🏕️फक्त दहा(१०)लाखात बनलेल्या घराची संपुर्ण माहिती मागणी तुमची महिती माझी संपुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • नमस्कार You Tube Family तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनल वर स्वागत आहे. 🙏
    🏕️ आम्ही 2023 मध्ये आमच्या नविन घराचे बांधकाम पूर्ण केले.आणि ते ही खूप कमी वेळात म्हणजे फक्त दीड महिन्यातच पूर्ण केले. आणि या आमच्या घर बांधकामाचे अनुभव तुम्हा सर्वांच्या सोबत शेअर करत आहे.
    कारण बऱ्याच जणांचे स्वप्न असते स्वतःचे घर
    आणि पुण्यासारख्या शहरात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशक्य वाटत असताना, फक्त आणि फक्त आमच्या दोघांच्या जिद्द आणि चिकाटी ह्या स्वभावामुळे आमच हे स्वप्न आम्ही पूर्ण केले आहे. आणि ते ही खूप कमी खर्चात आणि कमी कालवधीमध्ये, आणि "स्वतः हा" शब्द खूप महत्वाचा आहे कारण आम्ही हे बांधकाम स्वतः बांधले आहे.त्यामूळे इतका कमी खर्च आला.आणि एकदम छान क्वालिटीचे मटेरीयल वापरून जस पाहिजे तस आणि मजबूत बांधकाम पूर्ण करता आले.
    तसच आम्हाला अस वाटत की ज्याना कोणाला घर बांधायचं आहे त्यांना आमचा हा अनुभव सांगावा. जेणेकरून प्रत्येकाला स्वतःच्या स्वप्नातले घर बांधण्यास खूप मोठी तडजोड करावी लागणार नाही. खूप कमी खर्चात सुद्धा राहण्या योग्य जसे शहरात सर्व सूखसोईनीं युक्त घर असतात. तसेच हे घर खूप कमी खर्चात पूर्ण करता येईल.हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. माहिती आवडली असेल तर चॅनेल subscribe करा 🙏
    माझ्या चॅनेल वर भेट दील्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासुन धन्यवाद,🙏🙏🙏🙏

Комментарии • 1 тыс.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 9 месяцев назад +14

    ताई,तुम्ही उभयतांनी खूपच कष्ट घेऊन हे घराचे स्वप्न साकार केलेत,त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन....या घरात तुमची उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मनापासून अनेकानेक शुभेच्छा....🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You So Much Mam 🙏
      आणि तुमची लाख मोलाची कमेंट मला माझ्या पुढच्या वाटचालीस नविन ऊर्जा देतील.तुमचे असेच आशिर्वाद आणि प्रेम माझ्या कुटुंबावरती राहुदे 😊

    • @vishnughode4676
      @vishnughode4676 2 месяца назад

      गुड 🔥🔥🎁

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  2 месяца назад

      @vishnughode4676 🙏

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 9 месяцев назад +32

    फारच छान, अशी मराठी माणसे असतील तर महाराष्ट्र नक्कीच अग्रेसर राहील पुढची ५० वर्ष

  • @Bepositive54
    @Bepositive54 9 месяцев назад +4

    खुप छान विडिओ आहे ताई आणि आता तुमच 10 लाखात खुप सुंदर घर झालेल आहे आम्ही 9 वर्षापुर्वी 2 लाख 15 हजारात बीना स्लॅपच,घर बांधायला ठेकेदाराला दिल होत आणि आमच बांधकाम फक्त 400 स्क्वेअर फूट मध्ये होत खुप फसवल आम्हाला ठेकेदाराने बांधकाम पण अर्धवट दार नाही बसवले नंतर आम्ही कसेतरी हलके दोन दार बसवले कारण पाहणारं कोणी नव्हत आणि आता पण बरच काम करायच आहे तुमचा विडिओ बघून मला पण आता स्वत करून घ्यावस वाटत आहे. 🙏तुमचा विडिओ पहीले यायला हवा होता. पैसे वाचले असते. कष्टाचे पैसे गेले की खुप हळहळ वाटते.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      हो ना मॅडम त्यासाठीच आम्ही स्वतः करण्याचा निर्णय घेतला. आणि याच्यापुढे सुद्धा बर्याच लोकांना माझ्या व्हिडिओचा कुठे ना कुठे थोडीफार आयडिया मिळून जाईल की घरासाठी नेमका किती खर्च येतो या उद्देशानेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 9 месяцев назад +24

    ताई तुमचं घर बांधण्याच काम बर्याच लोकांना प्रेरणादायी वाटेल कारण बिल्डर किंवा कंत्राटदार आज काल भरपूर लुटतात धन्यवाद 🙏🌹

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You 🙏

    • @jeevanshinde5235
      @jeevanshinde5235 6 месяцев назад +1

      चूक आहे

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  6 месяцев назад

      @@jeevanshinde5235 आहों दादा तुम्हाला नाही पटत तर नका बघू

    • @jeevanshinde5235
      @jeevanshinde5235 6 месяцев назад

      @@lpk_vlogspune दुसऱ्यांची इज्जत काढू नका.. बस..

