Ajit Pawar यांचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार का ? Sharad Pawar नेमका काय डाव टाकतायत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #BolBhidu #AjitPawarvsSharadPawar #NCP
    महायुतीत जागा वाटपावरून सातत्याने खटके उडत आहेत. कोण किती जागा लढवणार, याचा फॉर्म्युला अजून फायनल झाला नाहीये. असं असताना भाजप १५० तर शिंदे गट १०० जागा लढण्यावर ठाम आहे. या दोन पक्षांच्या रस्सीखेचात अजित पवार गट मात्र बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे. लोकसभेचा परफॉरमन्स पाहता विधानसभेला अजित पवार गटाच्या अनेक जागा मायनस होऊ शकतात, असं बोललं जातंय. लोकसभेत फटका बसल्यानंतर अजित पवारांनी पिंक पॉलिटीक्स करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्यभर जनसन्मान यात्रा काढत माझी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला. पण त्यांनी केलेल्या इव्हेंटबाजीमुळे याचा इम्पॅक्ट निगेटीव्ह झाल्याची चर्चा आहे. शिवाय मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. मावळमध्ये अजित पवार गटाला मदत करायची नाही.
    वेळ पडली तर तुतारीला साथ द्यायची, असा प्रचार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय, असा आरोप शेळके यांनी केलाय. एकूणच युतीच्या राजकारणात अजित पवार गटाच्या अडचणी वाढताना दिसतायत. हे कमी होतं म्हणून की काय आता ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांनी डाव टाकल्याची चर्चा आहे. त्यांनी घड्याळ चिन्ह गोठवण्यासाठी न्यायालयात धाव घेतलीय. यामुळे अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता घड्याळ चिन्ह गोठवलं जाऊ शकतं का? चिन्ह गोठवलं तर याचा फटका अजित पवार गटाला कसा बसू शकतो? अजित पवारांसमोर नेमक्या अडचणी काय आहेत? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 55

  • @dnyaneshwarpoul8348
    @dnyaneshwarpoul8348 3 часа назад +52

    वस्तादाचा हा डाव बसला तर दादांचा बाजारच उठला म्हणून समजा...धोबी का कुत्ता न घरका न घाट का असं होणार..😂😅

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 44 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @sushant518
    @sushant518 2 часа назад +24

    अजित पवार be like - सगळी जण माझीच का मारत आहे, 😂

    • @ramchandramanjare4806
      @ramchandramanjare4806 Час назад +1

      महाशक्ती पाठीशी नाही दादाच्या.......

  • @RakshaPatil-u8z
    @RakshaPatil-u8z 3 часа назад +10

    डाव चांगला आहे पण असे काही होईल याची शक्यता कमीच आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप लगेच नाही करणार आणि त्यात लोकसभा निवडणूक झाली असताना अशी मागणी आता करणे तुर्तास तरी काही उपयोगी होणार नाही.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 часа назад +12

    सुप्रिम न्यायालयाने पण अजित पवारला नविन चिन्ह निवडा असं म्हटलं आहे

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 44 минуты назад

      असं काय झालं नाही आहे

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 часа назад +6

    एका समाजाच्या मतदानावर निवडणूक जिंकता येत का???

  • @omprakashgandhi256
    @omprakashgandhi256 2 часа назад +6

    यामागे अदृश शक्ती देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 часа назад +12

    एकच वस्ताद पवार साहेब फक्त

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 44 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @sandipwable4062
    @sandipwable4062 2 часа назад +6

    Khup Chan Boltey Aarti 👍

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 44 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @tusharsangale380
    @tusharsangale380 Час назад +1

    तुतारीला गोडवा महाराष्ट्र मध्ये सध्या ची परिस्थिती त्याला एक च माणूस जबाबदार आहे, फक्त आणि फक्त वादविवाद लावणे.
    समाजामध्ये फुट पाडणे.
    एक तरूण मतदार....‌ जायाला जे करायचे ते करा

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 часа назад +10

    काही होणार नाही.निवडणूक आयोग मोदी शहा ची बटीक आहे......

