अगदी खरं ! दर वर्षी काही घरे बंद होत चालली आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. तसे काही तरी होवो आणि पुन्हा एकदा कोकणातलीच नव्हे तर पूर्ण भारतातली गावं खेडी गजबजून जावोत ! तो सोन्याचा दिन येवो ! जय जवान, जय किसान !
दादा.... तु खूप तळमळीने बोलतोस..... आम्ही आमच्या शहरी आयुष्यात खूप जास्त गुंतून गेलोय.... तुला असं बोलताना पाहिल्यावर मी कोकणातली असूनही असा विचार का नाही करू शकलो याचं वाईट वाटतं....निदान मला तरी......Hatts of to you 🙏
प्रसाद जास्त काही लिहायला आज सुचत नाहीये , कारण तुझ्या आजच्या विडिओने डोळ्यात पाणि आणल , ,खरा रानमाणुस जो कोकणाची जिवणशैली वाचवण्याचा प्रयन्त करतोय , तुला सलाम
मी आयुष्यात प्रथमच इतका कटू वास्तव सांगणारा दर्दभरा व्हिडीओ पाहिला नव्हे जीवाचे कान करून परत परत ऐकला. प्रसाद !! तुमचे वास्तवाचे कथन खरोखर मनाचा ठाव घेते.ह्रदयाच्या गाभार्यातून आलेल्या शब्दांनी जीव गलबलला . पण ह्यांच्या घरातील तरुणांनी जमीनीच्या लोभापायी स्वतःचीच नाती पायदळी तुडविली आहेत.दुर्दैवाने आज हे चित्र कोकणात घरोघरी पहावयास मिळतेय. त्यामुळेच परप्रांतीय कोकणात स्वतःचे पाय पसरू बघतोय.तिथेही मराठी कोकणी माणसाचे उच्चाटन होता कामा नये . भाऊबंदकीत हीच परिणीती होईल. तेव्हा "हे कोकणी माणसा !! सावध हो !! प्रसाद! तुम्ही आता भाऊबंदकी थांबविण्यासाठी पुन्हा एक जबरदस्त व्हिडीओ बनवा . व सर्व कोकणी माणसांना ,भावंडांना एकत्र आणा.कोकणी माणसं , कोकणी गावं आणि आपली कोकणी संस्कृती टिकवा. Prasad !! Best of luck 👍!!
शेवटची पिढी हे शिर्षक समर्पक आहे... ऐकून सासूबाईंची आठवण आली. आम्ही सुद्धा गावी घर बांधले आहे. आयुष्याचां अर्धा अधिक काळ मुंबईत घालवला पण त्या आता गावच्या हवेत समाधानाने राहतात. नव्वदीच्या वयात त्या कधी कधी आम्ही मुंबईत असल्यास एकट्या मोठ्या हिमतीने राहतात.एक नाळ जोडलेली आहे त्यांच्या भोवती आणि गावाभोवती सुद्धा . हया जुन्या पिढीची माणसे आपल्या अवतीभोवती असल्याने जगण्याचे बळ प्राप्त होते. छान बोलला आहेस तू, देव तुझे भले करो.
खरंच गावांना माणसांची गरज आहे..इच्छा असूनही गावी जाऊ शकत नाही...सणांना गावाला जायचे आणि आठवणी सोबत घेऊन यायचे एवढेच काय ते सुख..भविष्यात गावाला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही हे नक्की ..तुझी आत्मियता पाहून मन भरून येते..खूप पुढे जा..शुभेच्छा ❤
मित्रा प्रसाद,कोकणी रानमाणूस म्हणून कोकणाविषयी जी तुझी तळमळ पाहून मन भारावून जातो.असाच आम्हां कोकण्याना तू जागवत रहा.कधितरी तूझ्या हातात हात घालायची इच्छा होऊ दे हीच प्रार्थना!
🙏 दादा तुझी तळमळ थेट काळजाला भिडला,मी आज ६३ वर्षांचा आहे, माझ्या आजीच्या हातचं जेवण करून आज पन्नास वर्षे झाली,मला आजोळ मुकलं, पण मला अभिमान आहे मला कोकणातली पार्श्वभूमी आहे, तुला तूझ्या महान कार्यासाठी खुप खूप शुभेच्छा
बंधु तुझे प्रत्येक विषय हे जीवतोड आहे तुला हि कल्पना सुचणंं हि दैव देणगी असणार आहे .... अशीच माहिती पुर्ण व्हिडिओ करत रहा यामुळे थोडीफार जनजागृती होईल आणि थोडेफार जुनी परंपरा जागृत राहील ... खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
दादा, तुझ्या ह्रदयातून निघालेल्या भावना, तळमळ माझ्या ह्रदयापर्यंत पोहचली आणि प्रत्येक वेळी पोहचली. ह्रदय प्रत्येक वेळी पाझरले. शेवटची पिढी म्हणून जो नामोल्लेख केलास, तेव्हांच खलास झालो. कंठ दाटून आला. पुढे लिहीता येईना, मोबाईल धुरकट झाला.
दादू, किती ओतप्रोत भरलंय रे तुझ्यात... साधंसरळ जगणं! व्हॉइस प्रोजेक्शन इज सो इफेक्टिव, रादर इट्स सो रिअल! पण हेही खरंच... इट्स लास्ट जनरेशन... शेवटची! बाकी काही असो... जबरा फॅन झालो आपण! पण खरंच रे...
