मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती - डॉ. आ. ह. साळुंखे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2018
  • मनुस्मृती हा कायद्याचा व नीतिनियमांचा जगातील आद्य ग्रंथ आहे अशा प्रकारे अनेकदा तिचा गौरव केला जातो. पण हा गौरव करताना ऐतिहासिक प्रक्रिया सामान्यत: ध्यानात घेतली जात नाही. वस्तुतः जो ग्रंथ आद्य असेल तो अनेक त्रुटींंनी युक्त असण्याची शक्यता आपण मान्य केली पाहिजे. काळाच्या ओघात पुढचे ग्रंथ अधिक विकसित, परिपक्व व परिपूर्ण होणे योग्य म्हटले पाहिजे. परंतु मनुस्मृतीला आद्य ग्रंथ म्हणणाऱ्यांची भूमिका अशी नसते. एकीकडून त्यांना आद्य म्हणून मनुस्मृतीचा गौरवही करायचा असतो आणि दुसरीकडे ती सर्वश्रेष्ठ म्हणून तिचे गुणगानही करायचे असते. अशा गोष्टींची निर्मिती ईश्वरापर्यंत वा एखाद्या देवतेपर्यंत मागे नेली जात असल्यामुळे त्या गोष्टीला आद्यता व सर्वश्रेष्ठता हे दोन्ही गुण चिकटवण्यात त्यांना कोणतीही विसंगती वाटत नाही. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असू शकत नाहीत.
    ... मनुस्मृती हा कायद्याच्या क्षेत्रातील आद्य ग्रंथ तर नाहीच, पण तो आदर्श वा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असेही म्हणता येत नाही.
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.

Комментарии •