अप्रतिम सादरीकरण... कधीही कितीही वेळा ऐकली ,वाचली तरी डोळे घळा घळा वाहू लागतात. आणि आपल्या वडिलांनी सुद्धा त्या वेळच्या त्यांच्या परिस्थिती मध्ये आपले किती लाड केले होते ते आठवून खूप जास्त रडू येते. आता वडील नाहीत त्यांना विसरणं ही शक्य नाही पण ह्या कवितेमुळे अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून गेले. खूप धन्यवाद स्पृहा
तुझ हे सादरीकरण शाळेतल्या बाकावर घेऊन गेल आणि शेवटी 2 कडवे अगदी जड अंतःकरणाने म्हणणारे सर सुद्धा दिसले आणि ते ही अगदी ह्याच चालीत म्हणून दाखवायचे ही कविता 😇 खूप छान सादरीकरण 👍खूप खूप धन्यवाद
शाळेतलं बालभारतीचं पुस्तक डोळ्यासमोर आलं आणि ज्या चालीत तुम्ही ही कविता सादर केलीत त्याच चालीत आम्ही पण ही कविता म्हणत असू.. शाळेतले सुंदर दिवस आठवले आणि अत्यन्त कळकळीनी, passionately शिकवणारे त्यावेळचे शिक्षक आठवले. त्यांच्या मुळे ही कविता आजही शब्दांसकट, चालीसकट अर्थासकट जशीच्या तशी इतक्या वर्षानंतरही मनात जिवंत राहिली आहे.. ही किमया कवीच्या अद्भुत शब्दांची आहे की समर्पित होऊन शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकांची आहे हे सांगणं कठीण आहे.Thank you स्पृहा.. 😊
खूप सुंदर सादरीकरण स्पृहा . आठवीत आम्ही ही कविता तोंडपाठ केली होती. बाबांची खूप आठवण आली. मी पुण्यात हॉस्टेलला राहत असताना बाबा खूप आजारी असून सुध्दा १० तासांचा प्रवास करुन मला भेटायला यायचे कारण येण्याजाण्यात माझा वेळ जायला नको म्हणून.
माझ्या लहानपणी ही कविता शाळेत आम्हाला होती. मी माझ्या मुलींना त्यांच्या लहानपणी म्हणायचे आणि आता नातीलाही . तुझ्यामुळे आमच्या .(आजी-आजोबा) जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खुप छान. धन्यवाद.
शालेय जीवनात समोर आलेल्या अप्रतिम कवितांमधली ही एक. तू सादर करत असताना मन खरंच त्या काळात गेलं. किती सुंदर कविता होत्या तेव्हा. तुझं गाऊन सादरीकरण अप्रतिम. खूप गोड तू आणि कविता .👍👏👏
स्पृहा ,तुम्ही थोडक्यात भावर्थासह अप्रतीम सादर केलीत ही कविता... या व्हिडिओ सोबत खाली दिलेली संपूर्ण कविताही वाचली आणि हे खूप छान केलं की की संपूर्ण कविता discription box मध्ये दिलीत... 👍🏻👌
खूपच छान कविता आहे ही, मला खुप आवडते, Mi पुण्यात असते माझे बाबा गावी असतात , खुप आठवण आली आज बाबांची ते pn माला असच समजाऊन सांगायचे, माझी मुलगी pn पाच वर्षांची आहे Ani उद्याच तिचा जन्म दिवस आहे , मी ही कविता तिला समजाऊन सांगायचा नक्की प्रयत्न करेन. Ani खरच खूप सुंदर आहे कविता.
ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती. तेंव्हाच माझ्या शिक्षकांनी ती कविता खूप छान समजावून सांगितली होती. शिवाय आमची परिस्थिती अशी होती की गरिबी काय हे कोणी समजावून सांगायची गरज नव्हती. त्यामुळेच आज सुध्धा ही कविता वाचली की डोळे भरून येतात. त्या सर्व आठवणी आज परत आल्या. धन्यवाद.
आम्हाला आठवीला ही कविता होती.मला चांगलेच आठवते,परब बाईंनी सांगितलेल्या कवितेचा अर्थ ऐकून वर्गातल्या साठ टक्के मुलांच्या डोळ्यातून पाणी आले होते. किती सुंदर होते त्यावेळचे दिवस. क्षणार्धात शाळेतील बालपण आठवले.😊
मी प्राथमिक शिक्षण घेत असताना आम्हाला चौथीला अभ्यासाला होती ही कविता. तेव्हा पाठ होती, आज काहीच आठवत नाही, स्पृहा उच्चार अप्रतिम वाचन शैली वेगळी ओळख देऊन गेली. फारच आनंद झाला.
खूप भावपूर्ण व छान , जुनी अविस्मरणीय अशी कविता. छान सादर केली.आता अशा सुंदर अर्थपूर्ण कविता शालेय कार्यक्रमातून गायब झाल्यात की केल्या आहेत. त्याचे वैषम्य वाटते भावी पिढी या ह्या साहित्या पासुन वंचित रहात आहे.
स्पृहा जोशी तुम्ही कविता खूप छान सादर केली. आम्हाला 7 वीच्या पाठयपुस्तकात ही कविता अभ्यासाला होती. त्यावेळी आम्हाला आमच्या शिक्षकांनी ही कविता तुम्ही जशी सादर केली त्याच पद्धतीने सादर केली होती. सलाम तुम्हाला!
अप्रतिम , जुना काळ आठवला , हृदय हेलावलं , ह्याच चालित म्णायचो आम्ही , एकदा पुढील कविता ऐकवाल ? मनी धीर धरी... शोक आवरी जननी , भेटेन नऊ महिन्यांनी ( भगत सिहं आईला म्हणत आहे )
ताई, तूम्ही खूप चांगली कविता आपल्या आवाजात सुंदरपणे सादर केली. तशी ती कविता अजरामरच आहे. प्रत्येक्ष वडिलांनी आपल्या कन्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण परिस्थिती मुळे बाप बिचारा हतबल झालेला असतो, पण बापाने आपल्या लाडक्या कन्येला खूपच समजवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्य ते वडील.
