गेलेल्या व्यक्तीचे कपडे त्याच्या मागे असलेल्यानी घालू नयेत असे काही जण म्हणतात... त्यांना मला एकच सांगणे आहे...त्या माणसाने मागे ठेवलेली property अशी कोणाला देऊन टाकता का... घर असेल बंगला असेल दागिने रोख रक्कम असेल किव्वा इतर काहीही.. नाही ना...मग कपडे का वापरू नयेत.... खूपच सुंदर विचार तुम्ही येथे मांडला 🙏🙏
खुप सुरेख आजचा विडिओ झाला.... मेलेल्या माणसाच्या दागिन्यांना आणि पैश्याला वाली मिळतो पण कपड्यांना नाही ह्या बाबतीत माझ्याही मनात खुप दिवसान पासुन प्रश्न होतेच... त्याच एक कारण हे की आज काल लोकं आपले दागिने बँकेच्या लॉकर मधे किव्वा कपाटात सेफ ठेवतात आणि पैसा लागेल एव्हढाच स्वतःकडे ठेवून बाकीचा बँकेत किव्वा इतरत्र गुंतवतात.. एक कपडेच असे असतात की ते त्यांच्याच कपाटात असतात आणि त्यांनीं ते पुष्कळदा वापरलेले असतात... जी व्यक्ती ते कपडे सदानकदा वापरते त्या कपड्याशी त्यांचा ओरां म्हणजेच आभा मंडळ कनेक्ट असतं... ती व्यक्ती मरते पण त्या आभा मंडळाच्या रुपात ती कुठे ना कुठे तिथेच असते... अभी ओर कुचं तो भी बाकी हे वहा.. असं काहीसं असतं... तस तपासून पहायचं असेल तर घरातल्या पाळीव कुत्र्याला ते कपडे हुंगवा आणि मग बघा तो कुत्रा ती मेलेली व्यक्ती तिच्या नेहमीची बसायची जागा किव्वा जोपायची जागा इथेच तो कुत्रा जावून तो कुत्रा kui kui करत राहतो. ... आता तूम्ही म्हणाल दागिने आणि पैसा.. त्याच काय, पण ह्या गोष्टी तितक्या जास्त वापरात नसतात जितके की त्या व्यक्तीचे कपडे आणि चपला. तूम्ही नक्की पहा आणि विचार करा... आता गेलेल्या व्यक्तीचा स्वभाव भांड कुदळ, गैर वागणूक, दुसऱ्याला नावे ठेवण्याची प्रवृत्ती असेल तर विचार करा त्या व्यकीचा त्या वस्तुतील ओरा कसा असेल. तुमची आई देवतुल्य होती हे तुमच्या सांगण्यातून आणि लोकांनी स्वतःहून त्यांच्या नेलेल्या कपड्यातून दिसून येतो अश्या व्यक्तीचा ओरा वाईट कसा असेल... मी काही तुमच्या आई ला पाहिले नाही पण तरुण पणी त्यांनीं कोणीही कुठलीही वस्तू मागितली की ती त्यांनीं लोकांना दिली आहे हया वरूनच त्याचे मन कळते ते जीवंत पणी कश्यात अडकले नाही तर मेल्यावर अडकेल का? त्यांच्या गेल्यावर त्या वस्तून पासून कोणाला त्रास होईल का, आणि हे लोकं ही जाणतात...पण सर्वच असे नसतात जीवंत पणी हाय हाय आणि मेल्यावरही हाय हाय असे त्यांचे असते... लोकांनी ते पाहिलेल असतं.... आता तूम्ही डॉक्टर,, हया गोष्टींना अंधश्रध्दा म्हणाल तर मुंबईला असे ओरा पाहणारे विकिर कॅमेरे आहेत ते पाहणारे आपल्या कडून ते पाहण्याचे पैसे घेतात त्यातून तुमचा ओरा कलर समजतो जितके मेडीटेशन जास्त तितके आभा मंडळ जास्त फेललेले आणि तेज किरणांचे असते असते. जर अंधश्रध्दा वाटली तर माझी ही कॉमेंट ताबडतोप हाईड करा. कारण आपल्या भारतीयांनी जर हया गोष्टीनं बाबत बोललं तरी अंधश्रद्धा म्हणून केस होतें आणि तिथे अमेरिकेत भूत आहेत का हे पाहणयासाठी वेगवेगळी यंत्र आहेत त्याला आपणं मानतो.. का?? तर त्यांना तसे यंत्र मिळाले.. न दिसणाऱ्या जागच्या पार बघण्या साठी आणि एकण्यासाठी थोड्क्यात काय तर ते स्वतःला सायन्स च्या चवकाटीत बसवू शकले आणि आपणं नाही... आपल्या कडे ऋषी मुनींनी ते दिसतें, वास्तविक आपल्या कडूनच सारे तिथे गेले पण म्हणतात ना जिथे पिकते तिथे.....पण जिथे सायन्स थकत तिथे आध्यात्म सूरू होत. आणि... जिथे इथे आड आणि तिथे विहीर अशी परिस्थिती ज्याच्या आयूक्ष्यात येते ना तिथे भले भले आध्यात्ममाला नाकारणारे लोकं ती चोखंदळ पाय वाट कधी चालू लागतात हे त्यांचें त्यांना कळत नाही. बाकी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.😊❤
मॅडम अतिशय सुंदर प्रबोधन आपण जे प्रबोधन केले अतिशय सुंदर आहे अंधश्रद्धा या माध्यमातून कमी होते कपड्यात कधीच दोष नसतो आवडीने दिल्यास व घातल्याने मागील माणसाची इच्छा पूर्ण होते
माझ्या शेजारी पालवकाकू राहायच्या त्या वयाच्या ६१ व्या वर्षी निधन पावल्या . त्यांच्याही खुप साड्या, ड्रेसेस हाते . त्यांच्या मिस्टरांनी त्या आश्रमाला दान केल्या. खरचं हा topic खुपच महत्वाचा घेतला मॅडम तुम्ही 🙏
माझ्या सासूबाई गेल्या, त्यांचे दागिने मुली घेऊन गेल्या आणि साड्यांचं काय करायचं विचारलं तर म्हणाल्या," देऊन टाक कोणालाही" . मला खूप राग आला, एकत्र सासूबाई अंथरुणावर असताना त्यांची पूर्ण सेवा मी केली , कुणी ढुंकूनही बघितले नाही, मी ठरवलं आहे, आता सगळ्या साड्यांचं मीच ठरवेन, काय करायचे ते !! माझी मुलगी एक साडी घेऊन गेली..आजीची आठवण म्हणून!!
Melelya vyaktiche kapde thevu naye Karn andhakari Shakti kapdyan madhe vas karte tumhi ajari padu shakta daridry yet ye kapde konala Dan nhi karayche agdi new asle tari te jalun takayche .. dusri gosht son asel tar te modun takayche Ani te paise vaprun takayche
माझ्या सासुबाई वारल्या नंतर त्यांचे न ऊवारी पातळ ज्यांना हवे होते त्यांना दिले.गादी,बेडशिट,ब्लॅंकेट ,चादरी ,पलंग आमचे कडे काम करायला बाई होती ती म्हणाली मला द्या मी वापरते.आजी मला आईसारखी होती. आणि ऊरलेल्या काॅटनच्या पातळांची मी गोदडी केली.
खूपच छान विषय आहे. मी देखील माझ्या सासूबाई म्हणजे आईंच्या नऊवारी साड्या नणंदा आणि इतर स्त्रियांना दिल्या. दोन साड्यांची दुपटी नातवा करिता बनवली. ती खूप छान आणि मऊ झाली. खूप खूप खूप धन्यवाद तुम्हाला. विषय असेच आणखी ऐकायला आवडेल आम्हाला. धन्यवाद.
खूप छान विषय, खूप चांगला विचार मांडलात, गरजवंतांनां द्यावेत असे कपडे, त्यांचे भरभरुन प्रेम मिळेल, मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात, खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारे विषय असतात तसेच तुमचा दृष्टिकोनसुद्धा खूप पटतो मला. मी नेहमीच तुमच्या व्हिडिओची वाट बघते.🙏🙏
ताई तुम्ही हा घेतलेला विषय जिव्हाळ्याचा,ममतेचा,मायेचा,आपलेपणाचा,भावनिकतेचा, अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन अत्यंत ओघवत्या भाषेत मांडलेले विचार हृदयाला स्पर्श करून गेले.माझी आई देखील सेम तुमच्या आईच्या स्वभावासारखीच होती. तीला नेहमी देण्यातच आनंद वाटत असे.ती गेल्यानंतर तीच्या पश्चात तिच्या साड्या तीच्या सात लेकी,दोन सुना,काही नाती व नात सुनानी तीची आठवण म्हणून आवडीने वाटून घेतल्या.कारण तीचा स्वभाव अत्यंत प्रेमळ,मनमोकळा संवाद साधत होती.तीचं सर्व लेकरांवर सारखचं प्रेम होतं. ताई आज हा विषय मांडत असतांना आपण परीधान केलेला पोषाख खुपचं छानं,सुदंर,मस्तचं होता.
