आर्य आक्रमणाचा सिद्धांत - एक दिशाभूल ! (भाग-२) | श्री. वासुदेव बिडवे | Falsified Aryan Invasion

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • आर्य हे मूळचे भारतीय नाहीत, ते आक्रमण करून भारतात वसले, असा कांगावा सतत चालू असतो. पण ह्यात तथ्य आहे कि नाही? ह्यावर आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत, अनेक वृत्तपत्रातून ह्या विषयावर लेख लिहिणारे प्राच्यविद्या अभ्यासक श्री. वासुदेव बिडवे.
    विषय : आर्य आक्रमणाचा सिद्धांत - एक दिशाभूल ! (भाग-२)
    Aryan Invasion - Misguided Theory ! - Shri Vasudev Bidve
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Комментарии • 86

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 Месяц назад +2

    राष्ट्र सेवक चे खुप आभार. वासुदेव बिडवे यांचे तरुण भारत मध्ये लेख वाचले होते. पाश्च्यात्त लोकांनी पसरवलेली चुकीची माहिती खॊडून काढायला यांच्यासारखे लोक पुढं येते आहेत हि खूपच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
    फक्त मी येथे एक नमूद करू इच्छितो बिडवे यांचे टिळकांच्या बाबतीतील काही संदर्भ बरोबर नाहीत (बोलण्याच्या ओघामध्ये असे झाले असण्याची शक्यता आहे ) ते असे कि
    लोकमान्य टिळकांनी मंडाले च्या कारागृहात गीतेचा अभ्यास करताना ओरायन लिहिलेले नाही. मंडालेच्या कारागृहामध्ये टिळक ओरायन ची पुढील सुधारित आवृत्ती बद्दल लिखाण करीत होते ज्याचा उल्लेख टिळकांच्या Vedic Chronology and Vedang Jyotish, मध्ये नमूद केले आहे (पान १६७,Orion outlines for recast, Recast with additions - Book requires almost to be re-writen in order to incorprate new materials made available since 1893 and new results- आणि पुढे २८ संदर्भ आहेत) आणि टिळकांनी १९११ साली लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख आहे. टिळक म्हणतात "...हे पुस्तक म्हणे जुने ओरायनच. पण सुधारलेले, वाढिवलेले, चुका काढून टाकलेले. तात्पर्य जुन्या ग्रंथाचे स्वरूप इतके पालटणार आहे कि त्याला नवी आवृत्ती काढताना नवे नाव दिलेलेच बरे". याच बरोबर Arctic Home च्या नवीन आवृत्ती साठी सुद्धा टिळक लिहितात "For revising the book the following new works ought to be consulted" आणि पुढे १३ पुस्तके आणि १९ पत्रकांची संदर्भ दिले आहेत. Arctic Home is the sequel of Orion,असा Arctic Home च्या Preface मध्येच उल्लेख आहे.
    ओरायन पुस्तकाचा सारांश London Oriental Congress मध्ये १८९२ सालीच प्रकाशित झाला होता (मंडालेच्या १६ वर्ष आधी). पुस्तकाच्या Preface च्या शेवटी साल नमूद केले आहे १८९३. preface मधेच उल्लेख आहे "About four years ago, as I was reading the Bhagavad Geeta,.....This led me to inquire into the primitve Vedic Calendar and the result of four years". . त्यातून ४ वजा केले म्हणजे होतात १८८९. त्याकाळी कॉलेज मध्ये गणितविषयात ज्योतिर्गणित सुद्धा समाविष्ट केलेले होते, टिळकांना गणितामध्ये विशेष गती होती आणि केरूनाना छत्रे यांच्या सारखे गुरु होते ज्यांच्यामुळे ज्योति:गणितामध्ये टिळकांना रुची निर्माण झाली. त्यामुळे ओरायन च्या लेखनाआधी टिळकांना परांचनगती माहित नव्हती हे म्हणणे धाडसाचे होईल
    Max Muller याना टिळकांची ओळख Orion च्याच प्रकाशनानंतर झाली. Arctic Home (1903) च्या preface मध्ये टिळक लिहितात ".. Prof Max Muller who knew me only as the author of Orion...." म्हणजे १८९२ नंतरच. त्याच Preface मध्ये टिळक म्हणतात "..much of my spare time during last ten years has been devoted to the search of evidence which would lift up this curtain and reveal to us the long vista of primitive aryan antiquity. याचा अर्थ ओरायन च्या प्रकाशनानंतर (१८९३) नंतर लगेच Arctic Home च्या संशोधनाला सुरुवात झाली.
    Max Muller यांनी जी ऋग्वेद भाषांतर पाठवली त्या वेळी टिळक तुरुंगात होते (१८९७) हे अगदी बरोबर पण ते मंडाले मध्ये नव्हते. फक्त त्यांना Max Muller यांच्यामुळे ऋग्वेद हाती मिळाले व सरकारने त्यांना रात्री काही काळ ते ऋग्वेद आणि बाकी पुस्तके वाचनाची परवानगी दिली आणि तेव्हा टिळकांनी ऋग्वेदामधील Arctic सिद्धांताला पुष्टी देणारे परिच्छेद एकत्र केले. Max Muller यांनी वेदांचा काळ भाषाशास्त्रानुसार इ.स.वि.सन पूर्व १२०० ठरवला होता. Orion प्रकाशित झाल्यानंतर त्या कालनिर्णयाला तडा गेला
    त्यामुळे Max Muller यांच्या ऋग्वेद च्या भाषांतरामुळे नाही तर त्यानी केलेल्या वेदांच्या चुकिच्या कालनिर्णयामुळे टिळकांनी या विषयावर संशोधन केल हे म्हणणे योग्य ठरेल
    संदर्भ -
    लोकमान्य टिळक यांचे चरित्र खंड १ - न. चिं. केळकर
    Orion or Researches into Antiquity of Vedas
    The Arctic Home in the Vedas
    Vedic Chronology and Vedang Jyotish

