Register heirs now in just 15 days I करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025
  • Register heirs now in just 15 days
    करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.
    Mission for Law Education.
    १. अनेक जणांची ब-याच दिवसापासूनची मागणी आहे की मी वारस नोंद या विषयावर एखादा व्हिडिओ प्रसारीत करावा. तर मित्रांनो आजचा विषय आहे वारसनोंद कशी करावी, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात, कशाप्रकारे अर्ज करावा, वारस नोंदणीची प्रक्रीया कशी असते, या सर्व गोष्टींची सखोल चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मुख्यत्वे शेतजमीनीबाबत वारसनोंद करुन घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं आज आपण प्रामुख्यानं शेतजमीनीची वारसनोंद कशाप्रकारे करुन घ्यावी याबाबतच बोलणार आहोत. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी वारसनोंदीचा कानमंत्र घेवून आलोयं. तर तयार आहात ना वारसनोंद कशी करावी ते ऐकायला. मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल. चला तर मित्रांनो उदाहरणासहीत जाणून घेवूया कशी करावी वारसनोंद...
    २. राजाराम आप्पा यांच्या पश्चात त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. राजाराम यांची पत्नी यापुर्वीच देवाघरी गेलेली आहे. राजाराम यांच्या नावावर दहा एकर जमीन आहे. एक मुलगा वगळता त्यांची दोन्ही मुलं शहरात राहतात. मुली दिल्या घरी सुखी आहेत. राजाराम यांच निधन झाल्यानंतर ते सारे गावी आलेले होते. सगळे विधी आटोपल्यानंतर गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनी त्यांना सुचवले की राजाराम आप्पांची जमीन तुमच्या नावावर लागलीच फिरवून घ्या. तुम्ही सगळे आला आहात तर वारस नोंदीचा अर्ज तलाठ्याकडं देवून लगेच वारस नोंद करुन घ्या. सर्वांनी यावर विचारविनीमय केला. त्या भावंडात हेवेदावे मुळीच नव्हते. ३ महिन्याच्या आत वारसनोंद करणं गरजेच होतं, तेव्हा त्यांनी विचारपुर्वक निर्णय घेतला.
    ३. सगळ्या भावंडांनी राजाराम आप्पांना यापुर्वी दिलेल्या वचनाप्रमाणं दोन्ही बहिणींना साडीचोळीचा हक्क देण्याचे सर्वानुमते मान्य केलं गेलं. राजाराम आप्पांच्या मुलीही सुखवस्तु असल्यानं त्यांनी तिन्ही भावांच्या लाभात शेतजमिनीचे हक्कसोडपत्र करुन देण्याच मान्य केलं. बहिणींना पुन्हा पुन्हा याव लागू नये म्हणून बहिणींच्या संमतीने साडीचोळीचा हक्क अबाधीत ठेवून दोनशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर विनामोबदला हक्कसोडपत्र करुन घेवून ते तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेतलं. तत्पुर्वी आनंदानं म्हणजेच राजाराम आप्पासोबत राहणा-या मुलानं वारसनोंदीच्या अर्जावर सगळ्या भावंडांच्या सह्या घेतल्या. त्यांनंत १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर एक शपथपत्र तयार या शपथपत्रात त्यांनी सर्व वारसदारांची नावे, वय व पत्ता आणि या व्यतिरिक्त कोणीही वारस नसल्याचं आवर्जून नमूद केलं गेलं. आणि ते शपथपत्र तहसिलदारांकडून त्यानं प्रमाणित करुन घेतलं.
    ४. आनंदानं आणलेल्या वारसनोंदीच्या अर्जात राजाराम आप्पांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला ती तारीख, व त्यांच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे. आणि राजाराम आप्पांना किती वारस आहेत. ही सारी माहिती त्यात नमुद करण्यात आली. अर्जासोबत ग्रामपंचायत कार्यालयातुन काढुन घेण्यात आलेला मृत्युचा दाखला, पोलिस पाटलाकडून घेण्यात आलेला वारस दाखला, त्यांच्या नावावरील जमिनीचे आठ-अ चे उतारे, सर्व वारसदारांचे पत्ते, मृताबरोबर असलेले वारसदारांचे नातेसंबंध आणि तहसिलदारांसमोर करण्यात आलेलं शपथपत्र ही सर्व कागदपत्र सोबत जो़डून परिपुर्ण असलेला वारसनोंदीचा अर्ज पाच रुपयाचं कोर्ट फी तिकीट लावून तलाठी कार्यालयात सादर करण्यात आला.
    ५. मित्रांनो सदरचा अर्ज प्राप्त होताच गावकामगार व तलाठी यानं त्या अर्जाची नोंद गाव नमुना ६ क मध्ये घेतली. गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेल्या माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर मध्ये तलाठ्यानं नोंद घेतली. आणि तलाठी कार्यालयामार्फतीनं सर्व वारसदारांना नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसात कुणीही हरकत न घेतल्यानं या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररीत्या त्यानं आदेश काढला. त्यानंतर ती नोंद मंडल अधिका-यानं प्रमाणित केली. अशाप्रकारे राजाराम आप्पांच्या पश्चात त्यांच्या वारसांची नोंद करण्यात आली. तर मित्रांनो या ठिकाणी हे ही लक्षात ठेवा की जर, वारस नोंदीबाबत कुणी हरकत घेतली असती तर, त्या व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली गेली असती.
    ६. आज आपणं पाहिलेलं उदाहरण शेतजमिनीच होतं. याच प्रकारानं तुम्हाला तुमच्या घराची वारसनोंद, सिडकोच्या मिळकतीची तसेच म्हाडाच्याही मिळकतीचीही वारसनोंद करुन घेता येते. तर मित्रांनो कोणत्याही स्थावर मिळकतीच्या नोंदी वेळच्या वेळी करुन घेणं आवश्यक असतं. त्या जर वेळच्या वेळी घेतल्या गेल्या नाहीत तर काळाबरोबर काही गोष्टीत बदल होवू शकतो. म्हणजेच समजा एखाद्या वारसानं आपल्या एकट्याची वारस म्हणून नोंद करुन घेतली तर तुम्हाला अडचण निर्माण होवू शकेत. म्हणूनच स्थावर मालमत्तेच्या बाबतीत मात्र सगळ्या नोंदी वेळच्या वेळी करुन घ्या आणि निश्चिंत व्हा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत वारसनोंदीबाबत इतकचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, वारसनोंदीची ही माहिती सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची असल्यानं हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीच्या व्हाटसप ग्रुपवर फॉरवर्ड करण्यास विसरु नका.
    ७. बरं का मित्रांनो याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधुन बिंधास विचारा. मी अशाच प्रकारचे कायद्याचे व्हिडिओज तुमच्या फायद्यासाठी नेहमीच घेवून येत असतो. माझे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलचं बटन दाबून, नोटीफीकेशन ऑन करुन, माझं चॅनेल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयहिंद. जय महाराष्ट्र.
    Adv. Dhanraj Kharatmal., B.Com.,LLB
    V Education
    #LegalHeir#MaharashtraGovernmetn#SaatBaara#PropertyCard

