पावसाळ्यातला माथेरान 🏞️ Monsoon Ride to Matheran l Matheran Hill Station In Monsoon Explore Matheran

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Monsoon Ride to Matheran l Matheran Hill Station In Monsoon Explore Matheran
    माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हणले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंट्सना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती पॉईंट्सची नावे इंग्रजीत आहेत.
    माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.
    हवामान
    इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. उन्हाळ्यात २०० ते ३००, तर हिवाळ्यात १५० ते २५० असते. मे महिन्यात संध्याकाळ अल्हाददायक असते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. नुकताच होऊन गेलेल्या पावसानं माथेरान हिरवंगार झालेलं असतं. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. जून ते ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस पडतो. या काळात धुक्याचे साम्राज्य संपूर्ण माथेरानवर असते. सूर्यप्रकाशही फार कमीवेळा दिसतो. अगदी अलिकडेपर्यंत पावसाळ्यात पर्यटक येतच नसत. कारण जून ते सप्टेंबर मध्ये आगगाडी आणि हॉटेल्स बंद असतात. पण आता तरुण आणि प्रेमी युगुलांची या काळातही इथे बऱ्यापैकी गर्दी असते.
    वृक्षसंपदा
    माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित या प्रकारात मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. ह्या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉईंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही.
    प्राणी व पक्षी
    माथेरानमध्ये आढळणाऱ्या प्राणीवर्गात सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते माकडांचे. माकडांप्रमाणेच रानमांजरे, हरणे, ससे हे प्राणी इथे आहेत. शिवाय खालच्या जंगलातून कधीकधी बिबटे देखिल वर येतात; पण त्यांनी माणसांना त्रास दिल्याचे ऐकिवात नाही. क्वचित कधीतरी गाय, शेळी या बिबट्याने मारली, अशी माहिती जवळच्या आदिवासींकडून ऐकायला मिळते.
    येथील पक्षीसृष्टीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट आदि पक्षी आहेत. पॅराडाइज फ्लायकॅचर नावाचा एक पांढराशुभ्र व लांब शेपटी असणारा पक्षी इथे आढळतो.
    इतिहास
    इ.स. 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवरून वर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले.
    Matheran is an automobile-free hill station and a municipal council in the Karjat taluka of the Raigad district located in the Indian state of Maharashtra. Matheran is part of the Mumbai Metropolitan Region, and one of the smallest hill stations in India. It is located in the Western Ghats, at an elevation of around 800 m (2,625 feet) above sea level. It is about 90 km from Mumbai, and 120 km from Pune. This proximity to these urban areas makes it a weekend getaway for many. Matheran, which means "forest on the forehead" (of the mountains) in Marathi, is an eco-sensitive region, declared by the Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India. It is Asia's only automobile-free hill station.
    There are many hotels and Parsi bungalows in the area. Old British colonial architecture is preserved in Matheran.The roads are made of red laterite earth.
    History
    Purple Flowers at Matheran
    Matheran in 1874
    Matheran map of 1911
    Matheran was identified by Hugh Poyntz Malet, the then district collector of Raigad district in the May of 1850. Lord Elphinstone, the then Governor of Bombay laid the foundations of the development as a future hill station. The British developed Matheran as a getaway from the regional summer heat. It is also the birthplace of freedom fighter Veer Bhai Kotwal.
    The Matheran Railway
    The Matheran Hill Railway was built in 1907 by Sir Adamjee Peerbhoy and covers a distance of 20 km (12 mi), through forest land. The railway was inspected by UNESCO officials, but failed to make it to the list of the World Heritage Sites. India's other Hill Railways like the Darjeeling Railway, the Kangra Valley Railway, Nilgiri Mountain Railway are already on the list.

Комментарии • 19

  • @Cineridermrunmay
    @Cineridermrunmay Месяц назад +2

    ek number 😊 nice vlog

  • @milinddheemate3842
    @milinddheemate3842 Месяц назад +1

    Mastach......

  • @sagarmengal1739
    @sagarmengal1739 Месяц назад +2

    Nice video😊❤

  • @rakeshtendulkar4756
    @rakeshtendulkar4756 Месяц назад +1

    Thanks 😊 for covering matheran

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Месяц назад +1

    खुप खुप छान माथेरान चा व्हिडिओ बनविला आणि नितीन भाऊ तुमचे आणि ताईंचे धन्यवाद की तुम्ही मला माथेरान फिरण्यासाठी बोलाविले व्हिडिओ क्लॅरिटी आवाजाची क्लॅरिटी एक नंबर आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा एकदा तरी माथेरान पाहण्यासाठी येऊन जा. 👌👍

    • @allrounder_nitin
      @allrounder_nitin  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏🏻 सर्व तुमच्यामुळे शक्य झालं 🙏🏻

    • @travellingtime7844
      @travellingtime7844 29 дней назад

      भाऊ तुमचे धन्यवाद की तुम्ही मला तुमची सेवा करण्याचा एक चान्स दिला 🙏

  • @marathiroasterofficial
    @marathiroasterofficial Месяц назад +1

    Love from Prashant madhavi vlog meet at jawhar palace ❤❤❤

  • @amitbhingarkar6252
    @amitbhingarkar6252 Месяц назад +1

    Khup Chan Video ❤

  • @krishnanawale2446
    @krishnanawale2446 Месяц назад +1

    Mast khup chan
    Pan madhe madhe aavaj khup Kami yeto

  • @ganeshjadhav-mp1wc
    @ganeshjadhav-mp1wc Месяц назад +1

    Mumbai goa Highway chi update de dada plz