Sagara Pran Talmalala सागरा प्राण तळमळला मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #veerSawarkar #Nemajasine #Sawarkargauravyatra विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८
    इंग्रजांविरूद्ध जोरदार लढा देणा-यांमध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किना-यावर १० डिसेंबर १९०९ साली “ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला” हे लिहिले होते. या गीताला १०० वर्शांपेक्षाही जास्त वर्ष झाले आहे. आजच्या पिढीला आजही या गीताने भुरळ घातली असून हे गाणं आणि त्याचे शब्द अंगावर शहारे उभे करतात. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन
    ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला
    भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
    मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
    तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
    मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
    विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
    तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
    सागरा, प्राण तळमळला ...
    शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
    भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
    गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
    जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
    ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
    तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
    सागरा, प्राण तळमळला ...
    नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
    प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
    तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
    भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
    तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
    सागरा, प्राण तळमळला ...
    या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
    त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते
    मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
    तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
    कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
    सागरा, प्राण तळमळला ...

Комментарии • 1,6 тыс.

  • @manishrao18
    @manishrao18 4 года назад +611

    गाण्याची प्रस्तावना छान मांडली, अश्रू अनावर झाले.
    US ला असताना समुद्रा किनारी हे गाणे ऐकले होते,
    ती घुसमट सांगणे कठीण आहे.
    त्या शूरा मी वंदी तो 🙏

  • @ravindrakshirsagar3849
    @ravindrakshirsagar3849 4 года назад +78

    सावरकरांनी सोसलेला छळ त्याची कल्पना हि करवत नाही, टीका करणाऱ्या नेत्यांनी अगोदर सावरकरांचा इतिहास वाचावा आपोआप त्यांना स्वतःची योग्यता समजेल .
    । सावरकरांना माझा प्रणाम ।

  • @vilasraonyayadhish5609
    @vilasraonyayadhish5609 5 лет назад +118

    सावरकरांना समजायला खरंच देशभक्तीचे ओतप्रोत भरलेलं काळीज हव. वंद्य वंदे मातरम्!

  • @user-dg6rb8np1t
    @user-dg6rb8np1t Год назад +54

    जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना समजू शकले नाहीत अशाना चांगली सद्बुद्धि दे रे देवा।

  • @dhirajpatil9743
    @dhirajpatil9743 5 лет назад +125

    छत्रपती शिवाजी महाराजां नंतर आम्ही ज्यांना कोणाला मानतो ते म्हनजे स्वातंत्र्यवीर सावरकर

    • @Sanvedana
      @Sanvedana 5 месяцев назад +2

      ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला 'काक तलीये राज्य म्हटलं

    • @kunalgaidhani517
      @kunalgaidhani517 5 месяцев назад +10

      @@Sanvedana kuthe apman kela ahe jara sanga? Kontya pustakat ?
      Maharajanchi pahili arti lihinare savarkar ahet…laksht theva…maharajanchi aarti lihili tyanni manje kiti bhakta hote te vichar kara

    • @kateomkar
      @kateomkar 5 месяцев назад +2

      छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वैचारिक वंशज...

    • @sachinghadage5296
      @sachinghadage5296 5 месяцев назад +2

      वीर सावरकर महान क्रांतिकारी कोटी प्रणाम ❤

    • @shubhadadivekar927
      @shubhadadivekar927 4 месяца назад +2

      तुमची दोघांची जोडी खूप आवडली.गाण तर सुंदरच.🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinshelar7906
    @pravinshelar7906 4 года назад +120

    खरे स्वातंत्र्यवीर भारतरत्न म्हणून गौरविले नाहीत हिच खंत वाटते.
    माझे कोटी कोटी प्रणाम स्वातंत्र्यवीर तुमच्या चरणावर.

    • @busylife4742
      @busylife4742 3 года назад +3

      हिर्याची पारख करायल जोहरी लागतो येर्या गबाळ्याचे काम नोहे ते

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 3 года назад

      Bharat Ratna chi garaj nahi Savarkarana,

  • @prajaktakhot2605
    @prajaktakhot2605 3 года назад +27

    सावरकर तुम्हाला आम्ही नाही कधी विसरणार जो पर्यंत हा देश जिवंत आहे तो पर्यंत तुमची त्यागाची मसाळ प्रत्येकाचा मनात तेवत राहील.

  • @yadneshmarde3015
    @yadneshmarde3015 5 лет назад +88

    घळाघळा अश्रू ढळले माझ्या नेत्रातून.
    किती हालअपेष्टा , किती त्याग !!
    आता मिळाले स्वराज्य सुराज्य म्हणून टिकवणे हे आम्हा तरुणांचे कर्तव्य !