Комментарии • 932

  • @vinoddevkule667
    @vinoddevkule667 2 года назад +6

    सर तुम्ही खुप छान व्हीडीओ करता व उदाहरणासह सांगता ही पध्दत खरोखर कौतुकास्पद आहे व त्यामुळे आम्हा सर्व सामान्य लोकांना कळते .तुम्ही असेच माहिती पुर्ण जनजागृती युक्त व्हीडीओ बनवत जा या कामी तुम्हास हार्दीक शुभेच्छा!

    • @valuableeducation
      @valuableeducation  2 года назад

      धन्यवाद

    • @swetarao4690
      @swetarao4690 8 месяцев назад

      Plz send your contact number we have to do varsai in Maharashtra state your fees?

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 4 года назад +3

    अत्यंत उपयुक्त माहिती, आभारी आहे

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @somnathpatangpure280
    @somnathpatangpure280 3 года назад +6

    नमस्कार साहेब खुप च छान माहिती मिळाली आपल्या कङुन त्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब.
    आजी, आजोबा, मामा, काका यांच्या मृत्यू च्या किती दिवसाच्या आत राहिलेल्या इतर वारसदाराची नावे सात बारा उतारा लावून घ्यावी.याला किती दिवसां चा कालावधी आहे. काही नियम अटी असल्यास त्या बद्दल माहिती सांगा साहेब.
    धन्यवाद साहेब.

  • @kabirpahurkar61
    @kabirpahurkar61 Год назад +2

    Sir khup khup dhnyvad aapn dilelya mahiti badall, aami direct phon kela aani sirani aamla mahiti dili, hakka sod patr karnyasati je tumi sangitle tyanantr aamchi dhavpal kmi jali, aani tya margane ami pudche kam kartoy ,kuthlihi fess n gheta dilelya mahiti badl aabhari aahot sir dhanyvad

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +5

    Very Informative👍 Thanks Sir 🙏

  • @arunkulkarni9973
    @arunkulkarni9973 9 месяцев назад

    खुप उपयुक्त माहिती धन्यवाद सर.

