पानिपत: मराठ्यांचे सेनापती सदाशिवभाऊंची समाधी २५० वर्षांनी कशी सापडली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 611

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 2 года назад +145

    सदाशिवराव भाऊंची समाधी शोधण्यात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली .आपल्या या कार्याला त्रिवार वंदन.!!

    • @sandhyaakerkar1376
      @sandhyaakerkar1376 Год назад +1

      सर, आपल्या महाराष्ट्र सरकारच्या लक्षात ही गोष्ट आली नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष केले?

    • @PrasadCalifornia
      @PrasadCalifornia 7 месяцев назад

      Abhinandan❤

  • @govindraoshinde525
    @govindraoshinde525 2 года назад +87

    साहेब, हा video पहायला सुरुवात केल्यापासून डोळ्यातील अश्रूंना मी थांबवू शकलो नाही हो. मी एक सच्चा मराठा आहे.मराठ्यांचा इतिहास म्हणजे माझा जिव की प्राण. मराठ्यांचा इतिहास वाचणं माझा खूप आवडीचा विषय. सदाशिवराव भाऊच्या समाधीचा शोध घ्यायला आपल्याला इतका वेळ का लागला याच सदाशिवराव भाऊंना किती वाईट वाटलं असेल नाही? असो ! योग्य वेळ आल्यावरच
    कोणतीही गोष्ट घडून येते. पण तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय..

  • @kulmayu
    @kulmayu 2 года назад +114

    समस्त मराठी जनांच्या मनातील कायम भळभळणारी जखम... पानिपत! कदाचित त्या वेदनांमुळेच या विषयांवर अभ्यास व शोध मर्यादित स्वरूपात होत आलेला आहे.... आपले खूप धन्यवाद सर या मौल्यवान संशोधनासाठी!

  • @nanasahebpatil128
    @nanasahebpatil128 2 года назад +121

    पानीपत ( विश्वास पाटील ) मी अनेक वेळा वाचले असून सदाशिव भाऊ बाबत माझ्या मनात खंत आणि दुःख आहे की एका शूर योद्धया बाबत महाराष्ट्रातील लोकांमध्ये हवी तेवढी जागृती नाही किंवा माहिती नाही .सर आपण दिलेल्या माहिती मुळे भाऊंच्या समाधी बाबत स्पष्टता झाली

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 2 года назад +9

      मी पानिपत पूर्ण वाचू शकलो नाही...
      खूप वेदना होतात

    • @aisakyu7480
      @aisakyu7480 2 года назад +7

      Yach karan ahe, Briged

    • @rajendrashinde5500
      @rajendrashinde5500 2 года назад +5

      Very very informative and thank you for your sincere efforts

    • @tatya1947
      @tatya1947 Год назад +8

      @@suresh-pt4cv मी ही तीन वेळा शेवट वाचायचा प्रयत्न केला. दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू ही असाच प्रचंड वेदना दायी आहे.. डोळे याची साक्ष देऊ लागले की दुर्दैवाला प्रणाम करून प्रयत्न सोडून देतो.

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 Год назад +2

      विश्वास पाटील यांची संशोधनाची गुणवत्ता संशयास्पद आहे. त्यांच्यावर साहित्य चोरीचे आरोप आहेत.

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 2 года назад +59

    पानिपताच्या रणावर रणी पडलेलाल्या सदाशिवराव विश्वासरावभाऊंसह अनेक अनामिक वीरांना सादर प्रणाम आपलेामन:पुर्वक आभार !!

  • @vidyadharbadve2610
    @vidyadharbadve2610 2 года назад +15

    धन्यवाद प्रवीण भोसलेजी मी पांच वर्षांपूर्वी कालाआम येथे जाऊन पानिपतच्या तिसऱ्या युध्दात शहीद झालेल्या मराठा वीरांना वंदन करून आलो. त्या वेळेस माहिती असते तर सांधी येथे जाऊन भाऊसाहेबांच्या समाधी वर मस्तक ठेवता आले असते. महाराष्ट्र सरकारने या समाधी स्थळास मदत द्यावी व भाऊसाहेबांचे एक भव्य स्मारक उभारावे. त्याची प्रसिद्धी करावी

