कोंकणातील १०० वर्षांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग होईल असं घर | Laterite Stone House | Colours Of Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 дек 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #कोंकणीजीवन #LateriteStone #LateriteStoneHouse #कोंकणातील१००वर्षांपूर्वीचघर
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोंकणातील १०० वर्षांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग होईल असं घर | Laterite Stone House | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 716

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Год назад +209

    घराला 102वर्ष झाली तरी किती स्वच्छ नीट नेटकं ठेवले होते. घराचा स्वच्छते वरून माणसाचा स्वभाब कळतो. बापट गुरुजी किती आवढीने सर्व सांगत होते ते खूप आनंद दायी होते. खूप छान.

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 Год назад +28

    वाडा च आहे हा जणू. भरपूर खोल्या, भरपूर दरवाजे, मुबलक खिडक्या आणि सूर्य प्रकाश, खेळती हवा, सारवलेली जमीन.सुंदर घर आणि चांगली माणसे.
    एवढ्या मोठ्या घराला सांभाळणे, नीट नेटके ठेवणे हे कष्टाचे,खर्चिक काम. बापट सर आणि त्यांच्या पत्नी, दोघांना सलाम.

  • @shilparane2332
    @shilparane2332 Год назад +68

    सलाम बापट गुरुजींना
    अशी घर सांभाळायला भाग्य लागते
    पूर्वजांची पुण्याई असते या मागे .

    • @harshadhagaikwad9790
      @harshadhagaikwad9790 Год назад +3

      खूप छान आहे पण वाईट वाटले कारण एवढ्या मोठ्या घरात दोन च माणसं आहेत बिच्चारे

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Год назад +44

    वा.फारच छान.102वर्ष झाली या घराला.पण अजुन खुप मजबुत आहे." बापट साहेब फार छान राखलं आहात आपण घंर.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +52

    अरे किती सुंदर वाडा आहे तो....आणि बापट सरांनी पण फार प्रेमाने प्रत्येक गोष्ट जपलेली आहे.
    सरांना नमस्कार आणि विनय तुला खूप धन्यवाद इतका सुंदर वाडा दाखवल्याबद्दल!!!

  • @chandulalmajithia2085
    @chandulalmajithia2085 Год назад +27

    बापटसराना इतिहास जिंवत ठेवणया साठी लाख लाख शुभेच्छा आणि अभिनंदन 👃👃👃👃👃

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Год назад +15

    कोकणात आजही जुन्या काळातली घरा शाबूत हत, आणि त्या जुन्या कौलारू घरांसमोर नवनवीन बंगले पण फिके पडतत, काही लोकांनी जुने घरा आजही जपून ठेवल्यांनी हत, कोकणात घर म्हणजे कसा हव्या चारही बाजूने कौलारू घर अगदी भक्कम दिसता 😘😍😊

  • @rupeshdhumal1085
    @rupeshdhumal1085 11 месяцев назад +15

    हा व्हिडिओ एकदम हृदयस्पर्शी वाटला , कारण अस पूर्वजनकाली घर जपन खूप विशेष बाब आहे आणि ते बापट गुरुजींनी स्वतः ती वास्तू जपून ठेवली खूपच छान वाटलं ,,,,
    Specially thanks for Colours of konkan family तुमच्या मुले आम्हाला या channel द्वारे अशी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळाली. नाहीतर आम्ही अशा वास्तू पाहण्यासाठी time काढून जावं लागतं ,तेच आम्हाला तुमच्या channel मधून पहावयास मिळत ,

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 3 месяца назад +9

    बापट साहेब कमाल आहे तुम्ही सुंदर जपल आहे घर .घराला घरपण देणारी मानस पण ❤❤❤❤❤

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Год назад +8

    श्री.बापट साहेब तुम्ही खुप निर्मळ मनाचे आहात कारण आपण सोन्याची हुंडी दाखवलीत आणि आता ही त्यात सोने आहेत असे तुम्ही स्वतःहून सांगत आहात यावरूनच प्रत्यय येतो तुम्ही खुप निर्मळ मनाचे आहात..
    खुप विस्तृत पणे आपण माहिती दिलीत 👌👌

  • @sandeshpatil2769
    @sandeshpatil2769 9 месяцев назад +9

    बापट गुरुजींना कोटी कोटी प्रणाम हे दुशय हेघर असच जपुन ठेवा गुरुजी जजी माहित सांगत होते अगदी मनापासून त्यांना परत धन्यवाद

