Pro-वर्तन | संवाद प्रवर्तक स्त्रियांशी | भाग ११ वा | धनश्री लेले | अनघा मोडक | वीणा गोखले
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- रसिकहो सादर करीत आहोत जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत "Pro-वर्तन" या प्रवर्तक स्त्रियांशी संवाद साधणाऱ्या मालिकेचा अकरावा भाग !
विशेष सहभाग : सुप्रसिद्ध निरुपणकार, निवेदिका, मुलखतकार धनश्री लेले.
मुलाखतकार : सुप्रसिद्ध निवेदिका आणि मुलाखतकार अनघा मोडक
संकल्पना आणि दिग्दर्शन : वीणा गोखले
#SmrutiGandhaMarathi
#ProVartan
धनश्री ताईंच्या सारख्या दिग्गज शब्दप्रभू व्यक्तीची मुलाखत घेतांना अनघा किंचितही कमी पडली नाही. इतकी आनंददायी मुलाखत ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. या बोलण्यातून किती शिकवण मिळाली हे मोजता येत नाही. दोघींचा व्यासंग, वाचन हे कौतुकास्पद आहे.
😊😊ौौ😊😊
😊😊😊😊😊
स्तुत्य असे विचार समजले.
धनश्री ताई आपल्याकडून कोणतेही व्यक्यान श्रवण करण्याची उत्कंठा वाढीस लागते.
अनघा मॅडम खूप खूप धन्यवाद.
असेच नवनवीन व्याख्यान धनश्री ताईंच्या अमोघ वाणीतून श्रवण करण्याची इच्छा आहे
खुप खुप छान मुलाखात ! मराठी भाषेची ज्यांना नितांत आवड आहे त्यांनी तर चुकवू च नये .
लागो न द्रुष्ट कोणाची अशी झाली मुलाखत.
संपून नये अशी.
दोघीना मनःपूर्वक शुभेच्छा ❤🙏
खूप मन भरून आले तुम्हा दोघींच मनमीत ऐकताना. देवाने तुम्हाला असच आमच्यासाठी बोलत ठेवावे हीच प्रार्थना देवाच्या चरणी. तुम्हाला दीर्घायु लाभो.
🌹👌वक्ता दशसहस्रेषु”अनेक गुणांचा निर्मळ संगम धनश्री ताई,अनघाताई❤️अलौलिक👌🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌❤️⭐️❤️⭐️🙏
अनघाताई मोडक, धनश्री ताई लेले
प्रवर्तन अतिशय छान, अनघाताई आपण पण मोजके शब्दात, गोड शब्दात मुलाखत घेता, विस्तार पण पाल्हाल वाटला नाही, खरच तुझ्या मुलाखातीला वन्दन 👏🏻, धनश्री ताई तर काय आडनावा प्रमाणे लेले कुछ कम नही, साक्षात सरस्वती प्रसन्न आहे, आणि व्यक्तीमत्व, देहबोली श्रवण वेळी खिळून ठेवते, पुनःश्च आपणास प्रणिपात 👏🏻👏🏻
सौ धनश्री ताई आपण आम्हाला ज्ञानरूपी वाण भरभरून दिले आहे, आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद.
प्रश्न मुळातून समजून घेत समर्पक उदाहरणांसह सुसंगत आणि संक्षिप्त, तरीही समृद्ध अशा उत्तरांची धनश्री ताईंची मांडणी...
एका विषयातून पुढच्या दुसऱ्या विषयाकडे अत्यंत अलगदपणे नेण्याचे अनघा ताईंचे कसब,
याला मुलाखत म्हणावं की गुरू शिष्याची एखादी जुगलबंदी?
केवळ अप्रतिम...
आम्हां श्रोत्यांच्या आयुष्यातले दोन तास "काव्यशास्त्रविनोदेन..." संपन्न केले तुम्ही दोघींनी...
खूप आभार आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्हा दोघींचे सुंदर विचार,बोलण्यातली सहजता आणि शब्द संपन्नता ... आम्हां श्रोत्यांना अतिशय समृद्ध करणारा आनंददायी अनुभव म्हणजे ही मुलाखत......
