झऱ्याकाठी असलेलं एक नितांत सुंदर मंदिर-'विमलेश्वर मंदिर'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • कोकणातील देवगड मध्ये वाडा नावाचं एक सुंदर गाव आहे. या गावात विमलेश्वर हे एक नितांत सुंदर मंदिर आहे. समोर झरा वाहतो. आजूबाजूला उंच झाडी आहे. देवगड मधला हा एक सुंदर भाग पावसाळ्यात आपलं खरं सौंदर्य दाखवतो. त्याचाच हा एपिसोड.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Комментарии • 468

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 2 года назад +2

    अतिशय रमणीय स्थान! तुझा वावर व बोलण किती सहज आहे ग! अजिबात अभिनय नाही! मेकअप नाही, साधी मुलगी, घरकाम करता करता उठून बाहेर पडून तिथ गेलीयेस अशीच दिसतेस तू! स्क्रिप्ट पण अगदी सहज साध, शूटिंग पण छान घेतलय! आणि अतिशय गोऽऽऽऽऽड दिसतेस, फ्रेश! म्हणजे आहेचस तू गोड व गुणी मुलगी!👍❤ छान उपक्रम आहे. खूप शुभेच्छा ग तुला! तुझा ब्लॉग पाहीन आता 🤩

  • @prashyakulkarni281
    @prashyakulkarni281 2 года назад +6

    वटवाघूळ food chain चा एक अविभाज्य भाग आहे. त्याने टोळधाड control मध्ये येते. युरोप मध्ये एका जागेतून अशी वटवाघळे जाणूनबुजून हलवली आणि त्या वर्षी टोळधाडी मुळे आसपासच्या पिकांचे खुप नुकसान झाले होते अशी नोंद आहे. त्यांना पुन्हा restore करण्यात आलं. पण व्हिडिओ खुप छान आहे, informative आहे. Best wishes

  • @yogeshpaykar4199
    @yogeshpaykar4199 Год назад +2

    मुक्ता ताई तुमचा आवाज खूप छान आहे बोलण्याची पदत पण छान आहे तुमचा मुळे आमाला कोकण दर्शन होतो तुमाला पुढचा वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा... 🙏🙏

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 2 года назад +25

    शेवटी त्या पुलावर तु बसुन केलेला द्रोण शॉट खरंच अप्रतिम होता. सोबत ते छान संगीत आणि तुझा मंजुळ आवाज... शब्दच नाहीत. मी माझी दोन्ही मुले, बायको यांनी मस्त TV वर अनुभवला हा व्हिडिओ. शेवटी कोकण ते कोकण 👌🏻
    खुप खुप सुंदर आणि तुझे आभार 🙏🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏आणि सगळी family एकत्र मिळून पाहत आहात,हे वाचून खूप आनंद झाला

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar 2 года назад +4

    तुमच्या व्हिडिओचे यश या गोष्टीत सामावले आहे की आजूबाजूच्या प्रसन्न निसर्गाचे चित्रण दाखवताना तुम्ही आपले संभाषणसुद्धा प्रवाही,ओघवते व अकृत्रिम ठेवलय.माझ्यासारख्या देशावर राहणाऱ्या व्यक्तीला आता कार काढून ८-१५ दिवस कोकणात भटकंती करावेसे वाटू लागले आहे. स्थान-दर्शनाचे हे व्रत जोमाने सुरु ठेवा,महाराष्ट्राचे सौंदर्य जगाला कळू द्या. 🤩

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏

    • @lkchougule6055
      @lkchougule6055 Год назад

      नमस्कार कधीही कितीही वेळा कोकणात भ केला तरी कंटाळा हा येत नाही शक्यतो मोटरसायकल ने केलेला प्रवास खूपच रोमांचकारी अनुभव देत असतो

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar1902 2 года назад +4

    माझं माहेरचं कुलदैवत आहे हे धन्यवाद मुक्ता तुझ्यामुळे दर्शन झालं. मंदिराबाहेरचे हत्ती मूळचे जांभ्याचेच आणि कोरलेले आहेत माझ्याकडे 2000 सालचे त्यांचे ओरिजनल फोटो पण आहेत ....सर्व दर्शकांना विनंती की या ठिकाणी जा पण या प्राकृतिक सौंदर्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या म्हणजे आपला हा खजिना सांभाळला जाईल.

