योग पंचविशी १९. संगीत साधना काळानुसार राग आणि चक्र सांगड अलका सराफ.व्हिडिओ निर्मिती श्रीपाद सामंत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • योग पंचविशी या प्रकल्पातील हा उच्चांक बिंदू.गेली साडेचार वर्षे आमच्या तुटपुंज्या तयारीत आम्ही धडपड करीत आहोत .आमची मुले नातवंडे अनेकदा मदतीला धाऊन येतात.
    अपर्णा सामंत च्या परिचयाची अलका सराफ चा वर्षभरापूर्वी योग वर्गात प्रवेश झाला .
    आमच्या भजनवर्गात ही रमू लागल्या.योगायोगाने माझी जुनी विद्यार्थिनी करुणा च्या एका कार्यक्रमासाठी अपर्णा सामंत मला घेऊन गेली.त़्यात अलकाचा सहभाग होता.सहाजिकच चक्र वेध मधला हा विषय अलका ताईंना दिला.
    त्यांचा व्हिडिओ करायला त्या आल्या .तुटपुंज्या ज्ञानावर आणि मर्यादित साधनांच्या आधारे खूप खटपट करून ९/१० मिनिटांचा व्हिडिओ तयार झाला.त्यातील काही चुका लक्षात आल्यावर परत व्हिडिओ करूया हा आग्रह म्हणजे मला संकट वाटलं.
    अपर्णा आणि शामभाईंचा सुपुत्र श्रीपाद मदतीला धावून आला.व्हिडिओ निर्मिती जाणकाराच्या हातून व्हायची होती.

Комментарии •