गावातील 125 वर्षे जुन्या घरात राहिले | निसर्ग भटकंती | Heritage Homestay | Kokan Beach Homestay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Villa Mangoes and Seashells चे Contact Details
    +91 9518709234
    +91 94031 88915
    www.instagram....
    maps.app.goo.g...
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicso...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Комментарии • 793

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Месяц назад +73

    Villa Mangoes and Seashells चे Contact Details
    +91 9518709234
    +91 94031 88915
    instagram.com/mangoesandseashells?igsh=MXI1YTVncXBuMWJ6cQ==
    maps.app.goo.gl/oR6xj2YFJLXdLdvK6

    • @whatthehell3651
      @whatthehell3651 Месяц назад +1

      @@MuktaNarvekar thankyou ga amhi tu dakhvlelya baryach thikani jaun alo
      tyzyamule khup chan thikana pratyaksha pahili

    • @krutikamadhavi796
      @krutikamadhavi796 Месяц назад +2

      मुक्ता तुझे सगळे व्हिडिओ मी पाहते खूप छान असतात.माझ्या मुलाला तुझे व्हिडीओ खूप आवडतात.आमच्याकडे पण नक्की ये पालघरला

    • @meghnamulye7973
      @meghnamulye7973 Месяц назад

      Dhanyawad nakki jau

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 Месяц назад +1

      मुक्ता आता श्रावण महिना येणार आहे ,तेव्हा तळ कोकणातील निसर्ग रम्य परिसर मधली शिव मंदीर विडियो बनव.

    • @mangeshmhatre1915
      @mangeshmhatre1915 Месяц назад

      द्रोण चे चित्रीकरण खूप छान केले आहे मुक्ता ताई

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Месяц назад +32

    कोकणची खरी ओळख ती की तू च मुक्ता देऊ शकतेस.. खऱ्या अर्थाने कोकण कळते. सोप्या पद्धतीने ते तू सांगतेस.. तुझी सांगण्याची पध्दत खूपच भावते.. डॉक्युमेंटरी प्रमाणे..

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 Месяц назад +16

    सध्या कोकणातल्या (ठराविक सोडले तर) सो कॉल्ड कोकण दाखवण्याचा उत आलेला दिसतो. पण तुझ्या नजरेतून आणि कॅमेऱ्यातून खरं कोकण दिसत. आणि तुझ कोकण प्रेम यामुळे ते अधिकच खुलत. बाकी पावसाळ्यातील कोकण आणि कोकणातली देवळा भाव खाऊन जातात. घर खूपच छान

  • @prashantsawant6750
    @prashantsawant6750 Месяц назад +115

    आमचं घर पण 150 वर्षाचं जुण आहे उन्हाळ्यात, पावसाळ्यात , हिवाळ्यात , खूप छान वाटत असते . आज काल सर्वांना बंगला हवा असतो हे फक्त दिसायला खूप युनिक असत पण खर तर जुन्या वास्तू आणि जणू काय वातावरणाशी निगडित अशी घर असतात आणि हे सर्व कोकणातच पाहायला मिळतात. आणि तू सर्वांना दाखवून देत असतेस म्हणून मी तुझे व्हिडिओ पाहत असतो ❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +18

      धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼 मलाही जुनी घरे आवडतात.

    • @neelamdevkar951
      @neelamdevkar951 Месяц назад +10

      माझ्या वडिलांचे घर सुध्दा मातीचे होते मला खुप छान वाटायचे गावी राहण्याची मजा मी अनुभवायची, पण आता ते develope केल त्यात ती मजा नाही

    • @arvindrane7569
      @arvindrane7569 Месяц назад +6

      घर, गाव आणि समुद्र परीसर नयनरम्य.

    • @pradeepbhoir5388
      @pradeepbhoir5388 Месяц назад +1

      Thanks खूप छान व्हिडीओ आहे ​@@MuktaNarvekar

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Месяц назад +1

      माझे गाव रोहे तालुक्यातील चणेरे हे असुन तिथे आमचे दुमजली घर आहे सर्व लाकूडकाम हे सर्व सागवान आहे. तिथे एक भाग इतका थंड आहे की ए. सी. ची गरज नसते. त्या घरावर एक कौल आहे त्यावर लिहिले आहे.
      1982 Made in France. म्हणजे आपला व्यापार संबंध हे सुमारे दिडशे वर्षा पेक्षा जास्त काळ होता याचा हा पुरावा आहे.

