इथे होकायंत्र दिशा चुकते | देवाचे गोठणे मधील कातळशिल्प | Petroglyphs of barsu | श्री भार्गवराम मंदिर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2022
  • कातळशिल्प देवाचे गोठणे, बारसू
    कोकणच्या कातळसड्यांवर आदिमानवाने अनेक गोष्टी कोरून ठेवल्या आहेत. त्यातीलच एकमोद्वितीय असे कातळशिल्प म्हणजे देवाचे गोठणे येथील रावणसड्यावरील कातळशिल्प. या कातळशिल्पावर असणारे चुंबकीय क्षेत्र त्याला जगातील सर्वात वेगळे असे स्थान बनवते. इथे आल्यावर तुमचं मन विचारांच्या गुंत्यात सापडतं. ही एखादी वैद्यकीय उपचाराची प्रणाली होती का...? का इथे मानवकृती कोरली असेल...? चुंबकाचा शोध लागायच्या आधी १०००० ते १५००० वर्षांपूर्वी इथे चुंबकीय क्षेत्र आहे हे आदिमानवला कसे कळाले असेल...?
    कातळशिल्प पहायचे झाल्यास देवाचे गोठणे आणि बारसू मधील कातळशिल्पे आपण पाहायलाच हवीत. राजापूरचा हा भाग म्हणजे नारळी पोफळीच्या बागा, कुळागारे, त्यातून वाहणारे झरे, नद्या, जुनी कौलारू घरं, आपलं ऐतिहासिक रूप संभाळलेली मंदिरं आणि कातळसडे असे निसर्गाचे अप्रतिम रूप. बारसू सोलगाव चा कातळसडातर अजून वेगळा आहे. जांभ्या दगडाचा एवढा मोठा थर इतर कुठेही सापडत नाही. याच कातळसड्यावर काही एकमोद्वितीय कातळशिल्प आदिमानवाने कोरून ठेवली आहेत. त्यांच्याच शोधत मी येऊन पोहोचलो देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिराजवळ.
    कातळशिल्प पाहायला सुरुवात केली की आपण कसे त्यांना पाहायला व्याकुळ होतो. याच गमतीवरचा भन्नाट व्हिडिओ. व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या सोयीसाठी या ठिकाणांचे चुकीचे Google Location बरोबर करून खाली देत आहे.
    श्री भार्गवराम मंदिर (देवाचे गोठणे):
    maps.app.goo.gl/6ALbEzwkHuTZP...
    रावणसड्यावरील कातळशिल्प (देवाचे गोठणे):
    maps.app.goo.gl/GBjyrMsE2RD1t...
    बारसू मधील कातळशिल्प:
    maps.app.goo.gl/XiAekkrxQyPnE...
    Barsu petroglyphs
    maps.app.goo.gl/6CoFzKZcGgGYe...

Комментарии • 5

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Год назад +1

    कोकणातील सर्वच मंदिरं आपलं एक वेगळपण दाखवतात

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 года назад +1

    Khup Chan

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद...☺️🙏
      कोकण म्हणजे निसर्गाच्या सर्व छटा असणारी संपूर्ण भूमी. पण इथली बरीच ठिकाणं अजून ही लोकांसाठी अपरिचितच. याच सुंदर ठिकाणांना लोकांपुढे आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना share करा. अशाच सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe केलेच असेल, आपल्या आप्तजनांना ही चॅनेल ची ओळख करून द्या.
      आपले प्रोत्साहन आमच्यासाठी प्रेरणा आहे, असेच प्रोत्साहन देत राहा.☺️

  • @chinmaysande2864
    @chinmaysande2864 2 года назад +1

    Wah dada💯💯💯

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