P. L. Deshpande & Mangesh Padgaonkar On Shrinivas Khale (Khale Rajani, Mumbai, 1991)
HTML-код
- Опубликовано: 3 фев 2025
- श्रीनिवास खळे यांच्या सत्काराच्या निमित्ताने पु ल, भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे रंगमंचावर एकत्र येण्याचा योग जुळून आला होता.
पु ल, खळे आणि पाडगावकर यांचा खूप जुना स्नेह, तरुणपणी तिघेहि रेडियोसाठी एकत्र काम करत.
एक योगायोग म्हणजे त्यावेळी पुलंच्या सांगण्यावरून पाडगावकरांनी "बिल्हण" ही संगीतिका लिहिली, त्याचे संगीत पुलंनी दिले, त्यांचे सहाय्यक होते खळे, आणि रेडियोसाठी झालेल्या "बिल्हण" च्या प्रथम प्रसारणात भीमसेन जोशी "माझे जीवन गाणे," "शब्दांच्या पलीकडले" ही (नंतर अभिषेकींनी गायलेली) बिल्हणाची गाणी गायले होते.
या सत्काराच्यावेळी पु लं नी आणि पाडगावकरांनी केलेल्या सुंदर भाषणाची ही ध्वनीचित्रफीत. यावेळी पु लं खूप थकलेले असूनही आवर्जून आले होते.