Runanubandhachya with Lyrics | ऋणानुबंधाच्या | PT. Kumar Gandharva Vani Jairam | Marathi Bhavgeet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 951

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +35

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen

    • @shashikantthavai1287
      @shashikantthavai1287 Год назад +1

      Birthday Thamboli letters>

    • @shashikantthavai1287
      @shashikantthavai1287 Год назад +1

      Big thing

    • @alkakandhare9971
      @alkakandhare9971 Год назад

      ​@@shashikantthavai1287🎉🎉🎉🎉🎉🎉zzxzzzz🎉zzzzzzz🎉🎉zzzzzzzzzzz🎉zzzzz🎉🎉🎉🎉🎉,🎉🎉,,zzzzzzzzzzzzzzz🎉🎉🎉zx🎉🎉😀😀😂😀😂❤❤👰?🎉

    • @avani.bhongale
      @avani.bhongale Год назад

      ​@@shashikantthavai128798😊😊😊😅😅😅😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @babanshinde5007
      @babanshinde5007 Год назад +1

      ​@@shashikantthavai1287q❤aa❤wà

  • @bubblesmusic4761
    @bubblesmusic4761 2 года назад +401

    एवढ्या कमेन्ट वाचल्या पण कवीचे आणि संगीतकारा चे कौतुक नाही दिसले.. कवी बाळ कोल्हटकर आणि संगीतकार वसंत देसाई यांच्या सुंदर रचना आणि साज चढवलाय कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी. अप्रतिम स्वर्गीय आनंद

    • @rajeshjoshi4558
      @rajeshjoshi4558 2 года назад +7

      Avadi बरोबर

    • @pravintribhuwan8294
      @pravintribhuwan8294 Год назад +7

      खरच खुप छान रचना आणि संगीत .

    • @pravintribhuwan8294
      @pravintribhuwan8294 Год назад +7

      खरच खुप छान रचना आणि संगीत .

    • @dr.gslavekarlavekar1877
      @dr.gslavekarlavekar1877 Год назад +6

      ह्या गाण्याला भाषेचे बंधन नाही, सर्वाना नेहमी आवडणारे गाणे

    • @subhashborekar2586
      @subhashborekar2586 Год назад +3

      No one can describe vibes of song❤️

  • @VISHNUDESAI-q7d
    @VISHNUDESAI-q7d 8 месяцев назад +20

    खरोखरच हे गाणं ऐकून 1975 साल चा काळ आठवण आला मी 12 वर्षांचा असताना गावात नाटकाच्या स्टेज लावलेल्या करण्यातुन या गाण्याचे 2 मैलांवर जरी आवाज कानावर पडला कि मन प्रसन्न होते असे आज गान ऐकताना ते बालपण आठवत धन्य ते गीतकार, संगीतकार व गायक

  • @rajeshambardekar4847
    @rajeshambardekar4847 Год назад +67

    रचना :- बाळ कोल्हटकर , संगीत ( चाल) :- वसंत देसाई , स्वर :- शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली ( कुमार गंधर्व) आणि वाणी ताई जयराम , किती सुंदर संगम आहे , ऐकून कान तृप्त झाले , चौघांच्याही चरणी ते जिथे असतील तिथे येथूनच साष्टांग नमस्कार , यापैकी कोणीही आता आपल्यात नाहीत , पण गाण्याच्या रुपात मात्र आहेत , धन्य आहेत ती सर्व व्यक्ती

    • @RaviPatait
      @RaviPatait 5 месяцев назад +3

      धन्यवाद सर. कुमार गंधर्व यांचे पूर्ण नाव माहित नव्हते मला

    • @RaviPatait
      @RaviPatait 5 месяцев назад

      रोज एकतो मी हे गाणे.मन नाही भरत

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Год назад +43

    मूळ कर्नाटकचे कुमार जी आणि आंध्रच्या वाणी जयराम यांनी या मराठी गीताला सह्याद्रीच्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. हा महिमा आहे
    प्रांत भाषा प्रदेश भेदांच्या पलिकडे नेवून मने आणि माणसे जोडणाऱ्या संगीत कलेचा... 🙏
    पन्नासहुन अधिक वर्ष झाली तरी ताजेतवाने असणाऱ्या या गीताच्या यशाचे श्रेय ,गीतकार , संगीतकार , आणि गायक कलाकार तिघांनाही
    चढत्या क्रमाने जाते...
    बाळ कोल्हटकर, वसंत देसाई , कुमार जी आणि वाणी जयराम यांना .... 🙏🙏🙏

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 7 месяцев назад

      या मराठी गीताला सह्याद्रीच्या उंचीवर न ठेवता हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

    • @RaviKumar-ii6cb
      @RaviKumar-ii6cb 6 месяцев назад +2

      Vani was Tamilian not Telugu. She has sung in all the 4 southern Indian languages and also can speak in those languages. But her mother tongue was Tamil.

