जंगल जगलेला खतरनाक माणूस 🌳✨|| भाग -३ || शामराव कोकरे || सयाजी शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • शामराव यांनी आपलं आयुष्य जंगलात काढलं. सोबत तेवढीच खंबीर बायको. जवळपास सगळेच प्राणी समोरासमोर पाहिलेले शामराव माणूस नावाच्या प्राण्यापासून मात्र अजूनही लांबच राहतात.
    #sayajishinde #wildlife #jungle #nature
    ============================================================
    RUclips:-
    / @sayajishinde .
    ============================================================
    Visit Website:-
    sayajishinde.com/
    ============================================================
    My Social Media Accounts:-
    Follow me on-:👇🏻
    Instagram:-
    ...
    Facebook:-
    www.facebook.c...
    Twitter:-
    Sa...
    ===========================================================
    Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
    SAHYADRI DEVRAI.
    Visit Website:-
    www.sahyadride...
    Follow us on:-👇🏻
    Instagram:-
    ...
    Facebook:-
    www.facebook.c...
    ============================================================
    #sayajishinde
    #sayajishindevideo
    #maharashtra
    #sayajishindeinkapilsharmashow
    #sayajishindemimicry
    #sayajishindetreeplantation
    #sayajishindemovies
    #sayajishindevlog
    #sayajishindecomedyscene

Комментарии • 286

  • @sangitakumatkar905
    @sangitakumatkar905 7 месяцев назад +65

    सयाजी सरांना एक विनंती आहे की त्यांनी शामरावांच्या जीवनावर आधारित एक फिल्म करावी आणि शामरावांची भूमिका त्यांनी स्वतः करावी 👌खूप छान सर 🙏

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 7 месяцев назад +2

      Yes possible big cinema with sayajirao shinde saheb and other actor's like nana patekarsaheb

  • @sonaiinfotech4156
    @sonaiinfotech4156 7 месяцев назад +77

    मराठी मातीशी खरी नाळ असलेला सच्चा हिरो..सयाजीराव शिंदे..

  • @prakashkhandekar2801
    @prakashkhandekar2801 7 месяцев назад +49

    कुठेही देखावा नाही पाण्यासारखे निथळ व निर्मळ स्वच्छ माणूस....
    शब्दात भावना व्यक्त करू शकत नाही.....

  • @Sachinkumar-kn9ok
    @Sachinkumar-kn9ok 7 месяцев назад +35

    ❤️🙏मातीशी नाळ जुळलेली आहे धनगर समाज ज्या ची सयाजी सर माझ्या समाज्या ची जंगलात ले जगणे म्हणजे तुम्ही अनुभवला या बद्दल धन्यवाद 🙏❤️❤️

  • @Patriotic212
    @Patriotic212 7 месяцев назад +23

    ही खरी परिस्थिती आहे सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या धनगर समाजाची..या ठिकाणी प्रामुख्याने डांगे धनगर वास्तव्यास आहेत ..त्यांचा व्यवसाय पशुपालन हा आहे ..धनगर समाजाच्या लोकांचा वागण्याचा एक वेगळा swag 😎 दिसून येतो ..

  • @mayursonawane9431
    @mayursonawane9431 Месяц назад +1

    खूपच छान सयाजी सर
    ज्याला कुणी नाही त्याच्या आयुष्यात आनंद पसरवायच काम खूप बहुमोलाच आहे राव

  • @adityaradhe8812
    @adityaradhe8812 7 месяцев назад +28

    सर तुमचे व्हिडिओ बघितले की डोळ्यात पाणी यायचं थांबत नाही. सर तुम्ही खरंच येवढं मोठे अभिनेते आहात. पण मातीतल्या माणसांना तुम्ही नाही विसरलात. तुम्ही आत्ता पर्यंत खूप प्रवास केला. पण परत तुम्ही घरट्याकडे आला आहात. भारी वाटलं सर धन्यवाद हा सुखद आनंद दिल्याबद्दल😊

  • @Shankr.Patil.
    @Shankr.Patil. 7 месяцев назад +30

    महाराष्ट्र भूषण नाही तर पद्मभूषण पुरस्काराचे हक्कदार नक्कीच तूम्ही आहेत, down to Earth 🌎.real Hero ❤❤.

