वाड्यांच्या सहवासात | Marathi Documentary on Pune Wada | Wada In Pune | Assal Marathi

Поделиться
HTML-код

Комментарии • 188

  • @sujataborkar7497
    @sujataborkar7497 Год назад +70

    यात आमच्या 668 कसबा पेठेतील वाड्याबद्दल अविनाश दादा व रेखा वहिनी यांनी खूप आठवणी जाग्या केल्या ...आमचे बालपण खूप छान गेले..दादाने उल्लेख केलेले मुंजीचे घर म्हणजे आमचे घर जिथे आम्ही भाड्याने राहात होतो..जसे मुंजीच्या वेळेस आम्ही घर नूतनीकरण करून घेतले अन् तिथेच मुंज केली तसे माझ्या लग्नात सारा वाडा म्हणजे लग्नघर झाले होते...खूप छान आठवणी आहेत...कधीच न विसरता येणार...अशी वाडा संस्कृती पुन्हा अनुभवता आली तर ?अतिशय सुंदर दिवस होते...सगळेच जण मनाने श्रीमंत होते...आता ती श्रीमंती बघायला मिळत नाही..या निमित्ताने खूप आठवणी जागृत झाल्या..काही लोक हे जग सोडून गेली..पण त्यांच्या आठवणी अजून येत असतात.

    • @mangalaupadhye1761
      @mangalaupadhye1761 Год назад +3

      सुजाता, तो tumacha वाडा होता न...थोड़ी confuse zale mi..khup aathvani tajya jhaalya

    • @sujataborkar7497
      @sujataborkar7497 Год назад +1

      Yes

    • @kalpanamahajan2631
      @kalpanamahajan2631 Год назад +5

      अप्रतिम,खूपच सुंदर, वाडा संस्कृती तच सर्व जडणघडण झाल्यामुळे वाचताना खूप आठवणी जाग्या झाल्या,सांही शनिवार पेठेत वाड्यातच रहात होतो त्यामुळे वरील सर्व ठिकाणे परिचयाची आहेत,1940 पासून आम्ही वाड्या त रहात होतो, माझे वडील त्यावेळी वाड्यात आले, जागा भाड्याने देणे आहे अशा पाट्या असत, 3 रुपये महिना भाडे होते असे वडील सांगत, खरोखर वाडा म्हणजे संस्कारांचे महाविद्यालय आहे,खूप छान,वाड्यात पुन्हा फिरून आल्यासारखे वाटले

    • @sameerrajadhyaksha9273
      @sameerrajadhyaksha9273 Год назад

      आजही वाडा पाहताना त्याची भव्यता जाणवते , ती भव्यता केवळ वाड्याच्या
      ' आकारमानातील' नव्हे तर अगणित आनंददायी आणि दुःखद अशा क्षण आणि प्रसंगांनी समृध्द ( Mature) झालेल्या आणि त्या अनुभवावर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती प्रमाणे भासते.
      त्या वास्तूला ( जागेला नव्हे ) आत्मा आहे हे जाणवत रहात , म्हणूनच अशा वास्तूनसोबत नात जमतं आणि आयुष्यभर सोबत रहात.
      आज इतक्या मोठ्या काळानंतर देखील त्या वास्तूचा "खानदानी' रुबाब सहज दिसून येतो ..जे जे नशीबवान तिथे वास्तव्यास राहिले आणि 'आयुष्य जगले'
      त्यांचा हेवा वाटतो.

    • @chetanmane7658
      @chetanmane7658 4 месяца назад

      त्यावेळी माणसं महत्वाची होती आणि आत्ता पैसा😊

  • @mrs.madhavidhananjayjoshi4518
    @mrs.madhavidhananjayjoshi4518 Год назад +20

    सरदार पुरंदरे वाड्यातले माझे बालपण..वाडा ... तिथले वातावरण ..तिथला संस्कार तिथले किस्से हा एक अवस्मरणीय अनुभव असतो...वाडा हा एक चालते बोलते विद्यापीठ असते..वाड्यात जन्म घ्यायला पूर्वपुण्याई लागते

  • @rajeshbagate4010
    @rajeshbagate4010 Год назад +11

    वाड्यात राहण्याचा आनंद फारच वेगळा असतो . तो आजच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये नाही. वाड्यात दिवाळीच्या दिवसात तर खूपच छान वाटत असे.