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 Месяц назад +17

    काय वर्णन करावे नाही कळत..
    सुरेख निवेदन सुरेख चित्रीकरण सुरेख निसर्ग सुरेख संगीत... निव्वळ अप्रतिम ❤

  • @sweetpearl99
    @sweetpearl99 Месяц назад +25

    आमचे गणेश गुळे असेच सुंदर राहो आणि plastic carry करून निसर्गात फेकणारा अश्या फिरणाऱ्या पर्यटकांकडून नेहमी दुर राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏

  • @bharatikamat5388
    @bharatikamat5388 Месяц назад +13

    घरबसल्या नेत्रसुखद पर्यटन अनुभव! अप्रतिम फोटो ग्राफी.सुरेख वर्णन 👌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Месяц назад +28

    वा बाळा तू कोकणातील गाव अप्रतिम आहे हिरव्यागार चादरीमध्ये आच्छादलेले हे छोटे से गणपती गुळे गाव बघूनच डोळे दिपले घरातील ठेवणी कलाकृती बघून खुप छान मस्त वाटले व बाजूला असलेला समुद्र किनारा अप्रतिम एक नंबर आहे गाव व आजूबाजूला असलेली देवस्थान व माडाची व आंब्याची झाडे बघून खुप आवडले व तुझे लाघवी सुंदर बोलून सादरीकरण करणे खुप आवडला खुप सुरेख वर्णन केले आहे गावाचे गाव वखाण्यासारखे आहे व तुझ्या बरोबर असणारे काकांनी खुप छान पैकी माहिती पुरवली एक नंबर विडिओ खुप खुप आवडला बाळा मला अशीच कोकणातील सुंदर गावे व तिकडची पारंपरिक शेती व संस्कृती निसर्ग सौंदर्य व तिकडची प्रेमळ मेहनती कष्टाळू प्रामाणिक माणसे या सर्वांची ओळख करून दे तुझी अशीच प्रगती होऊ दे व भरपूर यश लाभू दे हीच देवाकडे प्रार्थना माझे अनेक आशीर्वाद बाळा देव बरे करो👌👌❤❤🤚🤚👍👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Месяц назад +37

    मुक्ता मस्तच कोकण पर्यटनाला न्याय देणाऱ्या पैकी तू एक गणेश गुळे बघीतलय पण प्रत्येक वेळी थंडीत किंवा उन्हाळ्यात लक्ष्मीनारायण मंदिर अप्रतिम गणपती मंदिराच्या समोरील बाजूस एक पायऱ्या पायऱ्यांची पांडव कालीन म्हणतात विहीर छान आहे लाकडी परातीला काटवट असे बहुदा म्हणतात धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +2

      हो. काटवट म्हणतात... 😃

    • @suhaslande1369
      @suhaslande1369 Месяц назад +1

      @@MuktaNarvekar नेहमीच विसरलो चहा अगदी मस्त ठिकाणी

    • @naikpadmakar
      @naikpadmakar 28 дней назад

      @@suhaslande1369
      😢
      TF C uh hi by hi 2:21 der Stadt
      Uh ggf. by gf ft

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Месяц назад +20

    कोकणातील अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि अप्रतिम ड्रोन शॉट्स मुळे भातशेती जणुकाही वरुन कोणीतरी रांगोळी काढली आहे असे वाटते त्यामुळे विडिओ खूपच सुंदर बनला आहे धन्यवाद

  • @swapnilpacharne
    @swapnilpacharne Месяц назад +19

    खूप छान क्षेत्रात कार्यरत आहात तुम्ही..
    प्रत्येक भागाचे चित्रीकरण आणि सादरीकरण करताना जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करता आपणं हे कौतुकास्पद आहे..
    अनेक शुभेच्छा 😊🙏

  • @amarchougule4341
    @amarchougule4341 Месяц назад +7

    धरती वरचा स्वर्ग दाखवलास बाळा. खूप छान. खूप खूप धन्यवाद.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 25 дней назад +1

    मुक्ताताई तुमचे व्हिडिओ पाहीले ना मन प्रसन्न होत एकदम रिलॅक्स फिल होत कामातुन आलेला थकवा नाहीसा होतो अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम बॅगराऊड म्युझिक मस्त खूप छान असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पहायला मिळोत..,............. कोल्हापूर जि इचलकरंजी मनापासून धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Месяц назад +5

    मुक्ता...मुक्त वातावरण मुक्तपणे विहंगम दृश्य टिपणारा तुझा कॅमेरा मुक्तपणे संचार करणारे पक्षी, आणि तुला वाढलेले मांसाहारी जेवण, व Super Super delux हॉटेल पेक्षा सुंदर असलेले मोठे घर, अप्रतिम....आणि तुझं ATTITUDE...