Dear Spruha, This was extremely emotional. I have a daughter who is 47 years old and remembering the tough times of our life's journey together we could relate this poem tremendously. Thank you, lovely narration.
अप्रतिम सादरीकरण स्प्रुहाजी! ही कविता आम्हांला लहानपणी अभ्यासाला होती. आजही ती ऐकताना डोळे आणि कंठ अगदी भरून आले. छान उपक्रम आहे.त्याकरिता तुमचे कॊतुक व तुम्हांला हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद!
बालमनात रुजलेली हृदयस्पर्शी आवडीची कविता,माझे गोकाक कर सर यांनी इतकी छान शिकवली होती ,त्यांची आठवण झाली.वडिलांची आठवन तर शब्दात सांगता येत नाही,ते एक शिक्षक,मोठ्या घराण्यात मी लग्न होऊन आले, आपल्या मुलींना गरीबाची म्हणून हिणवलं जाऊ नये असं त्यांना खूप वाटायचं🙏🏻
माझे आजोबा आणि बाबा नेहमी हि कविता आम्हाला म्हणून दाखवायचे, आज दोघेही नाहीत, पण तुझ्यामुळे पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या, सुंदर कविता आणि सादरीकरण ताई
स्पृहा, तुझं कृतार्थ इथलं येणं! तुझे कविता वाचन मनाला स्पर्शून जाते ग... शब्द न शब्द अर्थ उकलून जातो.. अशीच नित्य वाचनातून कविता ऐकवित रहा!... कवी कल्पना साकार करण्याची ताकद तुझ्या आवाजात आहे!
कविता कशी वाटली, काय विचारतेस? अगं दीदी, ही कविता अनेकदा वाचली, ऐकली, पाठही केली शाळेत; पण कळली मात्र आज, तुझ्या तोंडून ऐकल्यावर! खुप छान सादर केलीस कविता…👏🏼👏🏼
हॅलो स्पृहा,कवीने खूपच तळमळीने लिहिलेली कविता तुम्ही तितक्याच तळमळीने गायलीत! जुनी मराठी भाषा,तिची श्रीमती या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशात येत आहे! आपले आभार मानावेत तितके कमीच,धन्यवाद!
ऐकून डोळ्यात पाणी आल दीदी .....खूप छान कविता आहे आणी तुझ सादरीकरण नेहमीच अप्रतिम !.... खूप गोड ❤ तुझ्या मुळे मनातली कवितेविषयीची ओढ टिकून आहे thank you 🎉❤
आमच्या लहानपणी पाठ्यपुस्तकात आम्ही शिकलो.तेव्हा चाल आवडली,गाता यायची म्हणून ही कविता आवडायची.मोठे झाल्यावर त्यातील अर्थ कळतो आणि डोळे पाणावतात.माझ्या गोरटीला म्हटले की अख्खा वर्ग माझ्या कडे वळून पाहायचा माझं माहेरचे आडनाव गोरटे.पूर्ण कविता खाली दिल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद स्पृहा ही कविता माझ्या हृदयाच्या अतीशय जवळची आहे आणि ती पण माझ्या अतीशय आवडत्या व्यक्तीकडून रसग्रहणा सहीत ऐकायला मिळाली व्वा क्या बात है
ही कविता तू स्पृहा गाईलीस तितकीच पाठ्यपुस्तकात होतीकारण मी शिकवली आहे ,पाठ होतीच ,मुलीचे भावविश्व बाबा व बाबांचेही मुलगी ,शिकवताना सुध्दा गळा दाटून यायचा.याची चाल हिच आहे ,गुणगणण्याची ,खुप छान.
माझी पण खूप आवडती कविता.माझे बाबा सुद्धा पूर्ण कविता म्हणायचे.आणि त्यांचे डोळे डबडबलेले असायचे.त्या वयात त्याचा अर्थ कळला नाही. मोठं झाल्यावर मात्र कविता म्हणताना मी पण रडले अगदी हमसून हमसून
धन्यवाद स्पुहा।maazhi कन्या कविता खुप आवडीची आहे।अनेक वेळा dolyatun पाणी येते gatana।सदर छान kele न radataana। कमाल तुझी। सादर करणे कविता kevhadhe है kraerv
खुप खुप सुंदर व संवेदनशील कवीता व त्याबरोबरच तुमचे सादरीकरण ही तेवढेच महत्त्वाचे आणी खुप छान भावपूर्ण होते. खुप खुप खुप खुप खुप खुप आवडले खरेतर ही पुर्ण कविताचे सादरीकरण नक्कीच आवडेल ... प्लीज पहा जमते का? तुमचे काव्य वाचनाची आवड खुप भावली व तुमच्यामुळेच माझी पण कवितेत ली रुची वाढायला लागली.. 👌👍❤️
स्पृहा तू वाचलेल्या सर्व कविता मला फार आवडतात. ही कविता ऐकताना मला माझ्या वडिलांची खूपखूप आठवण झाली.आणि बेताची परिस्थिती असल्यावर मुलांनी छोटासा हट्ट केला आणि तो आई वडिलांना पुरवता आला नाही की त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल हे मला आत्ता कळते आहे त्या बद्दल तुला धन्यवाद.आणि खूप सार्या शुभेच्छा.