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 Год назад

      हे अगदी खरं,ती दिवाळी आठवली आणि डोळे भरुन आले.😩😪

    • @ssinteriorjourney1208
      @ssinteriorjourney1208 Год назад

      Khar aahe

  • @sagarborate9821
    @sagarborate9821 Год назад +5

    आम्ही एकच मागेंन या पुरातन वास्तू अश्याच राहुदेत..! वेळोवेळी यांचे रेनोवेशन डागडुजी होत रहावी अगदी लोकसहभागातून वर्गणीतून का होईना हे जपले पाहिजेत..! आम्ही मुंबईकर वाडा सोडाच साधे घर पण 400 squre foot चे आम्ही मुंबईमध्ये राहिल्यावर साधारण 40 वर्षेनी घेतले. तेही मुंबई पासून कोसो दूर. ज्याच्याकडे आभाळाएवढा मोठा आणि पुरातन आठवणी हृदयात ठेवलेला वाडा आहे त्यांनी याची प्रचंड काळजी घ्यावी... ही छान documentry बनवणाऱ्या कलाकारांना मी वंदन करतो असे छान वाडे आपण जगाला दाखवले.

  • @sunitahipparkar4300
    @sunitahipparkar4300 Год назад +7

    माझा जन्म पुण्यातील एका वाड्यात झाला आहेत,पुणेकर असल्याचा मला खूप अभिमान पण आहे❤

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 Год назад +14

    उत्तम संहिता, निवेदन नि सुंदर चित्रण. वास्तुविशारद असलेल्या ताईंचे विवरण आवडले.
    मी लिहिलेल्या "१२जुलै, १९६१" ह्या पानशेत धरणफुटीविषयक कादंबरीत वाताहत झालेले नि वाचलेले काही वाडे आहेत. एक वाडा तर एका पात्रासारखी कथानकभर भूमिका बजावतो. ही कादंबरी जुलै, २०२१ मध्ये इंकिंग इनोव्हेशन (वडाळा, मुंबई) या प्रकाशनसंस्थेने छापली आहे.

  • @stubbornfact7174
    @stubbornfact7174 Год назад +11

    हे बघून वाटतयं परत वळावं आणि बांधावा एक वाडा...!

  • @kashinathchari6497
    @kashinathchari6497 Год назад +25

    खुपच सुंदर मी अशी आशा करतो असे वाडे पिढ्यां पिढ्या शाबूत राहू देत .

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Год назад +8

    वाह समृद्ध वाडा संस्कृति ,एकत्र कुटुंब,आपुलकीचा शेजार ,नातलग आणि अप्रतिम चित्रिकरण ,उत्तम संकल्पना 👌👌👌👌😍

  • @udayitraj3363
    @udayitraj3363 Год назад +8

    वाई गावातील वाड्यावर देखील असेच अभ्यासपूर्ण विवेचन व्हावे 🌹🙏🌹

  • @ashokjoshi8851
    @ashokjoshi8851 Год назад +10

    खूपच सुंदर!! कसबा पेठ,नारायण पेठ, शनिवार पेठ, बुधवारपेठ या सर्व ठिकाणी लहानपणा पासून वावरत असल्याने खुपचं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
    धन्यवाद !

    • @urmilagore4053
      @urmilagore4053 Год назад

      सहजसुंदर घेतली आहे film

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Год назад +6

    खुप सुंदर.फार दिवसांची काही चांगले ऐकले पाहिले..जुने पुणे ते पुणे त्याला पर्याय नाही. धन्यवाद

  • @pradeeppatki2713
    @pradeeppatki2713 Год назад +9

    मस्त झाली आहे . ह्यामुळे आम्हाला पण खूप गोष्टी आठवल्या वा नवीन समाजल्या..धन्यवाद नाव पण मस्त,.
    संकेत अरविंद ज्योती.....👌👌👌👌

  • @mayatulsiani8411
    @mayatulsiani8411 Год назад +8

    Even my family Wada.. Is still present....
    Almost 75 yrs old..
    After my family members departed...
    One Tamil, Two Sindhi families, Marwari and Gujrati.. Families use to stay all together...
    Down wards... Marwari and Agarwal family use to stay....
    We're having Golden memories...
    It was and will be of Hindu community....
    Blessed those days...