  • @stoic304
    @stoic304 4 года назад +3

    खूप धनयवाद सर

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @pravinkrishna3610
    @pravinkrishna3610 4 года назад +1

    तुम्ही दिलेली माहीती जुनी आहे. तुमचे ज्ञान अपुरे आहे

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад +1

      धन्यवाद. तुमच्याकडे नविन माहिती असल्यास कृपया शेअर करावी. पुढील व्हिडिओत त्याचा अंतर्भाव करण्यात येईल.

    • @pravinkrishna3610
      @pravinkrishna3610 4 года назад

      ruclips.net/video/oGCIF17PI44/видео.html

    • @pravinkrishna3610
      @pravinkrishna3610 4 года назад

      @@valuableeducation वारस नोंद झाल्यानंतरच हक्कसोडपञक होते

  • @aatifkhan4534
    @aatifkhan4534 4 года назад +4

    sir varsa adhare ferfar sathi heirship certificate chi garaj nahi ka ?

  • @DeepakSawakhande333
    @DeepakSawakhande333 3 года назад +1

    खूप छान अगदी सहज माहिती मिळाली धन्यवाद....

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 4 года назад +4

    फ्लॅट बाबतित वारस नोंद कशी करावी? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @rahulkumbhare1725
    @rahulkumbhare1725 Год назад +1

    Khup chhan mahiti dili sir.
    Thanks sir.

  • @rockydsoza4308
    @rockydsoza4308 3 года назад +3

    खूप उपयुक्त माहिती दिली आहे म्हणतात आपण २१ व्या शतकात आहोत परंतु असे वाटते एका आदिवासी भागात अजून जगतो कारण कायद्याचं धाक आधिकर्यान नाही पैशे घेऊन काहीपण करतात माणसे गप्प बसतात

  • @amish_chakor_4914
    @amish_chakor_4914 3 года назад +1

    खूपच छान अप्रतिम असा संदेश तुम्ही आम्हाला दिला आहे अशीच माहिती देत रहा खूप पुढे जाशाला गोड ब्लेसस यू सर,माज काम आहे तुमच्याकडे मदत करू शकता का तुम्ही गावाचे घर आहे त्या घारा खालील जागा ही सर्व भाऊ आणि बहिणी chya नवा वर आहे मग त्यात एक माझे पापा आहेत त्यांचं पण नाव आहे माला माझ्या पापाच्या नाव वर करायचं आहे ती जागा पापाच्या आणि घर पापाच नाव वर मग व्हिडिओ बनवा ना घर नावावर कऱ्यनसाठी च plea 🤲

  • @sureshchavan9183
    @sureshchavan9183 4 года назад +5

    सर,
    तुम्ही एक विडिओ सावत्र भावंडाचा वारसाहक्क बद्दल एक विडिओ बनवा. म्हणजे आम्हांला पण त्याबद्दल माहिती मिळेल.

    • @swatisuryavanshi1061
      @swatisuryavanshi1061 3 года назад

      सर एखादया महिलेचे 2 विवाह झाले असतील व जमीन खरेदी ही दुसऱ्या लग्नाच्या नंतर केली असेल पण नाव मात्र पहिल्या पतीच्या आडनावाच्या आधारे जमीन खरेदी केली तर त्या महिलेच्या दुसऱ्या पतीच्या मुलींना जन्म देणारी आई एकच आहे या आधारे वारस ठरविता येते का

  • @pranjalishinde972
    @pranjalishinde972 Месяц назад

    Khup chan mahiti deli sir tumhi

  • @ashfaquedeshmukh7111
    @ashfaquedeshmukh7111 4 года назад +3

    कोर्ट द्वारे मिळालेले वारस प्रमाण पत्राचा वापर वारस नोंदणी साठी कसा करावा ? कृपया याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @amitkopardekar7452
    @amitkopardekar7452 2 года назад +1

    खूप खूप आपले आभार 🙏 कारण आपण खूप छान उदाहरण देऊन वारसानोंद बाबत योग्य माहिती दिलेली आहे.

  • @mahendramore1458
    @mahendramore1458 4 года назад +4

    सर माझ्या आजोबांची जमीन कोयना प्रकल्पासाठी 1964 ला संपादित केली. नंतर शासनाने अतिरिक्त जागेचे ग्रामस्थांना पुनरवाटप केल्या(पुन्हा परत केल्या) . पुनरवाटपा वेळी आजोबा हयात नव्हते व ती जमीन फक्त एकाच मोठ्या चुलत्यांचे नाव लागले. आता आजोबांचे सगळे मुलगेही हयात नाहीत व मोठ्या चुलत्यांचा मुलगा माझ्या बाबांचीच जमीन म्हणतो.
    काय करावे

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 10 месяцев назад

    🙏धन्यवाद, साहेब
    आपला व्हिडीओ एकदम उपयुक्त एवं माहिती पूर्ण वाटला.
    तरी कृपया वारसा हक्क सोडत बाबत माहिती देण्याची तसदी घ्यावी, हि आपणास नम्र विनंती.
    पुनःचं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद 🙏

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 4 года назад +4

    Sir नजर चुकीने हक्कसोड पत्र करून घेतलं असेल तर काय करता येईल

  • @jagdishdingore2334
    @jagdishdingore2334 4 года назад

    खूप चांगली माहिती. धन्यवाद सर.