  • @kittupop709
    @kittupop709 Месяц назад +4

    आदरणीय श्री भोसले सर,आपण नीर क्षीर न्यायाने करत असलेल्या स्पष्टीकरणामुळे व ऐतिहासिक पुराव्यांमुळे आपण समाजमान्य झाला आहे.आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो आहे.खुप खुप धन्यवाद.❤

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 2 года назад +46

    आपण समाधी शोधण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +40

    वंदन करीतो भाऊसाहेब यांना... डोळ्यात पाणी आले,मन दाटुन आले....लाख लाख सलाम

  • @parage5040
    @parage5040 Год назад +13

    महान सेनापती पेशवे सदाशिव राव भाऊ आणि समस्त महापराक्रमी मराठा वीरांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण आदरांजली...

  • @ommodak
    @ommodak Год назад +4

    आज २०२२नोव्हेंबर मध्ये हे सर्व प्रथमच वाचले माहिती वाचून धन्य धन्य झाल्या सारखे वाटते.त्या मराठी वीराला शतशः प्रणाम
    पण आपले सरकार या बाबतीत काहीच करत नाही v ek प्रकारचे मुद्दाम दुर्लक्ष करत असते.आपल्या पराक्रमाच्या आठवणी पण राजकीय गैरसोयी च्याच वाटतात......बघू पण जनतेनी काही केले तर जरूर जमेल तेवढी आर्थिक मदत करू

  • @arunkulkarni9492
    @arunkulkarni9492 Месяц назад +1

    जय शिवराय......मराठेशाही प्रविण भोसले साहेब.....मी आपले व्हिडिओ व इतिहास विषयक माहिती पाहतो.......आपण प्रस्तुत केलेली माहिती अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक असते.......आपले खुप खुप आभार.......आपल्याकडून आई भवानीच्या कृपेने असेच कार्य अव्याहत पणे घडो ही सदिच्छा.

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 года назад +32

    मलाही तोच प्रश्न पडलेला.
    "पानिपत" वाचताना भाऊंच्या समाधी बद्दल काहीच कसं लिहल नाही..
    धन्यवाद सर.....🙏

  • @navnathumagar8493
    @navnathumagar8493 2 года назад +39

    सर, आपल्या कार्याला तोड नाही....
    आपल्यामुळे आम्हाला ही दुर्मिळ माहिती मिळाली
    आपले खूप खूप धन्यवाद 🙏

    • @sharmilajathar4754
      @sharmilajathar4754 2 года назад +2

      सदाशिव भाऊंना सादर प्रणाम!

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 2 года назад +14

    प्रविणराजे मी आपला fan आहे आपले मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक 10 वर्षापूर्वी मी हडपसर बांटर स्कूलमध्ये भरलेले प्रदर्शनात आपली गाठ घेतली होती आपला हा उपक्रम खूप चांगला आहे

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 2 года назад +14

    समाधी जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. ही समाधी प्रेरणादायी आहे.

  • @ravindragodbole7
    @ravindragodbole7 6 месяцев назад +3

    आपण सदाशिव राव भाऊ पेशवे यांचे समाधी बाबत मुद्दाम शोध घेऊन आपला वेळ व पैसा खर्च करून तमाम मराठी जनांना एक बहुमूल्य ठेव च दिली आहे.आपले शतशः आभार.आपले हातून असेच दैवी कार्य घडत राहो हीच सदिच्छा.🎉

  • @anilkulkarni8097
    @anilkulkarni8097 2 года назад +12

    श्री भोसले सर आपण कष्टपूर्वक सादर करत असलेला मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास अंगावर शहारे आणणारा असाच आहे .आपण शिववरायांचे पूर्वजन्मीचे देणे देत आहात असेच वाटते .आपल्या या कार्यासाठी आई भवानी मातेचे अगणित आशीर्वाद सदैव सोबत राहोत ही आई जगदंबेचरणी प्रार्थना 🙏🚩🙏

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 2 месяца назад +1

    भोसले सर आपण मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊंची समाधी एवढी कष्ट करून शोधल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आपला पद्मभूषण किंवा पद्मविभूषण असा पारितोषिक देऊन सत्कार केला पाहिजे आणि सदाशिवराव भाऊंची समाधी महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक वारसा म्हणून तेथे भाऊंचे स्मारक उभा करायला पाहिजे धन्यवाद 🙏🙏