खूप खूप...खूपच सुंदर कविता ऐकायला मिळाली....शाळेत असताना तोंडपाठ होती ही कविता...पण त्यातला एवढा सुंदर अर्थ तेव्हा कळला नव्हता...आज बरेच वर्षानी ही कविता ऐकली आणि अर्थ कळल्यामुळे असेल आता ही कविता जास्त भावली... कवितेचं सादरीकरण खूपच उत्कृष्ट आहे...शब्दांनुसार तुमच्या आवाजातील भाव सुध्दा खूप छान आहेत... 👌👌🌹🌹🌹
शाळेत असताना जितकी कविता समजली,उमजली, नाही ती आत्ता मुलीचा बाप असल्यावर उमजली. या कवितेला काळाची मर्यादाच नाही.अतिशय आशयपूर्ण कविता. तसेच वाचन ही फारच सुंदर. शाळेत शिकत असताना धडे, कविता म्हणजे फक्त अभ्यास,व परीक्षा हेच डोक्यात असते त्यामुळे अशा सुंदर आशयघन कवितांचा खरा आनंद घेताच येत नाही. शिक्षकांनी सुध्दा कविता शिकवताना आभ्यासा पलीकडे जाऊन शिकवले पाहिजे असे आता वाटते.❤❤❤❤❤❤
खूप सुंदर कविता आहे ही. मी शाळेत असताना आमच्या अभ्यासक्रमात होती ही कविता व जशीच्या तशी माझ्या लक्षात होती. एकदा माझ्या मुलीला आमच्या परिवारातील एका व्यक्तीने विनाकारण मानसिक त्रास दिला. तेंव्हा मी स्वतः शाळेत होते.( शिक्षिका ) मुलगी माझ्याशी बोलत होती, आवाज भरुन आलेला होता त्यावरुनच लक्षात आले कि हिचे डोळे डबडबलेले आहेत आणि माझे ही डोळे भरुन वाहू लागले आणि ही कविता आठवली. काहीही कारण नसताना असा त्रास देणे याचाच अर्थ आमच्या परिस्थिती वरुन आम्हाला कमी लेखणे. मी सुद्धा या कवितेच्या वाचनाची मागणी केलेली होती. खूप धन्यवाद!!! आणि ही कविता तुम्ही अगदी जुन्या पद्धतीने च सादर केलीत, खूप छान वाटली, तुमच्या आवाजात अजूनच छान!!!
खूपच सुंदर आहे ही कविता. खूप अर्थपूर्ण आणि मनमोहक. डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. ही कविता मुळातच खूप छान आहे आणि त्यात तुमचे सादरीकरण इतकं सुंदर आहे की परत परत ऐकावेसे वाटते. मला *शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट* ही कविता तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल. मी यशश्री जोशी ( लग्नापूर्वी ) आणि लग्नानंतर आता Vrinda Desai, बेळगावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
माझे पण बाबा ही कविता माझ्या लहानपणी माझी समजूत काढण्यासाठी म्हणत असत. आज योगायोग असा की आज माझे वडील जाऊन पंधरा दिवस झाले. त्या आठवणी परत आठवल्या. शेवटी आपल्या बरोबर ऐवढेच असते. धन्यवाद.
सुंदर विश्लेषण!👌ज्या छंदात कविता लिहिली आहे त्याच चालीत सादर केलेली ही कविता मनाला पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. इयत्ता सातवीला (1973-74) आम्हाला ही कविता होती. स्पृहा तुझा हा उपक्रम खरंच स्पृहणीय आहे.👌👍
खूपच सुंदर सादरीकरण. आमची पण ही कविता शाळेत असताना पूर्ण पाठ होती. तेव्हा गर्भितार्थ करण्याएवढे वय नव्हते.पण जसेजसे मोठे होत गेले, तशी तशी ही कविता अंतर्मनात खोल रुजली. ह्या कवितेत बाप व लेक एकमेकांत किती गुंतले असतात- याचे फारच भावपूर्ण वर्णन आहे.
किती आठवणी ताज्या झाल्या बालपणी अगणित वेळा मी बाबासोबत अंगणात ही व पोर खाटेवर मृत्युच्या दारा या कविता म्हटल्या असतील अप्रतिम सादरीकरण अन त्याहीपेक्षा पार्श्वभुमी कथन त्यामुळे आकलन सुलभ होते व आवड वाढते🙏
Khup sunder! Man helavun taknari ani mazya athvanitli ani mala avadnari Kavita vachlis! Khupach Chan vatle,tya junya shaletil ayushhyat ramle! God Bless You !
स्पृहा तुला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तु सादर केलेली कविता आम्हाला शाळेत असताना अभ्यासाला होती. अतिशय एका गरीब वडिलांना पोरी कडे पाहून सुचलेले शब्दांकित कवीने केले आहेत. त्यांना सप्रेम साष्टांग नमस्कार. आणि तु हे चालु केलेली ही साईट मला मनापासून आवडले. धन्यवाद
खूप मस्त ,तुमची पहिली कविता एकली तेव्हाच वाटले ही कविता तुम्हाला सांगावी ,आणि आज लगेच आली पण .भारी ,लहानपणी च सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या ,आम्हाला शाळेत होती ,त्यामुळे घरात नेहमी म्हंटले जात होती
खूप छान कविता.माझी आवडती. माझे वडील ही कविता म्हणायचे. आता मी माझ्या नातीला म्हणून दाखवते.ती कधी रडायला लागली की मी तीला पहिल्या दोन ओळी म्हणून तशी action करून दाखवते.आता ती देखील छान action करून दाखवते आणि खदखदून हसते.खूप धन्यवाद स्पृहा
आदरणीय मॅडम कवितेचे अतिशय प्रभावीपणे वाचन केले, की कवितेच्या वाचनावरून कवितेचा अर्थ समजतो अशी ही कविता भावस्पर्शी हृदयस्पर्शी मनाला भावलेली कविता. पुढील भागात कवितेच्या एकेक ओळीचा भावार्थ समजून सांगणे विनंती. धन्यवाद.
Maze baba lahan panich varle mala versh pn navta zala pn aai nehmi mi radat astana hi kavita gaychi...kharach khup lucky astat te lok jyana aai vadilanche prem milte
माझी फार आवडती कविता. खूप सुंदर लिहीलेली आहे. धन्यवाद तू ऐकवलीस. अशी च आणखी एक कविता आहे.ती जरूर ऐकवा. कविता आहे " बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून. पुन्हा एकदा धन्यवाद
खूपच सुंदर कविता, ही लहानपणी आम्हांला पाठ्यपुस्तकात होती. तेव्हा त्या वयात तिचा अर्थ तेवढा कळला नव्हता, पण आज जेव्हा पुन्हा ही कविता तुझ्या तोंडून ऐकली तेव्हा डोळ्यात पाणी आलं.