    • @MLanjekar
      @MLanjekar 2 месяца назад +1

      She has sung in several Indian languages (19 languages excluding Sanskrit), such as Kannada, Tamil, Hindi, Telugu, Malayalam, Marathi, Odia,[8] Gujarati, Haryanvi, Assamese, Tulu, Kashmiri, Bhojpuri, Marwari, Urdu, Konkani, Punjabi and Bengali languages

    • @ashoksalvi6462
      @ashoksalvi6462 Месяц назад

      ऐकताना जराही जाणवत नाही पंडितजी व वानी जयराम अमराठी आहेत🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shriprasad82
    @shriprasad82 2 года назад +19

    देशात झालेला आजपर्यंतचा सर्वात मोठा गायक म्हणजे कुमार गंधर्व जी

  • @prajaktakasegaonkar5848
    @prajaktakasegaonkar5848 2 года назад +52

    हे गाणं ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालो. गाणं ऐकताना कानात कोणीतरी अमृत ओतत आहे असे वाटते. कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. Evergreen !

  • @kamaleshbonavate6003
    @kamaleshbonavate6003 Год назад +13

    आदरणीय संगीतकार वसंत राव देसाई यांनीआदरणीय बाळ कोल्हटकर यांच्या शब्दांना सुरात गुंफून कुमार गंधर्व यांच्या अप्रतिम आवाजाने आमच्या कानांना अमृत तुल्य गीताने तृप्त केल्याबद्दल मी आणि अनेक भारतीय श्रोते आपले ऋणी आहोत.
    🙏🙏🙏त्रिवार नमन💐💐💐💐

  • @sureshlothe8964
    @sureshlothe8964 3 года назад +77

    भारतीय शास्त्रीय संगीत याला भूतलावर जोड नाही, अप्रतिम गीत यापुढे असे होणे नाही.
    गीतकार व गीतगायक यांना नमन.

  • @jitendrabhosale3400
    @jitendrabhosale3400 5 лет назад +147

    कुमार गंधर्व फुफ्फुसात बिघाड झाले तरीही एवढे बेफाम आफाट गायाचे खरच प्रणाम त्यांना

  • @deepalisabnis8048
    @deepalisabnis8048 4 года назад +267

    खरंच गेल्या 50 वर्ष पासून हे गाणे जीवनाची अवीट गोडी सांगते.मन खूप प्रसन्न होते.माझ्या आजोळ दिवाळीत पहाटे माझा मामा लावायचा

    • @mandasuryawanshi4073
      @mandasuryawanshi4073 3 года назад +4

      Juni gani juni hotach nahi te Gayak sarvach June kalakar Amar ahet kalechya rupane aj hi toch anana detat

    • @adventureisland7049
      @adventureisland7049 3 года назад +3

      tai..kiti saal chi gosht sangat ahat? tabakadi var aikayche?

    • @pamg2628
      @pamg2628 3 года назад +7

      Same here Deepali. I used to hear this song at my Aaji's house in Pune- maybe 35 years ago. Remembered those simple days with Aaji, cousins, mama, mami... Great memories.

    • @amolpathak199
      @amolpathak199 3 года назад +4

      वाह...काय स्वर्गसुख अनुभवत असाल.

    • @siddaramappamundase3210
      @siddaramappamundase3210 2 года назад +1

      Hah

  • @gautammangaonkar7537
    @gautammangaonkar7537 6 месяцев назад +12

    आमच्या गेट टुगेदर साठी हे गाणे मी पसंत केले आम्ही मित्र मैत्रीण खूप वर्षा नंतर भेटलो सर्वाना खुप आवडले हे गाणे...

  • @nareshmane787
    @nareshmane787 3 года назад +81

    कितीही वेळा ऐका.... एक तृष्णा नेहमीच जाणवते.
    कधी काळी लहानपणी रेडिओवर ऐकलंल हे गीत आज पुन्हा त्या सुवर्ण काळात घेऊन गेलं.

  • @Prism123
    @Prism123 3 года назад +78

    आजच्या काळातल्या तळपायतली शिर मस्तकात जावी अशी बेसूर गाणी या जुन्या गाण्यांसमोर क्षणभरही टिकू शकणार नाहीत... गंधर्वांची एक मनोहारी आलाप आजच्या आदर्श, अजय, अरिजित सगळ्यांना विरघळून टाकण्यास समर्थ आहे.... साक्षात स्वर्ग अवतरतो खरच!!!

    • @aksht9781
      @aksht9781 Год назад +4

      कारण आजकाल च्या पिढीची tasteच इतकी खालच्या स्तराला गेली आहे की काही करून परत येऊ शकत नाही... म्हणजे point of no return सारख... आणि मी आज काल च्या पिढीतल्या आहे... पण मला जुनेच सोने वाटते...