    • @prabhakarmanemane6774
      @prabhakarmanemane6774 4 года назад +2

      😭😭also me

    • @girishsalunke8031
      @girishsalunke8031 2 года назад +2

      अति सुंदर !! आपल्या संकल्पनेचा सर्वांनीच दृढ़संकल्प करावा अशी ईश्वरीच्छा !!💐💐

    • @Sanvedana
      @Sanvedana 5 месяцев назад

      दादा भगतसिंग पण मूव्ही बघा, म्हणजे अजून अश्रू घळाघळा ओघवतील. आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना मृत्यू शिवाय पर्याय नव्हता

  • @user-mk1lm1mu9y
    @user-mk1lm1mu9y 4 года назад +256

    सर्वात पहिला आणि शेवटचा हिंदूह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर ❤️

    • @rohitvedpathak5192
      @rohitvedpathak5192 2 года назад +6

      No shivaji & savrkar real hero

    • @narendrametkar512
      @narendrametkar512 2 года назад

      आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार्यांना सर्व फुकाच मीळाल आणी एवढा मोठा त्याग असुनही भारतरत्न मीळत नाही ही शोकांतीका आहे

    • @Bobade-dinesh01
      @Bobade-dinesh01 Год назад +9

      @@rohitvedpathak5192 dharmveer chatrapati sambhaji maharaj also a big hero.

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Год назад +1

      तुम्हाला हि प्रणाम...छान कमेंट केली घाडी जी

    • @busylife4742
      @busylife4742 Год назад +1

      आणी प्रखर ,खरा राष्ट्रप्रेमी ,राष्ट्रभक्त ♥️🙏🙏🌹👹

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 Год назад +32

    जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो,डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही,सावरकर तुम्ही या देशात जन्म घ्यायलाच नको होत,काही नतदृष्ट्यांना तुम्हाला समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील," धन्य तुमची मातृभक्ती,धन्य तुमची मातृसेवा "
    एक सावरकर प्रेमी

    • @aashoklokhande5977
      @aashoklokhande5977 Месяц назад

      खरा भारत मातेच्या सुपुत्रा कोटी कोटी प्रणाम आसा कळकळीचा देश भक्त पुन्हा पुन्हा जन्माला यावा हिच मातृ भूमीसी नम्र विनंती विनंती सावरकर अमर रहे

  • @vaishnavijoshi4422
    @vaishnavijoshi4422 3 года назад +93

    सावरकरांना योग्य तो सन्मान मिळालाच पाहिजे आणि त्या साठी प्रत्येक भारतीयला प्रयत्न केले पाहिजे
    येत्या 26 फेब्रूवारी ला सावरकरांच्या जय जयकारत भारत देश दुम दूमुन गेला पाहिजे

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад +99

    अंगावर शहारे आले सावरकरांचे जीवन प्रसंग ऐकून ।खूप खूप आभार 🙏🙏

  • @rahulwagh001ify
    @rahulwagh001ify 4 года назад +209

    २१ व्या वर्षी शब्दांवर एवढे प्रभुत्व.. धन्य तो वंश .. धन्य तो कुळ.. धन्य ते माता पिता .. धन्य तो देश.. आणि धन्य आहोत आपण की या देशात आपला जन्म झाला

  • @mayankmusicsatishgarathe9203
    @mayankmusicsatishgarathe9203 5 лет назад +105

    फक्त ब्राह्मण समाजच नाही तर आगरी कोली समाज.. आम्ही सावरकर प्रेमी...
    वंदे मातरम

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 месяцев назад

      ❤️

    • @babsnaik2727
      @babsnaik2727 5 месяцев назад +1

      हो नक्कीच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर आगरी आणि कोळी समाज स्वातंत्र्यवीर सावरकरांना खुप मानतो!
      🚩 वन्दे मातरम् 🚩

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 месяцев назад +1

      Koli samaj _🔥❤️🚩

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 4 месяца назад +1

      🙏🙏🙏🙏💪💪💯

    • @babsnaik2727
      @babsnaik2727 4 месяца назад +1

      @@MithilaKulkarni 🙏🚩🚩🙏

  • @sachinshinde2154
    @sachinshinde2154 4 года назад +33

    शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी।
    ही फसगत झाली अशी।। ........ अप्रतिम

  • @harshpoetry1383
    @harshpoetry1383 3 года назад +52

    खरंच !ह्या अजरामर गीतामध्ये वीर सावरकरांच्या जागी स्वतःला ठेऊन बघा. वीर सावरकरांच्या मनातील व्यथा आणि या गीताचा अर्थ नक्की कळेल. वीर सावरकर खूप महान होते. 🙏🙏🙏

