फर्माईश : माझ्या मित्रा | Spruha Joshi | Marathi Poems

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • For Brand Collaborations & Partnerships drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
    खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
    गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
    _______________________________
    माझ्या मित्रा
    ऐक ना,
    मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
    अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
    बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
    तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
    आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
    कितीदा पाह्यलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही !
    आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
    पण थांब, घाई करू नकोस,
    अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही.
    हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
    स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
    तर प्रेमिक असशील,
    समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
    धपापतेय माझे काळीज,
    तर मग तू कोण असशील ?
    स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
    हाती देशील तर पती असशील,
    आणि चालशील जर माझ्यासोबत
    त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
    समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
    पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
    आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
    तर मग तू कोण असशील ?
    मित्र असशील माझ्या मित्रा !
    अरुणा ढेरे
    तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #Food #Travel
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Produced By :
    Spruha Joshi
    Nachiket Ashok Khasnis
    Location Partners :
    Tushar & Chiranjivi Kothawade, Studio Infinity
    Filming & Production Stills :
    Angad Joshi
    Shubhankar Havele
    Editors :
    Soham kurulkar
    Yogesh Dixit
    Tanishq Mohite
    Hair & Makeup: Bhagyashree Patil
    Styling : Tanmay Jangam
    Costumes: Cotton Village
    Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official RUclips Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

Комментарии • 350

  • @gauravlute1481
    @gauravlute1481 2 года назад +4

    मैत्रीला अत्यंत सुंदर लळा लावणारी अप्रतिम कविता. इतकं प्रचंड‌ विश्र्वासाचे धागे घट्ट मैत्रीच्या नात्यांना बांधणारी कविता आहे.
    खूपच सुंदर ❤️👌👌

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 Год назад

    सुंदर,अप्रतिम!!!

  • @pandurangchate8115
    @pandurangchate8115 2 года назад

    अरुणाताईंची
    अतिशय अर्थपूर्ण अशी कविता आहे.
    स्पृहा तु उत्तम अभिनेत्री तर आहेसच. पण त्यापेक्षाही एक मोठी कवयित्री म्हणूनच नावारूपाला येत आहे. खूप खूप सुंदर.
    कविता आवडली...अप्रतिम!

  • @veenamusic...2225
    @veenamusic...2225 Год назад +1

    खूप खूप 🌺🌺सुंदर
    #वीणा म्युझिक मैफिल शब्द सुरांची

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 2 года назад

    खुप छान, सादरीकरण

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 2 года назад +32

    अरुणा ढेरे या माझ्या पण खूप लाडक्या लेखिका, कवयित्री आहेत. सध्या मी त्यांचं जाणीवा जाग्या होताना हे पुस्तक वाचतेय. आणि खरच खूप ओघवती आणि अभ्यासपूर्ण लेखन त्याच असत. आजची तुमची कविता सादरीकरण अप्रतिम.

    • @shobhanabhalearao460
      @shobhanabhalearao460 Год назад +1

      खुप छान कविता आणि सादरीकरण... अभिनंदन स्पृहा....

    • @vilaspundle4766
      @vilaspundle4766 Год назад +1

      छान कविता सृहा ताई

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 Месяц назад

      ताई माईक वापरा आवाज आजुन छान येईल

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 года назад +4

    अरूणाताईंची सुंदर अर्थपूर्ण कविता,सुंदर सादरीकरण. खूप प्रेम.

  • @neelawalawalkar7522
    @neelawalawalkar7522 2 года назад +1

    खूप छान कविता आणि सादरीकरण उत्तम

  • @Shrimant_Katta
    @Shrimant_Katta 2 года назад

    ♥️🤗

  • @bhartikumbhar4781
    @bhartikumbhar4781 Год назад +8

    खूप सुंदर कविता.. खूप छान विषय.. खूप छान सादरीकरण...
    " नुसतंच काय जगायचं..
    जग कवितेतून बघायचं.. "😊

  • @sunandabhamare4379
    @sunandabhamare4379 2 года назад +1

    कवी कुंजविहारी यांची भेटेन नऊ महिन्यांनी ही ऐकावा ,तुमच्या तोंडुन ऐकायला फार आवडेल ,कारण तुम्ही त्याचा अर्थ पण सांगता ,मला माहित आहे ,पण ते प्रेक्षकांना सांगावे असे वाटते मला

  • @sagarshinde4393
    @sagarshinde4393 2 года назад +10

    अप्रतिम सादरीकरण...
    अर्ध्यावर फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नकोस...
    हे मित्रा ...आपली साथ आहे जन्माची अशी अर्ध्यावर सोडू नकोस...!!!