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 6 месяцев назад +15

    इतक्या बुजुर्ग माणसाला सुद्धा त्याच्या भावना जाग्या करून रडवता येऊ शकतं ! हाच खरा ' माणूस ' या संकल्पनेच्या सिद्धतेचा चमत्कार आहे. 🙏 सयाजी शिंदे तुम्ही माणूस म्हणून सिद्धी मिळवली आहे. I am proud of you, love you sir ❤🙏

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 5 месяцев назад +23

    नव्वदीतला माणूस आई वडिलांच्या आठवणीने कासावीस होऊन लहान मुलासारखा रडतो.. आई वडील हे खरंच देव असतात... आला सास गेला सास जीवा तुझं रं तंतर.. जगनं मरनं एका सासाचं अंतर 🙏

    • @kavitapawar5614
      @kavitapawar5614 5 месяцев назад +1

      Sir तूम्ही खूप सुंदर भावना व्यक्त केलीत

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos 5 месяцев назад

      @@kavitapawar5614 हां जे मनात आलं ते लिहिलं पण आई वडील आहेत तोपर्यंत आपण या जगात मालक... आई बाप गेल्यावर फक्त भाडेकरू... कारण ते प्रेम.. ती तळमळ.. ती जाणीव.. तो निस्वार्थी त्याग... फक्त आई बापच करू शकतात... रस्त्यावर झोपणाऱ्या दारूड्या पोराला आई बाप भिक मागून दारूला पैसे देतात आणि संध्याकाळी भाजी भाकरीची सोय देखील करतात..‌ म्हणजे वाईट मधली वाईट परिस्थिती असूनही ते आपल्या लेकाची साथ सोडत नाहीत... पोराच्या वेदना आई बापालाच कळतात.. मातृत्व आणि पितृत्व हे जगात श्रेष्ठ आहे.. ईश्वरी शक्ती आहे ज्या शक्तीने स्वार्थ काढून टाकला या नात्यातून.

  • @Sandy5050-ir7sl
    @Sandy5050-ir7sl 7 месяцев назад +32

    निसर्ग आहे म्हणून आपण आहोत डोळ्यात पाणी आलं 🙏🙏🙏🙏

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c 7 месяцев назад +14

    सह्याद्रीचे खरे मावळे गवळी धनगर

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 5 месяцев назад +8

    माझ्या धनगर समाजाचे हे वास्तव सत्य.🎉

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 7 месяцев назад +13

    एवढा मोठा अभिनेता.............पण कसलाच गर्व, अभिनिवेश नाही....
    ❤❤❤❤❤

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar4876 7 месяцев назад +13

    मनाने श्रीमंत अंतःकरण निर्मळ आई वडिला विषयी प्रेम आदर तुटक्या झोपडीत आनंदी राहून माणुसकी असलेली माणसे सयाजी सर आपण दाखवली या जगात आता घर पक्की झालेत पण मन मात्र कच्ची पडकी झालेत व्हि पाहिला खूप भारी वाटल सर🙏🙏

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm 7 месяцев назад +13

    आजपर्यंत स्वप्नात जंगल जीवन अनुभवलेल...पन खरंच आज सयाजी सर तुमच्यामुळे ह्या शामराव बाबांना आम्ही अनुभवलं...आणी जंगलातील जीवन पण अनुभवायला मिळाले...मनापासुन धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤आणि त्या बाबांना पन ह्या फौजीचा कडकककक सैल्युट🫡🫡🫡🫡🫡

  • @lalitwankhede408
    @lalitwankhede408 Месяц назад +1

    खरज डोळ्यात पाणी आले शामराव बाबांचे निसर्ग प्रेम बगून

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 7 месяцев назад +14

    सयाजीराव, खरच धनगरांच खर जीवन तुम्ही आमच्यासमोर ऊभ करता, तुमच्या कार्यास नतमस्तक.

