मन हलकं करणारी मराठी गाणी | Shukratara Mand Vara | Swar Gangechya Kathavarti | Old Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 387

  • @rashmigharat2073
    @rashmigharat2073 2 месяца назад +33

    65-70 ला पोहचलेली प्रत्येक व्यक्तीला ही गाणी अतिशय उत्तम टॉनिक आहे.कारण मनातील द्वंद्व हया गाण्यांनी विसरायला होतात.कारण ह्या वयातल्या माणसांचे मन कोणीही जाणवू शकत नाही.पैसा असूनही आणि नसूनही, त्याग नात्यासाठी केलेला असतो पण दिसत नाही. ही गाणी त्यांना समजून घेतात❤

  • @amolpagare8330
    @amolpagare8330 3 месяца назад +20

    कमेंट किती छान आहे असं वाटत वाचत राहावं 👌 प्रत्येकाचे अनुभव भाव सर्व दिसत लिहिण्यातून खरच गाणी होती मराठी शांत आणि अर्थपूर्ण

  • @ashamahabdi2290
    @ashamahabdi2290 4 месяца назад +48

    नदीच्या काठी असलेल्या झाडाखाली बसून मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने वाऱ्याच्या हलक्या झुळकी बरोबर ही गाणी ऐकायला मिळणे, स्वर्गसुखं म्हणजे नेमकं काय हे कळतं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prashantpanchal2668
    @prashantpanchal2668 3 месяца назад +140

    शाळेत जाताना ही गाणी लागायची तेव्हा मर्फी चा रेडिओ होता ८८ लां असे दिवस नाही येणार परत❤

    • @maclimp
      @maclimp 3 месяца назад +16

      माझा जन्म ८८ साल चा सर ,,, मी पण हे गाणी खुप आवडीने ऐकतो,,,८० ९० काळ खुप सुंदर होता

    • @shrimatimantri9360
      @shrimatimantri9360 2 месяца назад +3

      प्ै

    • @AshaChaudhari-jo3dh
      @AshaChaudhari-jo3dh 2 месяца назад

      Her
      ​@@maclimp

    • @maclimp
      @maclimp 2 месяца назад +1

      ??​@@AshaChaudhari-jo3dh

    • @pankajjambhorkar7743
      @pankajjambhorkar7743 Месяц назад +1

      . फक्त त्या गोड़ आणि सुंदर आठवनी राहतात बाकी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Месяц назад +1

    🌹👌उसवून श्वास माझा,फसवून रात गेली” स्रीसुलभ अव्यक्त भाव अप्रतिम गुंफन❤️👌❤️👌👌⭐️❤️👌❤️⭐️❤️👌❤️👌❤️🌼🌺🌼🙏

  • @vivekgidde8420
    @vivekgidde8420 3 месяца назад +35

    फक्त आणि फक्त ऐकतच रहावे, वाटते वर्णन करूच शकत नाही, आम्ही सगळे फारच नशीबवान की ही नितांतसुंदर अशी गाणी ऐकतोय, सगळी काळजी, चिंता विसरून जाते, खूप समाधान लाभते आहे,

  • @ashoksawant1548
    @ashoksawant1548 5 месяцев назад +38

    ही जुनी मराठी शांत गाणी रात्री झोपताना ऐकता शांत झोप लागते व सगळी दुःख विसरल्या सारखे वाटते 💜👍

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 2 месяца назад +9

    खूप शुभेच्छा, जुन्या आठवणी जाग्या होतात. प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा सरासरी काळ, वेळ, आवड, छंद, असतात..
    खूप कष्टाने ही गाणी, संगीत, रचना अर्थपूर्ण आहेत.
    धन्य.. कलाकार, गीतकार संगीत कार, आणि दाद देणारे... रसिक जनता...
    जुने ते सोने.. 😊

  • @subhashdhande4182
    @subhashdhande4182 10 месяцев назад +25

    ही गाणी म्हणजे एक आनंदाचा डोह या डोहात उडी मारत मनसोक्त डुंबावे व काही क्षण आपण आपल्यातच रमून जावे. असे वाटते.