  • @BVM555
    @BVM555 Год назад +22

    हा व्हिडीओ म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे.किती सुक्ष्म अभ्यास आणि निरिक्षण, अप्रतिम!!!!!अनेक धन्यवाद

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 5 месяцев назад +2

    बिडवे सरांचे खुप खुप आभार.खूप सखोल माहिती सांगितली आहे.🙏🙏🙏🙏🙏

  • @kaangoshty
    @kaangoshty Год назад +9

    राष्ट्र सेवक चॅनेलचे अगदी मनापासून आभार
    अतिशय स्तुत्य उपक्रम
    बिडवे सरांचे आणखीन अशाच प्रकारची आणखीन बौद्धिक अपलोड करावेत अशी विनम्र मागणी 🙏🙏
    निलेश ओक सरांचा यात उल्लेख केला आहे. रामायणाचे कालखंड सांगणारे त्यांचे संशोधन खरोखर लखलखीत प्रकाश दाखवणारे आहे
    बिडवे सरांचा अनेक ज्ञानशाखांचा सखोल अभ्यास आणि योग्य सुचक मांडणी खरोखर मार्गदर्शक ठरले . अतिशय क्लिष्ट विषयही सोप्या पद्धतीने सरांनी हाताळून याबाबत प्रामाणिक मत मांडले आहे. अगदी मनापासून हा व्हिडिओ आवडला
    राष्ट्रसेवक चॅनेलचे पुनश्च आभार आणि धन्यवाद
    तसेच अनेकोत्तम शुभेच्छा 🙏🙏

  • @rockingnation
    @rockingnation Месяц назад

    बिडवे सर तुम्ही जनुकशास्त्रा सारखा अत्यंत किचकट विषय खूप सोपा करून सांगितला आणि खूप साऱ्या शंका दूर केल्या त्याबद्दल धन्यवाद.

