शर आला तो धावुनी आला काळ ll एके काळी अतिशय गाजलेली मराठी कविता ll प्रत्येकांच्या ओठावरची कविता
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- गीतकार :- ग. ह. पाटील
गायक :- सूरज कुमार धनजोडे
व्हिडिओ :- विशाल धनजोडे
नमस्ते मित्रांनो
अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
धन्यवाद 🙏🏻
छान मी लहान असताना ही कविता पाठ केलेली होती आज पुन्हा एकदा मिळाली खूप खूप आभार
पन्नास वर्षापुर्वी आम्हास ही कवीता होती.अप्रतिम आणी आमचे शिक्षक ही आठवणीत आहेत ,त्याना मानाचा मुजरा,
@@satishbhokardole6638 Me dusarit Astana hi Kavita shikvit Astana shikshak chlivar mhanun ghet.Aamhi sagale bhavande sayankali anganat basun saglech anek Kavita chlivar mhanat hoto.Shar aala to saru zale ki aae baba aamchi Kavita laksh devun aeikayache.Hi kavita anekana60 70age zale tarihi tondpath aahe Karan tenha chavathiche vargatach vahit lihit asat.Mhanunach anek kavita tondpath karun ghet.Maj maghari kara tumhi sambhal aeikun aae baba gahivarat hote.Hi chal Pilu ragatil aslyamule sagalyanna aavadte.He aatta samajale.Ya sarva god god aathavine balpan kiti Ramya hote.Hech khare aahe.Gangadhar Kanole Nanded
Khup chan gata.kavita far sunder
माझी आजी ला खूप आवडयाची ही कविता आज तुमच्यामुळे आजी ची विसरलेलं कवळे परत तुमच्या मुळे यादस्मरीनी आले. .... धन्यवाद
खुप हृदय स्पर्शी कविता.🙏🙏
मला माझ्या शाळेची आठवण झाली मनापासून धन्यवाद डोळ्यातून पाणी आले धन्यवाद
खुप सुंदर शाळेतील कवीता ऐकुन धन्य झाले कान तृप्त झाले
अप्रतिम कविता मनाला भावणारी व छान सादरीकरण . खुप आवडली.
ग ह अप्रतिम लिहायचे, गुरुदेव अतिशय सुंदर गायलीत, मी लहानपणी ऐकली होती आईकडून 🙏 😫😫😵😭
खुपच छान कविता बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली धन्यवाद
फारच सुंदर, खूप वर्षापूर्वी वाचलेली कविता गाण्याच्या रुपात ऐकली. धन्यवाद.
खूपच सुंदर कविता आहे मन अगदी गहिवरून आले
अतिशय भावपूर्ण सादरीकरण. खूप दिवसांनची इच्छा पूर्ण झाली, धन्यवाद.
waaaa mi nehmi mhante hikavita...4tya vargala hoti
बऱ्याच जणांनी गायली
पण तुझ्यासारखा आवाज कोणाचाच नाही ✅
आम्ही ज्या आवाजात ऐकली ,गायली तोच आवाज आमच्या गुरुजींनी शिकवलेला🎉
👌👌🌹💐💐👍
Kalij fadun takanare gayan... Apratim rachana....yewhadhi warshe zali tarihi dole ole zalyashiway rahat nahit
अप्रतिम खुपचं छान जय श्रीराम
सर ही कविता मी खूप वेळा एकेली तरी ती आपल्या वाणीतून पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. 😢😢
सलाम तुमच्या वाणीला ❤❤
माझा जन्म 1942 चा. ही कविता माझी अर्ध्याहून अधिक पाठ आहे. अजूनही एकांतात गुणगुणतो. डोळे भरून येतात.
खूपच सुंदर.आम्हाला.ही कविता.होती पूर्ण.आठवत नव्हती.त्याबद्दल आभार
मनात कुठेतरी घर करून असलेली कविता ऐकण्याचे भाग्य मिळाले.धन्यवाद!
श्रावण बाळाची कविता आईसाठी वडिलांसाठी हृदयस्पर्शी कविता मला आठवले ते बालपण मला आठवले श्रावण बाळाचे आई बापासाठी पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर दशरथ राजाने हरीण म्हणून बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहे अशाच कविता तुम्ही सादर करीत सादर करीत राहा हीच विनंती गवळी सर
हां प्रसंग हरताळें (चांगदेव) तलावाच्या तिरावर घडला होता त्याच तळ्याचे पाळिं एका तिर्थस्थान आहे महानुभाव पंथाचे (सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे)
जुनी कविता ऐकायला मिळाली खूप छान
खूप सुंदर कविता आम्हाला चौथीला होती
❤🙏❤ अप्रतिम गायन बरेच वर्षांनी ही कविता यैकली .कोरड्या डोळयांनी ही कविता ऐकू शकतच नाही म्हणू तरी कसे शकणार पण आपण खूपच भावपूर्ण गायलात .👍😊❤🙌❤
खूप छान ...मला चवथीला होती ही कविता खूप वर्षापासून ची इच्छा तुमच्या मुळे आज पुर्ण झाली..खूप खूप धन्यवाद..।।।
8:20
Ati sundapr.