    • @uniquerecipies843
      @uniquerecipies843 Год назад +3

      आता Autotune वापरून shembd पोरग पण गाणं म्हणेल पण त्या काळात असले फिल्टर्स autotune काहीच नव्हते पण काय सुंदर आणि सुरात गाणी असायची❤❤

    • @ChandrakantDombe
      @ChandrakantDombe 3 месяца назад +1

      अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत त्या काळात संगीताचे आधुनिक साहित्य नसताना इतके सुंदर संगीत,चाल,गायण हे आजच्या पिढीला नाही समजणार

  • @rdave3598
    @rdave3598 3 года назад +70

    नेहमी हे गाणे ऐकून मला बालपणीच्या विविध-भारतीची आठवण होते...अप्रतिम...

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe Год назад +17

    हे गाणं ऐकायला 'कितीदा आलो, गेलो, रमलो'...!
    भेटीत तृष्टता मोठी...!

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 года назад +58

    काय लिहावे ते सुचतच नाही...!! अप्रतिम ...!! 1974-75 चा कालखंड डोळ्यासमोर उभा राहिला...!!

  • @pramodnerle11
    @pramodnerle11 Год назад +11

    अप्रतिम गाणे!
    लहानपणी आम्ही आकाशवाणीवर हे गाणं जवळपास दररोज उठल्यावर न चुकता ऐकत असू; त्यावेळी आकाशवाणी हे असं एकमेव साधन होत जे प्रत्येकाच्या घरोघरी व मनोमनी जोडलं गेलं होत. बालकाला आई जशी गुठी पाजवल्याने त्याचे शरीर सुदृढ व निरोगी बनतं;तसं असंख्य मराठी संगीत प्रेमींची मने ही समृध्द व निर्मळ या व अशा अनेक समकालीन गाण्यांच्या गुठीने बनली.
    या गाण्याची रचना ही बाळ कोल्हटकर यांनी केली तर यास स्वरसाज पंडीत कुमार गंधर्व व वाणी जयराम यांनी चढवला तर संगीत वसंत देसाई यांनी दिले. या सर्वांच्या प्रयत्नातून साकारलेली ही रचना आजही तमाम मराठी संगीतप्रेमी लोकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे.❤❤❤

  • @rajendrabhorade6780
    @rajendrabhorade6780 2 года назад +39

    गेल्या चाळीस वर्षांपासून हे गाणे ऐकत आहे आणि यापुढेही ऐकत राहणार आहे. गाण्यातील गोडी अजरामर आहे.

  • @nitindhande7911
    @nitindhande7911 7 месяцев назад +11

    हे गाणं ऐकताना डोळ्यात अश्रू येतात अप्रतिम गाणं आहे लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि आणि 50 वर्षात पर्यंत ऐकत आहे

  • @raghunandan0420
    @raghunandan0420 3 года назад +43

    आमचे आणि ह्या कलाकारांचे देवाने।ऋणानुबंध लिहून ठेवले म्हणून हा स्वर्गीय आनंद आम्हाला लाभला

  • @pari3290
    @pari3290 3 года назад +90

    हे गाणे कधीही , केव्हाही... कोणत्याही वेळी ऐका...गाणे एकाताना गाण्याचा प्रेमात पडणारच...असे हे सुंदर गाणं आहे...

  • @krishnapatil1008
    @krishnapatil1008 2 года назад +4

    माझे वय तसे लहान आहे आता ४० च्या जवळपास पोचलो आहे पण हे गाणे जेव्हा मी बालवयात ऐकायचो मन शांत आणि स्थिर व्हायचे🙏 खूप छान वाटते अजूनही गाणं ऐकताना❤️❤️

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 Год назад +18

    अप्रतिम..अगदी सा.सन 1976 ला प्रथम ऐकले तेंव्हापासून आजतागायत..आणि...आजन्म आवड कायमच राहील असे मधूर सुंदर गीत संगीत.. 🌹🌹👏🙏😊

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 4 года назад +125

    खुप सुंदर गाणे आहे थोर महान जेष्ठ दिग्गज मातब्बर गायक गायिका यांनी स्वगींय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 🙏 💐 🌹 🌺 🌸 🍀 🍁 🌻 🌾 🍂 🌺

  • @ankushambavkar5942
    @ankushambavkar5942 4 года назад +80

    आम्ही भाग्यवान आहोत.... हे अप्रतिम शब्द ...हा आवाज... आम्हाला ऐकायला मिळाला...💐💐💐💐💐

  • @aniruddhadeshmukh6718
    @aniruddhadeshmukh6718 4 года назад +181

    अप्रतिम,,,, गंधर्व म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गातून च देवांनी यांना पृथ्वीतलावर धाडले,,,, केवळ आम्हा भारतीयांना स्वर्गीय सुख देण्यासाठी,,,,,, अशी स्वर्गीय अनुभूती,, केवळ गंधर्व च देतील,,,

    • @sharnappakhelage1148
      @sharnappakhelage1148 3 года назад +4

      मधुर शास्त्रीय संगीत

    • @yashwantpadade1267
      @yashwantpadade1267 3 года назад

      Apratim

    • @hemantendait9278
      @hemantendait9278 3 года назад +1

      @@yashwantpadade1267 n

    • @hemantendait9278
      @hemantendait9278 3 года назад +1

      @@yashwantpadade1267 jnn

    • @balwantmanglekar9321
      @balwantmanglekar9321 3 года назад

      @@sharnappakhelage1148 xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxz 🙏🙏