🙏🙏 ताई आजचा विषय खूप महत्त्वाचा होता गेलेल्या व्यक्तीच्या साड्यांचे काय करावे माझी आई 3 वर्षा पूर्वी गेली कोरोणाचा काळ चालू होता त्यामुळे नातेवाईक काही जास्त कोणी आले नाहीत त्यामुळे मी आईच्या दोन तीन साड्या आठवण म्हणून ठेवून घेतल्या बाकी साड्या जे गरजु आहेत त्यांना व काही आश्रमाची गाडी येते जुने कपडे धान्य वगैरे नेण्यासाठी त्यांना दिल्या मी एक साडी न ऊवारी शिवुन घेतली मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या देवब्राम्हणा दिवशी नेसले मला खूप छान वाटले व तिची खूप आठवण आली ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असते मला खूप आवडतात आणि खूप छान असतात आज मी माझ्या मनातील तुम्हाला सांगितले
उत्तम विषय मांडला.. माणूस जातो त्याच्या.. गुणवत्तेवर असत सर्व त्याचीच नव्हे त्या चीच नाही.. इतरांची तशीच गुणवत्ता लागते खुप च. छान विषय होता माझा. भाऊ नुकताच गेला डॉ कटर. होते त्याच ा... वस्तू आम्हाला हवेत असे बोलायचे सगळे चया.. मुखात एकच.. होत. आमचा देव माणूस.. हरपला खरच. सूदर. विषय मांडला लहान पणा पासून.. म्हातारपणापर्यत.! कपडे दागिने यावरून पझेस्विह. असतात
माझ्या आईच्या ही खूप व खूप छान सुंदर साड्या होत्या ,आम्ही ही सर्व बहिणींनी व वहिनीने त्या वाटून घेतल्या,आमची आई ही देवी सारखी होती ,तुमचा व्हिडिओ बघून मला खूप छान वाटले,कालच आईचे पहिले वर्ष श्राद्ध झाले,आम्ही दोघी बहिणी विधवा आहोत म्हणून मी विचार केला व सवाशनीचे लेणे आम्ही आईचे मंगळसूत्र लहान बहिणीला दिले .आम्ही तिघी बहिणी, व वहिनी,मावशी यांनी साड्या घेतल्या. तुमचा व्हिडिओ बघून मला आमचाच विषय वाटला ,
खूप सुंदर विषय आहे कौतुक तुमचं. मी जीन्स शर्ट घालते. माझी आई नववारी साडी घालायची. तिच्या मृत्यू नंतर मी माझ्या आईच्या साड्यांची गोधडी बनवली आणि 10 वर्ष झाली मी तीच पांघरते. त्यात मला माझ्या आईची उब मी आजही पांघरते. वडिलांचे धोतर आहे मी दर वर्षी ज्योतिबा फुलेचा रोल करते तेव्हा नेसते. माझे आईवडील आजही माझ्या सोबत आहेत. एवढेच काय त्यांच्या दोन तीन अस्थी देखील मी माझ्या पुजास्थानात ठेवल्यात, काही माझ्या कुंड्यात टाकल्यात. माझ्या वडिलांचे निधन होवून सात वर्षे झालीत.
छान विषय घेता नी छान आणि स्पष्ट मांडता हे फारच आवडतं अनुराधा ताई. जे काही भारी नी किंमती असतं ते मृतकास सांभाळतात त्याच्या हातून सूटतच कुठे😂 प्रश्न येतो साध्या वस्तूंचाच. त्याबद्दलच विचारणा होत असेल की " हवय का कोणाला?" ताई , ते प्रेम आपलेपणाकुठे आहे शिल्लक?
मी तर माझ्या सासूबाईंचे सर्व कपडे साड्या दान केल्या काही ननदांना दिल्या. दागिने पण ननंद बाईंना दिले. त्यांचा सर्व संसार पण ज्याला हवा त्यांना दिला 🙏आपण तरी काय घेऊन जाणार आहोत बरोबर... 😊🙏
गेलेल्या व्यक्ती चे जे काही असेल ते जर त्याच्या जवळ च्या व्यकति ला हवे असेल तर त्याना ते द्यावे जसे मुली बहिण किव्हा नातेवाईक माणूस गेले म्हणून की वस्तू वाईट होत नाही
आजचा खूप छान विषय .आपली जवळची व्यक्ती गेल्यावर तिची आठवण म्हणून तिचे कपडे किंवा साड्या आठवण म्हणून ठेवायला हवीच आहे.पण कपडे किंवा साड्या जास्त असल्या तर गरजूंना द्यायला हव्यात .
माझ्या मोठ्या बहिणीचे दागिने घरदार त्याना मूल नसल्याने नातेवाईकांनी स्वीकारले पण कपडे वापरण्यास तयार नव्हते. मग मी तिच्या काही साड्या घेऊन आले. त्या मी प्रत्येक देवळात व शुभ कार्य दिवशी नेसले. अजूनही नेसते💕
खरच आहे आपली वस्तू कोणाला गरजेला वापरायला देणं हे खरचं खूप छान आहे . आणि प्रत्येकानं ते द्यावं इतरांना वापरायला. नाही तरी मृत्यु केव्हा येईल हे कोणीच सांगू शकत नाही .
खरंच खूप प्रॉब्लेम होतो साड्यांचा. माझ्या सासुबाई गेल्यानंतर मी काही साड्या त्यांच्या एका बहिणीला आणि काही माझ्या नणंदेला दिल्या. मी जास्त वापरत नसल्याने राहिलेले सगळे चांगले कपडे, ड्रेस, साड्या,स्वेटर मी एका वृद्धाश्रमात देऊन आले.
खूप योग्य मार्गदर्शन केलं तुम्ही. सहज गप्पा मारत तुम्ही हे सांगितलं. ड्रेसचा रंग लय भारी. तुम्ही मध्येच इतरांशीही बोलता त्यामुळे घरगुती वातावरण निर्माण होतं.
योग्य विश्लेषण! (पाहणे, ओबसेरवेशन) आम्ही, (भाऊ बहिणी) याचे अनुकरण(देणे/वाटणे) केले! बांधकाम साईट, मेस, इतर ठिकाणी जाऊन , साड्या देण्यास ,सर्वात केली आहे.
तुमचं बोलतं ते खुप आवडले असेच केले पाहिजे मेलेल्या वक्तीवर जो प्रेम करतो तोच सभाळून ठेवतो आणि खोटे पण.आणि लोकांना दकवण्या साठी घेतो तो ऐक महिन्यात भाडीवल्याला देऊन टाकतात आवडीने घेतले तर शेवट पर्यंत ठेवा मनापासून❤
सौ.ताई नमस्कार. या विडिओ पाहा ते खुप बारकाईने विचार करून तुम्ही आमच्या साठी माहिती देता. आणि मला खूप आवडतात आणि तुम्हाला खूप खूप धन्यवादखुप तळमळीने सांगता.आमच्या घरातील सदस्य आहात.असे मी मानते.
खूप सुंदर प्रथम तुमचा ड्रेस.खूप सुंदर आणि दिलेली माहिती अतिशय मोलाची काहीची जुन्या पद्धतीवर खूप विश्वास.पण ते चुकीचे आहे माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी सगळे ठेवणे आणि आपल्या नातेवाईक ना देणे हीच के आठवण असते .आमची आई वडील गेल्यावर आम्ही चार भावंडे आणि दोन वहिनी खूप आनंदाने वाटून घेतले.