खरंच 😢, पुढची पिढी स्वतः पुरत बघणारी. दुसऱ्याशी काही घेण देण नसणारी त्यामुळे दुसऱ्याचे दुःख काय आहे हे समजत नाही. आता सुख सोयी भरपूर आहे पण समाधान कुठेच दिसत नाही.
आयुष्याच्या संध्याकाळी परतीच्या वाटेवर असलेल्या जुन्या पिढीकडून नेमके काय घ्यायला हवे आणि कसे घ्यायला हवे याबाबत अत्यंत मोजक्या आणि लाघवी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या तुझ्या भावना थेट हृदयापर्यंत पोहोचतात.....खुप छान.
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला............ ही तळमळ कशी असेल.....ह्याचा अनुभव आज तुझ्या बोलण्यातून जाणवला...... आपसूक डोळे भरून आले.... खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला
खूप छान..... मी कोकणातील आहे हे सर्व लहानपणी अनुभवले आहे.... माणसं प्रेमळ होती.... कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करायची.... माणुसकी, जिव्हाळा....कुठे तरी हरवला आहें....... आताची पिढी गणपतीला गावी येते... विसर्जन झाले कि त्याच रात्री पुन्हा शहरांत जाण्याची तयारी सुरु करतात... सकाळी ST मध्ये बसून.. टाटा, बाय बाय करतात.... पण त्या आजी चे डोळे मात्र पाण्याने भरलेले असतात.... पुन्हा एकटी....🙏🙏
Dev Karo dev tula changle aushya devo. I spend my entire life till date with hazardous chemicals for money. Being Malvani I appreciate your efforts for our culture
Bhai tu hya video madhun majyshi samor basun bolas As janvl Mala as kharch vatat hot Ki kahi tari ahe Aplya manushya jivnach muly tya vr apan boltoy Khrch bhava hatsoff you..
खुप सुंदर व साध्या शब्दात अंतःकरणानातुन गावा च्या संकृतीचे तुम्ही वर्णन केले ते अगदी मनाला...भावले भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन करणाऱ्या तुमच्या या प्रयत्नांना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
प्रसाद आजचो हो व्हिडिओ बघल्यार आमच्या बालपणाचो चलचित्रपट डोळ्यासमोरसून तरळूक लागलो. हीच म्हातारपणची पिढी आमी लहानपणापासूनच बघीत आयलसव. डोळ्यात पाणी हाडलय तू. उत्कृष्ट 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
प्रसाद, तुमचे खूप सारे व्हिडिओ पाहतो त्याचे मुख्य कारण तुझी प्रामाणिक तळमळ आणि आपुलकी असेल तुझा आवाज ! तू दाखवतोय तेव्हढे कोकण मी पाहिलेले नाहीये. या पुढे किती जमेल, माहित नाही, पण तुझ्या नजरेतून, तुझ्या भावनेतून कोकण जाणून घेणे, हा देखील खूप आनंद आहे रे माझ्या साठी !! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...
तुझा आजच्या विषयाचा विचार मी खूप महिन्या पासून करतोय,आज तो तू पण घेतलास भावा,छान वाटलं... ही जी जुनी माणसं आहे ना हाच पूर्वीचा कोकण आहे पूर्ण ...मनात खूप दुःख होत पुढे कस असेल आता..!!!.
किती छान रे प्रसाद! रानमाणूस चे सगळे व्हिडीओज मी बघत असते. मी स्वतः आता साठीला आलेय. मला कोकणचं प्रचंड वेड आहे. हे जे तू दसखवतोस ना, ते कोकण! तू सांगतोस ती सुशेगात जीवनशैली, हा निसर्ग, हे झरे, हेच जगणं मला प्रचंड प्रिय आहे अगदी लहानपणापासून. मी पुण्यातील सकाळ मध्ये मासिकातून लिहीत असते खूप. आणि बऱ्याचवेळी माझ्या कथा कोकणातील जीवनशैलीवर सुद्धा बेतलेल्या असतात. त्या अशाच एका कोकण कथेनं मला राज्यस्तरीय गो नी दांडेकर पुरस्कार मिळवून दिला.मी पुणेकर पण कोकणाची ओढ का कोण जाणे मला प्रचंडये. आणि हे तूझं कोकण प्रेम, हा निसर्ग, सुशेगात जगणं बघायला मला प्रचंड आवडतं. मी येते दरवर्षीच कोकणात. मला तुझ्या नजरेतून एकदा कोकण अनुभवायचंय. पण तू कुठे भेटशील माहीत नाही. म्हणून आजवर भेटले नाहीये. बघूया होतं का भेटणं. पण खूप छान वाटतं जेव्हाही मी रानमाणूस बघते. ☺️
खूप छान,काळजाला भिडणारे वर्णन,केवळ ब्लॉग म्हणून बोलणे नव्हे तर काळजातून आलेला नी काळजाला भिडणारा, गदगडीत झालेला आवाज. अप्रतिम वर्णन. विषय छान........ खूपच छान.
आपण जे काही सांगता आहात हे सत्य आहे. मी पण कोकणातील आहे. देवगड, अचारा, कांदळगाव. दरवर्षी न चुकता एप्रिल मे व जून पहिला आठवडा आम्ही आजोळी असायचो. सर्व कामे करायचो. खूप छान वाटायचं. कौलारू मोठे घर व आम्ही सर्व ३० भावंडं जमायचो. तांबड्या तांदळाचे मऊ भात, तूप मेतकूट, अंबोशीचे लोणचे, नाचणीची भाकरी त्यावर खोबरेल तेल, ओल्या नारळाची चटणी. खरच खूप छान आयुष्य
प्रसाद, तुझे निरीक्षण , अभ्यास, विश्लेषण अप्रतीम . हे वास्तव सत्य प्रत्येक कोकणातिल गावात आहे. मी पन्नास वर्षापूर्वीचा कोकण आणी आजचा पाहिला की दुःख होते. गावात माणसच नाहित. सगळी तरुणमंडळी बाहेर आणी कांही मोजक्याच घरांमध्ये तु सांगीतल्याप्रमाणे शेवटची पिढी दिसते. देव बरें करो.