खूप छान. माझी आई 4थी पास होती पण पोथ्या पुराणासोबत तिला कादंबरी वाचनाचा छंद होता आणि तिने मला ही त्याचे वेड लावले. लहानपणी ती आम्हाला म्हणून दाखवायची. आज तुम्ही मला त्या काळात नेले.
खूप सुंदर सादरीकरण. आम्ही ही शिकलो, अनु भवली, आणि अध्यापक नात्याने सेवेत विद्यार्थ्यांना सुंदर अप्रतिम दर्शन घडवले. खूप सुंदर भावविश्व निर्मिती स्पृहा. सुरेख... सुंदर गायन, आणि अर्थपूर्ण...best!!!
अप्रतिम स्पृहा.. छान म्हटलीस कविता... अंगावर काटा आला तसेच गहीवरून आले. माझे बालपण आठवले.. शाळेतील आमच्या पाठक बाई आठवल्या ... अगदी जशाच्या तश्या डोळ्यासमोर आल्या जेव्हा त्या आम्हाला ही कविता शिकवत होत्या....(जवळ जवळ २७ वर्षांपूर्वी)
ही कविता ऐकून डोळे ओले न होणारा बाबा सापडणार नाही. कविता अगदी खोल अंत:करणापर्यंत जाते. स्पृहाचे सादरीकरणही तेवढेच जोरकस.
अप्रतिम सादरीकरण... कधीही कितीही वेळा ऐकली ,वाचली तरी डोळे घळा घळा वाहू लागतात. आणि आपल्या वडिलांनी सुद्धा त्या वेळच्या त्यांच्या परिस्थिती मध्ये आपले किती लाड केले होते ते आठवून खूप जास्त रडू येते. आता वडील नाहीत त्यांना विसरणं ही शक्य नाही पण ह्या कवितेमुळे अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून गेले. खूप धन्यवाद स्पृहा
अगं स्पृहा ताई ही कविता फारच करुणा स्पद आहे 😢😢 छान सादर केली स
तुझ हे सादरीकरण शाळेतल्या बाकावर घेऊन गेल आणि शेवटी 2 कडवे अगदी जड अंतःकरणाने म्हणणारे सर सुद्धा दिसले आणि ते ही अगदी ह्याच चालीत म्हणून दाखवायचे ही कविता 😇 खूप छान सादरीकरण 👍खूप खूप धन्यवाद
शाळेतलं बालभारतीचं पुस्तक डोळ्यासमोर आलं आणि ज्या चालीत तुम्ही ही कविता सादर केलीत त्याच चालीत आम्ही पण ही कविता म्हणत असू.. शाळेतले सुंदर दिवस आठवले आणि अत्यन्त कळकळीनी, passionately शिकवणारे त्यावेळचे शिक्षक आठवले. त्यांच्या मुळे ही कविता आजही शब्दांसकट, चालीसकट अर्थासकट जशीच्या तशी इतक्या वर्षानंतरही मनात जिवंत राहिली आहे.. ही किमया कवीच्या अद्भुत शब्दांची आहे की समर्पित होऊन शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकांची आहे हे सांगणं कठीण आहे.Thank you स्पृहा.. 😊
Spruha,tuzi aaji shobhen ya vayachi mi aahe.Pan ajoonhi kitihi vela aikali tari ya kavitene dole bharoonch yetat.Etaki vedana ya kavitet aahe.Suhruda Deshapande.Aani tu nehamich kavitela nyay detes.
🙏 that's it
डोळयात पाणी येते
खूप सुंदर सादरीकरण स्पृहा . आठवीत आम्ही ही कविता तोंडपाठ केली होती. बाबांची खूप आठवण आली. मी पुण्यात हॉस्टेलला राहत असताना बाबा खूप आजारी असून सुध्दा १० तासांचा प्रवास करुन मला भेटायला यायचे कारण येण्याजाण्यात माझा वेळ जायला नको म्हणून.
नशिब चाल अगदी आम्हाला शाळेत होती तशीच बोलली आहे त्यामुळे आम्हाला ते शाळेतील दिवस आठवले खुप छान ❤
माझे दादा देखील ही कविता माझ्यासाठी म्हणायचे.ते आठवले आणि माझेही डोळे त्यांच्या आठवणीने पाणावले. स्पृहा खूप खूप छान म्हंटले. धन्यवाद!!
खूपच सुंदर कविता सादर केली मला माझ्या लहानपणी ची आठवण करून दिली स कविता ऐकून मला माझ्या वडिलांनी फार आठवण आली आत्ता ते हयात नाहीत
कविता फार छान आहे👌👌
माझ्या लहानपणी ही कविता शाळेत आम्हाला होती. मी माझ्या मुलींना त्यांच्या लहानपणी म्हणायचे आणि आता नातीलाही . तुझ्यामुळे आमच्या .(आजी-आजोबा) जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खुप छान. धन्यवाद.
शालेय जीवनात समोर आलेल्या अप्रतिम कवितांमधली ही एक. तू सादर करत असताना मन खरंच त्या काळात गेलं. किती सुंदर कविता होत्या तेव्हा. तुझं गाऊन सादरीकरण अप्रतिम. खूप गोड तू आणि कविता .👍👏👏
अतिशय उत्तम,अप्रतिम,माझ्या दादांची मी लाडकी कन्या होते,त्यांची आठवण झाली हि कविता ऐकून,Thx स्पृहा ताई
खूप छान
खूप छान कविता आहे आणि तुमच्या आवाजामुळे एकदम आम्ही भारावून गेलो आहे तुम्हाला मालिकांमध्ये पाहायला खूप आवडेल
स्प्रुहा तुला कशाची उपमा द्यावी कळत नाही तू कशातच कमी नाही .तुझ्या कला धीटपणाचे कौतुक आहे धन्यवाद
मी शाळेत असताना हि कविता आमच्या गुरुजींनी इतक्या सुंदर पद्धतीने शिकवली होती की... अजूनही स्मरणात आहे
कवितेच्या शेवटी डोळे नक्कीच पानावतात.