❤कुलकणी वा छान
Atishay sunder rachna Amhala shalhet Kavita Hoti Athaw dili Abhari
मी 65 वर्ष मागे गेलो.
गायका बरोबर गाउन संपूर्ण कवितेचा पुन्हा मुग्ध आनंद घेतला.
धन्यवाद....
फार छान गाईली जुन्या काळातील कवितांची आठवण झाली धन्यवाद.
जुन्या काळचे कविता ची आठवण करून दिली खूप खूप धन्यवाद सर
खुप धन्यवाद 8:22
डोळ्यात पाणी आणण्याची ताकद असलेली कविता...कवीची अजब ताकद....
धन्यवाद कविता लीहणाऱ्या कविना इतका करुण रस भरलेली कविता लिहिली व गायकानेही त्याच भावनेतून गायली धन्य वाद . जय श्री राम.
ही कविता ग. ह. पाटील यांची अजरामर कविता आहे, आपले सादरीकरण खूप छान,
मला खूप आवडते हि कविता.❤🎉
Really I am also heard this poem every time cried ! I love this song ! really very sensible poem ! Jai hind ! Jai Maharashtra !
फारच सुंदर व अर्थपूर्ण कविता, सादरीकरण अतिशय सुंदर, माझी आई हि कविता नेहमी म्हणायची.
खरंच हि कविता भावपूर्ण आहे. माझे जेष्ट सहकारी शिक्षक मा.कुराडे दादा अतीशय सुंदर चालीत गायन करत असत मी महिन्यातून एकदा तरी त्यांच्या कडून कविता ऐकत असे
लहानपणी ची कविता आहे माझी इच्छा पूर्ण झाली
धन्यवाद, आपण अशा जुन्या कविता ,अंगाई गीते सादर करून आम्हांला आमच्या बालपणीचा काळ पुन्हा एकदा समोर उभा केलात.खूप बरे वाटले.असाच जुन्या साहित्याचा खजिना पुन्हा एकदा आपल्याकडून आमच्यासाठी उघडला गेला तर खूप छान होईल.पुन्हा एकदा धन्यवाद अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद घरातील मोठ्याना नमस्कार लहानांना आशीर्वाद .
आजच्या काळात अशी कविता विदयार्थ्यांना अभ्यासक्रमात नक्कीच पाहिजे काळाची गरज आहे ती😂
1967 साली मी चौथीत होतो तेव्हा आम्हाला ही कविता होती आमचे शिक्षक शिकवत असत तेव्हा डोळ्यातून अश्रू यायचे
खूपच सुंदर कविता आहे आणि आवाज पण खूपच सुंदर आहे भाऊ आपला खूप आवडली मनापासून धन्यवाद
खूप छान ऐकताना आपसुक डोळे भरून येतात धन्यवाद
मी सहा वर्षाचा असताना ही कविता वाचली होती पण आम्हाला ही कविता अभ्यासक्रमात नव्हती .फारच भावपूर्ण कविता आहे मी 1968 ला पहिली ला असताना ही कविता माझ्या मामाच्या अभ्यास क्रमातील ही कविता होती .कविता वाचताना डोळे पाणावतात .या कवितेचे संगीतमय वाचन केल्याबद्दल धन्यवाद.अश्याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम चालू ठेवावा .
Aapli juni kavita😂😂😂🚩🚩
मी चवथी मध्ये १९६७/१९६८असताना होती.फारच छान काळजाला भिडणारी कविता आहे. जुने शाळेतील गुरुजींची कविता शिकवत असलेली आठवण आली. डोळे पाणावले. आपण फारच गायली आहे.अशाच जुन्या कविता ऐकण्यास उत्सुक आहे.
