Paranda Killa | तुम्हीच पाहा.. तळघरातील शिवपिंडी | परांडा भुईकोट किल्ला | Gadkille

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июл 2023
  • परांडा. महाराष्ट्राच्या गौरवशाली दुर्गवैभवात भर टाकणारा हा भुईकोट प्रकारातील अजस्त्र किल्ला. मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा, मुळ चालुक्य तसेच यादवकालीन वास्तुरचना, जमीनीखाली दडलेली तळघरं, महाल, शिवपिंडी, वास्तुकलेचा नयनरम्य अंदाज असलेली विहीर असं बरंच काही या किल्ल्यावर पाहायला मिळतं. मी या भुईकोटावर काय पाहिलं ते व्हिडीओत पाहालच.. काही गोष्टी खचितच धक्कादायक होत्या. बाकी किल्ला उत्तमच आहे.
    इथे येण्यासाठी कुर्जुवाडी किंवा सोलापूर रेल्वेस्थानक जवळ पडेल. तिथून हसस्थानकात जायचं नि परांडा बस स्थानकाला जाणारी बस पकडायची. परांडा बसस्टँडच्या बाजूलाच किल्ला आहे.
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 937

  • @sairajkulkarni262
    @sairajkulkarni262 11 месяцев назад +190

    मी किल्ले दाखवणाऱ्या खूप लोकांचे व्हिडिओ पाहिले आहेत पण तू ज्या पद्धतीने किल्ला दाखवतोस तस कोणीही दाखवत नाही तू 1तास 2 तासाचा व्हिडिओ बनवलास तरी तो मी बघणार असेच बनवत रहा मी तुझा हा व्हिडिओ टीव्ही वर बघितला आणि तू जेव्हा बोललास की शॉर्ट व्हिडिओ चालतील का (चालणार नाही) तुझे सगळे व्हिडिओ बघितलेत त्या हक्काने बोलतोय(चालणार नाही) त्यावेळी मी मोबाईल उचलून लगेच कॉमेंट लिहायला घेतली

    • @ntkadam77
      @ntkadam77 7 месяцев назад +9

      आजच व्हिडिओ पहिला.. सविस्तर माहिती दिली आहे. सविस्तर आहे म्हणूनच उपयोगी वाटते.. कृपा करून व्हिडिओ शॉर्ट करू नका..(सर्व माहिती मांडता येणारं नाही कदाचित महत्वाची माहिती) असेच सविस्तर व्हिडिओ बनवत रहा , ज्यांना इतिहास समजून घ्यायचा आहे ते नक्की पूर्ण व्हिडिओ पाहतील.... मला खात्री आहे.

    • @tirupatialhat1998
      @tirupatialhat1998 7 месяцев назад +1

      😉😉

    • @sudhirprabhu7668
      @sudhirprabhu7668 7 месяцев назад +2

      Yes information must be complete

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 месяцев назад +14

      खूप खूप आभार!❤💪🏻
      छान वाटतंय की मोठ्या व्हिडीओजना देखील असा उत्तम प्रतिसाद मिळतोय. आणि आपल्या सबस्क्रायबर्स मंडळींनी हक्कानं सांगणं is love!❤
      आपण हाच फॉरमॅट फॉलो करू. आणि असेच अधिकाधिक व्हिडीओ तुमच्यापर्यत पोहोचवू. असंच सोबत असा. जय शिवराय!🔥

    • @notsoschool
      @notsoschool 7 месяцев назад +1

      Ok

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 4 месяца назад +6

    नको नको सगळे डिटेल दाखवतोय तेच खूप खूप मनाला छान वाटते रे.तुला देव उत्साह , तकत देवो.🎉🎉

  • @anuradhaparte3196
    @anuradhaparte3196 7 месяцев назад +4

    तुम्ही खुप उत्तम प्रकारे किलला दाखविला आहे. अगदी स्वत किल्ला पाहिल्या सारखं वाटत होते. आणि किल्ल्यावरील मशिदी पाहुन खुप यातना होतात एखाद्या सुंदर गोष्टीला गालबोट लागावे असे या मशिदी या पवित्र वास्तू वर उभ्या राहिल्या आहेत

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 4 месяца назад +4

    किल्ला तुम्ही सर्व फिरून दाखवताना मार्गदर्शन इतिहासही सांगितला.मनाला समाधान वाटले.

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 4 месяца назад +4

    खूप छान सुंदर वाटले.किती छान,समजून घेत आम्हाला किल्ला दाखवला .वाटले आम्ही पण तूझ्या सोबत आहोत.किती मेहनत घेतलीस त्याला खूप खूप धन्यवाद.आणि हो तुला पुढील वाटचालीस खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा 🎉

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 4 месяца назад +4

    मी परांडा तालूक्यातीलच आहे
    .खुच छान माहीती सांगीतली त्या बद्दल आपल्या पुर्ण टीमचे आभार .परांडा ते खर्डा या दोन्ही किल्याला जोडणारा भुयारी रस्ता आहे .असे एकण्यात आहे .त्या बद्दल कोणाला कांही माहीती असेल तर शेअर करा .पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @s.nranshur9352
    @s.nranshur9352 7 месяцев назад +5

    फारच सुंदर .
    शॉर्ट वीडियो पेक्षा पुर्ण वीडियो मधे ज्यास्त
    मजा येते त्या काळातील इतिहास नजरे समोर येतो त्या काळात गेल्यासारखे वाटते.
    धन्यवाद .