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 Год назад +3

    आपण कोणा एका च कौतुक नाही करू शकत. जर आपण एका च कौतूक केलं तर तो दुसऱ्या वरती अन्याय म्हणून पूर्वीचे जे गीतकार संगीतकार गायक वादक जे काय असते निवेदक अप्रतिम होते आणि त्यांची तुलना आपण कोणाशीही करू शकत आणि आपल्याला ही एक सुवर्ण देणगी हे सुवर्ण ठेवावे आणि ही ठेवा आपण जतन केली.
    गाडी किती अप्रतिम होती आजही आपण ऐकतोय आवडीने. किती वेळा तरी येत नाही आपल्याला कुठे बोर ही होत नाही.
    अशी ही सुंदर ठेव अनमोल ठेव ज्याला शब्द सुद्धा नाहीत आपल्याला बोलण्याकरीता धन्यवाद.

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 3 года назад +56

    कितीतरी वेळा ऐकल हे गीत, पण मन भरले नाही कधी. अत्रुप्त आनंदाची अनुभूती।

    • @Kartikee_
      @Kartikee_ 2 года назад

      अगदी बरोबर

    • @grajashree9490
      @grajashree9490 2 года назад

      खूप खूप गोड संगीत आनेक वर्ष झाली आहे तरी गोडी तीच आहे खरच पूर्वी ची आठवण,आविट गोडी

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 3 года назад +29

    शब्दच अपुरे आहेत,किती लिहलं तरी , हे अजरामर आहे एवढंच म्हणेन...गंधर्व...👌

  • @sanjaykulkarni485
    @sanjaykulkarni485 3 года назад +38

    कितीही वेळा ऐकले प्रत्येक वेळी वेगळीच तृष्टता मिळते. गंधर्व म्हणजे दैवी देणगी....👌👍💐💐

  • @sureshshikhare9827
    @sureshshikhare9827 2 года назад +41

    अप्रतिम गीत . कितीही ऐकले तरीही परत परत ऐकावे असे गीत . गीतकार व गायक यांना कोटी कोटी प्रणाम .

    • @jyotimogde9388
      @jyotimogde9388 Год назад +1

      अप्रतिम गीत. नेहमी ऐकावेसे वाटते सुमधूर आवाज सुंदर संगीत

    • @vaishalipatelmixpoetry2024
      @vaishalipatelmixpoetry2024 Год назад

      अतिशय सुंदर

    • @jyotimhatre7088
      @jyotimhatre7088 8 месяцев назад

      Atishay sunder madhur avaj balpanat gelo asa vatata amche kaka lavache he gane

  • @prakashshinde6035
    @prakashshinde6035 2 года назад +9

    माझ्या माहिती प्रमाणे हे सुंदर कर्णमधुर गीत देव दीना घरी धावला या नाटकातील आहे मी लहान असताना आमचे आईबाबा या नाटकाला गेले होते व तेंव्हापासून मी ऐकतो आणि आज ही अगदी मनापासुन ऐकतो अतिसुंदर रचना आणि आवाज

  • @shalakatamse3977
    @shalakatamse3977 4 года назад +196

    🙏अप्रतिम हे गाणे जेव्हा पण एेकते संपूच नये असे वाटते! धन्य आपले पंडित कुमार गंधर्वजी आणि वाणी जयराम😍🙏🙏🙏👍

    • @mandarkulkarni6630
      @mandarkulkarni6630 3 года назад +1

      Chaytanya Maharaj pravchan

    • @sanjaykoratkar1173
      @sanjaykoratkar1173 3 года назад +2

      शब्द रचना संगीत व स्वर स्व. पण्डित कुमार गंधर्व यानी ही रचना चीरकाल व चिरतरुन ठेवाली.. अवीट गोडी 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

    • @pradnyamohadkar3153
      @pradnyamohadkar3153 3 года назад

      Apratim sunder Shri Kumar Gandarva and Vani jayram bahut khub👍👍👍🙏🙏

    • @ramchandraghadigaonkar7429
      @ramchandraghadigaonkar7429 3 года назад

      @@mandarkulkarni6630 ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

    • @ramchandraghadigaonkar7429
      @ramchandraghadigaonkar7429 3 года назад

      @@mandarkulkarni6630 ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

  • @t.pravin3275
    @t.pravin3275 4 месяца назад +7

    माझ्या स्वर्गीय वडिलांचे एक आवडते अविस्मरणीय गाणे ❤

  • @kantchendkale5577
    @kantchendkale5577 3 года назад +56

    खुपच सुंदर गीत आवाजात जादू आहे कुमार गंधर्व म्हणजे स्वर्गीय आनंद देऊन जातात.

