कोकणातील प्रतिकेदारनाथ मंदिर पाहिलंय का तुम्ही...? | संगमेश्वरमधील प्राचीन मंदिर समूह |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2022
  • 🍂संगमेश्वर मधील प्राचीन मंदिर समूह🍂
    चालुक्य काळात दक्षिण काशी असे महत्व प्राप्त झालेल्या संगमेश्वरच्या पवित्र भूमीत चालुक्य राजा कर्ण याने जवळजवळ तीनशे साठ मंदिरे बांधली. यापैकी कित्येक मंदिरं परकीय आक्रमणात पाडली गेली, कित्येक आपण केलेल्या दुर्लक्षामुळे पडली, काही अजून ही जशास तशी उभी आहेत तर काही शेवटच्या घटका मोजत आहेत. उत्कृष्ठ स्थापत्य, अप्रतिम शिल्पकाम आणि स्वतःचे सौंदर्य वैभव असलेली अपरिचित मंदिरे आत्ता आत्ता काही लोकांमुळे प्रकाशात येत आहेत. यापैकी श्री कर्णेश्वर मंदिर, श्री सूर्यदेव मंदिर आणि श्री संगमेश्वर मंदिर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवला आहे. याशिवाय श्री सोमेश्वर मंदिर, श्री काशी विश्वेश्वर मंदिर आणि अजून काही मंदिरे झाडाझुडपांनी वेढून गेली आहेत.
    दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने श्री सोमेश्वर मंदिर आणि श्री काशी विश्वेश्वर मंदिर परिसराची सफाई करून ही मंदिर मोकळी करण्यात आली त्याबद्दल दुर्गवीर प्रतिष्ठानचे मनःपूर्वक धन्यवाद.
    या पुरातन वस्तूंना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पुरातत्व खात्याचे लक्ष जाण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
    "गद्धेगळ" आणि त्याचा अर्थ
    गद्धेगळ हा शब्द गाढवाचा दगड ह्या अर्थी आला. गद्धेगळीला गडदू असे ही म्हणतात. गाव उत्पन्न किंवा जमीन दान एखाद्या किल्ल्यासाठी किंवा मंदिरासाठी दिले तर तशा जमिनीवर गडदू ठेवण्याची पद्धत होती. या शिलेवर चंद्र, सूर्य, गाढव आणि मानवाकृती कोरण्यात आल्या आहेत. चंद्र, सूर्य यांचा अर्थ जे दान देण्यात आले आहे ते आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत चिरकाळ राहो असा होतो. तर गाढव आणि मनुष्याकृती ही संकर आकारात दाखवण्याचा अर्थ जो ह्या दानाला विरोध करेल त्याचा संकर गाढवाशी होईल (त्याला गाढव लागो) अशा अर्थाचा अपशब्द होतो.
    मंदिर परिसरात, किल्यांवर किंवा गावामध्ये वीरगळ, सतीशीळेसोबतच गद्धेगळ ही पाहायला मिळतात.
    इथे कसे पोहोचाल:
    Someshwar Mandir Kasba
    maps.app.goo.gl/3mQaH3tuG5vHS...
    Kashi Vishweshwar Temple
    maps.app.goo.gl/c71VvKfpaGM1F...

Комментарии •