  • @akashhhh23
    @akashhhh23 5 лет назад +113

    इतिहास ज्यांनी रचला त्या वीरमानवाला मानाचा मुजरा.....होय मी सावरकरवादी

  • @manojmali6443
    @manojmali6443 6 лет назад +445

    या देशाला आजही सावरकरांच्या विचाराची गरज आहे देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या थोर क्रांतिकारका कोटी कोटी नमन

    • @adinathmule3192
      @adinathmule3192 5 лет назад +2

      Nice

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 3 года назад +9

      खुप खुप समाधान वाटल काॅमेंट वाचुन ..साक्षात्कार झाला मी एकटीच नाही अनेक आहेत सोबतीला जे सावरकरांनवरील अन्याय जाणुन मनाने विचलीत होतात

  • @dhanrajkore4950
    @dhanrajkore4950 5 лет назад +59

    सावरकरांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम!....असा देशभक्त पुन्हा जन्म घेवो असेच वाटते!! अशीच देशभक्ती आपल्या सर्वांमध्ये रुजायला हवी.....

    • @pundlikjadhav1197
      @pundlikjadhav1197 Год назад +2

      गोऱ्यानी तर अंदमान जेल मध्ये ठेवले, काळे तर त्याहून पुढे आले आहेत.

  • @ishwar3
    @ishwar3 6 лет назад +103

    ज्याने घराची आपल्या कुटूंबाची पर्वा केली नाही . देशासाठी आयुष्य वाहून दिला . ह्या गाण्यांनी त्याच्या मनातील देश प्रेम पाहून डोळ्यात पाणी येत . असे हे सावरकर . ह्यांच्या चरणी शत शत नमन

    • @ashokwani3021
      @ashokwani3021 Год назад

      अंगावरती शहारी आणणारे गीत आज देखील आज देखील अंगावरती काटे उभे राहतात

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Год назад +3

      कृपया स्वातंत्र्यवीर सावरकर असे एडिट करावे

    • @ishwar3
      @ishwar3 Год назад

      @@rajupnjkr धन्यवाद

  • @shivajidesai6552
    @shivajidesai6552 5 лет назад +148

    राष्ट्रासाठी सावरकरांएवढा त्याग आजपर्यंत कुणीच केला नसेल.पण आम्हांला सावरकर समजले नाहीत हे आमचे दुर्दैव आहे.त्यांच्या मृत्यू नंतर देखील आज ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका होते हे पाहून मन खिन्न होते.

    • @ajaymisal6536
      @ajaymisal6536 3 года назад +4

      अगदी बरोबर, सावरकर यांच्या एवढा असीम त्याग, हाल अपेष्टा फार कमी लोकांच्या वाटेला आल्या असतील...तरीपण आजही काही अमराठी लोकं व राजकीय पक्षांकडून सोशल मीडिया वर त्यांच्याबद्दल चुकीचं व वाईट लिहिलं जात, त्यांचा द्वेष केला जातो...फार वेदना होतात मनाला या सगळ्या मुळे......

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 3 года назад +7

      @@ajaymisal6536 तुमच्या मनाला वेदना होतात हेच त्यांना हवय संधी मिंळेल तेव्हा राग व्यक्त करा योग्य शब्दात समाचार घ्या गप्प बसल्यावर मुक संमती आहे असा अर्थ काढतात ते

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi 3 года назад +3

      @@bharatimusale1469 many .ani mi majya pari n he kam kel ahe.

    • @servicetowardsdivine7933
      @servicetowardsdivine7933 2 года назад +7

      सावरकर अपल्याला समजले नाही कारण आपल्याला कोणी त्यांना समजू च दिले नाही 😔 जो पर्यंत गांधीवादाची पट्टी डोल्यांवरून हटत नाही तो पर्यंत आपल्याला सावरकर समजनार च नाही 😭😭😭

    • @servicetowardsdivine7933
      @servicetowardsdivine7933 2 года назад +1

      @@Vinaykumar-rh8bi proud of you 👍keep it up 🙏

  • @Omkar837
    @Omkar837 Год назад +42

    अप्रतिम प्रस्तावना.. अंगावर शहारे आणणारे वर्णन आणि तितकेच सुंदर गायन..कोटी कोटी प्रणाम या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांच्या देशभक्तीला..🙏

  • @vijo2402
    @vijo2402 2 года назад +41

    ह्रदय उचंबळून आणणारे हे काव्य ऐकतांना ह्रदय गदगदते ...

  • @meetpotdar1658
    @meetpotdar1658 5 месяцев назад +9

    स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय हे नेहरूगांधी घराण्यात जन्मलेल्या चव्वनीला कसं कळेल. त्यासाठी रक्तात अत्युच्च देशभक्ती, देशप्रेम आणि त्यागाची प्रबळ भावना असावी लागते.