  • @paraggujarathi7399
    @paraggujarathi7399 Год назад +29

    या संशोधनाचा उपयोग ,खोटी मनुस्मृती ,आबेडकर फुले महोदयांचे गैरसमज आणि पर्यायाने दलित चळवळी ,दक्षीणेकडील तमिळ लोकांचे द्राविडी चळवळी यांना उघडकीस आणण्यास पण केला जावा ,

    • @rahulketechnovlogs2805
      @rahulketechnovlogs2805 Год назад

      are shembdya ambedkari chalwal hi tumchya bhangadi Open karayla ahe .tu tyanche gairsamaj für karnyachi patrata nahi..
      shembdyano kuthali gosht kuthali jodaych Ani navinach dakhwaych ...
      Arya Invasion theory khiti mhanaych ...are Band Kara ...
      kalganana kashi kanishkane keli

    • @paraggujarathi7399
      @paraggujarathi7399 Год назад

      @@rahulketechnovlogs2805 एवढा त्रागा ,सत्य कटू असते ,आंबेडकर फुले ही राजकारणाने महान केलेली व्यक्तिमत्व आहेत ,तयार संविधानाच्या द्राफ्ट वर मन मानी एडिट करने हेच काय त्यांचं योगदान ,बाकि सगळा ठणाणा . 180 वर्षा पेक्षा जुनी मनुस्मृती सापडत नाही ,खोटी मनुस्मृती हाती घेऊन नुसता हैदोस घातला त्यांनी ,राजकारण केलं ,खरी मनुस्मृती तर आजचे संविधान ,जी जन्मजात जातपात पाहून पात्रता ठरवते ,आरक्षणाची मलाई लाटून गब्बर झालेले आजचे तुमच्या सारखे नवं ब्राह्मण हीच खरी देशाची समस्या आहे ,हा रतीब चालू ठेवण्या साठीच तर पाहिजे आर्य इनव्याजन थियरी ,नकली मनुस्मृती च्या नकली कथा ,भेदभावाच्या खोट्या गोष्टी ,आता कर त्रागा दे मारून स्वतःच्या थोबाडीत .देव सद्बुद्धी देवो

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +2

      @@rahulketechnovlogs2805 भाऊ कनिष्क कोन होता?

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 Год назад +6

      स्वतः डाॅ. आंबेडकरांनी " आर्य भारतात आले " ही संकल्पना नाकारली आहे

    • @AMULTM23
      @AMULTM23 Год назад

      ​@@milindrokde7233❤

  • @Moksha31
    @Moksha31 Год назад +6

    कधीपासून वाट बघत होतो.धन्यवाद 👍👍👍👍👍

  • @sanjayselukar8782
    @sanjayselukar8782 Год назад +4

    अतिशय उपयुक्त शास्त्रोक्त माहिती

  • @prabhatagency6264
    @prabhatagency6264 11 месяцев назад +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 9 месяцев назад +1

    खुप सखोल संशोधन समोर मांडण्यासाठी धन्यवाद 🙏

  • @winner0073
    @winner0073 Год назад +6

    अप्रतिम, अवर्णनीय, निःशब्द......

  • @jitendragirase3668
    @jitendragirase3668 9 месяцев назад +1

    अत्यंत अभ्यास पूर्ण

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 Год назад +7

    खूपच छान 👍... योगी श्री अरविंद ह्यांनी देखील आर्य मूळ भारतीय होते हे सिद्ध केले होते...

