जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2008
  • Suman Kalyanpur sings for JeevankalA
    Putr[a] vhAvA aisA
    P.SAvalArAm
    Vasant Prabhu
    जिथे सागरा धरणी मिळते
    तिथे तुझी मी वाट पाहाते
    डोंगर दरिचे सोडून घर ते
    पल्लव पाचूचे तोडून नाते
    हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
    प्रीत नदी एकरुपते
    वेचित वाळूत शंख शिंपले
    रम्य बाल्य ते जिथे खेळले
    खेळाचा उल्हास रंगात येउनी
    धुंदीत यौवन जिथे डोलते
    बघुनी नभीची चंद्रकोर ती
    सागर हृदयी उर्मी उठती
    सुख दुःखाची जेथ सारखी
    प्रीत जीवना ओढ लागते
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 1,3 тыс.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 года назад +695

    पन्नास वर्षांपूर्वी मी शाळेत जाताना अकरा वाजता कामगार सभा म्हणून आकाशवाणी वर एक गाण्याचा कार्यक्रम असायचा ...त्यात अशी सुमधूर गाणी लागायची !! आज मन पुन्हा एकदा मागे गेले..!! डोळे भरून आले...!!

    • @UserAurKya
      @UserAurKya 2 года назад +11

      Old is always gold ...

    • @ramhanuman1111
      @ramhanuman1111 2 года назад +64

      जुनी माणसं परमेश्वरा ला मानणारी होती, नीती मूल्य शिल्लक होती, त्यामुळे अशी अजरामर कलाकृती निर्माण झाली

    • @vasantgorule1676
      @vasantgorule1676 2 года назад +4

      Hoy dada

    • @shakuntalanavagire582
      @shakuntalanavagire582 2 года назад +10

      As am listening these melodies since 1960 to 2022.very nice.

    • @nandlalraut334
      @nandlalraut334 2 года назад +22

      अगदी बराेबर बाेलला आपण....त्याशिवाय हे अजरामर गीत ,संगीत तयार हाेऊ शकत नाही....ही गाणी आजही मनाला भावतात....ऐकांतात असलाे की,मी नेहमी ऐकताे.....मनावरचा ताण कमी हाेताे....नमस्कार.....

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 года назад +46

    जुनी माणसं परमेश्वरा ला मानणारी होती, नीती मूल्य शिल्लक होती, त्यामुळे अशी अजरामर कलाकृती निर्माण झाली

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 4 года назад +46

    फक्त काही वर्षे वाट पहा.बाबूजी,गदिमा,पी.सावळाराम,राजा परांजपे सर्व महान कलावंत पुनर्जन्म घेऊन येणार आहेत.सध्याच्या धांगडधिंग्याचे दिवस संपून मराठी संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा येईल.

  • @prasadkhanolkar2964
    @prasadkhanolkar2964 3 года назад +270

    सुंदर,सात्विक,शालीन...ती माणसे,ती गाणी,ते शब्द.. ते संगीत..आता परतून न होणे....आताच्या संगीतात जीव नुसता गुदमरतो...

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад +3

      Khara aahe

    • @dakshamokashi1691
      @dakshamokashi1691 2 года назад +1

      Agree

    • @prakashdeshpande6046
      @prakashdeshpande6046 2 года назад +1

      I agree with you

    • @ramhanuman1111
      @ramhanuman1111 2 года назад +8

      जुनी माणसं परमेश्वरा ला मानणारी होती, नीती मूल्य शिल्लक होती, त्यामुळे अशी अजरामर कलाकृती निर्माण झाली

    • @sharadapamula2829
      @sharadapamula2829 2 года назад +2

      Very true

  • @jyotibarkade1535
    @jyotibarkade1535 4 года назад +223

    अशी सुन्दर गाणी ऐकताना आम्ही मोठे झालो हे आमचे भाग्य.

  • @gajusable8492
    @gajusable8492 Год назад +91

    खरं म्हणजे you tube चे मानावे तितके आभारी आहोत आपण. आम्हाला हा मोलाचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल 👏👏👏

  • @TN-kp1fy
    @TN-kp1fy 4 года назад +204

    काय वर्णन करणार या गाण्याचं? शब्द तर सुचले पाहिजेत ना! काय ती शब्दरचना, काय ते संगीत, काय ती चाल, काय तो स्वर, काय ते गायन! सर्व काही अप्रतिम.

    • @meeramahabal95
      @meeramahabal95 2 года назад +1

      Marthisong

    • @vaishalidesai1783
      @vaishalidesai1783 2 года назад +2

      खुप छान..

    • @pranoutigaikwad6903
      @pranoutigaikwad6903 2 года назад

      Oop

    • @s_harwalkar
      @s_harwalkar 2 года назад +2

      चित्रणही तितकंच सुंदर आणि निरागस!