  • @mahadevthakur5601
    @mahadevthakur5601 2 года назад +72

    श्री देव विमलेश्वर देवळाच्या बाहेर जे हत्ती पाहीलेत ते संपूर्णपणे कोरलेले आहेत. फक्त पुढील भाग प्लास्टर केलेला आहे कारण ते व्यवस्थित टिकून राहावे म्हणून. जय देव विमलेश्वर 🙏🙏

    • @mrunmayganesh605
      @mrunmayganesh605 2 года назад +4

      बुद्ध लेणी आहेत

    • @the...devil..
      @the...devil.. 2 года назад

      @@mrunmayganesh605 absolutely correct...

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 2 года назад +9

      @@mrunmayganesh605 tumhi lok jithe jaal tithe hich comment aste...
      Jas kay buddha janama aadhi kahich navat khuthe 🙄🙄🙄
      Evdhach aahe tar afganistan la buddh murti todli tevha ka naay gele jaab vicharayla talibani na tumhi lok bhimseni 😏😏😏

    • @vikashastro
      @vikashastro 2 года назад

      Aamche Gaav

    • @spcreation4661
      @spcreation4661 2 года назад +2

      @@ketkipadvi2476 💯

  • @advaitthakur9934
    @advaitthakur9934 4 месяца назад +1

    मुकता , मी तसा उशीराच तुझे चॅनेल बघू लागलो आहे त्यामुळे हे वर्षभरापूर्वीच विडिओ आत्ता पाहतोय . अक्षरशः स्वप्नवत ठिकाण आहे हे. माझ्याकडे शब्दच नाहीत . येथे जायलाच पाहिजे मला .

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 2 года назад +14

    वाह खूप सुंदर आणि धन्यवाद, तुमच्या वर्णनाप्रमाणे झुळझुळ वाहणारी हिरव्यागार शेती (आणि त्या पलीकडे दिसणारा एका सुंदर मंदिराचा कळस) श्री.विमलेश्वर क्षेत्र आमचे ग्रामदैवत प्राचीन मंदिर, याला आपण सुचल्याप्रमाणे भेट दिलीच खूप आनंद झाला, आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे जे हत्ती आहेत माहुता बरोबर ते पूर्वी पूर्णपणे जांभ्या दगडाच्या कातळातच कोरलेले आहेत, त्यावर काही वर्षांपूर्वी सिमेंट प्लास्टर केलेले आहे, मी लहानपणी हे पूर्ण पाहिलेले आहे माझे वय आता 54 वर्षाचे आहे यावर साधारणता गेल्या शतकाच्या उत्तरार्धात यावर प्लास्टर केलेले आहे. ह्या पूर्ण अतिप्राचीन मंदिराचे स्ट्रक्चर जांभ्या दगडातच कोरलेले आहे. यावर काही वर्षांपूर्वी (काही समस्यांच्या पूर्ततेसाठी )प्लास्टरचा लेयर चढवलेला आहे. श्री. विमलेश्वर मंदिर खूप प्राचीन, निसर्गरम्य परिसरात वसलेले प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराला प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी. धन्यवाद

    • @udayagashe8360
      @udayagashe8360 2 года назад +1

      तुम्ही खूप सुंदर वर्णन केलंय.....एखादी कथा सांगावी त्याप्रमाणे. श्री देव विमलेश्वर आणि परिसराच खरं दर्शनाला अनुभव दिलात याबद्दल धन्यवाद.