धन्यवाद
चाल अतिशय सुंदर पूर्वीच्या कविता अतिशय भावपूर्ण ऐकायला कर्णमधुर
खूप छान कविता
पुष्कळ वर्षांनी ऐकायला मिळाली
अतिशय सुंदर कविता 🙏🙏
1नंबर धन्यवाद
बरेच दिवसांनी चांगल काही ऐकायला मिळालं
Khup khup chan avajahi Ani Kavita tar aprtimach🙏🙏👌👍🙏
धन्यवाद दादा
एक वर्षापूर्वी मीच बोलली होती तुम्हाला शर आला तो धावूनि आला काळ पाठवा म्हणून
धन्यवाद बेटा, एक आजी
वनी खेळते बाळ ते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांची 🎉🎉
शोधा आणि युट्युब वर पाठवा
खुप छान कविता आहे आम्हाला चवथीत होती हिकविता
खुपच सुंदर कविता लहान पन आठवले
आम्हाला ही गोष्ट होती.छान छान गोष्टी पुस्तकात.आमच्या बाई गोष्ट मस्तच सांगायच्या.
आम्हाला पण होती.
खूप खूप आवडती कविता.
खुप सुंदर कविता आहे. आणि तुम्ही गायलीत पण खुप सुंदर. ऐकताना डोळे पाणावले. माझे आजोबा ही अंगाई म्हणून गायचे😭😭
फार सुंदर कविता
माझे वडील नेहमी ही कविता गायन करायचे. सर्व जण आम्ही मनःपूर्वक ऐकायचे. तुम्ही माझ्या वडिलांना माझ्या समोर आणले. जे आज हयात नाहीत. डोळ्यात पाणी आले. 🙏
माझा जन्म 1964 चा.आमच्या अभ्यासक्रमाला ही कविता नव्हती,पूर्वी होती.परंतु लहानपणापसून कविता ऐकत आलो आहे.खुपच भावपूर्ण!अतिशय ह्रदयद्रावक प्रसंग!!
धन्यवाद👏👏
फार सुंदर कविता. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. कवितेचा अर्थ असा आहे की रुदय भारावून गेले. कवीला सुधा सलाम.
लहानपणी ऐकलेली कविता, शब्दरचना अप्रतिम ‼️ चाल पण अप्रतिम ‼️ ऐकताना अंगावर काटा उभा राहिलाच पाहिजे ‼️🙏🙏🙏
ही कविता डोल्यात पाणी आल्याशिवाय ऐकणे अशक्य.
खूपच छान गायली आहे
धन्यवाद
छान छान खूपच छान गायली कविता ऐकून सुंदर वाटली
धन्यवाद दादा, लहानपणी ह्या कवितेत बद्दल खूप खूप ऐकले होते, परंतु संपूर्ण काव.य ऐकण्याचा योग आता आला.खुपच छान काव्यं रचना, अगदी थोडक्या शब्दांत चफकल पुणे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो,हेच या कवितेचे गमक आहे तसेच ती गेय आहे,व तिची चाल सुध्दा ठरलेलीच व ठसठशीत आहे.धन.यवाद.एक अजरामर कविता आहे...😂❤
खूप छान कविता जुन्या आठवणी
खूपच छान कविता. अगदी ऐकून डोळ्यात पाणी आआले.
छान गायली कविता.मंगल वाचन मध्ये सातवी मध्ये शिकलेल्या कवितेला आज उजाळा मिळाला.धन्यवाद.
हि कविता आम्हाला होती खुपच सुंदर 👌🏼👌🏼👍🙏🏽🙏🏽
वाटलं नव्हतं ही लहानपणीची कविता ऐकायला मिळेल खूप सुंदर डोळे पाणावले😢😢
आमचे लहानपणी माझी आई अतिशय सुंदर म्हणायची. शब्दच असे आहेत की श्रावण बाळ आणि ते दृश्य समोर उभी होतात. आम्ही सगळे भावंडे देखील ऐकताना रडत असायचो.
अतिशय सुंदर.ऐकवल्याबध्ल खुप खुप धन्यवाद.🙏🙏
सगळंया जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खूप खूप छानच खूप खूप समाधान झाले.
खुप सुंदर कविता आहे माझ्या खूप आवडीची कविता आज पुर्ण ऐकायला मिळाली. खूप खूप आभार.
खूप अप्रतिम कविता आज लेखी स्वरूपात मला मिळाली धन्यवाद
धन्यवाद दादा.खूप छान ,गहिवर् आणणारं कवन्.🙏🙏👍😭😭
अतिशय सुंदर कविता
खूप छान ही कविता आहे जुने दिवस आठवले 👌👌🌹🌹
अतिशय उत्कट, हृदयस्पर्शी काव्य.. शालेय जीवनात मराठी च्या शिक्षकांनी मनापासून उत्तमरीत्या सादरीकरण करून शिकविल्या मुळे इतक्या वर्षांनंतरही ती मनात तशीच झालेली आहे.. अजूनही कविता ऐकताना डोळे भरून येतातच..
सर जी कृपा करून आपण आई ही कविता एे कवावी
बाळ जातो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून ही कविता उपलब्ध झाल्यास कृपया गाण्याचा प्रयत्न करावा
खुप छान अंगावर शहारे निर्माण करणारे गीत धन्यवाद.