मॅडम, आजचा विषय म्हटलं तर खूप emotional आहे......पण तुम्ही खूप संयमाने,फार emotional न होता, स्पष्टपणे, अत्यंत व्यवस्थितपणे हाताळलात....पण एक नक्की आहे,की गेलेल्या व्यक्तिच आयुष्य, स्वभाव यावर नंतरच्या सुध्दा बर्याच गोष्टी अवलंबून असतात..... बाकी आजचा ड्रेस एकदम मस्त.... खूप smart दिसताय या ड्रेस मधे धन्यवाद 🙏
माझे मिस्टर जुलैमध्ये गेले काही. दिवसांनी मी ज्यांच्या कडे भाड्याने राहते .त्या वहिनी मला म्हणाल्या त्यांचे कपडे व वस्तू जाळून टाक. मला खूप वाईट वाटले. तुमचा हा व्हिडिओ पाहून बरं वाटलं. एवढे त्यांनी स्वतःच्या हाताने इस्त्री करून कपडे ठेवले आहेत जसेच्या तसे कपाटात आहेत
मृत व्यक्ती बद्दल आपल्याला जर खरोखर प्रेम असेल,माया असेल आपुलकी असेल तर त्याची प्रत्येक वस्तू देखील तितकीच जवळची असायला हवी...त्यांत कसलं अशुद्ध आणि काय..मग सोनं,पैसे कसे चालतात...आणि ताई तुमचा ड्रेस खुप छान आहे मला खूप आवडला... आणि तुमच्यातली मला विशेष आवडणारी गोष्ट म्हणजे तुमच्या बोलण्या वागण्यातील सहजता आणि मोकळेपणा...❤ मंजिरी साठे डोंबिवली
ताई छान विषय आहे.मेलेल्या माणसांच्या कपड्यांची अशी हेळसांड होऊ नये .बहुतेक लोक सगळं फेकून देतात हे चुकीचं आहे .कुंटुंबातील सर्वांनी त्या हौसेने वापरायला हरकत नाही .छान वाटले तुमच्या बोलण्याने .माणूस गेला कि गेला .तो काय कपड्यात बसत नाही .आणि तुमचा आजचा ड्रेस छान आहे .छान दिसत आहात तुम्ही .धन्यवाद ताई
खूप छान विचार माझी तीन महिन्यापूर्वी आई गेली आम्ही चार बहिणी आहोत कोणी काही नेत नव्ह्ते. पण मी त्यांनी आईला घेतलेल्या साड्या देऊन टाकल्या आणि उरलेल्या मी घेऊन आले नेसता येण्यासारख्या ठेवल्या आणि बाकीच्यांची कालच गोधडी भरली .
ताई आपण खूपच लाख मोलाची माहिती दिलात खरे आहे मेलेल्या लोकांचे कपडे कोण घळ नाही माझी आई पण गेली आता आठ महिने झाले मला सगळ्यांनी सांगितले त्यांचे कपडे वापरायचे नहीठपन मी काही एकले नाही त्या जे वापर्थ होत्या ते कपडे चादर मला द्यायला लग्वली म्हणजे बाहेर फेकायला मी जद मनाने ते दिले पण भ अकीचे काय मी देणारही म्हणून सांगितले त्यांची नवीनaanleli aa Medicine n टाकायला लावे मी ते रडत दिले k😅arn mi एकटीच आहे मला भिन भाऊ नाहीत तुम्ही समजू स्था माझी काय अवस्था झाली असेल देव पण पण्याठ सोडा दुसरे दिवशीच लोक सांगायला लागले पण मी काही एकले नाही मी म्हणाले आईचे घरपेसे दागिने चलताठ मग हे का नहीमाला हुमचा हा विदिओगर मनाला 0:17 भारावून गेला समाजात असे काही लोक असतात त्यांना हा व्हिडिओ खरच दकवावा असे मला वाठे खर आहे मेलेल्या मनुष्याचे कपडे अप्रले म्हणून आपण अशुद्ध होत नाहीं आपली खु आभरी आहे v mla samdhan pn वाटले 👌👌🙏🙏🙏👍👍✅🌷👌🙏🙏😊
महत्त्वाचा विषय हाताळला धन्यवाद. आपण कधी जाणार माहीत नसत. पण काही कालावधीनंतर आपल्या वस्तु सगळ्यांना वाटून टाकावेत. आपल्या जरूरी पुरतेच ठेवावेत मेल्यावर काहीच प्रश्न येणार नाहीत. आणि आपणही आनंद घेऊ शकतो.आपल्या खरेदीवरचा मोह कमी केला पाहीजे.आपलाही जोवर अडकायला नको.आपल्या मागे कोणालाच त्रास नको.
आजचा विडिओ खुप छान आहे,तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,गेलेल्या माणसाचे दागिने/पैसे चालतात पण कपडे घालू नये असं सगळ्यांना वाटत असतं,का? तर म्हणे त्यांत मृत व्यक्तीचा जीव अडकलेला असतो,त्याचा डायरेक्ट संबंध कपड्याशी असतो,पण मला हे पटत नाही, दागिने पण त्या व्यक्तीने अंगावरच घातलेले असतात,खरं तर मृत व्यक्तीचा आणि विशेषतः स्त्रीचा जीव तिच्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर असतो, माझी आई तुमच्या आईसारखीच होती,कुणी कुठली वस्तु मागितली तर ती प्रेमाने द्यायची आम्हाला साड्यांचे प्रचंड वेड आहे,माझ्या आईने जाण्यापूर्वी मला आणि वहिनीला एक एक मोठी सुटकेस भरून साड्या दिल्या होत्या,ती गेली तेव्हा दोन गोदरेजची कपाटं भरुन साड्या होत्या,मग भावाने मला आणि वहिनीला दोन तीन महिन्यानी त्या साड्या वाटून घ्या असं सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही हव्या त्या साड्या घेतल्या, वहिनीच्या बहिणीला काही साड्या दिल्या आणि बाकीच्या साड्या त्यांच्याकडे काम करणार्या लोकांना आणि गुंज नांवाच्या संस्थेला दिल्या
जिवंत असताना ज्या साड्या वाटल्या जात नाहीत त्या आठवण म्हणून नातेवाईक बायकांबरोबरच नक्कीच त्या व्यक्तीची सेवा करणार्या महिलांना पेटीकोट सकट अवश्य भेट द्याव्यात. कधी कधी नआतलगआंपएक्षआ नातलगांपेक्षा या लोकांना प्रेम व गरज दोन्ही असते. वृद्धाश्रमात तर कपडे व इतरसामानही देता येते.
छान माहिती मिळाली खरच जीवंतपणी च आपल्या वस्तू द्या व्यात कारण नंतर कुणाला आवडेल च असे नाही मी पण जस्त साडी वापरत नाही बरे वाटले तूम्ही सांगितले ते आता मी पण माझ्या साड्या देईन साड्या चांगल्या आहेत माझ्या खूप धन्यवाद 🎉❤❤
माझ्या सासूबाई ५ वर्षांपूर्वी गेल्या मी त्यांच्या काही साड्या घरातील मदतनीस स्रियांना दिल्या, काही सुती मऊ साड्यांच्या गोधड्या शिवून घेतल्या, त्या आम्ही वापरतो, काही भारी साड्या मी वापरते, आणि उरलेल्या सर्व साड्या, अगदी घडी न मोडलेल्या सुद्धा रा. स्व. संघातर्फे आदिवासी, पूरग्रस्तांसाठी दिल्या जातात तिथे नेऊन दिल्या.
प्रथम मला तुम्ही आवडतात स्पष्ट बोलण्यामुळे आणि तुमचा ड्रेस तुमचा रंग खूपच छान व तुम्हांला छान दिसतोय आता मेलेली व्यक्तीविषयी मेलेली व्यक्ती आपली कोणीतरी लागत असते व आपण जीवंत आहोत तो पर्यंत तिच्याबरोबर काढलेल्या क्षणांची आठवण येत राहणार त्यात वापरलेल्या , सासू च्या कपडे, दखगिन्यांमुळे म्हणजे ते जर आपल्या बरोबर असतील तर अजून छान क्षण आठवतात अंगावर पांघरले तर एक वेगळीच ऊब मिळते
माझ्या मोठ्या वहिनीची आठवण आली तिने पण जिवंत असतानाच मला काठपदराच्या साड्या दिल्या होत्या कारण तिला त्या वयोमानानुसार जड वाटत होत्या. ती वारल्या नंतर तिचे नवीन गाऊन होते ते आम्ही वाटून घेतले .तिचे माझ्यावर मुलीसारखं प्रेम होते ,वापरले कपडे तर काही नाही होत. विषय छान मांडलात.🙏
मँडम तुमचा dress छान छान आहे. आज तुम्ही दिलेली माहीती खूप आवडली. आपले कपडे ,साड्या देता येतील तेवढे मधे मधे कुणालाही देत रहावे. आपल्या नंतर ही आपले कपडे कुणालाही वाटून टाका असे घरच्यांना सांगून ठेवावे.
