#आता
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #शेतजमिनिचे वाटणीपत्र करा आता फक्त 100/- रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर.
तहसिलदारांकडे अर्ज दिल्यापासून किती दिवसात वाटप करण्यात येते.
तहसिलदारांकडे दिलेल्या वाटपत्राला किती मुद्रांक शुल्क लागते.
या वाटपत्रासाठी सगळ्यांना उपस्थित राहणे गरजेचे असते काय.
तहसिलदारांसमोर वडिलोपार्जीत जमिनिचे वाटपत्र करता येते काय.
जर एखाद्या भावाने अथवा बहिणीने वाटपत्राला हरकत घेतल्यास काय होवू शकते.
तहसिलदारांसमोर वाटप करण्याइतका वेळ नाही, वाटपपत्र लगेच कसे करता येईल.
२. या आणि इतर अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. त्या अगोदर आपण वानगीदाखल एक उदाहरण घेवू म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील.
सर्जेरावांच्या नावावर वडिलोपार्जीत दहा एकर जमिन होती. त्याचप्रमाणे गावातील चार खणांचे घरही त्यांचे नावावर होते. वडीलांच्या पश्चात सात-बारा सदरी त्यांचे नाव एकत्र कुटुंब पुढारी म्हणून लागलेले होते. परंतु, त्यांचे आप-आपसातील वादामुळे त्यांच्यात वाटपपत्र होण्याची चिन्हं दिसेनात. त्यामुळे त्यांचे कुटुंबात सदान्-कदा भांडणे व्हायची. आईच्या पुढाकाराने गावातील पंच मंडळींनी मध्यस्थी करुन सर्जेराव व त्यांचे अजून दोन भाऊ यांना वाटपासाठी तयार केले. काहींनी त्यांना सल्ला दिला की नोंदणीकृत वाटपपत्राद्वारे वाटप करुन घ्या आणि प्रत्येकजण मोकळे व्हा. तेव्हा त्यांनी रितसर दुय्यम निबंधक कार्यालयात जावून वाटपासाठी किती खर्च येईल याची विचारणाही केली. परंतू त्या वाटपासाठी सुमारे एक लाख रुपयाचा खर्च येणार होता.
३. इतके दिवस एकत्रकुटुंब पुढारी म्हणून सर्जेरावच जमिन कसत होते. म्हणून दुस-या दोन भावांना वाटायचे कि इतके दिवस त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजेच सर्जेरावाने त्या शेतजमिनितील उत्पन्न घेतले आहे. तेव्हा वाटपपत्राचा खर्चही त्यानेच करावा. परंतु सर्जेराव निघाले पट्टीचे पोहणारे. ते म्हणाले, ‘तुम्ही दोघे सगळा भार माझ्यावर टाकुन शहरात निघुन गेलात. तुम्हाला जमिन पाहिजे असेल किंवा त्या जमिनित हिस्सा पाहिजे असल्यास तुम्हालाही खर्च करावाच लागेल.’ पण त्या गोष्टीसाठी ते दोघेही तयार होईना. आणि त्या वाटपपत्राचा विषय पुन्हा बाजूला पडला.
४. काही वर्षांचा कालावधी असाच निघुन गेला मधल्या काळात त्यांच्या आईचेही निधन झाले. त्यावेळी पुन्हा ते सारे एकत्र जमले, पुन्हा वाटपाचा विषय निघाला, पुन्हा तोच पेच. खर्च कुणी करायचा..? मग गावातल्या तलाठ्याकडे जावून त्याला त्यावर तोडगा सुचविण्याची विनंती करण्यात आली. तलाठ्याने त्यांना मार्गदर्शन केलं. तो म्हणाला की, ‘तुम्हाला जर नोंदणीकृत वाटपपत्र करावयाचे नसेल तर तुम्ही महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमचे कलम-८५ खाली तहसिलदारांकडेसुद्धा वाटपाचा अर्ज दाखल करुन वाटपपत्र करुन घेवू शकता. त्यासाठी फक्त शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.’ तलाठी भाउसाहेबांनी त्यांना योग्य सल्ला दिला होता. कलम-८५ प्रमाणे वाटपाला फारसा खर्चही येणार नव्हता. त्यामुळे तिघांनीही सर्वांच्या सहमतीने तहसिलदारांसमोर रितसर वाटपाचा अर्ज दाखल केला.