    • @dineshkadam5191
      @dineshkadam5191 2 года назад

      खुपचं भाग्यवान आहात की असा गाव आपल्याला लाभला हे देवाचं देण जपण्याचि व सेवा करण्याचि संधि आपल्याला लाभलि धन्यता वाटलि,👌👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 2 года назад +6

    तुमच्या मुळे आम्हाला आमच्या कुलदैवतेच र्दशन झाले ते सुद्धा श्रावण महिन्यात खूप खूप धन्यवाद हर हर महादेव

  • @vaishalibhande6719
    @vaishalibhande6719 2 года назад +3

    Hi Mukta विमलेश्वर मंदिर हे माझ्या माहेराहून जवळ आहे मी दोन वेळाच या मंदिरात प्रवेश केला पण बाहेरून कारण गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही तूझ्यामूळे आज गाभाऱ्यातील विमलेश्वराचे दर्शन झाले खूप खूप आभार 🙏🙏🙏 मूक्ता तसेच हे मंदिर पांडवानी त्याच्या वनवासात असताना बांधले तेही एका रात्रीत पूर्ण केले अशी आख्यायिकेनुसार आम्हाला लहानपणापासून सांगितले होते

  • @PravinPuranikVlogs
    @PravinPuranikVlogs 2 года назад +2

    छान video आहे ...💐💐
    मी पण बनवतो vlog 🌺🌺

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 года назад +6

    अश्या जागा आणि मंदिरं बघितली की शांताबाई शेळके ह्यांच्या ओळी आठवतात..
    'भग्न शिवालय, परिसर निर्जन,
    पळस तरुंचे दाट पुढे बन,
    तरु वेली करितील गर्द झुला |
    जाईन विचारीत रान फुला....
    Thank you for showing us such hypnotically magical places..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      आहाsss किती सुंदर❤️❤️

    • @sujathar3826
      @sujathar3826 2 года назад

      हे गाणं ऐकलं नसेल तर जरूर ऐका.. किशोरीताई अमोणकरांचे स्वर कानात रुंजी घालत रहातात आणि शांतबाईंचे शब्द रक्तात झिरपतात..

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 года назад +1

    खूपच निसर्ग रम्य ठिकाण 👌👌👌👌

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 2 года назад +1

    मुक्ता नर्वकर .तुमची बोलन्याची शेंयली चागली आहे ..तुमी आमला मोहीक करून टाकता .. ..तुमी खुश रहा आन्नदीत राहा .तुमचे फिरन्या च टिकान चंगल दाकवता🙏तुमि हुशार अहात तुमची बोली चंगली आहे राज घर्यान्या सारकी आहे ..़(धन्यावाद) तुमि आसेच हासत रहा आमस बरे वाटते जय म्हलार🙏

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 2 года назад +14

    विमलेश्वर मंदिर पाहून खूप प्रसन्न वाटल श्रावण महिना सूरू आहे अशा छान मंदिराच महादेवा च दर्शन झाल खूप बर वाटल 🙏🏼

  • @manishaslifestylechannel9787
    @manishaslifestylechannel9787 2 года назад +2

    देवगड हे माझं माहेर चे गाव. तुम्ही ज्या पद्धतीने देवगड दाखवत आहात ते खूप कौतुकास्पद. विमलेश्र्वर मंदिर मी पाहिले आहे. नितांत सुंदर गूढरम्य परिसर आहे हा. कोणत्याही ऋतूत तो सुंदरच दिसतो. पडवणे समुद्र किनारा पण सुंदर. या गावात आमचे नातेवाईक राहतात त्यामुळे अधून मधून जाणे होते. कोकणचे निसर्गसौंदर्य दाखवण्याचे खूप छान काम तुम्ही करत आहात. खूप शुभेच्छा. माझे सासर जैतापूर. ते हि कधी दाखवाल अशी आशा करते.

