भाजे लेणी, दख्खनमधील सर्वात जुन्या लेणी | इथे आलात तर काय पहायचे | Bhaja Buddhist caves | Full info.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 мар 2022
  • 🍂🍁भाजे लेणी, लोणावळा🍁🍂
    "लेणी" आणि "आवळी" या शब्दांच्या संधीमधून "लोणावळी" हा शब्दप्रयोग तयार झाला, म्हणजेच लेण्यांची मालिका असणारा प्रदेश. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन "लोणावळा" हे नाव प्रचलित झाले.
    कोकणातील बंदरे आणि दख्खनला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर अनेक लेणीसमूह वसले आहेत. यातीलच एक लेणीसमूह लोणावळ्यापासून अगदी जवळ विसापूर लोहगड किल्यांच्या पायथ्याला वसला आहे. धर्मप्रचारासाठी जगभर फिरणारे बौद्ध भिख्खू इथे राहून साधना करत आणि आपल्या शिष्यांनाही बौद्ध धर्माचे शिक्षण देत.
    महाराष्ट्रातील सर्वात जुना असा हा लेणीसमूह त्याच्या चैतरगृह, विहार, स्तूप, जुने बैठे खेळपट आणि शिल्पकला यासाठी प्रसिद्ध आहे. अशा या सुंदर वास्तूवरचा हा सुंदर विडिओ.
    इथे आल्यावर काय काय पहायचे 🧐, कुठे पहायचे 😍, काय काळजी घ्यायची हे सर्व काही विस्तृतपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️
    बैठे खेळपट,
    कोणतेही खेळ हे केवळ हे शारीरिक संवर्धनासाठी खेळले जातात असे नाही तर मनाच्या पोषणासाठी, प्यापारासाठी, व्यवहारातील बोलणी करण्यासाठी आणि युध्दातील तहामध्ये ही खेळल्याचे आपल्याला माहिती आहे. पूर्वी इतिहास संशोधन करणारे पर्यटक, भिक्षु, संशोधक, प्रवासी आणि व्यापारी मुक्कामासाठी अशा डोंगरावर, मंदिरांमध्ये, लेण्यांमध्ये दोन तीन महिने राहत. अशावेळी मन रमवण्यासाठी त्यांच्या देशात, प्रदेशात प्रचलित असणारे खेळ त्यांनी इथे कोरून ठेवले. तेच हे खेळपट.
    मंकळा,
    मंकळा हा खेळ प्राचीन आहे. बुद्धीचा वापर करून हा खेळला जातो. यात नशिबाचा कोणताही घटक उपयोगी येत नाही. हजारो वर्षांपासून हा खेळ इथीओपीआ, सुदान, घाना, दक्षिण आफ्रिका आणि भारतात खेळला जातो. या खेळात अठ्ठेचाळीस(४८) छिद्रांच्या पटावर बारा(१२) बियांच्या मदतीने खेळला जातो. जो स्पर्धक जास्त बिया गोळा करतो तो स्पर्धक विजयी ठरतो. अत्यंत रंजक असा हा खेळ आहे.
    वाघबकरी,
    वाघबकरी हा खेळ मुख्यतः नेपाळ आणि दक्षिण भारतात बघायला मिळतो. या खेळामध्ये तीन वाघ आणि पंधरा बकऱ्या असतात. वाघाने बकऱ्यांना खायचे आणि बकऱ्यांनी मिळून वाघाला अडवायचे अशी या खेळाची संकल्पना आहे.
    पच्चीसी,
    महाभारतात जे द्युत युद्ध खेळले गेले त्याला पच्चीसी असे म्हणतात. हा खेळ प्राचीन आणि राजा महाराजांकडून खेळला गेला. मुघलकाळात हा खेळ चौपर या नावाने जुगाराचा प्रकार म्हणून खेळला जायचा. शेजारच्या देशांमध्ये या भारतीय खेळाला परचीसी ,चेस इंडिया अशी नावे दिली आहेत. सोंगट्या, फासे आणि पच्चीसी पटासोबत हा खेळ एक विरुद्ध एक किंवा दोन विरुद्ध दोन स्पर्धकांमध्ये हा खेळ खेळला जातो.
    🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️

Комментарии • 6