काकीने केली चवदार आकूर भाजी - सकाळची न्याहारी | कोकणातल्या रानभाज्या | Ranbhaji | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2024
  • काकीने केली चवदार आकूर भाजी - सकाळची न्याहारी | कोकणातल्या रानभाज्या | Ranbhaji | Kokankar Avinash
    आज मंडळी दुपारी प्लॅन झाला आकूर नावाची रानभाजी जंगल जाऊन आणण्याचा. सह्याद्रीत डोंगरदऱ्यात मिळणारी हि भाजी. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. जंगलात जाऊन आकुर आणणे म्हणजे त्याची तुम्हाला माहिती हवी. मी आणि प्रमोद अंकुर काढत होतो तेवढ्यात पावसाने पण हजेरी लावली. थोडा वेळ वाट बघितली आणि धावतच घर गाठले. घरी पोचलो आणि मुसळधार पाऊस आला. सकाळी काकीने मस्त भाजी बनवली. या भाजीत थोडा जवळ टाकला कि चव एकदम भारी. पाठच्या पडवीत सर्वानी न्याहारी केली.
    #Ranbhaji #ForestVegetables #KokanForest #MusaldharPaus
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    पावसाळी हवा थोडी रुळली की, हवेत छान गारवा पसरतो. सदा सर्वकाळ हिरवागार असणारा इथला परिसर या काळात हिरव्या रंगाच्या विविध छटा घेऊन येतो. जणू काही मऊशार, कोवळ्या पोपटी रंगाची शाल पांघरली असावी, असा भास होत राहतो.
    कोकणात वर्षा ऋतूमुळे निसर्गात घडू लागलेला बदल थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतो. ऋतू बदलाची चाहूल स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पदार्थावरूनही लक्षात येते. हा काळ असतो पावसाळी रानभाज्यांचा. पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या भाज्यांची गृहिणी वाट बघत असतात.
    मुद्दाम भाजी मंडईत चक्कर मारावी, असाच हा काळ असतो. पुण्या-मुंबईमध्ये सहजपणे बघायला मिळणार नाहीत, अशा अनेक स्थानिक अपरिचित भाज्यांनी इथली मंडई फुलून जाते. पावसाळा सुरू होताच कोकणात स्वयंपाकघरांना वेध लागतात ते या काळात मिळणाऱ्या भाज्यांचे. केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या खाण्यासाठी घरातले अनेकजण आतुरतात. भारंगी, आकूर, अळू, तेरे, पेवळा, फागला, फोडशी, पिडूशी, कील्ल, कुडूक, ढाण्या, कुढ्याच्या शेंगा आणि फुले, खापऱ्या आणि कोकणातील खास अळंबी म्हणजेच नैसर्गिकरीत्या उगवलेले मशरूम्स. या काही भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात. अनेकजण या काळात सात्त्विक आहार घेणे पसंत करतात. मासळीची कसर या पावसाळी भाज्या भरून काढत नसल्या तरी पुढे वर्षभर ताटात मासळी असतेच म्हणूनच कदाचित पाहुण्या बनून आलेल्या आणि थोडा काळ सोबत करणाऱ्या पावसाळी हिरव्यागार रानभाज्या ताटात आपली हक्काची जागा तयार करतात. यातली प्रत्येक भाजी आपले वेगळेपण घेऊनच जन्माला आली आहे. त्यामुळे या भाज्यांना एक वेगळेच महत्त्व आहे. या भाज्यांची मूळ चव किंचितही कमी होऊ न देता, उगाचंच मसाल्यांचा मारा न करता, सर्वांत महत्त्वाचे यातील काही भाज्या एक थेंब तेलाचा वापर न करता केल्या जातात आणि तरीही अतिशय चविष्ट लागतात हेच यांचे विशेष.
    उन्हाळ्यात परसदारात पिकलेला फणस उतरवून त्यातले गरे खाऊन झाल्यावर घरातील चाणाक्ष महिला उरलेल्या आठळ्या एकत्रित साठवून ठेवतात. याच वाळवलेल्या आठळ्या उकडून, बारीक चिरून या पावसाळी भाज्यांमध्ये घालतात. फणसाच्या आठळ्यांमुळे भाजीची लज्जत अजून वाढते. कोकणात घराघरांत अशा रानभाज्यांच्या साहाय्याने, एका वेगळ्या पद्धतीने पावसाळा साजरा केला जातो.
    चवदार आकूर / अंकुर :-
    चवदार ‘आकूर’ पावसाळ्यात नदी, तलावाच्या कडेला / सह्याद्रीत ‘आकूर’ नावाच्या भाजीचे कोंब उगवू लागतात. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. चिरल्यानंतर थोडेसे चिकट होणारे आकूर प्रत्यक्षात कुरकुरीत असतात. चिरतानादेखील त्यांचा कुरकुरीतपणा जाणवतो. ओल्या खोबऱ्याबरोबर किंवा सुक्या वाटणात थोडे जिरे, २ लाल मिरच्या आणि थोडासा गरम मसाला त्याबरोबर थोडी चिंच घालून हे सगळे बारीक वाटून घेऊन कांद्याबरोबर शिजणाऱ्या आकुरामध्ये घातले की त्या भाजीला एक छानसा आंबट, थोडासा तिखट स्वाद येतो. मसूर, हरभरा डाळ, वाटाणे यापैकी कोणतेही एक कडधान्य आकुरामध्ये वापरले तरी उत्तम. . या प्रत्येक कडधान्यानुसार आकूर भाजीची चव बदलत जाते. आकूरच काय पण यातल्या अनेक भाज्यांमध्ये छोटी सुकट / सुंगटे किंवा जवळा म्हणजे कोलीम घातल्याशिवाय सारस्वत बायकांना चैन पडत नाही. सुंगटांमुळेदेखील भाजीची चव वाढते.
    कोकणातल्या रानभाज्या
    पावसाळी रानभाज्या
    आरोग्यदायी रानभाज्या
    ranbhaji
    ranbhaji recipe in marathi
    ranbhajya
    Aakur Ranbhaji
    Kokan Forest Vegetables
    Konkan Forest Vegetables
    kokan ranbhaji
    konkan ranbhaji
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar

Комментарии • 70

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 29 дней назад +6

    काकीचा स्वभाव खूप छान आहे आविनाश भावा,मायेने जेवायला घालतात ते तुला.

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 29 дней назад +2

    भर पावसात मित्रांबरोबर भजी पार्टी झालीच पाहिजे

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 29 дней назад +2

    नवीन भाजीचे नाव कळाले दादा तूझ्या मूळे कोकण पाऊसात बघायला मस्त आहे. सगळीकडे धबधबे असतात.

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 22 дня назад

    मी खाल्ली आहे भाऊ.... शृंगारपूर, संगमेश्वर ❤️

  • @krishnagaonkar3694
    @krishnagaonkar3694 27 дней назад

    Khaali dada mast lagte ❤

  • @sagarbate2866
    @sagarbate2866 23 дня назад +1

    शब्द नाहीत दादा 😊

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 22 дня назад

    मस्त 👌👌

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 29 дней назад +2

    आजचा व्हिडिओ छान झालाय काकीच्या हातची आकूराची भाजी तर एक नंबर

  • @SaurabhSawant-rj8wf
    @SaurabhSawant-rj8wf 28 дней назад

    मस्त

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 29 дней назад +2

    जवला टाकून छान होते आकुर ची भाजी

  • @latagawane1356
    @latagawane1356 29 дней назад +1

    भाजी आणि भाकरी उत्तम 👌👌❤️❤️

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 28 дней назад

    Mast vedio❤
    Intresting vedio❤️👌🏻👌🏻

  • @naikr2101
    @naikr2101 29 дней назад +1

    गावामधील व्हिडिओ मस्त आहेत सर्व.....वातावरण पण छान झालं आहे....❤❤❤❤❤

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 28 дней назад

    . Bhaji Bharat Chand stay

  • @latagawane1356
    @latagawane1356 29 дней назад +1

    काकीला आणि आईला नमस्कार 🙏❤️❤️

  • @nishantmadake4648
    @nishantmadake4648 29 дней назад

    तीकले वातावरण पाहून तिकडे येऊ वाटतय निसर्ग रम्य वातावरण असल्यावर भारी वाटतं
    आम्ही बार्शीकर

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 29 дней назад

    Mast recipe

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 29 дней назад

    दादा तुम्हीं खुब नशीब वान आहें निसर्ग मध्य राहतात जंगल आहें मस्त भाजी मजा आहें

  • @ShilpaTukrul-rd2to
    @ShilpaTukrul-rd2to 29 дней назад

    Khup bhari

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 29 дней назад

    छानभाजीदादा👍👌🙏

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 29 дней назад

    Beautiful vlog

  • @SaurabhSawant-rj8wf
    @SaurabhSawant-rj8wf 28 дней назад

    किती. छान

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 29 дней назад

    Khup chan Vlog!❤

  • @sandeshpawar8589
    @sandeshpawar8589 29 дней назад

    मस्त व्हिडीओ

  • @virendragoriwale93
    @virendragoriwale93 29 дней назад

    👌👌

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 28 дней назад

    छान झालेय आकूर ची भाजी 🙏🏻🙏🏻

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 28 дней назад

    Kup chaan video mast superb video 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 29 дней назад

    👌👌👌👍

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 29 дней назад

    Kaki ne bhaji mastch keli nice recipe 😊

  • @user-np9rb8un4z
    @user-np9rb8un4z 29 дней назад

    खूप छान भाजी बनवली काकीने ❤🎉

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 29 дней назад

    Delicious recipe kaki khup chchan nice video

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 29 дней назад

    Best video dada🙏

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 28 дней назад

    🐭

  • @vaibhavilad7047
    @vaibhavilad7047 29 дней назад

    व्हिडिओ खूपच छान होता काकीने आकुर ची भाजी खूपच छान आणि स्वच्छता पण खूप छान होती

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 29 дней назад

    ❤❤❤❤

  • @krushnaambat5558
    @krushnaambat5558 29 дней назад

    खुप छान व्लोग आहे दादा👌👌मला पावसाल्याचे विडीओ खुप आवतात

  • @ushajunghare8164
    @ushajunghare8164 29 дней назад

    गावचे विडिओ छान वाटतात बघायला

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 29 дней назад

    आईला बघून छान वाटले.