  • @rahulathavale5772
    @rahulathavale5772 Год назад +17

    106 शनिवार पेठ ते 128 शनिवार पेठ आशा 20 वाड्यांचा नेनेघाटाचा 125 वर्षांचा इतिहास माझ्या वडिलांनी संकलित करून वारसा नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्या मध्ये नेनेघाट गणेश मंडळ आणि पूर्वीचे वाडे अशी सखोल माहिती आहे

    • @gauriagashe6666
      @gauriagashe6666 Год назад +2

      हे पुस्तक कुठे मिळू शकेल कळवा

    • @artisansamarth2427
      @artisansamarth2427 5 месяцев назад

      hey pustak kuthe bhetu shakta

  • @prasadkulkarni6751
    @prasadkulkarni6751 Год назад +5

    अविस्मरणीय अशा काळाची आठवण करून दिलीत आपण देशपांडेजी आभार

  • @dineshshintre3766
    @dineshshintre3766 Год назад +7

    Time 4.12 कविता खूप सुंदर आहे...श्रावणी सोनावणे 👍👌👌

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 Год назад +4

    मी स्वतःला नशीबवान समजतो की मी माझ बालपण कल्याणच्या ऐतिहासिक सुभेदार वाड्यात गेल
    काही अविचारी माणसांनी सुभेदार वाडा आपल्या फायद्यासाठी पाडला आणि एका ऐतिहासिक इमारतीला
    नष्ट केल वाड्याच जतन व्हायला पाहिजे होत माझ्या सारखे बरे कल्याणकर माझ्या मताशी सहमत असतील

  • @atulsathe3579
    @atulsathe3579 Год назад +15

    Kamaaaaaaaal documentry.. thanks for making it on wadas... Please make similar one on old Mandir and Irani Cafes... God bless you guys.

  • @snehajagtap4357
    @snehajagtap4357 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद हे सगळे सोने आहे, जुने ते सोने म्हणतात ते, मला माझे बालपण आठवले..तावरे वाडा सदाशिव पेठ, आता apartment झाली तेथे

  • @yashshinde5725
    @yashshinde5725 Год назад +15

    Beautiful presentation of ancient Pune ❤❤❤

  • @dusmantachakra
    @dusmantachakra Год назад +15

    A beautiful documentation of a heritage structure. The script and narration, the camera work, the music et al simply carried me away in a time travel. Thank you, the creators.

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 Год назад +2

    माझ्या मिस्टरांचं पण बालपण असंच पुण्यात सदाशिव पेठेत एका वाड्यात गेलं. माझ्या सासूबाईंच्या माहेरघरी सगळ एकत्र कुटुंब त्या वाड्यात नांदत होत. आता तो वाडा नाही पण त्या आठवणी मात्र ताज्या आहेत. त्यांच्या आमच्या गप्पांमध्ये त्या मला आठवणी सांगत असतात.

  • @madhuribhosale2864
    @madhuribhosale2864 Год назад +11

    Kiti chaan ❤️ went down memory lane !! Beautiful captures!!

  • @seemarasane
    @seemarasane Год назад +2

    Awsomeee jyanch balpan gelay na punyatlya wadyat tyana ha video awdlya shivay rahnar nai ani athvani tar kayam...

