श्री आंबेश्वर देवराई, आंबा | किर्र झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि त्यामध्ये मिळणारी मनःशांती |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2022
  • श्री आंबेश्वर देवराई,
    देवाच्या नावाने राखलेले पवित्र वन म्हणजे देवराई. देवाची राई अर्थात देवासाठी राखलेली जमीन. त्या जमिनीवरील झाडं, दगड, माती अगदी कण अन कण देवाचा, देवाच्या मालकीचा. या राईत प्रत्येकाला अभय आहे, देवतेनं दिलेलं संरक्षण कवचच जणू. म्हणूनच फक्त सह्याद्रीतच नव्हे तर संपूर्ण भारतात या देवरायांचे अस्तित्व आढळून येते. वनस्पती संपदेबरोबरच अनेक पशुपक्षांचे हे आश्रयस्थान आहे. देवराईतील वनस्पती तोडणे हा जसा गुन्हा मानला जातो तसंच इथल्या पशुपक्षांना इजा पोहोचवणे अथवा त्यांची शिकार करणे हा देखील मोठा अपराध समजला जातो. साहजिकच जंगलाला लागून असणाऱ्या देवरायांमध्ये विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना अभय मिळते. खरंतर या देवराया म्हणजे जैवविविधतेच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षाचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत आहोत. लोक संस्कृती आणि पर्यावरणातील महत्वाचा घटक असलेली ही देवाची राई जोपासण्याठी आपणा सर्वांची गरज आहे.
    * देवराईचे पावित्र्य राखा.
    * देवराईत प्लास्टिक कचरा करू नका.
    * व्यसन करू नका.
    * देवराईतील प्रत्येक गोष्टीवर इथल्या सजीवांचा हक्क आहे म्हणून पाने, फुले, फळे तोडू नका.
    कसे पोहोचाल:
    Ambeshwar Devrai
    maps.app.goo.gl/VosaemLBfSL8x...
    राहण्याची व जेवणाची उत्तम सोय:
    Go-kul Holiday Resort
    plot 170 National Highway 204, Talavade, Amba, Maharashtra 415101

Комментарии • 3

  • @chinmaysande2864
    @chinmaysande2864 2 года назад +2

    👍🏻👍🏻💥💥💥

  • @sangrampatil5869
    @sangrampatil5869 2 года назад +1

    भाऊ पावणखिंड चा व्हिडिओ कधी टाकताय वेट करतोय

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      Lavkarach.... Vategao jogani utsav yetoy adhi... Mg pawankhind... Yetya shanivari pawankhind yeil...