  • @purushottamkotwal632
    @purushottamkotwal632 5 лет назад +32

    या गाण्याची पार्श्वभूमी खूपच छान सांगितली. ज्या ज्या वेळी हे गाणे ऐकतो तेव्हा मला अक्षरशः रडू येते. मी अंदमान ला जेल मधील ज्या खोलीत सावरकरांना ठेवले होते तेथेही जाऊन त्या पवित्र भूमीला वंदन केले. त्या वेळी मला या गाण्याची आठवण झाली आणि मन गहिवरून आले.

  • @santoshtodankar5830
    @santoshtodankar5830 6 лет назад +22

    सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान संपूर्ण भारताला कळलं पाहिजे. . . .

  • @prashantshimpi432
    @prashantshimpi432 5 лет назад +48

    खुपच हृदयद्रावक ईतिहास आहे आपल्या सावरकरांचा...तरीही कीरतेक चोचले लोक त्याचा अपमान करतात...

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 Год назад +54

    🕉️🚩👑 स्वातंत्रवीर सावरकर अमर रहे 🇮🇳❤️🔥

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 4 года назад +27

    Sawarkar mhanje veer
    Sawarkar mhanje vichar
    Sawarkar mhanje chetna
    Sawarkar mhanje prarthana
    Sawarkar mhanje swatantry....
    Sawarkar mhanje dhagdhagte. 🔥🔥🔥ANGNIKUND 🔥🔥🔥🙏🚩🙏

  • @philiprodrigues3344
    @philiprodrigues3344 Год назад +16

    शब्दातीत... देशासाठी स्वतःच्या जीवनासह कुटूंबाची राखरांगोळी ज्या तेजस्वी विराने सहन केली...शत शत नमन माझे ।

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 года назад +14

    सागरा सागरा प्राण तलमालला विर सावरकर यांना कोटी प्रणाम Jai ShriRam🙏🙏🙏🙏 Jaihanuman Hari omaaa🌹🌹🌹🌹🌹

  • @samadhannagre.3782
    @samadhannagre.3782 5 лет назад +54

    काय शब्द रचना आहे. नमन त्या महानायकला...

  • @gkeducation6573
    @gkeducation6573 5 лет назад +11

    अशी रचना कुणीच कवी करू शकत नाही.खूप श्रीमंत रचना आहे वीर सावरकरांची...!!!!

  • @narayantambat4410
    @narayantambat4410 Год назад +10

    हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर यांना विनम्र अभिवादन. ते एवढे मोठे रत्न आहेत की त्यांना अजून ही आपण देशाच्या अमृत महोत्सव साजरा करीत असताना कोणत्याही सरकार ला भारत रत्न द्यावेशे वाटले नाहीत.

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 3 месяца назад

      त्याची.काय.गरज.आहे.जो.आपल्याच.तेजाने.प्रकाशतो.त्याला.तेलाची.काय.गरज.आहे.हे...पुरस्कार.मागणे.फक्त.राजकिय.खेळ.आहे...राजकारणि.लोक.फक्त.लोकांचा.गोंधळ.करतात.राजकारणासाठि.एकाहि.पुढाऱ्याचि.नावहि.घेण्याचिहि.लायकि.नाहि.ते.मागणि.करतात

  • @shivamkhedikar4818
    @shivamkhedikar4818 3 года назад +19

    धन्य ते सावरकर🙏🙏..आणि त्यांची असीम राष्ट्रभक्ती🙏🙏

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 3 года назад +12

    आज २८ मे २०२१ सावरकराचा जन्म दिवस त्या निम्मीत माझे या वीराला शत् शत् प्रणाम .
    जय हिद्
    वंदे मातरम् .💐💐💐👌👌

  • @rameshshinde6813
    @rameshshinde6813 5 лет назад +85

    कितीही वेळा गीत ऐका अंगावर काटा येतो "" सावरकरांना विनम्र अभिवादन

  • @ravindrabelhekar404
    @ravindrabelhekar404 5 лет назад +9

    काय बोलू अप्रतिम काव्य रचनेबद्दल .... निशब्द झालो आहे ..... वंदन ! वंदन ! वंदन ..... देवा

  • @suchitakulkarni7085
    @suchitakulkarni7085 Год назад +14

    अप्रतिम. अखंड भारताचे महान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा कायम ॠणी राहील. वंदे मातरम् 🙏

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 4 года назад +19

    सूर्यासारखे तळ प ते व्यक्ती महत्व म्हणजे वीर सावरकर . असुवंनो माझिया डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका.
    खरच सावरकरां सारखे देश भक्त पुन्हा होणे नाही. 💐🙏😥

  • @varshakulkarni8155
    @varshakulkarni8155 5 лет назад +12

    एकमेव अद्वितीय सावरकर, कोटी कोटी नमन वीरपुत्रास

  • @ganeshsatam7241
    @ganeshsatam7241 5 лет назад +7

    खुप काही लिहायचे आहे पण पण शब्दच नाही सुचत एकदम निःशब्द झालो मी कोटी कोटी नमन तया स्वातंत्र्य सूर्या

