पानिपत: मराठ्यांचे सेनापती सदाशिवभाऊंची समाधी २५० वर्षांनी कशी सापडली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2022
  • पानिपत युध्दातील मराठ्यांचे सेनापती सदाशिवभाऊंची समाधी सापडली : २५० वर्षे हे आपल्याला माहितीच नव्हते!
    १४ जानेवारी १७६१!....पानिपतची तिसरी लढाई!....मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे व सर्वाधिक प्राणहानी झालेले महायुद्ध!....जिंकूनही मराठ्यांशी तहाची बोलणी करुन अब्दाली चालता झाला!.... यानंतर पुन्हा खैबरखिंडीतून एकही आक्रमण हिंदुस्थान वर झाले नाही!....म्हणूनच हारुनही मराठ्यांनी जिंकलेला हा महारणसंग्राम!
    पाऊण लाखभर मराठ्यांनी प्राणार्पण केलेल्या या महायुध्दात मराठ्यांचे सेनापती होते सदाशिवराव भाऊ! अनेक मातब्बर सरदार यात वीरगती पावले. पण या राष्ट्रभक्त वीरांची समाधीस्थळे काळाच्या ओघात विस्मरणात गेली. सदाशिवभाऊंची समाधी अस्तित्वात असूनदेखील मराठी लोकांपासून २५० वर्षे अज्ञातच राहिली. ही समाधी कशी प्रकाशात आली आणि छायाचित्रांसह मराठीत प्रसिद्ध झाली त्याची ही‌ हकीकत!
    ही भाऊंची समाधी कुठे आहे? कशा अवस्थेत आहे? ही इथेच का स्थापन झाली? काय आहे स्थानिक माहिती? याला नेमका पुरावा काय आहे?
    कुणाही मराठी व्यक्तीने चित्रित केलेला या समाधीचा पहिला व्हीडीओ कोणता?
    वरच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनेक छायाचित्रांसह, नकाशासह आणि व्हीडिओसह जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पहा आणि तुमच्या परिचित इतिहासप्रेमींना ही पोस्ट शेअरही करा.
    मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
    आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #PanipatWar1761 #SadashivbhauSamadhi #AbdliVsMaratha

Комментарии • 581

  • @govindraoshinde525
    @govindraoshinde525 2 года назад +81

    साहेब, हा video पहायला सुरुवात केल्यापासून डोळ्यातील अश्रूंना मी थांबवू शकलो नाही हो. मी एक सच्चा मराठा आहे.मराठ्यांचा इतिहास म्हणजे माझा जिव की प्राण. मराठ्यांचा इतिहास वाचणं माझा खूप आवडीचा विषय. सदाशिवराव भाऊच्या समाधीचा शोध घ्यायला आपल्याला इतका वेळ का लागला याच सदाशिवराव भाऊंना किती वाईट वाटलं असेल नाही? असो ! योग्य वेळ आल्यावरच
    कोणतीही गोष्ट घडून येते. पण तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय..

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 2 года назад +132

    सदाशिवराव भाऊंची समाधी शोधण्यात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली .आपल्या या कार्याला त्रिवार वंदन.!!

    • @sandhyaakerkar1376
      @sandhyaakerkar1376 Год назад +1

      सर, आपल्या महाराष्ट्र सरकारच्या लक्षात ही गोष्ट आली नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष केले?

    • @PrasadCalifornia
      @PrasadCalifornia 4 месяца назад

      Abhinandan❤

  • @nanasahebpatil128
    @nanasahebpatil128 2 года назад +109

    पानीपत ( विश्वास पाटील ) मी अनेक वेळा वाचले असून सदाशिव भाऊ बाबत माझ्या मनात खंत आणि दुःख आहे की एका शूर योद्धया बाबत महाराष्ट्रातील लोकांमध्ये हवी तेवढी जागृती नाही किंवा माहिती नाही .सर आपण दिलेल्या माहिती मुळे भाऊंच्या समाधी बाबत स्पष्टता झाली

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv Год назад +8

      मी पानिपत पूर्ण वाचू शकलो नाही...
      खूप वेदना होतात

    • @aisakyu7480
      @aisakyu7480 Год назад +7

      Yach karan ahe, Briged

    • @rajendrashinde5500
      @rajendrashinde5500 Год назад +5

      Very very informative and thank you for your sincere efforts

    • @tatya1947
      @tatya1947 Год назад +8

      @@suresh-pt4cv मी ही तीन वेळा शेवट वाचायचा प्रयत्न केला. दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू ही असाच प्रचंड वेदना दायी आहे.. डोळे याची साक्ष देऊ लागले की दुर्दैवाला प्रणाम करून प्रयत्न सोडून देतो.

