आई वडिलांनी सुद्धा स्वतःला बळकट करायला पाहिजे, भावनांनी... -अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने I जन्मऋण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 мар 2024
  • “जन्मऋण”द्वारे ‘आभाळमाया’ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण!
    मुंबई:आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी ‘जन्मऋण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून ‘आभाळमाया’ या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड करुन बाजी मारली आहे.
    मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती, मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावे? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पहावे? बदलत्या काळानुसार त्याची पावलं कशी ओळखावी? याच विषयावर आधारित “जन्मऋण” हा त्यांचा चित्रपट आहे.
    श्री गणेश फिल्म्स निर्मित आणि श्री अधिकारी ब्रदर्स प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका - चित्रपट अभिनेते महेश ठाकूर यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.
    येत्या २२ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.
    #Janmarun #sukanyamone #manojjoshi #kanchanadhikari #sushantshelar #dhananjaymandrekar #tusharkawale #anaghaatul #maheshthakur #vaishalisamant #sudeshbhosle #Shriganeshfilms #shriadhikaribrothers #director #producer #writer #story #music #actor #movie #marathimovie #marathifilm #film #marathi #cast #drama #interview #rashtramudra #vinitmasavkar
    #जन्मऋण #सुकन्यामोने #मनोजजोशी #कांचनअधिकारी #सुशांतशेलार #धनंजयमांद्रेकर #तुषारआरके #अनघाअतुल #महेशठाकूर #वैशालीसामंत #सुदेशभोसले #श्रीगणेशफिल्म्स #श्रीअधिकारीब्रदर्स #निर्माती #दिग्दर्शक #लेखन #कथा #पटकथा #संगीत #कलाकार #मराठी #चित्रपट #टीझर #ट्रेलर #मुलाखत #राष्ट्रमुद्रा #विनितमासावकर

Комментарии • 82

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 Месяц назад +1

    मी ह्या विषयावर खूप लिहिलं आहे. आणि तुलाही बरेच लेख पाठवले आहेत.

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Месяц назад +4

    खरंच खूपच बोधप्रद संदेश आजच्या पिढीला दिला आहे आणि आई बाबा नी मुलाला प्रदेशात नोकरी करत ऑफिस मधून जावे लागले तर कृपया त्या ला पाठवावे आमच कसं होईल असे बोलून नये काही काळजी करू नकोस आम्ही आहेत असा धीर दिला पाहिजे

  • @NareshParkar
    @NareshParkar Месяц назад +2

    ह्या विषयावर अद्याप भरपूर नाटक, सिनेमा येऊन गेले, पण त्या episode मध्ये त्या वर उत्तर किंवा solutions असा काही प्रकार सुचविलेला गेला नव्हता,तो आपण उत्तम रित्या मांडलेला दिसतो.
    Financial stability and physical awareness are the two main aspects in which you have succeeded.
    The best ever thoughts. 10 out of 10.

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 Месяц назад +3

    सुकन्या तुझ्या सारखेच तुझे विचारही सुंदर आणि प्रगल्भ आहे.

  • @madhuritawade3465
    @madhuritawade3465 2 месяца назад +3

    आमची लाडकी अभिनेत्री .आईच्या भूमिकेत तर खूपच आवडते . किती सकारात्मक विचार मांडलेत . मनाने तयार व्हा हा विचार मस्त . नाती कशी जपावित हे सुद्धा समजते .मुलांची प्रगती ह्यापेक्षा दुसरा पालकांचा मोठा आनंद कोणता असू शकतो .

  • @mrunalpendse2346
    @mrunalpendse2346 2 месяца назад +14

    सुकन्या ताई तुम्ही किती छान सांगितले ,खरच असे वागायला पाहिजे म्हणजे नात्यामध्ये कटुता येणार नाही

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 2 месяца назад +7

    खूप छान विचार मांडले एक नवी बाजू लक्षात आणून दिली आईवडिल ही मुलांच्या ऋणात असतात आपण मनाने शरिराने समर्थ राहून त्यानाही करावे प्रसग पडलाच तर आधार द्यावा घ्यावा

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 2 месяца назад +4

    खूप छान विषय आहे काळाची गरज ओळखून केला आहे सिनेमा जरूर बघणार आहे शुभेच्छा

  • @nehagandhi5442
    @nehagandhi5442 Месяц назад +1

    खरंच खूप सुंदर विषय आहे. आई-वडिलांनी प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे.
    एक हुशार माळी झाडाची पिकलेली पानं, खराब पान काढून टाकतो जेणेकरून इतर चांगल्या पानांचे पोषण झाले पाहिजे.
    आपण पण आपलं व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे. सर्व काही मुलांच्या नावावर नाही करायचं कारण जोडलेली माणसं आणि साठवलेला पैसाच आपलं म्हातारपण सुखकर करतो