५. कलम-८५ प्रमाणे तहसिलदारांना वाटपाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांनी सर्व सहहिस्सेदारांना नोटीस बजावली. आणि त्यांसंबंधी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी त्यांना देण्यात आली. या सर्व प्रक्रियेत सुमारे दोन महिन्याचा कालावधी निघुन गेला. त्यामुळे या दोन महिन्याच्या कालावधीत पुलाखालुन बरेच पाणि निघुन गेलेले होते. आईच्यापश्चात त्या तिन्ही भावात पुन्हा वितुष्ट आले होते. त्यामुळे सर्जेराव वगळता दुस-या दोन भावांनी सरस-निरस वाटप होत नसल्याचा मुद्दा मांडून वाटपाला हरकत घेतली.
६. वरील हरकत प्राप्त झाल्यानंतर व अर्जदार, सहअर्जदार यांची सुनावणी घेतल्यानंतर तहसिलदारांचे असे मत झाले की, ज्यासाठी अर्ज केला आहे त्या धारण जमिनिमध्ये हक्क विवादास्पद व वादग्रस्त आहे. त्यामुळे तहसिलदारांनी तो वाटपाचा अर्ज नाकारला. त्याबाबतीत त्याच्या हक्कासंबंधीचा प्रश्न दिवाणी न्यायालयामार्फत सोडविण्याचा निर्देश दिला. त्यामुळे सर्जेरावांचे ते वाटपाचे प्रकरण दिवाणी न्यायालयात गेले.
७. खरं तर कलम-८५ अन्वये तहसिलदारांमार्फतीने फक्त रक्कम रुपये शंभराच्या मुद्रांक शुल्कावर सर्व सह हिस्सेदारांच्या सहमतीने वाटपपत्र करुन घेण्याची तरतुद महाराष्ट्र जमिन महसूल कायदा-१९६६ मध्ये करण्यात आलेली आहे. परंतू अशा वाटपाला कायद्यातील तरतुदीप्रमाणे लागणारा वेळ पाहता नोंदणीकृत दस्ताव्दारे वाटणीपत्र करुन घेण्याचा सहज सोपा पर्यायही उपलब्ध आहे. फक्त या प्रकरणी थोडा अधिक खर्च करावा लागतो. पण मित्रांनो जर फक्त शंभर रुपयांत तुमच्या शेतजमिनिची वाटणी होत असेल तर का करु नये.
८. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम-१९६६ चे कलम-८५ अन्वये फक्त वडीलोपार्जीत मिळकतीचेच वाटप करता येते. काही लोकांचा हा प्रश्न असतो की बहिणींना हिस्सा द्यावयाचा नसेल तर काय करावे लागेल. खरं तर महाराष्ट्रात 1994 मध्ये सुधारणा झालेल्या कायद्याप्रमाणे एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेत मुलींना हक्क दिले गेलेतं.
९. आणि जर का वडिलांच्या मालमत्तेत मुलिंना हिस्सा नको असेल तर त्या मुलिंचे कायदेशिररित्या विनामोबदला हक्कसोडपत्र तयार करुन ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणे आवश्यक असते. त्यासाठी रक्कम रुपये दोनशेच्या मुद्रांक शुल्कावर हक्कसोडपत्राचा दस्तावेज तयार केला जातो. त्याबाबतची चर्चा सविस्तररित्या यापुर्वीच माझ्या हक्कसोडपत्राच्या व्हिडिओ मध्ये करण्यात आलेली आहे.
हक्कसोडपत्र कसे करावे....
• #How to do Release Dee...
#PartitionDeed#200#वाटणीपत्र#शेतजमिन
Dhanraj Kharatmal,.B.Com.,LLB.
Nice video
सर खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद, खूप माहिती मिळाली.