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 9 месяцев назад +2

      विश्वास पाटील यांची संशोधनाची गुणवत्ता संशयास्पद आहे. त्यांच्यावर साहित्य चोरीचे आरोप आहेत.

  • @kulmayu
    @kulmayu 2 года назад +108

    समस्त मराठी जनांच्या मनातील कायम भळभळणारी जखम... पानिपत! कदाचित त्या वेदनांमुळेच या विषयांवर अभ्यास व शोध मर्यादित स्वरूपात होत आलेला आहे.... आपले खूप धन्यवाद सर या मौल्यवान संशोधनासाठी!

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 Год назад +55

    पानिपताच्या रणावर रणी पडलेलाल्या सदाशिवराव विश्वासरावभाऊंसह अनेक अनामिक वीरांना सादर प्रणाम आपलेामन:पुर्वक आभार !!

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 года назад +31

    मलाही तोच प्रश्न पडलेला.
    "पानिपत" वाचताना भाऊंच्या समाधी बद्दल काहीच कसं लिहल नाही..
    धन्यवाद सर.....🙏

  • @vidyadharbadve2610
    @vidyadharbadve2610 Год назад +12

    धन्यवाद प्रवीण भोसलेजी मी पांच वर्षांपूर्वी कालाआम येथे जाऊन पानिपतच्या तिसऱ्या युध्दात शहीद झालेल्या मराठा वीरांना वंदन करून आलो. त्या वेळेस माहिती असते तर सांधी येथे जाऊन भाऊसाहेबांच्या समाधी वर मस्तक ठेवता आले असते. महाराष्ट्र सरकारने या समाधी स्थळास मदत द्यावी व भाऊसाहेबांचे एक भव्य स्मारक उभारावे. त्याची प्रसिद्धी करावी

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Год назад +33

    सर, great work. सदाशिवराव पेशवे. हरियाणा चे लोक एवढा आदर करतात आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांची नाहक बदनामी केली जाते. दुर्दैव.

    • @Ssgamingoff-r3q
      @Ssgamingoff-r3q Год назад +2

      Mi Maharashtra mdhun ahe ani Mla Abhiman ahe Bhaunvar. Sadashivrao bhau he Ek mahan shoorveer yodhha hote. Fkt akkalshunya lokach tyanna naav thevtat, jyala Kharach Akkal ahe ,jo jatiy dvesh krt Nahi, jyane saglyabajune itihas wachla ahe to Bhaunbaddal kadhich wait nahi bolnar.

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 Год назад +1

      पेशव्यांचा एकच वंशपरंपरागत दोष होता, तो म्हणजे ते

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 11 месяцев назад

      इथे सुद्धा पानिपत वीर मग ते दत्ताजी असतील, सदाशिवरावभाऊ असतील किंवा विश्वासराव असतील, जानकोजी असोत, यशवंतराव पवार असोत सर्व सर्व वीरा बाबत प्रचंड आदर आहे. प्रविण सरांनी एक चांगली माहिती उजेडात आणली. आपले सर्वांचे आता एक कर्तव्य आहे की जेव्हा केव्हा आपण सहली निमित्त उत्तरेत जाऊ तेव्हा आपल्या Tour Manager ला विनंती करून याचा समावेश करावा. जशी कुरुक्षेत्राला भेट देतो तशीच पानिपत आणि संघी या गावाला आयोजन करा. तेव्हाच प्रविण सरांनी केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले असे सिद्ध होईल. आता जबाबदारी आपली. 🙏🙏🙏

    • @jiti5034
      @jiti5034 11 месяцев назад +1

      दुर्दैवाने महाराष्ट्रात जातीचे राजकारण केले गेले कारण फक्त १ चूक ती म्हणजे नथुराम पण त्यामुळे पेशवे/ सावरकर यांनी केलेले देशासाठीचे काम सतत विसरले जाते

    • @sukantg7846
      @sukantg7846 4 месяца назад +1

      सदाशिवराव भाऊंच्या बद्दल काहीचं बदनामीपर काहीचं वाचनात नाही

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 2 года назад +43

    आपण समाधी शोधण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Год назад +27

    मरणाला भिवूनी जे जगती, ते हजार वेळा मरती,
    तुझीया रक्ताने भाऊ हि पावन झाली धरती,
    तुझिया पराजयाने लिहिली विजयाची गाथा,
    कुर्बानी देशासाठी मरण लवविथे माथा..