  • @prafuldeshmukh3676
    @prafuldeshmukh3676 2 года назад +2

    हिरवा निसर्ग आणि झरा खरच खुप सुंदर मंदिर चा प्रसन्न परिसर

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Год назад +1

    नमस्कार मुक्ता विमलेश्वर मंदिरा जवळील दृश्य खूपच विलोभनीय आहे. सर्व मंदिरे सुंदर आहे .तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @anandgokhale3830
    @anandgokhale3830 2 года назад +3

    खूप छान आणि सुंदर असे अजून एक देऊळ, आणि कोकण. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला असे अनुभव घेता येतात आणि तुम्ही ते असे सर्वांना अगदी सहज वाटत असता. खूप आनंद मिळतो आम्हाला त्यामुळे. मी आभारी आहे तुमचा.
    असेच फिरत राहा आणि काळजी घ्या.

  • @chetankumar8392
    @chetankumar8392 11 месяцев назад

    खूपच सुंदर आहे हे मंदिर.. माझं सर्वांत आवडत मंदिर❤❤...
    एक सुचवेन तुला की जिथे कुठे मंदिरांना भेट देशील त्यावेळी तेथील संपूर्ण माहिती आणि इतिहासाची माहिती करून घेऊन व्हिडीओ मधून आम्हाला सांग म्हणजे आम्हीपण ते अनुभवू.... 👍👍

  • @jayantphadke2436
    @jayantphadke2436 2 года назад

    सुंदर सादऱीकरण ....
    ही गुम्फा बौद्ध कालीन आहे ....

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 2 года назад +2

    ओम नमः शिवाय!

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 2 года назад +5

    देवादि देवा महादेवा सुंदर मंदिर , परिसर आणि तुम्ही केलेले वर्णन . खूप आवडला व्हिडिओ.

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 2 года назад +1

    श्री गणेशाचं वास्तव आहे ...अशीच ही जागा,ह्याची स्वच्छ्ता कायम अशीच राहावी ...🙏

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 2 года назад +5

    सुंदर हिरवागार प्रवास 🌱🌴🌳🌿
    अदभुत आणि अवर्णनीय 😘
    तुझे शब्दांकन सुरेख सुरेल ☺️

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 2 года назад +1

    एकदम तिथल्या वातावरणाचा अनुभव या व्हिडीओतून मिळाला.

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 2 года назад +1

    खुप सुंदर मंदिर आहे , आणि येथील निसर्ग ही. मंदिर, त्या मागची पाण्याची कुंडे आणि बाजूला असणारे झरे आणि कुळागरं पाहताना खुप प्रसन्न वाटलं. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे येथील लक्ष्मी केशव मंदिर असेच रमणीय आहे. रत्नागिरीत फिरायला गेलात तर नक्की बघा.

  • @dnyandeowarke
    @dnyandeowarke 2 года назад

    अतिशय सुंदर, प्रसन्न वातावरण आहे.

  • @sandeepghodekar4643
    @sandeepghodekar4643 2 года назад +1

    मुक्ता तु नेहमीच सुंदर आणि साधेपणाने जे व्हिडिओ बनवतेस त्यातला हा सगळ्यात सुंदर व्हिडिओ आहे. अभिनंदन तुझे आणि रोहित दोघांचं

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk 2 года назад +5

    वाह, किती सुंदर ठिकाण आहे! मन:शांतीसाठी उत्तम ठिकाण.

  • @shardareddi7855
    @shardareddi7855 2 года назад

    खूप छान अप्रतिम सुंदर आहेत शब्दच नाहीत वर्णन करायला.