  • @sunilkulkarni7232
    @sunilkulkarni7232 11 месяцев назад +4

    मी स्वतः परांडयाचा रहिवासी आहे, मागील 30 वर्षांपासून तेथे राहत नाही. माझ्या लहानपणी व कॉलेजला असताना 2-3 वेळेस किल्ला पहिला होता, परंतु त्यावेळी मी ही इतका डिप मध्ये पहिला नव्हता. बराच किल्ला आता वयाच्या 63 व्या वर्षी मी पहिला. खूप बरे वाटले, धन्यवाद. व्हिडिओ मध्ये आपण जे म्हटले आहे , की इस्लामी आक्रमकांनी संपूर्ण हिंदुस्थान वर वेळोवेळी शेकडो आक्रमण करून हिंदुवार जुलूम व अन्याय केला. त्यांना पूर्ण हिंदुस्थान करायचा2047 पर्यंत करायचा आहे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. आणी जर हिंदू लोक आहे तसेच राहतील तर कदाचित 2047 च्या आधी ही त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होईल यात अजिबात शंका नाहीं.

  • @satishpore1223
    @satishpore1223 7 месяцев назад +6

    60वर्षापुर्वी या खंदकात मी मित्राबरोबर खेळत असे.आमची माली नावाची घोडी येथे चरत असे.आज मी 73 वर्षाचा असून रायगड जिल्ह्यात स्थायीक आहे.

  • @ganeshsshelke
    @ganeshsshelke 11 месяцев назад +3

    अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे... संपूर्ण परांडा किल्ला फिरून आलो असे वाटले... धन्यवाद 👏🤝

  • @dattatryakate1496
    @dattatryakate1496 7 месяцев назад +3

    दादा धन्यवाद तुम्ही जो परांड्यातील भुईकोट किल्ला दाखवला ते अप्रतीम तुमच एकदम अनोळखी जागी धाडसान ऊतरून माहिती देण इतकं सार काही धन्यवाद
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @khushalpatil2155
    @khushalpatil2155 11 месяцев назад +2

    अप्रतिम... खुप कमी लोकं आहेत.. जी सत्य परिथिती धखवयाचं धडास करतात......

  • @ganeshdarade3615
    @ganeshdarade3615 4 месяца назад +3

    खुपच छान माहिती दिली भाऊ आणि त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर नक्कीच असणार यात शंका नाही खुपच छान

  • @anandkandi5128
    @anandkandi5128 7 месяцев назад +4

    खूप खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व
    अप्रतिम व्हिडिओ असतो तुमचा
    खूप छान वाटत आहे की नवीन पिढीला आपण खरा इतिहास सांगता आहात
    खूप intersting ahe

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs 4 месяца назад +3

    भूम परांडा किल्ला एवढा जबरदस्त आहे
    माहित नव्हतं दादू. धन्यवाद हा vdo केल्याबद्दल 🙏🏻

  • @gadbhramanti9007
    @gadbhramanti9007 11 месяцев назад +3

    अरे दादा तू तसे मोजक दाखवणारी व्हिडिओ नको करूस तुझी ही ही अशी व्हिडिओ चांगली वाटते ती कितीही तासाची असो पण तू जी माहिती देतोस ना अस्यच व्हिडिओ चांगल्या वाटतात ❤️ ❤

  • @deepakambetkar2857
    @deepakambetkar2857 4 месяца назад +3

    खूप छान अशीच नविन नविन गड किल्ल्या बद्दल माहिती देत रहा , आपली व्हिडिओ बनवण्याची पद्धत खूप छान आहे खूप शुभेच्छा🎉😊

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 11 месяцев назад +12

    45 मिनिट येथे जे मंदिर आहे ते शंकराचे आहे आणि श्रावण सोमवारी येथे मोठा महाप्रसादाचे आयोजन असते खुप लोक येतात या पुन्हा 3 ऱ्या सोमवारी 🎉

  • @Bhagwanshirsat1986
    @Bhagwanshirsat1986 4 месяца назад +3

    छान काम करताय दादा.अभ्यास पूर्ण ,माहिती देताय,छान,❤❤❤❤all टीम

  • @ganeshdhule5094
    @ganeshdhule5094 11 месяцев назад +4

    महाराजांचे खरे मावले शोभता दादा तुम्हीं खूप खूप आभार तुमच्या टीमचे आई तुलजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच आई भवानी चरणी प्रार्थना 🚩 जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @swapnilmore7558
    @swapnilmore7558 11 месяцев назад +3

    जेव्हा तुम्ही किल्ल्यांवर जाऊन महाराजांची माहिती सांगतात रिस्क घेऊन तिथे जातात आम्हाला proud feel hot महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या चा❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад +1

      महाराष्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान आहे..❤

  • @sanjaylokare6283
    @sanjaylokare6283 11 месяцев назад +3

    खूप छान आहे , गावा शेजारी आहे तरी आम्हाला हे सारं माहीत नाहीं आपल्या मुळे खुप माहिती मिळाली.