  • @parage5040
    @parage5040 Год назад +12

    महान सेनापती पेशवे सदाशिव राव भाऊ आणि समस्त महापराक्रमी मराठा वीरांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण आदरांजली...

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 Год назад +10

    माझ्या वडिलांनी पानिपतला भेट दिली तेंव्हा काला आम खरोखरच उजाड होत दोन दिवस राहून परतले त्यादरम्यान महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून खूप अगत्य केलं तेथे जवळपास सर्व घरी भाऊ महाराज ( भाऊसाहेब) ह्यांची मूर्ती नाहीतर फोटो ची पूजा होत असे ४० -४५ वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 Год назад +13

    सर , तुमच्याबद्दल विशेष आदर वाटायची दोन मुख्य कारणे एकतर तुम्ही सत्याशी बेइमानी करत नाही दुसरे म्हणजे तुम्हाला जातीची बंधने जाचत नाहीत भट पेशव्यांबद्दलसुद्धा खरेच लिहिले आहे

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 2 года назад +13

    समाधी जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. ही समाधी प्रेरणादायी आहे.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +39

    वंदन करीतो भाऊसाहेब यांना... डोळ्यात पाणी आले,मन दाटुन आले....लाख लाख सलाम

  • @profanandrdeshpande1175
    @profanandrdeshpande1175 Год назад +9

    आपले त्रिवार अभिनंदन. पानिपत चा पराभव हा अपघात होता पण त्याचा परिणाम हा मराठ्यांचा विजय होता.त्याने मराठ्याचा प्रभाव वाढला .आज ही अफगाणिस्तानात तालिबान्यांची राजवट असताना पण मराठ्यांचा , आदराने ,लढवय्या असा उल्लेख होतो...

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 2 года назад +13

    प्रविणराजे मी आपला fan आहे आपले मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक 10 वर्षापूर्वी मी हडपसर बांटर स्कूलमध्ये भरलेले प्रदर्शनात आपली गाठ घेतली होती आपला हा उपक्रम खूप चांगला आहे

  • @anilkulkarni8097
    @anilkulkarni8097 2 года назад +11

    श्री भोसले सर आपण कष्टपूर्वक सादर करत असलेला मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास अंगावर शहारे आणणारा असाच आहे .आपण शिववरायांचे पूर्वजन्मीचे देणे देत आहात असेच वाटते .आपल्या या कार्यासाठी आई भवानी मातेचे अगणित आशीर्वाद सदैव सोबत राहोत ही आई जगदंबेचरणी प्रार्थना 🙏🚩🙏

  • @ommodak
    @ommodak Год назад +4

    आज २०२२नोव्हेंबर मध्ये हे सर्व प्रथमच वाचले माहिती वाचून धन्य धन्य झाल्या सारखे वाटते.त्या मराठी वीराला शतशः प्रणाम
    पण आपले सरकार या बाबतीत काहीच करत नाही v ek प्रकारचे मुद्दाम दुर्लक्ष करत असते.आपल्या पराक्रमाच्या आठवणी पण राजकीय गैरसोयी च्याच वाटतात......बघू पण जनतेनी काही केले तर जरूर जमेल तेवढी आर्थिक मदत करू

  • @navnathumagar8493
    @navnathumagar8493 2 года назад +37

    सर, आपल्या कार्याला तोड नाही....
    आपल्यामुळे आम्हाला ही दुर्मिळ माहिती मिळाली
    आपले खूप खूप धन्यवाद 🙏

    • @sharmilajathar4754
      @sharmilajathar4754 Год назад +2

      सदाशिव भाऊंना सादर प्रणाम!

  • @navneet8360
    @navneet8360 Год назад +16

    मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. तुमच्या अथक परिश्रमांना अनेक नमस्कार
    🙏राजन सुळे

  • @ravindragodbole7
    @ravindragodbole7 3 месяца назад +2

    आपण सदाशिव राव भाऊ पेशवे यांचे समाधी बाबत मुद्दाम शोध घेऊन आपला वेळ व पैसा खर्च करून तमाम मराठी जनांना एक बहुमूल्य ठेव च दिली आहे.आपले शतशः आभार.आपले हातून असेच दैवी कार्य घडत राहो हीच सदिच्छा.🎉

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Год назад +5

    मी अनेक वेळा पानीपत येथील शौर्यभुमीला वंदन केले आहे पण आश्र्चर्य म्हणजे तेथेही कोणी सदाशिव रावभाऊंसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही.
    आता परत जाईन तेव्हा ह्या समाधीला नक्की भेट देणार.