स्पृहा ,तुम्ही थोडक्यात भावर्थासह अप्रतीम सादर केलीत ही कविता...
या व्हिडिओ सोबत खाली दिलेली संपूर्ण कविताही वाचली आणि हे खूप छान केलं की की संपूर्ण कविता discription box मध्ये दिलीत... 👍🏻👌
स्पृहा,अगदी अप्रतिम सादरीकरण,आणी तूझ्या आवाजाने जिवंत झाली,तुला खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर कविता आहे ही. शाळेत शिक्षक शिकताना अक्षरशः डोळ्यातून घळाघळा पाणी वहायचे.
खूपच छान कविता आहे ही, मला खुप आवडते, Mi पुण्यात असते माझे बाबा गावी असतात , खुप आठवण आली आज बाबांची ते pn माला असच समजाऊन सांगायचे,
माझी मुलगी pn पाच वर्षांची आहे Ani उद्याच तिचा जन्म दिवस आहे , मी ही कविता तिला समजाऊन सांगायचा नक्की प्रयत्न करेन. Ani खरच खूप सुंदर आहे कविता.
ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती. तेंव्हाच माझ्या शिक्षकांनी ती कविता खूप छान समजावून सांगितली होती. शिवाय आमची परिस्थिती अशी होती की गरिबी काय हे कोणी समजावून सांगायची गरज नव्हती. त्यामुळेच आज सुध्धा ही कविता वाचली की डोळे भरून येतात. त्या सर्व आठवणी आज परत आल्या.
धन्यवाद.
आम्हाला आठवीला ही कविता होती.मला चांगलेच आठवते,परब बाईंनी सांगितलेल्या कवितेचा अर्थ ऐकून वर्गातल्या साठ टक्के मुलांच्या डोळ्यातून पाणी आले होते.
किती सुंदर होते त्यावेळचे दिवस. क्षणार्धात शाळेतील बालपण आठवले.😊
मी प्राथमिक शिक्षण घेत असताना आम्हाला चौथीला अभ्यासाला होती ही कविता. तेव्हा पाठ होती, आज काहीच आठवत नाही, स्पृहा उच्चार अप्रतिम वाचन शैली वेगळी ओळख देऊन गेली. फारच आनंद झाला.
खूप भावपूर्ण व छान , जुनी अविस्मरणीय अशी कविता. छान सादर केली.आता अशा सुंदर अर्थपूर्ण कविता शालेय कार्यक्रमातून गायब झाल्यात की केल्या आहेत. त्याचे वैषम्य वाटते
भावी पिढी या ह्या साहित्या पासुन वंचित रहात आहे.
शालेय पाठ्यपुस्तकातुन
स्पृहा जोशी तुम्ही कविता खूप छान सादर केली. आम्हाला 7 वीच्या पाठयपुस्तकात ही कविता अभ्यासाला होती. त्यावेळी आम्हाला आमच्या शिक्षकांनी ही कविता तुम्ही जशी सादर केली त्याच पद्धतीने सादर केली होती. सलाम तुम्हाला!
अप्रतिम , जुना काळ आठवला , हृदय हेलावलं , ह्याच चालित म्णायचो आम्ही ,
एकदा पुढील कविता ऐकवाल ? मनी धीर धरी...
शोक आवरी जननी , भेटेन नऊ महिन्यांनी ( भगत सिहं आईला म्हणत आहे )
ताई, तूम्ही खूप चांगली कविता आपल्या आवाजात सुंदरपणे सादर केली. तशी ती कविता अजरामरच आहे. प्रत्येक्ष वडिलांनी आपल्या कन्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण परिस्थिती मुळे बाप बिचारा हतबल झालेला असतो, पण बापाने आपल्या लाडक्या कन्येला खूपच समजवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्य ते वडील.
Dear Spruha,
This was extremely emotional. I have a daughter who is 47 years old and remembering the tough times of our life's journey together we could relate this poem tremendously. Thank you, lovely narration.
अप्रतिम सादरीकरण स्प्रुहाजी!
ही कविता आम्हांला लहानपणी अभ्यासाला होती.
आजही ती ऐकताना डोळे आणि कंठ अगदी भरून आले.
छान उपक्रम आहे.त्याकरिता
तुमचे कॊतुक व तुम्हांला हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद!
स्पृहा खूपच छान. मी माझ्या मुलीला म्हणून दाखवायचे. आता नातींना म्हणून दाखवते.माझी आवडती कविता आहे.
बालमनात रुजलेली हृदयस्पर्शी आवडीची कविता,माझे गोकाक कर सर यांनी इतकी छान शिकवली होती ,त्यांची आठवण झाली.वडिलांची आठवन तर शब्दात सांगता येत नाही,ते एक शिक्षक,मोठ्या घराण्यात मी लग्न होऊन आले, आपल्या मुलींना गरीबाची म्हणून हिणवलं जाऊ नये असं त्यांना खूप वाटायचं🙏🏻
माझे आजोबा आणि बाबा नेहमी हि कविता आम्हाला म्हणून दाखवायचे, आज दोघेही नाहीत, पण तुझ्यामुळे पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या, सुंदर कविता आणि सादरीकरण ताई
स्पृहा, तुझं कृतार्थ इथलं येणं! तुझे कविता वाचन मनाला स्पर्शून जाते ग... शब्द न शब्द अर्थ उकलून जातो.. अशीच नित्य वाचनातून कविता ऐकवित रहा!... कवी कल्पना साकार करण्याची ताकद तुझ्या आवाजात आहे!
कविता कशी वाटली, काय विचारतेस? अगं दीदी, ही कविता अनेकदा वाचली, ऐकली, पाठही केली शाळेत; पण कळली मात्र आज, तुझ्या तोंडून ऐकल्यावर! खुप छान सादर केलीस कविता…👏🏼👏🏼
खूप सुंदर खूप 40 वर्षांनी पुन्हा पूर्ण ऐकायला मिळाली आणि आश्चर्य म्हणजे काही ओळी अगदी सवयी चे असल्या प्रमाणे स्पृहा सोबत गाता आल्या
हॅलो स्पृहा,कवीने खूपच तळमळीने लिहिलेली कविता तुम्ही तितक्याच तळमळीने गायलीत! जुनी मराठी भाषा,तिची श्रीमती या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशात येत आहे! आपले आभार मानावेत तितके कमीच,धन्यवाद!