    • @Siddeshwarkewale
      @Siddeshwarkewale 15 дней назад

      Can u try to build me also sister under 10lakh home sorry with the land is it 10lakh 😢😢

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 8 месяцев назад +10

    Excellent Video. Lady narrating small small details seemed to be professional. She seems to be capable of taking contract for construction & interiors. I wish her & family every success in life.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  8 месяцев назад +1

      Sir, I have given information of my own house in this video because those who want to make a low budget house for themselves, it would help them.That's the purpose of the video. Neither I am interior designer nor contracter nor I have to make any business through this video. Thank you so much for watching my video 🙏

  • @deepakalingan1044
    @deepakalingan1044 10 месяцев назад +110

    खुप सुंदर मी तुमची subscriber नाही आहे सहजच तुमचा video open झाला पण खूप छान वाटल. प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून केलीय तुम्ही आणि सांगितली आहे. त्यामुळे आमच्या पण मना पर्यंत पोहोचली. खुप खुप शुभेच्छा अशीच प्रगती करा. आणि घर खुप सुंदर आहे.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  10 месяцев назад +2

      Thank You So Much Mam 🙏

    • @jyostnadalvi6962
      @jyostnadalvi6962 10 месяцев назад +3

      तुमच गाव कोणत ?

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  10 месяцев назад +3

      @@jyostnadalvi6962 सांगली,आहे Mam thank You माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल 🙏

    • @rushikeshsawane3735
      @rushikeshsawane3735 10 месяцев назад +1

      खरच खूपच कौतुकास्पद आणि अभिनंदन तुमचं💐

    • @rushikeshsawane3735
      @rushikeshsawane3735 10 месяцев назад +1

      दौंड

  • @vasantbhute4103
    @vasantbhute4103 9 месяцев назад +6

    एवढया कमा खर्चात सर्व समावेषक अशी वास्तू आकर्षक स्वरुपात बनविली आहे खूप खूप हार्दिक अभिनंदन / वसंत भुते नागपूर

  • @TruptiHule
    @TruptiHule 2 месяца назад

    खूप छान घर आहे बाईला स्वताच घर हवे असत ती छोट्या छोट्या गोष्टीत खुष असते स्वकष्टाचे कौतुक आनंद खूप छान आहे माझी पण ईच्छा आहे घर बांधायचे आभीनंदन नवीन घरात सुखाने संसार करा ❤🥰👍

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 9 месяцев назад +3

    खूपच छान सुंदर 🏡 ,मला ते पहाताना स्वप्नातल्या सारखे वाटले, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम आशीर्वाद. 🏡🌹 कवयित्री आणि मुक्त पत्रकार

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You So Much Mam 🙏
      तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असेच माझ्या कुटुंबावर राहुदे.आणि हो तुमचे हे लाखमोलाचे शब्द माझ्या ह्या प्रवासामध्ये खूप मोलाचे ठरतील. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद,🙏

  • @mapatilworld4378
    @mapatilworld4378 9 месяцев назад +2

    खूप छान माहिती, नवीन घर बांधणारे यांना उपयुक्त, तसेच बजेट बद्दल घरी ऐक मत होत नाही, बजेट ही नाही व घर नाही ,असेही होते. त्यावर हा उत्तम उपाय आहे. असे मला वाटते. गीतकार m a patil, CGO,NAVY

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 10 месяцев назад +10

    Kharch khup chan aani congratulations 🎉 me pan jsut scrolling kart astana tumcha vlog Disla jashi devachi icha asavi coz mala pan mazya gavi swatach ghar bhandhyach aahe. Pan tumche khup khup aabhar tumi tumcha experience share kela coz tyamule jayana swatach ghar banvyach asel tyana khup help hoil. Tumhala Congratulations 🎉👏..