  • @arunborade2987
    @arunborade2987 10 месяцев назад +4

    अभ्यास पूर्ण, कष्टाने, तळमळीने बनवलेला मार्गदर्शन ज्ञान दर्शन ऐतिहासिक अजरामर व्हिडिओ, तुम्हाला व तुमच्या सवंगड्याना धन्यवाद

  • @shankarjadhav1735
    @shankarjadhav1735 2 месяца назад +1

    अभिनंदन छानच महाती अभ्यासपूर्ण व खरी आपला जंजिरा किल्ला दोन विडिओ पाहिले धन्यवाद जंजिरा पेक्षा परांडा अधिक स्वच्छ, बांधकामात चांगला. तसेच आपली महिती देण्याची विस्तृत पद्धती फारच चांगली आहे असेच यश संपादन करून मोठे व्हा पुनश्च आभार ...शंकरराव विठ्ठल जाधव, सातारा

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 9 месяцев назад +6

    या किल्ल्यावर ती झोपलेली व्यक्ती कोण आहे त्याचा तपास केला पाहिजे❤

    • @sagarubharecreativity
      @sagarubharecreativity 9 месяцев назад

      Mala vatla ti kabar hoti 😂 aila ashya sumsam jaagi kon zopta

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 4 месяца назад +4

    जय महाकाल ❤️

  • @akashbengle8004
    @akashbengle8004 7 месяцев назад +1

    प्रत्येक व्हिडिओ उत्कंठावर्धक आहे ...प्रत्येक किल्या मध्ये नवीन काहीतरी माहिती होतंय आणि ते जाऊन पहावं एवढी प्रचंड आकर्षण शक्ती निर्माण होते तुमचे व्हिडिओ पाहून ...अप्रतिम उपक्रम आणि मनापासून आभार

  • @adarshsoundwangi1394
    @adarshsoundwangi1394 11 месяцев назад +2

    आम्ही परांडा च्या जवळ राहातो परंतु येवढी महीत कोणी सांगीतली नाही तुमी भरपूर माहिती दिली धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PranjaliMestry-vq3bh
    @PranjaliMestry-vq3bh 3 месяца назад +3

    दादा तुझे विडिओ मी 2 दिवस झाले बघायला लागलेय पण खरच सांगते kantala येत नाही ...तू जे मोठे मोठे video शेअर करतोस ते बघून जी मनाला शांती मिळते ती शॉर्ट video बघून नाही मिळणार ...तुझ्या video मी माझ्या गावापासून बघायला सुरुवात केली (खरतर आमच दुर्दैव आहे की शंभू राजांना तिथे पकडले ..संगमेश्वर तालुक्यातील कसबा गाव ) आणि तेव्हापासून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याच video बघते आणि तुझ्या video खूप छान असतात आणि खुप उपयोगी आहेत त्यांच्यासाठी जे पहिल्यांदा किल्ल्यावर जात असतील ...खरच खुप प्रेम ...काळजी घ्या सगळ्या गोष्टी करताना ....

  • @rajeshripanhale7842
    @rajeshripanhale7842 11 месяцев назад +3

    🙏 शिवपिंडीला मनापासून नमस्कार 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @vikaskale3531
    @vikaskale3531 7 месяцев назад +2

    खूप सुंदर, आम्ही किल्यांचे खूप व्हिडीओ पहिले पण, आपल्या सारखे दाखवणारे पहिल्यांदाच पाहिले. खूप खूप आभार. कदाचित आपले व्हिडीओ पाहून आमचा किल्ला मानणारे याची सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. हीच अपेक्षा. पण आपला व्हिडीओ खूप सुंदर झाला.
    परत एकदा आपले मनःपूर्वक आभार. 🙏🙏

  • @vanitakirtane5091
    @vanitakirtane5091 Месяц назад +2

    ❤🎉🎉🎉 खूपच छान !🎉🎉🎉❤ तुम्हा मुलांच धाडस व अभ्यास पाहता खूपच कौतुक !!!❤🎉🎉🎉🎉🎉

  • @mangeshkhedekar8681
    @mangeshkhedekar8681 10 месяцев назад +5

    शिव मंदिर आहे तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे त्या ची काळजी घ्यावी

  • @ekanathdeshmukh5667
    @ekanathdeshmukh5667 11 месяцев назад +3

    भाऊ काय मस्त विडिओ बनवलाय, एकच नंबर, एवढा मोठा विडिओ पण अर्धा सेकंद पण बोर झालो नाही, कसलं भयाण डोकं म्हणायचं किल्ला बांधणाऱ्याच, वंदन आहे त्या महापुरुषाला. जय शिवाजी जय भवानी 🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад +1