  • @DeliciousCuisine1234
    @DeliciousCuisine1234 Год назад +3

    Hello. आज सकाळी मी तुमचा विडिओ पहिला. काहीतरी मिळवलं याची प्रचिती झाली. मला historical value हे खूप आवडतं, जवळीक पण भासते. वाडा हे नाव मुळातच खूप काही सांगून जातं. Video भारीच 👍🏼

  • @gangadhar952
    @gangadhar952 Год назад +1

    मी वाडा संस्कृती अनुभवली,जगलो आणि समृद्ध झालो .
    '"बेडरूम किचन "हे शब्द अवतरले नव्हते,तेंव्हा आकाशातील चांदण्या बघण्यात छान झोप लागत असे.
    कुणीही ,कुणाचे घरात बिनधास्त डोकावत असे!
    पानशेत पुराने वाडे अस्तंगत होऊ लागले!
    पण आठवणी मात्र हृदयाला कवटाळून आहेत!

  • @rahulghodke8663
    @rahulghodke8663 7 месяцев назад

    या शहर आणी वाड्या वर जितकं प्रेम करतो तितकं ते वाढत जाता... पुन्हा पुन्हा नव्या नी प्रेमात पडतो..❤❤

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 9 месяцев назад

    अप्रतिम वर्णन,विवेचन आणि videography सुंदर आहेच...... मलाही माझ्या जुन्या वाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या..पाणावले डोळे,पण सुखावले मन.
    तरळून गेले सारे बालपण.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Год назад +2

    कसबा पेठेतील राळे वाडा मला अजून आठवतो . तिथे माझे बालपण गेले. त्या आठवणींनी मन अजून गहिवरते .

  • @saitambe7249
    @saitambe7249 Год назад +8

    Pune nostalgia 😊

  • @prakashkadam7739
    @prakashkadam7739 5 месяцев назад

    Me sudha vadyat rahilo ahe tyamule vadyabaddal atmiyata prem vatate. far sunder vada darshan zhale dhanvad😊

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 Год назад +1

    खरंय वाडा ची बात काही और च आता असे होणे नाही जे आहे ते जपासणे एवढेच छान व्हिडीओ

  • @sopanfree20
    @sopanfree20 Год назад +2

    काय भारी लिहिलंय राव 🫂

  • @IndiWheel
    @IndiWheel Год назад +1

    खूप खूप धन्यवाद. डोळे पाणावले बघताना, सगळ्यां आठवणी परत दाटून आल्या, लहानपण जिथे घालवलं ते चित्र पूर्ण डोळ्या समोरून गेलं😢

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 Год назад +1

    खुप छान... हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी जपायला हवा ❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад

    खुप छान विडिओ आणि त्याच बरोबर प्रक्षकांबरोबर साधलेला संवाद. आज खरंच तुम्ही time machine मधुन मला 100 - 150 वर्षे मागे घेऊन गेलात. वाटलं कालचक्र उलटं फिरवलात. त्या काळात वाड्यात रहाणारी माणसे कशी होती, त्यांचे व्यवसाय, जीवनक्रम कसा होता आणि आज तेच कुटुंबांना निवारा देणारे वाडे आज अतिशय एकाकी वाटतात. वाडे संस्कृती फक्त पुण्यातच पहायला मिळते. Nice video. धन्यवाद. 🙏🏻

  • @startedoffpoor
    @startedoffpoor Год назад +9

    Thanks for this piece of Art 🙏
    Big love and respect to whole team ❤️

  • @shrutisajeev476
    @shrutisajeev476 Год назад +1

    Khup Chan documentary kelay, atun baghitle nhavte tar Aaj baghayla milale. Juni Mandir war baghayla avadel

  • @trekker5873
    @trekker5873 Год назад +1

    जिव्हाळ्याचा विषय वाडा..❤️❤️❤️

  • @vishwaindane4388
    @vishwaindane4388 Год назад

    Kiti sunder athavani jagya karun dilyat apan dhanyawad punha navyane janmalya sarkhe vatale

  • @priyankasinkar3460
    @priyankasinkar3460 Год назад

    Khup chan vatle video baghun.khup Sundar upkram.ani thank you for beautiful video.

  • @samadhan1912
    @samadhan1912 Год назад

    वाड्यात राहणे म्हणजे खरं सुख!!
    व्हिडिओ अप्रतिम आहे, cinematography उत्तम,आणि आवाज तर खूप छान आहे.