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 2 года назад +5

    अद्भुत सुंदर निसर्ग...
    तितकंच सुंदर कातळातील मंदिर...
    त्याच दर्जाची मांडणी...
    एकुणच मन प्रसन्न करणारी अनुभूती...👌🏻👌🏻👌🏻

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 Год назад

    तुझं वर्णन ऐकलं की ती वास्तू खूपच रमणीय वाटू लागते एवढं मात्र नक्की

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 2 года назад +1

    देऊळ आणि परिसर खूपच आवडला

  • @mphadkebsp
    @mphadkebsp Год назад

    हे आमचे कुलदैवत आहे thanks for sharing

  • @rameshwarkachhave2328
    @rameshwarkachhave2328 2 года назад +1

    khupch sundar. Peacefull. thank you for sharing.

  • @ganeshmahadik676
    @ganeshmahadik676 Год назад

    ताई खूप छान तुम्ही व्हिडीओ रेकॉर्ड करता ....तुला अणि दादाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप पुढे जाल ...🙏

  • @rameshtawde4331
    @rameshtawde4331 2 года назад +4

    जय श्री विमलेश्र्वर महाराज 🙏🙏

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Год назад

    खूपच सुंदर देखावा आहे झरे ,मंदिर छान आहे

  • @sanikaghadi226
    @sanikaghadi226 2 года назад +1

    माझ आजोळ आहे वाडा गाव. अतिशय सुंदर व्हिडीओ केला तुम्ही मॅडम खुप छान 👍👍👌🏻👌🏻

  • @sujataamberkar
    @sujataamberkar Год назад

    व्वा मस्तच ❤ सनातन संस्कृती चा विजय असो 🎉

  • @swaps1186
    @swaps1186 2 года назад +1

    निव्वळ अप्रतिम.. या रस्ताला जाणं झालंय पण हे मंदिर माहीत नव्हतं.. बाकी व्हिडियो तुझ्या सारखा एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लीत... खूप खूप धन्यवाद

  • @dhanrajdabhade7758
    @dhanrajdabhade7758 2 года назад

    खूप छान निसर्ग सौंदर्य आहे

  • @pranali2510
    @pranali2510 2 года назад +10

    I am also from Kokan . It has natural beauty. I feel Proud to be a part of it, Kokan is a Paradise for us. Thank you for sharing this video, awaiting for further more.

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 3 месяца назад

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य... thanks to explore unknown konkan ..

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 2 года назад +1

    Kay sunder dekhava aahe.... Dhantawad.

  • @ManasiPandharkar-rw2fh
    @ManasiPandharkar-rw2fh 10 месяцев назад

    तुमचे videos फारच सुंदर आहेत

  • @Shubhangi.ughade5150
    @Shubhangi.ughade5150 9 месяцев назад +1

    Khup chan tai

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 2 года назад

    खुप सुंदर शांत निसर्ग तेवढं च तुझे सुंदर शांत सादरीकरण. 👌👌👍👍

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 года назад +1

    खूप सुंदर, निसर्ग रम्य परिसर, श्री विमलेश्वर🙏🙏🙏

  • @vaibhavn4336
    @vaibhavn4336 2 года назад +1

    जय देव विमलेश्वर......

  • @ketanpandit8404
    @ketanpandit8404 2 года назад +1

    Me tuze video as a mental treatment mhanun recommend karayla suruvat keliye,maze je students depression madhe,abhyasachya pressure madhe astil tyanna tuze video dakhavto Ani khup fayda hotoy tyanna, medicine mhanun kam kartay tuze video.great work Mukta and Rohit.

  • @shantinandkulkarni364
    @shantinandkulkarni364 2 года назад

    खूपच सुंदर आहे व्हिडिओ🎥

  • @shwetagodbole7501
    @shwetagodbole7501 11 месяцев назад

    किती सुंदर आहे हे श्री विमलेश्वर मंदिर, शांत आणि ध्यान लागेल अस. बघूनच अस वाटत आहे की तिथे आहोत
    Thanks मुक्ता ताई हे दाखवल्याबद्दल

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 2 года назад +3

    निसर्ग सौंदर्याने भरलेल्या इतक्या सुंदर स्थळाची आणि मंदिराची आळख करून देण्याबद्दल खुप धन्यवाद. आम्ही तुमच्याबरोबरच तिथे आहोत असे वाटत होते. खुप छान व्हिडीओ झालाय.🙏

    • @nilimabawkar9035
      @nilimabawkar9035 2 года назад

      खूपच सुंदर निसर्ग रम्य परिसर
      Thank you so much

  • @ghanashyam2049
    @ghanashyam2049 2 года назад

    खुपचं छान व्हिडीओ झाला आहे ताई

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 2 года назад

    खरच खूप सुंदर व्हिडिओ .

