Bedse Cave | Kamshet, Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Bedse Cave | Bedse Leni Near Kamshet Pune
    बेडसे लेणी समूह
    पुणे ते लोणावळा रस्त्याने कामशेत परिसरात असलेली एक प्राचीन बुद्ध लेणी म्हणजे बेडसे लेणी समूह. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेले हे ठिकाण पुण्याहून ६० किमी अंतरावर असून कामशेत वरून डावीकडच्या रस्त्याने थेट बेडसे गावात पोहोचता येते. लोणावळा परिसरात या प्रकारचे आणखी काही लेणी समूह असून त्यातील कार्ले आणि भाजे ही लेणी समूह त्यामाणे भव्य असून या ठिकाणी बरीच वर्दळ सुद्धा असते मात्र बेडसे लेणी कडे फारसे पर्यटक फिरकत नाहीत. आकाराने लहान आणि कमी संख्येत असलेला हा लेणी समूह बेडसे गावाच्या मागे असलेल्या पहाडीत उंचावर निर्माण केलेला असून पहाडीच्या पायथ्याशी गाडी उभी करून या ठिकाणी पोहोचण्यास जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते.
    बेडसे गावापासून जवळच असलेल्या पहाडीत या ठिकाणी एकूण ११ गुफा कोरलेल्या असून यामध्ये एक चैत्यगृह व एक विहार आकाराने भव्य असे असून अत्यंत सुशोभित व सुंदर असे आहेत इतर लेणी लहान आकाराच्या खोल्यांप्रमाणे असून काही पाण्याचे कुंड आहेत. यातील ही मुख्य लेणी एक चैत्यगृह असून ते खूप उंच, निमुळते परंतु खोल खोदलेले आहे. समोरच भव्य असे चार खांब असून खांबाच्या वरील भागात प्राणी आणि मनुष्याच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. चैत्यागृहात प्रवेश करण्यासाठी असलेल्या व्दाराच्या वरील भाग कमानींनी अत्यंत सुशोभित केलेला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच भव्य असे स्तूप, आणि उंच खांब दृष्टीपथात पडतात. चैत्यगृहाचे छत कामानी प्रमाणे असून त्यामध्ये लाकडी कमानी बसविलेल्या होत्या मात्र कधीकाळी त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आता फक्त दगडी छत आणि कमानी बसविण्याच्या खोबणी तेवढ्या दिसतात. चैत्यगृहात दोन्ही बाजूंनी उंच असे अष्टकोनी आकाराचे २० खांब असून या खांबांमुळे लेणी तीन भागात विभागली गेली आहे मात्र या खांबांच्या पलीकडे फारशी जागा मात्र नाही. चैत्यागृहाच्या टोकाला भव्य असा स्तूप आहे.
    येतील दुसरी भव्य आकाराची लेणी म्हणजे हा सुंदर असा विहार. हा विहार उंचीला कमी असून विहारात तिन्ही बाजूला लहान लहान अशा एकूण ११ खोल्या आहेत. या खोल्यात आतमध्ये एका व्यक्तीस झोपण्यासाठी दगडी जागा असून पूर्वी या दरवाजाला कवाडे असावीत. निवास व्यवस्थेसाठी असलेला हा विहार सुद्धा अतिशय भव्य व सुंदर असा आहे. याशिवाय या परिसरात अशा काही लहानलहान खोल्या प्रमाणे लेण्या असून काही पाण्याचे कुंड आहेत. या कुंडात वरच्या दगडावरील पाणी गोळा करण्यासाठी दगडात नाल्या व छिद्रे कोरलेले आहेत.
    या लेणी समूह निर्मिती चा काळ सातवाहन काळापर्यंत म्हणजेच पहिले शतकापर्यंत मागे जात असून या काळातील शिल्पकला येथील चैत्यागृहात बघता येते. भाजे आणि कार्ले या लेण्यांमुळे बेडसे लेणी कडे पर्यटक फारसे फिरकत नाहीत त्यामुळे येथे फारशी गर्दी नसते. हा लेणी समूह बघून झाल्यावर जवळच असलेल्या कार्ले आणि भाजे लेणी समूहास भेट देता येईल. अगदी एका दिवसात या तिन्ही लेणी बघण्याचा कार्यक्रम सुद्धा आखता येऊ शकतो.
    Bedse Cave Kamshet, Pune
    Camera & Gear used -
    1) Video shoot with : GoPro Hero 7 and Canon Power Shot SX50HS
    2) Photographs - Canon Power Shot SX50HS
    Music credits-
    RUclips Library - www.youtube.co...
    Category -History & Education
    #Bedse Leni#Cave#Kamshet#Pune#Satvahan period#BuddhistCave#Bhale Leni#Karle Leni#

Комментарии • 9