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 2 года назад +15

    माझ्या वडिलांनी पानिपतला भेट दिली तेंव्हा काला आम खरोखरच उजाड होत दोन दिवस राहून परतले त्यादरम्यान महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून खूप अगत्य केलं तेथे जवळपास सर्व घरी भाऊ महाराज ( भाऊसाहेब) ह्यांची मूर्ती नाहीतर फोटो ची पूजा होत असे ४० -४५ वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल

  • @navneet8360
    @navneet8360 2 года назад +16

    मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. तुमच्या अथक परिश्रमांना अनेक नमस्कार
    🙏राजन सुळे

  • @aditiarjunwadkar3623
    @aditiarjunwadkar3623 2 года назад +13

    जातीयवादी राजकारणात पेशव्यांना ,तसेच त्यांनी गाजवलेला पराक्रम हेतुपुरस्सर बुद्धीने दुर्लक्षीत ठेवला आहे. तुम्ही हे फार मोलाचे कार्य केले आहे. छान माहिती आहे. पानिपतच्या सर्वच शूर विरांना कोटी कोटी प्रणाम.

    • @kishoriindurkar9930
      @kishoriindurkar9930 2 года назад

      जातीयवादी राजकारण कोणी केले हे सर्व जगाला माहीत आहेत. ९९% ईतिहास कोणी लिहीला याला पुराव्यांची गरज नाही. " दादोजी कोंडदेव ", हे काल्पनिक वक्तीमत्व तयार करून छत्रपती शिवाजीमहाराज ची पहीली गुरू जीजा माता आणि
      जगत गूरू संत तुकाराम याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला आहेत हे खरे ईतिहासकार सांगतीलच. मराठ्यांच्याच मदतीने बाजीराव पेशवानी तलवार गाजवली हे ईतिहास सांगतोच की. इतर पेशव्यानी काय दिवे लावलेत हे तुम्हांला सुधा माहीत आहे. खोटा ईतिहास तुम्ही निर्माण करू शकता.

    • @deepakpawar1504
      @deepakpawar1504 2 года назад +4

      मला हे पटत नाही हा मुद्दा खूप वाद निर्माण करणारा आहे पानिपत उद्धात मराठे हा शब्द
      महाराष्ट्रात राहणारे असा असायला हवा कारण आपल्या सेनेत सर्व जाती धर्माचे लोकं शिवाजी महाराजांच्या काळा पासून आहेत शिवाय वेगेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या जाती खरंतर बलुतेदार असत हे लक्षात घ्या 😌🙏

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 года назад

      @@deepakpawar1504 बरोबर आहे.

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 года назад

      @@deepakpawar1504 हिंदू मराठे होते

  • @rajivgayakwad6996
    @rajivgayakwad6996 2 года назад +10

    प्रवीण भाऊ भोसले आपले मनापासून खूप खूप खूप आभार.
    सदाशिव राव भाऊ यांना मानाचा मुजरा.....

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 2 года назад +36

    सर, great work. सदाशिवराव पेशवे. हरियाणा चे लोक एवढा आदर करतात आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांची नाहक बदनामी केली जाते. दुर्दैव.

    • @Ssgamingoff-r3q
      @Ssgamingoff-r3q Год назад +2

      Mi Maharashtra mdhun ahe ani Mla Abhiman ahe Bhaunvar. Sadashivrao bhau he Ek mahan shoorveer yodhha hote. Fkt akkalshunya lokach tyanna naav thevtat, jyala Kharach Akkal ahe ,jo jatiy dvesh krt Nahi, jyane saglyabajune itihas wachla ahe to Bhaunbaddal kadhich wait nahi bolnar.