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 3 месяца назад +11

    वास्तु बोले तथास्तु ,इतकी वर्षे झाली तरी खुप छान ठेवली ,बापट सरांनी खुप छान महीती दिली धन्यवाद

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Год назад +25

    व्वा 💯 वर्ष+ झाली तरीही चिरतरुण असलेलं आणि कित्येक पिढ्या डोळ्यांनी बघितलेले हे अस्सल कोकणी घर बघून खूप छान वाटलं...
    Drone शूट 🔥
    ह्याका म्हणतत अस्सल मालवणी/कोकणी घर.बापट सरांचे ही कौतुक कारण त्यांनी घराला आहे तसं ठेवलं आणि मुख्य गोष्ट म्हणजे जमीन अजूनही सारवली जाते...रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अशी जमीन नेहमी उत्तम. विनू दा आणि बाबू दा दोघं ही असच कोकण एक्सप्लोर करत रहा...

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Год назад +6

    माजी आई ने पण विडिओ बघितला तिला ही खुप आवडल घर...
    तिला ही आश्चर्य झालं व्हाइन अजून जपून ठेवले आहे 👌👌
    खुप छान 👌👌

  • @kamlakarjadhav4628
    @kamlakarjadhav4628 Год назад +9

    पूर्वी ब्राम्हण लोक खुप श्रीमंत होते. त्यामुळे मजबुत बांधकाम करणारे मजूर पण सहज मिळाले असणार .... मजबुत आहे

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Год назад +7

    खुप सुंदर विनु खरच आसा सुवर्ण ठेवा कोणी जपुन ठेवत नाही पण बापट सरांनी तो ठेवा ठेवलाय आणि तु तो दाखवलास खुप अप्रतिम

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 Год назад +36

    खुप म्हणजे खुपच अप्रतिम आहे घर.खुप छान ठेवले आहे घर. Thank you बापट सर. आणि तुम्हाला पण Thank you so much ,

  • @chaitanyakashalikar3239
    @chaitanyakashalikar3239 Год назад +5

    अप्रतीम घर आणी विडीयो ,कोकणातील खूप खूप सुंदर ऐश्र्वर्याच दर्शन होत आहे😍😍😍😍👏👏👏👏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 Год назад +8

    ख़ुप सुन्दर आहे घर, ती लहान मुलांन च गाडी पाहुन बालपनि चे दिवस आटवले. बापट गुरुजी नी पूर्वजानंच्या आटवनी जपुन टेवल्या आहेत ते पाहुन छान वाटल.

  • @KiranPatil-ps4kd
    @KiranPatil-ps4kd Год назад +4

    सरांच व्यक्तिमहत्व खूप छान आहे ❤

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Год назад +34

    अतिशय सुंदर!
    किती समृद्ध होती आपली संस्कृती... ❤
    गणपतीचा चौरंग 👌❤

  • @arjunadhav3922
    @arjunadhav3922 Год назад +16

    खरंच डोळे भरून आले 😢❤️ Old is gold

  • @meenasawant427
    @meenasawant427 Год назад +6

    खूप छान विडीयो
    जुनी घर ऐसपैस होती,बाधकाम मजबूत आहे. वास्तु जपुण ठेवली आहे अप्रतिम घराची रचना
    धन्यवाद बाबु आणि विनु

  • @manishak3062
    @manishak3062 Год назад +9

    खुप बर वाटल जुनी वास्तु पहायला मिळाली जबरदस्त घर कोकणातली जुनी घरा विहिर पायरहाट हातरहाट बाळंततिनिची खोली वेगळी आमच्या घरात पण होती,मनाला खुपच भावल घर जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप खुप धन्यवाद असेच व्हिडिओ खाकशी गाव, दाभोळा गाव पावणादेवी , चे पण करा .गाव बघुन बरा वाटता.

  • @aparnabhagat5629
    @aparnabhagat5629 Год назад +6

    किती ते सुंदर घर……मन एकदम प्रसन्न झाल❣️✨

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад +10

    कदाचित हा व्हिडिओ पाहुन निर्मात्यांची नजर इकडे वळु शकते. किंहुना त्यासाठी योग्य अशी रचना आहे.