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Месяц назад +4

    मी सुद्धा 80 च्या दशकातला ही गाणी म्हणजे ऐक उत्तम महिफलीची सुरेख सुरेल पर्वणी होती मला आठवतं रात्री 10 वा. आपली आवड ह्या रेडिओवरच्या कार्यक्रमात ही खास रसिकांना मेजवानी असे आजच्या मोबाईल युगात ही छान सुरांची सुरेल सुरावट आजही मी रात्री न चुकता ऐकतो. ही शांत सुरांची सुरावट माझ्यालेखी आनंदाची शिदोरी आहे.
    शेवटी म्हणतात ना जुनं ते सोनं 👌
    Old is gold 👍🏼

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 5 месяцев назад +15

    तिशय सुरेल गाणी,,सुरेल गायकांच्या सुरेल आवाज ,गेली २० वर्ष ही भावपूर्ण गीते आहेत
    रात्री,झोपताना ही गाणी ऐकत केव्हाच झोपी जातो.धन्यवाद गीतकार, संगीतकार आणि गायकांना.

  • @BANSODEMOHANKUMAR
    @BANSODEMOHANKUMAR 5 месяцев назад +14

    खरंच माझं मन शांत झालं खूप छान गाणी आहेत 👏

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 Месяц назад +2

    खरंच किती छान वाटलं हि गाणी ऐकायला.. जुन्या गत काळाची आठवण येते आणि मग मन मोहरुन जातं.. मस्त..

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Месяц назад +7

    🌹👌निराश मनाला नवचैतन्य देणारे कवी मंगेशकरांचे प्रभावी शब्द” या जन्मावर शतदा प्रेम करावे❤️👌जबरदस्त!!❤️👌❤️👌⭐️❤️👌❤️🙏

  • @user-fb9lv5tx2h
    @user-fb9lv5tx2h Месяц назад +4

    लोकांच्या रेडिओवर लावलेली रस्त्यावरून जाताना ऐकलेली अवीट गोडीची गाणी लहानपण फिरून परत आले धन्यवाद 🚩🚩🌷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @ksambolkar
    @ksambolkar 27 дней назад +3

    गाणी अशी होती की क्षणात मनात ठसत होती, एकाच वेळी आम्ही चित्रपट कृष्णधवल असे पाहत असे पण त्याचवेळी माझ्या मनात रंगीत चित्रपट चालत असे व असे कित्तेक दिवस चालत असे. आजही तीच गोडी आहे शब्द व संगीता मध्ये.

  • @user-ek8gg4hr9b
    @user-ek8gg4hr9b 7 месяцев назад +17

    माझ्या आयुष्यातील एक अनमोल ठेवा.... ज्याच मोल नाही मी करू शकत.... कसे आभार मानू तुमचे ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @guniwakode879
    @guniwakode879 Месяц назад +4

    खरच लहानपणीची गाणी अवीट होती.आता ही गाणे ऐकली तर बालपण आठवते.रेडीओवर गाणी लावली की डोळे उघडायचे

  • @premanandubale9144
    @premanandubale9144 7 месяцев назад +50

    😅म्हाताऱ्या रसिकाला तरुणाईतली आठवण!!!!असं वाटत मी अजून ❤तिथं आहे.

    • @kishoriturbhekar137
      @kishoriturbhekar137 6 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤00❤❤⁰❤⁰0

    • @Hallaukabar
      @Hallaukabar 3 месяца назад +6

      साहेब मस्त... तुमच्या शब्दांनी अंगावरती काटा उठवला❤❤

    • @da2752
      @da2752 3 месяца назад +4

      मन तरुण आहे..

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 5 месяцев назад +10

    🙏🏻🙏🏻खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 सर्व गाणी मनाला खुप खोलवर लागली 🙏🏻🙏🏻......😭 ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻एक गाण तर खुपच आवडत आहेसखी मंद झाल्या तारका खरच खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭

  • @arpanasarvankar4204
    @arpanasarvankar4204 2 месяца назад +7

    हि गाणी सतत ऐकत रहाविसी वाटतात अप्रतिम

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 7 месяцев назад +8

    ❤❤❤ही गाणी ऐकल्या वर आपल्या प्रेमाची आठवण झाली नाही अशी एक.ही व्यक्ती नसेल😢😢

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Месяц назад +3

    🌹👌स्वरगंगेच्या कांठावरती वचन दिले तू मला”गाण्याचा अर्थ कळण्याच वय नव्हत , पण रेडिओवर गाणे लागताच पावले थबकायची,कान टवकारले जायचे❤️जादूई गाण👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌❤️🙏