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode 4 года назад +5

    आमची जमीन चुलत भावाच्या नावे आहे. आता आम्हाला खातेफोड करुन स्वतःची जमीन आमच्या नावावर करुन घ्यायची आहे त्यासाठी काय करावे लागेल?

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 года назад

    खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 4 года назад +17

    सर. नमस्कार
    सर आपला मोबाईल नंबर VDO बरोबर
    दिलात तर बरं होईल...

  • @supriyabhagat877
    @supriyabhagat877 4 года назад +1

    खुप छान माहिती दिली

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @ammitgangawane3505
    @ammitgangawane3505 4 года назад +3

    How to fill this form online ?

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад

    Khup chan mahiti dhayanvad like🇮🇳

  • @ankushpatil7553
    @ankushpatil7553 4 года назад +6

    वारस नोंद करण्यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ झालाअसेल तर काय करावे

    • @fishaikh4952
      @fishaikh4952 4 года назад +4

      वारस नोद ऐक वर्ष पेक्षा जासंत दिवस झाले तर काय करावे लागेल

  • @NehaKasare-kn1oi
    @NehaKasare-kn1oi Месяц назад

    नमस्कार खरटमल साहेब🌹🌹

  • @vasudevanramamurthy669
    @vasudevanramamurthy669 4 года назад +3

    I need legal heir certificate I am
    In hunt for it.Since last 15.days.Can u guide in this matter. Or help me.After watching ur video.

  • @deepalibiradar6556
    @deepalibiradar6556 2 года назад

    खूप महत्वाची माहिती अतिशय सध्या सोप्या शब्दात सांगितली आहे सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सर याच बाबत एक प्रश्न आहे कि याच प्रोसेस ने वारस नोंद करत असताना माझ्या एका चुलत भावाने विनाकारण त्यावर स्टे आणला आहे तर आता मी पुढे काय करू शकते प्लीज मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @vilasshinde2675
    @vilasshinde2675 4 года назад +7

    सर तुमचा contact number मिळाला तर बरे होईल

  • @chandrakantband6926
    @chandrakantband6926 3 года назад

    खूप छान माहिती दिली...

  • @prabhakarchavan8176
    @prabhakarchavan8176 4 года назад +5

    If father dies in city like Mumbai one year ago then what is the procedure.?

    • @vithalwatekar4431
      @vithalwatekar4431 День назад

      वारसामीळवि काय चाल

  • @ओन्लीमराठी-भ8थ
    @ओन्लीमराठी-भ8थ 4 года назад +2

    Very nice information regarding waris mind.

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 4 года назад +16

    सर माझ्या आजोबांच्या निधनानंतर आजोबांचा मृत्यू दाखला नसल्याने माझ्या वडिलांची वारस नोंद झाली नाही, आता माझे वडीलही हयात नाहीत. तरी आम्हा भावंडांची वारस नोंद कशी करावी.

    • @siddheshpandit7595
      @siddheshpandit7595 2 года назад

      वारसप्रमानपत्र कोर्टतुन काढुन घ्या

    • @MarathaGeneral
      @MarathaGeneral 10 месяцев назад +2

      Doghancha mrutyu dakhla Ani tumhi jevdhe bhau bahin aahat tyanche aadhar card aaiche aadhar card gheun. Talukyachya survey office la jaun online form bhara. Tumch Kam zal.

  • @shaikhmoizuddin9412
    @shaikhmoizuddin9412 3 года назад

    Sir jai hind amchiya chulat bhauancha inam waras sartificate SDM kadun Raad zhala ahe karan kaka chiya murtu natar SDM kade janiyas 17 varsh ushir zhala hota atta Kaye karave lageal please

  • @bapugaikwad8847
    @bapugaikwad8847 4 года назад +7

    माझे आजोबा मृत्यू होऊन 70 वर्ष झाली कुठे वारले माहीत नाही मृत्यू दाखला मिळत नाही मृत्य दाखला मिळवता येईल मार्गदर्शन मिळावे

    • @babasahebshekade7555
      @babasahebshekade7555 2 месяца назад

      100 रुपये स्टॅम्प वर अफेटीव करून द्या माझे आजोबा .... यांची मृत व्यक्ती नोंद आधळून येत नाही असे प्रतिज्ञा पत्र करा
      व आंदाचे तारीख टाकून नोंद करून घ्या असे प्रतिज्ञा पत्र करून द्या तहसीलदार कडे

  • @rtech1292
    @rtech1292 4 года назад

    महत्वाची माहिती दिली सर आभारी आहे.