  • @rohitbansude6147
    @rohitbansude6147 Месяц назад +7

    तुमचा आवाज आणि अप्रतिम शब्दांची पेरणी व्हिडिओ पाहताना अस वाटत की आपण स्वतः तिथे उपस्थित आहेत , खूप मस्त अनुभव 🎉

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Месяц назад +5

    0:09 मस्तच छटा टिपल्या, thanks रोहित भाऊ..मुक्ता छान संवाद ❤

  • @shreyakorgaonkar1587
    @shreyakorgaonkar1587 Месяц назад +1

    "समुद्राचा स्वभाव" किती साधं पण सुंदर वर्णन. मुक्ता खरंच तू खूप छान आणि सोप्या भाषेत निसर्गाचं वर्णन करून सांगतेस. मनाला खूप भावते. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Месяц назад +10

    निसर्ग आणि कोकण कधीच निराश करत नाही. भारी व्हिडिओ 😍❤️

  • @RajendraPurohit-nr4hm
    @RajendraPurohit-nr4hm Месяц назад +35

    मी पुर्ण शाकाहारी आहे. तेवढं सोडलं तर इतर सर्व काही अप्रतिम सुंदर, नयनरम्य मनोहर.

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Месяц назад +6

    खुप छान असा व्हिडिओ तयार केला तुम्ही जुने ते सोने म्हणतात ना घर जुने जरी असले तरी खुप सुंदर आहे. गाव छान आहे.ड्रोन शॉट खूपच अप्रतिम होते त्यात आपल्या शेतकरी बळी राजाचे शेती करताना खूपच छान ड्रोन शॉट होता. छान मंदिर, समुद्र किनारा, बीच पाहण्यासाठी मिळाला. 👌👍

  • @sunilmali6708
    @sunilmali6708 Месяц назад +5

    फार उपकार आहेत मुक्ता ताई तुझे तुम्हा दोघां मुळे आम्हाला हे पाहायला मिळते 🙏🏻

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Месяц назад +8

    मुक्ता तुझ्या मुळे बरीच कोकण दर्षण घडतच असते पण मेधा धडे यांचे 125 वर्षाचे घर अप्रतीम.

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 6 дней назад

    "गाज"समुद्राची ..एक विलक्षण अनुभव...आमच बालपण अशाच समुद्र काठी गेलय.. आता खूप miss करतो ते सगळं. सुखसुविधां चा अभाव होता शहराशी तुलनेत पण निसर्गाच्या सान्निध्यातल हे जगण म्हणजे खरी श्रीमंती.. धन्यवाद मुक्ता...तू आणि स्वानंदी आणि बरेचसे युट्यूबवर खेड्यापाड्यातल थोडस आधुनिकीकरण होत असलेल गावपण वर्णन करता,दाखवता त्याला तोड नाही ❤

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 Месяц назад +5

    मुक्ता तुला माझ्याकडुन खूप खूप आभार. तुझे व्हिडिओ खूप छान आहेत. आता तू गणपती गुळे दाखविले. मस्तच सुंदर आहेत.Thank you. खूप खूप आशीर्वाद ❤

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Месяц назад +17

    हा व्लॉग म्हणजे एक नितांतसुंदर अनुभव आहे... नेहमी प्रमाणेच अप्रतिम निवेदन, अद्भुत सुंदर सिनेमॅटोग्राफी 👍

  • @anjalidahitankar2757
    @anjalidahitankar2757 Месяц назад +5

    खूप सुंदर vlog ,गणेशगुळे चा नयनरम्य सुंदर निसर्ग ,घर खूपच classic आहे,जुन्या घरात खूप positive ,serene vibes मिळतात❤

  • @vaibhavadhe2397
    @vaibhavadhe2397 Месяц назад +4

    स्वर्ग खरंच स्वर्ग, शब्द पण अपुरे पडतील एवढं वैभवसंपन्न, संस्कृती संपन्न नैसर्गिक सुंदरतेने नटलेले आहे कोकण , ताई असेच video बनवत जा 🙏🙏🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼

  • @SPL1785
    @SPL1785 Месяц назад

    अप्रतिम , RUclipsवर पाहिलेल्या असंख्य व्हीडीओ तील एक उत्कृष्ट आणि मनाला प्रसन्न करणारा व्हीडीओ

  • @alammulla
    @alammulla Месяц назад +1

    खूप छान मुक्ता अतिशय सुंदर गणपती गुळे या गावचे ग्रामदैवत सुंदर माहिती दिलीय धन्यवाद कोकण म्हणजे महाराष्ट्र स्वर्ग आहे .