मला ही कविता फार आवडते, अगदी रडू येते, खुप छान आवाज आहे तुमचा
विमल चिंचपुरे गुंजाळवाडी.राम कृष्ण हरी अशाच भावपूर्ण जुन्या कविता टाकत जा.धन्यवाद.
धन्यवाद। बंधु. अप्रतिम गायलात.
माझी पण आजी म्हणायची आणि आम्ही ऐकून झोपी जायचो....खूपच छान रचना आहे
कविता ऐकून शाळेतील आठवण झाली❤🎉🎉
ही कविता शाळेत लहानपणी ऐकली होती. आज आपल्या गायनाने डोळयातून अश्रूंची रांग लागली. आपले सादरीकरण उत्तम व उत्कृष्ठ आहे. या कवितेचा अर्थ जसा जसा समजतो तस तसा श्रावण बाळ आपल्या हृदयापाशी येतो. अप्रतिम, भावस्पर्शी, हृदय पिळवटून टाकणारी कविता. 👌👌👍
मला सहजपणे आठवली आणि मी u ट्यूब वर शोधून काढले आणि सुंदर आवाजात ही कविता ऐकायला मिळाली. कविते बरोबर मी सुद्धा भावविवश होऊन म्हणाले. हृदय स्पर्शी कविता. धन्यवाद.
कीती वर्ष झाली ही हदय स्पर्शी कविता ऐकून .आज तुमच्या मुळे पुन्हा स्मृती जागृत झाल्या.धन्यवाद.
अशा कविता आज रोजी अभ्यासक्रमात पाहिजे
आपल्या मताशी सहमत.
माझ्या आजोबांची आवडती कविता
असा जुन्या कवितांचा संग्रह
अप्रतिम, खूप छान❤आम्हाला होती ही कविता 🌸 धन्यवाद 👍🌹⭐⭐
माझी आई आम्हाला लहानपणी ही कविता नेहमी ऐकवत असे, आजही तिच्या पंच्याहतरीत तिला ही कविता पाठ आहे व म्हणते सुद्धा. खूप छान वाटते.
😢
दादा कोटी कोटी धन्यवाद हृदय स्पर्शी कविता आपण गायली अर्थ पूर्ण आशय आवाजातून जाणवलं नमन करतो
Khup Chan. Hearttouching
कविता p कविता खूप सुंदर मनाला भिडणारी अशी आहे जुन्या आठवणी ची ओळख झाली
मी लहान असताना माझे बाबा पण बोलून दाखवत होते मालखूप आवडली कविता भाऊ छान
खूपच सुंदर कविता गायली भाऊ .आवाज पण खूपच सुंदर आहे तुमचा.
Nice excellent poem. Mi 1979 madhe abhyasleli aahe. Direct chouthya vargat basalyasarkhe vatale. Dhanyavaad sir. Chhan gaily kavita.
कविता अतिशय सुंदर आहे त्यात शंकाच नाही. ऐकवल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
खुप छान. शाळेत असताना वाचताना, ऐकताना डोळे भरून येत असत. छान भावपूर्ण म्हटली आहे🙏🙏
अप्रतिम. छान आईचं काळीज. ❤❤
हि कविता ऐकताना मला माझ्या आईची आठवण आली माझ्या चिमुकल्या भाच्याला पाळण्याला झोका देत ति झोपवायची खरच हि कविता ऐकताना आईची खुप आठवण येते.आज आई नाही या जगात. जणु काही तिचे बोलच कानावर पडले असे वाटते.धन्यवाद. कविता छान वाटते ऐकायला मन प्रसन्न होते..तसेच डोळे भरून येतात.😢
मी वय 73 आहे जन्म 1951चौथीत असताना कै जगन्नाथ शंकर शिंदे गुरूजी छान आवाजात गायचे ही कविता 1960साली
कविता अप्रतिम माझे बाबा म्हणायचे ही कविता मी लहान असताना आज तुम्ही गाताना डोळ्यातून अश्रू आले तुम्ही गायली पण छान धन्यवाद
खूपच छान, बरेच वर्षा पासून ऐकायची होती ही कवीता माझे पती कधी कधी आठवले ही म्हणत असायचे तीस चाळीस वर्षांपूर्वी त्याच्या कडूनच ऐकली होती त्याच्या शाळेत त्यानी शिकलेली होती आमच्या वेळी नव्हती. धन्यवाद ही कविता तुम्ही घेऊन आलात ही कविता ऐकून त्याना त्याचे शाळेतील दिवस डोळयासमोर आले खूपच धन्यवाद