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 2 года назад +4

      आणि तेच आजचे अजय-अतुल, अवधुत गुप्ते पहा!
      संगीताची पार वाट लावलीय!

  • @vaibhavjadhav3702
    @vaibhavjadhav3702 Год назад +28

    माझी खुपच आवडीची गाईका,यांनाच भारतरत्न पुरस्कार द्यावयास हवा,प्रामाणिक इच्छा❤

    • @ravindramohite1149
      @ravindramohite1149 3 месяца назад

      Suman kalyanpur. bas naam hi kafi hai

    • @sandeeppandit6485
      @sandeeppandit6485 16 дней назад

      आपण भारतीय इतक्या वर्षांनी देखील ऐकतोय हाच खरा भारतरत्न पुरस्कार आहे. इतर पुरस्कार प्राप्त कलाकारांचे स्मरण आज कोणीही करतं नाही. शेवटी कला व राजकारण वेगळं आहे.

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 2 года назад +72

    सुमन कल्याणपूरांचा गोड,कोमल, मधूर आवाज
    ज्या गीताला लाभला ते गाणे तितकेच गोड अवीट आणि अजरामर झाले समजायला हरकत नसावी. अशी अनेक गाणी चिरतारुण्य घेऊन अजरामर झाली आहेत,जी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात...
    " God bless you Suman tai "

  • @mangaladigambar7652
    @mangaladigambar7652 2 года назад +39

    देवा परमेश्वरा ही लोक आता हवी होती काय वर्णन करावं याचं शब्द नाही 🙏🙏

  • @prasadmarathe193
    @prasadmarathe193 2 года назад +7

    अविट गोडीची गाणी आहेत. या गाण्यामुळे पुत्र व्हावा ऐसा हा सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमातील हिरो विवेक ज्यांना मराठीतील देवानंद म्हटले जायचे ते आमच्या घरी अनेक वेळा आले आहेत. अत्यंत साधी राहणी. ते इतके मोठे कलाकार आहेत अस कधीच जाणवलं नाही.

  • @gajananansingkar9603
    @gajananansingkar9603 5 лет назад +77

    लताताई , आशाताई व संपुर्ण मंगेशकर कुटुंब , स्व.किशोर कुमार ,स्व. मुकेश, स्व.रफी साहेब, मन्नाडे , महेद्र कपूर ,स्व.पंडित भीमसेन जोशी, स्व. प्रल्हाद शिंदे, सुधीर फडके , वाणी जयराम
    , हेमंतकुमार , सुमन कल्याणपूर व असे इतर जुने गायक आणि गीतकार , संगीतकार यांनी आमच्या पिढीला व येणाऱ्या पिढीला हिंदी व मराठी गाण्यांचा अमूल्य ठेवा दिलेला आहे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.

    • @ramchandrabhalekar731
      @ramchandrabhalekar731 3 года назад +1

      अगदी मनातले बोललात दादा तुम्ही त्यावेळची गाणी अप्रतिम अवीट गोडीची अहाहा,,,,,,,🙏🙏

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 3 года назад +2

      माझ्या मनातले बोलतात !! धन्यवाद !!

    • @gajananansingkar9603
      @gajananansingkar9603 3 года назад +2

      नमस्कार व आपले आभार

    • @ManojGiri-zp7cb
      @ManojGiri-zp7cb 3 месяца назад +3

      लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खरंच असे दिवस परत येतील

    • @user-xi1mj5ul3r
      @user-xi1mj5ul3r Месяц назад

      पन्नास वर्ष मागे गेल्यामुळे तरुण आहे वाटत आहे अशीच जूनी गाणी ऐकवा

  • @nandkumarpedamkar6463
    @nandkumarpedamkar6463 10 месяцев назад +6

    सुमन ताई माझ्या डोळ्यात अश्रू येतात.अप्रतिम ताई.एका लहान भावाला .खूप छान ताई मिळाली.

  • @milindsawant5707
    @milindsawant5707 3 года назад +87

    एक अप्रतिम आवाज....
    सूमन ताई...धन्यवाद....

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 года назад +129

    संगीतकार वसंत प्रभू यांचे अप्रतिम संगीत,आणि सुमन कल्याणपूर याचा स्वर.वाह.