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Месяц назад +2

    धन्यवाद मुक्ता खूप छान कोकण दाखवतेस मधून मधून टिपलेले ड्रेॊनचे शुटिंग एकदम निसर्ग रम्य जसे स्वर्गात आल्या सारखे वाटते तु खूप भाग्यवान आहेस तुला हे सर्व अनुभवता येते ❤❤ जय महाराष्ट्र

  • @dinkarbhandekar5122
    @dinkarbhandekar5122 Месяц назад +5

    कोंकण किती अप्रतिम आणि निसर्गरम्य आहे..... ❤ खरंच खूपच सुंदर आहे ❤

  • @vidyajoshi542
    @vidyajoshi542 Месяц назад +6

    खूप सुंदर video... कान, डोळे आणि मन तृप्त झाले.... मुक्ता तुझ्यामुळे हे निसर्ग वैभव बघता आले.... आता अनुभवायला नक्की जाऊ.....drone चे शूटिंग अप्रतिमच.....

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 Месяц назад +1

    मन प्रसन्न करणारी वातावरण तुमच्या मुळे आम्हला बघण्यास मिळाले व घराला काचेचे छत आसलेले आवडते त्यात पाऊस आसलयावर खूप छान आपले धन्यवाद!

  • @SubodhApte
    @SubodhApte Месяц назад +2

    सगळया गोष्टी फारच सुरेख. घर, निसर्ग, समुद्र, जेवण, तुमचे vlogging. डोंगरावरून दिसणारे जंगल तर फारच अप्रतिम.
    खूपच छान.
    🎉🎉

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 Месяц назад +12

    This is the difference between Maharashtra Tourism and Kerala Tourism departments.
    Konkan has everything that can prosper the entire Maharashtra treasury from its tourism. The way kerela has done it with its "Gods Own Country" Campaign.

  • @KundaDhore-n8j
    @KundaDhore-n8j Месяц назад +5

    हिच खरी श्रीमंती. अप्रतिम घर आणि सुंदर सादरीकरण ❤

  • @kishorrajadhyaksha5923
    @kishorrajadhyaksha5923 Месяц назад +1

    आपण सर्वांनी खूप सारे हा शब्द टाळायला पाहीजे, हा हिंदीतून आपण घेतला आहे. आपल्या मराठीत पुष्कळ, भरपूर, फार असे अनेक शब्द आहेत.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      अगदीच. मी लक्षात ठेवेन 😊🙏🏼

  • @amhifiraste
    @amhifiraste Месяц назад +15

    खूपच सुंदर! तुम्ही हा व्हिडिओ अप्रतिमरीत्या साकारला आहे. कोकणातल्या पावसाळ्याचा, शेतातल्या भाताची लागवड, समुद्रकिनाऱ्याचा आणि तिथे घेतलेल्या हाय टीचा आनंद घेताना, मनात येणारं समाधान आणि आनंद तुमच्या व्हिडिओतून अनुभवायला मिळाला.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼

  • @shamaljagtap8399
    @shamaljagtap8399 Месяц назад +4

    खुप सुंदर गाव आणि १२५ वर्षे जुना वाडा खुप छान.मी आजचं कोळंबीचे लोणचं बनवलं आहे.

  • @bapujoshi
    @bapujoshi Месяц назад +3

    उत्तमच. कोकण एक छान पर्यटन स्थळ आहे.
    परंपरा, संस्कृती, घरं जिथे जातात जपली |
    तीच वाटतात मनापासून आपली ||

  • @kishorsonar8766
    @kishorsonar8766 Месяц назад +3

    मुक्ता ताई तुझे ब्लॉक खुपच सुंदर आहेत.अस वाटतय कि मीच स्वतः त्या ठिकाणी
    फिरतोय. अप्रतिम. खास करून गणेशगुळे. 👌

  • @RajendraPawar-g8z
    @RajendraPawar-g8z Месяц назад +2

    मी आपले व्हिडिओ पहात असतो.असे वाटते की आपण साक्षात कोकणात भटकत आहोत.सादरीकरण खूपच छान आहे.असेच पुढे जात रहा.

  • @pravinhujare8782
    @pravinhujare8782 Месяц назад +1

    मुक्ता तुझं खूप धन्यवाद.
    तुझ्या मुळे खरं कोकण बघायला मिळाले.
    मेधा मॅडम चे सुद्धा अभिनंदन

  • @omkarkulkarni529
    @omkarkulkarni529 Месяц назад +6

    हा विडिओ बघणं म्हणजे मेडिटेटेशन होत माझ्यासाठी !! पार्श्वसंगीत फार विचारपूर्वक निवडल्याबद्दल विशेष कौतुक !!