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  10 месяцев назад

      Thank You So Much Mam 🙏
      तुमचे असेच आशिर्वाद आणि प्रेम आम्हावरती
      असुदे, तुमच्या या लाखमोलाच्या कमेंट मुळे
      मला एक प्रकारची नविन उर्जा मिळेल काम करण्यासाठी. खरच खुप भारी वाटल तुमची कमेंट वाचून आणि हो तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ पहील्याबद्दल 🙏

    • @rmadasvarpe5264
      @rmadasvarpe5264 9 месяцев назад

      Khupch chan

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      @rmadasvarpe5264 Thank You 🙏

  • @ashokbhamare9161
    @ashokbhamare9161 Месяц назад

    तुम्हा दोघाचे अभिनंदन, बरे झाले , तुम्ही हट्ट धरल्यामुळे घर झाले.

  • @piyer1409
    @piyer1409 9 месяцев назад +5

    Your this specific video has been found innovative solutions and I hope that your videos will be helpful to the desirable persons to some extent,it will be economical while constructing their own homes.Thanks.I can thoroughly understand your Marathi language,hence there is no problem.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank you very much Sir, for watching my videos and your valuable comments.
      Which will inspired for my feature journey. 🙏

  • @rangolibyjyotimane7630
    @rangolibyjyotimane7630 10 месяцев назад +5

    खूप छान माहितीपूर्ण video.
    तुमचे video बनवण्याचे कौशल्य ही खूप छान 👌

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  10 месяцев назад +1

      Thank You So Much Mam 🙏 आणि तुमच्या ह्या लाखमोलाच्या कमेंट मुळे मला आणखी नवी उर्जा मिळेल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 9 месяцев назад +1

    फारच सूंदर घराचे प्रयोजन आहे . आवडीचे बाधकाम आणि गरजे नुसार खोल्यांची रचणा आवडली . खर्चाचा ताळमेळ छान वाटला . धन्यवाद .

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 10 месяцев назад +5

    खूप सुंदर घर बनवले आहे माहिती खूप छान दिलीत

  • @dattakadam9264
    @dattakadam9264 2 дня назад

    छान माहीत दिलीत मला त्या बद्दल आपले अभिनंदन.

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 10 месяцев назад +5

    खूप छान आहे ताई घर तुमचं ,पुढील प्लॅनिंग पण छान केलेलं आहे

  • @dshewale4692
    @dshewale4692 9 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे. मेहनत करून घर बनवले आहे.तुम्हा दोघा पती पत्नीचे अभिनंदन💐

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 9 месяцев назад +3

    फार छान उपयोगी माहितीसाठी धन्यवाद 🙏👍

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 9 месяцев назад +1

    खुप छान पुर्ण विचार करून निर्णय घेतला ही सर्व कल्पना खूप छान आहे हिवडी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You 🙏 आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले त्या बद्दल तुम्हाला मनापासुन धन्यवाद. 🙏

  • @wilfredkale7039
    @wilfredkale7039 8 месяцев назад +2

    Your husband must be so proud of you❤. Good work

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  8 месяцев назад +1

      Yes, Thank You So Much for your complement.

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 2 месяца назад

    छान घर बांधलय अभिनंदन.कमीत कमी खर्चात घर बांधता येत बिल्डर शिवाय हे पाहून आश्चर्य वाटले

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 9 месяцев назад +2

    तुमचे घर बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली त्यांनी पण घर कामगार घेऊन स्वतः बाधले होते.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      खुप छान,यामुळे आपले पैसै खूप वाचवता येतात .

  • @rupalimalvadkar1942
    @rupalimalvadkar1942 9 месяцев назад

    ताई खूप सूंदर घर बनले आहे तुमचे ... अभिनंदन तुमचे💐💐

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 10 месяцев назад +7

    खूप छान बनवले घर तुमचे..

  • @anandraomohite1425
    @anandraomohite1425 2 месяца назад

    ताई घर खुपच छान बनवले आहे तुम्ही खुप मेहनत घेतली परंतु दहा लाखात सर्व झाले हे काय पटत नाही

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  2 месяца назад

      Thank You 🙏
      का? तुम्हाला अस वाटतय की हे दहा लाखात पुर्ण नाही झाल,होय हे आम्हीं करून दाखवलय, स्वतः समोर थांबून काम केले की होत शक्य.