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

    • @ram110486
      @ram110486 3 года назад

      @@valuableeducation pls share contact details

  • @samikshajoshi8207
    @samikshajoshi8207 4 года назад +6

    सर तुमचा नंबर मिळेल का? तुम्हाला संपर्क कसा करावा.

  • @poojabhatt9217
    @poojabhatt9217 3 года назад +1

    gavi majhya aaicha name 7/12 var aahe aani aai off jhali aahe ata mala varas nond karayachi aahe mala majhe nate vayek varas nond karundet nahi aani bolatat kahi nahi betanar tumhala mi ky karu shakato sir

  • @arunadhongade5846
    @arunadhongade5846 3 года назад +7

    तलाठी आमच्याकडे वारसनोंदणी साठी 3000 मागतात

    • @FirozKhan-yx6hu
      @FirozKhan-yx6hu 3 года назад

      सर बरी माहेति दिलि. 👍👍👍👍

  • @manojsutar9770
    @manojsutar9770 4 месяца назад

    Namaskar sir.
    Police patil varasa dakhala lihun det nasel tar kay karave.

  • @Nali2023
    @Nali2023 Год назад

    Nice Information
    Thank you

  • @humanbeing5871
    @humanbeing5871 4 года назад

    👍sir khup chan mahiti dili ..

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg.

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 4 года назад

    खुप छान सर जी 🙏

  • @minakshirajmane8918
    @minakshirajmane8918 Год назад

    Sir. 🙏🏻 mla jami mazhya mulichya navane karychi aahe..... Mzhe sasre mant aahet sod chithi de ani mulgi mla de mg mi karin jamin mulinchya navane nahitr nahi kart. Mzhi mulgi 6 years chi aahe. 🙏🏻sir piliz sanga

  • @Shaikh.AH.......
    @Shaikh.AH....... Год назад

    Sir baba 2004 la warle Anni Gharchi parestethi halakiche hote Tyat aaiche nidhan zale
    Ghar he baba chya nawane ahe .babache.anni.aaiche.mrutupatra .Ahe .Ghar nawane .hotel ka.

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 3 года назад

    खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद🙏

  • @vijaykadam3064
    @vijaykadam3064 4 года назад

    Chhan mahiti dili dhanyvad

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      धन्यवादा.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @ashpakpathan3382
    @ashpakpathan3382 4 года назад +2

    Knowledgeable..Sir lockdown will getting start up ..welcome to 5 G digital world 🌎 make connect for long ⌛

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @vaishalidongare7995
    @vaishalidongare7995 9 месяцев назад

    Sir mazya pati chya nidhan zalyamule mi varas praman ptra sathi cordat case dakhl kela ahe pn mazhi sasu hi jahilr nama gharavr lau det ni mhnun varas praman ptra det ni ahe prt jahir nama mrutukachya gharavr mazi sasu lau det nahiye mi ky karu sir krupaya lavkar mla reply dya hou shekel tr mla tumchya no. Deu shekal tr khup bare hoil sir

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 3 года назад

    Aai vadil astana mulika lagna zalelya mulilatiche nav varas nodkase karta yeyil krupay samjaun sanga

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा. तसेच माझे या विषयावरचेही व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा.

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 4 года назад

    खुपच सुंदर बातमी दिली ., मुत्युपत्राची अंमल बजावणी बाबत वीडीयो बनवा . ( नोंदणीकृत मुत्युपत्राची )

  • @sonalisankpal6893
    @sonalisankpal6893 3 года назад +1

    Mulila ghar hissa varas nond honyasati Kay Karve lagel

  • @dhirajsingrajput2668
    @dhirajsingrajput2668 3 года назад

    Sir Mazhe Aai Vadil Yanche Samppati Jamin Madhye Mala Hissa Vata Milel Ka Mazhe Aai Vadil Varlele Aahe Mazhe Bhau Mala Choli Bangadi Karat Nahi Kuthlyahi Prakare Sukh Dukhat Yat Nahi ( Mi Mulgi Aahe ) Mhanun Mala Kayde Shir Hissa Vata Milel Ka V Te Kase Niyojan Karave Please Ripley Sir 🙏🙏