  • @rashmigonnade1061
    @rashmigonnade1061 Год назад

    Hallo spruha tai......pls BA.C MARDHEKARANCHI ....OLYA PIPYAT MELE UNDIR KAVITA AIKWAL KA PPS.

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 года назад +10

    👌👌अरुणाताईंची खूप सुंदर कविता ऐकायला मिळाली. मैत्री म्हणजे निखळ नाते विश्वासाचे, आधाराचे व नितळ प्रेमाचे.
    स्पृहा नेहमीप्रमाणेच सुंदर सादरीकरण!!👍

  • @neetagaikwad9920
    @neetagaikwad9920 2 года назад +9

    मैत्रीच्या सुंदर निखळ नात्याचं अप्रतिम वर्णन आणि अतिशय सुंदर सादरीकरण ❤️🙏

  • @azizpatel6090
    @azizpatel6090 2 года назад +2

    Mala Bahina bai chi aary sansar sansar he kavita aaikwal ka please.

  • @hemalimaye
    @hemalimaye 2 года назад +1

    Dr अरुणा ढेरे हया माझी मावशी आहे..

  • @ChhayaNaik-n3m
    @ChhayaNaik-n3m 25 дней назад

    स्पृहाताई...जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं...खूप छान कविता ऐकायला मिळाली.
    मला देऊळ नावाची कविता तुमच्या मुखातून ऐकायची आहे

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 2 года назад +5

    सुंदर मैञी, निरपेक्ष, स्वच्छ, प्रेमळ, आपुलकीच्या स्नेहपूर्ण सुंदर नात्यांचा सुगंध अक्षयी.धन्यवाद स्पृहा. Very nice presentation. Love u so much!!!

  • @dadak3141
    @dadak3141 2 года назад +1

    माझी आवडती कविता स्पृहा... का ते नको विचारू...☺️🙂

  • @kaumudipundikar9028
    @kaumudipundikar9028 2 года назад +3

    मला गोविंदाग्रज यांची प्रेम आणि मरण ही कविता तुझ्याकडून ऐकायची आहे... ही कविता खूप खास आहे माझ्यासाठी.... please 🥺

  • @kaumudipundikar9028
    @kaumudipundikar9028 2 года назад +5

    मैत्री सोबत इतर नात्यांची व्याख्या पण किती अचूक केलीय...♥️

  • @rupalipatil3745
    @rupalipatil3745 2 года назад

    Khupach sunder. अरुणा ढेरे यांची savasnhine kunku tekavava ......ही कविता वाचाल का? निरंजन या संग्रहातील आहे.

  • @amitkulkarni7556
    @amitkulkarni7556 2 года назад +1

    फ मु शिंदे ह्यांची आई ही कविता ऐकवाल का? - अमित कुलकर्णी

  • @ganeshrajguru
    @ganeshrajguru 2 года назад +3

    मॅम खुप छान होती कविता अशी मैत्री खूपच निथळ आणि निरागस असते अशी मैत्री मिळणे भाग्याची गोष्ट असते...🙏🙏🙏

  • @bhagyashrichatti-sambare9139
    @bhagyashrichatti-sambare9139 5 месяцев назад

    एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. please दोनदा ऐकायची

  • @amityeske1357
    @amityeske1357 Месяц назад

    पैसा कमी असेल तर... पण जवळच्या एक मित्र आयुष्य मध्ये

  • @poojamunishwar2338
    @poojamunishwar2338 Год назад

    स्मरणाच्या पार कुठेसे ही शांताबाईंची कविता फर्माईशमध्ये ऐकवाल का?

  • @aptevishakha
    @aptevishakha 8 месяцев назад

    खूप छान. पार्श्व संगीताचा आवाज थोडा कमी ठेवला तर अजून एकाग्रतेने ऐकता येईल असं वाटलं.

  • @amolpatilbondhare2331
    @amolpatilbondhare2331 2 года назад

    छान कविता कारण सादर केली छानश्या आवाजाच्या चेहऱ्याने..... ❤️
    माझी कविता सादर करणार का?

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Месяц назад

    कविता आणि सादरीकरण खूप सुंदर.धन्यवाद.