  • @nileshgodse8811
    @nileshgodse8811 Год назад +4

    वाडा हेच खरे सुख होते

  • @abhiforchange
    @abhiforchange Месяц назад

    क्या बात है.... किती मस्त 😍

  • @mukundchorghade5016
    @mukundchorghade5016 Год назад +4

    An absolute delight. My college classmate Avinash Kulkarni and his wife truly made my day with their beautiful comments

  • @piyushhandekar2943
    @piyushhandekar2943 Год назад

    Narration ekdum sundar hota....khoop awadli Documentary.

  • @kalpanathawari6237
    @kalpanathawari6237 3 месяца назад

    आम्ही तळेगाव दाभाडे येथे भोंडवे वाड्यात राहत होतो आठवण आली हीdocumentry पाहून. पुन्हा जुने दिवस आठवतात व जावेसे वाटते

  • @sajan0665
    @sajan0665 Год назад +4

    खूप छान 👍👏

  • @sujataborkar7497
    @sujataborkar7497 Год назад +3

    Thank u Assal Marathi for sharing Vada Sabskruti 🙏

  • @sharvarisdreamland2420
    @sharvarisdreamland2420 Год назад

    Khup sundar documentary aahe 👌👌👌👌mazya hi khup aathvani refresh zalya 😊 👍👍

  • @sidghatage
    @sidghatage Год назад +1

    Amazing Video brooooo💯💯💯💯

  • @gauridawande1453
    @gauridawande1453 Год назад

    खुप छान. माझे बालपण ज्या वाड्यात गेले तो वाडा तुम्ही सुरवातीला दाखवला आहे. दगडी वाडा तपकीर गल्लीत आहे. पण तुम्ही नुसती front side दाखवली आहे. आतुन पण खुप सुंदर आहे वाडा.

  • @AnuppathakMusic1o1
    @AnuppathakMusic1o1 Год назад +1

    खूप छान,नाशिकला पण छोटे छोटे वडे आहेत़, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @amitfpl
    @amitfpl Год назад +4

    अप्रतिम ❤️

  • @vilasparab3416
    @vilasparab3416 Год назад

    खूप छान डॉक्युमेंट्री बनवली आहे. अभिनंदन.

  • @Giri-t7x
    @Giri-t7x 2 месяца назад

    सुपच छान सादरीकरण👌

  • @yogitadandekar6812
    @yogitadandekar6812 Год назад +3

    Khup chan

  • @anushapalshetkar891
    @anushapalshetkar891 Год назад +1

    फार सुंदर झालीये

  • @neelams1920
    @neelams1920 Год назад +3

    फारच छान 👌👌

  • @deeps6537
    @deeps6537 Год назад +1

    खूप छान.. जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या..

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam Год назад

    खूपच छान सर....वाडा संस्कृती पारंपरिक पद्धत आपल्यामुळे समजले.खुप धन्यवाद 🙏☺️

  • @UniversalLedArt
    @UniversalLedArt 7 месяцев назад

    🙋‍♂🏰🏯पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अश्या बुधवार पेठ भागातील "मारटकर वाड्यांचे" देखील सेपरेट व्हिडिओ बनवा... त्याच्यात देखील खूप मोठा ईतिहास आणि राजकारण दडलेले आहे... 📽📺