Kharach
आणि अनघा तू तर कित्ती प्रश्न विचारलेस त्यामुळे आमच्या पण ज्ञानात भर पडली त्यात धनश्री ताईंनी काही पण हातचे न राखतां मनमोकळी उत्तरे दिली. फार च छान ❤
अत्यंत सुरेख आमच्या मनातल्या या देवी सरस्वतीला त्रिवार अभिवादन आणि तुमच्या भागवत पर्वणी अनुभवाची आतुरतेने वाट पाहतोय हा योग लवकर येवो ही त्या योगेश्वर श्री कृष्ण चरणी प्रार्थना
किती निगर्वी , महान विदुषी पण तितक्याच साध्या धनश्री ताईंना नेहमी ऐकावेसे वाटते .
अनघाताई तुझं बोलणं मला खूप आनंद देऊन जातो ओघवते शब्द अर्थपूर्ण आणि नेमकं ..... कसं बोलावं ह्याचा तू वस्तुपाठ आहेस. सुंदर मुलाखत. धन्यवाद धनश्री ताई तो my favorite ❤
दोघीही अप्रतिम..जेवढं जमेल तेवढं वेचावे अन् मनाने कानांनी तृप्त व्हावं असं वाटून गेलं.. चिंब भिजून गेले.. धनश्री खूप छान गं...❤
अनघा मोडक ही खूप छान मुलाखत घेते. तिचाही व्यासंग दिसून येतो.
अप्रतिम मुलाखत! धनश्री ताई आणि अनघा कान आणि मन दोन्हीही तृप्त झाले.
भाषेच्या व ग्रंथांच्या प्रेमात पडावं अशी मुलाखत होती. दोघींचे खूप खूप धन्यवाद 💐🥰🙏🏻🙏🏻🙏🏻
धनश्रीताई आणि अनघाताई तुमच्या योगे एक उच्च अनुभूती प्राप्त झाली आहे.धनश्रीताई तुम्हाला साक्षात देवी सरस्वतीचे वरदान आहे.एकच जन्मात केवढे ज्ञान आत्मसात केले आहे.आणि ते ज्ञान इतरांना इतक्या आनंदी वातावरणात देणे हा आनंदी योग आहे.तुम्हा दोघींच्या माध्यमातून ते ऐकायला मिळाले हेच संकांतीचे सुंदर वाण आहे.
अनघा मोडक आणि शब्दप्रभु धनश्री ताई , आपण दोघीची ही मुलाखत मनापासून आवडली.
दोघिंचा व्यासंग आणि विषयाची
जाण अद्भुत आणि बोधपूर्ण आहे.
आपण दोघीं उच्च पातळीवरील
कलावंत आहात म्हणून दोघिंचे
मनापासून कौतुक आणि आभार.
खरोखरीच दोघी तुल्यबल आहेत. दोघी विनम्र आहेत. धनश्री लेले तर बोलायलाच नको. खूप कौतुक मला नेहमीच वाटत आलयं. कुठेही कधीच मी फार मी किती हुशार हा भाव नसतोच. हे फारच कौतुकास्पद आहे. मी त्यांची वेडी फॅन आहे. समजून सांगणे अवघड आहे. तेलीलया साधतांत. ❤
नमस्कार.खूप खूप छान.ऐकतच रहावं असं वाटतं.अभ्यासपूर्ण मुलाखत.
कित्ती विद्वत्ताप्रचुर संभाषण..! Hats off !