  • @venukulkarni2068
    @venukulkarni2068 Год назад

    स्पृहा ताई फर्माईश मध्ये मंगेश पाडगावकरांची सरणारे वर्ष मी ही कविता ऐकायला नक्की आवडेल

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 Год назад

    खूप सुंदर मी ही कविता करते माझी ही इच्छा आहे माझी कविता तुझ्या आवाजात एकावी स्पृहा ,, मी तुझी फॅन आहे मला तुझ बोलण दिसण हसण खूप खूप आवडत

  • @nikhilkamble3341
    @nikhilkamble3341 2 года назад +1

    मी 7 वी ला असताना ङाॅ अरूणा ढेरे यांचा वाट पाहताना हा धडा खुप सुंदर होता... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवणी देणारा हा धडा होता...

  • @girijamahamuni2327
    @girijamahamuni2327 2 года назад +2

    खरंच...गारुड घालतेय ही कविता मनाला...❤️
    स्पृहाताई ...द.मा.मिरासदार यांची 'रिस्क' नावाची गमतीदार कविता फर्माईश च्या भागात ऐकायला आवडेल...😊😊

  • @PrakashRampure-o1g
    @PrakashRampure-o1g 7 месяцев назад

    क्षमस्व, माझ्या लहान पणाची एक कविता कळवत आहे मिळाली तर पहा फारच जुनी कविता आहे. " वनी खेळती बाळ ते बल्लवांचे तुरे खोविते मस्तकी पल्लवांचे फुलांचे गळा घालीती दिव्य हार स्वनाथा सवे ते करीती विहार... कृष्णा ची वन क्रीडा कवितेचे नाव आहे.

  • @RushabhGavande-v3v
    @RushabhGavande-v3v 7 месяцев назад

    Wah क्या बात है Aruna ताई कविता छान पणे मा टली

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 2 месяца назад

    अतिशय सुंदर व हृदयाला❤ भिडणारी कविता

  • @प्रासादिकम्हणे

    खूप सुंदर कविता. काही जुन्या मैत्री डोळ्यांसमोर लख्ख पणे उभ्या राहिल्या. Nostalgic करून गेली कविता. Thank you स्पृहा

  • @sanjivaniart6322
    @sanjivaniart6322 2 года назад

    स्पृहा ताई, शांता शेळकेजींच्या कविताही ऐकवं ना...

  • @ashokary
    @ashokary 2 года назад

    खूपच छान......
    जर मी माझ्या काही कविता तुम्हाला पाठवल्या आणि त्या तुम्हाला आवडल्या तर आपण या प्लॅटफॉर्मवर वाचन कराल का?
    -अशोक यादव

  • @pankajnarule7745
    @pankajnarule7745 2 года назад

    कवी पुनीत मातकर यांच्या ऐन विणीच्या हंगामात या काव्यसंग्रहातील एखादी कविता सादर करा

  • @malini7639
    @malini7639 Год назад

    अग तुझे नाव मराठीत लिहता येत नाही ईग्रजी मला येत नाही .तुझे वाचन सुंदर आहे
    ईद्रिरा संत यांची कविता पण छान आहेत
    चंद्रमौळी झोपडी

  • @ashokkulkarni4198
    @ashokkulkarni4198 10 месяцев назад

    अप्रतिम.
    दूसरा शब्द नाही.
    माफ करा, मी कोणी कवी नाही

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 года назад +1

    अस वाटलं की ही कविता तुला समर्पित करावी..... Anyways.... By the way khup chhan disteys..😍😘❤️

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Год назад

    *इलाही इमानदार यांची गज़ल 'अंदाज आरशाचा' ऐकवा!*

  • @vivek.salunke
    @vivek.salunke 2 года назад

    अप्रतिम!! मला सौमित्र यांची बघ माझी आठवण येते का ही कविता ऐकायला आवडेल

  • @rasikahinge2630
    @rasikahinge2630 2 года назад

    माझ्या आवडत्या लेखिका कवयित्री
    खूप छान आवडती कविता

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 Год назад

    खुप छान कविता आणि स्पृहा सादरीकरणहु छान

  • @SandeshMane
    @SandeshMane 2 года назад

    Apratim 😍😍 tachkan bharun ale dole 😍

  • @veenapataskar9040
    @veenapataskar9040 2 года назад +1

    पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रज यांची कविता ऐकायची आहे

  • @udaypatil7477
    @udaypatil7477 Год назад

    कुसुमाग्रजांच्या मौन कविता घ्याल का?🙏

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 8 месяцев назад

    Hii Spruha khup chaan Kavita Ani khup chaan Saadarikaran . Nice.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +2

    Sundar kavita,apartim sadrikaran, uttam content.