  • @monikachavan428
    @monikachavan428 10 месяцев назад +6

    ताई खरोखरच तुमचं घर खूप सुंदर आहे आणि तुमचाही स्वभाव खूप छान आहे 🙏🙏💐💐

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 9 месяцев назад

    मी दिलेली माहिती फार छान सांगितली घर सुंदर झालेला आहे कारण तुम्ही वैयक्तिक लक्ष देऊन ते घराचे बांधकाम केले त्यामुळे ते सुंदरच असणार आपण स्वतः थांबवणे केल्याबद्दल आपणाला किती समाधान मिळते हेच महत्त्वाचं आहे आपण बैठकीच्या रूम ची माहिती दिलेली नाह

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You Mam 🙏 बऱ्याच लोकांनी पूर्ण डिटेल मध्ये मटेरियलची, रूम साइज, अशी महिती मागितलेली आहे. त्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये बैठकीच्या रूमची माहिती सुद्धा द्यायचा प्रयत्न करेन तो तुम्ही नक्की बघा.

  • @ManishaSonar-q6i
    @ManishaSonar-q6i 9 месяцев назад +3

    ताई आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 💐💐

  • @alpanadeshmukhpatil2846
    @alpanadeshmukhpatil2846 10 месяцев назад +2

    घर खूप छान आहे तुमचं, आणि एक ना एक गोष्ट छान एक्सप्लेन करून सांगता तुम्ही,तुमची दोन्ही मुलं हुशार आहेत,एकच सांगायचं होतं मुलांना कुठल्याही प्रकारचं burden किंवा cumpulsion/सक्ती करू नका.मार्क्स कमी पडले ,हरकत नाही हुशार आहे ना कुठे ना कुठे चमकणारच.👍

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  10 месяцев назад +3

      Thank You So Much 🙏तुमच्या या लाखमोलाच्या कमेंट साठी,
      आणि हो मुलांबाबत सांगायचं झालं तर नाही सक्ती करत आम्ही,पण आम्ही दोघेही खूप कष्टातून पुढे आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला असं वाटत की आत्ताची आमची परिस्थिती बघून मुलांना अस वाटायला नको की आपल्याला काहीच गरज नाही कष्ट करण्याची. आपल्या आई बापांनी तर सगळ आयत करुन ठेवले आहे.कस आहे चांगल शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे ते त्यांना कधीच उपाशी राहून देणार नाही, पैसा आज आहे तर उद्या नाही, पण त्यांच्याकडे चांगल शिक्षण असेल तर ते कुठे ना कुठे निदान आपला उदरनिर्वाह करु शकतील,या स्पर्धेच्या युगात कमीत कमी शिक्षण तरी चांगल घ्याव अशी आमची इच्छा आहे, त्या साठी थोड प्रेमळ राग व्यक्त करतो पण तू केलच पाहिजे असा हट्ट नसतो,आणि मला वाटत आम्हा दोघांपैकी एकानी तरी रागवायला हव नाही तर लाडात मुल कधी वाईट मार्गी लागली हे कळणार सुद्धा नाही. काही चुकल असेल तर माफ करा मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि हो पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏

    • @alpanadeshmukhpatil2846
      @alpanadeshmukhpatil2846 10 месяцев назад

      हो अगदी बरोबर 😊

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 9 месяцев назад +3

    Congratulations 🥰🎉🎊Khup mast ghar banvle ahe 👍👍

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 4 месяца назад

    खूपच छान.. अनेक उत्तम आशिर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  4 месяца назад

      Thank you so much ma'am 🙏🙏

  • @swamisai68
    @swamisai68 10 месяцев назад +4

    खूप छान tai घर 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 9 месяцев назад +1

    ताई खूपच छान घर बनवले आहे. 👌👌👌

  • @Lidili
    @Lidili 9 месяцев назад

    सुंदर, अप्रतीम बंगला. वरती मंगलोर कौल असती तर ventilation साठी मस्त झाले असते.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Ventilation साठी कहीच अडचन नाही सर, आही बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत. आणि आमच्या आजूबाजूला वातावरण मोकळे असल्यामुळे ventilation खुप छान प्रकारे होते.
      Thank You 🙏

  • @kavitasurve5834
    @kavitasurve5834 9 месяцев назад +2

    Khup khup Chan banlay ghar, tehi 10 lakhat. Tumcha kharach koutuk vatla. Tumcha he ghar Poonyat kuthe aahe ani ha plot kadhi ghetlat ani kitila? Pls. Sanga.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      सर आमची ही जागा पुण्यात तळेगाव येथे आहे. आणि आम्ही हा प्लॉट 2019 मध्ये घेतलेला आहे .आणि बारा लाखाला प्रति गुंठा अशी प्लॉटची किंमत आहे. आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल 🙏