खरच हा संवाद म्हणजे मला मधुमास च वाटतो दोघींची पण एवढी मधाळ वाणी अप्रतिम, 👌👌👍❤
🌹👌वा!वा!!क्याबात! धनश्रीताई!!लाजवाब👌❤️❤️👌❤️❤️👌⭐️❤️👌❤️👌🙏
धनश्री ताई लेले म्हणजे ओघवती वाणी अभ्यासवृत्ती शालीनता तेवढ्याच तोडीच्या अनघा ताई दोघींचाही संवाद संपूच नये असं वाटलं खूप ज्ञान मिळालं❤
ऐकतच रहावे,संपूच नये असे वाटते,धनश्रीताईंना लाभलेली ही दैवी संपदा आहे
खूपच सुंदर,ऐकताना अगदी मंत्रमुग्ध झाले
🌹 मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा तोडीस तोड होते. ही मुलाखत थांबूच
असं वाटत होतं. दोघींकडूनही खूप ज्ञानप्राप्ती झाली. अगदी कर्ण संपुष्टात आले. खूपच सुंदर. 🌹
Kadhich sampoo naye ashi hi mulakat. Tumha doghinche khoop khoop aabhar. Dhanashri tai tu khoop ggod aani dyandayak boltes. ❤
शब्दातीत, अप्रतिम! दोघीही एकमेकात अशा मिसळून बोलल्या की तुटलेल्या मोती सरांतून मोती सहजपणे घरंगळत जावेत, तसे शब्द हृदयांत घरंगळत जातात! दोघींनाही सादर🙏🙏🙏 मन प्रसन्न झाले पण कान अतृप्तच राहिले.👍👍👌👌🙏🙏
काय सांगु मन आणि कान तृप्त झाले
सगळ वाचण कठीण आहे. उदहरणासहित सांगितलेलं खूपच भावल🎉
आज,तुम्ही घेतलेली धनश्री ताईंची मुलाखत, अप्रतिम झाली आहे.सरस्वती कन्येशी सुंदर गप्पांगणामध्ये पूर्ण समरसून गेले.तुमचाही अभ्यास भरपूर आहे,हे ही जाणवले.त्यांच्या सर्व वीडियोंचे मी पारायण केले असे म्हणायला हरकत नाही.खूपच सुरेख!!!!!!
दोघींना ही नमस्कार.!!!!!😊😊
तुम्हाला बोलताना आणि आम्हाला तितकाच ऐकताना आनंद झाला
🌹👌पाठांतराने शब्दांच्या ज्योती होतात👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌❤️⭐️❤️⭐️👌❤️⭐️❤️⭐️👌🙏
अप्रतिम.मुलाखत कशी घ्यावी हेही अनघा ताई कडून कळते.धनश्री ताई तर ज्ञानाचे अपार भांडार आहे.दोघी तुल्यबळ आहेत.
वाचन, अभ्यास,मनन, चिंतन या सर्वांना मनापासून वंदन
🌹👌शब्दछटा लक्षात घेणे,भाषा प्रभावी👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
धनश्री आणि अनघा तुम्ही दोघी प्रतिभावंत आहातच. कुठच्याही क्षुल्लक विषयावर तुम्ही दोघी किती सहजसुंदर ओघवती वाणीने सुमधुर आवाजात बोलतात. दाखले सुद्धा रोजच्याच जीवनातील सहजतेने दाखले देतात. तुम्हा दोघींचे कौतुक करावे तेवढे कमीच. ह्या मुलाखतीने आम्ही कायावाचामने तृप्त झालो. 🙏👏👏
अनघा तु धनश्रीताईची खुपच छान मुलाखत घेतलीस त्याच्या बोलण्यात खुप गोडवा नमस्कार आणी खुप छान शिकवण मिळाली तुम्हाला पुढील कथासाठी धन्यवाद ❤
नमस्कार 🙏
अनघा ताई!
धनश्री ताई!
उंच निवेदन शिखरावर असलेल्या दोघीही किती छान योग ❤❤
धनश्री ताई!ज्ञानेश्वर-मुक्ताबाई प्रसंग डोळ्यासमोर आला तेव्हा हिच का मानस पुजा असेच वाटत होते. खुप खुप अभिनंदन तुमचे 🌷🌷
अनघा ताई अन् धनश्री ताई दोघींनाही एकत्र ऐकण्याचा खूप छान अनुभव...
धनश्री ताई आपल्या मुखातून भागवत नक्कीच ऐकायला मिळेल, ही मनस्वी इच्छा.
सर्वगुण संपन्न, अष्ट कला पूर्ण, साहित्य, रस, कला तज्ज्ञ असलेल्या धनश्री ताईंना एवढी अफाट बुद्धिमता प्रदान करताना, परमेश्वराने काहीच कमतरता ठेवली नाही. सढळ हाताने ताईंना गुणदान केलंय. असंच त्यांना ऐकताना वाटत असतं.