  • @aditiarjunwadkar3623
    @aditiarjunwadkar3623 2 года назад +12

    जातीयवादी राजकारणात पेशव्यांना ,तसेच त्यांनी गाजवलेला पराक्रम हेतुपुरस्सर बुद्धीने दुर्लक्षीत ठेवला आहे. तुम्ही हे फार मोलाचे कार्य केले आहे. छान माहिती आहे. पानिपतच्या सर्वच शूर विरांना कोटी कोटी प्रणाम.

    • @kishoriindurkar9930
      @kishoriindurkar9930 2 года назад

      जातीयवादी राजकारण कोणी केले हे सर्व जगाला माहीत आहेत. ९९% ईतिहास कोणी लिहीला याला पुराव्यांची गरज नाही. " दादोजी कोंडदेव ", हे काल्पनिक वक्तीमत्व तयार करून छत्रपती शिवाजीमहाराज ची पहीली गुरू जीजा माता आणि
      जगत गूरू संत तुकाराम याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला आहेत हे खरे ईतिहासकार सांगतीलच. मराठ्यांच्याच मदतीने बाजीराव पेशवानी तलवार गाजवली हे ईतिहास सांगतोच की. इतर पेशव्यानी काय दिवे लावलेत हे तुम्हांला सुधा माहीत आहे. खोटा ईतिहास तुम्ही निर्माण करू शकता.

    • @deepakpawar1504
      @deepakpawar1504 2 года назад +4

      मला हे पटत नाही हा मुद्दा खूप वाद निर्माण करणारा आहे पानिपत उद्धात मराठे हा शब्द
      महाराष्ट्रात राहणारे असा असायला हवा कारण आपल्या सेनेत सर्व जाती धर्माचे लोकं शिवाजी महाराजांच्या काळा पासून आहेत शिवाय वेगेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या जाती खरंतर बलुतेदार असत हे लक्षात घ्या 😌🙏

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Год назад

      @@deepakpawar1504 बरोबर आहे.

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 Год назад

      @@deepakpawar1504 हिंदू मराठे होते

  • @rajivgayakwad6996
    @rajivgayakwad6996 Год назад +9

    प्रवीण भाऊ भोसले आपले मनापासून खूप खूप खूप आभार.
    सदाशिव राव भाऊ यांना मानाचा मुजरा.....

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 Год назад +7

    सदाशिवराव भाउंबद्दल ही माहिती पहिल्यांदाच ऐकली.. धन्यवाद सर खूप मेहनतीने माहिती मिळविली तुम्ही

  • @prakashphatak6962
    @prakashphatak6962 Год назад +6

    मराठयांच्या गौरवशाली इतिहासाची ही गाथा तुमच्या प्रयतना मुळे सगळ्यांसमोर आली . तुम्हाला शतकोटी धन्यवाद.

  • @subhashgokhale5182
    @subhashgokhale5182 5 месяцев назад +2

    आदरणीय प्रविण भोसले यांना त्रिवार मुजरा. आपले बरेच विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीची विस्तृत माहिती असलेले पाहिले. आपलं अभ्यास पाहून आनंद झाला. नवीन पिढीला आपला इतिहास कळणे आवश्यक आहे. हा समाज आपला ऋणी राहिल.

  • @meenagokhale6211
    @meenagokhale6211 Год назад +7

    आपण कुठलाही एकांगी विचार न करता पूर्णपणे तौलनीक विचारने सर्व माहीती आम्हाला पुरवता त्याबद्दल आम्ही आपले खुप खुप धन्यवाद..

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +21

    महाराष्ट्र आता जातियवादी झाला आहे. ठराविक लोकांनी पेशवे ना दुर्लक्षित केले.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Год назад +7

    👌👌👌👌👌 आपण घेतलेल्या कष्टांचे, अविरतपणे केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👏👏👏👏👏

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Год назад +7

    एवढी परंपरा असूनही आजतागायत ही माहिती गुलदस्तात का राहिली? उत्तरेकडील मराठा संस्थानिकांच्या नजरेत कशी काय नाही आली? असो. भोसले साहेब, आपले प्रयत्न स्तुत्य आहे, धन्यवाद!

  • @gautampansare2169
    @gautampansare2169 Год назад +5

    भोसले साहेब धन्य आहे तुमची. पानिपत आणि भाऊंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण एखादी सहल अवश्य आयोजित करावी.
    सदर माहिती 'पेशवे घराण्याचा इतिहास' हे पुस्तक लिहिणाऱ्या श्री प्रमोद ओक यांच्या पर्यंत पोहोचवावी ही विनंती🙏

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 года назад +15

    अत्यंत महत्वाचे संशोधन सरजी...