  • @AyushArjun-kx1ze
    @AyushArjun-kx1ze Месяц назад +3

    माझे बाबा सकाळी हे गाणे लावायचे आम्ही ह्या गाण्याच्या आवाजाने उठायचं शाळेत जायला

  • @ashokgaikwad548
    @ashokgaikwad548 11 дней назад +1

    एकदम मस्त. हे गीते ऐकून ८० च्या दशकात पुन्हा एकदा गेल्यासारखे वाटते. खरोखर खूप छान काळ होता तो. सर्व गीतकार संगीतकार गायक यांना खूप खूप धन्यवाद

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 22 дня назад +1

    खरे आहे शाळेत असताना ऐकलेली गाणी अजून ही अवीट गोडी ची .,🙏🙏

  • @sadhanagaikwad3432
    @sadhanagaikwad3432 7 месяцев назад +17

    खरंच मन हलकं झालं कारण ही जुनी आठवणी तिल सुगम संगीत आता रेडिओ वर पण लागत नाही धन्यवाद मराठी संगीत 👍

  • @sanjayjangam7243
    @sanjayjangam7243 2 месяца назад +4

    86 ला वयस्कर लोक ऐकायची गाणी पण ती आजही आपण ऐकतोय . सुंदर रचना आहेत...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 14 дней назад +1

    🌹👌शब्दांकीत गाण्यातस्वतःला शोधता ,शोधता मन हलकं फुलक❤️👌अप्रतिम प्रतिभेची उंच भरारी❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @purnimashende3787
    @purnimashende3787 Месяц назад +1

    अप्रतिम अवीट अशी गाणी. कधीही ऐकावी केव्हाही ऐकावी अशी मन fresh करणारी...अ हा हा

  • @mosinmomin495
    @mosinmomin495 8 месяцев назад +9

    मना वरचं खुपओझ कमी झाल्यासारखं वाटलं ...यार खुप धन्यावाद 😢😢😢

  • @nageshpawar9002
    @nageshpawar9002 8 дней назад +4

    अतिशय अर्थपूर्ण काव्यरचना, नशीबवान आहोत आपण दीदी आणि इतर मंगेशकर कुटुंबीय, बाबूजी, सुरेशजी, अजित कडकडे, जितेंद्र अभिषेकी आणि इतर कित्येक मराठी संगीतातील रत्न ज्यांना 80 च्या दशका पासून रेडिओ वर ऐकले आहे. आणि आजही तितक्याच आत्मीयतेने त्यांना ऐकतो हेच त्यांचा मोठेपणा सिद्ध करतो

  • @deepakguram2506
    @deepakguram2506 Месяц назад +1

    खरंच सुरेख गाणी,पूर्वी चे दिवस आठवतात, वडिल असताना ही गाणी रेडीओवर संध्याकाळी लागायची

  • @anitajadhav6734
    @anitajadhav6734 3 месяца назад +3

    अचानक नियतीने आमच्या दोघांची ताटातूट केली.... खूप आठवणं येते.... असचं रात्री निवांत ही गाणी ऐकत , गुणगुणत पडुन रहायचो आम्ही.... ❤

  • @mugdhapar
    @mugdhapar 16 дней назад +1

    अवर्णनीय आहेत सगळी गाणी!!! तोडच नाही

  • @dineshagarkar1557
    @dineshagarkar1557 5 месяцев назад +13

    ❤अजूनही जुने प्रेम आठवते व ती मिळवाची आस आहे 😊

  • @ankushdagare5921
    @ankushdagare5921 7 месяцев назад +13

    सुश्राव्य गायन, वादन, अप्रतिम अर्थपूर्ण गीताला, अजरामर करणारे गायक कलाकार या सर्वांच्या मन हेलावून गेले हलकं झालं! धन्यवाद!🙏💐👍

    • @BhgwatPande
      @BhgwatPande 6 месяцев назад

      श्राव्य गाण्याचं आनंद जो आहे मनमोकळेपणाने धन्य धन्यवाद

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 9 месяцев назад +28

    अतिशय सुंदर गाणी आहेत ही, कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीच वाटतात! धन्य ते गायक आणि संगीतकार आणि गीतकार!

    • @manoharkulkarni1690
      @manoharkulkarni1690 9 месяцев назад

      अशीच एका पेक्षा एक सुंदर गाणी ऐकताना च दिवस सुंदर जावा आसेच नेहमी वाटते

  • @shirishkhoche1064
    @shirishkhoche1064 9 месяцев назад +13

    एकापेक्षा एक सुंदर व सरस गाणी असल्यामुळे कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही,सतत ऐकाविशीच वाटतात! धन्य ते गायक !