  • @ashakadam1763
    @ashakadam1763 2 года назад +66

    Old is gold always तुलना होऊच शकत नाही आजच्या काळात अशी गाणी नवीन पिढीला माहीत होणे अपेक्षित आहे

  • @ulhaslanjekar1085
    @ulhaslanjekar1085 Год назад +14

    सुमन कल्याणपूर या फार मोठ्या ताकदीच्या गाईका आहेत. त्यांनी गाईलेल प्रत्येक गाणं अजरामर केलं आहे. आज नवीन गाणी ऐकली की ,, त्यांची आठवण येते. अशी गाईका,,अशी गायकी,, असा आवाज पुन्हा होणार नाही. एकच - सुमन कल्याणपूर 🌷🌷🙏🙏

  • @prasadsamant9308
    @prasadsamant9308 2 года назад +17

    कुठेही वाद्यांच्या आवजांची गर्दी नाही गोंगाट नाही.. मधुर सात्विक आवाज सात्विक संगीत

    • @mandasuryawanshi4073
      @mandasuryawanshi4073 Год назад +1

      Sangeet.lahari.aksheshaha.rhudayatunjatata...ase.he.saneet.geet.sudhha..kiti.anand.dete..pan.ata.kuthe.tari.harvalay.he.sagle..

  • @dilipkhedekar5635
    @dilipkhedekar5635 2 года назад +75

    💐 !! आमच्यां "त्या वयांतल्यां" वेळचे अवीट गोडीचे प्रणयी गीत ! आठवणींच्यां इंद्रधनुषी झूल्यांवरचं गीत ! असा मेळ पुन्हां जमणं नाही !! 💐

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 года назад +3

      पुर्ण समधानाची अस्सल मेजवानी खरच आम्ही खुप भाग्यवान आहोत

    • @ambadaskhode6823
      @ambadaskhode6823 2 года назад +5

      ज्यांचा ज्यांचा जिव गुदमरतो त्यांनी समजून घ्यावं.😅

    • @sureshpise4882
      @sureshpise4882 Год назад

      खरंच

    • @sharmilagavankar480
      @sharmilagavankar480 Год назад +1

      Agdi barobar

  • @prutvipatil1211
    @prutvipatil1211 5 лет назад +160

    देवा ही माणसं पुन्हा पुन्हा जन्मास यओ
    अप्रतिम गाणी
    अवीट अविसमरनिय

    • @deadmanlegend2909
      @deadmanlegend2909 4 года назад +1

      Legends Nevers die

    • @vilassurve2352
      @vilassurve2352 4 года назад +5

      ऐक नंबर आहेत ही.मराठी गाणि मला खुप खुप ऐकायला आवडतात

    • @asawariapsingekar3315
      @asawariapsingekar3315 4 года назад +5

      Mala pan juni gani khip avadtat nhi tr aaj kalchya pidhila tasali phaltu navin gani avadtat

    • @kirandeshmukh1074
      @kirandeshmukh1074 3 года назад +1

      100%

    • @sudhakardharao2975
      @sudhakardharao2975 3 года назад +1

      प्रसन्न पाहत प्रसन्न गीत.. आनंद ..आनंद.

  • @saayoralamgirahmed9291
    @saayoralamgirahmed9291 3 года назад +134

    I am from Bangladesh . I could not understand the music, but the music tune and singers music delivers style was unparalleled, and finally I loved the music-song. Love you singer.

    • @paragkasodekar4051
      @paragkasodekar4051 3 года назад +11

      Its our pleasure you're listening indian music

    • @rajeevgangal542
      @rajeevgangal542 2 года назад

      Where the ocean meets the sky at the horizon is where I am waiting for you (my lover) . Leaving her house in the mountains and rivers she has broken her relationship with boulders and joined the ocean. That's where I wait for you..picking shells from the beach where we played on chilsroon, we transformed to a raging passionate youth like waves. I await you......on on and on

    • @marutimole5402
      @marutimole5402 Год назад +7

      It's Marathi language, from Maharashtra, belonging to Mumbai.

    • @prakashmungekar3119
      @prakashmungekar3119 Год назад +3

      Thanks Ahmed sir for appreciating this song . This song is in Marathi . This song has power to heal . This song clears all the dirt from our soul .

    • @shreebrahme
      @shreebrahme Год назад +7

      Incidentally the singer of this song - Suman Kalyanpur - was born in Dhaka...

  • @madhavdalvi7097
    @madhavdalvi7097 2 года назад +127

    कोण म्हणते ? हे गाणे लता दीदींच्या आवाजातील आहे ...हे गाणे गायीले आहे सर्वांच्या आवडत्या सुमन कल्याणपूर या गायिकेने....खरंच एक सुमन जे कधी ( खऱ्या अर्थाने) फुलले नाही...

    • @sudhirchikte25
      @sudhirchikte25 2 года назад +5

      खरचं नाही फुललं

    • @rajumore540
      @rajumore540 2 года назад +8

      मला वाटत त्याकाळी त्यांच्यावर अन्याय झाला असावा म्हणून ते सुमन फुलले नाही...

    • @vinayakkittur3964
      @vinayakkittur3964 Год назад +1

      खरंच..... अत्यंत सुरेल आवाज सुमनताईंचा...