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 2 года назад

    काव्य वाचन पण खूप सहज.छान..!👌

  • @alkamhatre6380
    @alkamhatre6380 2 года назад

    मला तुम्हाला एक पत्र पाठवायचे आहे कसे कुठल्या पत्यावर ते कृपया सांगावे

  • @titikshadeoghare3392
    @titikshadeoghare3392 16 дней назад

    अतिशय सुंदर, सुंदर उपक्रम

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 Год назад

    सुंदर, तू ही अन् कविता ही!

  • @pradnyajoshi62
    @pradnyajoshi62 Год назад

    Tuzya kavita ekun mala kavita wachnyachi aawad zali so pls mi konachya kavitanpasun suruwat karu pls guide kar na

  • @creativeishu8156
    @creativeishu8156 Год назад

    Spruha tai mi atach kvita wachayla ekayla suru kely konta pustak kiwa kvi suggest karshil ki jene krun ajun jast kavitechi odha lagel.

  • @yadavraojoshi6385
    @yadavraojoshi6385 Год назад

    श्रावण माझी हष॔ मानसी कवीता .एकवा.
    पी. जोशी

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 года назад +2

    नमस्कार

  • @ranjanabapat4852
    @ranjanabapat4852 2 года назад +1

    इंदिरा संत यांची बाळ उतरे अंगणी ही कविता

  • @atharvabhatade9853
    @atharvabhatade9853 2 года назад +1

    अरुणा ढेरे मलाही खूप आवडतात आणि खास गोष्ट म्हणजे मी स्वतः त्यांना भेटलो आहे.१०वी चा वर्गात असताना एका धड्यापासून वाचायला सुरुवात केली. खरंच खूप सुंदर लिहितात त्या...♥️👌😍

  • @vlogger_rajau
    @vlogger_rajau 2 года назад +2

    कविता खूप सुंदर आहे. 👌🏾😅

  • @amityeske1357
    @amityeske1357 Месяц назад

    .... खरच शब्द. अप्रतिम व्यक्तिमत्व

  • @namdevpp
    @namdevpp 2 года назад +1

    खुपच सुंदर अर्थबोध आहे या कविताचा.. धन्यवाद स्पृहा...

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 года назад +2

    Spruha kiti sunder kavita aahe Aruna Dhere hyanchi ,arth kiti chan aahe ani tujha sadarikaran apratim.👍🏻

  • @pramodlaxmiarts3066
    @pramodlaxmiarts3066 2 года назад +2

    Are wahh... Me 1'st time aikali hi kavita.❤ Kitti sunder aahe. Tuzyakadun ti aikan mhanaje parvanich😍Thanks, Thanks a lot. 👏

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 8 месяцев назад

    सुंदर प्रासादिक व रसाळ वाणीतून सादरीकरण❤

  • @ashwinipujari2339
    @ashwinipujari2339 2 года назад +1

    मी नेहमी आपल्या कविता ऐकते खुप आवडतात.
    मला एक फर्मायिश हि करायची होती की तुम्ही वैभव जोशी यांची कुछ तो सही कर् रहे हो हि कविता आपल्या channel वर ऐकायला नक्की आवडेल..
    धन्यवाद!

  • @shalakashet5553
    @shalakashet5553 Год назад

    Khup ch Chan
    Aruna tai chi konti pan Kavita chalel
    Thank you so much😊

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak5656 2 года назад

    Itke sunder shabda rachna aahe.... Kharach Tod nahi ya shabdana

  • @nileshturkeofficial
    @nileshturkeofficial 2 года назад

    ruclips.net/video/034s9rO2fk8/видео.html
    हीच कविता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर च्या आवाजात

  • @mandarkhare3194
    @mandarkhare3194 2 года назад +1

    अतिशय सुंदर सोज्वळ कविता आणि सादरीकरण देखील निर्मळ

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 Год назад +1

    आपला चॅनल फार छान आहे. कोणाबरोबर शेअर केल्यास त्या व्यक्तीला पण आनंद देणारा.

