Amritpal Singh Story- तुरुंगात बसून २ लाखांनी जिंकला,खास विमानाने दिल्लीला येऊन खासदारकीची शपथ घेतली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #AmritpalSingh #SheikhAbdulRashid #ParliamentOath #MaharashtraTimes
    वारिस दे पंजाबचा प्रमुख अमृतपाल सिंह... ज्याला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांच्या नाकीनऊ आले, त्याने तुरुंगात बसून जवळपास दोन लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आणि खासदार झाल्यानंतर दिल्लीत येऊन खासदारकीची शपथही घेतली. अमृतपाल सिंहसोबत तिहार जेलमध्ये असलेला काश्मिरी नेता शेख अब्दुल रशिदनेही बारामुल्ला मतदारसंघातून निवडणूक जिंकलीय आणि त्यानेही दोन तासांसाठी पॅरोल मिळवून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर खासदारकीची शपथ घेतली. खालिस्तानी नेता अमृतपाल सिंह सध्या आसाममधील दिब्रुगडच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आलीय, तर शेख अब्दुलवर दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अमृतपाल सिंहला चार दिवसांचा पॅरोल देण्यात आलाय, पण त्याला त्याच्या मतदारसंघात जाता येणार नाही. दिल्लीत राहूनच कुटुंबाला भेटण्याची अट त्याला घालण्यात आलीय. याशिवाय त्याच्या राहण्याची व्यवस्थाही लोकसभा सचिवालयाकडूनच करण्यात आलीय. दुसरीकडे शेख अब्दुलला फक्त दोन तासांचा पॅरोल मिळाला होता, पण चार दिवसांच्या पॅरोलनंतर अमृतपालला शपथविधीसाठी खास विमानाने दिल्लीत आणलं गेलं. अमृतपालला मीडियाशी बोलण्यासाठी बंदी घालण्यात आलीय, मात्र त्याच्या वडिलांनी दिल्लीत मुलगा निवडणुकीत जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 18

  • @manishkudekar5278
    @manishkudekar5278 4 дня назад +15

    देश विरोधी कृत्य करणारा निवडून येत असेल तर परिस्थिती खूप अवघड आहे

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 4 дня назад +8

    लोकशाही हीचा काळा दिवस आहे देश विरोधी कृती करणारयाला उभा राहण्याचा अधिकार नाही पाहिजे अशा लौकानचा हैशला वाढेल

  • @Chagan.932
    @Chagan.932 4 дня назад +5

    2 लाख मतांनी विजय झाला आहे. म्हणजे त्या मतदार संघात खलिस्तान समर्थन असलेले लोक बहुसंख्य आहे.

  • @patil1897
    @patil1897 4 дня назад +3

    जे लोक देश पेटवाय उठले देश..पेटवाय घाबरले नाहीत ते काई देशावर प्रेम करणार ... त्यांना आतच डांबून ठेवा

  • @patil1897
    @patil1897 4 дня назад +2

    देश विघातक खलिस्तानी लोक कसे निवडून येतात आणि लोक मतदान कसे काई करतात त्यांनाच माहीत...

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 4 дня назад +2

    गुनाहगार चुनाव लडकर जीत सकते है तो गुंडाराज के दीन दुर नही

  • @shindesuraj4119
    @shindesuraj4119 4 дня назад +3

    माणसामध्ये काही तरी टॅलेंट असेल म्हणून निवडून आला

    • @bharatrahane3244
      @bharatrahane3244 4 дня назад

      @@shindesuraj4119 खलीस्थान वाद्यानी केलेले मतदान आहे

  • @pravinparbhane3998
    @pravinparbhane3998 3 дня назад

    Waah secularism waah

  • @allseries11569
    @allseries11569 3 дня назад +1

    व्हा रे संविधान 😂😂😂😂

  • @asp6892
    @asp6892 4 дня назад

    देश विरोधी कारवाया करणाऱ्या आशा लोकांना निवडणूकीत ऊभे राहण्याची बंदी घालण्यात आली पाहिजे

  • @SubhashAvhad-dj5bj
    @SubhashAvhad-dj5bj 4 дня назад

    Khup Kathin Situation ahe Kahi Thikani,Lagech Jar Yacha Bandobast kela Nahi tar Khup Mahagat padel

  • @maskemadhusudan3112
    @maskemadhusudan3112 2 дня назад

    निउदून आला आहे त्याचा सन्मान केला पाहिजे

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 3 дня назад

    रासुका खाली जेल मध्ये असूनही निवडणूक लढवत आहेत हेच दुर्दैव आहे.

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 3 дня назад

    Desh virodhi ani niwadun yeto kharach awgadh ahe panjab vasio