Ek no. Suspasht bhashet
Thanks
Vatap Patra tahsilldar saheba kade karnysathi kiti kalavadhi jato serv hissedar tayar ahet
सर.माझा.भाऊपण.स्वताच्यानावाकरणयास.प्रयंत्न.चालु.आहेहोऊशकते.का
Sir vadil jeevant asatana tyanchya nave asaleli vadiloparjit shet jaminiche kalam85 nusar tahasildar office madhye 100 rupaye stamp var vatni patra hoile ka?
vatpachi nond rdda hote ka
Sar aamchi jmin maza sasre yancha navavr nahi zali tyancha chulat bhau mota yanech sarv nav laun ghetle aahe aamch navch nahi tr aata aami kay kru please sanga 🙏🙏🙏
Sir aamchya bhavane sahaj amhala dtavale aahe jamin sade char bighe aahe pan to amhala fakt thodishi rakkm ghya mhnto aahe aamhi doni bahini devorce zaalela aahe amhala kalat nahi kay katave
सप्रेम नमस्कार
आपण दिलेल्या सखोल व उत्कृष्ट माहितीबद्दल प्रथम आपले अभिनंदन व सप्रेम नमस्कार
आपण दिलेल्या माहितीनुसार वाटणी पत्र ची नोंद होणे अपेक्षित आहे परंतु तशी नोंद झालेली उदाहरणे दिसत नाहीत येन केन प्रकारे अडथळे उपस्थित करून नोंदी घेणे टाळले जात आहे ही वस्तुस्थितीआहे ज्यांच्या नोंदी सक्सेस झाल्या आहेत त्यांनी आपले आभार मानले असतीलच त्यांच्या कमेंट्स कृपया रिपीट करा
आपला
कृपाभिलाषी भक्त
नमस्कार,
तुमचे म्हणणे कदाचीत बरोबर असेल. अशाप्रकारच्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा म्हणून हा प्रबोधनाचा प्रयत्न आहे. यातून जागरुकता निर्माण होवून भविष्यात काहीतरी बदल निश्चित घडेल असा विश्वास आहे.
@@valuableeducation शंभर टक्के बरोबर
प्रबोधन व्हायलाच पाहिजे त्याशिवाय सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणार नाही जर अशा प्रकारे केलेल्या वाटणी पत्राची नोंद घेण्यास टाळाटाळ होत असेल तर आपण संघटनांत्मक प्रयत्न करून याची नोंद करून घेतली पाहिजे का ?
खूपच छान माहिती दिली सर
धन्यवाद.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
Sir 1940 made mazya aai chya aai Cha murtu zala ahe Ani tyach varshi mazya aai Cha janm zala ahe mala tyancha murtu dakhala taseh aaicha janma dakla kadaycha ahe mi aaila geun courtche chakkar katat ahe mayakade gramsevakacha dakhala ahe ,tachesh tahsil karyalyacha dakhala ahe taseh panchyat samiti Cha dakhala ahe pan tyacha kahich upyog hot Nani manniy jaj Saheb 1940 chya agodar janmleya mancha purawa magtat te uplabdha nahit mi Kai karu please sanga
Sir please sanga
जय जवान जय किसान
ऊपयुक्त माहिती दिलीत.धन्यवाद.
Thanks
wow very beautiful advice thanks i like it filling beater thanks you sar
Thanks sir, very much helpful for me
Most welcome
Sir, amche 100 stamp paper var vadilo parjit jaminiche vatap tahsil madhe zale 1 varsha pasun. But talathi office madhe ajun utaryavar nond nahi kay karave?
Sar talithi 20hajar rupye kharch sagtoy
वाटणीपत्र करायचे आहे पण बोजा आहे ,तर ते वातानिपत्र होईल का...sir please reply
Sir mla 2 dhire aahet tr vatni kshi karaychi
Sir mla pn shet vatni karaychi aahe kiti khrch yeil and dyaychi pn aahe
Nice
Thanks
योग्य माहिती मिळाली
धन्यवाद.
बक्षीस पत्र करता येते का तहसीलदार जवळ
साहेब नमस्कार,
मी एक सैनिक आहे लहानपना पासून बाहेर गावी शिकलो आणि सैन्यात भरती झालो. गावाकडची व शेतीची माहीती नव्हती. देश रक्षा करीत असताना माझ्या आई आणि वडिलांनी माझ्या पाठीमागे सर्व शेती मोठा मुलगा आणि सुनबाई व् नातू यांच्या नावे केली मला कोणत्याही प्रकारची सुचना न देता.
माझ्या वडिलांना वादलोपार्जित शेती मिळालेली नाही त्यांनी ती स्वतः विकत घेतलेली होती.