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 7 месяцев назад +28

    अतिशय आदर्श व्यक्तीमत्व 🙏 सयाजी शिंदे 🙏

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 7 месяцев назад +7

    दादांच्या मांडीवर तुम्ही झोपलात तेव्हा मला स्वर्ग आठवला .खरच शिंदे साहेब धन्य झालो

  • @sushantwalunj9958
    @sushantwalunj9958 7 месяцев назад +7

    मी ही गरिबीत राहिलो पण गरीबीची जाणीव होऊन न देता आनंदाने जगलो अशाच वातावरणात❤ शिंदे साहेब ग्रेट आहात तुम्ही❤

  • @ahilyadeviholkarhistory8977
    @ahilyadeviholkarhistory8977 7 месяцев назад +30

    धनगर समाजाचे वास्तव

  • @vijaymagdum2998
    @vijaymagdum2998 7 месяцев назад +7

    आई बापाच्या आठवणीने मन हळहळ करणे साहजिकच आहे गरीबाच्या घरी नारायण प्रकटतो भौतिक सुखापासून खूपच राहिली शामराव (आजोबा ) शेवटचे क्षण बरेच बोलके होते

  • @sanjaypawar8825
    @sanjaypawar8825 7 месяцев назад +12

    दरी डोंगरात राहिलेली, जगलेली माणसं, हिच खऱ्या अर्थाने जीवन जगली. ज्यांनी निसर्गाशी आपली नाळ जोडून ठेवली आहे ती खरी माणसं ...hats off sayaji Rao..

  • @AniketSawant-gv5oy
    @AniketSawant-gv5oy 7 месяцев назад +6

    नमस्कार साहेब खरच तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहे . कारण ६० वर्षा पूर्वी आमचे कोयना पुनर्वसन झाले.. आणि आम्ही रायगड मध्ये नवीन. " मालदेव " मध्ये स्ताईक झालो .. नविन मालदेव मध्ये आम्हीं येवढे रमलो गंमलो की आम्हाला विसर पडला की आमच्या पूर्वजांनी कसे दिवस काडले असतील याचे जिवंत उधारण मनजे तुम्ही हा केलेला शामराव कोकारे अजोबान सोबत केलेला व्हिडिओ.... आता पर्यंत फक्त आमचे जुने गाव हे आमच्या पूर्वजांनकडून आईकले होते .. पण आज तुमच्या मुळे आम्हाला आमचे गाव बागता सुधा आले ... धन्यवाद सयाजी शिंदे साहेब... अनिकेत सावंत नवीन मालदेव

  • @pandurangkadam3639
    @pandurangkadam3639 7 месяцев назад +8

    जगाव तर सयाजीराव शिंदे सारखं खरच तुमच्या कार्यास मनापासून सलाम आहे 👍👌💐

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 5 месяцев назад +2

    तिन्ही भाग बघितले आणि कमेंट करतेय .... शामराव आजोबा खरचं निसर्ग जगलेले आणि जपलेले व्यक्तिमत्त्व....त्यांच्याशी अश्या मनमोकळ्या रानगप्पा मारत आसपासचा निसर्ग समजून घेण्याची इच्छा आहे......अशी माणसं दुर्मिळच ....खूप छान ❤👌👍🙏

  • @drnileemapatil6350
    @drnileemapatil6350 7 месяцев назад +3

    Sir, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले तर माणसाचाही देव होतो..हे आपण दाखवून दिले आहे🙏🌱🌱 U r pride of nature lovers & role model of today's generation..❤🙏❤

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 7 месяцев назад +6

    सया तुझे असे प्रेम पाहून मला अश्रु मावेनासे झाले रे दादा मानसाने मानसासोबत मानसाप्रमाणे वागावे हिच खरी मानुष की तो हा मानुष सयाजीराव शींदे तुला देव खूप खूप आर्शीवादीत करो हिच माझी ईच्छा धन्यवाद देवां तुझ्या लेकराला साम्भाळ❤❤❤