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 Год назад +1

      पेशव्यांचा एकच वंशपरंपरागत दोष होता, तो म्हणजे ते

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Год назад

      इथे सुद्धा पानिपत वीर मग ते दत्ताजी असतील, सदाशिवरावभाऊ असतील किंवा विश्वासराव असतील, जानकोजी असोत, यशवंतराव पवार असोत सर्व सर्व वीरा बाबत प्रचंड आदर आहे. प्रविण सरांनी एक चांगली माहिती उजेडात आणली. आपले सर्वांचे आता एक कर्तव्य आहे की जेव्हा केव्हा आपण सहली निमित्त उत्तरेत जाऊ तेव्हा आपल्या Tour Manager ला विनंती करून याचा समावेश करावा. जशी कुरुक्षेत्राला भेट देतो तशीच पानिपत आणि संघी या गावाला आयोजन करा. तेव्हाच प्रविण सरांनी केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले असे सिद्ध होईल. आता जबाबदारी आपली. 🙏🙏🙏

    • @jiti5034
      @jiti5034 Год назад +1

      दुर्दैवाने महाराष्ट्रात जातीचे राजकारण केले गेले कारण फक्त १ चूक ती म्हणजे नथुराम पण त्यामुळे पेशवे/ सावरकर यांनी केलेले देशासाठीचे काम सतत विसरले जाते

    • @sukantg7846
      @sukantg7846 8 месяцев назад +1

      सदाशिवराव भाऊंच्या बद्दल काहीचं बदनामीपर काहीचं वाचनात नाही

  • @meenagokhale6211
    @meenagokhale6211 2 года назад +8

    आपण कुठलाही एकांगी विचार न करता पूर्णपणे तौलनीक विचारने सर्व माहीती आम्हाला पुरवता त्याबद्दल आम्ही आपले खुप खुप धन्यवाद..

  • @gajananmohade
    @gajananmohade 7 месяцев назад +2

    अतिशय छान माहिती सर.... श्रीमंत भाऊसाहेब पेशवा सबंधी दिलेली माहिती खूपच छान आहे. भाऊसाहेब पेशवा एक पराक्रमी योद्धा होते.

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 2 года назад +31

    मरणाला भिवूनी जे जगती, ते हजार वेळा मरती,
    तुझीया रक्ताने भाऊ हि पावन झाली धरती,
    तुझिया पराजयाने लिहिली विजयाची गाथा,
    कुर्बानी देशासाठी मरण लवविथे माथा..

  • @gautampansare2169
    @gautampansare2169 2 года назад +6

    भोसले साहेब धन्य आहे तुमची. पानिपत आणि भाऊंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण एखादी सहल अवश्य आयोजित करावी.
    सदर माहिती 'पेशवे घराण्याचा इतिहास' हे पुस्तक लिहिणाऱ्या श्री प्रमोद ओक यांच्या पर्यंत पोहोचवावी ही विनंती🙏

  • @prakashphatak6962
    @prakashphatak6962 Год назад +7

    मराठयांच्या गौरवशाली इतिहासाची ही गाथा तुमच्या प्रयतना मुळे सगळ्यांसमोर आली . तुम्हाला शतकोटी धन्यवाद.

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 2 года назад +7

    सदाशिवराव भाउंबद्दल ही माहिती पहिल्यांदाच ऐकली.. धन्यवाद सर खूप मेहनतीने माहिती मिळविली तुम्ही

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Год назад +3

    प्रथम मी आपणास धन्यवाद देऊ इच्छीतो कारण ईतकी दुर्मिळ माहीती आपण या मराठी मातृभूमी ला दिली आहे तेही जवळ जवळ २५० वर्षानंतर या समाधी स्थळा चा शोध घेणे हे अतिशय कठीण काम आपण केले हे काम काही सोपे नसते म्हणून सांगण्याचे तात्पयॆ एवढे आहे की आपण केलेल्या कार्याला सलाम व आपले मराठे यांनी संपूर्ण भारतभर कुठे कुठे कार्य केले आहे याचा शोध आपल्या सारख्या ईतिहास कारांनी केले आहे👉🙏😌 ।।जय महाराष्ट्र ।।जय हिंद।।

  • @subhashgokhale5182
    @subhashgokhale5182 8 месяцев назад +2

    आदरणीय प्रविण भोसले यांना त्रिवार मुजरा. आपले बरेच विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीची विस्तृत माहिती असलेले पाहिले. आपलं अभ्यास पाहून आनंद झाला. नवीन पिढीला आपला इतिहास कळणे आवश्यक आहे. हा समाज आपला ऋणी राहिल.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 2 года назад +7

    👌👌👌👌👌 आपण घेतलेल्या कष्टांचे, अविरतपणे केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👏👏👏👏👏

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 4 месяца назад +2

    सर आपले ऐतिहासिक कार्य खूप मोठे आहे. आपले खूप खूप अभिनंदन.