    • @vijaysali9693
      @vijaysali9693 Год назад +2

      सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे गाणे आहे

    • @mohanpujar7403
      @mohanpujar7403 Год назад

      सुमनजींवर अन्याय झाला आणि तो लतादीदींनी केला, हे ऐकून-२ खरोखर वीट आला आहे! लतादीदींच्या आवाजाशी थोडेफार साम्य आहे, यापलिकडे सुमनजींच्या आणि लतादीदींच्या आवाजात पुष्कळ फरक आहे, पण फक्त जाणकारच हा फरक सांगू शकतो. उषा खन्नाजींनी त्यांच्या मुलाखातीत स्पष्टपणे सांगितले आहे, सुमनजींच्या आवाजात Annoying कंपन असून त्यांचा आवाज लतादीदींच्या आवाजाची पन्नासावी काॕपी आहे. नाहीतर अनिलदा पासून ते लक्ष्मीकांत प्यारेलालपर्यंत सगळे वरिष्ठ संगीतकार लतादीदींच्या आवाजात त्यांची गाणी गाऊन घ्यायला हिरीरिने पुढे नसते आले. बहुतेक संगीतकार सुमनजींचा आवाज लतादीदींच्या आवाजाचा पर्याय म्हणून वापरत असत. या विषयावर खरेतर बरेच लिहिता येईल, परंतु लतादीदींवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना कोण थांबवणार?

  • @prabhakargramopadhye6116
    @prabhakargramopadhye6116 2 года назад +12

    शब्दच अपुरे पडतात,मी हे गाणं गेली तिस वर्षे पुन: पुन: ऐकतो पण मन भरत नाही.

  • @sandeepsalkar96
    @sandeepsalkar96 4 года назад +67

    पूर्वी रेडिओ वर हे गणे हमखास ऐकायला मिळायचे. कधी सकाळी तर कधी सायंकाळी . मराठी संगीतातला अजरामर ठेवा असाच पण नेहमी ऐकायला मिळाला तर आधीच्या जुन्या आठवणी ताज्या होतीलच. खूपच सुंदर गाणं आहे ..

    • @yogkamal1073
      @yogkamal1073 2 года назад +4

      नक्किच...शाळेत जातांना अकरा साडे अकराच्या आसपास ही आणि यासारखीच अजून काही गाणी लागायची..

    • @rajendrageet1927
      @rajendrageet1927 2 года назад +2

      उत्कृष्ट गीत. 🙏🙏🙏

    • @bhaskarbadgujar8270
      @bhaskarbadgujar8270 2 года назад +1

      मनमोहक गीत

  • @sandeep90166
    @sandeep90166 3 года назад +8

    माझ्या वडिलांच्या तरुण पणीचे गाणे माझ्या 25 वर्षाच्या मुलाच्या पिढीला पण आवडते. चमत्कार आहे

  • @dilippawar7030
    @dilippawar7030 5 лет назад +71

    वाह.वाह सुंदर.गाण....रात्री 12 ला एकतोय.......नास्टँलजीक..विवेक जीवनकला.....जग किती सुंदर होत.तेव्हा

    • @renee9283
      @renee9283 3 года назад +1

      Jag kharokhar khoop sundar hote ani manages sudhha sundar hoti.

    • @ashokdesai4758
      @ashokdesai4758 Год назад

      कवी ः पी. सावळाराम
      संगीतः वसंत प्रभू
      गायिकाः सुमन कल्याणपूर
      अभिनेत्रीः जीवनकला

  • @ujwalkumarbhatkar7233
    @ujwalkumarbhatkar7233 3 года назад +19

    अतिशय गोड गाणे ! सुंदर गीत,जबरदस्त शब्दरचना,अद्भुत संगीत....ब्लैक एंड व्हाईट असूनही शानदार पिक्चरायजेशन...रेडीयोवरच ऐकायचो कधीकाळी !

  • @yashwantpatil2934
    @yashwantpatil2934 5 лет назад +63

    माझे सर्वात आवडते गीत.
    किती वेळाही ऐकले तरी आणखी ऐकावे वाटते.

  • @siddgroupngp
    @siddgroupngp 5 лет назад +39

    बचपन की यादें ताजा हो जाती है आई जब गाना सुनती थी तब की यादें फिर से जिंदा हो गई

  • @blessfx3244
    @blessfx3244 2 года назад +54

    Love from Malaysia 🇲🇾 my father used to listen to these songs when I was a child !!
    Very meaningful

  • @prajaktnaik6699
    @prajaktnaik6699 Год назад +2

    या गाण्याची चाल माझ्या मनाला अगदी लहानपणापासून आवडली होती. व ती मी गायची.
    प्रितम नाईक
    गोवा

  • @sharadkaldante6517
    @sharadkaldante6517 2 месяца назад +1

    अशा सुमधूर गाण्यामुळेच मराठी किती उच्च दर्जाची हे कळतं "अभिजात दर्जा"

  • @chandrashekharlondhe6097
    @chandrashekharlondhe6097 2 года назад +6

    माझी मिनी माझ्यासाठी हे गाणं गाते असं सारखं वाटतं, आमचं प्रेम सागर किनारी म्हणजे वाशीच्या सागरविहारलाच फुलले आणि पुर्णही झाले, गणपती बाप्पा तीला सुखात ठेव,हिच प्रार्थना.