दादा खरोखरच तू अंजन घातलास डोळ्यात..ती बंद घरं व मोजकीच आणि तीही म्हातारी माणसं पाहून गलबलून येत., म्हणून मी ठरवलय निवृत्ती नंतर शांत जीवन जगायचंय ..मी घर बांधतोआहे अशाच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.... सोडतोय हे शहर....
दादूस काय प्रस्तुतिकरण आहे तूझे, अप्रतिम,अफलातून ,अगदी हृदयातून जाणारे। मी वाशीगाव नवी मुंबईचा आहे,अस्सल कोकणी पद्धतीच्या गावात राहणारा आहे।पण आत्ता आमच्याकडे खुप विकास झाल्याने गावाचे गावपण निघून गेले आहे फक्त आमची आगरी भाषा तेवढी आम्ही टिकून ठेवली आहे।माझी आई सुद्धा 80 वर्षाची झाली आहे, माझ्या आई सारख्या ज्या कोणी आहेत त्या पारंपरिक वेशात वावरणाऱ्या शेवटची पीढी आहे। दादूस तू जे बोललास त्याने जुन्या आठवणीना उजाळा देताना डोळे भरून आले। तुझे शतशः आभार
खरं आहे तुझं म्हणनं, अगदी शंभर टक्के खरं. पण मोबाईलमध्ये हरवलेला तरुण वर्ग जेंव्हा जागा होईल तेंव्हा वेळ असेलच असे नाही. तुला प्रतिसाद देत तरुणांनी जास्तीत जास्त वेळ आपली संस्कृती जपण्यासाठी खर्च केला तर नक्कीच हि पिढी शेवटची ठरणार नाही.
खरं आहे दादा, मी देखील गावाला आहे. पण माझ्या वयाची पिढी 5 टक्के फक्त गावात राहते, नाहीतर बाकी सर्व मुबंई ला शिफ्ट झालेले. खरंच गाव ओस पडलीत 😢 फक्त आजोबा आजी घरात असतात. बाकी सर्व गावात शुकशुकाट असतो.
अजून ही वेळ गेलेली आठवणीची शिदोरी घेऊन ह्या सर्व माणसाच्या मनाचा शोध घ्या खूप काही दडलंय जे आपल्याला पुस्तकातून कधीच मिळणार नाही, जुन्या पिढ्या त्यांचे काम कसे जगायचे कुठे जायचे हे आज जे जे आहेत आपल्या आपल्या पिढीत त्याच्याकडून जाणून घेण्याची गरज आहे तरच वारसं आणि वारसा ह्यातील फरक समजून घेतला जाईल
प्रसाद ,निसर्ग अति शहरीकरण झाल्यामुळे रौद्र रूपं दाखवत आहे, लोकं आता कायमची आपापल्या गावी परतायची वेळ आली आहे, व्यसनं, junk food , आरोग्याला अति तांत्रिक गोष्टीने पोहोचलेली हानी ह्याने बेजार झालीआहेत, पण ही जुनी लोकं आपल्याला परत मिळणार नाहीत 😢
तुझे आभार मानावे तेवढे कमी प्रसाद दादा. तुझी निसर्गा बद्दलची ही तळमळ आणि कोकणाबद्दलचे प्रेम खरोखर कोतुकस्पद. सरकारने पण तुला साथ दिली पाहिजे रे, तुझे विचार मते समजावून घेतली पाहिजेत. बदलावं आणि विकास कोणाला नकोत पण त्यासाठी निसर्गाचे बलिदान नको. आज निसर्ग टिकला तरच आपण टिकून राहु. आपले अस्तित्व आणि पुढील जगणं हेय या निसर्गाच्या अस्तित्वावर च अवलंबून आहे.
भावा तू किती कळकळीने आणि विचारपुर्वक बोलतोस. तू कोकणी माणसाच्या भावनांना हात घालतोस.तुझ्या बोलण्यातला शब्दांशब्द खरा असतो..अशीच समाज जागृती करत रहा. तू खुप मोठं काम करतो आहेस. आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
बंधू आपणास मनापासून नमस्कार, खरोखर भुतकाळ व वर्तमान काळ याची भावनिक व प्रेमाने ओतप्रोत असा गोड तितकीच मनाला चटका व हि वयोवृद्ध आपली प्रेमळ माणसे भले ती कोणत्याही गावातील असो,पण या सर्वांचा काही काळा पुरतीच सोबत रहाणार या आठवणीने मन भरून आले, खरे तर गावी जाताना दोन्ही बाजूला बहुतेक घर बंद दिसतात व डोळ्यासमोर चित्र उभे राहते कि पडवीत उभे राहून कोणीतरी आवाज देत आहे नक्कीच माझी जीजी,आका,काकू, असणार पण क्षणात मन भानावर येते अरे येथे आता कोणीच रहात नाहीत,😢क्षणभर थांबून पुढे निघायचे असो बंधू, मनापासून धन्यवाद की या चित्रफिती व्दारे आठवणी जाग्या झाल्या पण काय करणार याला पर्याय काय। 😢असो.धन्यवाद।
शेवटची पिढी हे शिर्षक वाचून ऐकून डोळ्यातून पाणी आले. वाईट वाटले.