  • @snehalprakashan6548
    @snehalprakashan6548 7 месяцев назад +5

    अप्रतिम आणि सुंदर अशी ही सर्व अर्थ पूर्ण गाणी

  • @taradeshpande8320
    @taradeshpande8320 4 месяца назад +5

    ❤hi gani शांत pane ऐकणे mhanje स्वर्ग sukh aahe

  • @shraddhanarkar5574
    @shraddhanarkar5574 2 месяца назад +3

    रात्री शांत आणि आनंदाची झोप हवी असेल तर हि गाणी ऐकत झोपी जावं❤❤❤❤

  • @gananaththakre3661
    @gananaththakre3661 9 месяцев назад +4

    Bolavlya vachun hi mrutu jari aala ithe thamble to hi pad bhari... Kai hi kalpana apratim

  • @user-po4bm7fc9c
    @user-po4bm7fc9c 10 месяцев назад +8

    खरं आहे,
    मन प्रफुल्लित होते।
    धन्यवाद।🙏🙏🙏

  • @sandybgmigemer302
    @sandybgmigemer302 9 месяцев назад +5

    नित्य ऐकत रहावे असे सुमधुर गाणी❤
    जुन ते सोन

  • @user-nx3cv1zm2y
    @user-nx3cv1zm2y 23 дня назад +4

    ही पिढी खूप भाग्यवान आहे ज्यांनी ही सर्व गाणी रेडिओ वर ऐकली सुटीच्या दिवशी शेतात गुरे चालायला जावे लागत असे बस रेडिओ सोबत असला कि दिवस कसा निघून जायचा कळायचे नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ते दिवस आठवले की मन अगदी भाऊक होते

  • @madhukaryede5333
    @madhukaryede5333 5 дней назад

    खूप छान गाणी होती आणि आज ही खूप छान आवडतात पुढच्या पिढीने सुद्धा हा छंद जोपासावा..

  • @sandeepverenkar7027
    @sandeepverenkar7027 10 месяцев назад +14

    लाभले भाग्य आम्हां, ऐकतो गीत मराठी.

  • @rakeshraut6974
    @rakeshraut6974 9 месяцев назад +5

    दिर्घायुष्य देणारी गाणी...

  • @paragtoal8685
    @paragtoal8685 9 месяцев назад +8

    अल्बम चे टायटल आहे मन हलकं करणारी गाणी, पण प्रत्यक्षात मन तृप्त करणारी गाणी आहेत ही, प्रत्येक गाण्याच्या शब्दांच्या अर्थात प्रतिभा ओसंडून वाहताना दिसते मुजरा त्या सर्व कलाकारांना ज्यांच्यामुळे हा योग जुळून आला. ❤🙏

  • @nileshjoshi2468
    @nileshjoshi2468 8 месяцев назад +7

    अति सुंदर अति सुंदर.मन अतिशय प्रसन्न झाले.सर्वच गाण्यांनी खूप खूप आनंद दिला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.

  • @rahulgamer989
    @rahulgamer989 9 месяцев назад +10

    अप्रतिम मण हलक करणारी गाणी ❤❤

  • @songisverygooddasharathsaw3569
    @songisverygooddasharathsaw3569 9 месяцев назад +6

    अतिशय सुंदर गाणी आहेत मन मोहून जाते

  • @shobhakharat8309
    @shobhakharat8309 9 месяцев назад +5

    खरच मन हलक करणारी गाणी आहेत ओल्ड इज गोल्ड

    • @jitumore2645
      @jitumore2645 5 месяцев назад

      खरंच...अप्रतिम 🎉

  • @bhanudasnarale6877
    @bhanudasnarale6877 Месяц назад

    मस्तच गाणी आहेत, मन प्रसन्न होते, गाणी ऐकत राहावे वाटते ❤😂

  • @smitachaudhary9310
    @smitachaudhary9310 5 дней назад

    Man trupat karanari hi gani aahet hats of to the all singer n writers.

  • @nareshsatvidkar5795
    @nareshsatvidkar5795 7 месяцев назад +2

    मध्येच येणाऱ्या जाहिरातीमुळे गाणें यैकण्याची इच्छाच नाहीशी होते. खुप वाईट वाटते.