Tumcha vdo khup chan watala,, and vyakti aawadati asli ki tichi har ek vastu aaplyala aashirvaad manun tevavi watate pan tich janari vyakti khadoos trass denari asel tr tyanchi ek vastu nko watate
खरच आहे जर त्या मेलेल्या माणसावर तुमचं खुप प्रेम असेल तर त्याचे कपडे वापरले म्हणून काही होत नाही.म्हाजी जेव्हा सासू वारली तेव्हा म्हाज्या लग्नाला एक वर्षच झाल होत.मी तिच्या साड्या म्हाज्या आईला व काकीला दिल्या होत्या कारण आमच्या लग्ना अगोदरच आईची व टाकीची मैत्री होती.
सांगू का मॅडम! आपल्या गरुड पुराणात लिहले आहे की स्वर्गवासी झालेल्या माणसाचे कपडे आणि दागिने वापरू नयेत. दागिने फार तर मोडून नवीन करून वापरावेत. पण तुमचे पण विचार पटतात. त्यामुळे खर काय आणि खोट काय? ह्याचा संभ्रम होतो.
Ma'am tumche topics khup Chan astat agadi chotya chotya ghosti chi pun tumhi khup Chan explain kartat video baghtana kalte ki arey hya kahi kahi chotya chotya goshti pun kiti important astat ❤❤❤❤ thank u Ma'am ❤❤
ज्या लोकांना कपडे साड्या नकोत त्यांनी त्यांचा 1रु हिघेऊ नये.प्रेम,आपुलकी, महत्वाची आहे .मी तर म्हणेल घरातील लोक कुचिस्थेने वागत असतील तर त्यांना अधिकार नाही.मी स्वतः माझ्या मेलेल्या जाऊ ची साडी मागून घेतली.आयुष्यात मला काही झाले नाही तर आशीर्वाद च मिळाला.
डॉक्टर मॅडम..... नमस्कार. मी तुमचे vedio नियमित पहाते.पण comment कधीच करत नाही.तुमचे vedio खूप सुंदर असतात. प्रत्येक वेळी आपल्या vedioमध्ये imp.content असतोच ,असतो. उदा. पावडर कशी लावावी...😂 खुप छान सांगितलं आपण.खूप आवडलं.खरंच किती सहजतेने आपण प्रत्येक विषय हाताळता. डॉक्टर म्हणजे केवळ वैद्यकीय क्षेत्र सांभाळणारी व्यक्ती नसून सामान्य व्यक्तीही असते जिला इतराप्रमाने जगणं आवडते आणि जगaवही..हे आपण आपल्या vedio मधून पटवून दिले. आपण असे नेहमी content घेऊन या..जे सगळ्यांना त्यावर बोलायचं असते पण. ..बोलत मात्र कुणीच नाही. आपणास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा..🎉 मीही तुमच्यासारखी एक डॉक्टर..तुम्ही बोलताना वाटते की ,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलता.😊
विषय खरंतर विचार करायला लावणारा आहे. आजकाल घरात एव्हढी माणसेही नसतात. मला एक पर्याय सुचतो , आपणच स्वत: एकाद्या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क करुन ठेवावा माझ्या निधना नंतर माझे कपडे (साड्या....) घेऊन जाणे अशा संस्थांना गरज असते आणि त्याचा वापर केला जातो.
Very unique subject Good idea yo distribut while we are alive. Tumachi aai kharach hushar bai hoti. Ha vichar kadhi dokyat aala navata apalya nantar kapadyanche kay? Kathin prashna aahe. Normally koni ghet nahi. Mag te daan karave kiwa, jalun takave lagatat. Changala salla dilat. धन्यवाद
गेलेल्या व्यक्तीचे कपडे त्याच्या मागे असलेल्यानी घालू नयेत असे काही जण म्हणतात... त्यांना मला एकच सांगणे आहे...त्या माणसाने मागे ठेवलेली property अशी कोणाला देऊन टाकता का... घर असेल बंगला असेल दागिने रोख रक्कम असेल किव्वा इतर काहीही.. नाही ना...मग कपडे का वापरू नयेत.... खूपच सुंदर विचार तुम्ही येथे मांडला 🙏🙏
ताई मनातल्या मनात राहून गेलेल्या विषयांची चांगलीच उकल. खूप साधक बाधक आणि सखोल चर्चा.आणि न चर्चिलेले विषय.
खुप सुरेख आजचा विडिओ झाला.... मेलेल्या माणसाच्या दागिन्यांना आणि पैश्याला वाली मिळतो पण कपड्यांना नाही ह्या बाबतीत माझ्याही मनात खुप दिवसान पासुन प्रश्न होतेच... त्याच एक कारण हे की आज काल लोकं आपले दागिने बँकेच्या लॉकर मधे किव्वा कपाटात सेफ ठेवतात आणि पैसा लागेल एव्हढाच स्वतःकडे ठेवून बाकीचा बँकेत किव्वा इतरत्र गुंतवतात.. एक कपडेच असे असतात की ते त्यांच्याच कपाटात असतात आणि त्यांनीं ते पुष्कळदा वापरलेले असतात... जी व्यक्ती ते कपडे सदानकदा वापरते त्या कपड्याशी त्यांचा ओरां म्हणजेच आभा मंडळ कनेक्ट असतं... ती व्यक्ती मरते पण त्या आभा मंडळाच्या रुपात ती कुठे ना कुठे तिथेच असते... अभी ओर कुचं तो भी बाकी हे वहा.. असं काहीसं असतं... तस तपासून पहायचं असेल तर घरातल्या पाळीव कुत्र्याला ते कपडे हुंगवा आणि मग बघा तो कुत्रा ती मेलेली व्यक्ती तिच्या नेहमीची बसायची जागा किव्वा जोपायची जागा इथेच तो कुत्रा जावून तो कुत्रा kui kui करत राहतो. ...
आता तूम्ही म्हणाल दागिने आणि पैसा.. त्याच काय, पण ह्या गोष्टी तितक्या जास्त वापरात नसतात जितके की त्या व्यक्तीचे कपडे आणि चपला. तूम्ही नक्की पहा आणि विचार करा...
आता गेलेल्या व्यक्तीचा स्वभाव भांड कुदळ, गैर वागणूक, दुसऱ्याला नावे ठेवण्याची प्रवृत्ती असेल तर विचार करा त्या व्यकीचा त्या वस्तुतील ओरा कसा असेल.
तुमची आई देवतुल्य होती हे तुमच्या सांगण्यातून आणि लोकांनी स्वतःहून त्यांच्या नेलेल्या कपड्यातून दिसून येतो अश्या व्यक्तीचा ओरा वाईट कसा असेल... मी काही तुमच्या आई ला पाहिले नाही पण तरुण पणी त्यांनीं कोणीही कुठलीही वस्तू मागितली की ती त्यांनीं लोकांना दिली आहे हया वरूनच त्याचे मन कळते ते जीवंत पणी कश्यात अडकले नाही तर मेल्यावर अडकेल का?
त्यांच्या गेल्यावर त्या वस्तून पासून कोणाला त्रास होईल का, आणि हे लोकं ही जाणतात...पण सर्वच असे नसतात जीवंत पणी हाय हाय आणि मेल्यावरही हाय हाय असे त्यांचे असते... लोकांनी ते पाहिलेल असतं....
आता तूम्ही डॉक्टर,, हया गोष्टींना अंधश्रध्दा म्हणाल तर मुंबईला असे ओरा पाहणारे विकिर कॅमेरे आहेत ते पाहणारे आपल्या कडून ते पाहण्याचे पैसे घेतात त्यातून तुमचा ओरा कलर समजतो जितके मेडीटेशन जास्त तितके आभा मंडळ जास्त फेललेले आणि तेज किरणांचे असते असते.
जर अंधश्रध्दा वाटली तर माझी ही कॉमेंट ताबडतोप हाईड करा. कारण आपल्या भारतीयांनी जर हया गोष्टीनं बाबत बोललं तरी अंधश्रद्धा म्हणून केस होतें आणि तिथे अमेरिकेत भूत आहेत का हे पाहणयासाठी वेगवेगळी यंत्र आहेत त्याला आपणं मानतो.. का?? तर त्यांना तसे यंत्र मिळाले.. न दिसणाऱ्या जागच्या पार बघण्या साठी आणि एकण्यासाठी थोड्क्यात काय तर ते स्वतःला सायन्स च्या चवकाटीत बसवू शकले आणि आपणं नाही... आपल्या कडे ऋषी मुनींनी ते दिसतें, वास्तविक आपल्या कडूनच सारे तिथे गेले पण म्हणतात ना जिथे पिकते तिथे.....पण जिथे सायन्स थकत तिथे आध्यात्म सूरू होत. आणि... जिथे इथे आड आणि तिथे विहीर अशी परिस्थिती ज्याच्या आयूक्ष्यात येते ना तिथे भले भले आध्यात्ममाला नाकारणारे लोकं ती चोखंदळ पाय वाट कधी चालू लागतात हे त्यांचें त्यांना कळत नाही.