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Год назад

    फार सुंदर विवेचन धन्यवाद

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 7 месяцев назад

    छान माहिती दिली. धन्यवाद

  • @vaishalipatil8945
    @vaishalipatil8945 9 месяцев назад

    Khoopach chaaaaan, maza janma jari belgaocha tari javal javal sathiparyant har suttit punyalach jane. Vhayche lagnaparyant kayam mangalvarpeth shingrencha vada te ajol te mama maushi tyani kelele lad, te sambhaji parkatle jane, terasta pethet relativeschi vadyatli ghari rahun yene pratyek suttit to shanivarvada nirkhun pahane sarasbagh deccan gymkhanyavarche poonam cafecha dosa a sevasadan pune yethe gele ki jeevanache sarthak zalyasarkhe vhayche roj laxmi roadche phirne , va sutti samptana ragane mumbaila partne janu sarva jivhala ti manse sodun ale ki vait vatayche pan fresh vhayche pudhe lagnanantar to wada to tithla karkhana phirne he sarva navryala sangun tyachya manat pan pune prem nirman zale va atta amhi doghe+amchi mulgi ase tighehi life member jhalo mag choti ali, tilahi ek prakarche prem zale, god knows pa tithe asa kahi jivhala vatto amha chaughanahi, ki sutti aliki pavle aposp punyasathi dhavtat, baki ti loka kashi asot pan punyacha vishay kadhla ki mazhya bhavna haluvar hotat to vada te balpan sarva sarva athavtech seeyouj

  • @bhagyabablad5575
    @bhagyabablad5575 Год назад +2

    Mala maza lahanpan aatvala 🥺🥺 thank u for this documentary 😍

  • @AN-ib5uc
    @AN-ib5uc Год назад

    June wade tikavalya pahijet
    Khoop chan documentary

  • @prashantbansode4039
    @prashantbansode4039 Год назад

    Khup subhecya ani chan information....👍👍👍

  • @santoshbenkar8462
    @santoshbenkar8462 Год назад

    Sundar!!!!
    thet Rasta Pethet pohachavalat !!!
    man 40/42 varshe mage gele !!!

  • @chinmaykale7366
    @chinmaykale7366 Год назад

    खुप सुंदर माहिती धन्यवाद

  • @latapethe8047
    @latapethe8047 9 месяцев назад

    Khup chan excellent👍❤❤

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ Год назад +2

    सादरीकरण 🔥 खूप छान 👍

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Год назад


    फारच सुंदर... सांभाळलं पाहिजे आहे ते...

  • @sadashivbaliga5066
    @sadashivbaliga5066 Год назад +1

    This Documentary ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Год назад +3

    खुप जुने झालेले वाडे उतरवून त्याच सामानात नवीन वाडा‌‌ बांधून घ्यायला पाहिजे.

  • @shellspc
    @shellspc Год назад +3

    वाड्या बदल थोडक्यात छान माहिती.

  • @devivinod
    @devivinod Год назад +3

    Please preserve them , we in Kerala also trying to protect tharvad

  • @sunitirangnekar7486
    @sunitirangnekar7486 Год назад +3

    Beautiful presentation!!.. like to know if there are any conducted tours to take this walk down memory lane??

  • @harikakadada
    @harikakadada Год назад

    Actually Time Travel Zala mitra !!! what a Documentary

  • @SamrthUniquecreation
    @SamrthUniquecreation Год назад

    Very nice Dada Tai chi

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 Год назад +1

    अप्रतिम ...

  • @poojajoshi1920
    @poojajoshi1920 Год назад

    खूप छान प्रदर्शन केलंत.
    वाडा - मला अतिशय आवडणारी जागा. मी बडोद्याची आणि इथे हि सुंदर पुराणे वाडे आहेत हो कधी वेळ मिळाला तर नक्की भेट घ्या. अमुक नाहीत सुद्धा.
    मला हा विडिओ अतिशय आवडला, जुनी आठवणी लोकं कशी राहत होती, इतिहास काय म्हणतो आणि सध्या च्या पिढी ला आवडतं का राहायला?
    परदेशात राहून मला घराची आणि भारताची खूप आठवण येते.
    मला नक्की आवडेल पुन्हा जगायला - ती सेम माणसं नाही सुद्धा भेटणार पण नक्की भेटणार एकांतयाचा सहवास.