  • @vandanabadave6963
    @vandanabadave6963 10 месяцев назад +5

    मन प्रसन्न झाले

  • @yallapabelgaonkar7309
    @yallapabelgaonkar7309 8 месяцев назад +3

    मनोरम अशी ही सुंदर आणि पून्हा पून्हा ऐकावीशी वाटणारी गाणी धन्य ते गायक आणि संगीतकार

  • @user-fb9lv5tx2h
    @user-fb9lv5tx2h Месяц назад

    गीतकार संगीतकार गायक यांनी हि अवीट गाणी अजरामर केलेली आहेत याला तोडच नाही अतिशय मेहनत घेऊन तयार केलेली गाणी लोकप्रिय केलेली आहेत आनंदाची डोही आनंद चे तरंग धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @bhushanparab621
    @bhushanparab621 5 месяцев назад +12

    अमृताहूनी गोड असे माय मराठी आणि तितकीच सुंदर हृदयस्पर्शी गाणी

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 11 дней назад

    प्रतेक शब्द् प्रेमाची आठवण देतो,,,,,, सुगंधित,,, भावना,,,,, झाल्या,,,, 🎉

  • @ishwarbhiungade5920
    @ishwarbhiungade5920 Месяц назад

    ❤ मी अजून सुद्धा यू ट्यूब मध्ये अशीच गाणी ऐकत असतो.
    तो काल रेडिओ 1986...होता.
    मन शांत करणारी आणि अर्थ असणारी.. भावगीते... पुन्हा.. पुन्हा एकावी वाटतात.❤खुप छान ❤

  • @richamadiwale3372
    @richamadiwale3372 26 дней назад

    ज्या सर्वानी हे कमेन्ट केली आहे. त्यानाच माहीत काय सुंदर दिवस होते ते. सकाळ झाली की हे ऐकून मन प्रसन्न.

  • @vanamaladumne
    @vanamaladumne 9 месяцев назад +3

    अप्रतिम गाणी ऐकतच रहावे वाटते. जुने ते सोने. 👍👌

  • @arjunmane4655
    @arjunmane4655 2 месяца назад +3

    मला रेडिओ चा लै नाद आमच्या घरी मोठा bush चा रेडिओ होता... आपली आवड मला फार आवडत होती... जुने दिवस परत कधीच येत नाहीत... आता वाटते कशाला आपण मोठे झालो... लहानपण देगा देवा... 🙏🙏🙏🙏

  • @sukhadabapat3144
    @sukhadabapat3144 2 месяца назад

    खरंच श्रवणीय गाणी आणि त्यातील प्रत्येक शब्द किती अर्थपूर्ण आहे.की कितीवेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
    सुंदर collection

  • @dagadukanase3789
    @dagadukanase3789 9 месяцев назад +3

    स्वर्गीय अनुभूति

  • @aruntambe5337
    @aruntambe5337 10 месяцев назад +2

    खरच मन हलकं झालं.. अप्रतिम अल्बम

  • @JayashriJamdade
    @JayashriJamdade Месяц назад

    Mala khup aavdtat hi gaani, sakali shaalet jaatana lagaychi, baalpanichi aathvan yete,maazya aaila aavad hoti,tichya mulech aavad nirmaan zaali , te divas veglech hote, very thanks ❤❤❤❤❤ aai chi khup aathvan yete.😢

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 5 месяцев назад +1

    जुनं ते सोनं, अप्रतिम

  • @arjunmane4655
    @arjunmane4655 4 месяца назад +2

    आपलीच अजरामर मराठी गीते.....

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 Месяц назад

    Juney te soney.
    Gely tey divas rahilya tya athavani.🙏🙏👌🏻👌🏻🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Месяц назад

    🌹👌अबोल प्रितीला बोलके करणारे हळुवार धूंद शब्द❤️वा!वा!! वाकला फांदीपरी फुलांनी जीव हा”❤️क्या बात!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l 8 месяцев назад +4

    Khup Sundar Chan balpana.chi.god.gaani❤

  • @nageshbhat6950
    @nageshbhat6950 2 месяца назад

    गीतकार संगीतकार आणि गायक यांना खूप खूप धन्यवाद अशी अवीट गाणी तिघांच्या माध्यमातून निर्माण झाली 50 वर्षांपासून ही गाणी ऐकत आहे पण आजही ही गाणी ऐकली कीं मूड फ्रेश होतो

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 9 месяцев назад +3

    ओल्ड इज गोल्ड खूपच छान गाणे ऐकत राहा रावस वाटते

  • @amrutakoranne4886
    @amrutakoranne4886 3 месяца назад +2

    फारच सुंदर आहेत सारी गाणी ,सारखी ऐकाविशी वाटतात

  • @sandeephendre2349
    @sandeephendre2349 2 месяца назад

    फार छान अनुभव असतो गेले ते दिवस राहिल्या आठवणी ❤❤

  • @kjshirodkar1316
    @kjshirodkar1316 8 месяцев назад +26

    फारच सुंदर धन्य ते गितकार गायक .

