अनंत | खानदेशातील कवी - बालकवी | Spruha Joshi | Marathi Kavita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2022
  • Location & Hospitality :
    Aryan Eco Resort Jalgaon
    Girana Pumping Rd, Savkhede Bk., Maharashtra 425002
    Call: 072498 14333
    Website: aryanecoresort.com/
    For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
    _______________________________
    अनंत | खानदेशातील कवी - बालकवी
    अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
    अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
    वरती खाली सर्व सांठले वातावरण अनंत,
    माप कशाचें, कुणा मोजितां, सर्व अनंत अनंत.
    कितेक मानव झटती, करिती हाडाचेंही पाणी,
    अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी !
    म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
    परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा ?
    विशाल वरती गगन नव्हे, हें विश्वाचें कोठार,
    उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
    कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी ?
    फार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी ?
    अनंत सारें विश्व, जाहलें अनंतात या लीन,
    क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान ?
    तव वैभव हें, तुझीं धनें हीं, हे अत्युच्च महाल,
    जातिल का गगनास भेदूनी ? अनंत का होतील ?
    तुझ्या कीर्तिचें माप गड्या का काळाला मोजील !
    ज्ञान तुझें तूं म्हणशी 'जाईल', कोठवरी जाईल ?
    'मी', 'माझे' या वृथा कल्पना, तूं कोणाचा कोण ?
    कितेक गेले मी मी म्हणतां या चक्रीं चिरडून.
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    #SpruhaJoshi #Poems #Marathi
    Travel Vlog Playlist: • Travel Vlog
    खादाडी Playlist: • Khadadi Series
    गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Filming & Production Stills:
    Anirudha Joshi
    Avdhut Tivarekar
    Editors:
    Tanishq Mohite
    Soham Kurulkar
    Graphics:
    Yogesh Dixit
    Styling : Tanmay Jangam
    Costumes: Cotton Village
    Managed by: Anurag Pathak
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official RUclips Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 112

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 Год назад +7

    किती सुंदर कविता!!👍ऐकिवात नव्हती...आणि स्पृहा तुझं अभिवाचन फारच उत्तम!!👍असेच उत्तम रसग्रहण आम्हाला करायला आवडेल ...आणि जळगाव चे हे उद्यानही उत्तम ..दुग्धशर्करा योग् वाटतो!😊

  • @shubhadadeshpande1774
    @shubhadadeshpande1774 Год назад +1

    अप्रतिम कविता आणि उत्तम सादरीकरण नेहमी प्रमाणेच.

  • @ameyrane7927
    @ameyrane7927 Год назад +1

    Jitki sundar kavita titkach sundar vaachan tuza Spruha.

  • @dhanashreeshinde8512
    @dhanashreeshinde8512 Год назад +2

    Spruha tai,tuza 'nisargachya saniddhyat kavita rekhatna khuuup khuup avadta...😊😌💫🌠👌👍🌷🍀🌻🌕️🌄🌏

  • @gauripotdar616
    @gauripotdar616 Год назад +1

    khup sundar kavita ..pahilyandach aikali...thanks hi Kavita aamchya paryant pochavalya baddal ..

  • @suhasinipatwardhan1835
    @suhasinipatwardhan1835 Год назад +2

    बालकवींच्या अनेक सुंदर कवितांपैकी ही एक कविता 👌 खुप वेळा वाचलेली होती तरी तुझ्याकडून ऐकताना आणि समजून घेताना भारी वाटलं👍
    मानव इतका क्षुद्र असूनही कशाचा फुका अभिमान बाळगतो? हा प्रश्न परत एकदा मनाला पडला . इतकी सुंदर कविता सुंदर रित्या सादर केल्याबद्दल धन्यवाद, स्पृहा !💐

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Год назад +1

    बालकवी...नाम ही काफी है

  • @advitaanimasti....majja...5103
    @advitaanimasti....majja...5103 Год назад +2