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Год назад +9

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांस कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @sopanmaghe2278
    @sopanmaghe2278 5 лет назад +36

    स्वतंत्रवीर सावरकर एक असे त्यागी महापुरुष होउन गेले कि त्यांचा इतिहास वाचला की अंगांवर काटा आल्याशिवाय राहत नहीं 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @kamlesh9537
    @kamlesh9537 4 года назад +86

    हे देवा वीर सावरकर यांच्या नावाने राजकारण होऊ नये हीच अपेक्षा...

    • @vijaysuryavanshi4506
      @vijaysuryavanshi4506 Год назад +11

      काँग्रेस चा धिक्कार हाच वीर सावरकर यांचा सन्मान

    • @prashantkale589
      @prashantkale589 Год назад

      Pappu kartoy saala mc bc

    • @prashantkale589
      @prashantkale589 Год назад +1

      @@vijaysuryavanshi4506 correct

  • @abhishekchavhan3768
    @abhishekchavhan3768 6 лет назад +307

    सावरकर म्हणजे एक विचार आहेत. सावरकर म्हणजे एक त्याग आहे. सावरकर म्हणजे विचारांचा समुद्र आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मनापासून वंदन.

    • @akhilkarve329
      @akhilkarve329 5 лет назад +14

      न भूतो न भविष्यती
      भारतमातेला स्वतंत्र करणाऱ्यांपैकी एक ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनाच स्वातंत्र्यदिनादिवशी न बोलावणं हे किती अपमानास्पद आहे.

    • @vyasghanshyam4261
      @vyasghanshyam4261 4 года назад +8

      नतद्रष्ट काँग्रेजी देशद्रोह्यांनी जे केले ते त्यांच्या दुषित रक्तात होते पण आता भाजपानेही खुप वेळ लावली या महान भारतभूपुत्राच्या सन्मानास!

  • @dipakpande3660
    @dipakpande3660 5 лет назад +16

    कोटी कोटी नमन। वेळ काढून सावरकरांचे जन्म स्थान भघुर नाशिक येथे सर्वानी भेट द्यावी।

  • @dr.chitragoswami7227
    @dr.chitragoswami7227 Год назад +15

    धन्य धन्य तो वंश, धन्य तो जन्म, प्रचंड विचार , सुंदर भाषा..मन कळवळते..

  • @abhishekjoshi1972
    @abhishekjoshi1972 5 лет назад +74

    या देशाला सावरकर कळन्याची नितांत गरज आहे. नाहीतर १५ August नंतर आलेलं परतंत्र पुढे ही चालू राहील मग ते 🤐शिक्षणात असो की राजकारणात. 💥

  • @kailasjadhav9565
    @kailasjadhav9565 4 года назад +14

    भारत मातेचे विर सुपुत्र वि दा सावरकर यांना कोटी कोटी नमन🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @navnathdugaje9135
    @navnathdugaje9135 5 лет назад +234

    सावरकरांबद्दल काहीचं बोलण्याची आपली कोणाचीच कुवत नाही!
    असा हा असामान्य हिरा💎
    अगदी कोहिनूर पेक्षा कितीतरी हजार पटीने जास्त महत्त्वाचा!

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 6 лет назад +126

    काय हे देशप्रेम,,,
    काय हे बलिदान,,,,,
    सागरा प्राण तलमला 😢😢
    कोटि कोटि प्रनाम,,,,,
    जय महाराष्ट्र,,,
    जय हिन्द,,
    जय भारत,,,,
    वन्देवन्दे-मातरम्,,,,

    • @santoshbhosale2202
      @santoshbhosale2202 6 лет назад +1

      Kharach aaj hya vicharanchi garaj aahe I salute he vira

    • @shivajidhangekar4562
      @shivajidhangekar4562 4 года назад +1

      सावरकर नावाच्या या धगधगत्या निखार्‍याला, विचाराला, फक्त आणि फक्त मोदीजी चं न्याय देऊ शकतात.

  • @shubhamrasal4036
    @shubhamrasal4036 2 года назад +26

    स्वा. सावरकरांना शतः शतः नमन...🙏🙏

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 6 месяцев назад +8

    अशक्य कोटीतील त्यागाचे मूर्तिमंत रूप म्हणजे वीर सावरकर.

  • @dharmendragogawale4607
    @dharmendragogawale4607 5 лет назад +38

    कोटी कोटी प्रणाम महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि त्यांच्या बंधूंना.🙏🙏🙏

  • @aboli-pawar
    @aboli-pawar 6 лет назад +434

    सावरकर पुन्हा होणे नाही.....खरच आपण खूप भाग्यवान आहोत की सावरकरांच्या देशात जन्माला आलो.....