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande6351 2 года назад +7

    परकीय आक्रमणे रोखण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे आपले मराठे दिग्विजयी होतें , भाउच्या पराक्रमाला तोड नाहि आपण त्यांच्याबद्दल खुप महत्वाची माहिती दिली ती आजच्या राष्ट्रप्रेमी तरुणासाठी खुप महत्वाची आहे .

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 Год назад +9

    आपल्या सदशिराव भाऊ यांच्या समाधी शोध कार्या बद्दल त्रिवार वन्दन मानाचा मुजरा जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VG9academy
    @VG9academy Год назад +5

    सदाशिव भाऊ सारख्या हजारो वीरांनी मराठेशाही साठी आपल्या जीवाचे बलिदान दिले, शतशः अभिवादन

  • @byateen1
    @byateen1 2 года назад +6

    तुमच्या ध्यासाला आणि प्रयत्नांना तोड नाही. तुमचे पुस्तक जरूर वाचेन

  • @sunilzade9156
    @sunilzade9156 2 года назад +7

    प्रवीण. सर. आपले. मनापासून. धन्यवाद उपेक्षित. राहिलेली. समाधी. उजेडात. आणली

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Год назад +3

    प्रथम मी आपणास धन्यवाद देऊ इच्छीतो कारण ईतकी दुर्मिळ माहीती आपण या मराठी मातृभूमी ला दिली आहे तेही जवळ जवळ २५० वर्षानंतर या समाधी स्थळा चा शोध घेणे हे अतिशय कठीण काम आपण केले हे काम काही सोपे नसते म्हणून सांगण्याचे तात्पयॆ एवढे आहे की आपण केलेल्या कार्याला सलाम व आपले मराठे यांनी संपूर्ण भारतभर कुठे कुठे कार्य केले आहे याचा शोध आपल्या सारख्या ईतिहास कारांनी केले आहे👉🙏😌 ।।जय महाराष्ट्र ।।जय हिंद।।

  • @gajananmohade
    @gajananmohade 4 месяца назад +2

    अतिशय छान माहिती सर.... श्रीमंत भाऊसाहेब पेशवा सबंधी दिलेली माहिती खूपच छान आहे. भाऊसाहेब पेशवा एक पराक्रमी योद्धा होते.

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 Год назад +6

    👍👍 अतिशय सुंदर माहिती शूर वीर भाऊंना मानाचा मुजरा

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 Год назад +6

    सदाशिवराव भोसले हे पानीपत युद्धाचे पेशव्यांचे सेनापती त्यांची समाधी पानीपत नजीक सांघी येथे २५० हून अधीक वर्षे सुरक्षीत आणी तिची देखबाल करणारे महंत असुनही, महाराष्ट्राला त्याची माहिती ह्या विडियो द्वारे करुन दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.🙏

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 11 месяцев назад +2

    The Great Maratha, एक मराठा लाख मराठा साम्राज्य महान कार्य आपण केले आहे

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 2 года назад +40

    Sir,really good work you are doing.every one who is proud to be marathi should visit this place.
    Sadashiv rao Bhau is marathi warrior who went thousand of miles to protect our matathi empire.

    • @sharadchandradhore1959
      @sharadchandradhore1959 Год назад +1

      Mr pravinji
      I always look yr informative and comprehensive videos. It's nice karya that u r doing.i can see yr hardship and result oriented efforts.l pray to the god to offer u long and healthy life.i do not have marathi version that is why I choose english.but my soul is maratha and maharashtradharma.i am proud to have yr interaction whenever possible.till that hars up to u.
      Warm regards.

    • @sharadchandradhore1959
      @sharadchandradhore1959 Год назад +1

      Pls read HATS UP to u

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 2 года назад +8

    आपले लेख वाचले होते. अलीकडेच एकदा त्या जत्रेची बातमीही T.V. वर पाहिली होती. आपण केलेल्या कार्यास वंदन।

  • @vishnudaspute8413
    @vishnudaspute8413 2 года назад +6

    अतिशय दुर्मिळ माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @vishramacharya159
    @vishramacharya159 Год назад +5

    खूपच सुरेख माहिती. मराठ्यांचा इतिहास दुर्देवाने कथा कादंबऱ्या आणि अलीकडे वादात अडकला आहे त्यामुळे सत्य इतिहास झाकला जातो व गैरसमज पसरवले जातात. सत्य माहीती बद्दल धन्यवाद