  • @vidyaakki5899
    @vidyaakki5899 4 года назад +2

    Sir khup thanks
    Tumhi dileli mahiti apratim
    Jyani varasdarachi nond kityek varsha keli nahi tyanchi kashi process and fees kiti asnaar tyabddal mahiti havi ahe

  • @shaileshdahiwale5005
    @shaileshdahiwale5005 Год назад

    Sir, mazya bhavachi dath zali ani tyachya nater. varas mnun mich ahe. Bhavachi navi ghar ahe te mazya navi karayche ahe ani aamchi jaga gavthan chi ahe tr kay kru mnje mazya navaver hoel plz mala marg sanga

  • @shridharkulakrni1451
    @shridharkulakrni1451 4 года назад +1

    Sir namaskar informative video hota tumcha ,mazi ashi shanka ahe ki sheti madhe "gift deed "chi process ani documents ani total expenses ya baddal mahiti sathi video banva
    Thank you

  • @prashantbhasme4604
    @prashantbhasme4604 4 года назад +2

    Thank you sir , helpful information

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      Most welcome
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @shamsagvekar4644
    @shamsagvekar4644 Год назад

    Sir namskar gavi vadilo parjit jamin aahe tyavar aamchi nave nahit no tha bhau aahe tyachi nave aahe jay karaveto n
    Nave takat nahi jay karave tumhi sanga

  • @harshalpatil4496
    @harshalpatil4496 2 года назад

    padik dongral jamin bagayat varun Dongarpad/Padjamin kashi karaychi

  • @rahulchitare6477
    @rahulchitare6477 2 года назад

    Sir plz purpidit gruha nirman sanstha baddal mahiti dya tya madhe kay niyam astat ani sansthe madhe kashi jaga viku shaktat

  • @sanjaybhopale4412
    @sanjaybhopale4412 Год назад

    aai chya nave aslleli sheti mulanchya nave nond karayachi aahe 3 bhav 2 bhavachya naave karayachi aahe nond tr kashi hoil

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 2 года назад +1

    5 जण वारसा पैकी 3 वारसंचे नाव लागले चूकुन 2 नावे राहिली आहेत 1996. चा विषय आहे तलाठी कार्यालयात 2022 मध्ये राहिलेली 2. नावे सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी अर्ज केला पण तलाठी यांनी अर्ज नामंजूर केला
    प्रांत कार्यालय मध्ये जावून दावा दाखल करायला सांगत आहेत 26 वर्ष उशिर असल्यामुळे प्रांत साहेबांनी दावा फेटाळून लावला आहे
    आता उरलेले 2 वारस लागण्यासाठी पर्याय काय आहे

  • @narayanmahadik2756
    @narayanmahadik2756 4 года назад

    खूप छान माहिती

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.

    • @nirmalawaje9157
      @nirmalawaje9157 4 года назад

      साहेब मी जागा घेतले 4 गुठ आणि त्यजेत घर बादला आहे पण माझ्या नावावर नाही मी किती वेळा तसल ऑफिस ला मी नावावर करा मनुन पण नाही केला सर मी काय करू तुम्ही सांगा जरा 20 वर्षे झाली आहे

  • @gangadharpatil2303
    @gangadharpatil2303 4 года назад

    Khup chaan sir

  • @virgovenky6588
    @virgovenky6588 2 года назад

    varas me mera maa ko noc nahi de rahaa hai to konsa dusara option hai kya mahada me noc complsury hai

  • @sagarsonawane8643
    @sagarsonawane8643 9 месяцев назад

    Sir ,society...cha varas nod small video banava.. please

  • @arvindjagtap2601
    @arvindjagtap2601 4 года назад

    Maze ghar vadiloparjit aahe mi bhar purna maza pahane bandle pan redevop karte veli maza bhavane tyache 2 bhag kele van aani aatha aardha bhag magtho tar mi kay karu v mi ko aalele pissache kay

  • @santoshsonavane2669
    @santoshsonavane2669 4 года назад +1

    Mazya aai chi aai che naav mazya chulat mamani varaspatrat dakhvale naahi. Maze chulat aajobani mazya mayat nantar tyancha varas koni nahi. Ashi nonda keli aahe. Mi kay karave. Barich varshe zali aahi.

    • @santoshsonavane2669
      @santoshsonavane2669 4 года назад

      Sorry, aajoba cha mayat nantar.varas nahi Ashi nonda keli aahe. Pls. Cont. U r no.

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 3 года назад

    Jar samja chulatya ne wadilana god god bolun sagali sheti ani ghar aaplya mulanchya nawawar karun ghetale tar amhi 10 mulini ky karaych? Margadarshan kara sir please,

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      सदरची जमीन जर वडिलोपार्जीत असेल तर तुम्हाला न्यायालयात दाद मागता येईल.