दादा़ तुझ्या प्रत्येक भावना तळमळ हृदयापर्यंत पोहचवली.
Sad but very true
खरं आहे... मलाही वाटत आता बस झालं हे शहरात असणार जीवन.. कोकण बोलावत आहे.. माध्यम आहे प्रसाद (रानमाणूस )
आपले विचार
आपली बोलण्याची पद्धत
खरच खूपच अप्रतिम दादा
आणि जे बोलत आहात ते खरोखरचं योग्य आहे
अगदी खरं ! दर वर्षी काही घरे बंद होत चालली आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. तसे काही तरी होवो आणि पुन्हा एकदा कोकणातलीच नव्हे तर पूर्ण भारतातली गावं खेडी गजबजून जावोत ! तो सोन्याचा दिन येवो ! जय जवान, जय किसान !
प्रसाद तू मनातून बोलतोस ते शब्द आणि शब्द हृदयात घर करतात तुझी ही संकल्पना मोठी मोठी होत जाऊ दे
मी जास्त काही बोलत नाही पण दादा तु देवमाणूस आहेस ❤
खरंच
❤❤
💯🙏
Agree
अगदी मनातलं बोललात ❤
खुप सुंदर कोकण आणि खुप सुंदर बोलतो प्रसाद गावडे
लांजा राजापूर मध्ये पण हीच परिस्थिती आहे...... घरो घरी आजी आजोबा..... वाट पाहतायत सणाची केव्हा माझा लेक येतोय नातवंडांना घेवून 😢😢😢
c😢😢
True😢
हो ,अगदी बरोबर आहे, पण शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नोकरी निमित्त गावा पासून दूर जावे लागतेच
सर्व बरोबर आहे. पण पोटासाठी जगदिशा हिंडविशी दाहीदिशा
खरंय! खूप सुंदर विलक्षण हातून निसटून चालल्याची हूरहूर मनाला अस्वस्थ करून जाते.. हा vdo पहाताना!😢
दादा.... तु खूप तळमळीने बोलतोस..... आम्ही आमच्या शहरी आयुष्यात खूप जास्त गुंतून गेलोय.... तुला असं बोलताना पाहिल्यावर मी कोकणातली असूनही असा विचार का नाही करू शकलो याचं वाईट वाटतं....निदान मला तरी......Hatts of to you 🙏
तु खुप तळमळीने बोलतोस तुज काम पण आहे
Speechless ❤❤❤❤❤
खरेच तू तर गेट्स आहे तू तर हुदय
Tumhi tulshi gowda baro bar tumche photo aahe aahe tyanni kadhi video nahi banavle tyani karun dakhavle tyana pan problem aalay, bhava chatrapati shivaji maharaj Yancya Rajath aapan jagtoy.......
Hakaa saathi ladayche astay
Khup gambhir vishay mandla deva . Bhavishyatali rikami ghar dolya samor aali🙏 😢
प्रसाद जास्त काही लिहायला आज सुचत नाहीये , कारण तुझ्या आजच्या विडिओने डोळ्यात पाणि आणल , ,खरा रानमाणुस जो कोकणाची जिवणशैली वाचवण्याचा प्रयन्त करतोय , तुला सलाम
मस्त व्हिडीओ झाला आहे। वर्णन सुंदर केले आहे
मी आयुष्यात प्रथमच इतका कटू वास्तव सांगणारा दर्दभरा व्हिडीओ पाहिला नव्हे जीवाचे कान करून परत परत ऐकला. प्रसाद !! तुमचे वास्तवाचे कथन खरोखर मनाचा ठाव घेते.ह्रदयाच्या गाभार्यातून आलेल्या शब्दांनी जीव गलबलला .
पण ह्यांच्या घरातील तरुणांनी जमीनीच्या लोभापायी स्वतःचीच नाती पायदळी तुडविली आहेत.दुर्दैवाने आज हे चित्र कोकणात घरोघरी पहावयास मिळतेय. त्यामुळेच परप्रांतीय कोकणात स्वतःचे पाय पसरू बघतोय.तिथेही मराठी कोकणी माणसाचे उच्चाटन होता कामा नये . भाऊबंदकीत हीच परिणीती होईल. तेव्हा "हे कोकणी माणसा !! सावध हो !!
प्रसाद! तुम्ही आता भाऊबंदकी थांबविण्यासाठी पुन्हा एक जबरदस्त व्हिडीओ बनवा . व सर्व कोकणी माणसांना ,भावंडांना एकत्र आणा.कोकणी माणसं , कोकणी गावं आणि आपली कोकणी संस्कृती टिकवा.
Prasad !! Best of luck 👍!!
शेवटची पिढी हे शिर्षक समर्पक आहे... ऐकून सासूबाईंची आठवण आली. आम्ही सुद्धा गावी घर बांधले आहे. आयुष्याचां अर्धा अधिक काळ मुंबईत घालवला पण त्या आता गावच्या हवेत समाधानाने राहतात. नव्वदीच्या वयात त्या कधी कधी आम्ही मुंबईत असल्यास एकट्या मोठ्या हिमतीने राहतात.एक नाळ जोडलेली आहे त्यांच्या भोवती आणि गावाभोवती सुद्धा . हया जुन्या पिढीची माणसे आपल्या अवतीभोवती असल्याने जगण्याचे बळ प्राप्त होते.
छान बोलला आहेस तू, देव तुझे भले करो.