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 Год назад +3

    श्री प्रवीण भोसले आपण फारच चांगले काम केले आहे करत आहात .आपल्याला भेटण्याचा योग आला तर चांगले .बघू सांगलीत आल्यास मी प्रयत्न करीनच.आपल्या सुरू असलेल्या कामात यश मिळो ही शुभेच्छा

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 Месяц назад +1

    खूप कष्ट घेऊन तुह्मी सर अहमला अगदी पुराव्यानिशी आणी तंतोतंत माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद !🙏🙏

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 2 года назад +8

    धन्यवाद ! आपण फार मोठे काम केले आहे

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 2 года назад +7

    खुप छान माहिती..अजूनही आपली मराठी माध्यमे या बाबतीत उदासीन आहेत.

  • @dr.ashajoshi777
    @dr.ashajoshi777 2 года назад +40

    Feel proud to see this video & information. Very impressed with your efforts to bring this for marathi people who love bravery of marathas. Thank you.

    • @jyotikulkarni8230
      @jyotikulkarni8230 Год назад +1

      आपण एक अमूल्य कार्य केले आहे. मराठी ईतिहास आपलं स दैव रुनी राहील. आपणास लाख लाख salam

  • @mangalrajjewellers6149
    @mangalrajjewellers6149 2 года назад +9

    आपण खुप महत्वाची माहिती दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @gajananranade2860
    @gajananranade2860 Год назад +5

    सर आपले जितके आभार मानावेत तितके थोडेच आहेत 🙏
    आपण ह्या व्हिडिओ द्वारे, आपण ध्येय निष्ठेने घेतलेला शोध आणि सांगितलेली महत्वपूर्ण माहिती, आपल्या मुळे आम्हाला समजली.
    आपल्याला खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Месяц назад +1

    सर आपले ऐतिहासिक कार्य खूप मोठे आहे. आपले खूप खूप अभिनंदन.

  • @rajendrasudhakarvaishampay2980
    @rajendrasudhakarvaishampay2980 Год назад +4

    प्रवीण दादा, आपण अत्यंत मोलाचे काम केले आहे, आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन

  • @maheshjangam5217
    @maheshjangam5217 2 года назад +8

    सर ,अतिशय महत्वपूर्ण आणि अमूल्य माहिती आपल्याकडून मिळत असते .

  • @sanjayakolkar3633
    @sanjayakolkar3633 2 года назад +8

    प्रवीण सर खुप खूप कौतुक नि अभिनंदन ,

  • @udaykuptekar9394
    @udaykuptekar9394 Год назад +5

    प्रवीणजी आपले कार्य महान आहे.

  • @sudhirkanvinde1021
    @sudhirkanvinde1021 2 года назад +3

    अतिशय सुरेख माहिती जी आम्हाला शेकडो वर्ष माहित नव्हती. श्री प्रवीण भोसले यांचे खूप खूप आभार.

  • @ashokpatil4176
    @ashokpatil4176 Год назад +5

    धन्यवाद सर. आम्हाला आजपर्यंत नसलेली माहिती तुमच्या मार्फत मिळाली.

  • @sandeepbhogte7811
    @sandeepbhogte7811 Месяц назад +1

    प्रवीण भोसले साहेब, आपणास शतशः नमन🙏. फार मोलाचे कार्य केलेत आपण,तोड नाही या कार्याला. १९६१ ला गाडगीळांनीच ही माहिती का उघड केली नाही? हे एक कोडेच आहे.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Год назад +3

    मराठीतील मुद्रित माध्यमांचा खप वाढला, पण तुम्हीच अज्ञातवासात राहीलात असे वाटते प्रविण जी! अशीच समाधी ज्ञानेशांची आहे.....तुमची मुद्रित पुस्तके पण मी वाचणार आहे........धन्यवाद!

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 Год назад +6

    मराठ्यांच्या पराक्रमी गाथेचे अज्ञात पान उलगडून दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  • @aathvanitlaamol113
    @aathvanitlaamol113 2 года назад +7

    अप्रतिम... डोळयात अश्रू आले... 🚩

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 Год назад +23

    Shriyut Bhosle Saheb
    Namaskar
    I have been following your channel for some time. I am very highly impressed by the way you tell the histry of Great Marathas.. But I must also admit that you have vigorously studied our history. Your episod on Sadashiv bhau is example of it. If I ever happens to visit sangli, I will be very happy to take your DARSHAN. My all the very best wishes for your endeavour.
    Regards
    Anant kulkarni