    • @amolgaikwad1402
      @amolgaikwad1402 6 лет назад +1

      Right

    • @prashantkor9793
      @prashantkor9793 5 лет назад +1

      True

    • @dinukatre3434
      @dinukatre3434 5 лет назад +3

      Agdi brobar bollard tumhi....para tu aajchya pidhila kahich Janiv nahi savarkaranchi aanni tyanchya balidanachi

    • @vidnyanvaidya1135
      @vidnyanvaidya1135 5 лет назад +2

      Aboli tumi far mothi gost bolun gelyat

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 5 лет назад +1

      Pan swatantrya milyawarhi congress Sarkar ne tyana shantpane jagoo dile nahi tyanchyawar bandhane ghatli hoti.

  • @statuskatta437
    @statuskatta437 3 года назад +37

    अप्रतिम सावरकरांचा इतिहास, जतन करावा, अभ्यास करावा, असा इतिहास 🙏🙏🙏🙏

    • @pundlikjadhav1197
      @pundlikjadhav1197 Год назад +2

      देशभक्तांचा इतिहास काँग्रेसने सपवला आहे.

  • @meenaborase5822
    @meenaborase5822 5 лет назад +47

    अप्रतीम निवेदन हि कवीता लहान पणी वर्गात शिकले होते . पण आज नव्याने शिकल्या सारखी जानवतेय . छान खुपच छान ...👏👏👏👏👏

  • @vrs8173
    @vrs8173 3 года назад +6

    कोटी कोटी प्रणाम भारतरत्न वीर सावरकर यास. कोण ते महाभाग करंटे ज्यांनी dislike kele. त्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे.

  • @kumodchaudhari1165
    @kumodchaudhari1165 5 лет назад +18

    अप्रतिम मातृभूमी चे गीत खरोखरच मन तळमळतो सलाम त्या सावरकर सरांना व गीतकार यांना

    • @sunilbhutkar2737
      @sunilbhutkar2737 3 года назад

      SIR?

    • @bombgameing7746
      @bombgameing7746 Год назад +1

      अहो,गीतकार स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दा.सावरकरच आहेत.संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर आहेत.हे गीत मंगेशकर बंधू आणि भगिनींनी गायलेले आहे.

  • @easyenglishbydr.m.s.prakas7192
    @easyenglishbydr.m.s.prakas7192 Год назад +34

    अप्रतिम निवेदन व विश्लेषण...अप्रतिम सादरीकरण...rich words and emotions of this unique patriotic song deeply penetrate into heart🙏

  • @pripen2674
    @pripen2674 5 лет назад +15

    सुंदर, सावरकरांसारखे प्रखर देशभक्त पुन्हा होणे नाही..जय हिंद

  • @nakuljoshi1485
    @nakuljoshi1485 5 лет назад +7

    खूपच सुरेख निवेदन... गाणं...
    आम्ही भाग्यवान आहोत सावरकरांच्या भूमीत जन्मलो...😢😢

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 3 года назад +6

    🚩🌷 स्व.सावरकर म्हणजे.देशभक्तीचा अंगार ! अजोड, निस्सीम, शब्दचअपुरे पडतात .अशी देशभक्ती. मुग्धाताईचे अप्रतिम,सुंदर सादरीकरण.
    🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷

    • @meenakulkarni5272
      @meenakulkarni5272 Год назад

      सावरकरांसारखा देशभक्त पुन्हा होणे नाही

  • @dattratraybhalekar8055
    @dattratraybhalekar8055 5 лет назад +9

    प्रखर देशभक्ताने रचलेले गीत अलौकिक प्रतिभा आणि त्यांचा खराखुरा अनुभव "" जय स्वातंत्र्यवीर सावरकर "

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 5 лет назад +10

    ग्रेट...सावरकरांच्या त्यागाला शत शत नमन🙏🙏

  • @anilburade9267
    @anilburade9267 6 лет назад +73

    अप्रतीम गायन, तितकेच अप्रतिम सादरीकरण नमन त्या विर पुत्रास, विदा सावरकर सदैव हिंदू भुमीत जिवंत राहतील, निषेध त्या बेरकी देशद्रोही नपुंसकांचा ज्यांनी अंदमान येथील स्मारकाची विटंबना केली, त्याचीच फळे भोगतायेत, आणी पुढेही भोगतील, वंदे मातरम्,,, जय माँ भारती

  • @pratibhapatil2946
    @pratibhapatil2946 3 года назад +2

    देशभक्ती काय असते ते आता च्या नेत्यांनी1%तरी घेतली यातून तर खूप आहे.mindblowing narration

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 6 лет назад +350

    हे गाणं एवढं अप्रतिम आहे .....जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो ..एवढी aअप्रतिम खोल शब्दरचना त्या माणसाला सुचली ......सलाम .....