    • @sahilambawade8636
      @sahilambawade8636 2 года назад +1

      पूर्वी रेडिओ वर कधीतरी हे ऐकलं होत. आता खूप वर्षांनी व्यक्ती कि वल्ली पाहताना एक ओळ ऐकली आणि पुन्हा संपूर्ण गाणं ऐकावंसं वाटले. खूपच श्रवनीय गाणे

    • @nilimaamle5057
      @nilimaamle5057 Год назад

      खूपछान अवीट गोडी

  • @skwankhade2183
    @skwankhade2183 Год назад +3

    न भुतो न भविष्यति अशी अप्रतिम रचना !

  • @sharadkaldante6517
    @sharadkaldante6517 4 года назад +94

    "कितीही वेळा ऐकले तरीही मन तृप्त होत नाही"!!...

  • @ujwalkumarbhatkar7233
    @ujwalkumarbhatkar7233 5 лет назад +92

    अद्भुत अप्रतिम गीत संगीत गायकी....रुणानुबंधाच्या.....गाठी...यात गाठी हा शब्द अशा अप्रतिम पध्दतीने म्हटला की ह्या भावनिक संकल्पनेला मुर्त रुप प्राप्त झाले...कधी गहिवरलो....यातला गहिवर हा स्पष्ट जाणवतो तर धुसफुसलो....काय बोलावे...शब्दही थिटे पडतात.वाणी जयराम यांनी फक्त पीचमधुन व्यक्त केलेला खट्याळपणा सर्व काही अद्भुत ...जर संत ज्ञानेश्वर माऊली माय मराठिच्या मस्तकावरील मुकुट आहेत तर ही अद्वितिय मंडळी मायमराठिच्या गळ्यातिल ताईत नक्कीच आहेत.

    • @mrunu5820
      @mrunu5820 4 года назад +1

      अध्भूत

    • @virajequip5041
      @virajequip5041 4 года назад +1

      Spot on..... प्रत्येक शब्द आणि सूर अप्रतिम....

    • @shobhabaderdinni6764
      @shobhabaderdinni6764 4 года назад +1

      Nmdte sada vastly matru bhum

    • @shekharpadhye1085
      @shekharpadhye1085 3 года назад +2

      मराठी भाषा न कळणारयाला सुध्दा अर्थ कळेल

  • @pralhadpatil1938
    @pralhadpatil1938 2 года назад +14

    खऱ्या भावना खरे प्रेम याचा सुवर्ण संगम कधीही न तुटणारा ऋणानुबंध

  • @jyotim7859
    @jyotim7859 Год назад +13

    भावपूर्ण श्रद्धांजली वाणी जयराम ताई.खूप सुंदर आवाज होता तुमचा.🙏

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Год назад +7

    भावपूर्ण श्रद्धांजली वाणी जयराम जी यांना. खूप गोड आवाज होता तुमचा.

  • @exonysis8252
    @exonysis8252 3 года назад +8

    👏👏👏👏👏 स्वर्ग कधी पाहिला नाही, पण हे गाणे ऐकल्यावर असे वाटते की जणू आपण स्वर्गामध्ये आहे वाटते....

  • @sudhirdattaramdalvi5226
    @sudhirdattaramdalvi5226 3 года назад +30

    अप्रतिम हे गाणे ! धन्य आपले पंडित कुमार गंधर्वजी आणि वाणी जयराम

  • @latalokare1869
    @latalokare1869 Год назад +1

    Mala hya ganyne balpaniche divas athvtat khup radavas vatte khup sundar awaj v ganyche shabdh aheyt thanku

  • @sanjeevdhakre1832
    @sanjeevdhakre1832 Месяц назад +3

    ह्यया गीताच्या भावना प्रत्येक्ष भावना प्रधान करताना भास होतो खास नवरा बायको च्या भावना समजुन घेतल्या जात नाहीत... ❤❤

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 3 года назад +2

    मी अगदी ५,६ वर्षांची असेल तेव्हा पासून हे गाणे ऐंकत आलेली आहे . आमच्या गावात ग्रामपंचायतीत सकाळी सकाळी हे गाणे रेडिओवर लावलेले असे आणि तेव्हा पासून पाठ झालेले आहे . तेव्हा अर्थ कळत नव्हता फक्त चाल आवडत होती . नंतर कळले की हे बाळ कोल्हटकरांचे नाट्य गीत आहे . धन्य ते कोल्हटकर
    शतश: प्रणाम 🙏🌹

  • @prashantsalunkhe992
    @prashantsalunkhe992 Год назад +3

    खरोखरच जूनी गाणी सतत ऐकावीत वाटतात जुन्या गाण्यातुन अर्थ बोध समजतो . म्हणूनच जुने तेच सोने
    अप्रतीम गाणे त्यांचे लेखक,संगीतकार,गायक, सादरकर्ते सर्वाचे करावे तेवढे कौतुक कमीच.🙏

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 года назад +87

    हा स्वरविलास कधी संपूच नये.......👌

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 3 года назад +28

    हृणानीबंधाच्या गाठी असल्यामुळेच अशे अद्वितीय गाणे आज आपणास पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत आहे !!!
    कधी धुस्फुसलो !!!!!❤️❤️❤️

  • @vitthalmahalle988
    @vitthalmahalle988 3 года назад +16

    अमूल्य ठेवा. हे एक गीत आहे जे पुनःपुनः ऐकल्याशिवाय राहवत नाही .जेवढे ऐकाल तेवढी त्याची गोडी वाढते .