अशी गोडं व्यक्तीमत्व धनु ताई खुप आवडते मला ,सगळं कसं भरभरून दिलयं देवाने तुम्हाला ,अशा शिक्षिका असल्या तर खरचं कसे शिष्य तयार होतीवं, हल्ली घरात ठरावीकच कुटुंबात संवाद किंवा काही विषयांची उत्तरे मुलांना मिळत नाही ते तुम्ही छान प्रकारे सांगता याचं खुप कौतुक
अनघा ताई आणि धनश्री ताई ,दोघीही खूप छान गप्पा रंगल्या. मधुर आवाज, नम्रता, बोधपूर्वक गोष्टी,खूप शिकण्यासारखे आहे . धन्यवाद,
अनघा किती गोड बोलतेस गं ,खरच खूप छान धनश्री ताई ,तुम्ही किती सहज पणे सांगता व ते समजते .ऐकतच राहवं वाटतं संपुच नये, दोघीही खुप सुंदर व गोड बोलतात ,दोघीही दिग्गज आहात 🙏🏻🙏🏻
निशब्द, खूप शब्दब्रम्हात न्हालो. अप्रतिम, धनश्री ताई आणि अनघा ताई दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏💐❤ परत परत ऐकावी अशी मुलाखत
खूपच सुंदर म्हणजे शद्बच नाही माझ्याकडे. परत परत ऐकावी अशीच. फक्त आता आचरणात १टक्का तरी उतरवता आली पाहिजे. धनश्रीताई आणि अनघाताई तुम्हां दोघींना साष्टांग नमस्कार.
नमस्कार. अप्रतिम व अवर्णनीय मुलाखत. तुमच्या ओघवत्या वाणीतून सर्व काही डोळ्यासमोर उभे राहते. परवाच कोथरूड मधील बेडेकर मंदिरात श्रीसूक्ताच्या प्रवचनात आपली भेट झाली. खूप विषयांचे ज्ञान मिळते. आपणांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
संक्रांत निमित्ताने खूप छान गप्पा झाल्या
किती तरी विचार मांडताना किती तरी गोष्टी
छान सांगितल्या आकलन होत होते
शब्द रुपी तीळ आणि ज्ञान रुपी गूळ
याचे एकत्रित करून आम्हा श्रोत्यांना
जो तिळगूळ तुम्ही दोघींनी वाटला
त्याने धन्य झालो 🙏👋
🎀दोन संतोषींची सुंदर मुलाखत. 💯% अगदी मनापासून,मनातलं बोललात धनश्री ताई. मी सुद्धा काही दिवसांपूर्वीच घरच्या कार्यक्रमासाठी साहित्य संमेलन सोडले. ते सोडण्यात मला अजिबात वाईट वाटले नाही. कारण मी पण आधी घराला प्राधान्य देते.
धनश्री ताई असंच बोलत रहाव आणि आम्ही ऐकत रहावं. सोबतच अनघाची समोरच्याला बोलतं करण्याची शैली तर अप्रतिमचं. खूप आवडली ही संतोष पूर्ण मुलाखत.💐💐
धनश्री ताईंची मधाळ वाणी,अफाट शब्दभांडार जेवढी प्रगल्भ आहे तितकीच अनघाची प्रश्नशैली विचार प्रवर्तक आहे दोघींनी संवाद खूप छान पध्दतीने खुलविला.
Dhanashri tai na aikne mhanje parvanich. Affat dnyan. Khup shikayle milte. Anagha tai hi todis tod 😊❤bolne atishay madhur 🌹💐
खरं म्हणजे सगळ्यांनी छानच कमेंट्स दिल्या आहेत पण तरीसुद्धा लिहल्याशिवाय रहावत नाही. धनश्री. म्हणजे सरस्वतीच रूप आणि अनघा पण व्यासंगी व्यक्तिमत्व. सुंदर मुलाखत ऐकत रहावी. असं. वाटतं. दोघीनाही धन्यवाद.