  • @shashikantparab9429
    @shashikantparab9429 Год назад

    मुक्ता विमलेश्वर मंदिर आणि सभोवरचा परिसर खूप सुंदर,गोड मराठी भाषा आणि वर्णन ,धन्यवाद.

  • @surajmagar3174
    @surajmagar3174 Год назад

    अप्रतिम निस्गसौंदर्य ❤❤

  • @akshaymohite9058
    @akshaymohite9058 2 года назад +1

    Khupach bhari vatal
    Man shant zala tai
    ❤️

  • @sandhyadeshmukh2361
    @sandhyadeshmukh2361 2 года назад

    Atishay sunder👌

  • @bharatpatil860
    @bharatpatil860 2 года назад

    ।। ओम नमः शिवाय ।।
    ।। हर हर महादेव ।।

  • @rajendrapatankar9591
    @rajendrapatankar9591 2 года назад +5

    🙏 आमच्या ग्रामदैवताची खूप छान माहिती सांगितली 👍 चित्रिकरण पण सुंदर..धन्यवाद 🌹🌹

  • @rupeshgharkar1428
    @rupeshgharkar1428 2 года назад +1

    आमचा कोकण असाच सुंदर जणू स्वर्गसुख

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 2 года назад

    खुप शांत आणि नयनरम्य परिसर आहे.. 👌

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 Год назад

    khup chann ahe mandir ani parisar tithla 🎉👍👌thanks!

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 2 года назад

    मी पाहिलंय मंदिर. अतिशय सुंदर ठिकाण.

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 4 месяца назад

    मुक्ता तुझे फार आभार

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 года назад

    श्री.देव विमलेश्वराचे मंदिर व परीसर लयभारी आहे.निसर्ग रम्य आहे त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @gouriingawale7656
    @gouriingawale7656 2 года назад +4

    खुपच सुंदर.....मन शांत करून गेलेला अनुभव........😊😊😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      धन्यवाद 😊🙏

    • @ramshinde8263
      @ramshinde8263 2 года назад

      @@MuktaNarvekar
      कोकणातील गणपती वर एखादा व्हिडिओ तयार करून पाठवा

  • @VipsCollection
    @VipsCollection 2 года назад

    सुंदर आणि रमणीय तीर्थ

  • @avinashpawar9927
    @avinashpawar9927 Год назад

    फार छान वाटलं !!!
    तुम्हां दोघांनाही खुप खुप शुभेच्छा.
    असेच एकत्र छान छान ठिकाणी फिरत रहा
    आणि
    तुमच्या माध्यमातून आम्हांला ते बघण्याचा आणि तिथे जाण्याची संधी मिळावी !!!!

  • @brujendrasontakey3389
    @brujendrasontakey3389 2 года назад

    खुप छान माहीती दीली धन्यवाद

  • @poojahatkar6133
    @poojahatkar6133 2 года назад +1

    फारच सुंदर परिसर..खूप छान विडिओ..

  • @prabhavatiauti4415
    @prabhavatiauti4415 Год назад

    Muktai Man Prasanna Karanare Manamohak VideoAhet Sarva.👍👌🌹

  • @mugdhaarekar4106
    @mugdhaarekar4106 2 года назад

    Nisarga apratim 👍🙏 nice video

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 2 года назад

    तुझं शांत सरळ बोलणं मनाला खूप भावतं. अतिशय सुंदर vlog केलास. नेहमी प्रमाणे.