      मनापासून आभार!❤🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय.🔥

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 7 месяцев назад +2

    राणे भाऊ, प्रत्यक्ष किल्ला फिरून पाहिल्याचं समाधान मिळते तुमच्या विडीयोतून. लय भारी. पुरातत्व खातं बहूधा या अमुल्य ऐतिहासीक वास्तू, किल्ले नष्ट होताना पाहण्याचेच काम करतंय, असं वाटतंय. संवर्धनाच्या नावानं यांचं काम नसल्यागतच आहे. हे खातं म्हणजे “पांढरा हत्ती” आहे, खर्च भरपूर, उपयोग काडीचा नाही.
    अरे, दादा तु ज्या ओघवत्या शैलीत माहिती देतो कोपरा न् कोपरा, सर्व फिरून दाखवतो तेच सुरू ठेव, उगीच शॅार्ट नको करूस. हीच पद्धत छान आहे, एक तळमळ, जिवंतपणा दिसतो यांत.

  • @sangeetakadam7874
    @sangeetakadam7874 4 месяца назад +2

    खूपच छान माहिती दिली. धन्यवाद हा किल्ला स्वतः पाहतेय असं वाटले .

  • @vikrammiskin5811
    @vikrammiskin5811 4 месяца назад +3

    अप्रतिम माहिती दिली.मी इथेच राहतो

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 11 месяцев назад +4

    सध्याच्या या वातावरणामुळे, असे ऐकण्यात येते की, काही प्रसिद्ध converted ( पुर्वीची मंदिरे, आता मशिदी) मध्ये प्रमाणात जुने पुरावे मिटवण्याचा उद्योग जोरात सुरु आहे. यांवर लक्ष ठेवायला हवे.

  • @sksnakesevar5658
    @sksnakesevar5658 11 месяцев назад +2

    विडिओ मोठा झाला तरीही एखादी गोष्ट लक्षात घेऊन ते इतरांना अनुभव घेवून त्यांना सांगितले की ती फार आनंद दायक वाटते अस वाटते की आत्ता आपण तिथेच आहो त्याबद्दल ची संपूर्ण माहिती मिळते कारण काहिंना तिथे जान्याच भाग्य लाभत नाही तर ति या मधुन थोडा का होईना अनुभव घेत असतात आणि दादा तुझ्या या कामगिरीबद्दल तुला मानाचा मुजरा 🧡 हा मि तुझा पहिला विडिओ बघितला आता तुझे पुर्ण विडिओ मि आवर्जून बघेल व इतरांना पन दाखवेल 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🔱हर हर महादेव🔱

  • @manishambule6180
    @manishambule6180 11 месяцев назад +1

    खूप खूप सुंदर चित्रीकरण.
    आम्हाला किल्ले दाखवायची तुमची पद्धत खूप आवडली. असेच पूर्ण पणे किल्ले दाखवत रहा.

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 7 месяцев назад +4

    धन्यवाद खुपच छान पद्धतीने समजावुन माहिती दिली तुमच्या बरोबर परांडा फिरतोय असे वाटले.

  • @navnathjaid4714
    @navnathjaid4714 3 месяца назад +3

    तूम्ही खुप छान इतिहास दाखावत आभिंदन

  • @sunitamujumale9786
    @sunitamujumale9786 3 месяца назад +2

    खूप छान व्हिडीओ बनवता व्हिडीओ पाहून किल्ला फिरून आल्यासारखे वाटते याच पद्धतीने व्हिडीओ बनवा. Thanks

  • @vanitakirtane5091
    @vanitakirtane5091 Месяц назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे व्हीडिओ पहाताना आपण स्वतःच तिथे उपस्थित असल्याचा आभास होतो आणि शेवटी खरोखरच आनंदाने दमल्या सारखे वाटले
    ❤❤❤❤❤❤❤❤❤ अशी तुमच्यासारख्या तरुणांनी गडसहली किवा निसर्गसहली चेव्हीडिओ ज अशाच प्रकारे थेट काहीही न वगळता दाखविल्यास आमच्या सारख्या वृद्धांनाही खूप आनंद होतो आणि अशक्य गोष्टीही या दृश्याद्वारे पाहून स्वतःअनुभवल्याचा भास होतो यासाठी तुमचे पहाडाइतके कौतुक !🎉🎉🎉 असेच दीर्घ व्हिडियो तयार करा मात्र जीव साभाळून😂
    ❤ जय शिवराय जय महाराष्ट्र !!!🎉🎉🎉
    ❤ भारत माता की जय !🎉🎉🎉
    ❤🎉 श्री स्वामी समर्थ❤ जयजय स्वामी समर्थ😂❤❤

  • @Ride096
    @Ride096 11 месяцев назад +3

    मी पाहिला आहे हा किल्ला खूप छान आहे खूप मोठा सुद्धा आहे दारूगोळा आहे

  • @user-bu9bo6td4b
    @user-bu9bo6td4b 11 месяцев назад +4

    Paranda मुक्ती आंदोलना ची गरज आहे

    • @coder_Aakher
      @coder_Aakher 11 месяцев назад +1

      कुठला आंदोलन?