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Год назад +1

      माफ करा आर्य म्हणजे कोणताही समाज नाही ,आर्य ही सदगुण वाचक संज्ञा आहे

  • @gurudini
    @gurudini Год назад +4

    सुरेख निरुपण

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 Год назад +4

    Kiti dnyan shakha hya ekas ek purak aahet.ekhadya samasyecha ulgada vhava mhanun sanvshodhak, tyanchye sanshodhan v vaidnyanikancha sukshm aabhyas hya saryana koti koti pranam. 🙏🙏🙏
    Arya Siddhanta baddal mahiti sangatana itarahi shastrachi mahiti dili jase samudrashastra etc .Dhanywad !!🙏🙏

    • @ashokdeshpande8695
      @ashokdeshpande8695 Год назад

      देवनागरीत लिहा ना! माझी भाषा, माझी लिपी, माझा अभिमान...👍

  • @SanataniJoe
    @SanataniJoe Месяц назад

    People are smart enough to know astronomers and astrology.

  • @kaustubhkale9597
    @kaustubhkale9597 Год назад +3

    कृपया श्रीकांत तळगेरीजींना आपल्या मुलाखतीसाठी बोलवावं ही विनंती.

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 5 месяцев назад +1

    छान

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 Месяц назад

    खरोखर समतेचा मंत्र दिला

  • @rmn5626
    @rmn5626 Год назад +1

    केवळ अप्रतिम

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 Год назад +4

    So precise and articulated

  • @lotanmore2536
    @lotanmore2536 11 месяцев назад +1

    सुंदर मांडणी.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Год назад +3

    फोडा - झोडा हे उत्क्रांत झालेल्या माणसांचा नियम आहे. स्वार्था साठी हा नियम संबंधित माणसे, गट, संस्था वापरत आहेत.

  • @anjalivaishampayan9243
    @anjalivaishampayan9243 Год назад +2

    सर खूप genius आहात तुम्ही 🙏

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 Год назад +2

    जय हिंद,जय सनातन 🇮🇳🚩

  • @user-wg8ts8fu6l
    @user-wg8ts8fu6l Год назад +2

    Sunder vivechan sarvadur prasidha hone avashyak aahe

  • @harshalshinde6052
    @harshalshinde6052 Год назад +4

    वयं सर्वे अमृतस्य पुत्रा:❤

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Год назад +3

    खुप प्रगल्भ विचार एकायला आवडले,मनापासून धन्यवाद

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Год назад +1

    धन्यवाद. आनंद वाटला

  • @vijaysutar8430
    @vijaysutar8430 Месяц назад +1

    जुनं ते सोनं / मुळ भारतीय लोक / ही म्हण खरीच आहे ,,
    सर्व शास्ञानुसार सिद्ध करुन दाखवता येते , या स्वरुपाचे vdo आणखी निर्माण करा ,,, नमस्कार
    सर्वाना vdo शेअर करा ,,

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 Год назад +8

    विशिष्ट धर्मग्रंथात पृथ्वीचा उगम चार सहस्र वर्षापूर्वीच सांगितला आहे तो सिद्ध करण्यासाठी ऋग्वेद ख्रिस्तपूर्व आठशे वर्ष फक्त आहे असं ठाम गृहीतक मॅक्सम्यूलर नं मांडले. ऋग्वेद जर चोवीस सहस्र वर्षापूर्वी सिद्ध होत असेल तर विशिष्ट धर्मग्रंथ खोटा ठरला असता.

  • @hemasparamparikrecipespara1200
    @hemasparamparikrecipespara1200 4 месяца назад +1

    🙏🙏

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 Год назад +7

    आर्य जर युरोपात ही गेले तर मग युरोपातील देशात आर्य विरुद्ध तिथले मूल निवासी असा प्रश्न का नाही उद्भवला

    • @Sanjay-gx2gd
      @Sanjay-gx2gd Год назад +1

      In such cases they use only Scientific terminology - like Population turnover.
      For India with latest evidences, it seems terminology used is further diluted - Now it is not Aryan Migration, it is Indo Aryan Arrival.

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 8 дней назад

      Tikade pan bhedbhav aahet...