आई वडिलांनी माझ्या नावावर 14 लाख होमलोन काढून घेतले आणि शेती मध्ये माझे नाव कोठेही लावलेले नाही. मला एकच मुलगी आहे. कृपया शेती माझ्या नावावर करण्यासाठी मार्ग सूचित करावा ही नम्र विनंती🙏
होम लोन शेतीवर मिळत नाही.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
Khate phod kasi karavi please reply
सर स्व कष्टार्जीत जमीनीचे अनोंदणीकूत अथवा तोंडी वाटप कायद्याला मान्य असते का ?
Mala swatantr kuthalya velet v kevha bolu shakto.
Aapn dileli mahiti changali v aavdli.🙏
Jaminiche 3 7/12 asel tr watnipatra howu shakte ka
होय.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
सर १००₹ चे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टँप पेपर की वेगळे १००₹ पे करावे लागतात... ते प्लीज सांगा.... महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 अनुसूची एक मधील अनुच्छेद 46 प्रमाणे मुद्रांक शुल्क देय आहे असा शासन निर्णय आहे. ते शुल्क नेमके कोणते?
Very nice
Thanks
सर भोगवट वर्ग 2ची जमिनीचा फेरफार होईल का याबाबत आम्ही तहसील त अर्ज दिले होते ते आजोबांच्या भाऊंच्या नावाने आहे मी त्याचा नतुआहो ते नावावर करा येला तयार आहे परंतु तहसीलदार एक वर्षानंतर अर्ज वापस आणि आदेश नाही हे होते की नाही ते मला कळवावे सर
Ferfar nahi milt na bhau
स्वकसटर्जित जमीनच बायको व अज्ञान मुलांचे नावे वाटप करता येईल का कलम 85 नुसार सर
Mazya vadilani 5 ekar jamin kharedi keli hoti mazya chulat bhavane mazya vadilana vachan lihata yet nahi yacha fayada gheun karj kadayache ase sangun ti jamin vatapane tyachya navavar karun ghetali aahe 2011 la tar ti jamin parat mazya vadilana milavata yeila ka?
Sir reply dhya na pleaz
Very good effort, but in reality these transfers do not get executed properly, due to bureaucratic entanglement.
sir mala aapnas vicharayche hote ki, aamche shet he maze vadil ani tyanche 2 dhakte bhau ase ekun 3 janachya navavar asun te kharedi khat aahe, tar aamhala mazya vadilanchya vateche shet mazya bhavachya nave karavayache aahe tr tyasathi te kiman kharchat kase karata yeil te plz sanga
सगळ्यात अगोदर तुम्ही वारसनोंद करुन घ्या. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवटपर्यंत पहा.... ruclips.net/video/L3LR8tMwdJo/видео.html
Very good information
Thanks
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
Very informative, thanks 🙏 👍
You are Most Welcome Sir.
धन्यवाद. लक्ष्मणजी.
@@valuableeducation sir karedi chi jamin aasel tar vatani patra kase karawe plz reply
व्हिडीओ पहायला व माहिती ऐकायला छान आहे.
परंतू प्रत्यक्षात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही
सुर्यरावजी कदाचित हा तुमचा अनुभव असू शकेल.
@@valuableeducation
सध्या काही ठिकाणी १००रू स्टँप १२० रू घ्यावा लागतोय .
@@सुर्यरावसुर्यराव khre ahe bhau
Vadilarjit jaminiche sarv bhau bhauchya sahmatine gharguti vatep karun 💯 rs chya stamp ver sarvanchya sign ani id proof deun talathaykde arj dila ter vateppatre hoile ka.
Sirji jar ekhadya Parivarachi Zameen legacy property mothya bhavachya Navavar ahe ani mothya bhavane Zameenichya navavar banketun loan kadhle ahe tar vatnichya veles kay chotya bhavala loan bharav lagel kay plz reply sirji
कर्ज ज्याने काढले आहे त्यानेच फेडावं.
hi sir
amchya eka 7/12 warti 4 bhawanche naav ahe. ani 100Rs chya stamp paper war vatap karayala tayar ahet.
vatani patra tayar zalya natar prattek hisse darache 7/12 vegale hotat ka ?
ani tya sathi kiti vel lagato ?
🙏 saheb aamchi gavi jamin 105 ekar ahe tya jaminit 5 hisse ahe tya madhe amhala aamcha 7 /12 vegla karun pahije tar Kay karave baki 4 Jan eikat nahi tar upay shuchva
I like it
धन्यवाद.