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 4 месяца назад +2

    सर आपले ध्येयव विचार शुध आहेत आपण सेनापतीं ना न्याय दिला गौरव केला

  • @kansepatil
    @kansepatil Год назад +4

    मनापासून धन्यवाद प्रवीण भाऊ 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🌻

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 года назад +9

    भोसले सर , खूप महत्त्वाची माहिती .
    🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @samadhanmore8623
    @samadhanmore8623 17 дней назад +1

    पानिपत मध्ये शाहिद झालेल्या सर्व महा विराना माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 2 года назад +27

    Salute to you for bringing to light the samadhi sthala of the hero of the battle of Panipat.
    KH Waze

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Год назад +5

    खूप छान,भावले.आपली आस्था,
    विवेचन करण्याची शैली आवडली.
    मराठा योद्ध्याची माहिती भावली.
    धुळ्याजवल सोनगीर येथे एका
    महाराजांची समाधी आहे ती
    तात्या टोपे यांची आहे असे
    ऐकिवात आहे.कृपया या बाबत
    माहिती असल्यास व्हिडिओ
    करावा.

  • @200sscnjaishivajipandurang6
    @200sscnjaishivajipandurang6 Год назад +6

    अभिमान वाटतो शोर्याचा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sandeepdalvi3688
    @sandeepdalvi3688 2 года назад +7

    Bhosale Sir, Aaapan khup abhimanaspad karya karst aahat. Tumachya karyas khup khup shubechha

  • @shrikantkarambelkar712
    @shrikantkarambelkar712 2 года назад +8

    खूप खूप धन्यवाद....!!! ¡!👍👍👍😊👍👍👍👍👍👍👍👍

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 6 дней назад

    खूप महत्वाची माहिती आहे. आपल्या फडतूस राजकारण्यांना याच काहीही देणं घेणं नाही. याची लाज वाटते

  • @ramdeepdake920
    @ramdeepdake920 9 месяцев назад +1

    खरोखर, आपल्या कष्टमय प्रयत्नांमुळे आम्हाला सदाशिव भाऊंच्या समाधीचे दर्शन घडले.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Год назад +3

    फारच सुंदर माहिती खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविला धन्यवाद

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 Год назад +2

    Dhanyawad Bhosale saheb, V.Patil yanchi kadambari vachalynantar mee Panipat la jayche tharavale ,tyanusar Panipat trip keli. Shahara baher asalele Smrutisthal konala mahit navhate.,sudaiwane sapadale.,natamastak zalo,chhan vatale. Tevha ya mathavishayee kalale asate tar gelo asato.Tumchya chikatiche vishesh kautuk.dhanyawad.

  • @dileepabhyankar5898
    @dileepabhyankar5898 2 года назад +2

    Atishay chhan mahiti. Khoop khoop dhanyawad. Vishwasrao Peshvyanvar suddha mahiti dyavi hee vinanti.

  • @vijaynavale8971
    @vijaynavale8971 Год назад +1

    आपण केलेल्या कार्यास त्रिवार नमन,माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारने भाऊंचा मोठा पुतळा उभारावा .

  • @pralhadavalaskar9008
    @pralhadavalaskar9008 Год назад +3

    आपण खूप मोठं काम केलं आहे. आपले मनोमन अभिनंदन. अनेक वर्षे झाकला गेलेल्या एक रहस्यमय आणि अज्ञात ईतिहासावर आपण प्रकाश टाकला आहे.

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 2 года назад +4

    *जय शिवराय* 🙏🏻🚩⚔️
    माननीय श्री. प्रवीण भोसले साहेब, आपण आपल्या मराठ्यांची धारातीर्थे या कादंबरी व युट्यूब विडिओच्या माध्यमातून फारच सुंदर व अचूक शोध घेऊन इतिहास उजागर करून देत आहात. आपण युट्यूब माध्यमातून देत असलेली ऐतिहासिक माहीती समजून घ्यायला पण सोपे आहे. आपल्या या कार्याला त्रिवार सलाम. आपण हे कार्य निरंतर करून आपला खरा इतिहास समाजासमोर आणून फारच मोलाची कामगिरी करत आहात. 🙏🏻
    हरियाणा राज्यातील कर्नाल येथील छत्रपति शिवाजी महाराज सेवा संघाचे प्रमुख (रोड मराठा) जगबीर तोरणे, दुलाराम दाभाडे हे यंदा बावधन गावातील प्रसिद्ध बगाड यात्रा पहाण्यासाठी आवर्जून आले होते. तेव्हा चर्चेत *काला आम, पेशवे सदाशिवराव भाऊ* यांच्या शौर्याबद्दल बरीच माहिती व संदर्भ त्यांनी सांगितले. तसेच हरियाणात त्यावेळेपासून राहिलेले रोड मराठा यांच्या मते पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठे जिंकलेलेच आहेत असा संदर्भ सुध्दा त्यांनी दिला. तसे पुरावेच उपलब्ध आहेत पानिपत व सभोवताली गावागावात असेही नमूद केले.
    खरतर याबाबतीत सुध्दा सखोल अभ्यास करून हा इतिहास समोर आणणे गरजेचं आहे. यासाठीच श्री. जगबीर तोरणे यांनी हरियाणात त्यांच्या गावी निमंत्रित केले आहे. 🙏🏻