  • @dasalokamwar4712
    @dasalokamwar4712 4 месяца назад +2

    धन्यवाद भाऊ आपने सच्ची के साथ सुंदर विडीओ बनायला है❤

  • @poonambangal327
    @poonambangal327 7 месяцев назад +1

    परांडा किल्ला अप्रतिम, मुख्य म्हणजे तुमची दाखवण्याची पद्धत फार छान प्रत्यक्ष बघण्याचा आनंद मिळतो

  • @amolkole7072
    @amolkole7072 11 месяцев назад +3

    व्हिडिओ किती मोठा असला तरी पण छोटाच वाटतो कारण तुमच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे

  • @pramodjagtap9261
    @pramodjagtap9261 11 месяцев назад +4

    भाऊ तुझा व्हिडिओ पाहताना आम्ही स्वतः कधी किल्ल्यावर पोहोचलो तेच समजलं नाही🚩🚩🚩
    पुरातत्व खाते झोपलं आहे म्हणूनच बऱ्याच किल्ल्यावर मजारी दिसू लागल्यात आता हे ही खरं आहे

  • @kavitashirsath3895
    @kavitashirsath3895 11 месяцев назад +1

    तुझ्यावर महाराजांची विशेष कृपा आहे म्हणून तुझ्या हातून असे अद्वितीय कार्य घडते आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vishwasmokashi1426
    @vishwasmokashi1426 11 месяцев назад +2

    तुम्ही हा व्हिडिओ अगदी मार्गदर्शक पद्धतीने दाखवला असेच आणखी व्हिडिओ पाठवत रहा 🧡🧡🧡

  • @sadipkumar9026
    @sadipkumar9026 11 месяцев назад +3

    'पुरातन खाते' म्हणजे इतिहास मातीमध्ये पुरणारे.
    तुम्ही धाडसाने किल्ले व त्यातील वास्तु दाखवून आपणच गडावरील किल्लेदार स्वरूपात दिसता.
    काळजी घ्या,आपली व आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांची.
    असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मी वाट पाहत असतो.
    जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 11 месяцев назад +3

    छान माहिती आहे,
    कॉमेंट मध्ये सर्व लढाई आहे.

  • @suhasdeshmukh7870
    @suhasdeshmukh7870 6 месяцев назад +1

    खुप छान विश्लेषण
    मराठवाड़ा कायम दुर्लक्षित राहिला ।
    पुरातत्व खाते काय काम करते याची दखल कोण घेणार?? लोक कधी एकत्र येणार ?? येथील राजकरणी फक्त आपली ख ळ गी भरतात ।
    असो
    आपण आपली काळजी घ्या। खुप रिस्क घेता । सावधान रहा गड दखवताना ।
    अपलाच एक गड निसर्ग प्रेमी

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 7 месяцев назад +5

    खूप प्रशस्त आहे किल्ला, प्रत्येक किल्याविषयी तू खूप अभ्यास केला आहेस,, video खूप छान झालाय, किल्यातून फिरताना स्वतःला सांभाळून फिर, खचलेल्या, ओल्या भागात जाऊ नको,

  • @pradipchaure278
    @pradipchaure278 11 месяцев назад +4

    खूपच समर्पक आणि माहिती पूर्व व्हिडिओ आहे. छोट्यातली छोटी माहिती मिळते. आणि ती माहिती आम्हाला समजण्यासाठी विडियो लांब झाला तर हरकत नाही.. कारण अपुरं ज्ञान धोका दायक असतं. आणि तो चौथरा नंदीचा असावा असं मला वाटतं. जाणकारांनी माहिती द्यावी. जर मि चुकत असेल तर.. बाकी सगळं तू सांगितलं आहेस.
    मला अजून एक सांगायचं आहे की विडियो बनवताना तुला काय काय स्ट्रगल करावं लागतं, काय मेहनत घ्यावी लागते, किती अभ्यास करावा लागतो, याचा सुद्धा विडियो बनव, तुझी मेहनत सुद्धा कळायला हवी..
    तू फार जबाबदारीचं काम करतो आहेस.. आणि ते काम पाहणं ही आमची जबाबदारी आहे. .. पुढच्या विडियो ची आतुरता आहे.. तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा.. आणि ती माहिती आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आभार..
    विडियो बनवताना स्वत:ची काळजी घ्या.. धन्यवाद..