Sir maze vegle karun dya 450akar jamin ahe
Sundar.guidance
Thanks a lot
सर, जमिनीवर कर्जाचा बोजा असल्यास खातेवा टप कसे करावे किंवा करता येते का , कृपया मार्गदर्शन करावे.
शेतीवर कर्ज घेतले आहे तीन भावांमध्ये वाटणी करता येईल काय
साहेब आम्हला वाटणी ला आलेली जमीन आमच्या काकांचा नावावर आहे आम्हला ती आमचा नावावर करून घ्यची आहे तर आम्ही ती कशी करावी
Kshi navavar karta yeil
हक्क सोड पत्रासाठी सर्व सहहिसेदराची उपस्थिती आवश्यक आहे का
होय.
सात बारावर तीन भावांची नावे असुन जमीन चार एकर आहे. जमीन खरेदीचे पैसे एकाच भावाने दिल्यामुळे त्याला एकट्याला दोन एकर व इतर दोन भावांना एकत्र दोन एकर असे जमीनीचे वाटप करता येते का ? कृपया माहिती द्या.
होय करता येईल. मुद्रांक शुल्क पुर्ण भरावे लागेल.
Thank you Sir.
सर आमची जमीन भोगवटादार वर्ग 1मध्ये 4 गट भोगवटादार वर्ग 2 मध्ये 1 गट आहे तर माझे वडील मयत आहे तर वारस दोन मुले एक पत्नी एक मुलगी यातील एक मुलगा मयत व पत्नी मयत मुलाची वारस वडिलाशी नाते असे आहे सुन नातुव नात अशी लागली आहे पत्नी चे नाव कमी केले आहे तर सातबारा वर एका मुलाचे नाव व एका मुलीचे नाव एका मुलाची तीन वारस आहेत जसे कि सुन नात नातु तर आता मुलीचे हक्क सोड पत्र करून घेणार भाव भावजय भाची भाचा आणि नंतर जो मुलगा मयत आहे त्याची तीन वारस त्याचे हक्क सोड पत्र करूण घेणार मुलगा म्हणजे वडिलाशी नाते नातु हक्क सोड पत्र लिहुन देणार सुन नात तर सर माझ्या बहिनीचे /भावजय व पुतनीचे हक्क सोड पत्र एकाचे वेळीस करता येईल का कारण नंतर माझ्यात व पुतण्यात क्षेत्र वाटप करून घेणार आहोत हक्क सोड पत्र एकाच वेळेस दोन हक्क सोड पत्र करता येईल का सर मला याची माहिती मिळावी हि नम्र विनंती आहे तुम्हाला माहिती देण्यात यावी .
Khup changed mahiti dili sir
धन्यवाद.
mobdalla hak sod kase karawe ..ya baddal mahiti milel ka ...
ruclips.net/video/CweTKC5oyiQ/видео.html हा हक्कसोडपत्राचा व्हिडिओ संपुर्ण पहा.
Sir aata jar kele tar kiti paise lagtata plz sangha
याबाबतची चौकशी आपण आपल्या वकिलांकडे करावी.
@@valuableeducation sar mi 85nusar arj karun 6mahine zal 1sunavni zali tripn jamin navavr nahi zali
paise deun registed mobdala hak sod karane sathi kiti kharch yeto ..tyavar stamb duty chi garaj asate ka ...
vina mobdalla ani mobdala haksod madhe nemaka haksod kay ahe
shetjamin navin sharthi chi ahe ...varg 2
ruclips.net/video/CweTKC5oyiQ/видео.html
ही माझ्या हक्कसोडपत्राची लिंक आहे. कृपया हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा.
Vadilanchya nawache jamin direct mazya nawawar karnysathi Kay karave lagel
Please reply sir
बक्षीसपत्र किंवा खरेदीपत्र करु शकता.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
अशी वाटणी करतांना जर सातबारा भोगवटदार वर्ग 2 असेल सेल परमिशन ची गरज आहे का, की डायरेक्ट करता येते, म्हणजे भोगवटदार वर्ग 1 करणे गरजेचे आहे का?
हस्तांतरण होत नसल्यानं परवानगीची आवश्यकता भासणार नाही.
जमीनीचे वाटप पत्र तयार करतो त्या मधे एका भावा च्या नावाचा उल्लेखच केलेला नाही आहे की मला या गट नंबर चा 7/12 माझ्या नावे करण्यात यावा. नावाचा उल्लेख नसताना 7/12 त्याच्या नावाचा तलाठी याने तयार केला आहे. तो 7/12 रद्द करण्यासाठी काय करावे लागेल.. Plz 🙏 सांगा.