  • @santoshnevpurkar6543
    @santoshnevpurkar6543 Месяц назад +5

    खुप सुंदर गाव, शेती, वाडा, निवेदन व फोटोग्राफी 🎉🎉

  • @ravindrapawar7228
    @ravindrapawar7228 Месяц назад +1

    काय व्हिडिओ बनवलाय मुक्ता. कसली कसली तारीफ करु. निसर्ग, घर, गाव, निवेदन, चीत्रांकान सगळंच अगदी अप्रतिम आहे. मी असे निसर्गाचे व्हिडिओज बघत असतो पण असा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओज साठी अनेक शुभेच्छा

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Месяц назад +5

    संभाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोधार केला तर ! बरे वाटले ऐकुन !

  • @Whatis2022
    @Whatis2022 Месяц назад +1

    अप्रतिम !!!… निव्वळ प्रवास वर्णन नाही तर अतिशय सुंदर कलाकृती !!.

  • @arunparab7045
    @arunparab7045 Месяц назад +4

    खूपच सुंदर गणेशगुळे आणि मंदिर परिसर. फारच सुंदर घर मस्तच

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 Месяц назад +10

    कवितेच्या गावात...
    कवितेच्या गावात झुळझुळ वाहणारी नदी आहे, श्री दत्तगुरूंचे देऊळ आहे आणि संध्याकाळी त्या परिसरात थांबून एकत्र मिळून गप्पा करणारी मंडळी आहे...
    कवितेच्या गावात वाऱ्याने पानांची सळसळ आहे, लाल मातीचा सुगंध आहे आणि विविधरंगी सुंदर फुलांचा छंद आहे...
    कवितेच्या गावात किर्तनाचा गोडवा आहे, सुरांचा मारवा आहे आणि सण गुढीपाडवा आहे...
    कवितेच्या गावात शांतता आहे, शब्दांची गोडी आहे, समुद्रामध्ये होडी आहे आणि माणसं थोडी भोळी आहे...
    कवी निरज
    26 July 2024

  • @nikhiljoshi2456
    @nikhiljoshi2456 Месяц назад +9

    This is one of best videos of yours. हा स्वर्गच आहे.

  • @vishvasparashar9545
    @vishvasparashar9545 Месяц назад

    कोकणातील एक सर्वसाधारण गाव, तेथील एक फार जुने प्रशस्थ घर. एक दोन देऊळ ने मी प्रमाणे.
    पण, या सगळ्याला आपले सुटसुटीत व आकर्षक निवेदन आणि उत्तम छायाचित्रण , यामुळे व्हिडिओ खूपच आकर्षक, श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाला आहे. हे गाव वक्ते घर जावून बघायची इच्छा होणे स्वाभाविकच.

  • @Donald-nk2os
    @Donald-nk2os Месяц назад +11

    अश्याप्रकारचा वातावरण जेव्हा पाहतो तेव्हा खूप चांगले वाटते ❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      😊😊😊 प्रसन्न वाटतं.

    • @Donald-nk2os
      @Donald-nk2os 25 дней назад

      @@MuktaNarvekar खरं आहे

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 Месяц назад +6

    मुक्ता ताई गणेशगुळे हे माझे वडीलांकडचे गाव
    गाव टुमदार आणि छान आहे
    आज तू आमच्या गावाला भेट दिल्याने खूप आनंद झाला, हल्ली माझे जाणे होत नाही काही वर्षापासून
    पूर्वी गेलो की समुद्रावर आणि प्राचीन मंदिरात मी तासनतास पडलेला असायचो
    बाकी तुझ्या मार्मिक संवादाला, अचूक चित्रीकरणाला तोड नाही
    आज परत मला तुझ्या कृपेने कोकणातल्या निसर्गाचा ऑक्सिजन मिळाला
    धन्यवाद 🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼

  • @vijaychavan3172
    @vijaychavan3172 Месяц назад +6

    कोकणातील प्रत्येक गाव पाहण्यासारखे आहे पावसाळ्यात कोकणात स्वर्ग अवतरत

    • @jayshreeyadav7765
      @jayshreeyadav7765 Месяц назад

      तिथे आसपास राहण्याची सोय आहे का,असेल तर माहिती कळवा

  • @pracheepatil1231
    @pracheepatil1231 Месяц назад +3

    कसलं सुंदर घर आहे.. प्रेमात पडले मी तर या घराच्या...!!!