  • @TravelwithBaliram786
    @TravelwithBaliram786 29 дней назад

    12 sabscriber ke Thank you dosto

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 29 дней назад

    किती छान रे व्हिडिओ!!! काकीच्या हातची रेसिपी खुप छान. यायला पाहिजे जेवायला 😂 .निदान तु कौतुक करतोस तो काकीच्या हातचा चहा प्यायला तरी येऊ.

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 29 дней назад +1

    गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी छान वाटतं कौल फ्राय पावसात झाला पाहिजे ❤❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  29 дней назад

      धन्यवाद. हो नक्किच

  • @user-ys9bb4hg2z
    @user-ys9bb4hg2z 24 дня назад +2

    गोडा मसाला ची रेसिपी दाखव ना दादा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  23 дня назад +1

      हो नक्किच एक Video करतो

  • @mangeshkadu5943
    @mangeshkadu5943 29 дней назад +1

    नाशिक इगतपुरी कडे याला आम्ही चाईची भाजी म्हणतो

  • @bismillamulla8446
    @bismillamulla8446 29 дней назад

    Bha Mast video banvto re bhava me karad hun baghte tujhe video

  • @user-is8qn5dz2z
    @user-is8qn5dz2z 29 дней назад

    Tumache kokantle video khoop Chan astat ek kokantala fil yeto pavsache video aprtim astat

  • @kishormayekar2649
    @kishormayekar2649 29 дней назад +1

    निवळी शाळेतून रिटायर
    झालो. दोन वर्ष झाली. आता नाही मिळत मला.शाळेत असताना सिझनवार खुरटी,रोवनं,चुडी,अंकूर,पाथर्डी,टाकळा,कवळा ,भरपूर वेलफळ भाज्या खाल्या.
    दोन वर्ष झाली.आठवणीवर जगतोय. माझी निवळी वैविध्य पूर्ण खाद्याचे नंदनवन आहे.
    वा,दारची भाजी

    • @devyanikakade778
      @devyanikakade778 29 дней назад

      Nivli kuthe aali

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  29 дней назад

      Thank you so much sir ❣️ आपण गावासाठी दिलेले योगदान बहुमूल्य होते आणि राहील.

  • @dnyaneshchavan7227
    @dnyaneshchavan7227 13 дней назад

    Lalkandi same word amhi use karaycho lahan Pani ambe kadtana @guhagar

  • @VijaySande-kj2nu
    @VijaySande-kj2nu 26 дней назад

    मुरबाड तालुक्यात चायवाल म्हणतात

  • @sonalirawade7970
    @sonalirawade7970 29 дней назад

    आमच्याकडे शेंडवेल बोलतात दादा

  • @KokanLife-uy9px
    @KokanLife-uy9px 29 дней назад

    Chikan prty zhali pahije

  • @smitakhandekar610
    @smitakhandekar610 29 дней назад

    Mase pakadnya khup majja aste pn risk pn khup aste panya mule khup ghasrt jhalele aste tya mule disko ast pay gharu shakto hi biti astech na dada ,tack care nice video

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 25 дней назад

    अरे मसाला, कांदा आणी जवळा एवढा भरभरून टाकलाय तर आकुर टाका वा बाकूर टाका, भाजी ही छान लागणारच 😂

  • @shashikantnampalliwar1322
    @shashikantnampalliwar1322 29 дней назад

    Kadhi puratan mandire dhakhavat ja

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 29 дней назад

    Ankur Manje ka hai Tamasha

  • @arunshinde3312
    @arunshinde3312 29 дней назад

    दुध मिळत नसेल तर एखादी गाय पाळावी

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 26 дней назад

    दादा आम्ही आकूरची भाजी नाही खाल्ली.

  • @RajeshChaudhary-pm6is
    @RajeshChaudhary-pm6is 29 дней назад

    आमच्या आगरी समाजात याला तेलपाट बोलतात भाजी बनवण्याची पद्धत सारखीच आहे पण आम्ही लाल मसाला टाकत नाही

    • @RajeshChaudhary-pm6is
      @RajeshChaudhary-pm6is 29 дней назад

      कोकण निसर्ग असाच टिकून ठेवा

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 29 дней назад

    दादा तूमचा गावातला पाच पायांचा नंदी मोठा झाला असेल ना

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 29 дней назад

    पाहिली पण नाही मी खाल्ले पण नाही

  • @rupesh7568
    @rupesh7568 29 дней назад

    tondala pani sutla dada. tu gavala kadhi janar ani pavsache video kadhi yenar tyachi ch vaat baghat hoto.

  • @SaurabhSawant-rj8wf
    @SaurabhSawant-rj8wf 28 дней назад

    मस्त