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад

      मनापासून आभार!❤🙏🏻
      व्हिडीओमागची धावपळ व्हिडीओत दाखवता आली तर निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यातही एक वेगळी मज्जा आहे. नक्की तसा काहीतरी प्रयोग करू. जय जय शिवराय!🔥

  • @Enjoying_mylife.
    @Enjoying_mylife. 11 месяцев назад +2

    सादरीकरण उत्तम आहे .परांडा किल्ल्याची पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😊
    किल्ला खुप प्रचंड आहे. त्याकाळात त्याचे महत्व किती होते..हे दिसले ...त्याकाळी बांधकाम व्यवस्था किती प्रगत होती... हे दिसून आले...

  • @abhijithande28204
    @abhijithande28204 7 месяцев назад +1

    मस्त information दिलीत मी परंडा तालुक्यातील आहे मी खूप वेळा गेलो पण संपूर्ण माहिती नव्हती मिळाली, पण video पाहून माहीती मिळाली, मी आणखीन येकदा किल्ल्याच दर्शन घेतलं...

  • @salunkeamit2184
    @salunkeamit2184 3 месяца назад +3

    धन्यवाद राणे आपण जे कार्य करीत आहेत ते खूप चांगले आहे. आपण Google pay no देत जा. कारण आम्ही हे फुकट पाहतोय तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 11 месяцев назад +44

    व्हिडिओची लांबी मोठी असो वा छोटी.. आम्ही या अभ्यासपूर्ण व्हिडिओची वाट आतुरतेने पाहू. काल टिझर पाहिल्यावर हा व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता होतीच..

    • @mangeshtelange9305
      @mangeshtelange9305 11 месяцев назад +2

      व्हिडिओ लांब झाला तरी चालेल पण गडाची पूर्ण माहिती मिळायला हवी...

    • @anandgosavi2475
      @anandgosavi2475 11 месяцев назад

      Mad Toda ti maid wat kunachi bagta

    • @sayband123
      @sayband123 11 месяцев назад

      Khar aahe

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 Месяц назад +2

    तुझी किल्ला गड दाखवण्याची पद्धत खूपच छान आहे निजाम नी वरतून घुमट बांधले असेल तरी पुराव्या निशी ते शिव मंदिर आहे
    तू किल्ला गड दाखवताना असं वाटत की त्या वेळेस आपण असू

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 9 месяцев назад +2

    हे सार काही अफलातून आहे आणि धरतीवरचा हाच खरोखरच स्वर्ग आहे या डोळ्याचे पारणे फिटली म्हणून समजा आणि या जीवाची चीज झाले आहे जी आम्ही बघू शकत नाही ते या धरतीवर या मानवाने स्वर्ग निर्माण करून या ठिकाणी आम्हाला प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनापासून आभार आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला पाहिजे ❤ तुम्हीही खूप डेरिंग करून सर्व व्हिडिओ दाखवला किल्ला दाखवला त्याबद्दल तुमचे शब्द सुमनाने स्वागत करण्याऐवजी अंतःकरणाने स्वागत सत्य मेव जयते 🌹🙏🥰

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 11 месяцев назад +3

    खूप च धाडस करून व्हिडिओ बनवला.काही मूर्ख लोकांच्या कमेंट कडे दुर्लक्ष करा.आम्ही तुमच्या सोबत आहोत .
    जय महाकाल..हर हर महादेव..🙏🙏🌹🌹🚩🚩

    • @user-ky5uj9qo8i
      @user-ky5uj9qo8i 11 месяцев назад +1

      खूब अच्छा माहिती आहे धन्यवाद

  • @waze2003
    @waze2003 3 месяца назад +3

    मनोज जरांगेला आणि एक विषय मिळाला आंदोलन करायला.

  • @vinodghag7367
    @vinodghag7367 7 месяцев назад +2

    प्रत्यक्ष गड फिरण्याचा आनंद मिळतो. धन्यवाद मित्रा.

  • @rameshgade6740
    @rameshgade6740 7 месяцев назад +3

    अतिशय छान दाखवला गड

  • @bhagwanraojagtap4345
    @bhagwanraojagtap4345 4 месяца назад +5

    ते थडग ऊखडुन टाकु शकत नाही?

  • @JanardanPatil-fn8sx
    @JanardanPatil-fn8sx Месяц назад +1

    सर तुमची गडाबद्दल माहीती सांगण्याची पध्दत अप्रतीम जय शिवराय

  • @swamikitchen4606
    @swamikitchen4606 Месяц назад +1

    माहिती फारच सुंदर आहे व्हिडिओ मोठा असला तरी तरी शेवटपर्यंत पहावासा वाटतो धन्यवाद

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 4 месяца назад +3

    गणपती बाप्पा मोरया ❤️

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 7 месяцев назад +3

    या वयात आता आमच्या सारख्या व्रुद्धांना किल्ल्यांची सफारी करणे शक्य नाही.पण आपल्या रनईंग काॅमेंट्रीमुळे प्रत्यक्ष किल्ला वर फिरून फिरून आल्या सारखे फिलिंग आले.धन्यवाद

  • @karunakhot3072
    @karunakhot3072 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती सांगतोस. व्हिडिओ लांबवला तरी चालेल . पण आतापर्यंत तू जी पद्धत वापरली त्याच पद्धतीत नेहमी गडांची माहिती देशील. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @sunitawalunj4677
    @sunitawalunj4677 7 месяцев назад +1

    मी हा किल्ला 1997 साली पाहिला होता. पण विहीर नव्हती पाहीली. छान माहिती दिली .