आपण सुखी माणसाचा सदरा घातलेल्या पिढीला मुकणार हे सत्य किती हेलावणारे आहे. हृदयाला भिडले आणि डोळ्यात पाणी आले.
Heart touching situation expressed with lots of love .
His voice choking with sadness . I can feel it.
खरंच गावांना माणसांची गरज आहे..इच्छा असूनही गावी जाऊ शकत नाही...सणांना गावाला जायचे आणि आठवणी सोबत घेऊन यायचे एवढेच काय ते सुख..भविष्यात गावाला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही हे नक्की ..तुझी आत्मियता पाहून मन भरून येते..खूप पुढे जा..शुभेच्छा ❤
हे अगदी खरं आहे.आणि सत्य परिस्थिती आहे
भावा तू एक महत्वपूर्ण मुद्दा छेडलायस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.❤👌👌👍
काळजाला हात घातलास भावा 🙏🏻🙏🏻एक कटू सत्य सांगितलेस. मी पण कोकणातील आहे. 🙏🏻🙏🏻
मित्रा प्रसाद,कोकणी रानमाणूस म्हणून कोकणाविषयी जी तुझी तळमळ पाहून मन भारावून जातो.असाच आम्हां कोकण्याना तू जागवत रहा.कधितरी तूझ्या हातात हात घालायची इच्छा होऊ दे हीच प्रार्थना!
खूपच भारी बोलतोस तू.सत्य मेव जयते.
🙏 दादा तुझी तळमळ थेट काळजाला भिडला,मी आज ६३ वर्षांचा आहे, माझ्या आजीच्या हातचं जेवण करून आज पन्नास वर्षे झाली,मला आजोळ मुकलं, पण मला अभिमान आहे मला कोकणातली पार्श्वभूमी आहे, तुला तूझ्या महान कार्यासाठी खुप खूप शुभेच्छा
बंधु तुझे प्रत्येक विषय हे जीवतोड आहे तुला हि कल्पना सुचणंं हि दैव देणगी असणार आहे .... अशीच माहिती पुर्ण व्हिडिओ करत रहा यामुळे थोडीफार जनजागृती होईल आणि थोडेफार जुनी परंपरा जागृत राहील ... खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
दादा, तुझ्या ह्रदयातून निघालेल्या भावना, तळमळ माझ्या ह्रदयापर्यंत पोहचली आणि प्रत्येक वेळी पोहचली. ह्रदय प्रत्येक वेळी पाझरले. शेवटची पिढी म्हणून जो नामोल्लेख केलास, तेव्हांच खलास झालो. कंठ दाटून आला. पुढे लिहीता येईना, मोबाईल धुरकट झाला.
Agadi kharay
Hoy re bhauu
Very good old-age. Cm navle nasik
😢
It's true
दादू,
किती ओतप्रोत भरलंय रे तुझ्यात... साधंसरळ जगणं!
व्हॉइस प्रोजेक्शन इज सो इफेक्टिव, रादर इट्स सो रिअल!
पण हेही खरंच... इट्स लास्ट जनरेशन... शेवटची!
बाकी काही असो... जबरा फॅन झालो आपण!
पण खरंच रे...
खरंच 😢, पुढची पिढी स्वतः पुरत बघणारी. दुसऱ्याशी काही घेण देण नसणारी त्यामुळे दुसऱ्याचे दुःख काय आहे हे समजत नाही. आता सुख सोयी भरपूर आहे पण समाधान कुठेच दिसत नाही.
खरंच कोकणातल्या शेवटच्या पिढीचं
भावनिक व्हिडिओ बघून आत्मचिंतन करायला भाग पाडले तुम्ही.मनापासून धन्यवाद. 🙏
काय express करणार. शब्द हरवले आहेत.
वाईट वाटते
खरंय वाक्य न वाक्य
सुंदर विडियो
परमेश्वर तुला तुझ्या ईप्सित कार्यात भरभरून यश देवो कारण त्यातच कोकणाचे भले होणार आहे.
खर आहे भाऊ खूप छान वाटत कोकणात गावी गेल्यावर राहायला धन्यवाद 🙏
प्रत्येक emotional माणसाला हा व्हिडिओ पहिल्या नंतर नक्कीच मनात खंत वाटली असेल.. खरंच ही शेवटची पिढी..🥹
होय दादा हरकlचा भात आणि वरीची पेज ज्या पीढीन खाल्ले आहेत त्याची चवच न्यारी!दादा तुला खूप शुभेच्छा 🎊🎊
आयुष्याच्या संध्याकाळी परतीच्या वाटेवर असलेल्या जुन्या पिढीकडून नेमके काय घ्यायला हवे आणि कसे घ्यायला हवे याबाबत अत्यंत मोजक्या आणि लाघवी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या तुझ्या भावना थेट हृदयापर्यंत पोहोचतात.....खुप छान.
मी विदर्भ चा आहे सेम असच विदर्भात सुद्धा खूप काही आहे अर्थातच महाराष्ट्रात कुठे न कुठे नैसर्गिक जगणं आहे. पण आता सगळं नामशेष होत चालल आहे.❤
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला............
ही तळमळ कशी असेल.....ह्याचा अनुभव आज तुझ्या बोलण्यातून जाणवला......
आपसूक डोळे भरून आले....
खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला
Re zhila khipach खरी आणी सुंदर video aasa aaj ho. खुप खुप धन्यवाद
इतका छान आणि सुंदर विषय घेऊन व्हिडिओ बनवलात त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन!
Great, tuzy pryatnana udand yash yeo, hich prabhu charani prarthana...!