धनश्री ताई सकारात्मकतेचा खळखळून वाहणारा झरा आहे.🙏🙏
अनघा आणि धनश्री ताई खरंच तुम्हा दोघींना एकत्र ऐकणं म्हणजेच एक पर्वणी आहे . धनश्री ताईंचं बोलणं आणि त्यांचं ऐकणं हीच खूप मोठी गोष्ट आहे . त्यांचं समृद्ध व्यक्तिमत्व आणि लाघवी हसून बोलणं खूपच मस्त. सरस्वती त्यांच्या जिभेवर वास करतेय आणि त्यांचं बोलणं संपूच नये असं वाटत असतं सतत. खूप छान मुलाखत. असंच छान छान कायम वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला मिळावं हीच इच्छा आणि तुम्हा दोघींनाही अनेक शुभेच्छा ❤
अतिशय उत्कृष्ट मुलाखत ,दोघीही भरभरून विचारांची देवाणघेवाण करत होत्या. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ,कुठेही कंटाळा न आणणारी ,अनघा मँडम पुढील प्रश्न काय असेल आणि त्यावर धनश्री मँडम काय बोलतील तेवढीच उत्सुकता निर्माण करत होत्या.
आपल्या मुलाखतीमधून दोघींकडून ,किती घेऊ नी किती नको अशी अवस्था होते.
सौ. धनश्रीताई आणि अनघा ताई दोघींना शत शत नमन. दोघींच्या वणीत देवी सरस्वतीचे रसाळ,सळसळते,प्रेमळ
रूप अनुभवले,दोघींना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. शुभं भवतू.
🌹👌वा!वा!!भावनेला “भाषा”नसते👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏❤️👌
ताईंना... अगदी जवळून भेटण्याचा योग आलाच... आहे... पण आजची गझल... अप्रतिम.... ऐकतच रहावे.... अनघा... अप्रतिम.. अव्यक्त 👌👌
माझ्या aawadi च्या doghi निवेदिका khup aaswad घेऊन ऐकले. धन्यवाद
याला म्हणतात मुलाखत, किती अप्रतिम, ओघवत्या शैलीत प्रश्न आणि उत्तरे..,'येथे कर माझे जुळती,'
ताई तुम्ही किती छान बोलता..
प्रश्न विचारणारे प्रश्नाला उत्तर देणारे दोघी ही छान..
ऐकत रहावं असं वाटतं..
प्रेरणादायी मुलाखत.......Hatt's Off
🌹👌दैनंदिन कामे म्हणजेच “कर्मयोग”🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
aho tumhi doghi kiti dnyani aahaat. tumachi charcha aikatana sare visarale jate. kevdha anand deta tumhi doghihi. apratim charcha. kiti dnyan dilat. god bless u both. thnks.
अवर्णनीय व अप्रतिम मुलाखत. खुप वेगवेगळे विषय अगदी ओघवत्या वाणीतून समजतात. ऐक....त रहावेसे वाटते. गंगा लहरी असो की आणखी काही असो. सर्व चित्र डोळ्यासमोर येते. परवाच आपली कोथरूड मधील बेडेकर मंदिरात श्रीसूक्ताच्या प्रवचनात भेट झाली.
हे खरं आहे ,आम्हांला गंगा लहरी तुमच्यामुळे माहित झाले.
धनश्री ताई आणि अनघा ताई तुम्हाला ऐकणं हा एक खूप अविस्मरणीय अनुभव आहे...खूप खूप शुभेच्छा
खूप छान वाटले.
खूपच सुंदर मुलाखत.... 💐🙏
मुलाखत देणारा उत्तम आहेच , पण मुलाखत घेणारा किती तयारीचा असावा याचा सुंदर वस्तुपाठ ही मुलाखत आहे !
दोघीही छान !!
खूप खूप सुंदर मुलाखत !!🙏🙏🙏
प्रोवर्तन धन्यवाद!धनश्री ताईंना भाषेला विविध प्रकारात सादर करण्याकरिता उदंड उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना.
खूप अप्रतिम मुलाखत ,खरोखर कान तृप्त झाले🙏🏻🙏🏻
कमाल, कमालीची अप्रतिम मुलाखत, घेणारी अनघाताई आणि देणार्या धनश्री ताई, दोघीही उच्चस्तरीय, खरोखरच गंगालहरी, शेवटचेच ज्ञानोबांची ओवी चपखल
🌹👌वेचक बोलणे हे वक्त्याचे लक्षण 👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
खूप छान, धन्यवाद दोघीनाही. अनघाताईनी छान मुलाखत घेतली. धनश्री ताईचा कार्यक्रम ऐकण्याची मी वाट बघतच असते खूप छान वाटते. धन्यवाद!