सर आमच्या पाच हेक्टर शेतजमीन खाते फोड बक्षीस पत्र करण्यासाठी छत्तीस हजार रुपये खर्च येणार असं तहसिल कार्यालय कडून सांगण्यात आले आहे. तर कृपया मार्गदर्शन करावे. जमीन वडिलांचे नावे आहे. तर आम्हाला
१.५+१.५+१+१ या पध्दतीने वाटप करायचे आहे. तर एवढा खर्च खरंच येतो का आणि शिवाय त्यासाठी पाटबंधारे खात्याची परवानगी अथवा संमती पत्रक घेणे आवश्यक आहे का.
सर, नमस्कार माझे वडील आणि काका असे 4 भाऊ आहेत. त्यांची वडिलोपार्जित जमिनीमध्ये चौघे वारसदार आहेत. आता आम्हाला सदर जमिनी नावावर करावयाच्या आहेत, परंतु माझ्या वडिलांचा मोठा भाऊ (१ नंबर) या जमीन नावावर करून द्यायला तयार नाही बाकी तिघांची संमती आहे. कृपया जमीन कशी प्रत्येकाच्या नावावर करता येईल मार्गदर्शन करावे.
न्यायालयातून आदेश घ्या.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
Very nice sir
Thanks and welcome
परभणी साठी चालु आहे का
संपुर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे.
आमच्या कुटुंबा मध्ये 5भाऊ 2बहिणी आहेत सर्वात मोठा भाऊ बहिणीला काही द्यायचे नाही पण 4भाऊ बहिणीला त्यांनी मागितली तेवढी जमीन द्यायाला तयार आहे, त्यामुळे खातेवाटपाला मोठा भाऊ सोडून करता येईल का? येत असेल तर मार्गदर्शन करा please
सर माझे बाबा आणि बाकी 5 असे सहा सखे भाऊ , त्यापैकी 2 काकांच्या नावे आमच्या हिसाची जमीन आहे.ती माझ्या बाबांच्या नावे या नियमानुसार करता येईल का.काका सही देण्यासाठी तयार आहेत. सर plz reply dya
Eka kutumbatil 5 bhau bahin hissedar ahet tyatil ek mayat ahe,tyancha varas tapas vhyaych ahe,pan tiche varas dhade vatapas virod kartat,Kay v kas karta yeyil.
दिवाणी न्यायालयात दाद मागा.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@@valuableeducation Sir te karto ahe..pan Jilhadikari marfat karnyacha kuthala GR ahe ka.
Apan suchavlya baddhal..Shatsha abhari🙏
सर आमची वडलोपर्जित जमिन होति ती एकाच्या नावावर असल्याने त्याने विकली आहे तीथे आमची घरे आहे व आम्हीच कसतो आहे तर काय करावे सांगा सर विनंती आहे
न्यायालयात दाद मागा
वाटणीने जमिन कोणा कोणाला वाटून देता येते
हक्क सोड ला किती खर्च लागतो
हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पहा. खर्चाबाबत मात्र तुमच्या वकिलाला विचारणा करावी.
10 ₹ chya stamp var gharicha (घरी) vatap kele asel tar te kayam hou shakte ki punnha ritasar karave lagel
Krupya margdrshan kara
त्या वाटप पत्राची सातबाराला नोंद झाली असेल नविन करण्याची आवश्यकता नाही. नोंद झालेली नसेल तर मात्र पुन्हा वाटप पत्र करणे आवश्यक राहील.
@@valuableeducation nahi
सातबारा खाते फोड करताना सहहिस्सेदार यांची manjuri नसेल तर काय karaiche?
दिवाणी न्यायालयात दाद मागू शकता.
तुकडेबंदी कायद्याचा नियम वारस नोंद करताना होत नाही , पण वाटणी पत्राची नोंद करताना होतो त्या साठी कमीतकमी किती गुंठे क्षेत्र असावे असा कांहीं कायदा आहे का ?
बागायत १० गुंठे
जिरायत ४० गुंठे
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
बागायत 10 गुंठे किंवा
जिरायत 40 गुंठे हा तुकडेबंदीचा नियम खरेदी ,विक्री व्यवहारासाठी आहे का ?