    खूप छान... नुकतेच लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतीचित्रे' वाचले... त्यात बालकवींच्या बर्‍याच गोष्टी वाचायला मिळाल्या आणि त्यातच आजची कविता...!! मस्तच.. सादरीकरण अप्रतिम... बालकवींना विनम्र अभिवादन 🙏

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 Год назад +1

    Khup sundar kavita, sadrikarn atishay sundar..Thank u so much ❤️ Love you ❤️❤️

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 месяцев назад

    मराठीतील आद्य कवीवर्य बालकवी यांची 'अनंत' ही कविता खरोखरच अतिशय प्रतिभासंपन्न अर्थात अनंत आहे. ह्या कवितेला अनंत ह्या विशेषणा शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही.
    तुमचं सादरीकरण अतिशय उत्तम झाले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 Год назад +1

    खूपच छान स्पृहा....

  • @seemajoshi1672
    @seemajoshi1672 Год назад +1

    Khup chan watale balkavina aekayla!stutya upkram Spruha! 🙏🙏.ho aamhi Sandan la bhet dili.khup chan aahe ga! 👌

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 Год назад +1

    जो न देखी रवी वोह देखे कवी.... धन्यवाद सुंदर कविता आपण सादर केल्या बद्दल

  • @umeshhoshing413
    @umeshhoshing413 Год назад +1

    सुंदर कविता, छान सादरीकरण!
    हा तुमचा उपक्रमच उत्तम आहे..
    खूप खूप शुभेच्छा!..💐

  • @anjalijog9785
    @anjalijog9785 Год назад

    खूप सुंदर कविता व काव्यवाचन सुद्धा सुरेख. अशाच वेगळ्या कविता ऐकव.

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 Год назад +1

    खूप छान सादरीकरण स्पृहा.

  • @ganeshbhadke6966
    @ganeshbhadke6966 Год назад +1

    कक्कीच नेहमी प्रमाणेच एकच नंबर होती कविता . खूप छान समजून सांगता तुम्ही कवितेचा अर्थ ..त्यामुळे अजून छान वाटत कविता ऐकायला

  • @rupalisantoshkharadekharad6819
    @rupalisantoshkharadekharad6819 Год назад +1

    Kharach chan aahe hi balkavinchi rachana

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 Год назад +1

    माझे आवडते कवी ! पण त्यांची माहित नसलेली अप्रतिम कविता ... ह्या अनंताच्या समोर मानवाची क्षुद्रता किती खुजी आहे .... फार सुंदर सांगतात ग बालकवी ... नतमस्तक त्या अफाट कल्पनाशक्ती समोर .... आणि तू तर काय ग्रेटच ...

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c Год назад

    खुपच छान स्पृहाताई [ तानाजी धरणे कवी / गीतकार महाड , रायगड ] बालकवींच्या कविता व बहिणाबाईंच्या कविता छान सादरीकरण करुन आपण ऐकवली खुपच छान वाटले ...!!!

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 Год назад +1

    Khup chhan disteys...😍😘❤️

  • @bhanudassakhare8788
    @bhanudassakhare8788 Год назад +1

    खुपच सुंदर वाचन,

  • @arundhatibarve5058
    @arundhatibarve5058 Год назад +1

    औदुंबर सतत भेटतो , एकदा मिलिंद जोशी आणि गुरु बरोबर रसग्रहण ऐकायला आवडेल

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 Год назад +1

    वाह.... खुप छान माहिती, आणि उत्तम सादरीकरण

  • @gaytrithorat8835
    @gaytrithorat8835 Год назад +1

    खुप सुंदर कविता आहे... आणि तुझ सादरीकरण तर अप्रतिम आहेच.... खुप खुप मनापासुन आभार इतकी सुंदर कविता ऐकवल्या बद्दल... अश्याच आम्हाला सुंदर सुंदर कविता ऐकवत रहा... धन्यवाद

  • @smitanagarkar9602
    @smitanagarkar9602 Год назад +1

    Khup sundar tai..👌♥️ khup mast kavita... अप्रतिम सादरीकरण...

