कोकणातले सुंदर कर्णेश्वर मंदिर, सप्तेश्वर मंदिर | Karneshwar & Sapteshwar Temple in Sangameshwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • आज मी आहे माझ्या गावी - निवळी, संगमेश्वर मध्ये. संगमेश्वर मध्ये संगमेश्वर मंदिर, कर्णेश्वर मंदिर आणि सप्तेश्वर मंदिर खूप पाहण्यासारखी देवस्थाने आहेत. आज आपण जातंय तिकडेच दर्शन घ्यायला. सकाळी आम्ही चहा नाश्ता करून निघालो संगमेश्वराच्या दिशेने. पहिले पोचलो संगमेश्वर कर्णेश्वर मंदिर, कसबा या ठिकाणी. तेथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून निघालो पुढे सप्तेश्वरच्या दिशेने. मधेच शास्त्री पुलावर नाश्ता केला. सप्तेश्वर मंदिर पोचता पोचता संध्याकाळ झाली होती. इथले वातावरण म्हणजे सुखद अनुभव. माश्यासोबत पाण्यात खेळण्याची मज्जा इथे जरूर घ्यावी.
    रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता. सतराव्या शतकात शेख मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत संगमेश्वरातच कैद केले होते. या संगमेश्वरामध्ये कर्णेश्वर मंदिर आहे. याला सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले
    02:36 संगमेश्वर मंदिर, संगमेश्वर रत्नागिरी | Sangameshwar Temple, Sangameshwar Ratnagiri
    Google Guide : goo.gl/maps/UK...
    06:12 कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर | Karneshwar Temple / Mandir, Sangameshwar, Ratnagiri
    Hindu temple in Sangameshwar, Maharashtra
    मुंबई-गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेकडून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्रीकरण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आढळून येते. कर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती इ. स. १०७५ ते १०९५ या कालखंडात गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने केली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकेमध्ये हा कर्ण राजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली आहे.
    Google Guide : goo.gl/maps/RQ...
    09:26 छत्रपती संभाजी महाराज स्मारक, कसबा संगमेश्वर | Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak, Kasba, Sanagameshwar
    Google Guide : goo.gl/maps/CL...
    12:06 सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वर, रत्नागिरी | Sapteshwar Mandir / Temple, Sangameshwar, Ratnagiri
    अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.
    मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगला डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर.
    सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्य़ाद्रीची मुख्य रांग आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे. इथून खरोखरच पाय निघत नाही.
    Google Guide :
    #SapteshwarTemple #KarneshwarTemple #SangameshwarTemple #SapteshwarMandir #KarneshwarMandir #SangameshwarMandir
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    S O C I A L S
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 48

  • @swatikadam5342
    @swatikadam5342 Месяц назад +1

    Chaan vatale mazya gavatil mandir dakhablya baddal

  • @सितारामजाधव-ग6श

    खूप छान मंदिर ऐतिहासिक मंदिरात दर्शनासाठी मस्त मजा आली अवीदादा

  • @siddheshpanchal4659
    @siddheshpanchal4659 2 года назад

    मंदिर खूप सुंदर आहे.🙏🙏🙏 Video mast banavla ahe.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад

    Beautiful old Temples , nature it at best , nice information .

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 2 года назад +1

    वाईट वाटले रस्ते पाहुन राजकारणी लोकांमुळे

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 2 года назад +1

    खूपच छान व्हिडिओ ... आमच्या गावच्या कर्णेश्वर आणि सप्तेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं .