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande6351 2 года назад +8

    परकीय आक्रमणे रोखण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे आपले मराठे दिग्विजयी होतें , भाउच्या पराक्रमाला तोड नाहि आपण त्यांच्याबद्दल खुप महत्वाची माहिती दिली ती आजच्या राष्ट्रप्रेमी तरुणासाठी खुप महत्वाची आहे .

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 2 года назад +7

    एवढी परंपरा असूनही आजतागायत ही माहिती गुलदस्तात का राहिली? उत्तरेकडील मराठा संस्थानिकांच्या नजरेत कशी काय नाही आली? असो. भोसले साहेब, आपले प्रयत्न स्तुत्य आहे, धन्यवाद!

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 2 года назад +3

    श्री प्रवीण भोसले आपण फारच चांगले काम केले आहे करत आहात .आपल्याला भेटण्याचा योग आला तर चांगले .बघू सांगलीत आल्यास मी प्रयत्न करीनच.आपल्या सुरू असलेल्या कामात यश मिळो ही शुभेच्छा

  • @sunilzade9156
    @sunilzade9156 2 года назад +7

    प्रवीण. सर. आपले. मनापासून. धन्यवाद उपेक्षित. राहिलेली. समाधी. उजेडात. आणली

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 2 года назад +9

    आपल्या सदशिराव भाऊ यांच्या समाधी शोध कार्या बद्दल त्रिवार वन्दन मानाचा मुजरा जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 года назад +15

    अत्यंत महत्वाचे संशोधन सरजी...

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 Год назад +2

    The Great Maratha, एक मराठा लाख मराठा साम्राज्य महान कार्य आपण केले आहे

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 8 месяцев назад +2

    Khup Sunder sr 🙏🏻 khup detail knowledgeble Kharij Etihadi Mahiti Purave Tarkha sakat Deta tumhi👍 Aase Sanshodhak Khupach Kami Bhetatat.. Ishwar Tumchi Sadiva Madat Karo.. 🙏🏻🙏🏻

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Год назад +5

    मी अनेक वेळा पानीपत येथील शौर्यभुमीला वंदन केले आहे पण आश्र्चर्य म्हणजे तेथेही कोणी सदाशिव रावभाऊंसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही.
    आता परत जाईन तेव्हा ह्या समाधीला नक्की भेट देणार.

  • @VG9academy
    @VG9academy Год назад +5

    सदाशिव भाऊ सारख्या हजारो वीरांनी मराठेशाही साठी आपल्या जीवाचे बलिदान दिले, शतशः अभिवादन

  • @gajananranade2860
    @gajananranade2860 2 года назад +5

    सर आपले जितके आभार मानावेत तितके थोडेच आहेत 🙏
    आपण ह्या व्हिडिओ द्वारे, आपण ध्येय निष्ठेने घेतलेला शोध आणि सांगितलेली महत्वपूर्ण माहिती, आपल्या मुळे आम्हाला समजली.
    आपल्याला खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 4 месяца назад +1

    खूप कष्ट घेऊन तुह्मी सर अहमला अगदी पुराव्यानिशी आणी तंतोतंत माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद !🙏🙏

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 2 года назад +9

    सर तुम्ही खरोखर अतिशय महत्वाचे काम हाती घेतले आहे...... आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा..

  • @rajendrasudhakarvaishampay2980
    @rajendrasudhakarvaishampay2980 2 года назад +4

    प्रवीण दादा, आपण अत्यंत मोलाचे काम केले आहे, आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन

  • @vishramacharya159
    @vishramacharya159 2 года назад +5

    खूपच सुरेख माहिती. मराठ्यांचा इतिहास दुर्देवाने कथा कादंबऱ्या आणि अलीकडे वादात अडकला आहे त्यामुळे सत्य इतिहास झाकला जातो व गैरसमज पसरवले जातात. सत्य माहीती बद्दल धन्यवाद

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 Год назад +15

    सर , तुमच्याबद्दल विशेष आदर वाटायची दोन मुख्य कारणे एकतर तुम्ही सत्याशी बेइमानी करत नाही दुसरे म्हणजे तुम्हाला जातीची बंधने जाचत नाहीत भट पेशव्यांबद्दलसुद्धा खरेच लिहिले आहे

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 года назад +3

    मराठीतील मुद्रित माध्यमांचा खप वाढला, पण तुम्हीच अज्ञातवासात राहीलात असे वाटते प्रविण जी! अशीच समाधी ज्ञानेशांची आहे.....तुमची मुद्रित पुस्तके पण मी वाचणार आहे........धन्यवाद!