  • @siddharthchavan3800
    @siddharthchavan3800 11 месяцев назад +4

    आमचे आजोबा सांगायचे इथ मंदिर आहे म्हणून

  • @akshayvikhe882
    @akshayvikhe882 6 месяцев назад +3

    दादा तुमचे विडिओ खुप संशोधन पुरक असतात, आपल्या छत्रपती च्या शौर्य ची साक्ष देतात, परंतु ती महादेव पिडीं व आपल्या देवांच्या भग्नावस्थेत मुर्ति जनानखाना शेजारी ठेवल्या त खुप वाईट वाटले, त्यांना त्यांची न्याय जागा मिळाली पाहिजे शासन या कडे लक्ष का देत नाही खुप मनाला वेदना होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना न्याय देईला पाहिजे

  • @deepakambetkar2857
    @deepakambetkar2857 4 месяца назад +2

    खूप खूप छान अशीच प्रगती करत रहा गॉड ब्लेस यू

  • @user-em1tq7oo1v
    @user-em1tq7oo1v 19 дней назад

    तु खुप छान पद्धतीने सादरीकरण करतो. बोलण्याची शैली पण छान आहे आणी प्रत्येक गोष्ट व्यवस्तीत मांडतो पण जे आपले आहे ते आपले आहे म्हणायला जरा कचरतो. 👌👌👌👌

  • @ShivajiJadhav-lv9jc
    @ShivajiJadhav-lv9jc 4 месяца назад +3

    छान बर का सर तुम्ही सारा किल्ला फिरून दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 11 месяцев назад +5

    💯💯💯👆 अतिक्रमण करण्याचं काम चालू आहे 😡

  • @somnathpatil8428
    @somnathpatil8428 4 месяца назад +2

    ❤खुप छान माहिती सांगितली

  • @kunaltope2252
    @kunaltope2252 4 месяца назад +1

    अत्यंत सुंदर प्रकारे माहिती देत आहे तुम्ही, तुमचे सगळे विडिओ मी नेहमी बघतो. खुप छान वाटते. ❤❤❤❤

  • @harshchaudhari2829
    @harshchaudhari2829 9 месяцев назад +3

    Continue with long video format.. जय शिवराय प्रथमेश शेठ ..

  • @kailassomawanshi5270
    @kailassomawanshi5270 11 месяцев назад +1

    खुपच चांगला व्हिडीओ संपुर्ण किल्ला दाखवला आम्ही हा किल्ला बघितला पण अपूर्णच बघीतला ह्या व्हिडीओ बघितल्या मुळे परत किल्ला बघायला जाण्याची इच्छा झाली

  • @Schoolkidaa
    @Schoolkidaa 11 месяцев назад +1

    आम्हालाही या किल्ल्याबद्दल येवढी माहीती नव्हती.... जेवढी तू सांगितलीस ..... आम्ही खूपदा या किल्ल्यात जाऊन आलोत पण तू जे दाखवलस त्यातील खूप काही आम्ही पाहिलच नाही... कारण खूप जंगल होत मधे तटबंदी शिवाय आतिल काहीच दिसत नव्हत...... या व्हिडिओमार्गे खूप गोष्टी पाहायला मिळाल्या..... खूप छान व्हिडिओ होता.... असेच व्हिडिओ बनवत राहा... व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण लोकांना किल्ल्यावरील गोष्टी समजल्या पाहिजेत अनुभवता आल्या पाहिजेत.

  • @gajupawar8433
    @gajupawar8433 7 месяцев назад +3

    खुप छान मला ते धडग आवडलं नाही ते मिडिया वर दाखवुन ते शिंदे साहेबा परर्यतं पोहचले पाहिजे ते हे काम करु शकतात

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 11 месяцев назад +4

    पुरातत्व खात हे "खात" असत म्हणून पुनर्विकास होत नाही किल्ल्यांचा.

  • @mangeshdevkhile9734
    @mangeshdevkhile9734 11 месяцев назад +1

    जय शिवराय 🚩🚩🚩
    प्रथमेश तुझ्या प्रत्येक व्हिडीओ प्रमाणेच यातही खूप अप्रतिम माहिती✌🏼👌🏼👌🏼👌🏼
    व्हिडीओ मोठा असतो म्हणूनच संपूर्ण किल्ला पाहण्याचा आनंद घेता येतो तसेच किल्ल्याची खोलात जाऊन माहिती तुझ्याकडून ऐकायला मिळते.त्यामुळेच व्हिडीओ च्या कालावधी पेक्षा किल्ल्याबद्दलची अपरिचित माहिती भेटणं जास्त महत्वाचं आहे.
    व्हिडीओ च्या माध्यमातून बघता परांडा किल्ल्याचे बांधकाम तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावरील असलेल्या तोफा अजूनही सुस्थितीत असल्याचे दिसत आहे तर सह्याद्री किंवा कोकणातले आपल्या मराठ्यांचे किल्ले पाहिले तर.......
    मुघलांकडून इतिहास बदलण्याचा झालेला घाणेरडा प्रयत्न यातूनच दिसून येतो.....
    आता आतुरता विजापूर किल्ल्याची....✌🏼