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 43 минуты назад

      आणि तू शरद पवारचा बटिक आहे

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Час назад

    वस्तादाचा.कोपच्यातला.डाव.बाहेर.निघाला.आता.चितपटच

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Час назад +1

    आयत्या पिठावर रांगोळी काढणारे दोन माणसे म्हणजे.... एकनाथ शिंदे अणि अजित पवार

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 2 часа назад +11

    मिधेचे पण धनुष्यबाण गोठवा

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i Час назад

      आणि उध्या च पण,, बाळासाहेब हेच खरे शिवसैनिक होते,, हिरवा उद्धू नव्हे

  • @ganeshgunjal8785
    @ganeshgunjal8785 Час назад +1

    जे असेल ते असेल मी राजकीय माणूस नाही पण मागच्या 50 वर्षात निवडणूक आली की एकाच नावभोवती निवडणूक फिरते ती म्हणजे शरद गोविंदराव पवार..❤

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 43 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 21 минуту назад

    सरन्यायाधीश च्या घरी कोण जाते या वरून समजते विरोधात काही च होणार नाही

  • @jytr-z5j
    @jytr-z5j 3 часа назад +3

    Fake Narrative

  • @yt10107
    @yt10107 3 часа назад +6

    ❤❤वस्ताद❤❤

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i Час назад

      नास्तिक हिंदुद्रोही माणसाला तुम्ही वस्ताद का म्हणता बर??/तेवढ्या लायकीचा माणूस पण पाहिजे ना

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 43 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @pradeepdeshmukh8728
    @pradeepdeshmukh8728 Час назад

    शरद पवारांच्या जागा आल्या काय किंवा अजीत दादांच्या पण कांग्रेस संपली पाहिजे

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b 33 минуты назад

    Ho

  • @ra8208
    @ra8208 Час назад

    जर हा डाव जर खरा झालं तर अजित आला कळेल कि एक वेळ ED cbi मागे लागली असती तर चालला असत पण काका नको

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 43 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 часа назад +1

    काय होणार नाही न्याय व्यवस्था मॅनेज आहे

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane Час назад +2

    लय जणांचा बाजार उठणार ....... 1000%

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Час назад

    वस्ताद जळगाव मधे बाहुला झालाय हे दिसत नाही अंधभक्तना...एकनाथ खडसे चा जाब विचारायचा ताकद आहे काय 😂

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 42 минуты назад

      शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू
      चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Час назад

    अरे भिडू कसला परफॉर्मन्स कमी आहे त्या अजित पवार चा 4 पैकी 1 जागा, आणि कमळाच्या 28 पैकी 9 जागा आहेत. करा हिशोब

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 часа назад +7

    शरद पवार ची जायची वेळ आली पण म्हाताऱ्याला राजकीय मोह सुटेना त्या सुप्रिया पेक्षा अजित काहिक पटीने योग्य नेतृत्व करु शकतो

    • @GanpatGaikwad-l7v
      @GanpatGaikwad-l7v 2 часа назад

      मग साग जाउन

    • @sagarkadam572
      @sagarkadam572 Час назад +2

      विषय सत्तेच्या मोहाचा नाही,विषय इज्जतेचा आहे.जेंव्हा तुझ्यासोबत असा दगाफटका झाला असता तरी तू पण तेच केले असतेस.

    • @Shinde1999
      @Shinde1999 Час назад +2

      दोन्ही पवार एकच आहेत ही फक्त नाटके आहेत, यामुळे बीजेपी जास्त damage झालिये, गेल्या लोकसभेत 23 खासदार जिंकणारी बीजेपी आज 3 नंबरवर गेली.

  • @ashokmarathe8296
    @ashokmarathe8296 Час назад

    भारतीय न्याय व्यवस्था...😂😂😂

  • @pradeepdeshmukh8728
    @pradeepdeshmukh8728 Час назад

    टारगेट फक्त कांग्रेस पाहिजे

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 часа назад +3

    मेकअप 😂😂😂😂