    • @santoshtodankar5830
      @santoshtodankar5830 6 лет назад +10

      हे गाणं ऐकलं की अंगावर काटा .
      जीतके खोल शब्द तीतकी खोल चाल.....त्याच तोडीचे गायन. ...
      एक सच्चे स्वतंत्रविर......
      ज्यांना काहि संधीसाधीनी महान होऊ दिल नाही

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 6 лет назад +12

      +SANTOSH TODANKAR
      शब्द रचना बघा काय केली कशी सुचली tya माणसाला ..ने मजसी ने परत मातृ भूमी ला सागरा प्राण तळमळला ....सागराला शेवटी विनवणी करतोय हा माणूस .....ग्रेट...
      मर्म बंधातली ठेव हि प्रेम मय ठेवी जपूनी सुखाने .....हे सुद्धा अप्रतिम शब्द रचना असलेलं गाणं

    • @kishorchavan918
      @kishorchavan918 6 лет назад

      Prashant Vaze

    • @atharvasapakal6749
      @atharvasapakal6749 6 лет назад

      Jam

    • @kamatradhika15
      @kamatradhika15 5 лет назад

      Just amazing

  • @bhushansakharkar1974
    @bhushansakharkar1974 5 лет назад +11

    भारत माता की जय
    स्वातंञ्यविर वि.दा. सावरकर यांना कोटि कोटि नमन

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 6 лет назад +176

    अनादी ते अनंत ते अवध्य ते भले ....सावरकरांना विनम्र अभिवादन ....सुंदर गायन

    • @parinitaabhyankar1137
      @parinitaabhyankar1137 5 лет назад +2

      Kharach man gahivarun ale tya vir purushala maze koti koti pranam

    • @priyarane7199
      @priyarane7199 3 года назад

      Great veer Savarkar ,we r proud of u.

  • @neelan7778
    @neelan7778 2 года назад +26

    Cannot express my gratitude to Vir Savarkar.
    With tears in my eyes salute HIM.

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Год назад +9

    खूप खूप छान सुंदर 🌹👍🔥🌺🧡🧡🧡 स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना मानाचा मुजरा नमन 🙏🙏🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 जय मराठी 🚩

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 Год назад

      धन्यवाद 👍🌹🙏 स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर 🌹🙏🙏🚩

  • @sagarsalunke6201
    @sagarsalunke6201 5 лет назад +25

    स्वतंत्र वीर सावरकर खुप प्रचंड इच्छा शक्ती असणारे आणि स्वतः सरस्वती त्याच्या मुखात वास करत होती
    तुमच्या मुले हा प्रसंग कळलं मला खुप छान
    अजून खुप काही जाणून घेण्याण्यास उत्कंठा लागली आहे

  • @rajashreevaishampayan5481
    @rajashreevaishampayan5481 Год назад +3

    सुत्रसंचलन फारच सुरेख,मन भारावून गेले डोळे पाणावले, दोघांनीही सुंदर गाणं म्हणले आहे🙏👌👍

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 5 лет назад +11

    निःशब्द होते..मन...कसले होते हे क्रांतीकारक मन..शरीर...या मातृभूमी ने असे पुत्र निर्माण केले..
    तिच्या पुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत 😪🙏🙏🙏🙏

  • @Rashtra_Dharma_143
    @Rashtra_Dharma_143 4 года назад +11

    थोर राष्ट्रभक्त व प्रखर हिंदुराष्ट्रवीर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्रिवार अभिवादन_/\_

  • @shraddham11
    @shraddham11 5 лет назад +24

    या गाण्याच्या प्रत्येक शब्दांतून सावरकरांचे भारतमातेवरील प्रेम ओथंबून वाहतेय..

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 5 лет назад +4

    केवढा मोठा हा संघर्ष केवढा मोठा त्याग
    सावरकर हेच खरे भारतरत्न

  • @hardikbhokareart8267
    @hardikbhokareart8267 4 года назад +7

    माझे कोटी कोटी प्रणाम सावरकरांच्या चरणांवर
    माझी जन्मठेप वाचला
    अंगावर काटा येतो

  • @shridharsutar7277
    @shridharsutar7277 6 лет назад +32

    हिंदुहृदयसम्राट स्वा सावरकर .