खूप छान..... मी कोकणातील आहे हे सर्व लहानपणी अनुभवले आहे.... माणसं प्रेमळ होती.... कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करायची.... माणुसकी, जिव्हाळा....कुठे तरी हरवला आहें....... आताची पिढी गणपतीला गावी येते... विसर्जन झाले कि त्याच रात्री पुन्हा शहरांत जाण्याची तयारी सुरु करतात... सकाळी ST मध्ये बसून.. टाटा, बाय बाय करतात.... पण त्या आजी चे डोळे मात्र पाण्याने भरलेले असतात.... पुन्हा एकटी....🙏🙏
माझा डोल्याला पाणी आल दादा 😢 बालपनाची आठवन आली ❤❤
खुप छान वाटलं ऐकून खरंच आपण फक्त मटेरिअलिस्टिक आयुष्य जगतोय आता change नाही झालो तर कधीच नाही.. हा विडिओ खुप share करा मित्रानो
Dev Karo dev tula changle aushya devo. I spend my entire life till date with hazardous chemicals for money. Being Malvani I appreciate your efforts for our culture
मी पण जास्त काही बोलत नाही प्रसाद दादा तुम्ही देवमाणूस आहेस 🙏🙏🙏🙏🙏🌳🌳🌳🌳🌳
बंधू नमस्कार तुम्ही ग्रेट आहेत
छान वस्तू स्तीती प्रस्तुत केली आहे
खूप मन हेलावून टाकणारी व्यथा आहे प्रसाद दादा तुझी कोकणात राहून कोकणी जीवन टिकून राहावं त्याची तळमळ पाहून खूप छान वाटत तुझा सार्थ अभिमान आहे😊
great .... Really you are very Lucky....
अगदी बरोबर आहे दादा ही मानस आपल्या तोडा वरुण हात फिरवायची निस्वार्थ प्रेम करनारी घआसआतल घास काढून देणारी ही मानसाना नकीच मुकणार आहोत
Bhai tu hya video madhun majyshi samor basun bolas
As janvl
Mala as kharch vatat hot
Ki kahi tari ahe
Aplya manushya jivnach muly tya vr apan boltoy
Khrch bhava hatsoff you..
हरकाच भात हे शब्द ऐकून माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
कोकणातील हे गरीबांचे खास जेवण होते ❤
खुप सुंदर व साध्या शब्दात अंतःकरणानातुन गावा
च्या संकृतीचे तुम्ही वर्णन केले ते अगदी मनाला...भावले
भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन करणाऱ्या तुमच्या या प्रयत्नांना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
प्रसाद आजचो हो व्हिडिओ बघल्यार आमच्या बालपणाचो चलचित्रपट डोळ्यासमोरसून तरळूक लागलो. हीच म्हातारपणची पिढी आमी लहानपणापासूनच बघीत आयलसव. डोळ्यात पाणी हाडलय तू. उत्कृष्ट 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
खर आहे तुमचम्णणण. विकासखच्या नावाखाली आपली संस्कृती खरे साधसुध जगण हरवतोय😢
विकास नाही जगाईची भ्रांत सर्वांना वाटते गावी राहवे पण गावात रोजगार उपलब्ध नाही
खरच ऐकून डोळ्यातून पाणी आल ह्या गोष्टींवर विश्वास नाही ठेऊ शकत की ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य होतील आणि ही जुणी पिढी आपल्यातून निघून जाईल.
गांधीजींचा साधा जगण्याचा मार्ग अनुसरा. खूप प्रश्न सुटतील. खोटी प्रतिष्ठा व उपभोगवाद सोडा.
प्रसाद, तुमचे खूप सारे व्हिडिओ पाहतो त्याचे मुख्य कारण तुझी प्रामाणिक तळमळ आणि आपुलकी असेल तुझा आवाज ! तू दाखवतोय तेव्हढे कोकण मी पाहिलेले नाहीये. या पुढे किती जमेल, माहित नाही, पण तुझ्या नजरेतून, तुझ्या भावनेतून कोकण जाणून घेणे, हा देखील खूप आनंद आहे रे माझ्या साठी !! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...
खरंच खूप खूप धन्यवाद.
दादा अगदी खरे , तळमळीने बोलतो आहे. ह्या पिढी सोबत अनुभवाचा मोठा खजिना लुप्त होईल.
प्रसाद. खरोखर. खरोखरच. आणि. खरोखर. तू. माझ्या. दृष्टीने. ग्रेट gret. आहेस. हे. सगळे. मी. आणुभवले. कोकणात.
तुझा आजच्या विषयाचा विचार मी खूप महिन्या पासून करतोय,आज तो तू पण घेतलास भावा,छान वाटलं... ही जी जुनी माणसं आहे ना हाच पूर्वीचा कोकण आहे पूर्ण ...मनात खूप दुःख होत पुढे कस असेल आता..!!!.