  • @aratimore9439
    @aratimore9439 9 месяцев назад

    सर आमच दोन खोलीच घर आहे ईचलकरंजीत तर सासरे आमच्या लग्नाआदिच वारलेत तर हेदोगे भाउ लहान होते पन आता आमच लग्न होउ न हीऐकोनविस व्रश झाली आजुन ही घराला वारसा नोद नाही तर सासु दिर ही भाऊ बंदाचच आयकतातर तिगाचा ही वारसा नोदं करायचा आहे तर त्याच्या नकळत वारसा नोदं करता एईल का🙏🙏❤

  • @nikhilhumane2288
    @nikhilhumane2288 4 года назад +2

    Good Information by You Sir, Thank you!

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      You are welcome
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

    • @pravinpawar181
      @pravinpawar181 4 года назад +1

      जर वारसांनी सुरुवातीला हरकत न घेता हक सोडला व कालांतराने हरकत घेतली तर काय होईल

  • @eknathpathave902
    @eknathpathave902 3 года назад

    Mamachya jaminivar bhachyachi varas nond hote ka

  • @rajendrakolekar2847
    @rajendrakolekar2847 3 года назад

    kiva bhavane bahinichi nod lavali nasal tar ti lav shakato ka

  • @vishalnerurkar2753
    @vishalnerurkar2753 2 года назад

    Namaskar saheb maza azoba che zameen 7/12kadyche ahe pn gavatle olak dakhvat nhe kya karycha

    • @valuableeducation
      @valuableeducation  2 года назад

      तुमच्याकडे जमीनीचा गट नंबर असेल तर तुम्ही सातबारा ऑनलाईन घेवू शकता.
      Mahabhumilekh.gov.in

  • @dipakkhandare9497
    @dipakkhandare9497 2 года назад +1

    🙏Thank You Sir🙏

  • @kashinathhiremath7016
    @kashinathhiremath7016 4 года назад +2

    sir, dhakatya bhavane (tyachi bayako) lahan bhau , varalya nantar ( tee thyachi bayako) mhanun 7/12 la nav lawale aahe.
    mi motha bhau asun mala talathya kadun notis aleli nahi.. Kay Karave Lagel ?

  • @Pradeepsahane
    @Pradeepsahane 4 года назад +1

    सर माझ्या वडिलांचे १९वरषापुरवी शेतीचे वाटणी झाली मला १काका व४ आतया आहेत तेव्हा काकाना शेती दिली पण आतयाचे हक्क सोड घेतले नाही पण त्या वेळी त्यांचे काही नव्हते माझे आजोबा ५वरषे पुरवी वारले व माझे वडील ३ वर्षांपूर्वी वारले आमची वारस नोंदणी झालीआहे पण आता काकांनी व आत्यांनी त्यांची नावे लावनयासाठी नोटीस पाठवले आहे काय करता येईल

  • @sachinghag858
    @sachinghag858 Год назад

    Sir 20 varsha ni vars nod Keli tar hoil ka. Please reply dya.🙏

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 Год назад

    धन्यवाद आभार

  • @rameshsonavane6562
    @rameshsonavane6562 4 года назад +1

    नमस्कार सिर
    वडिलांची रूम त्यांच्या नंतर आई चे नाव आले,
    आईला वारस ह्कांच्या paper society ne दिला,
    त्या पेपर मध्ये आमच्या चौघा भावंडांची नावे टाकली आहेत , आम्ही पेपर बनवुन society देऊ का,
    आमच्या बहिणी हस्थक्षेप करतील का, आई मृत्यू आगोदर हा society चा पेपर ९/०९/१९९५ ला बनवला आहे . आम्ही काय करावे ते सा॑गा

  • @prabhakarthakur1141
    @prabhakarthakur1141 4 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती आहे, सर. धन्यवाद.

  • @Neturalbigvlog
    @Neturalbigvlog 2 года назад

    Sir hakkshod kelo 2 loka che aani sagle nav kami jhale sir problem ky asel please 🙏

    • @valuableeducation
      @valuableeducation  2 года назад

      तलाठी कार्यालयाला पत्र द्या त्याची प्रत तहसिलदारांना द्या.

  • @yasinbagwan1146
    @yasinbagwan1146 3 года назад

    Sir majya attichya nave 3 gunthe jamin ahe v attiche lagin hi jale nahi ahe v atti mayt jali ahe tar mi vars none kasi karavi te sangu shkal ka

  • @rspingle
    @rspingle 4 года назад +1

    धन्यवादय

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      धन्यवाद.
      ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @ladmahadeva3679
    @ladmahadeva3679 4 года назад

    अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण,सर्वांनाच याचा खुप फायदा होईल.