  • @shankarsurvase6418
    @shankarsurvase6418 11 месяцев назад +1

    भावा एक नंबर सांगितल विडीओ मोठा झाला असला तरी तो गरजेचा आहे आणि अपेक्षा करतो याच या पूढेही असेच उत्तम प्रकारे माहिती देशील जय‌ जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 7 месяцев назад +4

    पूर्वी पासून मुस्लिम यांनी जवळपास सातशे सातशे राज्य केले आहे. हिंदू राज्यांनी सुद्धा पाचशे ते सहाशे वर्ष राज्य केले आहे. त्यामुळे दोन्ही. धर्माच्या राजांनी सुंदर किल्ले बांधले आहेत. त्यामुळे प्रत्येक केल्यावर दोन्ही धर्माच्या स्थापत्य कला दिसून येतात... कारण कारागीर हे मुस्लिम पण होते आणि हिंदू असे दोन्ही होते. त्याचाही परिणाम स्थापत्य कलेवर झाला आहे

  • @rohit2198
    @rohit2198 6 месяцев назад +3

    दादा बोलता बोलता बोलून गेलेलं सर्वात महत्वाचे वाक्य...या गड कील्यांवर अजूनही टिकून असलेल्या गोष्टींसाठी...'कदाचित हे निष्ठेचे वजन असेल..'

  • @kumarpatil9909
    @kumarpatil9909 4 месяца назад +1

    खूप छान संपूर्ण किल्ला प्रत्येक गोष्ट दिसणारी प्रत्येक वस्तू या सगळ्या गोष्टी

  • @sachinjagatap9625
    @sachinjagatap9625 11 месяцев назад +2

    भावा हा किल्ला मी चार वेळा पाहिला पण एवढी विस्तृत. माहिती आत्ता मिळाली❤❤❤❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад

      मनापासून आभार!❤🙏🏻
      आणि हो आता पाचव्यांदा भेट पक्की करा
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥

  • @neetakhodke1532
    @neetakhodke1532 Месяц назад +3

    छान ...किल्ला दाखवतांना तु स्वतःची काळजी घेत जा

  • @shahidshaikh-gz6fe
    @shahidshaikh-gz6fe 11 месяцев назад +6

    Bahmani saltanat madhla ahe ha killa, malik ambar asa faktan comparison difference war judge karne he chukiche ahe!!

  • @pujagodge3184
    @pujagodge3184 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली दादा मी पण हा किल्ला पाहिला आहे पण एवढं सगळ फिरून पाहिलं नव्हता तुमच्या मुळे इतक्या बारीक बारीक गोष्टी माहिती झाल्या धन्यवाद दादा🙏🙏 खूप छान एवढे फिरून व्हिडिओ बनवला 😂👌👌हा किल्ला फार मोठा आहे

  • @bhushanpawar8823
    @bhushanpawar8823 11 месяцев назад +2

    अप्रतिम 👌दादा तुझ्या मेहनतीला सलाम

  • @haribhaupatil8193
    @haribhaupatil8193 3 месяца назад +4

    अशा बांधकामांवर हाथोडा ठोका /बुलडोझर चालवावा

  • @user-lf7qp4et8p
    @user-lf7qp4et8p 11 месяцев назад +7

    किल्यावर मस्जिद बांधण्याचं प्रकरण फक्त एका किल्यावर होत नसून , हे प्रत्येक महाराज्यांच्या किल्यावर होत आहे , हल्लीच मी एक गड बघायला गेलो होतो तेथेही असेच मस्जिद बांधलेले दिसले एक नाही तर दोन दोन दर्गे होते तिथे . हे प्रकरण खूप गंभीर आहे . याला आळा बसने खूप महत्वाचे आहे आणि एवढच नाही तर त्या दर्ग्याची रोज पूजा सुद्धा होते असे निदेर्शनात आले कारण तेथे ताजी फुले वाहिलेली मला दिसली . या लोकांची खुरापत आजही थांबली नाहीये असेच दिसत आहे .

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h 7 месяцев назад +1

      He Khari gosht aahe pratyek kelyavar Darga masjid muddam bandhtat sarkar ni laksh dyayla pahije Avaidh kabja nako killa ha pavitra sthal aahe tithe Pavitry japl Pahije

  • @anandatambade8961
    @anandatambade8961 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण आपण आपल्या शैलीत किल्ल्याच महत्व प्रतिपादन केले आहे . लाजवाब .