  • @vijaygolwalkar6751
    @vijaygolwalkar6751 Год назад +10

    अभिनंदन घाडी बंधु असेच नवीन विषय घेऊन कोकणाचे गतवैभव दाखवा.
    बापट सरांचे अभिनंदन . अतीशय सुंदर घर राखलं.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад +5

    नक्कीच आवडलं, अतिशय दुर्मिळ ठेवा पहायला मिळाला.
    पण, सरांची मुलाखत घेताना सुरुवातीला विनु तुझी तत फफ झालेली दिसली नंतर रुळावर आलास आणि बाबुची तर बोलती बंदच होती, मात्र सरांनी अगदी दिलखुलास गप्पा मारत मारत संपुर्ण घराची माहीती दिली.
    फार छान वाटले पाहुन.
    मला वाटतं आपल्या अशी जुनी ठिकाणं अजुनही असावीत, पोंभुर्ले येथे जांभेकरांची घरं, नाडणला भिडेंचं घरही अलिकडे पर्यंत जुनच होतं आताचं काही माहीत नाही.

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Год назад +5

    अशी जुनी घर म्हणजे कोकणाचे वैभव. ती आजही त्या वास्तूत रहाणारे तेवढेच जपतात म्हणून ती टिकून आहेत. एवढी मोठी वास्तूची साफसफाई करणे, त्याची निगा राखणे खायची गोष्ट नाही. त्यामुळे श्री. बापट सरांना मानाचा मुजरा. खरच ही वास्तू बघून छान वाटले. तूला आणि बाबूक धन्यवाद.

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g Год назад +8

    अप्रतिम आणि अनमोल शिल्प 👌👌👌👌
    विनय आणि बाबु तुमचे खुप खुप धन्यवाद ईतके छान पुरातन कोकणातकोकणातले घर दाखवलात 👍बापट गुरूजी आणि बाई ऐवढया मोठ्या घरात दोघेचे राहातात म्हणजे तेचे या घरावती जिवापाड प्रेम आहे. बापट गुरुजींचे घर खुपच स्वच्छ, नीटनेटके, जुन्याकाळातील वस्तूने भरलेल भंडार आहे. बापट गुरुजींचे आणि बाईचे हि मना पासुन आभार कि त्याना नवीन काळाचा मोह अजीबात नाही. टिपीकल कोकणी कुटुंब 💕👍 पेटारा वरती लाकडी माळा जुन्या आठवणीआठवणीना उजाळा मिळाला 🙇 विनय जेव्हा तु बापट संरान बरोबर होतास 😂😂तेव्हा तेचा सारखाच शुध्द बोलत होतास 😂 बाबु तर काही बोलाच नाही 😂😂आणि जसे बापट सरांचे घर सोडलात 😂😂तसे पुन्हा तुमचा रुपात आलात 😅😆😃😄 असे बोलण्याचे तात्पर्य बापट गुरुजींन बरोबर पुणॅ दिवस आपण राहीलो तर किती शुध्द मराठी बोलु 😃😂✌

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 Год назад +4

    खूपच छान अस कोकणातील घर आणि निसर्ग आपल्या कोकणाचे खरे ऐश्वर्य आहे

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 Год назад +5

    छान घर खूप मोठ आहे स्वच्छता खूप चांगली ठेवली आहे.

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 Год назад +5

    विनु घर मस्तच दाखवले 👌👌🌟🌟🌟

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 Год назад +6

    खुप छान आहे बापट सरांच घर, हा व्हिडिओ मी बऱ्याच जणांना शेअर केला आहे .

  • @genuinerups5149
    @genuinerups5149 Год назад +2

    खरंच खूपच सुंदर घर आणि स्वच्छता तर एकदम भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Год назад +8

    खूप सुंदर घर गावी घर असेल तर तिथे रहायला हव तर ते सुन्दर व टिकून रहाते 👍👍👍👌

  • @kokanratn
    @kokanratn Год назад +6

    अप्रतिम सुंदर आहे घर माझ्या कोकणातील

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 Год назад +5

    खूप मस्त घर,प्रशस्त त्यांनी छान जतन केलं आहे ,विनू तू किती छान आदराने ,समोरच्या व्यक्तीचा मन सांभाळून ,respect , देऊन बोलतोस ,खूप मस्त vdo ,tu aslas ki babu khush asto