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 Месяц назад +7

    मुक्ता, मी तुमचे व्हिडिओ अपूर्ण बंद करू शकत नाही. ही तुमची विश्वासार्हता आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      धन्यवाद 😊🙏🏼 It means alot ❤️❤️

  • @santoshmhatre3196
    @santoshmhatre3196 Месяц назад +1

    खूपच छान vlog. सादरीकरण छायाचित्रण निवेदन सारे काही उत्कृष्ट

  • @satishpradhan9524
    @satishpradhan9524 Месяц назад +1

    अत्यंत सुंदर गणेशगुले.निसर्गाने कोंकणाला बहाल केलेला एक अनमोल नजराणा.नोकरीच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आठ वर्षे होतो पण गणेशगुलेला जाण्याचा योग आला नव्हता.आता तुमच्यामुळे कोकणातील या सुवर्णभूमीचे दर्शन झाले.आपले सादरीकरण अत्यंत सुंदर आहे.

  • @jayashreebhalerao-od2ml
    @jayashreebhalerao-od2ml Месяц назад +4

    खुपचं सुंदर ❤आजचा vlog कमाल... होता ❤🥰😍👌🙏

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Месяц назад +3

    मुक्ता तुझे व्हिडिओ अगदी वाट पहात असते मी कधी पहायला मिळतात असं होतं.एकेक व्हिडिओ सुंदर मेजवानीच असतात.इतकं सुंदर सादरीकरण असते की तिथे तुमच्या बरोबर आपण आहोत असं वाटतं.तो निसर्ग,ते दिडशे वर्षापूर्वीच आता पुन्हा जुनेपण जपत नुतनीकरण केलेलं माडीच्या आज्जीचं घर(हा वारसा जपणाऱ्या मेधा धाडेही ग्रेट!) आणि ती भातशेती,मंदिरं,वहाळ,समुद्र किनारा....
    वाह!मस्तच!
    असेच तुझे छान व्हिडिओ येत राहोत आणि आम्हाला तिथे घेऊन जावोत!धन्यवाद मुक्ता आणि रोहित!

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +4

    खूप सुंदर घर आहे. छान जूना ठेवा परंपरा जपलं आहे. ताई तूला हे घर दाखवण्यासाठी धन्यवाद 👌🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Месяц назад +6

    मुक्ता,किती सुंदर आजचा व्हिडिओ.
    निसर्ग रत्नांची खाण म्हणजे रत्नागिरी चे गणेशगुळे. सुरुवातीला दाखवलेले,पावसाचे गाणे ऐकत तुला आलेली जाग,वरच्या काचेरी कौलतून दिसणारे पावसाचे थेंब,खूपच छान.
    सुरूच्या बनातून तू फेसाळ त्या सागराकडे जाताना मला माझा गाव कारवार आठवला. असच सुरूच्या बनातून तिथेही सागर दिसतो. खरंच, देवळांच जपलेलं जूनेपण फारसं बघायला मिळत नाही,तुझ्या आजच्या व्हिडिओ मधून इतका आनंद दिलास,की व्हिडिओ संपल्यावर गोडी अपूर्णतेची जाणवत होती.
    लवकरच,अशा सुंदर निसर्ग खणी व्हिडिओ ची वाट पाहत आहे.❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      धन्यवाद 😊😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sachinkulkarni2501
    @sachinkulkarni2501 Месяц назад +2

    मी बऱ्याच वेळा पावसला जातो त्यावेळी गणेशगुळेला गेलेलो पण त्याठिकाणी फक्त गणपती मंदीरात जायचो.तेथील शांतता मनाला खूप भावते. पण गणेशगुळे गावात जाण्याचा योग कधी आला नाही. तुझा हा ब्लॉग पाहून पुढच्या वेळी नक्की जाईन. वर्णन व निसर्ग सौन्दर्य अप्रितिम. शुभेच्छा💐💐

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 Месяц назад +6

    रत्नागिरी झिल्ल्यातले एक अतिशय सुंदर गाव❤

  • @pradeepjadhav1123
    @pradeepjadhav1123 26 дней назад

    मुक्ता ताई खूपच छान अप्रतिम कोकण., गणेश गुळे दर्शन दाखविले खूप छान वाटले निसर्गाचा आनंद मिळाला ,अभिनंदन मुक्ता ताई धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @DEEPAKYADAV-nh2wt
    @DEEPAKYADAV-nh2wt Месяц назад +1

    कोकण दर्शन … खुप सुंदर घडते … तुमच्या चित्रफीतीतून.. खुप धन्यवाद🙏

  • @aanand2017
    @aanand2017 26 дней назад

    अप्रतिम छायाचित्रण! सुंदर लेखन, अप्रतिम व्हिडिओ शूटिंग! घर म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर!
    धन्यवाद मुक्ता! एका वेगळ्याच जगात घेऊन गेलीस आम्हा सर्वांना. तुझ्या कष्टाला अभिवादन!

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 Месяц назад +1

    छान माहिती देतेस कोकणाची ,कोकण संस्कृती व निसर्ग खरच खुप सुंदर आहे.