अतिशय सुंदर! ऐकतच रहाव! तुमच संभाषण संपुचनये अस वाटत.
एकदम उत्तम, संभाषण, ऐकायला खूपच सुंदर आणि आनंदमय वाटले. असेच पुनः पुनः वक्तव्य होत रहावीत हीच सदिच्छा. 😂
खुप खुप धन्य धन्य देवा मीअनघा मोडक मॅडमचं व्याख्यान घारेवाडी मध्ये यावर्षीच ऐकले आहे फार फार आनंद झाला तुमच्या दोघींचे व्याख्यान ऐकताना❤❤❤🎉
दोघी ताई अप्रतिम आणी त्यांची वाणी म्हणजे अवर्णीय ❤
धनश्री ताई व अनघा ताई, आपणास स्नेहपूर्वक नमस्कार. खुप सुंदर!कालच लोकाभिराम श्रीराम श्रवण करण्याचा योग आला. खुप छान!🌹🙏👌
खुप माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक अशी मुलाखत आहे 🙏🙏
सुरेखच. संपूच नये असे वाटणारी ही मुलाखत माधुर्यपूर्ण दोन तास शब्दरस, अर्थरस, भावरस यांच्या शिखरावर कधी घेऊन जातात कळतही नाही. धनश्रीताई ग्रेट आहेतच पण अनघाताई तुम्ही पण खूप छान बोललात. आम्ही लकी असे हे दोन तास सुंदर श्रवणाचा लाभ झाला. 👏👏
Khupch Chan angha ani dhanshri tai mi bharaun gele
खूप छान...एका वेगळ्याच उंचीवर असलेला कार्यक्रम..दोघींचा प्रचंड अभ्यास प्रत्येक प्रश्न आणि उत्तरात जाणवतो
अप्रतिम कार्यक्रम, दोन्ही लाघवी व्यक्ती ऐकत रहाव्या अशा आहेत.
🌹🙏🌹भाषा प्रवाही असली पाहिजे👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌🙏👌
दोघींना ऐकणे म्हणजेदुग्ध शर्करा योग.ऐकतच राहावे.भाषेवरचे प्रभुत्व आणि अभ्यासपूर्वक बोलणे.खरच दोघींनाही सविनय प्रणाम
Dhanashree Tai Khupch Sunder Mulakhat Hoti kadhi Sampu naye Asacj Vatat hota Anagha Tai Khupch chan
Apritim mulakhat.doghina salam.paraspar purak doghi.khup anand milala. Dhanshri tai amhala pan Gangmate chaya khushit ganga lahari shravan karayla nakki avadel. Parat asa yog ala tar nakki kalava.
असेच अप्रतिम कार्यक्रम ऐकायला पहायला आवडतील❤❤❤😊
दोघींनीही अतिशय सुरेख श्रवणीय योग प्रदान केला, धन्यवाद शब्द ही पुरणार नाही,मन उचंबळून आलं, परत परत ऐकावं आणि हात हाती घट्ट धरून आपली वाटचाल आनंदी करावी..अशी संक्रांत भेट लाभली 🎉❤
अतिशय सुंदर मुलाखत. दोघींनी असेच छान छान बोलत रहावे व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना. दोघींचे बोलणे संपूच नये असे वाटते. ❤
Khupach sunder man prasann zale असेच उत्तम उत्तम विषय ikayla मिळोत
खूप छान.दोघीही यशस्वी आहेत. सतत ऐकवस वाटत.खूप छान विचार ऐकायला मिळाले.
अतिशय सुंदर, भेट संक्रांतीच्या दिवशी मिळणे, ही सुवर्ण संधी लाभणे. शब्द सुचत नाहीत. सतत ऐकत राहावे असे वाटते. खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏
धनश्री ताई व अनघा ताई किती गोड आहात तुम्ही ऐकत राहावं असं वाटल
किती सुंदर अप्रतिम गझल,., हमेशा नमी अशीऑंखे सुखा नही पांऊ
१) स्टार्ट व्हेर यू आर ,विथ व्हॉट यू ह्याव आणि ३) मेक समथिंग आउट ऑफ इट
👋👋👋
धनश्री ताई नेहमीप्रमाणेच अप्रतिम अद्भुत बोलतात. कार्वर ची वाक्ये समर्पक ❤