  • @manalirane5341
    @manalirane5341 Год назад +5

    खूपच सुंदर घर आणि तुम्ही त्याची जपणूक खूपच छान केली आहे 👌👌👍👍✨✨🌹🌹

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Год назад +3

    👌🏻👌🏻👌🏻 खुपच सुंदर घर आहें म्हणून तर म्हणतात जुने ते सोन अगदि या घरासाठी ही म्हण चपखल लागु होते शभ॑र वर्ष जुने घर असुन देखील इतुके सुंदर व नीटनेटके घराची निगारानी खुप छान ठेवलेली दिसली खुप छान 🙏🏻 कोंकणात से घर कोठे आहें हे समजले असते तर आम्ही कोंकणात जाउ त्या वेऴेलाया ग्रास भेंट देता येईल 🙏🏻 धन्यवाद

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 7 месяцев назад +2

    ❤ खुप च सुंदर, अप्रतिम आहे वाडा चिरेबंदी बघुन मन भरून आलं किती सुंदर प्रत्येक वस्तु सांभाळून ठेवल्या आहेत आदरणीय बापट गुरुजी नी आणि त्यांच्या सौभाग्य वतीने (मावशी ने) त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा त्यांचा हा ठेवा जतन केला पाहिजे, सलाम Sir आणि माई ना 🎉🎉🎉 त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 Год назад +4

    मस्त व्हिडिओ लहानपणीची आठवण झाली तीन पायाची गाडी बघून

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 5 месяцев назад +2

    बापट सरांचा घर बघून समाधान झाला फारच छान घर आहे धन्यवाद मित्रा आणि धन्यवाद बापट सर 🙏🏻🌹

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Год назад +2

    विजू आणि बाबू फारच सुंदर वाडा चिरेबंदी
    असेच घर टेंबवलीमधे बामणांचेपणघर आहे

  • @tusharlataye7913
    @tusharlataye7913 Год назад +3

    कोकण म्हणजे हे, अस्सल कोकण 🙏👌सध्या (कोकणी रानमाणूस )म्हणून एक youtuber आहे. तो हि अशीच , मातीची घरे (म्हणजे मांघर )वाचवून त्यापासून ( village Homestay )सारखी पर्यटनास चालना देणारी संकल्पना राबवत आहे.

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 Год назад +2

    बापट सरांचे आभार असे घर राखणे या वयात फार कष्टाचे आहे. पण या दोघांनी किती प्रेमाने हि वास्तू जपली आहे. दोघांनाही प्रणाम फार नशिबवान आहात आपण हे घर नव्हे मंदीरच आहे.

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 5 месяцев назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद बापट गुरुजींचं जुनं घर दाखवल्याबद्दल आणि धन्यवाद गुरुजींना एवढं जुनं सगळं सुस्थितीत जतन करून ठेवल्याबद्दल.

  • @minalsawant5175
    @minalsawant5175 Год назад +11

    खूपच सुंदर घर ....आणि बापट सर आणि वहीनी नी ते छान सांभाळंय सुद्धा.....👌👌विनू आणि मुकेश आज तुमचा खरंच छान vlog होता....तसे सगळेच vlogs अतिशय सुंदर असतात...कधी विनोदी...कधी अर्थपूर्ण...कधी माहीती देणारे....very nice ... Keep it up... Best wishes 👍

  • @divyabaikar9667
    @divyabaikar9667 Год назад +6

    अतिशय सुंदर आहे घर . प्रत्येक घरातील सामग्री जुन्या काळातील समृद्धता दर्शवते. पाहून खूप आनंद झाला. मला नक्की आवडेल बापट सरांच्या घराला भेट द्यायला.

  • @anilbotle823
    @anilbotle823 Год назад +5

    विनू जुन्या काळी काही लोकांचे एवढे मोठे वाडे होते बघून छान वाटले

  • @anilogde1816
    @anilogde1816 3 месяца назад +2

    मी इंदौर, मध्य प्रदेशातील राहणारा असून मला महाराष्ट्राबद्दल खूप प्रेम आहे. कोकणातील हे सुंदर घर पाहून खूप आनंद वाटतोय. घर उत्तम उत्तम जपलंय. बापट सर धन्यवाद.

  • @ashahirlekar9981
    @ashahirlekar9981 Год назад +4

    खूब सुंदर घर आहे.विनू तुझे बोलणे खूब छान आहे.