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 Месяц назад

    मुक्ता तुझ्या मुळे कोकणातील सौंदर्य बघण्यास मिळते.धन्यवाद.

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Месяц назад +2

    सुंदर.हे सगळं वैभव जपणं खुप २ आवश्यक आहे

  • @pratiksha...8004
    @pratiksha...8004 Месяц назад +5

    प्रत्येक ऋतूमध्ये इथे वेगळा अनुभव घेता येईल अशीच जागा आहे 🎭🥰

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      हो.. उन्हाळयात आंबे खायची मौज करता येते, हिवाळ्यात समुद्रकिनाऱ्याची

  • @samkarni
    @samkarni Месяц назад +1

    खूप सुंदर video....सुरेख चित्रिकरण....पावसाळ्यातील कोकणचा अप्रतिम नजारा दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @maheshshitap5300
    @maheshshitap5300 Месяц назад +2

    कोकण स्वर्ग म्हणजे ,आज तुमचा हा व्हिडिओ बघुन स्वर्ग सोडून पैशाची कमतरता म्हणा किंवा काही म्हणा शहरात येऊन नरकात आल्याची भावना पुन्हा एकदा जागी झाली.
    असेच सुंदर व्हिडिओ आमच्या भेटीस येत राहो

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 24 дня назад

    अप्रतिम व्हिडिओ. ड्रोनचा सुरेख वापर. उत्तम पार्श्वसंगीत, उत्तम निवेदन आणि विशेषतः पावसाळ्यातील कोकणाचं ( स्वर्ग) चित्रीकरण म्हणजे तर लाजवाब 👍

  • @jagdisharekar4854
    @jagdisharekar4854 Месяц назад +7

    मुक्तताई खुप छान गाव गणेशगुले आणि आमचे गणपतीपुळे निसर्गाचा नजराणा म्हणजे कोकण ह्याला तोड नाही. 👍💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      हो. खरंय ❣️❣️😍😍

  • @SmrutiB
    @SmrutiB Месяц назад +4

    पावसाळ्यात समुद्राचा स्वभाव बदललेला असतो..इतका की लांबूनच त्याच्याशी हितगुज करावी...❤

  • @AmolNarayanTandale
    @AmolNarayanTandale Месяц назад +2

    मुक्ता तुझे मनापासून आभार, तु आम्हाला अतिशय सुंदर ठिकाणांचे घरबसल्या दर्शन घडवितेस...🙏

  • @anandapujari8331
    @anandapujari8331 4 дня назад

    आपण video खुप छान बनवला आहे.माहीती पण खुप छान सांगितले.तुम्ही असे आणखी माहिती पूर्ण video बनवा धन्यवाद 🙏🙏

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 Месяц назад +2

    अतिशय सुंदर व्हिडिओ झालाय बेटा ! तुझी कॉमेन्ट्री ही खूप छान वाटते . बघत असताना , खरचं आपण कोकणात आल्या सारखं वाटतंय ! मस्त .

  • @netrachachad9356
    @netrachachad9356 Месяц назад +1

    Mukta gaon , vada, purn Nisarg sunder aahech. Tyabaddal shanka nahi. Pan tu kelel nivedan suddha khupch chaan. God bless you 🙏❤

  • @guruprasadkaushik3136
    @guruprasadkaushik3136 18 дней назад

    मी हा विडिओ पहिला आणि निशब्द झालो अधभूत खुप छान दोन वेळा पूर्ण बघितला तरी समाधान होईना.. मुक्ता ताई धन्यवाद थोडा वेळ मी स्वतःला त्या जागी हरवून बसलो...
    🙏

  • @RevanPatil-lp5lk
    @RevanPatil-lp5lk Месяц назад +1

    अप्रतिम सादरीकरण तिथ आसल्या चा भास होतो . . . खुप सुंदर गणेशगुळे 😍😍♥️♥️♥️

  • @sheetalchandane5971
    @sheetalchandane5971 Месяц назад +1

    ड्रोन शॉट्स मुळे व्हिडिओ निसर्ग चित्रासारखा अप्रतिम झाला आहे.

  • @hajaratadvi7388
    @hajaratadvi7388 Месяц назад +1

    छान, निसर्ग सौंदर्याने नटलेले अती सुंदर गणेश गुळे गावं.