  • @rajendrabhangare1608
    @rajendrabhangare1608 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मला पण नवीन घराला सुरुवात करायची आहे तुमच्या या व्हिडिओमुळे मला खूप मदत होईल

  • @Lokenndra124
    @Lokenndra124 4 месяца назад +1

    शुभम भवतु ! शुभ आशीर्वाद (कुंडली तज्ञ/ वास्तुशास्त्रज्ञ / vastu consultant)✋🏻✡️🧭💐

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 9 месяцев назад

    घरबांधण्यासाठी खुपच मेहनत घेतली आहे तरी पुण्यात कुठच्या भागात आहे ते कळत नाही तरी ते सांगा.तुमचे अभिनंदन.

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You 🙏
      आणि आमचे घर पुण्यात तळेगांव येथे आहे.

  • @vijaysisale9238
    @vijaysisale9238 6 месяцев назад

    खूप सूंदर घर बनवले आहे तुम्हीं 👌🏻 माझी पण तुमच्या मिस्टरान सारखी इच्छा आहे कि बनवले तर दोन माजली सॅल्प चं बनवायचं परंतु तुमचं हे घर बगुन विचार बदलू वाटतोय 😊

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  6 месяцев назад

      Thank You 🙏

    • @jeevanshinde5235
      @jeevanshinde5235 6 месяцев назад

      एक वारा. पाऊस पडू द्या

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  6 месяцев назад

      @@jeevanshinde5235 एक नाही खूप वेळा वादळी वारा आणि पाऊस होऊन गेलेला आहे. इथे डोंगरी भाग असल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो गेली सहा महिने खूप मोठा वादळी वारा आणि पाऊस झालेला आहे. इथून पुढे सुद्धा पुढील 30 वर्षापर्यंत ना पत्र्याला काही होणार नाही बांधकामाला काही होणार आहे त्याची 100% गॅरंटी आहे. तुम्ही लोकांचे विचार बदलवण्याचा प्रयत्न सोडून द्या. तुम्हाला माहीत नाही गावाकडे तर फक्त पत्रा ठोकून सुद्धा 20-25 वर्षे आरामात काढतात आम्ही तर हे लाल विटांमध्ये खूप छान प्रकारे बांधकाम केलेला आहे. त्यामुळे हा निव्वळ तुमचा गैरसमज आहे.

  • @sudhakarahire-kt8bp
    @sudhakarahire-kt8bp 9 месяцев назад +1

    खूप सविस्तर माहिती दिली ताई तुम्ही.

  • @prabhakarvalanj643
    @prabhakarvalanj643 2 месяца назад

    Madam Ghar khupch chan ahe Ani tehi Kami kharchat❤❤❤❤

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 2 месяца назад

    Mast ahe

  • @malikamasala1
    @malikamasala1 10 месяцев назад

    ताई तुम्ही बजेट मध्ये खुप छान घर बांधल 👏

  • @YTstudyncraft
    @YTstudyncraft 3 месяца назад

    खूप छान घर आहे तुमचे

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 9 месяцев назад

    ताई तुमचं घर खूप च सुंदर झालं आहे.👌👌 इतक्या कमी बजेट मध्ये देखील 1000 Sq.ft. आलिशान बंगला बांधला जाऊ शकतो. unbelievable तुमच्या मेहनती ला आणि कल्पकता ला नमन .नवीन घरा करिता शुभेच्छा 👍👍🙏🙏😊😊

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
      आणि तुमची ही लाख मोलाची कमेंट माझ्या पुढील प्रवासात खूप छान अशी नविन ऊर्जा देतील अजून चांगले काम करण्यासाठी.Thank you 🙏

    • @madhusohanda2366
      @madhusohanda2366 9 месяцев назад

      plot
      barobar ha kharch aahe ka
      10 Lacks
      Location sanga

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      @@madhusohanda2366 फक्त घर बांधकामासाठी 10 लाख रुपये खर्च आलेला आहे. प्लॉटची किंमत वेगळी आहे.

