देवीहसोळ कातळशिल्प | श्री आर्यादुर्गा मंदिर | कोकणातील सर्वात मोठी बारव | Petroglyph of Devihasol

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2022
  • 🍂 आदिमानवाचं कातळस्वप्न 🍂
    कोकणात सडा म्हंटले तर डोळ्यासमोर उभे रहाते ते वैराण, रखरखीत भूप्रदेशाचे दृश्य. सरकारी दप्तरी अकारण बॅरन लँड म्हणून संबोधले गेलेले कातळपड आणि पोटखराबा क्षेत्र. जांभा खडकांचे कातळ सडे हे दक्षिण कोकणाचे खास वैशिष्ट्य.
    हजारो वर्षांचा मानवाचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या या रचना आणि आपल्या अंगावर या रचना बाळगणारा सडा भारत देशाचा आणि एकूणच मानवी उत्क्रांतीचा खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आहे .
    वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपले वेगवेगळे रूप दाखविणारा हा सडा पावसाळ्यात वेगळेच रूप धारण करतो. सड्यावर पाण्याची लहान मोठी तळी निर्माण होतात. जवळपास 30 पेक्षा अधिक गवताच्या प्रजाती आणि 150 पेक्षा अधिक प्रजातींच्या रंगीबेरंगी कातळ फुलांनी हा परिसर खुलून जातो. हे सौन्दर्य अनुभवताना आपण भारावून जातो.
    उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत भासणाऱ्या दक्षिण कोकणातील सड्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. पावसाचे पडणारे अधिक तर पाणी हे सडे आपल्या पोटात सामावून घेतात. आणि हे पाणी पुढे जवळपास वर्षभर सड्याचा कुशीतील गावांची पाण्याची तहान भागवतात. सड्यांवर मातीचे प्रमाण कमी असले तरी सड्यांच्या उताराच्या बाजूंवर मात्र मिश्र जंगले आढळून येतात. या जंगलांची जागा आता आंबा काजूच्या बागांनी घेतली आहे.
    देवीहसोळ गावामध्ये श्री आर्यादुर्गा देवीच्या मंदिराभोवती असणाऱ्या कातळसड्यावर खूप सारी कातळशिल्प आदिमानवाच्या अस्तित्वाचा पुरावा देतात. याच परिसरात बारमाही झरे, जांभ्या दगडात कोरलेल्या विहिरी आहेत. कोकणात मी पाहिलेली सर्वात मोठी विहीर किंवा बारव इथेच आहे. तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसेल असेच हे ठिकाण. इथे यायचे झाल्यास श्री आर्यादुर्गा देवी मंदिर भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय आहे. इथे राहणे म्हणजे निसर्गाच्या अगदी कुशीत राहण्याचा अनुभव. भक्तनिवास Booking साठी संपर्क खाली देत आहे.
    श्री रमेश विचारे (मंदिर संस्था अध्यक्ष): 7021739992
    श्री महेंद्र विचारे ( व्यवस्थापक): 9404151883
    इथे काय काय पहायचे:
    02:41 Shri Aarya Durga temple Devihasol
    maps.app.goo.gl/tSMPNkbPeNYSB...
    03:12 Petroglyphs of Devihasol
    maps.app.goo.gl/WNhxccWJumtQg...
    07:53 बुनगीच्या पऱ्याचे मोठे झरे
    maps.app.goo.gl/Z72vsuCtJTUAo...
    10:53 Petroglyph बुनगीच्या सड्यावरील कटाळशिल्प maps.app.goo.gl/RcMqeodcnrviJ...
    12:10 कोकणातील सर्वात मोठी विहीर(बारव)
    maps.app.goo.gl/YT9mcpEnZ5Hxk...
    14:35 मंदिराशेजारची बारव देवीहसोल
    maps.app.goo.gl/NWZwxyy7rtHMw...
    17:27 देवीचा गुडघा
    maps.app.goo.gl/etQ45ozFtTNyr...
    18:10 Petroglyph मंदिरासमोरचे कातळशिल्प
    maps.app.goo.gl/mQubTBfbA8DVL...
    सर्व ठिकाणे कशी वाटली हे comment करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला Like आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका.

Комментарии • 9

  • @sachinbhovad1152
    @sachinbhovad1152 Год назад +1

    👌

  • @chinmaysande2864
    @chinmaysande2864 2 года назад +1

    💥💥💥💥💯💯

  • @paragpetkar14
    @paragpetkar14 2 года назад +1

    Mast video ❤🥰😍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏

  • @ushamaskar8116
    @ushamaskar8116 2 года назад +1

    कोकणाचं सौंदर्य जेवढं न्हाळलं जाईल तेवढं कमी💐✌️ अप्रतिम कातळशिल्प

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...😊🙏

  • @narendravichare
    @narendravichare 2 года назад +1

    मित्रा, आमच्या देवीहसोळ गावातील हा कातळ शिल्पाचा आणि पुरातन विहिरींचा अमूल्य ठेवा अत्यंत उत्तम रीतीने जगासमोर आणल्याबद्दल आमच्या गावा तर्फे मनापासून धन्यवाद.. 🙏🙏❤️🌷🌷❤️😊😊

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद सर,
      आपल्या कोकणातील अशी सुंदर ठिकाणे लोकांसमोर येऊन त्यांचा विकास होणे काळाची गरज आहे. मी पहिल्यांदाच या गावाला भेट दिली पण जणू गावाच्या प्रेमातच पडलो. गावातील फक्त एक कातळशिल्प लोकांना माहिती आहे. गावातील इतर सुंदर ठिकाणे ही लोकांना माहिती होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
      चॅनेल नक्की Subscribe करा.
      आपले सर्व व्हिडिओ हे अपरिचित ठिकाणांची भेट घडवणारे आहेत. त्यांचा आनंद घ्या आणि त्या अपरिचित वस्तूंना प्रसिद्धी देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना share करा. ☺️🙏