  • @madhurimhatre9999
    @madhurimhatre9999 4 года назад +1

    Sir jamin ajoba chya bacachya navavar ahe tar papacha ni bhavache nav kase kay lagel

  • @ejajpathan5316
    @ejajpathan5316 2 года назад

    Sir is their any time limit for registered gift my father has done registered gift deed in 2014 but still i have not transferred the propety my expired in 2015

  • @parmeshwarbarkund7098
    @parmeshwarbarkund7098 2 года назад +2

    जर जमिनीचा मालक जिवंत असेल व त्याला वारस नोंद करायची असेल तर त्याची काय पद्धत आहे. कृपया यावर मार्गदर्शन करावे.... परमेश्वर बारकुंड करमाळा सोलापूर

  • @bhaiyapatilpatil1162
    @bhaiyapatilpatil1162 4 года назад +2

    सर अामचे आजोबा व आजी याच्या मुत्यु पूर्वी काकांनी त्यांच्या कडून बक्षीस पत्र व खरेदी खत करून घेतले आहेत जमीन चे प्लटांचे आम्हाला न माहीती केले गेले आहेत आमची संमती नसताना देखील हे व्यवहार झालेले आहेत तरी अशा व्यवहार झाल्यावर त्यात काय करावे लागेल सांगा

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 года назад

      जर सदरची मिळकत तुमचे आजी आजोबा यांची स्वकष्टार्जीत असेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. वडिलोपार्जीत असेत तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता.

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 4 года назад +2

    Helpful information

  • @vaibhavchinchkar6734
    @vaibhavchinchkar6734 4 года назад +1

    S.R.A.scheme / फ्लॅट मंध्ये ही माझ्या मुलाला त्याच्या आजोबांनी मृत्यू पत्रात वारस बनवले आहे तर त्याची ही नोंद करावी लागेल का . जर नोंद केली नाही व सोसायटी कमिटी ने noc दिली तरी Flat allotment च्या वेळेला कलेक्टर objection घेईल का

  • @Mr.khedkarvision
    @Mr.khedkarvision 2 года назад +1

    सर हरकत घेण्याचा कालावधी निघून गेला असेल तर आपण हरकत घेऊ शकतो का कारण की माझ्या आईच्या भावांनी माझ्या आईला कळूच दिले नाही की आपल्या नावावर करत आहोत आणि त्यांनी करून घेतलं आता त्याला खूप वर्षे झाली आहेत तर यावर आपण काही करू शकतो

  • @Dk-ln9fb
    @Dk-ln9fb 4 месяца назад

    Sir maje आजोबा मयात होऊन ५० वर्ष झाली आहे मयात सरटिफिकेट आहे त्याला ऐकाच मुलगा आहे त्याच्या मुलाच्या नावावर जमीन कशी करता yeal

  • @kiranmohite6504
    @kiranmohite6504 2 года назад

    सर मी घर बांधण्यासाठी माझ्याच जागेच्या बाजुला मी माझ्या भावकितल्या माणसाची जागा घेतली ती पण विकत त्याचा मी काय कागद बनवला नाही मी
    पैसे दिले माज घर मी बांधला आता घराचा घरपट्टी पण मी भरतो मी त्याला आता बोलतोय की मला स्टॅम्प paper वरती मला लिहून दे माझा ह्या जागेशी
    काहीच संबंध नाही भविष्यात पण नसणार आहे असं मला लिहून दे तो लिहून देण्यास तयार नाही वेगवेगळी करणे देतोय मला याच्यावर्ती उपाय सांगा सर मी काय करू मला काळजी घ्यायची गरज आहे का

  • @sadhanaramteke2314
    @sadhanaramteke2314 4 года назад

    Sir mi natyatil mulagi adopt dattak ghetali v dattak chi process tahasil office mdhun Keli pan mulichya mammine mulila sarv mala trass denyababat shikaun pathwale mulagi mala Tu molakarin ahes Tu ethe Raju nakos Tu gharatun noun Ka ase bad ghalu lagali tsech varavar amchi mulagi part dhya ase mhanu lagali tyamule mulagi Ata tyanche ghari ghari she Ata mi Kay Karu itaka trass Sahab karnepekha mulila vapas Karun nav badlayache ahe tyassthi mala Kay karave lagel mi khup dukhi zali ahe pz nav badalnyachi process Sabha v upay p suchava

  • @shobhanasapkale7637
    @shobhanasapkale7637 3 года назад

    Sir bhogavata 2ahe me mulagi ahe mala vadila ni jamin dili nahi mala jamin ghya yachi ahe bhogavata 2 la kiti vela lagato