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 8 месяцев назад +2

    Khoop chann sunder ghrrr bandhlat. 👌

  • @PranalisKitchen477
    @PranalisKitchen477 3 месяца назад

    Ghar khup chan aahe tai, amhala pan Ghar bandhayche aahe tya sathi tumchya video chi khup madat hoil, pan tumhi farshi light colour vaparli Asti tar, ajun khup mast vatal ast👍

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  3 месяца назад +1

      Thank You 🙏
      फरशी एवढ्यासाठी डार्क बसवलेली आहे आम्ही गार्डनिंग करणार हे आम्हाला आधीपासून माहित होतं आणि प्रत्येक वेळी चिखलाचे पाय आत मध्ये येणार शिवाय घरी लहान मुलं सुद्धा आहेत, आणि प्रत्येक वेळेस आपल्याला साफसफाई करायला तेवढा वेळ नसतो त्यामुळे आम्ही अशा फरशीचा कलर निवडला

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 4 месяца назад

    खुपच सुंदर कमी खर्चात घर मस्तच ❤

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 6 месяцев назад

    Excellent information. Good hiuse at reasonable cost n darjng keli ghar bandhyachi
    .shevti tat nako nako hote kam ourna kadhi honar yache.pan zalewar khup chan watate.ghar pahave bandhun.ase ahe congrats to u pple.

  • @sunitagore6567
    @sunitagore6567 3 месяца назад

    खूप छान स्वप्नातल घर असाव अस आहे
    कोणत्या एरीयात हे घर आहे ते पण सांगा ताई 🙏🙏

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  3 месяца назад

      Thank you 🙏
      Talegaon, Pune yethe aahe.

  • @anitathete3942
    @anitathete3942 2 месяца назад

    Khupch chan❤

  • @kunjanshinde9545
    @kunjanshinde9545 3 месяца назад

    खूपच छान आहे मला सुद्धा पुण्यात घर घ्यायचे आहे मी मुंबईला रहाते मला काही मार्गदर्शन करा किंवा जागा किती गुंठे लागते कारण फरवणारे सुद्धा असतात

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  3 месяца назад

      @@kunjanshinde9545
      Thank you
      तुम्हाला किती गुंठा जागा घ्यायची आहे घर किती जागेत बनवायचे आहे हे सर्व तुमच्यावर डिपेंड असतं. तुम्हाला घर फ्लॅट मध्ये घ्यायचे आहे की मोकळ्या जागेत घेऊन बांधायचे आहे. घरात राहणारे एकूण मेंबर त्यानुसार खोल्या,तुमचा बजेट, कोणत्या एरियात घेणार आहे.या सर्व गोष्टींचा प्लॅन करावा लागतो.

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 2 месяца назад

    Khup chen 🙏

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 9 месяцев назад +2

    Khup Chan planning verynice

  • @kishortupsakhare4678
    @kishortupsakhare4678 9 месяцев назад

    🎉Khup Khup Abhinandan Tumache Khup Sundar Mahiti Dilit Aapan Video Madhye .

  • @meenalshejal117
    @meenalshejal117 4 месяца назад

    छानच आहे घरकुल, फक्त बेडरूम साठी ventilation कमी वाटत

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  4 месяца назад

      Thank You 🙏
      बेडरूमसाठी आहे ventilation समोर एक खिडकी आहे.

  • @maheshgore273
    @maheshgore273 Месяц назад

    खूप छान 👌👌

  • @chandrakantthorat3514
    @chandrakantthorat3514 9 месяцев назад

    ताई खुप छान घर बांधले आहे ते पण दहा लाखात वाटत नाही हा सगळा खर्च दहा लाखात असेल तरी ठीक आहे अजून तुमची उन्नती होवो

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      हो दादा हे जे आमच घर बनलेले आहे ते फक्त दहा लाखात बनलेले आहे. आणि तुमचे मनापासुन खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले त्या बद्दल 🙏

  • @naazsyed511
    @naazsyed511 Месяц назад

    Abhinandan 🙏👌👌👍👍❤️👌🏆🏆 excellent 👌👍

  • @kalpana1
    @kalpana1 6 месяцев назад

    ताई तुम्ही दोघांनी राबून खूपच चांगलं घर बनवलं,हे घर कुठे आहे त्यासाठी परवानगी घेतली होती का पाणी लाईट व्यवस्था कशी केली तेही सांगितले तर बरं होईल नमस्कार....

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  6 месяцев назад

      नमस्ते मॅडम 🙏
      Thank You 😊
      आम्ही घेतलेली ही जागा रेसिडेन्सीयल झोन असल्यामुळे या ठिकाणी परवानगी घ्यायची गरज पडत नाही. बांधकाम झाल्यानंतर आपण घराची नोंद ग्रामपंचायत मध्ये जाऊन करू शकतो, आणि प्लॉट विकताना त्यांनी लाईटची सुविधा करून दिली होती. पाण्यासाठी आम्ही स्वतः बोरिंग करून घेतलेली आहे. आणि ड्रेनेजसाठी सुद्धा आम्ही स्वतःहूनच शोषखड्डा तयार करून घेतलेला आहे. अजून इकडे पाणी आणि ड्रेनेजची लाईन आलेली नाही.