  • @sureshshirke
    @sureshshirke 4 года назад +20

    एक अजरामर मराठी गीत . ,शब्द ,स्वर ताल ,चाल, भावना प्रकटन,चित्रीकरण ...सारेच काही अप्रतिम . ब्रम्हानंदी टाळी लागते ( Feeling of Bliss) ;)

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 года назад +7

    ह्या अप्रतिम आणि अविस्मरणीय प्रेमगीताला गाण्याला ११०० dislikes, आश्चर्य आहे.

    • @nishantsonavane7896
      @nishantsonavane7896 3 месяца назад

      ज्याला समजले नसेल त्यांनी डीसलाईक केलं असेल 😊

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 11 месяцев назад +4

    तळवलकर साहेब, कामगार सभा आणि ती धून आजही आठवते! रम्य ते बालपण.
    🌹🙏🌹

  • @nenesv1956
    @nenesv1956 2 года назад +5

    विवेक आणि जीवन कला यांचा अप्रतिम अभिनय चित्रपट पुत्र व्हावा ऐसा

  • @soldieroffaith4425
    @soldieroffaith4425 4 года назад +48

    I heard these all black and white movie songs in the transister mostly in my boyhood and growing years in my home town in coastal Karnataka. Radio was the only means of entertainment in those days other than theater. Due to the long stay of my family in Bombay my mother loved Marathi songs and dramas that she used to listen and enjoy there. When back in hometown mother used to hold the transister near to her ear to listen to these songs. The lilt of these songs rings in my ears even after decades of listening to it. Time changed and the link with these songs was lost on my mother's passing away. How nostalgic it is after such a long time.

  • @anilkalbhor12
    @anilkalbhor12 5 лет назад +234

    माझे bad luck हे गाणे मी रात्री पहातोय ..खुप लहानपणी माझे वडील हे गाणे पहाटे पहाटे लावीत असत .आणि शनिवारची पहाट परत एकदा आठवली कारण शनिवारी सकाळी शाळा असायची .

  • @pratibhadarekar2277
    @pratibhadarekar2277 9 лет назад +81

    अतिशय सूंदर...
    अशी गाणी....का नाही होत आता..
    हे मराठीच वैभव आहे.

    • @essemagencies5562
      @essemagencies5562 7 лет назад

      Pratibha Darekar

    • @rajendraprasadshinde2968
      @rajendraprasadshinde2968 7 лет назад +7

      Marathis are running after money, they have become career oriented, they have no time to wait for someone at the end of the horizon and at the sea, they will immediately take another temporary option.....these songs are our breath...we who are outdated in this world

    • @panjabraoarmal5142
      @panjabraoarmal5142 7 лет назад +2

      Essem Agencies

    • @kamaldeore1367
      @kamaldeore1367 7 лет назад

      Pratibha Darekar faarach chan git ahe.

    • @rashmikulkarni3953
      @rashmikulkarni3953 7 лет назад

      Kamal Deore old

  • @gbrapte
    @gbrapte 6 лет назад +137

    Proud to be Indian . Proud to be Hindu . Proud to be Maharashtrian to be able to listen and understand such classical Marathi lyrics .
    Wish to reborn same as above and enjoy these Marathi classical music .

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 5 лет назад +1

      Same here.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 5 лет назад +7

      आपण प्रतिक्रिया मराठीत लिहीली असती तर आनंद झाला असता

    • @killa3929
      @killa3929 4 года назад +3

      He gaan muslim nahi aiku shakat ka?

    • @dominicakhare556
      @dominicakhare556 4 года назад +3

      Same Here Dada

    • @gbrapte
      @gbrapte 4 года назад +3

      @@dilipgandhi2814 don't have Marathi keyboard . And it's slightly difficult to right in Marathi now . Still will put my all efforts to be able to post in Marathi . Learning Sanskrit since last more than 3 months

  • @avp4858
    @avp4858 3 года назад +9

    I am a Kannadiga. But I am very fond of Marathi songs. I always listen to old Marathi songs, particularly romantic & devotional.
    Though I don't understand Marathi, I listen to Marathi songs which are refreshing...

  • @harshadadeshmukh1853
    @harshadadeshmukh1853 4 года назад +18

    माझ्या आईच्या आवडीचे गाणे आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या आईची खूप आठवण येते. ☺☺

  • @chandugudd383
    @chandugudd383 6 лет назад +179

    आपण भाग्यवान आहोत ही गोड गाणी ऐकून मन तृप्त होते.