ऐकून डोळ्यात पाणी आल दीदी .....खूप छान कविता आहे आणी तुझ सादरीकरण नेहमीच अप्रतिम !....
खूप गोड ❤
तुझ्या मुळे मनातली कवितेविषयीची ओढ टिकून आहे thank you 🎉❤
हि कविता माझ्या खुप जवळची आणि आवडती आहे कारण माझी एक वर्षांची नातं हि कविता आयकत रोज झोपते खुप खुप धन्यवाद
आमच्या लहानपणी पाठ्यपुस्तकात आम्ही शिकलो.तेव्हा चाल आवडली,गाता यायची म्हणून ही कविता आवडायची.मोठे झाल्यावर त्यातील अर्थ कळतो आणि डोळे पाणावतात.माझ्या गोरटीला म्हटले की अख्खा वर्ग माझ्या कडे वळून पाहायचा माझं माहेरचे आडनाव गोरटे.पूर्ण कविता खाली दिल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद स्पृहा ही कविता माझ्या हृदयाच्या अतीशय जवळची आहे आणि ती पण माझ्या अतीशय आवडत्या व्यक्तीकडून रसग्रहणा सहीत ऐकायला मिळाली व्वा क्या बात है
अप्रतिम..गाई पाण्यावर आल्या तुमच्या सादरीकरणामुळे.. वडिलांविषयी च्या अनेक आठवणींनी मनाला साद घातली.
ही कविता तू स्पृहा गाईलीस तितकीच पाठ्यपुस्तकात होतीकारण मी शिकवली आहे ,पाठ होतीच ,मुलीचे भावविश्व बाबा व बाबांचेही मुलगी ,शिकवताना सुध्दा गळा दाटून यायचा.याची चाल हिच आहे ,गुणगणण्याची ,खुप छान.
माझी पण खूप आवडती कविता.माझे बाबा सुद्धा पूर्ण कविता म्हणायचे.आणि त्यांचे डोळे डबडबलेले असायचे.त्या वयात त्याचा अर्थ कळला नाही. मोठं झाल्यावर मात्र कविता म्हणताना मी पण रडले अगदी हमसून हमसून
Same here
जुन्या आठवणींसह माझे वडील मला आठवुन गेलेत. धन्यवाद .
@@Ratnakar1962 .
..हह
हहह.
धन्यवाद स्पुहा।maazhi कन्या कविता खुप आवडीची आहे।अनेक वेळा dolyatun पाणी येते gatana।सदर छान kele न radataana। कमाल तुझी। सादर करणे कविता kevhadhe है kraerv
मातीत ते विखरले अति रम्य पंख।केले वरी uadar padur निष्कलंक।चंचु tashish च उगड़ी।
खुप खुप सुंदर व संवेदनशील कवीता व त्याबरोबरच तुमचे सादरीकरण ही तेवढेच महत्त्वाचे आणी खुप छान भावपूर्ण होते. खुप खुप खुप खुप खुप खुप आवडले खरेतर ही पुर्ण कविताचे सादरीकरण नक्कीच आवडेल ... प्लीज पहा जमते का? तुमचे काव्य वाचनाची आवड खुप भावली व तुमच्यामुळेच माझी पण कवितेत ली रुची वाढायला लागली.. 👌👍❤️
स्पृहा तू कविता फार सुरेख सादर केलीस.कवीचे भाव अतिशय तरलतेने आमच्यापर्यंत पोचवलेस.खूप खूप धन्यवाद.
कवीता ऐकताना डोळ्यातुन पाणी थांबतच नव्हते ताई खुप छान आवाज आहे तुमचा 👌👌
स्पृहा तू वाचलेल्या सर्व कविता मला फार आवडतात. ही कविता ऐकताना मला माझ्या वडिलांची खूपखूप आठवण झाली.आणि बेताची परिस्थिती असल्यावर मुलांनी छोटासा हट्ट केला आणि तो आई वडिलांना पुरवता आला नाही की त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल हे मला आत्ता कळते आहे
त्या बद्दल तुला धन्यवाद.आणि खूप सार्या शुभेच्छा.
हि कविता जेंव्हा जेंव्हा मी ऐकते किंवा वाचते तेंव्हा ती नेहमीच माझ्या डोळ्यात पाणी आणते.. खूपच सुंदर आहे
खूप खूप...खूपच सुंदर कविता ऐकायला मिळाली....शाळेत असताना तोंडपाठ होती ही कविता...पण त्यातला एवढा सुंदर अर्थ तेव्हा कळला नव्हता...आज बरेच वर्षानी ही कविता ऐकली आणि अर्थ कळल्यामुळे असेल आता ही कविता जास्त भावली...
कवितेचं सादरीकरण खूपच उत्कृष्ट आहे...शब्दांनुसार तुमच्या आवाजातील भाव सुध्दा खूप छान आहेत... 👌👌🌹🌹🌹
शाळेत असताना जितकी कविता समजली,उमजली, नाही ती आत्ता मुलीचा बाप असल्यावर उमजली.
या कवितेला काळाची मर्यादाच नाही.अतिशय आशयपूर्ण कविता. तसेच वाचन ही फारच सुंदर.
शाळेत शिकत असताना धडे, कविता म्हणजे फक्त अभ्यास,व परीक्षा हेच डोक्यात असते त्यामुळे अशा सुंदर आशयघन कवितांचा खरा आनंद घेताच येत नाही.
शिक्षकांनी सुध्दा कविता शिकवताना आभ्यासा पलीकडे जाऊन शिकवले पाहिजे असे आता वाटते.❤❤❤❤❤❤
खूपच छान स्पृहा राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ही कविता म्हण
खूप सुंदर कविता आहे ही.