वारस नोंद करताना या पेक्षा कमी क्षेत्रावर नोंद होते पण त्याच क्षेत्राची हिस्सेदरांच्या सहमतीने केलेल्या वाटणी पत्राची नोंद करणे यात जमीन हस्तांतराचा भाग होत नाही मग तुकडे बंदीची बादा होते असे म्हणून नोंदी टाळणं ही सामान्य जनतेची फसवणूक व सरकारने केलेल्या कायद्याचा अवमान होत नाही का ?
यावर उपाय काय ?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सप्रेम नमस्कार
या तुकडे बंदी कायद्याचा जीआर नंबर काय आहे 🙏🙏🙏🙏💅🙏🙏
@@valuableeducation दहा गुंठे बागायत व 40 गुंठे जिरायत पर्यंत जमिनीचा तुकडा पाडता येतो असा शासनाचा आलेला जीआर नंबर पाहिजे तरी तो कृपया सांगा किंवा कसा मिळवावा याचे मार्गदर्शन करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Please mala sanga.
जमीन वर्ग 2 कुळ कायदा अशी आहे व ती वडिलोपार्जित आहे तरी त्या जमिनीमध्ये वारसांचा हिस्सा वाटप कशे करता येईल व त्यास सर्वांची सहमती आवश्यक आहे का
Very nice information ,
Thanks
Shaskiy jamen satbara nondnikrut aslayli jaminechi katyfod kashai karawe
सक्षम अधिका-याची परवानगी घेवून खातेफोड करावी.
नमस्कार सर,
१ हेक्टर ३५ आर, वडिलोपार्जीत शेत जमीन (जवळपास ३ एकर शेत जमीन) ३ भावांमध्ये वाटून घेता येईल का?? प्रत्येकी ४५ आर याप्रमाणे! कलम ८५ नुसार?
होय.
7/12 vegla hoil ka mg sir
नमस्कार सर
आमची वडिलोपार्जित जमीन ही आमच्या वडिलांच्या चुलतभाऊ यांच्या नावे आहे, तर ती अशाप्रकारे रु 100 च्या स्टॅम्प पेपर वर वाटणी होऊ शकते काय?
वडिलोपार्जीत जमिनीत तुम्ही वारसदार असाल तर सर्व सहमतीने तुम्ही वाटणीपत्र करुन घेवू शकता.
@@valuableeducation बरोबर आहे सर तुमच म्हणने तलाठी म्हणतो तसं जमत नाही हो बक्षीस पत्र करावे लागते असे म्हणतात
मग आपण. कोणाकडे जावे लागते ते सांगा
Sir vatnipatra karayala konte documents lagtaat
सर दोन भावांनी एकत्र असतांना जमीन घेतली... आणि आता ती जमीन वाटनी करून घ्यावयाची आहे तर १०० रुपयांच्या स्टॅम्पवर वाटनी करता येईल का ? please reply me Sir
नाही.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@@valuableeducation का सर .. ?
बहीण च्या नावावर जमीन आहे ती आई च्या किंवा माझ्या नावावर करायची आहे तर सोपा आणि कमी खर्चिक पर्याय सांगवा 🙏
पुणे जिल्हा या साठी चालू आहे का
संपुर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे.
सर आमच्या आज्याची जमीन 1.17आर आहे
यात आमच्या आज्यांने 1एकर चार मुलांतुन दोन मुलाना विकली..पंरतु त्या दोन्ही मुलांनी जमीन पैसे देऊन आज्याच्याच नावावर ठेवली व आता ते जमीन मिळविण्यासाठी कायदेशीर बाब काय करावे मार्गदर्शन
खरेदीखत किंवा बक्षीसपत्र करुन घ्या मुद्रांक शुल्क भरुन.
आपले हिस्सेदार वाटपाला तयार नसतील व आपल्याला आपणास आपला वाटा बाजूला करायचा असेल तर काय करावे लागेल
न्यायालयात दाद मागावी लागेल.
ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
खरेदी व 85नुसार वाटप यात फरक काय,85नुसार वाटप केल्यास स्वतंत्र उतारा कायम होतो का
जमिनीवर कर्ज असेल तर कलम ८५ प्रमाने वाटणी करता येते का???
कर्ज फेडण्याची जबाबदारी घेणं आवश्यक राहील.
@@valuableeducation धन्यवाद ...