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 2 года назад +7

    खुप छान माहिती..अजूनही आपली मराठी माध्यमे या बाबतीत उदासीन आहेत.

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 2 года назад +41

    Sir,really good work you are doing.every one who is proud to be marathi should visit this place.
    Sadashiv rao Bhau is marathi warrior who went thousand of miles to protect our matathi empire.

    • @sharadchandradhore1959
      @sharadchandradhore1959 2 года назад +1

      Mr pravinji
      I always look yr informative and comprehensive videos. It's nice karya that u r doing.i can see yr hardship and result oriented efforts.l pray to the god to offer u long and healthy life.i do not have marathi version that is why I choose english.but my soul is maratha and maharashtradharma.i am proud to have yr interaction whenever possible.till that hars up to u.
      Warm regards.

    • @sharadchandradhore1959
      @sharadchandradhore1959 2 года назад +1

      Pls read HATS UP to u

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 10 месяцев назад +1

    भोसले साहेब आपण मराठाची धारातीर्थी मधुन मराठ्यांचा जो इतिहास संशोधक करूण सांगतात ते आम्ही आमचे भाग्य समजतो धन्यवाद साहेब

  • @ramdeepdake920
    @ramdeepdake920 Год назад +1

    खरोखर, आपल्या कष्टमय प्रयत्नांमुळे आम्हाला सदाशिव भाऊंच्या समाधीचे दर्शन घडले.

  • @ravijoshi9562
    @ravijoshi9562 2 года назад +3

    सर सर्व प्रथम आपल्या कार्यास वंदन. पेशव्यांची मराठा साम्राज्य प्रति निष्ठा, हिंदुस्थानच्या मातीशी बांधिलकीचे मुर्त स्वरूप म्हणजे पानिपत. मराठी मातृभाषीक व्यक्तींनी किमान एकदा पानिपत चा इतिहास जरुर अभ्यासावा.

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 2 года назад +6

    👍👍 अतिशय सुंदर माहिती शूर वीर भाऊंना मानाचा मुजरा

  • @byateen1
    @byateen1 2 года назад +6

    तुमच्या ध्यासाला आणि प्रयत्नांना तोड नाही. तुमचे पुस्तक जरूर वाचेन

  • @sudhirkanvinde1021
    @sudhirkanvinde1021 2 года назад +3

    अतिशय सुरेख माहिती जी आम्हाला शेकडो वर्ष माहित नव्हती. श्री प्रवीण भोसले यांचे खूप खूप आभार.

  • @pralhadavalaskar9008
    @pralhadavalaskar9008 2 года назад +3

    आपण खूप मोठं काम केलं आहे. आपले मनोमन अभिनंदन. अनेक वर्षे झाकला गेलेल्या एक रहस्यमय आणि अज्ञात ईतिहासावर आपण प्रकाश टाकला आहे.

  • @vijaynavale8971
    @vijaynavale8971 Год назад +1

    आपण केलेल्या कार्यास त्रिवार नमन,माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारने भाऊंचा मोठा पुतळा उभारावा .

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Год назад +1

    सर ! सादर नमस्कार आपल्या सच्च्या अथक परिश्रमला सलाम मनःपूर्वक नमस्कार .भूतकाळात होऊन गेलेल्या इतिहासकारांच्या संशोधन अभ्यासाशी मत मतांतरे असू शकतात , पण त्यांनी केलेल्या परिश्रमाला दुर्लक्षित करता येणार नाही , हे तुम्ही करीत असलेल्या परिश्रमावरून योगदानावरून समजते आपल्या पारदर्शक निर्भिड न्याय्य मत मांडण्याच्या स्वाभाविक पैलूंचा मला अभिमान आहे. धन्यवाद साहेब 🎉🎉

  • @udaykuptekar9394
    @udaykuptekar9394 2 года назад +5

    प्रवीणजी आपले कार्य महान आहे.