  • @myfluffy9465
    @myfluffy9465 4 месяца назад +1

    👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 Год назад +10

    आपण दिलेली माहितीला पुष्टी देण्यासाठी ; इतर ' थेअरी ' कशा चूक आहेत, या बाबत कमीत कमी 10 एपिसोड तयार करावेत. वामन मेश्राम सारख्या लोकांची थोबाड बंद करावीत. धन्यवाद 🙏

    • @aniketlandge3826
      @aniketlandge3826 11 месяцев назад

      पहेल तू अपना 🧬 DNA टेस्ट करवा ले पहले

  • @uskhedkarjain
    @uskhedkarjain Месяц назад

    🙏

  • @universalenvirocare9134
    @universalenvirocare9134 Месяц назад

    सर, आपले आर्य आक्रमण सिद्धांताचे दोन्ही भाग ऐकले आणि शाळेत जे चुकीचे शिकवले होते की आर्य बाहेरून कॅशियस पर्वताच्या मार्गे आले होते त्याबाबतची सत्यता आज पन्नास वर्षांनंतर मला कळत आहे. सर आमची पिढी ह्या चुकीच्या अज्ञानात राहीली. पुढच्या पिढीसाठी तरी आपल्या संस्कृतीचे खरे ज्ञान शालेय शिक्षणात सरकार देईल का ?

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949 11 месяцев назад +1

    पूर्वाभाद्रपद नक्षत्रात सद्या वसंत संपात बिंदू आहे कालांतराने तो शततारका नक्षत्रात जाईल असे म्हणायचे आहे ना सरांना?

  • @abhijitjayade
    @abhijitjayade Год назад +1

    Thanks

  • @Vedic_Universe
    @Vedic_Universe Год назад +2

    Sarv mahiti khup Chan prakare sangitli pan aadar dene kahi thikani chukale sir Srikrishna Bhagwan he ishwar ahet Tynha respect madhe h bolvayla hav😔.Baki sarv mahiti khupach Chan😌🙏

  • @amitbhau
    @amitbhau Год назад +2

    मनुष्याचा जन्म आर्टिक क्षेत्रात दर्शवले म्हणून टिळकांना लोक नाव ठेवतात🤔

  • @aashishsaradeshmukh5727
    @aashishsaradeshmukh5727 Год назад +1

    प्रणाम सर, या सगळ्या गोष्टी आणि सौशोधन यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि काहीतरी योगदान करायची खूप इच्छा आहे पण योग्य मार्ग आणि मार्गदर्शन मिळत नाहीये. कशी सुरुवात करावी किंवा तुम्हाला भेटून ते कसे घेता येईल हे सांगितले तर खूप बरे होईल, नमस्कार

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад

      कृपया आम्हाला raashtrasevak@gmail.com वर ईमेल करा.

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 3 месяца назад

    Viewers please watch Nilesh Oak's videos on false Aryan invension theory

  • @shrirangjoshi377
    @shrirangjoshi377 Год назад +2

    अफ्रिका व भारत एकसंध होते .नर्मदा नदी

  • @Duravas
    @Duravas 11 месяцев назад

    sir, 1.arya itake juni sanskruti ahe tar arya lokanchi loksankhya itaki kami ka 2. Arya jar mul samajle tar ved, sanatan, itaka powerful, eknishta, tatvawadi asunpan apan sarvajan aryan ka nahi. kamit kami 50% tar asayale have jar hajaro varshapurvicha dakhala milat asel tar.

  • @bhavanaarekar-qt8lb
    @bhavanaarekar-qt8lb Год назад

    Andharatun Prakasha kadhe gelya सारखं वाटल

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 5 месяцев назад

    वेदी आणी यज्ञ हा फरक काय ? हे जरा व्यवस्थित समजून सांगा.

  • @tkva463
    @tkva463 Год назад

    टोनी जोसेफ ह्यांनी आपल्या 'Early Indian 'ह्या पुस्तकात Aryan Invision theory मांडली आहे.मात्र ते सुद्धा अंतिम निष्कर्षका पर्यंत पोहचत नाही. मात्र ईथले द्रविडियन, आदिवासी हेच खरे ह्या देशाचे मुळ निवासी आहे, असे प्रतिपादन करतात.