  • @tejashreekolhe2618
    @tejashreekolhe2618 4 года назад +50

    गाण्यातील आयुष्याचा अर्थ समावणारे भाव.., सूर.., आलाप....👍

    • @satyanarayanagrawal4323
      @satyanarayanagrawal4323 2 года назад

      जन्मोजन्मी तूम्हीच यांवें '****" भेटींत त्रुप्तता मोठीं . गाण्यात त्रूप्तता मोठीं

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 4 года назад +19

    ही नाती व आवड दैवी व Pre ordained
    असतात ! म्हणून क्षणात हृदयात बसतात
    ठाण मांडून शाश्वत !
    Poetry is the Besst words in the Best Order sirs n Ma ms !

  • @sunilshinde1971
    @sunilshinde1971 Месяц назад +4

    या गाण्यामुळे 50 वर्षांपूर्वी लग्नातील जेवणाची पंगत व सांजा आणि शाकभाजी याची आठवण येते

  • @ashishrane117
    @ashishrane117 2 года назад +1

    aai chya aawadatya ganyanmadhun aamhala he abhijaat aani apratim sangeet anubhavaila milal.....dhanyavad aai

  • @prakashjoshi3295
    @prakashjoshi3295 4 года назад +47

    अविस्मरणीय रचना आणि गायन :--कुमार गंधर्व आणि आणि वाणी जयराम.

  • @jayashshirdhone2895
    @jayashshirdhone2895 3 года назад +24

    खुपच सुंदर गाणे आहे.त्यातील भाव मनापासून गायले आहेत. अप्रतिम.. ऐकून समाधान होत नाही .

  • @shivnarayanbhise2739
    @shivnarayanbhise2739 4 года назад +54

    जवळ जवळ 20ते25 वर्षापासून हे गित ऐकताय पण गोडवा अगदी तोच आहे

  • @sahilsable2061
    @sahilsable2061 3 года назад +34

    These singers first sang for humans now they are in heaven singing for God

  • @dinesh01ful
    @dinesh01ful 5 лет назад +266

    कलेसाठी वेडी असलेली लोकं... असे गायक परत होणे नाही... जय महाराष्ट्र

    • @ratnakarkulkarni1742
      @ratnakarkulkarni1742 4 года назад +9

      सर मी लहानपणी आमच्या गावात गणपती मदिंर आहे . हे सकाऴी ठिक पाच लाऊड स्पीकर लागयचे. तेव्हा पासुन आवडत हे गाणे .

    • @justinvack4127
      @justinvack4127 4 года назад +1

      @@ratnakarkulkarni1742 llllll

    • @sanjeevzurale1568
      @sanjeevzurale1568 4 года назад +3

      100% True..

    • @shwetakulkarni1727
      @shwetakulkarni1727 3 года назад

      @@ratnakarkulkarni1742 🤣

    • @subhashgonugade3722
      @subhashgonugade3722 3 года назад +1

      🙏

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 2 месяца назад +2

    अजरामर गीत. लहान पणा पासून ऐकतोय गोडी कमी झाले नाही ❤❤

  • @vruddheshwarnagarkar1079
    @vruddheshwarnagarkar1079 3 года назад +14

    शांतपणे गाणे ऐकू वाटते, वारंवार ऐकू वाटते हीच या आवाजाची, शब्दांची ताकत आहे.

  • @deepakkushare8083
    @deepakkushare8083 Год назад

    अतिशयोक्तीपूर्ण म्हणा हवे तर पण अमचा अरुणोदय ह्या मंगलगितां शिवाय होत नव्हताच
    अप्रतिम अविट
    कोल्हटकर, वसंतराव आणी कुमार गंधर्व ही खरोखरीच स्वर्गीय गंधर्वच अवतरले ह्या मही वर

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 3 года назад +25

    आम्ही सुमारे 50 वर्षापासून ऐकत आलो..... खरेच अवीट गोडी....

    • @AL-vs6on
      @AL-vs6on 3 года назад +2

      हेच तर वैशिष्ट्य होतं या थोर लोकांचं. असं काही काम करून ठेवलंय की 50 वर्षांनंतरही ही रचना कानाला तितकीच गोड वाटते.
      नाहीतर आजकालची बॉलिवूडची थिल्लर गाणी.....