मी शाळेत असताना आमच्या अभ्यासक्रमात होती ही कविता व जशीच्या तशी माझ्या लक्षात होती.
एकदा माझ्या मुलीला आमच्या परिवारातील एका व्यक्तीने विनाकारण मानसिक त्रास दिला. तेंव्हा मी स्वतः शाळेत होते.( शिक्षिका ) मुलगी माझ्याशी बोलत होती, आवाज भरुन आलेला होता त्यावरुनच लक्षात आले कि हिचे डोळे डबडबलेले आहेत आणि माझे ही डोळे भरुन वाहू लागले आणि ही कविता आठवली. काहीही कारण नसताना असा त्रास देणे याचाच अर्थ आमच्या परिस्थिती वरुन आम्हाला कमी लेखणे.
मी सुद्धा या कवितेच्या वाचनाची मागणी केलेली होती.
खूप धन्यवाद!!!
आणि ही कविता तुम्ही अगदी जुन्या पद्धतीने च सादर केलीत, खूप छान वाटली, तुमच्या आवाजात अजूनच छान!!!
thank you @स्पृहा
माझे आजोबा म्हणायचे ही कविता
ते जावून खूप वर्षे झाली पण कविता काल ऐकल्यासारखी वाटली
या झोपडीत माझ्या ऐकायला आवडेल
धन्यवाद
खूपच सुंदर आहे ही कविता. खूप अर्थपूर्ण आणि मनमोहक. डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही.
ही कविता मुळातच खूप छान आहे आणि त्यात तुमचे सादरीकरण इतकं सुंदर आहे की परत परत ऐकावेसे वाटते.
मला *शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट* ही कविता तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल.
मी यशश्री जोशी ( लग्नापूर्वी ) आणि लग्नानंतर आता Vrinda Desai, बेळगावी.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम कविता
अप्रतिम निवेदन.
खूप गोड आवाज.
जुन्या आठवणी आल्या आणि मन भरून आलं. माझी लाडकी नात सुद्धा रडताना पाहून अशाच संवेदना जागृत होतात.आणि कवी बी यांची कविता ओठांवर येते.
माझे पण बाबा ही कविता माझ्या लहानपणी माझी समजूत काढण्यासाठी म्हणत असत.
आज योगायोग असा की आज माझे वडील जाऊन पंधरा दिवस झाले.
त्या आठवणी परत आठवल्या.
शेवटी आपल्या बरोबर ऐवढेच असते.
धन्यवाद.
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही कविता अगदी मन भरून येत आणि भूतकाळात रमल्यासारखे वाटते
सुंदर विश्लेषण!👌ज्या छंदात कविता लिहिली आहे त्याच चालीत सादर केलेली ही कविता मनाला पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. इयत्ता सातवीला (1973-74) आम्हाला ही कविता होती. स्पृहा तुझा हा उपक्रम खरंच स्पृहणीय आहे.👌👍
खूपच सुंदर सादरीकरण.
आमची पण ही कविता शाळेत असताना पूर्ण पाठ होती. तेव्हा गर्भितार्थ करण्याएवढे वय नव्हते.पण जसेजसे मोठे होत गेले, तशी तशी ही कविता अंतर्मनात खोल रुजली.
ह्या कवितेत बाप व लेक एकमेकांत किती गुंतले असतात- याचे फारच भावपूर्ण वर्णन आहे.
बालभारती च्या बहुतेक सगळ्याच सुंदर कविता होत्या , आज 40 वर्षांनी ही संपूर्ण कविता तीही शाळेत म्हणायचो त्या चालीत ऐकताना खूप आनंद झाला.
कविता फार म्हटलीआहे ही कविता साठ वर्षे पूर्वी मला नवीमधे होती
किती आठवणी ताज्या झाल्या बालपणी अगणित वेळा मी बाबासोबत अंगणात ही व पोर खाटेवर मृत्युच्या दारा या कविता म्हटल्या असतील अप्रतिम सादरीकरण अन त्याहीपेक्षा पार्श्वभुमी कथन त्यामुळे आकलन सुलभ होते व आवड वाढते🙏
khupach chan kavita ani tuze sadarikaran pan khup chan👌👌kavita chalit mhantlyamule ani tuzya goad awajane agdi bhavuk zale,👌👌👌
Khupch chan kavita Spruha di...Tu explain pn khup chan kelis...Thank you for poem
उत्तम कविता उत्तम सादरीकरण. आजीचे (अजब) घड्याळ ही कविता आपण सादर करावी.
Khup sunder! Man helavun taknari ani mazya athvanitli ani mala avadnari Kavita vachlis! Khupach Chan vatle,tya junya shaletil ayushhyat ramle! God Bless You !
मी पहिल्यांदा ही कविता ऐकली....खूप सुंदर कविता आहे .....Thank u so much Spruha Tai ❣️
Khup Chan👍😘❣️❣️❣️
स्पृहा माझी पण आवडती कविता आहे. मला तिसरी, चौथीत असताना
स्पृहा आज शाळेची आठवण झाली मला पण ही कविता खूप आवडायची.खुप छान वाटले.
आम्हाला शाळेत होति हि कविता. आणि माझ्या आजोबांची अतिशय आवडती कविता.
कृपया व्याकरणातील चुका असल्यास क्षमस्व 🙏🙏
शाळा वर्ग शिकविणारे शिक्षक आणि रडणार्या आम्ही मैत्रिणी हे सर्व डोळ्या समोरून गेले डोळे भरून आले . खूप खूप सुंदर
अतिशय सुंदर सादर केलीत , स्पृहा ताई तुम्ही ही कविता.आणि मनाला भिडली त्यातील अप्रतिम शब्दगुंफण.
शालेय अभ्यासक्रमात फक्त 4-5कडवी होती पण आज संपूर्ण कविता वाचायला मिळाली खूप खूप धन्यवाद.