  • @navanathfarate6133
    @navanathfarate6133 7 месяцев назад +10

    सयाजी सर तुम्ही सर्वांच्या पुढे चांगले विचार घेऊन येता त्या बद्दल तुम्हला खरे च मानावा लागेल परंतु सर्वानी नवीन दिशा घेऊन जगावे या हेतूने आपण त्यास अन्न ,वस्त्र, निवारा या गोष्टी भेटून द्यावे ही विनंती

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 7 месяцев назад +9

    सयाजीराव तुम्ही या आदिवासी समाजाची संस्कृती संस्कार कसे आहेत हे तुम्ही अतिशय जवळून अभ्यास केला आहे त्यामुळे तुम्ही या अंधारात असलेल्या खऱ्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर सिनेमा बनवा.

  • @maralesagar29
    @maralesagar29 7 месяцев назад +7

    23:51 शंभर वर्ष पुरुषा, हजार वर्षे वृक्षा या जंगलात रहाणार बाबांच्या तोंडून वाक्य ऐकूण त्यांच्या ज्ञानाची व त्यांच्या कडे असलेल्या निसर्गाच्या धनाची ही दौलत बघून खरच खूप आनंद वाटला. सयाजी सरांच प्रत्येक आडरानात निसर्गात जगले रमलेल्या माणसांच्यात मिसळून राहणे ,त्याच्याकडून मिळेल ते ज्ञान घेण्याची आपला हा प्रयत्न खूपच आवडला.
    Thank you सयाजी सर आपले अनुभव मुलाखत द्वारे आमच्याशी share करतायत आपण.

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 7 месяцев назад +6

    साहेब तुम्ही एक आदर्श आहात मराठी माणसासाठी राजकारणी नाही तुमच्या सारखे 10 सयाजी शिंदे तयार होतील तर महाराष्ट बदलून जाईल एवढी ताकद आहे तुमच्या त

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 7 месяцев назад +15

    मातीशी नाळ जोडलेली देव मानस...!.

  • @pramodshinde8539
    @pramodshinde8539 5 месяцев назад +2

    खरंच आहे की निसर्ग आहे म्हणून तर आपण/जीवन आहे परंतु हे फक्त आपण आणि आपल्या येणारी प्रत्येक पिढी यांना सांगितलं पाहिजे जय हिंद

  • @birappakhalati1592
    @birappakhalati1592 7 месяцев назад +6

    सयाजी शिंदे साहेब ग्रेट आहात आपण, खूपच छान,एक वेगळी दुनिया दाखविले

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 5 месяцев назад +1

    असे शेतकरी कष्टकरी लोकांचे अनुभव ऐकयला छान वाटते..आणि सयाजी सर तुमची बोली भाषा अप्रतिम,🙏

  • @mk-lw5sr
    @mk-lw5sr 7 месяцев назад +4

    नमस्कार सर आपण कोण काय आहोत हे बाजूला ठेऊन निसर्ग आणि निर्गातील दडलेली माणसं यात जावून आपला आनंद व्यक्त करताना जी आपल्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं प्रकर्षानं जाणवलं... आपण खूपच जमिनीवरील व्यक्ती आहात सर ❤ निसर्गाविषयी असलेली आस्था आपल्या कडे बघून जाणवते.... आपलं काम असच चालु रहाव हीचं ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, 🙏

  • @akshaymore8860
    @akshaymore8860 5 месяцев назад +2

    ऐकत च बसावं आस वाटत होत
    मन भरून आलं 😢😢
    खुप छान सर

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 7 месяцев назад +7

    The great man सयाजी शिंदे सर जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा

  • @CRYPTOMASTER1-b8c
    @CRYPTOMASTER1-b8c 7 месяцев назад +15

    शिंदे साहेब तुम्ही त्यांना सोलर पॅनल आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी घेवून द्या प्लिज 😢 त्यांच्या आयुष्यतील अंधार संपेल ❤