किती छान रे प्रसाद! रानमाणूस चे सगळे व्हिडीओज मी बघत असते. मी स्वतः आता साठीला आलेय. मला कोकणचं प्रचंड वेड आहे. हे जे तू दसखवतोस ना, ते कोकण! तू सांगतोस ती सुशेगात जीवनशैली, हा निसर्ग, हे झरे, हेच जगणं मला प्रचंड प्रिय आहे अगदी लहानपणापासून. मी पुण्यातील सकाळ मध्ये मासिकातून लिहीत असते खूप. आणि बऱ्याचवेळी माझ्या कथा कोकणातील जीवनशैलीवर सुद्धा बेतलेल्या असतात. त्या अशाच एका कोकण कथेनं मला राज्यस्तरीय गो नी दांडेकर पुरस्कार मिळवून दिला.मी पुणेकर पण कोकणाची ओढ का कोण जाणे मला प्रचंडये. आणि हे तूझं कोकण प्रेम, हा निसर्ग, सुशेगात जगणं बघायला मला प्रचंड आवडतं. मी येते दरवर्षीच कोकणात. मला तुझ्या नजरेतून एकदा कोकण अनुभवायचंय. पण तू कुठे भेटशील माहीत नाही. म्हणून आजवर भेटले नाहीये. बघूया होतं का भेटणं. पण खूप छान वाटतं जेव्हाही मी रानमाणूस बघते. ☺️
शेवटची पिढी खरंच डोळे पाणावले 🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ मला गाव नाही पण तुझे सर्व विडिओ मी पहातो हा विडिओ बघून वाटते आयुष्यचा शेवट कोकणात व्हावा खूप खूप धन्यवाद
तुझो अभिमान असा आमका कि जुन्या लोकाचो अमका आठवण करून दिलंस..जुन्या पिढी लोकांना मुळे आज आमची संस्कृती परंपरा सण जिवंत असतं ❤❤❤❤
खूप छान,काळजाला भिडणारे वर्णन,केवळ ब्लॉग म्हणून बोलणे नव्हे तर काळजातून आलेला नी काळजाला भिडणारा, गदगडीत झालेला आवाज.
अप्रतिम वर्णन. विषय छान........ खूपच छान.
प्रसाद तू बोलतोस ते खंर आहे अशी माया व प्रेम करणारी व्यक्ती कमी होते आहेत तू जे बोलत आहे ते ऐकून मन भरुन आले
आपण जे काही सांगता आहात हे सत्य आहे. मी पण कोकणातील आहे. देवगड, अचारा, कांदळगाव.
दरवर्षी न चुकता एप्रिल मे व जून पहिला आठवडा आम्ही आजोळी असायचो. सर्व कामे करायचो. खूप छान वाटायचं. कौलारू मोठे घर व आम्ही सर्व ३० भावंडं जमायचो. तांबड्या तांदळाचे मऊ भात, तूप मेतकूट, अंबोशीचे लोणचे, नाचणीची भाकरी त्यावर खोबरेल तेल, ओल्या नारळाची चटणी. खरच खूप छान आयुष्य
खुप छान बोललास जुन्या आठवणी निघाल्या की डोळ्यातून अश्रू येतात, धन्यवाद भावा
एक नंबर विडिओ.
प्रसाद,
तुझे निरीक्षण , अभ्यास, विश्लेषण अप्रतीम . हे वास्तव सत्य प्रत्येक कोकणातिल गावात आहे. मी पन्नास वर्षापूर्वीचा कोकण आणी आजचा पाहिला की दुःख होते.
गावात माणसच नाहित. सगळी तरुणमंडळी बाहेर आणी कांही मोजक्याच घरांमध्ये तु सांगीतल्याप्रमाणे शेवटची पिढी दिसते. देव बरें करो.
प्रसाद , खुपच छान विषय मांडलास . ऐकताना खुप लोकांची आठवण झाली ! खुप आभार !👍👍
खूप छान काम करतो आहेस तू.. At least आम्हाला या गोष्टी U tube वर बघून समजता तरी येत आहे
प्रत्येक गावातील गोष्ट आहे दादा ही ❤
अप्रतिम.. पण सत्य ही स्वीकारायला हवय.. अताच्या आधुनिक युगात या सगल्या गोष्टी मनोरंजन म्हणून पहतात... खुप चांगला उपक्रम आहे..
दादा खरोखरच तू अंजन घातलास डोळ्यात..ती बंद घरं व मोजकीच आणि तीही म्हातारी माणसं पाहून गलबलून येत.,
म्हणून मी ठरवलय निवृत्ती नंतर शांत जीवन जगायचंय ..मी घर बांधतोआहे अशाच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.... सोडतोय हे शहर....
खरच खूप छान. तुमचे शब्द हृदयातून सरळ ओठांवर आले आहेत. तेच शब्दभाव, तिच तळमळ डोळ्यात आहे.खरच तुम्ही देवदूतच आहात.
प्रसाद दादा,तुझी तळमळ भावते❤
अतिशय सुंदर कोकण चं वर्णन मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा -राजेद,कवे महाड
होय् हे खर आहे जुन्या लोकांचा निसर्गा बाबतीत असलेला अभ्यास पाहता ती माणस आपल्यासाठी विद्यापीठ च आहेत
दादूस काय प्रस्तुतिकरण आहे तूझे, अप्रतिम,अफलातून ,अगदी हृदयातून जाणारे। मी वाशीगाव नवी मुंबईचा आहे,अस्सल कोकणी पद्धतीच्या गावात राहणारा आहे।पण आत्ता आमच्याकडे खुप विकास झाल्याने गावाचे गावपण निघून गेले आहे फक्त आमची आगरी भाषा तेवढी आम्ही टिकून ठेवली आहे।माझी आई सुद्धा 80 वर्षाची झाली आहे, माझ्या आई सारख्या ज्या कोणी आहेत त्या पारंपरिक वेशात वावरणाऱ्या शेवटची पीढी आहे। दादूस तू जे बोललास त्याने जुन्या आठवणीना उजाळा देताना डोळे भरून आले। तुझे शतशः आभार
येणाऱ्या काळात हे आयुष्य पुस्तकात सुध्दा पहायला मिळणार नाही पिढीला,, संस्कृती जपा, आणि येणाऱ्या पिढीच्या हातात द्या, 🙏
जेव्हा जेव्हा गावी जाल तेव्हा आपल्या गावातील वयस्कर लोकाजवळ् जा त्याच्याशी आपुलकीने बोला निदान तेवढाच त्यांना समाधान वाटेल..