    • @sambhajishinde3159
      @sambhajishinde3159 2 года назад

      खुप छान माहिती आहे धन्यवाद, sambhaji shinde

    • @SantoshRathod-kf6vx
      @SantoshRathod-kf6vx 2 года назад

      Hats off to you for your inventive, laborious, and history making and breakthrough giving creative efforts Rev. Bhosle Sir.

  • @ravijoshi9562
    @ravijoshi9562 Год назад +2

    सर सर्व प्रथम आपल्या कार्यास वंदन. पेशव्यांची मराठा साम्राज्य प्रति निष्ठा, हिंदुस्थानच्या मातीशी बांधिलकीचे मुर्त स्वरूप म्हणजे पानिपत. मराठी मातृभाषीक व्यक्तींनी किमान एकदा पानिपत चा इतिहास जरुर अभ्यासावा.

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 Год назад +3

    खुपच सुंदर माहिती मिळाली.आपल्या कार्याला सलाम. आपण घेत असलेल्या कष्टांना भाऊंचे आशिर्वाद लाभो.सौ.दामोदरे.पुणे.

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Год назад +3

    खूप खूप आभार... अतिशय महत्वाचे आणि अनमोल माहीती आपण जगा समोर आणली... आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे....

  • @snehalsuhas9387
    @snehalsuhas9387 Год назад +1

    सदाशिवराव भाऊ,ही आपल्या इतिहासातील सर्वात दु:खद घटना आणि मराठ्यांची दुखरी नस आहे.भोसले सर,तुमचे खूपच आभार मानते.धन्यवाद.

  • @guttesambhajivishnu4900
    @guttesambhajivishnu4900 Год назад +6

    Thanks for making this video
    But some author like namdevrao jadhav are spreading much negative information on maratha warrior brave sadashiv rao bhau

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад +3

    ।। सदाशिव राव भाऊ हँना विनम्रपणे अभिवादन करत आहे।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @skintalk22
    @skintalk22 Год назад +1

    आपल्याला नम्र अभिवादन 💐
    रोमांचक ऐतिहासिक ठेवा

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 2 года назад +4

    मस्तच जबरदस्त माहिती सांगितली जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 Год назад +2

    सर, आपण फार मोठी व चांगली माहिती देवून पानीपत युद्धात मराठ्यांचा इतिहास समोर आणलेबद्दल धन्यवाद.

  • @user-ux3bj4pb6u
    @user-ux3bj4pb6u 3 месяца назад +1

    भोसले साहेब अत्यंत अभ्यासपूर्ण लेख....खुप खुप धन्यवाद 🙏

  • @shankarjanardanupare1905
    @shankarjanardanupare1905 Год назад +2

    अतिशय उपयोगी आणि संशोधक अशा पद्धतीची ही बातमी आहे ऐकून खूप समाधान वाटलं भोसले साहेब.

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 6 месяцев назад +1

    भोसले साहेब आपण मराठाची धारातीर्थी मधुन मराठ्यांचा जो इतिहास संशोधक करूण सांगतात ते आम्ही आमचे भाग्य समजतो धन्यवाद साहेब

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Год назад +1

    पेशव्यांचा पराक्रम महान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जंजिऱ्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पहिल्या बाजीरावांनी प्रत्यक्षात आणले.

  • @sj-pr2xs
    @sj-pr2xs Год назад +3

    Pls share this video to others. Marathis don't know this. Share this as much as possible. Good job sir

  • @kiransarnaik1583
    @kiransarnaik1583 Год назад +2

    👌फार सुंदर आपले आभार आम्हाला माहिती दिल्या बद्दल

  • @vishwasvidwans3006
    @vishwasvidwans3006 Год назад +1

    अभिमान भाऊंच्या शौर्याचा, अभिमान प्रवीणजींच्या अभ्यासूवृत्तीचा. प्रविणजी खुप खुप धन्यवाद शुभेच्छा आणी सहर्ष नमस्कार.