  • @NanuMisal
    @NanuMisal 5 месяцев назад

    अती सुंदर महीती दीली अनेकांना फायदा होईल

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 8 месяцев назад

    Khup Chan aahe sundar Lokeshan Pan very nice 💯 good 👍🏻 Chan Ghar bhagnyachi echa aahe Ghar me video pahila aahe Mi Sangeeta Tai Rajguru ashe Mi yeu ka Ghar bhagnya Sathi Mala khup khup avadle ashe Sundar ❤ good 👍🏻 good 💯 💯

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  8 месяцев назад

      हो ताई नक्की या तुम्ही आमच्या घरी,आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल 🙏

  • @manthankamble8813
    @manthankamble8813 5 месяцев назад

    खूपच छान घरं बांधलं ताई तुम्ही

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 10 месяцев назад +2

    फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं

  • @sunitamore-ec5eh
    @sunitamore-ec5eh 2 месяца назад

  • @ManishaPawar-v9v
    @ManishaPawar-v9v 8 месяцев назад +1

    Khup Chan ahey Tai tuhmch Ghar Dream house 👌😊

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 9 месяцев назад +1

    खूपच सुंदर घर, ह्या घरात तुमची खुप भरभराट होवो... ❤👍

  • @dattatraysawant8748
    @dattatraysawant8748 9 месяцев назад

    फारच उपयुक्त आणि मुद्देसूद व्हिडिओ बनवला आहे

  • @sumanco
    @sumanco 8 месяцев назад

    तुम्ही दोघे १ नंबरच जोडप बर का 🙏👍

  • @sangitagiri8330
    @sangitagiri8330 6 месяцев назад +1

    Nice punyat khuthe aahe ghar

  • @pratibhachavhan9749
    @pratibhachavhan9749 10 месяцев назад +1

    खुपच सुंदर माहिती दिली तुम्ही मला माझ्या मुलीसाठी घर बांधताना तुमचे मागैदशैन खूप मोलाचे ठरेल

  • @shraddhagore9401
    @shraddhagore9401 4 месяца назад

    ताई खुप छान घर आहे तुम्ही बधलेल.ताई तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग च काम पण कारण घ्या तुम्हाला पाणी कधीच कमी पडणार नाही

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  4 месяца назад

      Thank You 🙏
      हो नक्की करू 😊

  • @shirishpatil5144
    @shirishpatil5144 28 дней назад

    Khup chan tai

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 4 месяца назад +1

    ताई जागा कितीला घेतली छोटी जागा आहे तर सांगा माहीती सांगा

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  4 месяца назад

      15 ते 20 लाख रुपये प्रति गुंठा चालू आहे

  • @sulochanadoke6181
    @sulochanadoke6181 3 месяца назад

    ❤❤❤

  • @mayadatey1031
    @mayadatey1031 5 месяцев назад

    तुम्ही खूप छान केलं खरचं

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 месяца назад

    मला घर पत्रे खुप छान आहे किचन खुप छान कुठे शहरात गावात आहे खाली जागा बघायची सांगा ताई

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  2 месяца назад +1

      Thank You 🙏
      हे पुण्यात तळेगाव येथे आहे ताई

    • @vimalrecipe2623
      @vimalrecipe2623 2 месяца назад

      धन्यवाद ताई मला वाटल मुंबईत आहे खुप खुप आहे घर ताई खुष राहा आनंदी राहा

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  2 месяца назад +1

      @@vimalrecipe2623 thank You 🙏

  • @ArchanaDevgude
    @ArchanaDevgude 7 месяцев назад

    छान बनवलाय मस्त बनवले ताई घर एकदम बंगला टाईप सगळं मटेरियल तुम्ही दिलं होतं का

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  7 месяцев назад

      Thank You 🙏
      हो सर्व आम्ही स्वतः मटेरीयल आणून कामगार लाऊन बनवुन घेतले आहे.

  • @hemantchiwukula2923
    @hemantchiwukula2923 9 месяцев назад

    बघायला कसे आणि कधी येउ शकतो, पत्ता पाठवून दिला तर येणे शक्य होईल, 🚌 बस नंबर वगैरे...