  • @sheelab1009
    @sheelab1009 Месяц назад +1

    One of the best and realitybased video. सुकन्या तू माझी सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहेस. आता तर जास्तीच आवडायला लागलीs. मी माहीम मध्ये रहात असताना तुम्हा दोघांना नेहमीच बघायची आणि खुश व्हायचे
    आता अमेरिकेत settled आहे मुलाकडे.
    Sheela Barde
    82 years old

  • @anjudamle6293
    @anjudamle6293 2 месяца назад +2

    खरचं आहे. मुलांनी चांगले शिकून सवरुन पुढे जावे त्यांची चांगली प्रगती व्हावी हेच पालकांना अपेक्षित असते. मुलांना व पालकांना एकमेकांची काळजी असतेच. असे वाटते. चित्रपट जरुर पाहणार

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Месяц назад +1

    खूपच सुंदर सुकन्या ताई, माझी खूप आवडती जोडी आहे तुम्ही दोघे, त्यात तू तर खूपच..अगदी मनजवळची वाटते...खूप छान विचार, अगदी तंतोतंत पटते आहे, हल्ली बऱ्याच ठिकाणी हाच प्रोब्लेम आहे मुलं परदेशात आणि आई वडील इथे, विषय आणि विचार खूप छान मुद्देसूद मांडले आहेस,हल्ली आपण ही मानसिक,शारीरिक आणि बौद्धिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम असायलाच हवे...खूप अगदी आपल्या सामान्यांच्या मनातलेच विचार वाटत आहेत! तसेच will cha विचार पुढच्या सोयी साठी कसा योग्य आहे हेही छान सांगितले, खूप च भावले मनाला👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤️😘 तुमच्याशी संपर्क करायला आवडेल.काही contact no मिळू शकेल का please

  • @manishamirgal6001
    @manishamirgal6001 Месяц назад +1

    Sukanya maam khup chaan bollya

  • @manjushalodha4191
    @manjushalodha4191 Месяц назад +1

    नाजुक व ज्वलंत विषयाची अप्रतिम,सुरेख मांडनी सुकन्याताई .
    आभार व शुभेच्छा

  • @shiluapte2285
    @shiluapte2285 2 месяца назад +2

    सुकन्या ताई तुम्ही जे बोलता वागता हे तंतोतंत माझ्या बाबतीत असंचं आहे. माझी मुलं मुली बाहेरच आहेत. पण मुलाने हा तुमचा इंटरव्ह्यूव ऐकला आणी मला म्हणाला तुच बोलते आहे असं वाटलं. त्याला खुप भरून आलं की सेम अगदी माझ्या आईचे विचार असेच आहेत आणी माझी आईच हे बोलते असं मला त्याने सांगितले

  • @shraddhajoshi915
    @shraddhajoshi915 Месяц назад +2

    अगदी आजचा ज्वलंत विषय निवडलाय.चित्रपटासाठी शुभेच्छा.नक्की बघणार.

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 месяца назад +1

    खूप छान, गोडी गुलाबी मध्ये rahun कसे वागावे हे मस्त समजावले..
    खरच.. ही ajchya kalachee गरज आहे..
    Dhanyavaad सुकन्या ताई..
    Tumche abhar..
    🙏🙏

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 2 месяца назад +3

    Khup chaan sangitle sukanya Tai tumhi agadi khar aahe Janm run sathi khup khup shubhechha

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Месяц назад +1

    सुकन्या ताई, अतिशय परिपक्व विचारांच्या व अभिनय करणार्या अभिनेत्री

  • @lalitadeshpande3612
    @lalitadeshpande3612 2 месяца назад +4

    खूपच छान, समुपदेशन केले आहे पालकांचे सुकन्याताईंनी.अप्रतिम

  • @shobhahoskalle
    @shobhahoskalle Месяц назад +1

    15 किंवा 22 मार्चला इचलकरंजी आणि सातारा भागात चित्रपट प्रदर्शित झाला नाही

  • @kalpanajagtap2840
    @kalpanajagtap2840 2 месяца назад +5

    छान विषय निवडला.आजच्या काळाची गरज आहे.

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Месяц назад +1

    खूपच सुंदर सांगितले आहे आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ह्या गाण्यात छान संदेश दिला आहे आणि बोधप्रद संदेश आहे खरंच आहे आपण भक्कम राहिलो तर मुलांना आधार आहे कधी ही जबाबदारी मला जमणार नाही असे बोलू नये मी आहे

  • @anuradhajadhav8184
    @anuradhajadhav8184 Месяц назад +1

    खूप धन्यवाद सुकन्या ताई खूप छान विचार मांडलेत

  • @samiksharane3751
    @samiksharane3751 2 месяца назад +1

    Exactly 💯 खूप छान मत,सविस्तर,सोप्या पद्धतीत मांडलत...❤

  • @NeelaDige
    @NeelaDige 2 месяца назад +5

    Khup chan bolalat Sukanya tai 100 takke khar ahe

  • @anantparab3200
    @anantparab3200 Месяц назад +2

    आपण आणि आपले पती आमचे लाडके आहात

  • @pinkisingh4567
    @pinkisingh4567 2 месяца назад +1

    Very positive approach conveyed by Sukanya .Good for the society .