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 года назад

      कुमारजी आणि वाणी जयराम ! काय सुंदर गाणं गायलंत हो! जबरदस्त ! फार सुंदर !गाण्यात तुष्टता होती!👌👌🙏🙏👏👏🌹

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 4 года назад +14

    खुप सुंदर कौतुकास्पद गायण,मराठी नाट्यरत्न कुमार गंधर्व आणि वाणी जयराम, जुने ते सोने किती ऐकले तरी पुन्हा ऐकावे असे वाटते,जय महाराष्ट्र 🚩🌹 वन्दे मातरम्।

  • @balajiraogacche7763
    @balajiraogacche7763 2 года назад

    मला कळतय तेंव्हा पासुन मी हे गीत ऐकतोय. त्याची अविटगोडी अजून संपलेली नाही. कदाचीत माझी नात नातु हे गीत ऐकतील ! कीती पीढ्या हे अस्मरणीय गीत ऐकतील याचा अंदाज येत नाही. खुपच छान गीत आहे.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Год назад +3

    कवी ,संगीतकार, गायक या सर्वाचा सुंदर मिलाफ मन प्रसन्न होते ऐकताना मंत्र मुग्ध होउन जातो.

  • @prashantkhemnar3388
    @prashantkhemnar3388 2 года назад +1

    अनेक सुंदर गीतापैकी हे एक सुंदर गीत आहे कितीही वेळी ऐकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते

  • @prashantkarekar4586
    @prashantkarekar4586 Год назад +5

    शब्दात ...आभार मानता येत नाहीत..
    असे हे...
    अमर..
    गीत

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 2 года назад +1

    अप्रतिम,गाणे समजायला लागले तेव्हा पासून परत परत एकावेसे वाटते हे गाणे.तेव्हा शब्दांचा अर्थ कळत नव्हता . आज मात्र शब्द न शब्द कळतो.रेकॉर्ड नंतर रेडिओ,कॅसेट आणि आता तर केव्हाही खूप सोईच झालं आहे 🙏

  • @narayanshinde9822
    @narayanshinde9822 2 года назад +5

    शालेय जीवनात असताना मी हे गीत ऐकलं होतं, तेव्हा पासून आजपर्यंत ऐकतो आहे.... अप्रतिम.. कुमार गंधर्व वाणीजी..

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 22 дня назад

    कुमार साहेबांचे हे दोन गाणी अजरामर आहेत आणि मराठी सौन्दर्यांची खाण आहेत.... उठी उठी गोपाळा व ऋणानुबंधाच्या 🌹🙏

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 4 года назад +23

    हे सूर हृदयात अनाहतनाद निनादवितात !
    We r lifted to Heaven Instsntly !
    Such Singer r Born rarely !
    God s Infinite Attributes to be
    perceived !

    • @navalsingpatil7856
      @navalsingpatil7856 3 года назад +1

      वा!काय अप्रतिम प्रतिक्रिया दिलीत आपण.

    • @prashantkarekar4586
      @prashantkarekar4586 Год назад

      मस्त .... रिप्लाय

  • @kumarmadhale6793
    @kumarmadhale6793 Год назад +1

    ऋणानुधाच्या हे गाणे खूप चांगल्या आवाजात गायिले आहे. हे गाणे मला.30 वर्षे झाली खूप आवडते. मला वाटते कि हे गाणे प्रत्येक गाव चावडीवर सकाळी हे गीत लावावे.

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 3 года назад +6

    खरच आम्ही नशीबवान आहे, हा आवाज ऐकायला मिळतो, पुन्हा पुन्हा ऐकत रहावं वाटतं

  • @प्रकाशटवके
    @प्रकाशटवके 11 месяцев назад +1

    लहानपणी ही गाणी रेडिओ वर लागायची. पन्नास साठ वर्षांपूर्वी कुटुंब मोठी राहायची. मी लहान अहतांना माझ्या मामेभावाचं लग्न झाले. लग्नात आग्रहाखातर त्यानी हे गीत गायले होते.

  • @TheShashin
    @TheShashin Год назад +6

    अवघी गीत निर्मिती च उच्चतम आहे. ह्या गीताच्या सर्वच शिल्पकारांना माझा प्रणाम 🙏

  • @shankarlokhande9148
    @shankarlokhande9148 7 месяцев назад +1

    आता युट्युब मुळे हे गाणं कधीही ऐकता येते, आधी फक्त fm वर हे गाणं ऐकता यायचं, देव दिनाघारी धावला या नाटकातील हे गाणं आहे असं वाटतंय, बाल गंदर्व

  • @paraspatil6731
    @paraspatil6731 2 года назад +2

    आकाशवाणी ला सकाळी सकाळी पहिला चहा घेता घेता हे सुंदर गाणं लागल्यावर दिवस खूप छान जातो.... खरंच खूप भाग्यवान आहोत आपण अश्या लोकांचा सहवास लाभला.

  • @eagleeyenews
    @eagleeyenews 27 дней назад

    जेव्हापासून कानाला सुरांची, शब्दांची जाणीव व्हायला लागली तेव्हापासून हे अवीट गीत ऐकतो आहे. सदाबहार गीत.