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 3 года назад

      खुप छान आहेत विचार तुमचे

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 5 лет назад +37

    साष्टांग दंडवत... सारकंराना.....💐👌
    वंदे मातरम् जय हरी

  • @gautamnanabelgavkar3160
    @gautamnanabelgavkar3160 5 лет назад +25

    धन्य धन्य ...
    क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकर

  • @spokesperson_vishnukaldoke5228
    @spokesperson_vishnukaldoke5228 Год назад +1

    देशसेवेखातर सावरकर कुटुंबाने सोसलेला अत्याचार खरोखरच अत्युच्य टोकाचे आहे..
    हा त्याग आणि देश प्रेमा खातर भोगायला आलेल्या यम यातना..... या सर्वापुढे शब्द सुचत नाही. 🙏 शत शत नमन....! सावरकर अमर रहे...!

  • @dineshchavan403
    @dineshchavan403 3 года назад +9

    आदणीय व अस्सीम देशभक्त सावरकरांना प्रणाम.

  • @ajaymisal6536
    @ajaymisal6536 3 года назад +3

    वीर सावरकर यांच्या एवढा असीम त्याग, हाल अपेष्टा फार कमी लोकांच्या वाटेला आल्या असतील...तरीपण आजही काही अमराठी लोकं व राजकीय पक्षांकडून सोशल मीडिया वर त्यांच्याबद्दल चुकीचं व वाईट लिहिलं जात, त्यांचा द्वेष केला जातो...फार वेदना होतात मनाला या सगळ्या मुळे......

  • @parmeshkumar3412
    @parmeshkumar3412 5 лет назад +21

    प्रथमेश लघाटे सर तूम्ही सांगितलेल्या सावरकरांच्या देशसेवेच्या बलिदानाबद्दल अक्षरशा अंगावर काटा उभा राहतो . असेच नविन पाठवत चला thanks all of you

  • @sharadpatil2822
    @sharadpatil2822 5 лет назад +2

    मी मनुवाद्यांचा द्वेष करतो पण सावरकरांना खूप मानतो आणि ते मनुवादी नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनात खूप त्याग केला सत्य लोकांसमोर आणले

  • @rajeshwarjaipurkar2944
    @rajeshwarjaipurkar2944 4 года назад +6

    अप्रतिम , धन्य ती देशभक्ती, देशप्रेम.

  • @ashifsheikh5200
    @ashifsheikh5200 5 лет назад +12

    अति उत्तम गाणं 👌👌👌🌺🌺

  • @user-iw8us7bk3r
    @user-iw8us7bk3r 6 лет назад +203

    "तुज साठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण"- स्वा. विर सावरकर

    • @atharvgaonkar2463
      @atharvgaonkar2463 5 лет назад

      प्रवास- भाग शोध शोध शोध नव्याचा 6

    • @ushaphansikar9443
      @ushaphansikar9443 5 лет назад

      L MP mop 0llpp

    • @shraddha9058
      @shraddha9058 5 лет назад

      Mast

    • @busylife4742
      @busylife4742 3 года назад

      कि घेतले हे न व्रत आम्ही अंधतेने
      लब्थप्रकाश ईतिहास निसर्गमाने
      जेदिव्यदाहक म्हणूनी असावयाचे
      बुध्याची वाण धरीले अम्ही हे सतिचे

  • @lalitpawar1094
    @lalitpawar1094 5 месяцев назад +2

    राष्ट्राहितासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा महापुरुष, किती ते देशप्रेम, किती त्या मरणयातना 🙏

  • @miss.vaishalisantoshshinde5361
    @miss.vaishalisantoshshinde5361 6 лет назад +402

    सावरकरां बद्ल सांगितलेली माहीती खुप सुंदर आहे. निवेदन सादर केले ले पण छान आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashishprabhudesai9289
    @ashishprabhudesai9289 5 лет назад +24

    Mughdha is singing in 2 voices... Beautiful...
    Prathamesh as usual..uttam..😍

  • @Sarthi97
    @Sarthi97 6 лет назад +6

    आमचे आदर्श फक्त श्री शिवाजी महाराज, लोकमान्य तिलक आणि स्वा. सावरकर. 🚩🚩

  • @user-mp5sj9os3u
    @user-mp5sj9os3u Год назад +8

    सावरकरांचे कार्य अत्यंत महान आहे .

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 5 лет назад +5

    🙏 प्रणाम स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आणि धन्यवाद, वंदे मातरम.😢

  • @nitinchandratreya5584
    @nitinchandratreya5584 4 года назад +2

    आपल्या देशाला तसेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यासारखे खंदे नेते लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. सर्वांना माझे शतशः प्रणाम!!

  • @NMJundale
    @NMJundale 4 года назад +6

    त्यांच्या कष्टापुढे ,त्रासापुढे ड्युटी करताना आम्हाला येणारे अडथळे , अडचणी खूप खूप खूप कमी शक्तीशाली आहेत .

  • @WisdomInExperience
    @WisdomInExperience 3 года назад +21

    very beautiful speech and song. modern youth doesnt know the sacrifice of Savarkar and family for the nation.