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 Год назад

      खरं सांगू,,,,आता ते शक्यही नाही,एकतर वाडे आता ढासळू लागलेत,दुरुस्ती शक्यही नाही,अश्यक्यच आहे ते.
      एकांत वगैरे खरं आहे..पण त्यातील माणसेही महत्वाची,आता तिथे राहायला गेलो तर त्या आठवणी खायला उठतील,तो अप्रतीम काळ निसटला तो निसटलाच.नाहीतरी आपल्या पिढी (ही शेवटचीच)
      नंतर आता हे सर्व वाडे पडीक तरी होतील,त्याकडे कुणी डोकावणारही नाही ( कारण त्यांचे तसे भावनिक नातेच नाही ना !!!) किंवा बिल्डर,,😞😔😩

  • @sudhirdhutre4108
    @sudhirdhutre4108 Год назад

    फारच छान, सुंदर

  • @sagmail13
    @sagmail13 Год назад +1

    Khupach chaan... Ha varsa japla pahije
    👌👌👍👍

    • @vrushalibidwai9178
      @vrushalibidwai9178 Год назад

      Mala pan kup kahi bolyache vadya baddal Mazya kade amchya vadyacha me ek lekh lihia ahe.pl sandhi dyave

    • @anaghakulkarni5492
      @anaghakulkarni5492 Год назад

      अस्सल मराठी
      नाव खूप छान आहे. विषयही नावाला अनुरूप , मराठी मनाला भावणारा.वाड्यांची निवड मस्त.निवेदन, चित्रिकरण, सादरीकरण सर्वच उत्तम.चित्रफीत खूप आवडली.
      अभिनंदन!

  • @rashmisp1
    @rashmisp1 Год назад

    Khup chan documentary.

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 Год назад +1

    आमचा पण वाडा आहे पुण्यात कसबा पेठ मधे खूप छान सोनेरी दिवस होते👌👌👌 सर्व चुलते आजी आजोबा आम्ही सगळे एकत्र रहायचो. वाड्यात राहने म्हणजे राजवाड्यात राहण्या सारखे पण आता कोथरुडला राहतो वाडा आजूनही तसाच आहे खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आठवण आली की कधी कधी आजूनही जातो आम्ही वाड्यात आमच्या वाड्यातील तळघर खूप आवडायच मला पण कितेक वर्ष बंद आसल्यामुळे आत कोणीच जात नव्हते आजी आजोबा खूप ओरडायचे आत नका जाऊ का कुणास ठावूक... आणि आजूनही ते तसेच बंद आहे.... 🙏

  • @jitendramhatre1807
    @jitendramhatre1807 Год назад

    👌👌🎭खुप सुंदर

  • @surekhaagarkar9562
    @surekhaagarkar9562 Год назад

    खुप सुंदर.. धन्यवाद

  • @manishadesai3908
    @manishadesai3908 Год назад

    Wada sanskriti khup chan mahiti asch Pune madhil prachin mandir cha hi mahiti nakki dya

  • @varsharushipathak3661
    @varsharushipathak3661 Год назад +1

    अप्रतिम!!!

  • @gaurikumbhar9227
    @gaurikumbhar9227 Год назад

    khup sundar....!

  • @mindwander997
    @mindwander997 Год назад

    Khup bhari...👍👍

  • @murtuzaali5015
    @murtuzaali5015 Год назад +1

    Great documentary 👍

  • @truthspeaker.truthseeker.
    @truthspeaker.truthseeker. Год назад +2

    We need to conserve our heritage and culture.

  • @pankajpandey6194
    @pankajpandey6194 6 месяцев назад +1

    Aaaaaaapraaatiiiiiimmmmmmm😊
    297 shukarwar Peth wada majhe ghar hoteeee

  • @abhishekchachar7127
    @abhishekchachar7127 Год назад +2

    येथे वाडा पाडून बिल्डिंग बांधायची नाही असे आधीच ठरले आहे पुणेकरांचे तेव्हा असा प्रस्ताव घेऊन कोणीही आल्यास त्याला वाड्यातच कोंडून पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील 😂 हुकूमावरून एक पुणेकर❤

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Год назад +1

    Sunder documentation. ❤

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 Год назад

    मस्त

  • @rohininaidu9063
    @rohininaidu9063 5 месяцев назад

    एक मोठी joint family असल्यासारखेच सगळे रहायचे. ४६४ पंडित वाडा. कसबा पेठ.येथे आम्ही रहात होतो.