स्पृहा तुला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तु सादर केलेली कविता आम्हाला शाळेत असताना अभ्यासाला होती. अतिशय एका गरीब वडिलांना पोरी कडे पाहून सुचलेले शब्दांकित कवीने केले आहेत. त्यांना सप्रेम साष्टांग नमस्कार. आणि तु हे चालु केलेली ही साईट मला मनापासून आवडले. धन्यवाद
Khup chan. Amhala shalet 4th or 5th la hoti hi kavita. Aani ashich aamhi wargat mhanaycho eka sura madhe..❤ Khup sunder kavita
माझी खूप आवडती कविता आहे आणि देव देतो सद्गुणी बालकांना । काय म्हणुनी आम्हास करांत्याना।। या ओळी लहान पणापासून खूप भाऊन गेल्या
खूप कविता . माझ्या लहानपणी वर्गातील सगळ्या मुली हमसून रडल्या होत्या !सुंदर सादरीकरण!
खूप मस्त ,तुमची पहिली कविता एकली तेव्हाच वाटले ही कविता तुम्हाला सांगावी ,आणि आज लगेच आली पण .भारी ,लहानपणी च सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या ,आम्हाला शाळेत होती ,त्यामुळे घरात नेहमी म्हंटले जात होती
Khup chhan ani mazi aavadti kavita.aajavi purn path aahe
मला ही कविता होतो .खूप आवडायची सरांनी कवितेचा अर्थ सांगितला त्यावेळी खूप वाईट वाटले .
पहिल्यांदाच ऐकली आणि खूप छान वाटलं. कधी तरी पूर्ण ऐकायला आवडेल.
मी तुमच्या कविता नेहमी ऐकते.. तुम्ही मला एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकापासून खूप आवडता..मी अजूनही ती मालिका पाहते..
खूप छान कविता.माझी आवडती. माझे वडील ही कविता म्हणायचे. आता मी माझ्या नातीला म्हणून दाखवते.ती कधी रडायला लागली की मी तीला पहिल्या दोन ओळी म्हणून तशी action करून दाखवते.आता ती देखील छान action करून दाखवते आणि खदखदून हसते.खूप धन्यवाद स्पृहा
खुप सुंदर कविता आहे.आणि तुम्ही ती गायली ही छान.शाळेची आठवण झाली आणि कविता शिकवलेल्या सरांची ही आठवण झाली.धन्यवाद स्पृहा .
आदरणीय मॅडम कवितेचे अतिशय प्रभावीपणे वाचन केले, की कवितेच्या वाचनावरून कवितेचा अर्थ समजतो अशी ही कविता भावस्पर्शी हृदयस्पर्शी मनाला भावलेली कविता. पुढील भागात कवितेच्या एकेक ओळीचा भावार्थ समजून सांगणे विनंती. धन्यवाद.
धन्यवाद ! स्पृहाताई ही कविता ऐकून मला माझ्या लहानपणीची व बाबांची खूप आठवण झाली. खूप हृदयस्पर्शी कविता आहे.
Maze baba lahan panich varle mala versh pn navta zala pn aai nehmi mi radat astana hi kavita gaychi...kharach khup lucky astat te lok jyana aai vadilanche prem milte
अंगावर काटा आला, अप्रतिम सादरीकरण एका अप्रतिम कवितेचे
माझी फार आवडती कविता. खूप सुंदर लिहीलेली आहे. धन्यवाद तू ऐकवलीस. अशी च आणखी एक कविता आहे.ती जरूर ऐकवा. कविता आहे " बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून. पुन्हा एकदा धन्यवाद
शालेय जीवनात असतानाची खूप आवडती कविता, मला खूप आवडायची, कविता अजूनही आठवते तोंड पाठ आहे, पण आज तुझ्या कडून ऐकून खूप छान वाटले.
फारच सुंदर व मन हेलावून टाकणारी कविता आहे
खूपच सुंदर कविता, ही लहानपणी आम्हांला पाठ्यपुस्तकात होती. तेव्हा त्या वयात तिचा अर्थ तेवढा कळला नव्हता, पण आज जेव्हा पुन्हा ही कविता तुझ्या तोंडून ऐकली तेव्हा डोळ्यात पाणी आलं.
अप्रतिम कविता, आणि सादरीकरण चाल, उच्चार,(उत्तम)🎉👌👍
मला शाळेत ही कविता होती,आणि मध्यंतरी विडीयो ही आला होता ,खूप दिवसांनी अर्थासहीत ऐकायला मिळाली कानांना छान वाटले
आगळी फारच जीवनात उपयोगी अशी कविता आग्रण गायली आगळ्या
ढगांनी शिवदत्त गवळी सर
खूप छान. माझी आई 4थी पास होती पण पोथ्या पुराणासोबत तिला कादंबरी वाचनाचा छंद होता आणि तिने मला ही त्याचे वेड लावले. लहानपणी ती आम्हाला म्हणून दाखवायची. आज तुम्ही मला त्या काळात नेले.
खूप सुंदर सादरीकरण. आम्ही ही शिकलो, अनु भवली, आणि अध्यापक नात्याने सेवेत विद्यार्थ्यांना सुंदर अप्रतिम दर्शन घडवले. खूप सुंदर भावविश्व निर्मिती स्पृहा. सुरेख... सुंदर गायन, आणि अर्थपूर्ण...best!!!
अप्रतिम स्पृहा.. छान म्हटलीस कविता... अंगावर काटा आला तसेच गहीवरून आले. माझे बालपण आठवले.. शाळेतील आमच्या पाठक बाई आठवल्या ... अगदी जशाच्या तश्या डोळ्यासमोर आल्या जेव्हा त्या आम्हाला ही कविता शिकवत होत्या....(जवळ जवळ २७ वर्षांपूर्वी)
ही कवि ऐकताना मन हुरळून जाते डोळयांत पाणी येते व मुलीची आठवन व बालपण आठवते 🙏🙏
धन्यवाद ही कविता ऐकवलया बदल. लहानपणीचया आठवणी जागया झालाय
अतिशय सुंदर, माझी आई म्हणते ही कविता, किती अर्थ आहे ह्यात, डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही
खूप छान कविता, वाचन पण सुंदर... "आई" कविता ऐकायला आवडेल