  • @savitamali16
    @savitamali16 2 года назад

    Khup ch sunder ahe

  • @rudrajyotb188
    @rudrajyotb188 Год назад

    Apratim devine place...

  • @rupeshkhedekar
    @rupeshkhedekar 2 года назад

    Khup chan.. Sundar👍👍

  • @deepalibelhekar2572
    @deepalibelhekar2572 2 года назад

    Khup Sundar ahe parisar

  • @kshri1
    @kshri1 2 года назад

    Khooooopch sundar 👌👌👌👌

  • @mamatachauhanchowan4468
    @mamatachauhanchowan4468 2 года назад

    Khup Sundar....vedio baghatana Chafyach ful pavasat baghatana ji anubhuti yete tashi ali

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 9 месяцев назад

    Nice information nice shering nice location ❤

  • @shubh_kadam__
    @shubh_kadam__ 2 года назад +4

    YOU ARE THE BEST MARATHI TRAVEL VLOGER 💯👍🏻❤️

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 года назад +1

    विमल वाले ईश्वर - विमलेश्वर🤔
    हर हर महादेव 🙏

  • @shridhartamhankar6341
    @shridhartamhankar6341 2 года назад

    अप्रतिम निसर्ग

  • @arunasurve2256
    @arunasurve2256 2 года назад

    मी पाहिलेला हा तुझा पहिला विडिओ आणि तो इतका आवडला की मी तुझी subscriber झालेय. असेच तुझे विडिओ छान, छान असू देत. बेस्ट ऑफ लक. 👍🏻👍🏻💐💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      धन्यवाद 😊🙏
      खूप छान वाटलं कमेंट वाचून. Yes!! अजून छान छान व्हिडिओ लवकरच शेअर करेन. 😃

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 2 года назад +3

    अप्रतिम सादरीकरण..........अशाच काहीश्या अपरिचित प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती देत चला. निश्चितच अशा नितांत सुंदर मंदिराला भेट द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.~ एक सांगलीकर

  • @prakashbhandari2840
    @prakashbhandari2840 2 года назад

    Khup khup cchan

  • @omkarkhollam
    @omkarkhollam 2 года назад +1

    khupch shant ani green jaga ahe khup peaceful vatl pahun ha vlog .... it was mesemerizing 🍃🍃

  • @JG-tu3ml
    @JG-tu3ml 2 года назад

    Mukta, ani tiche sahakari ...khup sundar video kela ahe. Sagle clearly kalale. thanks a lot!

  • @vrdl2842
    @vrdl2842 2 года назад

    Khup chan thikan .. ani tyahunhi chan explain kela.. with detail vedio 👍

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 года назад

    Man khush jhaala he thikaan baghun.chyaan vlog.

  • @rameshghadi6326
    @rameshghadi6326 2 года назад

    👍खुपच सुंदर मंदिर,मी माझ्या भाचीच्या लग्नाला नाडण गावी गेलेलो,तेव्हा पाहिल होत अंदाजे१५ वषाऀ पूर्वी

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 11 месяцев назад

    Bharpur phira , nisarg japa 👌👌

  • @shreyapatil2567
    @shreyapatil2567 2 года назад

    खूप खूप सुंदर,शांत,निर्मळ,निवांत मंदिर आहे.कधीच पाहिले नव्हते असे मंदिर

  • @sakshipatil4409
    @sakshipatil4409 2 года назад

    फार सुंदर मंदिर आहे. आम्ही लहानपणा पासून ह्या मंदिराची सुंदरता पाहत आहोत.
    विमलेश्वर महाराज की जय 🙏🙏🙏🙏

    • @sakshipatil4409
      @sakshipatil4409 2 года назад

      आमचं घर मंदिराच्या बाजूच्या वाडीत आहे. नमसवाडी, तावडे.

  • @saylibait9357
    @saylibait9357 2 года назад

    Khup सुंदर