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Chan mandire aahet

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 2 года назад

    खूप छान कोकण.दश॔न.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 года назад

    मस्त अविनाश, कर्णेश्वर मंदिर मी १९९५ ला बघितलं होतं, शास्त्री पुलाजवळ मुंबई साईटला लेफ्ट आहे,तिथे माझ्या मावसमेहुणीच्या लग्नाला आलो होतो तेव्हाची आठवण झाली खूप छान मंदिर आहे,खुप छान माहिती दिली 👌👌👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад

      धन्यवाद. जुन्या आठवणी ❣️

  • @rainbowfriendsfan7210
    @rainbowfriendsfan7210 2 года назад

    🚩🙏🙏

  • @akhilsurve8671
    @akhilsurve8671 2 года назад

    Nice video dada

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 2 года назад

    हे आमचं कुलदैवत लक्ष्मी नरसिंह

  • @anirudhganu6773
    @anirudhganu6773 2 года назад

    छान माहिती दिलीत. पुढच्या वेळी ह्या प्राचीन मंदिरांचे दर्शन नक्की करु 🙏🏼

  • @subhashkadam3515
    @subhashkadam3515 2 года назад

    Very nice vedio.enjoyed old & historical temples.nice narration.

  • @subodhsurve1891
    @subodhsurve1891 2 года назад

    Namskar

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 года назад

    1no video bhava ❤️❤️👍👍

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 года назад

    Om nama shivaay. Mast sunder mandire aahet

  • @rameshkhambe8689
    @rameshkhambe8689 2 года назад

    Khup chan video bhava

  • @k2bole902
    @k2bole902 2 года назад

    Khup Chhan Video 👌👌👌

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 года назад

    Chan 👍

  • @truptighole3568
    @truptighole3568 2 года назад

    Dada amhi clg la astana gelelo ya mandirat...
    Khup mst ahe...

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 2 года назад

    Nice video🌹💐👌👍🙏

  • @subhashparit1885
    @subhashparit1885 2 года назад +1

    S for Satish, निखिल आणि अविनाश एकत्रित Meet up घ्या म्हणजे एकाचवेळी सर्वांची भेट होईल

  • @vikasghadshi8764
    @vikasghadshi8764 2 года назад

    Chan

  • @rforraut7046
    @rforraut7046 2 года назад

    HAPPY new years

  • @priyankagaikwad9298
    @priyankagaikwad9298 2 года назад

    सरदेसाई चा वाडा आहे का

  • @akshaybandbe7974
    @akshaybandbe7974 2 года назад

    Mast re dada te Rajesh padye aamchya gavi rahtay

  • @atmaramkhapane3073
    @atmaramkhapane3073 2 года назад

    Very nice video and information. Please give me information about bhari bhavani temple. My kuldevta.wheee is its main temple.

  • @rudralilandgevlog8550
    @rudralilandgevlog8550 2 года назад

    1 coment Avi

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 2 года назад

    NICE SAMI MUKADAM KARDE DAPOLI DOHA QATAR

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад

    Good Evening.Devdarshan masta milate tuzya vlog madhe.aani mahiti pan saavkaash detos.Maase paayala gudgulya karatat ka? Gaavala pahate kombada aarawato te mi gelya anek varshaat anubhavale naahiye.Bridge pan aahe ka tuzya gaavi ?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад

      धन्यवाद. हो bridge आहेत ना

  • @xxo27u
    @xxo27u 10 месяцев назад

    शिरंबे देवस्थान आहे

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 2 года назад

    Madhav patil dist Latur 🌹💐 Chan mahiti dili sambaji maharajachi sasurvadi srangarpur yesubaeche Maher dakva taynche vanshaj Kay kartat mulakath ghay khup Chan videos astat tumche abhinandan 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад

      धन्यवाद. हो नक्किच

  • @mohanmirgal5593
    @mohanmirgal5593 2 года назад

    Nice 👍 Avinash Dada tumcha nom Dya

  • @shrikantshetye1452
    @shrikantshetye1452 2 года назад

    Avi dada jakmata temple la nahi gela ka

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад

      नाही गेलो. पण एक स्पेशल Video लवकरच बनवेन

    • @shrikantshetye1452
      @shrikantshetye1452 2 года назад

      Thanks dada

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 2 года назад

    अविनाश तुझ्या आणि संदेशच्या गावी येणाच्या योग आला गणपतीपुळे आलो त्यामुळे गाव छान आहे रस्ता खूप खराब आहे. गणपतीपुळे तर फार खराब आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 года назад

      रस्त्याची condition खूपच खराब आहे