  • @kansepatil
    @kansepatil 2 года назад +4

    मनापासून धन्यवाद प्रवीण भाऊ 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🌻

  • @sanjayakolkar3633
    @sanjayakolkar3633 2 года назад +8

    प्रवीण सर खुप खूप कौतुक नि अभिनंदन ,

  • @snehalsuhas9387
    @snehalsuhas9387 Год назад +1

    सदाशिवराव भाऊ,ही आपल्या इतिहासातील सर्वात दु:खद घटना आणि मराठ्यांची दुखरी नस आहे.भोसले सर,तुमचे खूपच आभार मानते.धन्यवाद.

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 2 года назад +8

    धन्यवाद ! आपण फार मोठे काम केले आहे

  • @vishnudaspute8413
    @vishnudaspute8413 2 года назад +6

    अतिशय दुर्मिळ माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 8 месяцев назад +2

    सर आपले ध्येयव विचार शुध आहेत आपण सेनापतीं ना न्याय दिला गौरव केला

  • @ashokpatil4176
    @ashokpatil4176 2 года назад +5

    धन्यवाद सर. आम्हाला आजपर्यंत नसलेली माहिती तुमच्या मार्फत मिळाली.

  • @avinashphadnis7286
    @avinashphadnis7286 Год назад

    @# प्रवीण भोसले साहेब नमस्कार, मी तुमचे मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलेले होते. तुमचा हा RUclips channel वरुन इतिहास हा निःपक्ष पणे मांडण्याचा प्रयत्न खूपच उत्तम अणि स्वागतार्ह आहे. साध्या सगळीकडेच जातीपातीच्या राजकारणाला पेव फोडून आपलीच पोळी भाजण्याचे गलीछ काम हे राजकारणी लोक करत आहेत. त्यांना हे आपणाकडून एक सणसणीत उत्तरच ठरेल ही आशा करतो. आपल्या स्तुत्य कार्यक्रमाला अणि चॅनल ला हार्दिक शुभेच्छा.. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    अविनाश फडणीस (बहारीन)

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 2 года назад +6

    सदाशिवराव भोसले हे पानीपत युद्धाचे पेशव्यांचे सेनापती त्यांची समाधी पानीपत नजीक सांघी येथे २५० हून अधीक वर्षे सुरक्षीत आणी तिची देखबाल करणारे महंत असुनही, महाराष्ट्राला त्याची माहिती ह्या विडियो द्वारे करुन दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.🙏

  • @maheshjangam5217
    @maheshjangam5217 2 года назад +8

    सर ,अतिशय महत्वपूर्ण आणि अमूल्य माहिती आपल्याकडून मिळत असते .

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Год назад +1

    सर आपण दिलेली माहिती फार मोलाची आहे ही कुठेही बघायला कींवा एकायला मिळाली नव्हती .
    फारच छान माहिती मिळाली 👌👌🙏🙏

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 Год назад +3

    खुपच सुंदर माहिती मिळाली.आपल्या कार्याला सलाम. आपण घेत असलेल्या कष्टांना भाऊंचे आशिर्वाद लाभो.सौ.दामोदरे.पुणे.

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 3 месяца назад

    खूप महत्वाची माहिती आहे. आपल्या फडतूस राजकारण्यांना याच काहीही देणं घेणं नाही. याची लाज वाटते

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 2 года назад +5

    खूप छान,भावले.आपली आस्था,
    विवेचन करण्याची शैली आवडली.
    मराठा योद्ध्याची माहिती भावली.
    धुळ्याजवल सोनगीर येथे एका
    महाराजांची समाधी आहे ती
    तात्या टोपे यांची आहे असे
    ऐकिवात आहे.कृपया या बाबत
    माहिती असल्यास व्हिडिओ
    करावा.

  • @santoshsonunemembar3952
    @santoshsonunemembar3952 8 месяцев назад +1

    सर पानिपतावर आपण माहिती विडिओ बनवा कारण तुम्ही खूप अप्रतिम. आणि सत्य माहिती देता..