    • @tanvibhaip6315
      @tanvibhaip6315 5 месяцев назад +1

      😮😅😅😅😅pppppp😅😅😅

  • @priyakulkarni7708
    @priyakulkarni7708 2 месяца назад

    क्लासिक गाणी!!👍वाह!सुंदर!

  • @sonukilledar50
    @sonukilledar50 2 месяца назад

    स्वर्गीय ठेवा आहे हा....❤

  • @user-xe1qk1us5d
    @user-xe1qk1us5d 9 месяцев назад +5

    Old is Gold सदाबहार श्रवणीय गिते आहे

  • @user-my6dd8gt6v
    @user-my6dd8gt6v 5 месяцев назад +1

    अप्रतिम हा शब्द सुद्धा ठीता पडेल इतकी सुंदर composition

  • @mayurjoshi1410
    @mayurjoshi1410 2 месяца назад

    अतिशय सुंदर जुने ते सोने म्हण तात ना खूप तरल गाणे मनाला प्रसन्न करतात 🌹🌹❤❤👌👌

  • @user-tw3we8vi3d
    @user-tw3we8vi3d 9 месяцев назад +3

    खूप सुंदर श्रवणीय

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 3 месяца назад

    मनातील भावना व्यक्त करणारी भावपूर्ण गाणी, शांत आणि मंद संगीत. खुप छान!

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm 7 месяцев назад +5

    खूप छान गीते आहेत..जुने ते सोने...🎉🎉

  • @radhakrushnakulkarni3134
    @radhakrushnakulkarni3134 Месяц назад +1

    GaneHAswatat,manachyaEakkoprat,,KhupRadwtat,pan

  • @user-lv3se5rm5h
    @user-lv3se5rm5h 2 месяца назад

    खरचं किती मदुर हृदयाला स्पर्श करणारी जुनी गाणी ..अशी गाणी होती म्हणून समाधान वाटते

  • @gananaththakre3661
    @gananaththakre3661 9 месяцев назад +4

    Hi sarva gaani apratim ani ajra amar aahet. Kitihi da aiklit teri manala mohun jatat. The lyrics, music, voice and the tune is just something which cannot be described

    • @shrirangpagare5873
      @shrirangpagare5873 Месяц назад

      मनात जपली ली गाने आहे म्हणून मन प्रसन्न होते

  • @shubhangikulkarni7548
    @shubhangikulkarni7548 10 месяцев назад +14

    परत परत ऐकण्याची इच्छा होती अशी आहेत हि गाणी ❤🎉

  • @smitanagare7362
    @smitanagare7362 2 месяца назад

    जुन्या गाण्याचे शब्द व संगीत खुपच सुमधुर होते आता अशी गाणी नाही होणार

  • @manikyerme6899
    @manikyerme6899 Месяц назад

    मनला भिडणारी ही गानी असे काही सांगून जातात ज्या जिवनात क्षण आलेल्या आठवणी सुरवात होते एक क्षण मानुस भारावून जातो क्षणभर हे जग विसरून जातो मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेले हे भावगीत अप्रतिम आहे

  • @anitakhairnar9893
    @anitakhairnar9893 3 месяца назад +1

    Khup chan vatla

  • @prashantmhapuskar
    @prashantmhapuskar 18 дней назад

    fakt apratim.... shabdach nahi suchat. lahanpaniche diwas athavale ani nakalat dolyatun pani ale..

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 6 месяцев назад +1

    🌅🙏🌹संध्याकाळच्या वेळात अगदी मन हलकं करणारी गाणी आहेत आणि ती एकापाठोपाठ ऐकताना मस्त वाटतं 👌👌👏👏 कवि,संगीत, गायक आणि सारेगम सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार 💐💐

  • @ASHAPARCHANDE
    @ASHAPARCHANDE 21 день назад

    Khup Chan gane ahet aikatch rahav as vatat

  • @jayshrishinde5356
    @jayshrishinde5356 10 месяцев назад +3

    अतिशय सुंदर...पुन्हा पुन्हा आयकावी वाटतात

  • @kalyanishinde970
    @kalyanishinde970 5 месяцев назад +2

    ❤❤