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      सर मी नंबर दिला आहे व्हाट्सअप वरती विचारू शकता 🙏

  • @prajaktasawant1440
    @prajaktasawant1440 6 месяцев назад

    ताई खूप सुंदर घर बांधले आहे

  • @rajshreevathare6043
    @rajshreevathare6043 9 дней назад

    Khupch chan ahe tai

  • @rohinibhoir5643
    @rohinibhoir5643 8 месяцев назад

    खुप छान आहे बोलणं तुमचं कुठेही गर्व नाही

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 9 месяцев назад +1

    Apratim Ghar
    Sunder Sureakh
    Bhari

  • @ShubhangiJadhav-zh4fu
    @ShubhangiJadhav-zh4fu 6 месяцев назад

    खूप छान घर माहिती पण खूप छान दिली

  • @rambhaukalkumbe3684
    @rambhaukalkumbe3684 3 дня назад

    🎉🎉🎉🎉❤

  • @appasalve7554
    @appasalve7554 3 месяца назад

    अतिशय सुंदर

  • @samrudhisawant8219
    @samrudhisawant8219 9 месяцев назад

    पुणे शहरात एक गुंठ्याची किंमत काय आहे, हे तुमच घर कुठल्या एरीयामध्ये येते मी आळंदी जवळ राहते तुमचा स्वभाव खूप छान वाटतो योग आला तर भेटु

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You So Much Mam 🙏
      आम्ही पुण्यात सोमाटणे फाटा तळेगाव येथे राहतो. आणि या ठिकाणी जागेचे भाव प्रत्येक एरिया नुसार आणि आपल्याला मिळालेल्या सोयी यावर अवलंबून असतात. आत्ता मी जिथे राहते तिथे 15 ते 20 लाख प्रति गुंठा आहेत.
      आणि हो तुम्ही नक्की या भेटू आपण. 🙏

  • @ShivanandKshirsagar-b5k
    @ShivanandKshirsagar-b5k 6 месяцев назад

    Tumcha video prernadai ahe.khup chan Tai 🎉🎉🎉😊😊😊

  • @dkkajle5822
    @dkkajle5822 9 месяцев назад

    खूपच छान, १०लाखात घर मॅडम जागे स ह...

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You 🙏 10 लाख किंमत ही फक्त बांधकामाची किंमत आहे. जागेची किंमत वेगळी आहे सर

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 9 месяцев назад

    खुपच सुंदर व अभीनंदन.ताई मी धानोरी पुणे येथे राहतो.मला लोणावळ्याला असे घर बांधण्याचा मानस आहे.आपण कुठे बांधलय?हे घर एकदा पाहता येईल का?आपले बहूमुल्य मार्गदर्शन पण होईल.धन्यवाद🙏

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  9 месяцев назад

      Thank You 🙏
      अणि हो तुम्ही नक्की बघू शकता घर. आम्ही सोमाटणे फाटा तळेगाव येथे राहतो. आणि येण्या आधी एकदा कॉल करून या कारण आम्ही बाहेर असलो तर तुमचे हेलपाटे नको व्हायला म्हणून.मोाइल नंबर दिला आहे बऱ्याच कमेंट मध्ये.

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 7 месяцев назад +1

    खूप सुंदर घर बांधले आहे मनःपूर्वक शुभेच्छा

  • @jitugaikar3833
    @jitugaikar3833 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती ताई

  • @archanasable4271
    @archanasable4271 10 месяцев назад

    Khup chan aahe tumch ghar aani tumche vicharhi,aapn aaplya ecchepramane aaplya manasarkh jyaveles ghar banvto aani sajvto na tyacha aanand ha veglach asto....

  • @drmukhtarshaikh8158
    @drmukhtarshaikh8158 4 месяца назад

    Khup chan Ghar Aahe❤🎉❤

  • @manisharecipes2798
    @manisharecipes2798 6 месяцев назад

    Chan zalay tumche Swarg sarkha Ghar ❤👌👌🎁🔔🙏

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  6 месяцев назад

      तूमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @musicalbeats7007
    @musicalbeats7007 10 месяцев назад +2

    खुप छान नियोजन

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 8 месяцев назад +1

    Khup Mast 1 near 👌👌👍👍

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 9 месяцев назад

    कटछाट करून तुम्ही चांगल घर म्यानेज करू दाखवले ..मी सुधा एक इंटिरियर डेकोरेटर आहे मुंबईत..छान वाटले.