  • @cancer4684
    @cancer4684 Год назад +1

    True fact, katu satya. 😔 Tuzhe presentation nehmipramane spruhaniya, shravaniya.👈👍😃❤️

  • @diptidonde8323
    @diptidonde8323 Год назад +4

    Khup sundar kaam kartey tu spruha aajchya mobilechya kalat vachan kami zalay pan tu ya channelchya madhyamatun ti kasar bharun kadhtes. Aapan ekach vayachya aahot tuzi De dhamal baghun baghun aapan sobatch vadhalo Keep it up Love you dear ashach sudar sundar kavita amhala aikawat ja aani aaplya lahanpanichya kalat gheun ja.

  • @mayurgawande5593
    @mayurgawande5593 Год назад +1

    अप्रतिम स्पृहा ताई खूपच सुंदर 😘👌👌👌

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Год назад

    कविता खूप सुंदर आहे आणि सादरीकरण पण सुंदर.वेळीच कठीण
    शब्दांचे अर्थ समजून सांगण्याची पद्धत आवडली.

  • @suniljavak4409
    @suniljavak4409 Год назад +1

    खुप छान स्पृहा 👌👌👌👌

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Год назад

    कविता आणि कवितेचे सादरीकरण
    दोन्ही सुंदर.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Год назад +1

    Apartim kavita mam

  • @sadhanabagul3731
    @sadhanabagul3731 6 месяцев назад

    अप्रतिम कविता व तू वाचलीसही खूप छान

  • @ashasawant948
    @ashasawant948 Год назад

    निसर्ग कवी, बालकवींच्या सुंदर कवितेचं, सुंदर सादरीकरण. खूप प्रेम.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Год назад +1

    Uttam sadrikaran

  • @mangeshghadage5771
    @mangeshghadage5771 Год назад

    खूप छान कविता आणि सादरीकरण पण उत्तम स्पृहा ताई

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 Год назад +2

    स्पृहाताई, नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ अप्रतिम झाला आहे. सुंदर विस्लेषण ! फक्त एक छोटीशी चूक झाली आहे. ही कविता डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. पण शेवटी कवीचे नाव बहिणाबाई चौधरी असे दिले आहे.

  • @prachi2529Jadhav
    @prachi2529Jadhav Год назад +1

    Spruha di khup mast kavita aahe. I wish mazi ek tari poem me tuzya aavajat aikel it's my dream

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 Год назад

    स्पृहा छान सादर केल्या कविता.

  • @raghunathchaudhari786
    @raghunathchaudhari786 Год назад

    👌 अती छान ❤️
    दिल खुलासा काव्य खजिना
    धन्यवाद 👏

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 10 месяцев назад

    विश्वातील परग्रहांवरील कवीदेखील अशीच कविता करत असतील.

  • @jayeshshah29
    @jayeshshah29 Год назад +1

    Super.

  • @aishwaryachavan2879
    @aishwaryachavan2879 Год назад +2

    स्पृहा दीदी तुझ्यामुळे आज पुन्हा एक नवीन कविता ऐकायला मिळाली. अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण!👌👌

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 Год назад +1

    अप्रतिम.

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 Год назад +2

    अप्रतिम 💐💐 पार्श्व संगीत पक्षाचे आवाज...खरच बालकवींची निसर्गाच्या सान्निध्यात केलेलं सादरीकरण.....

  • @madhavimathekar1746
    @madhavimathekar1746 Год назад +1

    खूपच छान 👌👌

  • @pawan789
    @pawan789 Год назад

    अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
    अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
    वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
    माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
    कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
    अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
    म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
    परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?
    विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
    उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
    कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
    फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?
    अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
    क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
    तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
    जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
    तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
    ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल?
    'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
    कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून
    🙌🙌❤️❤️

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 Год назад +1

    खूप सुंदर कविता तुम्ही खूपच सुंदर प्रकारे आमच्यापर्यंत पोहचवली ....थँक्स ...आणि परत एकदा ....
    ....."तुमन आमना खान्देश मा मन भरीसन स्वागत शे " 🙏🙏🙏

  • @nitingaikwad7687
    @nitingaikwad7687 Год назад +1

    खुप खुप छान

  • @omkargawade4331
    @omkargawade4331 Год назад +2

    खूप सुंदर कविता स्पृहा. बालकवींच्या नेहमीच्या कवितांपेक्षा खूप वेगळी आणि जीवनाचा अर्थ सांगणारी आहे. अश्या अनेक अज्ञात कविता असतील ज्या आम्हाला माहितही नसतील अश्या कवितांचा समावेश कायम करत रहा ह्याच शुभेच्छा.