बाकी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.😊❤
Agadi barobar...tumcha vichar vichar karayala lavnara aahe..
👍🏻❤100%
बरोबर आहे
Vishay pharaoh changala nivadala ahe vrudhasramat kapade dilyas sradha andhsradha yancha Prashant urinary nahi
मॅडम अतिशय सुंदर प्रबोधन आपण जे प्रबोधन केले अतिशय सुंदर आहे अंधश्रद्धा या माध्यमातून कमी होते कपड्यात कधीच दोष नसतो आवडीने दिल्यास व घातल्याने मागील माणसाची इच्छा पूर्ण होते
मृत व्यक्तीचे पैसा, घरदार,सोने नाणे वापरलेले जसे चालते तसे कपडे पण वापरलेले चालतात
माझ्या शेजारी पालवकाकू राहायच्या त्या वयाच्या ६१ व्या वर्षी निधन पावल्या . त्यांच्याही खुप साड्या, ड्रेसेस हाते . त्यांच्या मिस्टरांनी त्या आश्रमाला दान केल्या. खरचं हा topic खुपच महत्वाचा घेतला मॅडम तुम्ही 🙏
मैडम मी तुमचे विडिओ नियमित बघते विषय खुप छान असतात अगदी मनापासून धन्यवाद अशेच मार्ग दर्शन करीत रहा आजचा विडिओ खुप छान आहे 😊
माझ्या सासूबाई गेल्या, त्यांचे दागिने मुली घेऊन गेल्या आणि साड्यांचं काय करायचं विचारलं तर म्हणाल्या," देऊन टाक कोणालाही" . मला खूप राग आला, एकत्र सासूबाई अंथरुणावर असताना त्यांची पूर्ण सेवा मी केली , कुणी ढुंकूनही बघितले नाही, मी ठरवलं आहे, आता सगळ्या साड्यांचं मीच ठरवेन, काय करायचे ते !! माझी मुलगी एक साडी घेऊन गेली..आजीची आठवण म्हणून!!
हे अगदीच खरं आहे
दुनिया अशीच आहे
Melelya vyaktiche kapde thevu naye Karn andhakari Shakti kapdyan madhe vas karte tumhi ajari padu shakta daridry yet ye kapde konala Dan nhi karayche agdi new asle tari te jalun takayche .. dusri gosht son asel tar te modun takayche Ani te paise vaprun takayche
Khup chan vishay Ani samadhan vatle 🙏
माझ्या सासुबाई वारल्या नंतर त्यांचे न ऊवारी पातळ ज्यांना हवे होते त्यांना दिले.गादी,बेडशिट,ब्लॅंकेट
,चादरी ,पलंग आमचे कडे काम करायला बाई होती ती म्हणाली मला द्या मी वापरते.आजी मला आईसारखी होती. आणि ऊरलेल्या काॅटनच्या पातळांची मी गोदडी केली.
Khup chan mazy sasubaini tynchy hayatitch saglya sadya Watan dilya
सुंदर पद्धतीने सांगितलं मॅडम मन तेवढं मोठं पाहिजे देण्यासाठी सर्वांचे मन साररवे नाही
खूपच छान माहिती,जवळच्या माणसाचे कपडे प्रसाद म्हणून जरूर वापरावेत.😊
अतिशय महत्वाचा विषय आपण मांडलात.
आपण आपल्याला हवे ते एकदोन ठेवून बाकी कौणाला हवे असल्यास द्यावेत.
उरलेले वृद्धाश्रमात द्यावेत.खूप आवडीने वापरततात.
खूप सुंदर आणि पटले तुमचे विचार, काही लोक देवाघरी गेलेल्या लोकांचे कपडे जाळून टाकतात,, मला हे कधीच नाही पटलं 👍🤗❤❤
खूप बरोबर बॉलत ताई पण त्यासाठी मन मोठ्ठे करावे लागते ते सगळ्यांना नाही जमत हे ही सत्य आहे
खूपच छान विषय आहे. मी देखील माझ्या सासूबाई म्हणजे आईंच्या नऊवारी साड्या नणंदा आणि इतर स्त्रियांना दिल्या. दोन साड्यांची दुपटी नातवा करिता बनवली. ती खूप छान आणि मऊ झाली. खूप खूप खूप धन्यवाद तुम्हाला. विषय असेच आणखी ऐकायला आवडेल आम्हाला. धन्यवाद.
खूप छान विषय, खूप चांगला विचार मांडलात, गरजवंतांनां द्यावेत असे कपडे, त्यांचे भरभरुन प्रेम मिळेल,
मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात, खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारे विषय असतात तसेच तुमचा दृष्टिकोनसुद्धा खूप पटतो मला. मी नेहमीच तुमच्या व्हिडिओची वाट बघते.🙏🙏
After many days, You have discussed a very important subject. Keep going with good topics.
निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या आपण खुप छान दिसता,आयुष्यमान भव
खरोखर महत्त्वाचा विषय आहे. कधीतरी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतोच. नंतर कोण काय करतील सांगू शकत नाही.
छान सुचवलय मॕडम.तुमचे अनुभव मोकळ्या मनाने सांगितले आहेत. प्रेरणा देणारे विचार आहेत आपले.धन्यवाद
ताई तुम्ही हा घेतलेला विषय जिव्हाळ्याचा,ममतेचा,मायेचा,आपलेपणाचा,भावनिकतेचा, अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन अत्यंत ओघवत्या भाषेत मांडलेले विचार हृदयाला स्पर्श करून गेले.माझी आई देखील सेम तुमच्या आईच्या स्वभावासारखीच होती. तीला नेहमी देण्यातच आनंद वाटत असे.ती गेल्यानंतर तीच्या पश्चात तिच्या साड्या तीच्या सात लेकी,दोन सुना,काही नाती व नात सुनानी तीची आठवण म्हणून आवडीने वाटून घेतल्या.कारण तीचा स्वभाव अत्यंत प्रेमळ,मनमोकळा संवाद साधत होती.तीचं सर्व लेकरांवर सारखचं प्रेम होतं.
ताई आज हा विषय मांडत असतांना आपण परीधान केलेला पोषाख खुपचं छानं,सुदंर,मस्तचं होता.
❤😊
🙏🙏 ताई
आजचा विषय खूप महत्त्वाचा होता
गेलेल्या व्यक्तीच्या साड्यांचे काय करावे
माझी आई 3 वर्षा पूर्वी गेली
कोरोणाचा काळ चालू होता
त्यामुळे नातेवाईक काही जास्त कोणी आले नाहीत
त्यामुळे मी आईच्या दोन तीन साड्या आठवण म्हणून ठेवून घेतल्या
बाकी साड्या जे गरजु आहेत त्यांना
व काही आश्रमाची गाडी येते जुने कपडे धान्य वगैरे नेण्यासाठी त्यांना दिल्या
मी एक साडी न ऊवारी शिवुन घेतली
मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या देवब्राम्हणा दिवशी नेसले
मला खूप छान वाटले
व तिची खूप आठवण आली
ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असते
मला खूप आवडतात
आणि खूप छान असतात
आज मी माझ्या मनातील तुम्हाला सांगितले
उत्तम विषय मांडला.. माणूस जातो त्याच्या.. गुणवत्तेवर असत सर्व त्याचीच नव्हे त्या चीच नाही.. इतरांची तशीच गुणवत्ता लागते खुप च. छान विषय होता माझा. भाऊ नुकताच गेला डॉ कटर. होते त्याच ा... वस्तू आम्हाला हवेत असे बोलायचे सगळे चया.. मुखात एकच.. होत. आमचा देव माणूस.. हरपला खरच. सूदर. विषय मांडला लहान पणा पासून.. म्हातारपणापर्यत.! कपडे दागिने यावरून पझेस्विह. असतात
माझ्या आईच्या ही खूप व खूप छान सुंदर साड्या होत्या ,आम्ही ही सर्व बहिणींनी व वहिनीने त्या वाटून घेतल्या,आमची आई ही देवी सारखी होती ,तुमचा व्हिडिओ बघून मला खूप छान वाटले,कालच आईचे पहिले वर्ष श्राद्ध झाले,आम्ही दोघी बहिणी विधवा आहोत म्हणून मी विचार केला व सवाशनीचे लेणे
आम्ही आईचे मंगळसूत्र लहान बहिणीला
दिले .आम्ही तिघी बहिणी, व वहिनी,मावशी यांनी साड्या घेतल्या.