  • @sushamathite5735
    @sushamathite5735 2 месяца назад +3

    आपल्या विचारातून सकारात्मकता नक्की वाढेल.फार छान विचार

  • @jayalumpatki5023
    @jayalumpatki5023 Месяц назад +1

    खुप सुंदर विचार सांगितले दोन पिढ्यांतील अंतर नक्की कमी होईल

  • @madhavinakhare2397
    @madhavinakhare2397 Месяц назад +1

    Khupach nast vichsr aahet agadi manala Pattayat sarvani bodha ghyava asach aahet tumha sarvana khup khup shubheccha

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 2 месяца назад +1

    Mam tumhi vajnakade ka laksh det nahi, you are my favourite person

  • @sangitamukwane4778
    @sangitamukwane4778 Месяц назад +1

    Khup sunder vichar ahet baghu aamhi picture 🙏🙏

  • @manishawasule198
    @manishawasule198 2 месяца назад +4

    Khupacha chhan sangitla tumhi khup positiv khup aavadal nakki tasa prayatna karel Namaskar ❤

  • @poojanaik1390
    @poojanaik1390 2 месяца назад +4

    Khoop chan bolane aahe ekdam khare .. thanks dear

  • @vandanasalagre883
    @vandanasalagre883 Месяц назад +1

    खूप छान वाटले तुमचा वीडियो बघून

  • @ashalatabhingare9985
    @ashalatabhingare9985 Месяц назад +1

    Sukanya khup changale vichar mandales Chan 👌
    Tula. Shubhechha💐

  • @anuradhajoshi5496
    @anuradhajoshi5496 2 месяца назад +1

    ताई.तुम्ही .खूप .छान.माहिती.दिली.धन्यवाद

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 2 месяца назад +1

    खुप छान विचार मांडले सुकन्या ताई सिनेमा जरुर बघेन

  • @milanbhagvat7315
    @milanbhagvat7315 2 месяца назад +1

    Vvtrue sukanya Tai v well said and appropriately put up

  • @user-ib3tz9kw8u
    @user-ib3tz9kw8u 2 месяца назад +1

    Khup chan Vichar aahet madam👍👍👌👌🙏

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Месяц назад +1

    मी माझ्या तिन्ही मुलीला सांगितले बिंधास्त रहा प्रदेशात जाण्याची संधी मिळाली ती सोडायची नाही माझी काळजी करू नका कारण मी डी एड ला असतानां आम्हाला काॅलेज मध्ये आकाशी झेप घे रे पाखरा हे गीत ऐकून आम्हाला संपूर्ण अर्थ समजून सांगितला आणि मी पण आज ही माझ्या नातीना तेच वेळोवेळी मार्गदर्शन करते

  • @anuradhajadhav8184
    @anuradhajadhav8184 Месяц назад +1

    खूप धन्यवाद ताई छान विचार मांडलेत

  • @priyankabandiwadekar4865
    @priyankabandiwadekar4865 2 месяца назад +3

    Khup chhan. Kharay palakani balkat vhayala pahije.

  • @madhurigunaware2968
    @madhurigunaware2968 2 месяца назад +3

    Kharach Aaikun Manala Ubhare Aali 🙏👏

  • @sheetalerondkar9225
    @sheetalerondkar9225 2 месяца назад +3

    सुंदर मार्गदर्शन

  • @hemlatadeshpande8205
    @hemlatadeshpande8205 2 месяца назад +1

    तिन्ही सांजा हा चित्रपट ह्यावरच आधारित आहे जरुर बघा

  • @madhurideshpande3749
    @madhurideshpande3749 2 месяца назад +3

    Tai khup sunder information dili. M naki ha picture bagin.maza mulga pan US la aahe. M pan mala emotionally changed Karin.Thanks once again.All the best tumcha Ani tumcha muli cha future karita. God bless you ❤

  • @sangitavisapurkar3987
    @sangitavisapurkar3987 Месяц назад +1

    Khup chyan tai !! Pahuch cinema

  • @sindhubhure4512
    @sindhubhure4512 Месяц назад +1

    Khupach chhan fakta mulanach dosh ka dhyaycha aplyatahi Dosha astoch ki

  • @shivangidamle3437
    @shivangidamle3437 2 месяца назад +2

    खूप सुंदर , विचार आहेत.