    • @akshaygore7393
      @akshaygore7393 7 месяцев назад +2

      मी दिले होते सोलर पॅनल किट

    • @vilasdupare8685
      @vilasdupare8685 7 месяцев назад

      मी देऊ इच्छित आहे मला यांनची सेवा करण्याची संधी मिळाली तर बरे वाटेल

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 7 месяцев назад +1

    खरा अभिनेता शामराव च 👌🙏🌹

  • @sanjaychavan9829
    @sanjaychavan9829 7 месяцев назад +6

    सयाजी सर तुमच्या कार्याला सलाम...🫡

  • @amoljadhav5548
    @amoljadhav5548 6 месяцев назад

    सयाजी शिंदे साहेब माझं राहिलेले आयुष्य तुम्हाला लाभुदे

  • @user-dr7hv9oy1l
    @user-dr7hv9oy1l 7 месяцев назад +2

    ॲक्टर म्हणून सुद्धा आपण खूप छान काम करता मनुष्य म्हणून सुद्धा आपण सर्व उत्तम आहात

  • @princess8421
    @princess8421 7 месяцев назад +3

    निसर्ग आहे तर आपण आहे बरोबर आहे सयाजी सर

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c 7 месяцев назад +1

    Great धनगर गवळी जय हिरकणी

  • @deepakmalusare1692
    @deepakmalusare1692 7 месяцев назад +5

    शिग्रोबा धनघर् खन्दला घाटातील मन्दिर् आहे

  • @dattaharidhage8241
    @dattaharidhage8241 6 месяцев назад +1

    खरंच भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही 😢❤ love you sir

  • @janardanshelar4721
    @janardanshelar4721 7 месяцев назад +2

    सर तुम्ही तुमचं बालपण जगत आहात. मातीशी नाळ जोडली गेलेली आहे ती कधीच तुटू शकत नाही.ह्या सगळ्या ओव्या एकूण वडिलांची आठवण होते ❤

  • @sandeeppatil2600
    @sandeeppatil2600 7 месяцев назад +1

    बाबांनी एक वाक्य बरोबर बोललात निसर्ग आहे तर आपण आहोत. खूप छान वाटले सर ❤

  • @sandeepchavan8384
    @sandeepchavan8384 5 месяцев назад +1

    सयाजी सर खूप छान। आपल्या मातीशी नाळ असणार व्यक्तीमत्व❤❤

  • @mukunddhavle6496
    @mukunddhavle6496 3 месяца назад

    Great manus Sayaji shinde sir

  • @mayankpawar5370
    @mayankpawar5370 2 месяца назад

    सलाम तुमच्या कामाला

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 7 месяцев назад +6

    51 like majha sir Baba lai bhari hastar khup chan video ahe sir

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 7 месяцев назад +6

    जल, जंगल, जमीन यांच संवर्धन अशाच माणसाने केले.

  • @nileshborate4312
    @nileshborate4312 7 месяцев назад +9

    Shamrao series was awesome... No words to explain. I like your concept of living with these people and understanding the situation, challenges and learning new things from these people. Hands of sayaji sir 🙏

  • @mayurkamble8292
    @mayurkamble8292 4 месяца назад

    आयुष्य किती सुन्दर आहे कस जगायच खरच आज या मानसा मुळे शिकलों खर च देव माणूस❤

  • @gajananpawar798
    @gajananpawar798 7 месяцев назад +6

    No words sir. ❤❤❤❤❤❤❤

  • @PurvaPatil-5152
    @PurvaPatil-5152 4 месяца назад +1

    "आठवण येते आई बापाची "😢
    या वयात आठवण येते तीपण अश्या परिस्थितीत...म्हणजे किती फरक आहे आताच्या पिढी मध्ये आणि त्या पिढीतील माणसांचा विचारांमध्ये.