  • @jyotiyennawar284
    @jyotiyennawar284 Год назад +1

    Khup sundar👌👌

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 Год назад +1

    खूप छान

  • @sonalispoetry
    @sonalispoetry Год назад +1

    छान कविता सादर केली👍👌👌👌

  • @indrayanisaindane8582
    @indrayanisaindane8582 11 месяцев назад

    अतिशय सुंदर सादरी करन. खूप छान

  • @ramalpednekar6363
    @ramalpednekar6363 Год назад +1

    Nice🙂

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 9 месяцев назад

    Jivanacha khara arth❤

  • @premakrush3403
    @premakrush3403 Год назад +1

    Bhari.

  • @sunilasawant4566
    @sunilasawant4566 Год назад +1

    👍 khup chan

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Год назад +1

    👌🏻👌🏻स्पृहा खूप सुंदर कविता ऐकवलीस, शेवटच्या कडव्यातील संदेश खरच अर्थपूर्ण आहे. त्र्यंबक बापूजीना बालकवी म्हणून का ओळखतात हे तुझ्यामुळे कळाले. 🙏🏻🙏🏻
    नेहमीप्रमाणे अप्रतिम सादरीकरण. 💐

  • @ashwinideshpande4487
    @ashwinideshpande4487 Год назад +1

    अप्रतिम कविता... सहज सुंदर मनाला भिडणार सादरिकरण 😊

  • @svernekar2290
    @svernekar2290 Год назад +1

    Apratim 👌👌👌

  • @shirishshrotri760
    @shirishshrotri760 Год назад +1

    Chanech

  • @bhagyashrikulkarni4846
    @bhagyashrikulkarni4846 Год назад +1

    तु मला फार फार आवडतेस, कविताही अप्रतिम आहे. मलाही लिहायला फार आवडते आणि तु माझी प्रेरणा आहेस.
    स्पृहा ताई स्वप्नांची समाप्ती ही कुसुमाग्रजांची कविता ऐकवशील......
    Please And thank you so much 😊

  • @deepaliraut7620
    @deepaliraut7620 Год назад

    Apratim kavita aani sadarikaran.

  • @vlogger_rajau
    @vlogger_rajau Год назад

    सादरीकरण आणि कविता उत्तम!!

  • @meenakshigupte2546
    @meenakshigupte2546 Год назад +1

    spruha you are amazing as always, wonderful poem

  • @anjalimhadgut
    @anjalimhadgut Год назад

    वा सुंदर कविता

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 11 месяцев назад

    सुंदर कविता.

  • @punamshimpi8009
    @punamshimpi8009 Год назад +1

    ताई माझं माहेर जळगावच आहे.
    जळगाव कसं वाटलं.. कविता खूप छान..

  • @pradeepkanthale2806
    @pradeepkanthale2806 Год назад

    Very niceअप्रतीम सादरीकरण

  • @sulbhathorat2845
    @sulbhathorat2845 Год назад +1

    Beautiful poem

  • @prakashvanave6596
    @prakashvanave6596 Год назад

    I will say that, 'Please dont Stop'❤❤

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 Год назад +2

    Philosophy of life n behaviour is expressed in this poem... beautiful message given... Thanks for your efforts.. thanks

  • @niranjanghuge5727
    @niranjanghuge5727 Год назад

    खुपच सुंदर सादरीकरण.