  • @janvikawle3957
    @janvikawle3957 Год назад +2

    अप्रतिम. 👌👌खूप सुंदर घर आहे.खुंटी कोनाडे बघून लहान पणीची आठवण झाली. 😘😘

  • @vasantimehendale622
    @vasantimehendale622 3 месяца назад +1

    खूप छान वाटल कोकणातल घर, इतक्या निगुतीने इतके वर्ष जपलेल. ठाण्याच्या फ्लॅटमधून विडिओ पाहिला पण त्याघरातच आहे अस वाटल. माझं आजोळही असाच ऐसपैस अशाचीच रचना असलेलं त्यामुळे ती आठवणही झाली. अशी अँटिक घर पाहायला खूप छान वाटत.❤👌🏽

  • @sunitsapre6215
    @sunitsapre6215 11 часов назад

    खूप मोठं सगळ्या जुन्या वस्तू छान जपू ठेवल्या आहेत खूप खूप आभार गावाचे नाव नाही कळले.

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 Год назад +3

    धन्यवाद दादा,आणि बापट सरांना, असे जुने घर बघायला मिळण म्हणजे भाग्यच ,

  • @shamikalanjekar5663
    @shamikalanjekar5663 15 дней назад

    खुप खुप छान
    केरळ मध्ये अनेक घरं आहेत अशी
    हे घर बघुन मनाला समाधान वाटले
    Thanks colour of kokan team

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 3 месяца назад +1

    धन्यवाद.कोकणातील पारंपरिक पद्धतीची अशी घरे बांधण्यासाठी कुशल कारागीर किती बुद्धिमान होते आणि बापट सरानी घराची काळजी घेऊन अजून ते जपताहेत पूर्वजांची वास्तू .त्यांना व कुटुंबबियाना 🙏🙏👍

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Год назад +5

    पांगुळगाडा म्हणतत त्या गाडीला, सरांचं घर छानचं आहे, विनू तुझी commentary मस्त

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Год назад +15

    खरंच खूप सुंदर वाडा ,चौसोपी बांधकाम, सुंदर अनमोल ठेवा आहे हा सरांनी घर खूप जीवात‌ जपलंय हे तिथे असलेल्या निट नेटकेपणा बघून लक्षात येते. सर सुद्धा आवडीने सर्व दाखवत होते.
    मन प्रसन्न झाले घर बघून. सरांचे आणि विनूचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @pallavichavan9527
    @pallavichavan9527 Год назад +3

    Khup chan आणि saglya वस्तू जपून thevlya nahitr aatachi पिढी adagl म्हणून् काढू निर् टाकायची घाई

  • @sachinnachare5752
    @sachinnachare5752 Год назад +4

    Kupsundar Ghar juni vastu kup racnatmac hoteya Sundar video👌

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +2

    खुप सुंदर घर 👌👍 एवढं मोठ घर मैंटेन ठेवण पण खूप कठीण पण असत छान मेंटेनं ठेवलं काकांनी घर

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 11 месяцев назад +1

    मन भरेना इतक सुंदर घर ओहे ठेवलय ही जीवापाड नीट नेटक.

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 Год назад +3

    खूप सुंदर आहे दादा घर गावी गेल्यावर अशी घर पाहिजे पण आजकाल सर्वांनी बगले उभारले त्यामुळे गावच फील येत नाही आमचं पण तसच आहे पण गावी जुनीच घर पाहिजे तर बर वाट खूप बरं वाटलं इतकं जून घर बगून 👌👌👌👍👍❤️❤️

  • @rupalikubal9010
    @rupalikubal9010 Год назад +2

    जुने ते सोने... खरच सोन्या सारखी स्वच्छं सुन्दर वास्तु आहे... बापट सरानी छान ठेवले आहे घर् 👌👌
    असेच माहितीपूर्ण वीडियो बनवत रहा 👍👍

  • @anitadhuri9302
    @anitadhuri9302 Год назад +21

    जुन ते सोन, सोनेरी क्षणांचे साक्षीदार 🏡🙏

    • @bhagyashreeghagare8513
      @bhagyashreeghagare8513 Год назад +1

      अरे हे आम्हांला संस्कृत शिकवायचे. अजुनही तसेच हसत खेळत आहेत. सुंदर अप्रतिम घर

  • @pravinpatil8069
    @pravinpatil8069 Год назад +1

    जूनं तेच सोणं (Old is Always Gold ) !! खुपच छान घर आणि Video देखील !! 👌👌👍👍

  • @simpkn947
    @simpkn947 Год назад +8

    खरंच खूप सुंदर घर आहे..बापट गुरुजी किती आवडीने सगळं दाखवत आहेत..अशी घरं दुर्मिळ आहेत.खुप छान vlog होता.