  • @nabhathakur1387
    @nabhathakur1387 2 месяца назад +2

    खूप वचन विचार मांडलेत सुकन्या ताई तुम्ही. आमची मने खंबीर होतील. आणि तुम्ही म्हणता तशी मुलांना पण आमची काळजी असतेच. माझ्या दोन्ही मुली ज्या सासरी आहेत. त्या रोज एकदा तरी आम्हाला फोन करतात. चौकशी करतात. धन्यवाद ताई.

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 2 месяца назад +2

    गुणी अभिनेत्री

  • @vijayaingle4657
    @vijayaingle4657 2 месяца назад +1

    सुंदर मार्गदर्शन लाभले ताई 🙏

  • @srshukla2407
    @srshukla2407 2 месяца назад +2

    खूप छान , नक्की बघू सिनेमा

  • @mangalavaval33
    @mangalavaval33 2 месяца назад +1

    खुपच सुंदर 🎉🎉

  • @shobhakulkarni122
    @shobhakulkarni122 2 месяца назад +2

    Khupch. Chan. Vichar

  • @VarshaPanwar-li6xu
    @VarshaPanwar-li6xu 2 месяца назад +2

    Khoop chan vichar

  • @ujwalajewlikar4909
    @ujwalajewlikar4909 2 месяца назад +1

    🙏🙏👌khup ch chan

  • @anitachodankar4329
    @anitachodankar4329 2 месяца назад +1

    खुप सुंदर विषय

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 месяца назад +1

    Every word is really important, there are many property issues after death of the parents. Parent should be wise to distribute not only wealth but also love and care to their children.

  • @neetasuryawanshi3237
    @neetasuryawanshi3237 2 месяца назад +1

    खूप छान

  • @VidyaParab-gt5lv
    @VidyaParab-gt5lv 2 месяца назад +1

    Khoopach chhan ,thanku

  • @leenagole1949
    @leenagole1949 2 месяца назад +2

    Very nice tho

  • @geetashrotri792
    @geetashrotri792 2 месяца назад +1

    Khup sunder

  • @madhumatigaikwad7750
    @madhumatigaikwad7750 2 месяца назад +2

    Amhala kay kele tar pudhacha prawas sukhakar hoeil.te amhi karto ahot.Dhanyawad.

  • @user-tq7rz1bf7y
    @user-tq7rz1bf7y 2 месяца назад +1

    खूपच छान👍

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 2 месяца назад +1

    It would be better if this sensitive topic is explained by someone elderly. …

  • @surekhanagarkar4824
    @surekhanagarkar4824 2 месяца назад +1

    Kiti halk vatayla lagl . Tumche vichar eikun mana mana che oze Kami zale

  • @sunitalondhe8167
    @sunitalondhe8167 2 месяца назад +1

    Be practical

  • @sunandakhare
    @sunandakhare Месяц назад +1

    Upadesh karane faaaaar sope asate. Pan jache jalate tyalach ķalate..Gharoghri matichya chuli nasatat. 😢

  • @vijayapatekar1316
    @vijayapatekar1316 2 месяца назад +2

    Tumhi sangitlelya Sglya goshti purfect aahe.pn vridhashram hi kalpnach shn hot nahi.karn sglyana vridhashram prvdt nahi.mg tumhi sadhi vridhashram bagha.khup ghanrede astat
    . swachhata nste.

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 2 месяца назад +1

    A C room madhe basun he vichar changle.ayushyabhar kasht karun mhatarpani sudha tumhi balkat wha. Vrudhashram changle ahe. Waa....thodo vayomanane kadak bollo.maf kara.ajun mi balkat.ahe.shree gurudev dutta

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 2 месяца назад +1

      इथे एसी रुमचा काय संबंध ?
      खरच जर समाधानी रहायचं असेल तर सतत मुलां वर अपेक्षांचंं ओझं टाकून त्यांना आरोपींच्या पिंजर्‍यात उभं करण्या पेक्षा हेच योग्य आहे.

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 2 месяца назад +1

    Astil ase 5 10 take mula pn kiti gharat aai vadila gelya nantar tyanche photos astat.with due respect.it is common g
    Fact.

    • @rameshdattapujari247
      @rameshdattapujari247 2 месяца назад +3

      फोटो भिंतीवर असेल तरच प्रेम,आदर असं असं काही नाही. .....सौ.पुजारी

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 месяца назад +1

      होय वाळवी लागते/ आणि लाकडी वस्तू कामातून जातात माझे घरी मी यजमानांचा फोटो मी नाही लावला परंतु ते मनांत असतात च मला वयामुळे काही करायला जमत पण नाही दुसऱ्या कडून करून घेणे मला पटत नाही.