  • @SwarupNagdeve
    @SwarupNagdeve Год назад +6

    खुप छान सुंदर गीत आहे. संबंधित सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.

  • @amarkshirsagar2509
    @amarkshirsagar2509 Год назад +5

    God bring that Golder Era back to our lives. (1970's) I might even come back to life after my death if my dead body hears this song.

  • @rameshjamdade5785
    @rameshjamdade5785 7 лет назад +122

    अप्रतिम ,, तोडच नाही सुंदर , जुनं ते सोनं यात शँखा नाहीं , किती हि ऐकली तरी कधीच कंटाळा न आणणारी, सुंदर

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 4 года назад +5

    परत परत वाटते की सगळा काही घेऊन कोणी वेळे ला 1990 मध्ये थांबवून देत असेल तर किती बर होईल.
    आपन सगळ्याची नासाडी करून टाकली हव्यासापोटी. 😢😥😥😢

  • @appakadam6190
    @appakadam6190 2 года назад +8

    होय...मि ही लहानपणी पासून ऐकतोय...त्या वेळी रेडीओ वर सकाळी 11 वा.कामगार सभा मध्ये ऐकायला मिळायचे..आता ऐकतांना लहानपनात आल्या सारखे वाटत...

  • @vasantdarshetkar6459
    @vasantdarshetkar6459 3 года назад +5

    " वाह वाह , सुंदर गाणं , सुमन कल्याणपूर .

    • @sakshamjangam8655
      @sakshamjangam8655 2 года назад

      सुंदर

    • @vikascongratulationsrane5846
      @vikascongratulationsrane5846 2 года назад

      अतिशय सुंदर गाणे ऐकले अणि बालपण आठवले ,डोळ्यात पाणी आले

  • @hiteshkumar2604
    @hiteshkumar2604 4 года назад +2

    बालपणापासून ऐकत आहे हे गाणं,आज 37 वर्षाचा आहे पण आता वाटतंय की कुणी माझ्यासाठी सुद्धा हे गाणं म्हणावं.
    सुमन ताईंचा आवाज लाजवाब,कर्णमधुर संगीत,आणि कलावंत सुद्धा,

  • @shrikanttarkar205
    @shrikanttarkar205 4 года назад +7

    फक्त प्रेम आसक्ती, मिलनाची भक्ती, निरागस तृप्ती , हिच खरी प्रितशक्ती.

  • @sanjaykoli5664
    @sanjaykoli5664 5 лет назад +3

    खरंच मित्रांनो आपण खूप भाग्यवान आहोत, जी अशी गाणी आपल्या वाटेल आली , ह्या गाण्यात खूप काही आणि बरच काही लपलेलं असत , अगदीच अर्थपूर्ण भावपूर्ण मनमोहक सुंदर अप्रतिम अशी हि गाणी असं वाटतं ऐकतच राहावं 👌👌👌👌💚💙💚💙

  • @ganshyampachopal453
    @ganshyampachopal453 7 лет назад +7

    अतिशय श्रवणिय व अर्थातच अर्थपूर्ण सुंदर, पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी गाणी. सुंदर अति सुंदर!

  • @anilgaikwad4241
    @anilgaikwad4241 Месяц назад

    तीथे तुझी मी वाट पाहते .अतिशय सूंदर गाण आणि गाण्यातून व्यक्त झालेल्या प्रेम भावना .सुमणजींचे आभार.

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh 11 месяцев назад

    अशी साधी, शांत, सुंदर गाणी ऐकत आम्ही शाळा व कॉलेज 12 वि पर्यंत आलो, 1995 साली जरी ही गाणी आधीच्या काळातील असली तरी कायम रेडियो वर लागायची आणि हीच जुनी गाणी ऐकून प्रसन्न वाटायचे....
    नंतर मात्र अचानक सर्व बदलत गेले, जगच बदलले सगळे...

  • @jogeshshelar
    @jogeshshelar 4 года назад +4

    किती निर्मल गाणी आहेत ही . सुखद अनुभव देणारी. मन हलक करणारी.

  • @dhananjaykulkarni8
    @dhananjaykulkarni8 9 лет назад +4

    अप्रतिम गीत....माझ्या साठी तरी एकदा ऐकाच...!

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 года назад +2

    खूपच अप्रतिम गीत ' जुन्या गीतांची किमया च कांही अनमोल होती . अर्थपूर्ण ' सुसंगीत बध्द होती .