  • @poojagurav8248
    @poojagurav8248 Месяц назад +2

    Khup chaan mukta taii....he aamch gav aahe....adityanath mandirajvlch aamch ghar aahe....khup chaan video bnvlays...mi job sathi punyat aste pn aj tuza video bghitla tevha aamchya vadit jaun alyacha feel milala... thank you ❤️❤️

  • @maninisbuisnessidia1639
    @maninisbuisnessidia1639 Месяц назад +1

    मुक्ता ,तुझे सर्व व्हिडिओ खूप माहिती पर व मन प्रसन्न करणारे असतात.तुम्हा दोघांना ही धन्यवाद व तुमचे खूप खूप कौतुक
    शुभेच्छा ❤

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Месяц назад +1

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻तुझे कोकण वर्णन ऐकताना अगदी तिथेच असल्याचा भास होतो 👌🏻👌🏻👌🏻गोड हसतेस बोलता बोलता 👌🏻👌🏻

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 Месяц назад +1

    Kay bolave kalat nahi...next level video hota... love from kolhapur ❤️💛💚💙💜

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi7948 Месяц назад

    गणपती पुणे गाव तुझ्या व्हिडिओ मधून पाहून मन प्रसन्न झाले
    धन्यवाद ताई.

  • @armarimaratha
    @armarimaratha Месяц назад +1

    गणेशगुळे आणि गणपती पुळे निसर्गरम्य गावे छान प्रदर्शित केलात. स्वानंदीजी आणि आपण कोकणचे वैभव अप्रतिम सादर करताय 🙏🙏

  • @shashikantparab9429
    @shashikantparab9429 Месяц назад

    मुक्ता गणेशगुळे खूप सुंदर गाव.पाहताना खूप आनंद झाला.नेहमीप्रमाणे तुमचा व्हिडिओ अप्रतिम .अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Месяц назад

    अप्रतीम आहे फारच सुंदर वर्णन केले आहे प्रत्येक पारंपरिक देवळांचे इथल्या निसर्गाचे तिथल्या पारंपरिक भांड्यांचे शिवाय घराला तर अगदीच सुंदर टच दिलाय मूळ रचनेत बदल ना करता अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे फारच सुंदर उपक्रम हाती घेतला आहे कोकणाला खरच अशा उपक्रमाची गरज आहे

  • @ROHITAPTE
    @ROHITAPTE Месяц назад +1

    खुप सुंदर vlog. कॅमेऱ्याच्या पुढे तू आणि मागे रोहित दोघांचही काम अप्रतिम. ड्रोनचा अप्रतिम वापर. पार्श्वसंगीत एकदम पूरक.
    फक्त एक गोष्ट खटकली. मी प्राणी प्रेमी असल्यामुळे असेल कदाचित. थोडं स्पष्ट सांगायचं झालं तर स्वतः डोळस भटकंती करताना मुक्या, निरागस प्राण्यांची नैसर्गीक भटकंती अर्ध्यावरच दम तोडतेय....

  • @shubhadasubhedar8788
    @shubhadasubhedar8788 Месяц назад +1

    काय सुंदर घर आहे ईथे नक्कीच रहायला आवडेल. माझ्या आजोळच घरही असच कौलारू आहे म्हणजे वाडा आहे.

  • @ranjanapednekar7349
    @ranjanapednekar7349 Месяц назад +3

    कोकणातली सगळीच गावं निसर्गरम्य आहेत ... तू पहिल्यांदाच गेली आहेस वाटतं कोकणात ...

    • @ginis0011
      @ginis0011 Месяц назад +1

      तुम्ही तिचा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय असे वाटते कारण ती नेहमी कोकणातले व्हिडिओ टाकत असते.

  • @prashantbane2940
    @prashantbane2940 Месяц назад

    शब्द अपुरे पडतील असं ठिकाण दाखवलंस तू मुक्ता... मन प्रसन्न झालं... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @user-fi3jr8qg9h
    @user-fi3jr8qg9h Месяц назад

    अप्रतिम.. अप्रतिम.. अप्रतिम.. तुझ्या नजरेतून .. खरे तर तुझ्या कॅमेऱ्याच्या नजरेतून.. कोकणाचे हे अप्रतिम सौंदर्य अनुभवताना खूपच आनंद होतो ... असेच सुंदर कोकण दर्शन घडवत रहा ... तुझ्या कॅमेरामनला सलाम .. विशेषतः तो दोन जोत चालत असलेल्या शेतांचे ड्रोन मधून केलेले चित्रीकरण... काय त्या शेतांमधल्या रंगछटा... अवर्णनीय... keep it up...

  • @Pp-nh5gr
    @Pp-nh5gr Месяц назад +2

    24:00 n 24:24 excellent Drone shots Mukta n team❤

  • @Mauli-c3l
    @Mauli-c3l Месяц назад

    अप्रतिम घर आणि तू सुद्धा .. पाहतच राहव वाटत ..अश्या सुंदर गावातील अत्यंत नीट नेटक ठेवलेले अगदी माझ्या स्वप्नातलं घर …