खरं आहे तुझं म्हणनं, अगदी शंभर टक्के खरं. पण मोबाईलमध्ये हरवलेला तरुण वर्ग जेंव्हा जागा होईल तेंव्हा वेळ असेलच असे नाही. तुला प्रतिसाद देत तरुणांनी जास्तीत जास्त वेळ आपली संस्कृती जपण्यासाठी खर्च केला तर नक्कीच हि पिढी शेवटची ठरणार नाही.
तुझी कोकणाविषयी तळमळ पाहून मन हेलावून जाते तुला मनःपूर्वक सलाम आम्ही तुझ्या पाठिशी आहोत देव तुला दीर्घ आयुष्य देवो हि प्रार्थना
खरं आहे दादा, मी देखील गावाला आहे. पण माझ्या वयाची पिढी 5 टक्के फक्त गावात राहते, नाहीतर बाकी सर्व मुबंई ला शिफ्ट झालेले. खरंच गाव ओस पडलीत 😢 फक्त आजोबा आजी घरात असतात. बाकी सर्व गावात शुकशुकाट असतो.
You great..and..Great
💐अप्रतिम सादरीकरण; उत्कृष्ट भाषाशैली; थोडक्यात काय सर्वच उत्तम!💐
डोळ्यात पाणी इला रे झिला. खरा सांग लस
बिंपैशाच प्रेम काय असते ते ह्या अमूल्य शब्द.
अजून ही वेळ गेलेली आठवणीची शिदोरी घेऊन ह्या सर्व माणसाच्या मनाचा शोध घ्या खूप काही दडलंय जे आपल्याला पुस्तकातून कधीच मिळणार नाही, जुन्या पिढ्या त्यांचे काम कसे जगायचे कुठे जायचे
हे आज जे जे आहेत आपल्या आपल्या पिढीत त्याच्याकडून जाणून घेण्याची गरज आहे तरच वारसं आणि वारसा ह्यातील फरक समजून घेतला जाईल
प्रसाद ,निसर्ग अति शहरीकरण झाल्यामुळे रौद्र रूपं दाखवत आहे, लोकं आता कायमची आपापल्या गावी परतायची वेळ आली आहे, व्यसनं, junk food , आरोग्याला अति तांत्रिक गोष्टीने पोहोचलेली हानी ह्याने बेजार झालीआहेत, पण ही जुनी लोकं आपल्याला परत मिळणार नाहीत 😢
व्यसन, Junk food आणि शहरीकरण हे विषय गम्भीर आहेत.
तुझे आभार मानावे तेवढे कमी प्रसाद दादा. तुझी निसर्गा बद्दलची ही तळमळ
आणि कोकणाबद्दलचे प्रेम खरोखर कोतुकस्पद.
सरकारने पण तुला साथ दिली पाहिजे रे, तुझे विचार मते समजावून घेतली पाहिजेत. बदलावं आणि विकास कोणाला नकोत पण त्यासाठी निसर्गाचे बलिदान नको. आज निसर्ग टिकला तरच आपण टिकून राहु. आपले अस्तित्व आणि पुढील जगणं हेय या निसर्गाच्या अस्तित्वावर च अवलंबून आहे.
बाळा, तू कोकणासाठी खूप प्रयत्न करतो आहेस तुला भेटावं वाटतं इतकं सरळ साधं जीवन आता लोकांना फक्त दुसऱ्यांनी जगावं असं वाटतं जसा विवेकानंद शेजारी जन्मावा
Khup Khup sunder video.
भावा तू किती कळकळीने आणि विचारपुर्वक बोलतोस. तू कोकणी माणसाच्या भावनांना हात घालतोस.तुझ्या बोलण्यातला शब्दांशब्द खरा असतो..अशीच समाज जागृती करत रहा. तू खुप मोठं काम करतो आहेस. आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
खुप छान, सत्य निसर्ग आहे तर आपन आहोत l
तुम्ही खुप चांगला विषय मांडला आहे यावर सध्या कोणी विचारच करत नय हा व्हिडीओ सर्वांनी पाहिला पाहिजे मग समजेल जुनी पिढी काय आहे होती
खूप छान माहिती दिली धन्यवाद👍
बंधू आपणास मनापासून नमस्कार, खरोखर भुतकाळ व वर्तमान काळ याची भावनिक व प्रेमाने ओतप्रोत असा गोड तितकीच मनाला चटका व हि वयोवृद्ध आपली प्रेमळ माणसे भले ती कोणत्याही गावातील असो,पण या सर्वांचा काही काळा पुरतीच सोबत रहाणार या आठवणीने मन भरून आले, खरे तर गावी जाताना दोन्ही बाजूला बहुतेक घर बंद दिसतात व डोळ्यासमोर चित्र उभे राहते कि पडवीत उभे राहून कोणीतरी आवाज देत आहे नक्कीच माझी जीजी,आका,काकू, असणार पण क्षणात मन भानावर येते अरे येथे आता कोणीच रहात नाहीत,😢क्षणभर थांबून पुढे निघायचे असो बंधू, मनापासून धन्यवाद की या चित्रफिती व्दारे आठवणी जाग्या झाल्या पण काय करणार याला पर्याय काय। 😢असो.धन्यवाद।
Great speach really very important for everyone