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama Год назад +1

    सर आपण मराठी योध्यांची माहिती संकलित करता आहात तुम्हाला खूप धन्यवाद व शुभेच्छा.

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 2 года назад +8

    आपले लेख वाचले होते. अलीकडेच एकदा त्या जत्रेची बातमीही T.V. वर पाहिली होती. आपण केलेल्या कार्यास वंदन।

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 Месяц назад +2

    जय श्रीराम, हर हर महादेव.

  • @sandeepbhogte7811
    @sandeepbhogte7811 5 месяцев назад +1

    प्रवीण भोसले साहेब, आपणास शतशः नमन🙏. फार मोलाचे कार्य केलेत आपण,तोड नाही या कार्याला. १९६१ ला गाडगीळांनीच ही माहिती का उघड केली नाही? हे एक कोडेच आहे.

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 2 года назад +3

    खूप खूप आभार... अतिशय महत्वाचे आणि अनमोल माहीती आपण जगा समोर आणली... आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे....

  • @दीपकमनोरमापरशुरामवार्डे

    भोसले साहेब अत्यंत अभ्यासपूर्ण लेख....खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vishwasvidwans3006
    @vishwasvidwans3006 Год назад +1

    अभिमान भाऊंच्या शौर्याचा, अभिमान प्रवीणजींच्या अभ्यासूवृत्तीचा. प्रविणजी खुप खुप धन्यवाद शुभेच्छा आणी सहर्ष नमस्कार.

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 2 месяца назад

    अतिशय छान माहिती सर, माझ्याकडे आपले मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक 2018 पूर्वी चे असल्याने त्यात ही भाऊंची महिती नाही, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती सर,आपले खूप खूप मनस्वी धन्यवाद.

  • @mangalrajjewellers6149
    @mangalrajjewellers6149 2 года назад +9

    आपण खुप महत्वाची माहिती दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @200sscnjaishivajipandurang6
    @200sscnjaishivajipandurang6 2 года назад +6

    अभिमान वाटतो शोर्याचा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @nileshtayade3223
    @nileshtayade3223 Год назад +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती .... पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद... आपण खरंच लोकजनजागृतीचे खूप मोठे कार्य करीत आहात🙏🙏

  • @aathvanitlaamol113
    @aathvanitlaamol113 2 года назад +7

    अप्रतिम... डोळयात अश्रू आले... 🚩

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 года назад +3

    फारच सुंदर माहिती खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविला धन्यवाद

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Месяц назад +1

    फार महत्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद सर.

  • @vibvitlelal5975
    @vibvitlelal5975 8 месяцев назад +1

    In pursuit of true history! Bravo, Bhosale ji. Your service to Shiva Chhatrapati's Swarajya is laudable!

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 года назад +9

    भोसले सर , खूप महत्त्वाची माहिती .
    🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @shankarjanardanupare1905
    @shankarjanardanupare1905 2 года назад +2

    अतिशय उपयोगी आणि संशोधक अशा पद्धतीची ही बातमी आहे ऐकून खूप समाधान वाटलं भोसले साहेब.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Год назад +2

    एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल व भाऊसाहेबांची समाधी शोधल्याबद्दल आपल्याला लक्ष लक्ष धन्यवाद.

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 года назад +2

    सर, आपण फार मोठी व चांगली माहिती देवून पानीपत युद्धात मराठ्यांचा इतिहास समोर आणलेबद्दल धन्यवाद.

  • @skintalk22
    @skintalk22 Год назад +1

    आपल्याला नम्र अभिवादन 💐
    रोमांचक ऐतिहासिक ठेवा

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +1

    खुप सुंदर माहिती अप्रतिम निरीक्षण अभ्यासू संशोधन,,,मराठा म्हणजे आठरा पगड,,, हे आपल्या संशोधन व विवेचन यावरून स्पष्ट होते,,,,धन्यवाद,,,मराठा म्हणून जगले मराठे म्हणून मेले,त्या सर्वांना तीवर प्रणाम,,,,आजुन ही पानिपत ची जखम भळभळत आहे,,,आजूनही आम्ही विसरलो नाही,,,सर

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 4 месяца назад

    अतिशय सुंदर व सखोल माहीती आपण दिली यासाठी धन्यवाद