तुमचा व्हिडिओ बघून मला आमचाच विषय वाटला ,
सुंदर व्हिडीओ
छान वाटला संवाद. योग्य विचार मांडलेत.
अतिशय खूप चांगला विषय होता. बोध घ्यायला पाहिजे.
खूप सुंदर विषय आहे कौतुक तुमचं. मी जीन्स शर्ट घालते. माझी आई नववारी साडी घालायची. तिच्या मृत्यू नंतर मी माझ्या आईच्या साड्यांची गोधडी बनवली आणि 10 वर्ष झाली मी तीच पांघरते. त्यात मला माझ्या आईची उब मी आजही पांघरते. वडिलांचे धोतर आहे मी दर वर्षी ज्योतिबा फुलेचा रोल करते तेव्हा नेसते. माझे आईवडील आजही माझ्या सोबत आहेत. एवढेच काय त्यांच्या दोन तीन अस्थी देखील मी माझ्या पुजास्थानात ठेवल्यात, काही माझ्या कुंड्यात टाकल्यात.
माझ्या वडिलांचे निधन होवून सात वर्षे झालीत.
छान विषय घेता नी छान आणि स्पष्ट मांडता हे फारच आवडतं अनुराधा ताई.
जे काही भारी नी किंमती असतं ते मृतकास सांभाळतात त्याच्या हातून सूटतच कुठे😂
प्रश्न येतो साध्या वस्तूंचाच. त्याबद्दलच विचारणा होत असेल की " हवय का कोणाला?"
ताई , ते प्रेम आपलेपणाकुठे आहे शिल्लक?
मी तर माझ्या सासूबाईंचे सर्व कपडे साड्या दान केल्या काही ननदांना दिल्या. दागिने पण ननंद बाईंना दिले.
त्यांचा सर्व संसार पण ज्याला हवा त्यांना दिला 🙏आपण तरी काय घेऊन जाणार आहोत बरोबर... 😊🙏
गेलेल्या व्यक्ती चे जे काही असेल ते जर त्याच्या जवळ च्या व्यकति ला हवे असेल तर त्याना ते द्यावे जसे मुली बहिण किव्हा नातेवाईक माणूस गेले म्हणून की वस्तू वाईट होत नाही
आजचा खूप छान विषय .आपली जवळची व्यक्ती गेल्यावर तिची आठवण म्हणून तिचे कपडे किंवा साड्या आठवण म्हणून ठेवायला हवीच आहे.पण कपडे किंवा साड्या जास्त असल्या तर गरजूंना द्यायला हव्यात .
खरंच खूप छान विषय आहे मनापासून आय कावस वाटल😊
माझ्या मोठ्या बहिणीचे दागिने घरदार त्याना मूल नसल्याने नातेवाईकांनी स्वीकारले पण कपडे वापरण्यास तयार नव्हते. मग मी तिच्या काही साड्या घेऊन आले. त्या मी प्रत्येक देवळात व शुभ कार्य दिवशी नेसले. अजूनही नेसते💕
विषय आणि विचार उत्तम! आपण आहोत तोपर्यंतच आपल्या कपड्यांचे वाटप केले तर चांगलेच! पण नंतरही केले तर उत्तमच ! त्याचा उपयोग व्हावा !!
खरच आहे आपली वस्तू कोणाला गरजेला वापरायला देणं हे खरचं खूप छान आहे . आणि प्रत्येकानं ते द्यावं इतरांना वापरायला. नाही तरी मृत्यु केव्हा येईल हे कोणीच सांगू शकत नाही .
खरेच खूप छान सुंदर विचार आहेत. मनाचेच भाव असतात सर्वांचे....
दागिने व ईतर गोष्टी देखील काही मुले बहिणीस देत नाही. आईची जिवंतपणी echya असते .
खरंच खूप प्रॉब्लेम होतो साड्यांचा.
माझ्या सासुबाई गेल्यानंतर मी काही साड्या त्यांच्या एका बहिणीला आणि काही माझ्या नणंदेला दिल्या.
मी जास्त वापरत नसल्याने राहिलेले सगळे चांगले कपडे, ड्रेस, साड्या,स्वेटर मी एका वृद्धाश्रमात देऊन आले.
अगदी बरोबर आहे पैसा चालतो, सोन्याची दागिने चालतात तर कपडे चालायला काहीच हरकत नाही. कारण ते आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींची असतात.
खूप छान आणि महत्त्वाचा विषय आहे ताई. आपल्या सर्वांना मार्गदर्शक असा.
धन्यवाद 🙏
खूप योग्य मार्गदर्शन केलं तुम्ही.
सहज गप्पा मारत तुम्ही हे सांगितलं.
ड्रेसचा रंग लय भारी.
तुम्ही मध्येच इतरांशीही बोलता त्यामुळे घरगुती वातावरण निर्माण होतं.
3:05 पासून पुढे.....
मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोललात,.... "त्याच्यासाठी प्रेमच असावे लागते" .... 👌👌
योग्य विश्लेषण! (पाहणे, ओबसेरवेशन)
आम्ही, (भाऊ बहिणी) याचे अनुकरण(देणे/वाटणे) केले!
बांधकाम साईट, मेस, इतर ठिकाणी जाऊन , साड्या देण्यास ,सर्वात केली आहे.
तुमचं बोलतं ते खुप आवडले असेच केले पाहिजे मेलेल्या वक्तीवर जो प्रेम करतो तोच सभाळून ठेवतो आणि खोटे पण.आणि लोकांना दकवण्या साठी घेतो तो ऐक महिन्यात भाडीवल्याला देऊन टाकतात आवडीने घेतले तर शेवट पर्यंत ठेवा मनापासून❤
सौ.ताई नमस्कार. या विडिओ पाहा ते खुप बारकाईने विचार करून तुम्ही आमच्या साठी माहिती देता. आणि मला खूप आवडतात आणि तुम्हाला खूप खूप धन्यवादखुप तळमळीने सांगता.आमच्या घरातील सदस्य आहात.असे मी मानते.
नमस्कार ताई तुम्ही जे विषय घेता ते खूप छान असतात खूप आवडतात मला 🙏🏻
खुप छान सांगितले ताई माझ्या आईच्या साड्या तिच्या नाती मुलगी मी व माझ्या वहिनी आम्ही सर्वांनी वाटुन घेतल्या व त्या आनंदाने व प्रेमाने वापरत आहोत.
Khup chan mahiti माझ्या aai cya मृत्यूनंतर Amhala toch prashna padla hota aamhi kahi use kelya kahi dusryana deun taklya Thanks mam changle vichar
खूप सुंदर प्रथम तुमचा ड्रेस.खूप सुंदर आणि दिलेली माहिती अतिशय मोलाची काहीची जुन्या पद्धतीवर खूप विश्वास.पण ते चुकीचे आहे माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी सगळे ठेवणे आणि आपल्या नातेवाईक ना देणे हीच के आठवण असते .आमची आई वडील गेल्यावर आम्ही चार भावंडे आणि दोन वहिनी खूप आनंदाने वाटून घेतले.
मॅडम, आजचा विषय म्हटलं तर खूप emotional आहे......पण तुम्ही खूप संयमाने,फार emotional न होता, स्पष्टपणे, अत्यंत व्यवस्थितपणे हाताळलात....पण एक नक्की आहे,की गेलेल्या व्यक्तिच आयुष्य, स्वभाव यावर नंतरच्या सुध्दा बर्याच गोष्टी अवलंबून असतात.....
बाकी आजचा ड्रेस एकदम मस्त....
खूप smart दिसताय या ड्रेस मधे
धन्यवाद 🙏
माझे मिस्टर जुलैमध्ये गेले काही. दिवसांनी मी ज्यांच्या कडे भाड्याने राहते .त्या वहिनी मला म्हणाल्या त्यांचे कपडे व वस्तू जाळून टाक. मला खूप वाईट वाटले. तुमचा हा व्हिडिओ पाहून बरं वाटलं. एवढे त्यांनी स्वतःच्या हाताने इस्त्री करून कपडे ठेवले आहेत जसेच्या तसे कपाटात आहेत
म्हणूनच मी म्हणते की आसक्ती कमी करा.साठीनंतर साड्या घेऊच नयेत.आहेत त्याच नेसून टाकाव्यात.म्हणजे हा प्रश्नच येणार नाही.
👌👌👍
आपण जिवंत असतानाच आपल्या वस्तु वाटाव्यात.