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 6 лет назад +8

    अगर ऐसा कोई इंतजार करता है तो मैं उसको जीवन के पार भी मिलूंगा

    • @pareshnaik7726
      @pareshnaik7726 5 лет назад

      Mayookh Dave
      काश की ऐसा प्रेम हर सच्चे प्रेमी को मीले।

  • @ulkapatil182
    @ulkapatil182 Год назад +2

    हे गीत आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकत आहे.खूप सुंदर गीत आणि सुमन कल्याणपुर यांनी छानच गायले आहे 👌

  • @pankajshroff9109
    @pankajshroff9109 2 года назад +6

    My entire childhood passed listening these songs on radio.... I remeber songs even after 45 years.... Aprateemm.

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 2 месяца назад

    जिते सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते काय भावपुर्ण रचना आहे धन्य झालो मी हे गीत ऐकुन

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 9 месяцев назад +2

    Vasant Prabhu, undoubtedly SD Burman of Marathi film music.
    Lovers of Marathi music owe their unforgetting love and respect to this great man.

  • @vikassoman8673
    @vikassoman8673 8 лет назад +33

    एव्हरग्रीन... संगीत, स्वर, गाणं सगळंच जुळून आलय ... कितीही वेळा ऐकलं तरी कमीच...

    • @balu.kaka.kerkar
      @balu.kaka.kerkar Год назад

      My school days i tune to kamgarsabha at elevan am and go to school

  • @MsACORDION
    @MsACORDION 11 лет назад +47

    very melodious composition by late Vasant Prabhu ji and sung by the great Suman Kalyanpur ji in her very very sweet voice no words to praise this master piece of the century never will this golden melodies be heard again it is a great pity .PIANO ACCORDIONIST arranger and compose FRANK STEPHENS

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 месяца назад

    वसंत प्रभू, the Great 🙏
    मराठी संगीतात रस असलेल्या कुठल्याही पिढीतील व्यक्तीला हे गाणे ठाऊक नाही असे होऊच शकत नाही..
    सुमन कल्याण पूर यांच्यासाठी हे गाणे म्हणजे सिग्नेचर ट्यून असेच म्हणावेसे वाटते

  • @dnyaneshwarbhutkar3041
    @dnyaneshwarbhutkar3041 7 месяцев назад

    मला अतिशय आवडलेले गाणं.
    गीतात सागराचे सानिध्य,
    एक मेकांवरचे स्र्वर्गीय प्रेम.
    कर्णमधूर आवाज,
    गीतातील भाव. व साधे संगीत
    इ. इ. बरेच काही लिहीण्याचा शब्द आठवावे लागतात अशा अनेक बाबी आहेत. गेली चाळीस वर्षे माझ्या मनात या सुमधूर गीताने घर केले आहे.
    गाणे लिहीणारा, संगीत देणारा, व अभिनय करणारे कलाकार, त्यांचे हावभाव अप्रतिम आहेत.

  • @kishorghodake9707
    @kishorghodake9707 5 лет назад +10

    अशी गायिका असे संगीतकार आणि गीतकार
    पुन्हा होणे नाही

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 5 лет назад +15

    सागराच्या गंभीरतेसारखे अप्रतिम शब्द तसेच लाटांच्या लयीला व गाजेला स्पर्श करणारे अनुपम संगीत. संपुर्ण गीत सहजसुंदरपणे आपल्यापर्यत पोहचवणारी रूपमती जीवनकला.तसेच या सर्वांना बांधून ठेवणारा सुमनजींचा सुमधुर सुस्वर. हे गाणे जर तिन्हीसांजेला ऐकले तर दुर गेलेल्या स्वजनांची आठवण येऊन मन व्याकुळ होते. .तसेच एका उदास आनंदाचा अनुभव देणारे आहे.केवळ अभिजात.

  • @surendrakerkar9462
    @surendrakerkar9462 5 лет назад +2

    पी सावळाराम , वसंत प्रभू आणि सुमन कल्याणपूर अविस्मरणीय मधुर गीत

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i 5 месяцев назад

    रबिंद्र संगीताच्या संस्कारातून जन्मलेलं हे गीत मायमराठीच्या कुशीत वाढलं, रसिकांच्या हृदयात घर करून राहिलं, राहील!
    एकेक सूर जन्मोजन्मीच्या स्वरसाधनेचा हात धरून आकाशीचा शब्द घेऊन सुमनताईंच्या कंठातून सागराच्या लाटेसारखा आजही डोळ्यातून पाझरतो!
    जन्म सार्थकी लागला!

  • @bapuraonisargandh7958
    @bapuraonisargandh7958 2 года назад +3

    अप्रतिम गीत . सुंदर रचना धन्यवाद.

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 3 года назад +4

    हे माझ अतिशय आवडतं गीत आहे. सरळ साधे शद्ब आणि तितकीच सुमधूर चाल व तितकाच सुरेल प्रभावी आवाज. वा!

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 2 дня назад

    खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद

  • @priyachitte864
    @priyachitte864 2 месяца назад

    किती talented होत्या सुमन जी.किती अवघड गीत किती गोड गायले आहे.😊
    हिरोईन कोंन आहे .