    • @narendratendolkar261
      @narendratendolkar261 Год назад +1

      तथाकथित मूलनिवासी, आदिवासी देखील बाहेरूनच आलेत. सर्वांचे मूळ निवासस्थान आफ्रिकाच आहे.

  • @meerashenvi3165
    @meerashenvi3165 11 месяцев назад

    Bhagirath was 30generations before Ram
    Parshuram was before Ram
    Prahlad and Bali and Batu Vaman was before Parshuram
    That highlights civilisations were very much existing
    Our ignorance and blind belief in western intelligence stopped us from believing these facts and accept that Aryans are outsiders

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev Год назад +1

    अत्यंत उत्तम माहिती....पण प्रचलित इंग्रजी शब्दांना सुयोग्य मराठी प्रतिशब्द असताना उगाच इंग्रजी शब्द का वापरले आहेत ..ते कळत नाही..मुलाखत घेणारी‌ मुलगी तर विचित्र मराठी बोलते.. मराठी व्याकरण वापरून इंग्रजी बोलते असे म्हणायला हरकत नाही..

    • @samidhakothe62
      @samidhakothe62 Год назад +1

      मला असं वाटतं आपण मुख्य विषय न बघता जे चुक काय हेच बघायचे कां? किती उत्तम माहिती पुरवली

  • @babankamble8128
    @babankamble8128 Год назад

    Comment with science journy

  • @ssgd1717
    @ssgd1717 Год назад +2

    Carbon datings ला काय किंमत नाही...थोडक्यात. खगोलीय तारखा महत्वाच्या आहेत.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Год назад +1

    Bramhan khota etihas rachnyat number one aahe,khote bolane retun bolane,puran rachane bhakad katha rachane v to etihas mhanun sangne hech kam kele.pali dhamma lipi vacnyachi akkal ya vidwanhanha mahiti nhavati,aata shahanpana shikavat aahe

    • @Seeema22
      @Seeema22 11 месяцев назад

      Barobar तुम्ही बरोबर आणि..ही शिकलेली माणसं चुकीची.... त्यांनी सांगितलं ते ऐकलं नाही..का..carbon dating ने... आपल्याला कालखंड ठरवता येतो... माणसावर नाही.. किमान विज्ञानावर तरी विश्वास ठेवा... ब्राह्मण ब्राह्मण काय करता...अजून जातीतच अडकला आहात... समोरच्याची जात इतकी महत्वाची आहे काय.... तुम्हाला... ब्राह्मण म्हणून हिनवणे...हा जातीभेद नव्हे का.. महाशय

    • @hrk3212
      @hrk3212 10 месяцев назад

      ब्राह्मण खोटे lihitat असे तुम्हाला वाटते पूर्वग्रहदूषित vicharanmule...pan Dr Ambedkar tar Brahman नव्हते tyani tyanchya who were shudras chapter 4 madhe Arya Bharata baherun aale नाहीत हे sangun Aryan invasion theory khodun काढली आहे ते वाचा

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Год назад +1

    Vedic people were fish eating Brahmins who made Indus civilization

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 8 дней назад

      Nahi te Kayashta mhanje shak dwipi bramhins aahet

  • @akshaydhekale123
    @akshaydhekale123 Год назад

    😂😂😂😂 जातीवाद अन्ग्रेजो की देणं है ये बता कर प्राचूसंशोधक अपने ज्ञान का प्रमाण दे चुके है , पता नही अन्ग्रेजो की translatede किताबे पड कर सवर्ण मनुवादी आंबेडकरजी के साथ जातीवाद करते होगे 😂😂😂😂
    इसी ज्ञान की वजह से हजारो सालो से विज्ञान वेदो से बाहर नही आ पाया