मृत व्यक्ती बद्दल आपल्याला जर खरोखर प्रेम असेल,माया असेल आपुलकी असेल तर त्याची प्रत्येक वस्तू देखील तितकीच जवळची असायला हवी...त्यांत कसलं अशुद्ध आणि काय..मग सोनं,पैसे कसे चालतात...आणि ताई तुमचा ड्रेस खुप छान आहे मला खूप आवडला... आणि तुमच्यातली मला विशेष आवडणारी गोष्ट म्हणजे तुमच्या बोलण्या वागण्यातील सहजता आणि मोकळेपणा...❤ मंजिरी साठे डोंबिवली
खुप सुंदर व्हिडीओ केलात खरोखरच आहे दागिने पैसे चालतात .पण कपडे नकोत .आपण पण आपली कपडे मणसोक्तष वापरली पाहिजेत .धन्यवाद ताई
ताई छान विषय आहे.मेलेल्या माणसांच्या कपड्यांची अशी हेळसांड होऊ नये .बहुतेक लोक सगळं फेकून देतात हे चुकीचं आहे .कुंटुंबातील सर्वांनी त्या हौसेने वापरायला हरकत नाही .छान वाटले तुमच्या बोलण्याने .माणूस गेला कि गेला .तो काय कपड्यात बसत नाही .आणि तुमचा आजचा ड्रेस छान आहे .छान दिसत आहात तुम्ही .धन्यवाद ताई
खूप छान विचार माझी तीन महिन्यापूर्वी आई गेली आम्ही चार बहिणी आहोत कोणी काही नेत नव्ह्ते. पण मी त्यांनी आईला घेतलेल्या साड्या देऊन टाकल्या आणि उरलेल्या मी घेऊन आले नेसता येण्यासारख्या ठेवल्या आणि बाकीच्यांची कालच गोधडी भरली .
वेगळा विषय छान हाताळला, खूप चांगले मार्गदर्शन केले.
ताई आपण खूपच लाख मोलाची माहिती दिलात खरे आहे मेलेल्या लोकांचे कपडे कोण घळ नाही माझी आई पण गेली आता आठ महिने झाले मला सगळ्यांनी सांगितले त्यांचे कपडे वापरायचे नहीठपन मी काही एकले नाही त्या जे वापर्थ होत्या ते कपडे चादर मला द्यायला लग्वली म्हणजे बाहेर फेकायला मी जद मनाने ते दिले पण भ अकीचे काय मी देणारही म्हणून सांगितले त्यांची नवीनaanleli aa
Medicine n टाकायला लावे मी ते रडत दिले k😅arn mi एकटीच आहे मला भिन भाऊ नाहीत तुम्ही समजू स्था माझी काय अवस्था झाली असेल देव पण पण्याठ सोडा दुसरे दिवशीच लोक सांगायला लागले पण मी काही एकले नाही मी म्हणाले आईचे घरपेसे दागिने चलताठ मग हे का नहीमाला हुमचा हा विदिओगर मनाला 0:17 भारावून गेला समाजात असे काही लोक असतात त्यांना हा व्हिडिओ खरच दकवावा असे मला वाठे खर आहे मेलेल्या मनुष्याचे कपडे अप्रले म्हणून आपण अशुद्ध होत नाहीं आपली खु आभरी आहे v mla samdhan pn वाटले 👌👌🙏🙏🙏👍👍✅🌷👌🙏🙏😊
खूपच छान माहिती दिलीत आणि आपण आहे तोवर आपल्या वस्तू वाटाव्या हे आवडले
महत्त्वाचा विषय हाताळला धन्यवाद.
आपण कधी जाणार माहीत नसत. पण
काही कालावधीनंतर आपल्या वस्तु सगळ्यांना वाटून टाकावेत. आपल्या जरूरी पुरतेच ठेवावेत मेल्यावर काहीच
प्रश्न येणार नाहीत. आणि आपणही आनंद घेऊ शकतो.आपल्या खरेदीवरचा
मोह कमी केला पाहीजे.आपलाही जोवर अडकायला नको.आपल्या मागे
कोणालाच त्रास नको.
आजचा विडिओ खुप छान आहे,तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,गेलेल्या माणसाचे दागिने/पैसे चालतात पण कपडे घालू नये असं सगळ्यांना वाटत असतं,का? तर म्हणे त्यांत मृत व्यक्तीचा जीव अडकलेला असतो,त्याचा डायरेक्ट संबंध कपड्याशी असतो,पण मला हे पटत नाही, दागिने पण त्या व्यक्तीने अंगावरच घातलेले असतात,खरं तर मृत व्यक्तीचा आणि विशेषतः स्त्रीचा जीव तिच्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर असतो,
माझी आई तुमच्या आईसारखीच होती,कुणी कुठली वस्तु मागितली तर ती प्रेमाने द्यायची
आम्हाला साड्यांचे प्रचंड वेड आहे,माझ्या आईने जाण्यापूर्वी मला आणि वहिनीला एक एक मोठी सुटकेस भरून साड्या दिल्या होत्या,ती गेली तेव्हा दोन गोदरेजची कपाटं भरुन साड्या होत्या,मग भावाने मला
आणि वहिनीला दोन तीन महिन्यानी त्या साड्या वाटून घ्या असं सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही हव्या त्या साड्या घेतल्या, वहिनीच्या बहिणीला काही साड्या दिल्या आणि बाकीच्या साड्या त्यांच्याकडे काम करणार्या लोकांना आणि गुंज नांवाच्या संस्थेला दिल्या
तुमचा टॉप खूपच छान ओढणी पण उठून दिसतेय. आजचा तुमचा ड्रेस तुमच्यावर अगदी खुलून दिसतोय. एवढा की याच्यावर अगदी साधं मंगळसूत्र, साधे मोत्याचे बट्टू पण छान दिसतील 😊
खूप छान विषय घेतला. आभारी आहे.
जिवंत असताना ज्या साड्या वाटल्या जात नाहीत त्या आठवण म्हणून नातेवाईक बायकांबरोबरच नक्कीच त्या व्यक्तीची सेवा करणार्या महिलांना पेटीकोट सकट अवश्य भेट द्याव्यात.
कधी कधी नआतलगआंपएक्षआ नातलगांपेक्षा या लोकांना प्रेम व गरज दोन्ही असते.
वृद्धाश्रमात तर कपडे व इतरसामानही देता येते.
तुमची कल्पना आवडली, आपल्या जवळच्या व्यक्ती ची आठवण म्हणून त्यांचे कपडे ठेवायला काही च हरकत नाही..
छान माहिती मिळाली खरच जीवंतपणी च आपल्या वस्तू द्या व्यात कारण नंतर कुणाला आवडेल च असे नाही मी पण जस्त साडी वापरत नाही बरे वाटले तूम्ही सांगितले ते आता मी पण माझ्या साड्या देईन साड्या चांगल्या आहेत माझ्या खूप धन्यवाद 🎉❤❤
माझ्या सासूबाई ५ वर्षांपूर्वी गेल्या
मी त्यांच्या काही साड्या घरातील मदतनीस स्रियांना दिल्या, काही सुती मऊ साड्यांच्या गोधड्या शिवून घेतल्या, त्या आम्ही वापरतो, काही भारी साड्या मी वापरते, आणि उरलेल्या सर्व साड्या, अगदी घडी न मोडलेल्या सुद्धा रा. स्व. संघातर्फे आदिवासी, पूरग्रस्तांसाठी दिल्या जातात तिथे नेऊन दिल्या.
ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही साड्या बद्दल. माझी आई जाऊन 19 वषॅ झाली 😢😢 मी पण ऐक साडी आठवण म्हणून ठेवली आहे.
माझ्या आईच्या साड्या पण कपाट भरून होत्या ती पण सर्वांना वाटायची तिला पण जाऊन 15 वर्ष झाली आहेत साड्या एकदम कॉस्टली होत्या आजचा Vdo छान आहे
ताई खूपच छान मनोगत व्यक्त केले खूप खूप धन्यवाद
प्रथम मला तुम्ही आवडतात स्पष्ट बोलण्यामुळे आणि तुमचा ड्रेस तुमचा रंग खूपच छान व तुम्हांला छान दिसतोय आता मेलेली व्यक्तीविषयी मेलेली व्यक्ती आपली कोणीतरी लागत असते व आपण जीवंत आहोत तो पर्यंत तिच्याबरोबर काढलेल्या क्षणांची आठवण येत राहणार त्यात वापरलेल्या , सासू च्या कपडे, दखगिन्यांमुळे म्हणजे ते जर आपल्या बरोबर असतील तर अजून छान क्षण आठवतात अंगावर पांघरले तर एक वेगळीच ऊब मिळते
तुमच्या आई सारखी माझी आईही होती, covid मध्ये गेली....पण तीच्या साड्या सर्व नातेवाईकांनी हक्काने मागून घेतल्या/नेल्या
माझ्या वहिनीने ही आनंदाने दिल्या
ताई तुम्ही बोलता तेच बरोबर आहे तुम्ही छान बोलता मला
तुम्ही जे समजावून सांगता ते शिकायला मिळते
धन्यवाद ताई
डाॅ.मॅम ...आज तुम्ही फार चांगल्या विषयादा हात घातलाय ....माझी आई पण अशीच स्वभावाची होती अगदी तंतोतंत 😊😊हाती कमी होत,तरी दानत फा...र होती ....