  • @tejalchaudhari3421
    @tejalchaudhari3421 2 года назад +2

    Ekdum perfect 👌👌👌

  • @SBB512
    @SBB512 2 года назад

    Spruha tai khup chhan sadrikaran kelas pn aruna tainchi ankhin ek kavita aikav na Grishmatlya Sakali Ale Bharun megh khup sundar kavita ahe hi pn

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 года назад

    ग्रेस यांच्या कविता आवडतील

  • @vindajoshihambarde4984
    @vindajoshihambarde4984 2 года назад +1

    Chhanach

  • @krishnapatil1126
    @krishnapatil1126 2 месяца назад

    मैत्रीचं नातच वेगळं असतं

  • @kavitatembulkar7992
    @kavitatembulkar7992 2 года назад

    मला ना अरूणा ढेरे यांची राधा नंतरची ऐकायची आहे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Год назад

    *सुरेश भट यांच्या कविता ऐकवा!*

  • @prajktajagdale6563
    @prajktajagdale6563 2 года назад

    Aamcha gavche Kavi Rendalkr yacha pan sag ki tai khup mast aahit

  • @Libra6
    @Libra6 2 года назад +1

    Spruhaniya, spruhatai👈👌😀. Take care stay safe, waiting for SNDN season 5. Pls download your and varad's interview with anurup. Ani ho gammat gani series jamel tase chalu theva.👈🙏

  • @anishaprabhu6768
    @anishaprabhu6768 2 года назад

    Khup chhan prakare mandli aahe hi kavita ek kharya ani nikhal maitriche bhaav apratim pane vyakta karun vilakshan udaharan prastut karun je kharokhar maitritli odh chhan prakare samjavte va tyatla moklepana japun apulkine ek chhansa chhotasa pan ghatta na tutnaara naata va dhaaga ani ashe mitra je aplya sankatat apli saath detat va aplayala tya sankatanna tya apayashala samori jaayla kahi nahi pan thodasa bal detat te faar mahatvacha va avibhajya bhaag asto ayushyat je konihi dusra nahi karu shakat ekameva vyakti jishyashi apan moklepannane manatla saarakahi sangu shakto bolu shakto va aadharahi vatto va darpanahi yet nahi ase ek anokhieananda denaare vardaan aahet he khare chehryavar nikhal va naisragik hasu ananaare .........!!!!!!

  • @manasiphadke7247
    @manasiphadke7247 2 года назад

    Arti sunder spruha👌👍

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Asha kavita Punha punha share kara

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Apartim content

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Asa kavita Punha punha sadar kara.

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 2 года назад +1

    धन्यवाद स्पृहा!! ही माझी अतिशय प्रिय असणारी आणि मनाच्या आणि मोबाईल च्याही कोपऱ्यात जपून ठेवलेली कविता तुझ्या सादरीकरणातून जीवंत झाली.. अरुणा ताई माझ्याही आवडीच्या आणि माझ्या मनातली इच्छा या फर्माईश मधून पूर्ण केल्याबद्दल तुझे आणि फर्माईश करणाऱ्या ताईंचे खूप आभार.. ❤️❤️🙏

  • @ajaywaghmare8437
    @ajaywaghmare8437 5 месяцев назад

    He dalimba che dane hi kavita mahite ka tumhla ti aiku shakta?

  • @meghaghotekar7466
    @meghaghotekar7466 2 года назад

    Khupch mst....tumch sadarikaran👏👏

  • @rekhamainde5077
    @rekhamainde5077 Год назад

    Apratim Kavita 💖😍👌👌

  • @vitthalgat0709
    @vitthalgat0709 2 года назад +1

    उत्तम सादरीकरण प्रिय स्पृहा 👍🖊️📚🍫🦋🦚👒🌹🌅🌴🌳🍭🌦️🍊🍋🍈🍑🍒🥝🍐🍏🍇🍉🫐🍎🥥🥭🍓🌄💞

  • @latagandhar409
    @latagandhar409 2 года назад +1

    Bahinabai choudhary hynchya poem eyakayala avdatil didi! Khup chaan sadarikarn aaha tumache

  • @akshaykadam8779
    @akshaykadam8779 2 года назад +2

    अतिशय सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण👌🏻🌹

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 8 месяцев назад

    Friendship???

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 6 месяцев назад

    सुंदर कविता ❤ सुंदर सादरीकरण

  • @smitasaraf7950
    @smitasaraf7950 2 года назад +2

    हृदयाला स्पर्श करते ही कविता