  • @anitapanchal7433
    @anitapanchal7433 Месяц назад

    khara hero sir tumhi great ahat❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 7 месяцев назад +8

    खरे आरक्षणाचे हकदार हेच लोक आहेत सत्तर वर्षे झाली र. चा ड करुन या लोकांवर अन्याय केला जातोय,यांना वेडं म्हटले गेले हे सुद्धा षडयंत्रच

  • @padmakardavane152
    @padmakardavane152 5 месяцев назад

    सयाजी शिंदे प्रत्येक्ष्यात जरी चित्रपटात खलनायकाची भूमिका करत असेले तर खऱ्या जीवनात ते एक खरे नायक म्हणून आहेत अश्या सरांना साष्टांग दंडवत...❤❤❤

  • @kailassapkal8494
    @kailassapkal8494 5 месяцев назад

    शामराव यांचे बोल अजरामर राहतील,निसर्ग आहे म्हणून आपण आहे,खूपच सुंदर उदाहरण दिले शामराव यांनी जनतेला ,खूपच छान👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolkolekar2636
    @amolkolekar2636 7 месяцев назад +3

    सयाजी शिंदे सर ग्रेट आहे ते all the best ❤❤❤❤🎉

  • @nanemune
    @nanemune 7 месяцев назад +4

    Sayaji sir kharch tumhala bhetu vatat aahe tumcha khup motha fan🙏🥹

  • @anilnagargoje196
    @anilnagargoje196 6 месяцев назад

    या वयातही आईवडिलांची आठवण आली की बाबा रडले,,काय माया आहे,,काय भक्ती आहे देवाची,, आणि शिंदे च निसर्ग प्रेम अलौकिक,,खूप छान सीरिज आहे 👏👏👍👍

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 7 месяцев назад +3

    Great sayaji शिंदे. मीही.माझ्या आजोळी हे अनुभवले आहे odhyala pur आल्यावर रात्रभर kakdi पपई खाऊन 2 दिवस chaprat rahilo आहे. Gaon 5 k. M.होते

  • @sanjayrajage8553
    @sanjayrajage8553 7 месяцев назад

    खरंच बाबांचे प्रत्येक शब्द खरे आहेत माणसापेक्षा जनावरे बरी.. दादा कोंडके चं गाणं आहे माणसा परास मेंढरे बरी... म्हणजे माणसं दरोडा टाकतात फसवतात राजकारणी असतात.. जनावरे माणसाला जगवतात आधार देतात.... एक अनुभव आहे म्हणून.....

  • @Subhashjamdade2
    @Subhashjamdade2 3 месяца назад

    Abhinandan sirji

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 7 месяцев назад +7

    Great sir.... Salute for your humbleness... Thank you

  • @prakashkhandekar9782
    @prakashkhandekar9782 7 месяцев назад +1

    सर हे पाहून तुम्ही एवढे मोठे सेलिब्रिटी आहात वाटत नाही ग्रेट 🙏

  • @user-lb9fj9yz6c
    @user-lb9fj9yz6c 7 месяцев назад +1

    या निसर्गाचा शत्रू माणूस 😢 खूप छान व्हिडिओ ❤

  • @ajitkhatkale3661
    @ajitkhatkale3661 7 месяцев назад

    अप्रतिम…..सयाजी सर आजच्या युग़ातील समाजाला ऐश्वर्याच्या जगण्यापुढं जाऊन खरं जगण काय असतं हे शामराव आजोबांच्या माध्यमातून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद…बाकी तुमची जडणघडण ग्रामीण भागात झाल्याने आपण ते अजून प्रभावीपणे मांडलत….आता पुढच्या व्हिडीओची प्रतीक्षा आहे 🙏🏻

  • @ahilyadeviholkarhistory8977
    @ahilyadeviholkarhistory8977 7 месяцев назад +7

    Jai malhar

  • @vikasbagal7596
    @vikasbagal7596 7 месяцев назад

    दरी डोंगरात राहिलेली, जगलेली माणसं, हिच खऱ्या अर्थाने जीवन जगली. ज्यांनी निसर्गाशी आपली नाळ जोडून ठेवली आहे ती खरी माणसं ...hats off sayaji sir..