  • @ashokshende5095
    @ashokshende5095 2 года назад +7

    Great poet Bal Kolhatkar. Great music director Vasant Desai. Both are stalwarts. I have immense respect for both of them.

  • @eknathsakhare6679
    @eknathsakhare6679 Год назад +8

    अप्रतिम गीत रचना. अणि संगीत. अणि चाल. अणि स्वर..किती वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. 🙏

    • @prashantkarekar4586
      @prashantkarekar4586 Год назад

      कितीही वेळा ऐकलं..
      तरी समाधान होतेच...

    • @balkrishanagarge5999
      @balkrishanagarge5999 Год назад

      खूपच सुंदर रचना स्वर आणि संगीत सुधा

  • @manishb395
    @manishb395 3 года назад +12

    या जन्मी भेट नाही झाली ...
    पण पुढच्या जन्मी होईलच ...
    वेटिंग फॉर यू फोर एवर .....
    😪😪😪

  • @ramaniyer9469
    @ramaniyer9469 Год назад +4

    Vani Jairam a very talented apratim voice. A classical singer par excellence. Dil choo Gaya yeh old song Aaj bhi. Tribute to u Vani Amma.

  • @prakashpatil9312
    @prakashpatil9312 Год назад +1

    प्रकाश पाटील कुभोज खूपच छान न विसरता येणारी आठवणी

  • @mukunddeshpande1728
    @mukunddeshpande1728 3 года назад +30

    Immortal song . Must have enjoyed listening this song thousands of times but every time there treat to ears . Simply cant get bored of this song anytime .

  • @maheshshinde3575
    @maheshshinde3575 2 года назад +2

    आजही या गाण्याला तोड नाही सकाळ ची सुरुवात सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही एकदा ऐका मोहात पडाल......

  • @ND-jw1xj
    @ND-jw1xj 3 года назад +46

    Calm atmosphere + rain 🌧️ + this song + ☕ Tea
    *MOST BEAUTIFUL TIME*

    • @sunilkumarmpande4774
      @sunilkumarmpande4774 2 года назад +3

      + kanda bhajji (fritters)

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 года назад

      Calm atmosphere+ Rain + Tea + Pakode= स्वर्गीय अनुभूती 🌹🌹

  • @RameshBagade-gc4xv
    @RameshBagade-gc4xv 4 месяца назад

    माझ्या दुकानात सांज वेळी दिवा लावल्या नंतर दररोज मी हे ऐकतो मनाला फार आनंद मिळतो.

  • @bhagyashreevaishampayan4592
    @bhagyashreevaishampayan4592 5 лет назад +32

    ऐकतच राहावे वाटते...खूप सुंदर

  • @insuranceadviser8318
    @insuranceadviser8318 2 месяца назад

    खरंच असे कलाकार होणें हे आमचे परम भाग्य आहे अश्या रचना म्हणजे एक पर्वणीच आहे.👍👍

  • @vinodc198
    @vinodc198 Год назад +2

    साक्षात गंधर्व गात असल्याचा भास होतोय. स्वर्गीय आनंद........

  • @sunilgharkar534
    @sunilgharkar534 2 года назад

    खूपच सुंदर, दररोज किती वेळा एकले तरी पोट भरत नाही.

  • @seemaghule9313
    @seemaghule9313 3 года назад +25

    I often used to hear this song in every diwali from my childhood. Today is lakshmipuja n narakchaturthi, I'm listening this song n enjoying it.

  • @chandangandhi5581
    @chandangandhi5581 6 месяцев назад

    अप्रतिम अविस्मरणिय, धुंद गाणि संपूर्णं समूहास नमन.

  • @sujayparrikar5047
    @sujayparrikar5047 Год назад +4

    Mesmerising.
    I still remembers the day I have heard this song on loud speaker in 1972 on ring cwremony of my relative .I was 5 years old that time,abd still enjoying this song."Kadhi Dhusfuslo ,kashi Gahivarlo"

  • @AshokDewarkar
    @AshokDewarkar Месяц назад

    अप्रतिम ते अप्रितम च माझ्याकडे शब्दच नाही धन्य हो त्या सर्वांचे जे आता आपल्यात जवळच असल्याचा भास प्रत्यक्ष प्रत्येकाला होतोच कान एकदम अमृता प्रमाणे तुप्त होतात धन्य होत्या सर्वांचेच शब्दच नाही शब्द अपूरे पडतात .

  • @veerkudale2474
    @veerkudale2474 4 года назад +28

    कुमार गंधर्व यांच्या अप्रतिम आवाजाला मानाचा मुजरा 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @udaygokhale8286
    @udaygokhale8286 17 дней назад

    Vani Jairam ji hyancha awaz jadumai ahe..tya मूळच्या केरळ च्या आहेत पण मराठी उच्चार किती स्पष्टं आहेत...❤❤❤

  • @rohinibhoir5643
    @rohinibhoir5643 Год назад +3

    Marathi song sung by great singer vani jairam.... Bharatratna