खूपच छान सांगितले. बोलण्यातल
मोकळेपणा खूप आवडला . ❤
Wow,kaku khup chaan vishay,majhi aai 2 varshan purvi geli age 79 hota ticha ,amhi 3 bahini aahot sakhhaya tar amhi tighini aai chya sadya vatun ghtlya aapsat.nice topic.👌👌👌👌
Khoop Chaan 👌👍
Chan mahiti ahe..kahre ahe..tya mansabadal khup prem asel ter nakki athavan asavi tyacha sarichi aplyakade..Nice anubhav share kelat..
माझ्या मोठ्या वहिनीची आठवण आली तिने पण जिवंत असतानाच मला काठपदराच्या साड्या दिल्या होत्या कारण तिला त्या वयोमानानुसार जड वाटत होत्या. ती वारल्या नंतर तिचे नवीन गाऊन होते ते आम्ही वाटून घेतले .तिचे माझ्यावर मुलीसारखं प्रेम होते ,वापरले कपडे तर काही नाही होत. विषय छान मांडलात.🙏
छान विषय मांडला, आहे तो पर्यंत वाटत राहावे म्हणजे उपयोग होईल
vishay khupe chan madala aapn gelanantar aapla sadaa upyogat yetil tar khupech aani sadaa vatat rahayala pahije
Khup cha chaan vichar aahet Tai kharacha daagine chalatat pan kapde chalat nahit ❤🥺
Khup chhan topic...mi mazya Mr.nanche कपडे kahi dile v kahi तसेच dhevlet Aadhvan म्हणुन...Agdi 👞 blet pasun sarv dhevle aahe....khup chhan topic chhan पद्धतीने मांडला.❤❤..Aani ho Dr.Madam tumcha dress chhan disat aahe तुम्हाला..❤❤
तुमचा ड्रेस छान आहे. मेलेल्या माणसाचे कपडे अनाथाश्रमात दान करावेत कारण परिचित लोक ते फारसे वापरत नाहीत.
छान! विचार करण्याजोगं !
अशावेळी तुम्हीही काही अनाथाश्रमांचे नाव पत्ते सुचवू शकता.
मीतर माझ्या काकीसासूंच्या साड्या खूप आनंदाने वापरते.
मॅडम ड्रेस खूप छान दिसतो आहे व आजचा विषय महत्त्वाचा वाटला छान माहिती दिली
मँडम तुमचा dress छान छान आहे.
आज तुम्ही दिलेली माहीती खूप आवडली.
आपले कपडे ,साड्या देता येतील तेवढे मधे मधे कुणालाही देत रहावे. आपल्या नंतर ही आपले कपडे कुणालाही वाटून टाका असे घरच्यांना सांगून ठेवावे.
Tumcha vdo khup chan watala,, and vyakti aawadati asli ki tichi har ek vastu aaplyala aashirvaad manun tevavi watate pan tich janari vyakti khadoos trass denari asel tr tyanchi ek vastu nko watate
खरच आहे जर त्या मेलेल्या माणसावर तुमचं खुप प्रेम असेल तर त्याचे कपडे वापरले म्हणून काही होत नाही.म्हाजी जेव्हा सासू वारली तेव्हा म्हाज्या लग्नाला एक वर्षच झाल होत.मी तिच्या साड्या म्हाज्या आईला व काकीला दिल्या होत्या कारण आमच्या लग्ना अगोदरच आईची व टाकीची मैत्री होती.
तुमचा ड्रेस छान आहे खरं तर मला पण हा प्रश्न पडतो की मी मेल्यावर माझ्या साड्यांच काय होणार खूप छान व्हिडिओ बनवलाय धन्यवाद ताई
विषय खरच योग्य होता, तुम्ही अगदी योग्य तर्हेने मांडलात. मनातलाच बोललात.
ताई ड्रेस खूप छान आहे.आणि ताई तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे.मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते.सगळ्या विषयांवर तुम्ही बोलत असता.
मॅडम तुम्ही खूप छान बोलताय. कुठेही नाटकीपणा नाही. अगदी घरगुती मैत्रिणींशी गप्पा मारल्या असे वाटले
सांगू का मॅडम! आपल्या गरुड पुराणात लिहले आहे की स्वर्गवासी झालेल्या माणसाचे कपडे आणि दागिने वापरू नयेत. दागिने फार तर मोडून नवीन करून वापरावेत. पण तुमचे पण विचार पटतात. त्यामुळे खर काय आणि खोट काय? ह्याचा संभ्रम होतो.
Khup chhan mahiti sangitli manatil prashnanchi uttare milali
Khupach vegla Vishay pn molachi mahiti dilit yabaddal sarvanchya manat samaj gairsamaj astat kahi aushi door jhalyat ass samjuya. Dhannyavaad. 🙏🏻🙏🏻
Ma'am tumche topics khup Chan astat agadi chotya chotya ghosti chi pun tumhi khup Chan explain kartat video baghtana kalte ki arey hya kahi kahi chotya chotya goshti pun kiti important astat ❤❤❤❤ thank u Ma'am ❤❤
ज्या लोकांना कपडे साड्या नकोत त्यांनी त्यांचा 1रु हिघेऊ नये.प्रेम,आपुलकी, महत्वाची आहे .मी तर म्हणेल घरातील लोक कुचिस्थेने वागत असतील तर त्यांना अधिकार नाही.मी स्वतः माझ्या मेलेल्या जाऊ ची साडी मागून घेतली.आयुष्यात मला काही झाले नाही तर आशीर्वाद च मिळाला.
Khup chan... Mi pan asech kele, myza sasubai chy sarees relation madhlya sarva ladies na vatlya. Sasreche kapde Anathaly la neun dile. Karan te oversize hote kunalahi fit yet navte... 🙏
डॉक्टर मॅडम..... नमस्कार.
मी तुमचे vedio नियमित पहाते.पण comment कधीच करत नाही.तुमचे vedio खूप सुंदर असतात. प्रत्येक वेळी आपल्या vedioमध्ये imp.content असतोच ,असतो.
उदा. पावडर कशी लावावी...😂
खुप छान सांगितलं आपण.खूप आवडलं.खरंच किती सहजतेने आपण प्रत्येक विषय हाताळता.
डॉक्टर म्हणजे केवळ वैद्यकीय क्षेत्र सांभाळणारी व्यक्ती नसून सामान्य व्यक्तीही असते जिला इतराप्रमाने जगणं आवडते आणि जगaवही..हे आपण आपल्या vedio मधून पटवून दिले.
आपण असे नेहमी content घेऊन या..जे सगळ्यांना त्यावर बोलायचं असते पण. ..बोलत मात्र कुणीच नाही.
आपणास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा..🎉
मीही तुमच्यासारखी एक डॉक्टर..तुम्ही बोलताना वाटते की ,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलता.😊
विषय खरंतर विचार करायला लावणारा आहे.
आजकाल घरात एव्हढी माणसेही नसतात.
मला एक पर्याय सुचतो , आपणच स्वत:
एकाद्या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क करुन ठेवावा माझ्या निधना नंतर माझे कपडे (साड्या....) घेऊन जाणे अशा संस्थांना गरज असते आणि त्याचा वापर केला जातो.
G00d
खूप सुंदर विषय. छान माहिती,धन्यवाद.
Dress छान आहे madam tumcha आणि video pn छान आहे. विषय changala आहे.
विषय खूप छान घेतला
Very unique subject
Good idea yo distribut while we are alive.
Tumachi aai kharach hushar bai hoti.
Ha vichar kadhi dokyat aala navata apalya nantar kapadyanche kay? Kathin prashna aahe.
Normally koni ghet nahi.
Mag te daan karave kiwa, jalun takave lagatat.
Changala salla dilat. धन्यवाद
खूप सुंदर अगदी आवश्यक विषय घेतलातआणि तितकंच छान सांगितलंत