वांटणी पत्रकाचा कोर्टात लागणारा ठोस पुरावा कोणता
शिलींगची जमिन भोगवटदार वर्ग2 मधील सात बारा वरील वारसदार बहीणीला हक्कसोड पत्रासाठी काय करावे,याबाबातची माहीती द्यावी
व्हिडीओत दिलेल्या माहितीप्रमाणे करु शकता.
साहेब, माझ्या नावाने दोन शेत आहेत,या वडीलोपारजीत शेतापैकी एक शेत माझ्या नावाने ठेवायचे आहे व दुसऱ्या शेताची वाटणी माझ्या पत्नीला व मुलाला द्यायची असल्यास ते या कलमानुसार शक्य आहे काय?
सर जमिनीचे वाद 87%कुटुंबातील शेतकरी यांचे आहेत ह्या वेळी तुमचा व्हिडीओ खूप उपयोगी आहे तरी अधिक माहितीसाठी तुम्हचा मो,न, मिळावा ही विनंती कृपया
सर सदनिका पतीच्या नावावर आहे. ती पती आणि पत्नी दोघाच्या नावावर करायची असेल तर काय करायचं असते कृपया सांगा.
Bhogwata no 2 vatap Patra hote ka
होईल.
सर जमीनीवर बोजा असल्यास खातेफोड करता येईल का
सर्वप्रथम बोजा कमी करुन घेणे आवश्यक आहे.
Sir माझा नावावर 10 गुंठे जमीन आहे आणि आई chya नावावर 11 गुंठे जमीन आहे तर आईच्या नववरची जमीन माझा नावावर करायची आहे तर कलम 85 नुसार होऊ शकते.कृपया मदत करा साहेब.
Gav kamgar म्हणून मिळालेल्या जमिनीचे वाटप होते का
परवानगी लागेल.
नमस्कार सर, कर्नाटक राज्यात माझ्या वडिलांच्या नावे वडिलोपार्जित जमीन होती . वडील हयात आहेत. आम्ही तीन बहिणी आहोत. वडिलांनी माझ्या एका बहिणीच्या नावे बक्षीस पत्र करून पूर्ण जमीन तिच्या नावे केली आहे. आमच्या दोघीकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. स्टॅम्प् पेपरवर केल्या नाहीत. हक्कसोड पत्र ही केले नाही. बहिणीच्या नावे शेत जमीन झाली आहे. आम्ही दोघी जमीन मिळणण्यास काय करू शकतो. वडील हयात आहेत.
सर माझ्या चुलत्यांना मुले नसल्याने त्यांची सर्व प्रॉपर्टी ही आमच्या म्हणजे त्यांच्या पुतुण्याच्या नावावर करण्यासाठी हे 100 rs च्या स्टॅम्प पेपर वर होईल का? कारण तलाठी बोलला कि फक्त वडिलांच्या नावावरील प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करण्यासाठी 100rs स्टॅम्प चा वापर होतो परंतु चुलतुयाच्या नावावरील जमीन पुतण्याच्या नावावर करण्यासाठी कोर्टात जावे लागले.
Pls reply sir.
याचा फायदा पुतण्यांना मिळणार नाही. पुर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
आमची सामाईक जमिनीचे वाटप अश्या प्रकारे होऊ शकते का? गेल्या काही पिढ्या वटप झालेलं नसल्यामुळे खुप किचकट प्रक्रिया असेल म्हणून कोणी पुढाकार घेतला नाही आजपर्यंत
होईल.
फक्त तुम्ही नेटाने प्रयत्न करायला हवेत. कारण जर पिढ्यान पिढ्या वाटप झालेले नसेल निश्चितच या प्रक्रीयेला वेळ लागे. त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या वंशावळीचा दाखला तुम्हाला काढुन घ्यावा लागेल. त्यांनतर पुढची प्रोसीजर करणं आवश्यक आहे.
होय करता येईल. त्यासाठी वेळ लागेल पण चिकाटीने प्रयत्न करावे लागतील.
सर आमची एकत्रित शेतजमीन आहे त्या व्हर बॅंकेचे कजॅ असल्यामुळे खाते फोड करण्यास अडचणी येत आहेत तरी उपाय सुचवावा
त्यावर एकच उपाय म्हणजे बॅंकेचे कर्ज Nil करुन घेणे. त्यामुळे खातेफोड झाल्यानंतर तुमचा सातबारा बोजारहीत असेल.