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 Год назад +1

    खरचं अप्रतिम आहे . . . . nice background sounds 👍

  • @rohanshintre4976
    @rohanshintre4976 Год назад

    संपूर्ण कवितेतून खूप छान संदेश दिला आहे. बालकवींनी. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि भविष्यातही राहील.

  • @virendrapatange3936
    @virendrapatange3936 Год назад +1

    Sundar

  • @shyamsundarambhore365
    @shyamsundarambhore365 4 месяца назад

    Khup sundar ❤

  • @rajeshgujarati7700
    @rajeshgujarati7700 Год назад +1

    Great madam. Thanks for sharing such a beautiful poem.

  • @bhargavi1780
    @bhargavi1780 Год назад +1

    तू खूप गोड आहेस.माझी मुलगी तुझ्या सारखीच आहे

  • @vaidehikothawade4654
    @vaidehikothawade4654 Год назад +1

    khup sundar kavita aaj tuzyamule aikayla milali spruha tai thank you, pan na kavita lihili aahe na description madhye tithe kavitechya khali 'kavayitri - Bahinabai' asa lihila aahe tewhad ek change karun gheshil
    baki kavita uttam aani tuz kavita vachan hi khup chhan

  • @anupamaalavekar2296
    @anupamaalavekar2296 Год назад +1

    अप्रतिम कविता. 👌👌

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 Год назад

    तुला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे बघू कधी योग येतो ते, भाषेची अभ्यासक म्हणून नियमितपणे ऐकते, नुसत्या कविताच नाही तर खादाडीचे एपिसोड सुद्धा पाहते 👌👍

  • @anandthakur2036
    @anandthakur2036 Месяц назад

    मस्तच👍

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 Год назад +2

    एक विनंती आहे माझी की,कविवर्य वामन रामराव कांत उर्फ वा.रा.कांत यांच्या कविता सादरीकरणाचा एखादा vlog होऊन जाऊ द्या की.फार बहुपेडी साहित्य आहे त्यांचे

  • @poonamdeshkar2148
    @poonamdeshkar2148 Год назад

    Wonderful voice

  • @arvindjoshi4654
    @arvindjoshi4654 Год назад

    अप्रतिम

  • @surekhachavan348
    @surekhachavan348 Год назад +1

    खूप chaan

  • @vinayakrajmane1477
    @vinayakrajmane1477 Год назад +1

    जितकी सुंदर कविता तितकंच सुंदर सादरीकरण... खूप खूप छान स्पृहा...👌👌🍫

    • @vinayakrajmane1477
      @vinayakrajmane1477 11 месяцев назад

      स्पृहा मॅडम please मेल बॉक्स चेक करा... तुम्ही माझ्या पुस्तकाला.ब्लरपेज देणार होतात त्या बाबत मेल सेंड केला आहे...

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 Год назад +1

    छानच सादर केली तू कविता अर्थात कविता मस्तच आहे.... जळगावात कुठलं ठिकाणी ??मी जळगावातच असते....

  • @satishgaikwad2580
    @satishgaikwad2580 10 месяцев назад

    Very nice

  • @deathnote6361
    @deathnote6361 Год назад +1

    as usually, Great Kavita, Great Narration👌

  • @pranalimagi9984
    @pranalimagi9984 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sayaleepote2655
    @sayaleepote2655 Год назад

    Sundar ❤

  • @chaitalibari2891
    @chaitalibari2891 Год назад +2

    spruha tai mi pan jalgoan chi ae ani mi pan ek chand mhanun kavita karte tuzya avajat mazi ekhadi kavita ekayla milu shakel ka ...yourquote ya plateform var mazya kavita aet tula vel asel tar vachun bagh

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 Год назад

    खूप खूप छान कविता, अर्थ गर्भ कविता, उत्तम सादरीकरण, धन्यवाद 👌👌👌👍❤️

  • @i_dear
    @i_dear Год назад +1

    Spruha can you told us which app you prefer in your iPad to read books.

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 Год назад +1

    Wonderful Narration Spruha! 👌👌

  • @gauravshewalkar9096
    @gauravshewalkar9096 Год назад

    अतिशय सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण 😊👌🏼