  • @AI_Motivation_with_HR_Ajay
    @AI_Motivation_with_HR_Ajay 7 месяцев назад +13

    My role model ❤

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 4 месяца назад

    अरण्यराणा सयाजी ! 🙏

  • @vandananipane944
    @vandananipane944 7 месяцев назад +1

    100 वर्षे पुरुषा हजारवर्षे वृक्षा कोकरे बाबा बोलले कीती खरं आहे ना त्यांच्या आयुष्याचा अनुभव खूप मोठा आहे.🙏🙏

  • @pranav9732
    @pranav9732 6 месяцев назад

    खरे निसर्ग जीवन जगलेले संत शामराव महाराज🙏

  • @pintukhandare6428
    @pintukhandare6428 6 месяцев назад

    सयाजीराव,500,वर्ष,जगाओ,तुम्ही

  • @ajaykharat3651
    @ajaykharat3651 5 месяцев назад

    मी फिल्म इंडस्ट्रीज मधील पहिला व्यक्ती सयाजी सर पहिला जो तुमाला बागून असे वाटले गरीब शिमांत् कुणीनसते वाह माण

  • @angadwaghmare3550
    @angadwaghmare3550 7 месяцев назад

    सयाजी सर, तुमचे व्हिडिओ पाहून मनाला लय भारी वाटलं. खरचं हे जुणी माणसं किती भारी होते हो.सर तुम्ही आसेच क्षण अनुभवा आणि आमच्या पण अनुभवास येऊ द्या. शामराव बाबा आणि आजी पण लई भारी बोलतात. धन्यवाद सयाजी सर

  • @manishadhamal134
    @manishadhamal134 5 месяцев назад

    छान

  • @in-search-of-happyness
    @in-search-of-happyness 7 месяцев назад

    आपल्या समाजातील रूढी परंपरांबद्दल माहिती खरे तर अशा जुन्या जाणत्या कडूनच मिळतात, सया काका खूप धन्यवाद असा हिरा शोधून तो समाजासमोर आणून आमच्या सारख्या नवख्याना जागृत केल्याबद्दल!

  • @hinduraosurve1446
    @hinduraosurve1446 4 месяца назад

    ❤❤❤❤

  • @user-xp5gb8pc9i
    @user-xp5gb8pc9i 7 месяцев назад

    ही आहे आमच्या सातारा जिल्ह्याचे आन बाण शान म्हणजे सयाजी शिंदे

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 7 месяцев назад +1

    सयाजी शिंदे एक नंबर अभिनेता .

  • @sunitakharat2563
    @sunitakharat2563 4 месяца назад

    १०० वर्ष पुरुषा १००० वर्ष वृक्षा हे आजोबांचं वाक्य खरच मनात घर करून गेलं....

  • @mahendrathombare1349
    @mahendrathombare1349 5 месяцев назад

    sayaji sir you are great

  • @atulchavan6389
    @atulchavan6389 7 месяцев назад +4

    Lvkr takt jawa sir vidio

  • @shantaramgavali6936
    @shantaramgavali6936 Месяц назад

    Great Sir

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 6 месяцев назад

    ह्याला जीवन ऐसे नाव..👍👌💐

  • @daymntinandkumar114
    @daymntinandkumar114 4 месяца назад

    सयाजी काका खूप ग्रेट निशब्द निशब्द

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 6 месяцев назад

    Sayaji shinde sir is great

  • @paradiscosmeticsrdc
    @paradiscosmeticsrdc 7 месяцев назад +2

    अतिशय आदर्श व्यक्तीमत्व सयाजी शिंदे

  • @rajujawale4888
    @rajujawale4888 4 месяца назад

    Thank you so much sayaji rao

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 6 месяцев назад

    nisarg hay tar aapan aahe nahitar aapan sampalo ......great shabdhch naahit ❤

  • @namdevchavan226
    @namdevchavan226 6 месяцев назад

    अतिशय आदर्श व्यक्तीमत्व जयाजी शिंदे सर

  • @ravithombare9179
    @ravithombare9179 7 месяцев назад

    शेवटच्या क्षणाला डोळ्यांच्या कडा ओलावल्या सयाजीराव, कसं बोलावं काय बोलावं.... शब्दच हरवले आहेत.