  • @nayanasawant2648
    @nayanasawant2648 5 лет назад +17

    किती छान गाणी आहेत , खरंच मन खूप प्रसन्न होते.

  • @sl-sd7mk
    @sl-sd7mk 3 года назад +9

    खेळाचा उल्हास रंगात येऊन धुंदीत यौवन जिथे डोलते तिथे तुझी मी वाट पाहाते 👍👍

  • @crazysamforu2598
    @crazysamforu2598 21 день назад

    माझा वय वर्ष 35 मी अजून हीच गाणी ऐकतो...तोड नाही ह्या गाण्यांना...नशीब आम्ही ह्या पिढीशी...जोडून आहोत...

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 4 года назад +2

    खरंच ही गाणी ऐकताना आपण खूप छान काखंडात जन्मलॅ याबद्दलपरमेशाचे आभेर मानू तितके थोडेच!

  • @sandeep90166
    @sandeep90166 3 года назад +3

    30-40 वर्षा पूर्वी सर्व घरातून ही गाणी अजूनही आवडीने ऐकली जातात

  • @rakeshdamania7662
    @rakeshdamania7662 8 лет назад +63

    अतिशय सुंदर संगीत
    खरच मराठी संगीताचे सुवर्ण दिवस होते ते..

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 года назад +4

    jgd.मनाला भावणारे गीत! मनीॅच्या उर्मि कशा उसळतात जशी नदी सागराकडे झेपावते. निसर्गाचे सहवासात मनीच्या आशा पालवतात. गीत,संगीत व निसर्गसौंदर्याचा अद्भुत संगम!

  • @arvindsingasane2118
    @arvindsingasane2118 8 лет назад +200

    सुमन ताईंचा आवाज आणि गारठणारी सकाळ अहाहा !!!!

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu 5 лет назад +4

    अतिशय सुंदर गीत अप्रतिम👌👌👌👌👌 माझ्या आईचे आवडते गाणे

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 3 года назад +7

    माझो अतिशय आवडतं गाणं ....❤❤

  • @raginisahani8403
    @raginisahani8403 8 месяцев назад

    यमन रागातील खूप सुंदर गाणं सुमन कल्याणपूर यांचे खूप सुंदर गाणं

  • @urmilathakur3863
    @urmilathakur3863 5 лет назад +5

    माझं अतिशय आवडत गाणं
    सुमनताईंचा आवाज खूप गोड आहे

  • @SANTGURUJI
    @SANTGURUJI 10 лет назад +43

    Valentineis should learn this type of love

  • @devashishvartak
    @devashishvartak 4 года назад +23

    My mom's favourite song... I so remember her as I listen to this song...

  • @rajanmahimkar7549
    @rajanmahimkar7549 Год назад

    जिथे शब्दच अपुरे पडतात,तिथे काय लिहायचे.
    अप्रतिम, साधारण समजायला लागल्यापासून म्हणजे 57/58 वर्षे कानाला तृप्त करणारे एक अविट गीत,संगीत व आवाज.

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 Год назад

    खुप जुनं व मन भरून आकर्षित करतं हे गाणं ऐकले की लहान पणातल्या आठवणी येतात धन्यवाद

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 3 года назад +7

    गोड आवाज, मधुर संगीत, सुंदर बोल ...वारंवार ऐकत राहावे........🙏🙏🙏👍

  • @haridasthakre2351
    @haridasthakre2351 5 лет назад +15

    काळाच्या ओघात अमर राहणारे गीत

  • @spatil4192
    @spatil4192 2 года назад +1

    ओल्ड इज गोल्ड अप्रतिम माय फेवरेट सॉंग

  • @santoshkhanpate4252
    @santoshkhanpate4252 2 года назад +2

    छान आवाज सुमन कल्याणपुर

  • @harshalaachrekar840
    @harshalaachrekar840 5 лет назад +4

    अप्रतिम शब्दरचना सुंदर संगित अन त्यावर सुमन ताईंच्या आवाजाचा साज

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 5 лет назад +14

    अशी गाणी पुन्हा होणे नाही
    अप्रतिम आहेत

    • @nandkumarkharpude9164
      @nandkumarkharpude9164 4 года назад

      Aapratim git he gane eikatana lahapanichi aapali aawadchi aathavan yete aase git punya hone nahi hrudaysparsi

  • @ushajoshi7373
    @ushajoshi7373 5 лет назад +2

    जिथे सागरा धरणी मिळते. Waav fantastic I am very happy to listen this song. R G Joshi sangli

  • @vidyaparnerkar659
    @vidyaparnerkar659 5 лет назад +2

    जीथे सागरा धरणी मीळते तीथे तुझी मी वाट पाहाते खूप खूप सुंदर आणि गोड गाणं आहे