    • @suyashsaikhede7770
      @suyashsaikhede7770 Год назад

      Khup sundar ghar ahe as vatat flyat vygere kahi nako ashac घरामध्ये रहावं असं vatat khup sundar khup chan👌👌👌

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 Год назад +1

    अशी जुनी घरे पाहायला मज्जा येते.
    बापट सरांनी छान ठेवले आहे जुन्या सामानासह.
    आजचा vlog👌👌

  • @vinodkulkarni7896
    @vinodkulkarni7896 Год назад +3

    ही अशी घरा कोकणातच बघुक मिळतत... लय भारी असा घर म्हणजे आताचो वाडो

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 Год назад +4

    Khupch Chan ahe ghar dada 👌 bapat sirani khup Chan prkare mahiti dili as Ghar ata nahi bghayla milnar pan ek samjl nahi dada tulshi rundavn mage kas 👌baki ghrachi rchana khupch Chan Ani tas thevl pan ahe tyani mast maja ali 👍💯😊

  • @user-ic1zc3fy4w
    @user-ic1zc3fy4w 2 месяца назад

    मला खूप आवडल घर बापट सरांचं त्यांनी खूप छान मेंटेन करून ठेवलंय आजही घराला. ईश्वर त्यांना अजूनही दीर्घायुष्य देवो निरोगी आरोग्य देवो हिच सदिच्छा आणि दादा असेच छान छान विडिओ अपलोड करत जा मी कोकणातील नाही सातारच्या आहे पण मला तुझे विडिओ पहिले की पुन्हा मुंबई तुन गावी गेल्यासारखं वाटतं जेव्हा रिटायर्ड होऊन गावी जाईन तेव्हा असचं छान घर नक्कीच बांधेन खूप खूप छान 👌👌👌👌🌹🌹🌹

  • @sanjaymaindargi8313
    @sanjaymaindargi8313 Год назад

    किती सुंदर, अजुन संपुर्ण घरात सारवण आहे फारच सुंदर, बापट सरांनी घर खुप छान व स्वछ ठेवले आहे.👌👌👍👍🙏🙏

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 Год назад

    अविश्वासनीय ....भावा खुप खुप धन्यवाद आज कोकणातला बंगला दाखवल्याबद्द मानापासून आभार 🙏🙏🙏

  • @gaurimore4358
    @gaurimore4358 Год назад +3

    खरच खूपच छान आहे घर ..कोणत्या गावी आहे हे ... खरचं आता पणं असच लोकांनी घर बांधलं पाहिजे ...

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 Месяц назад +1

    खरं च खुप खुप छान घर आहे अजोळी गेल्या सारख वाटते

  • @sanikabhogale4413
    @sanikabhogale4413 Год назад +8

    Khup sundar ghar

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 Год назад

    बापट सरांच शंभर वर्षांपूर्वीच घर खूप आवडलं. 👌👌

  • @user-qi9fx5zm7g
    @user-qi9fx5zm7g 16 дней назад +2

    Kharch khuppppppp chhan Ghar aahe .......

  • @smritikothare6545
    @smritikothare6545 Год назад +8

    Rich heritage of India. The real wealth of our society. 🙏 Bapuji. Felt really nice. Tranquil atmosphere.

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Год назад

    स्वछता खूपच सुंदर,आजच्या पिढीला बघण्यासाठी आवश्यक👌👌👌

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Год назад +1

    इतक्या जुन्या आठवणी बापट गुरुजींनी जपून ठेवल्यात खूपच छान वाटले हा विडिओ पाहून तुम्ही तो आवडीने दाखवला धन्यवाद 🙏

  • @mukundbhagwat7885
    @mukundbhagwat7885 Год назад

    बापट सरांचा अप्रतिम वाडा.. निगुतीने जपलेली वास्तू .. 👌👌👌👌👌🙏🙏

  • @surendrasatam8051
    @surendrasatam8051 Год назад

    बापट गुरुजींचे पणजोबा खूपच हुशार होते असं घराच्या रचनेवरून दिसून येतं आणि तुम्ही त्याचं शूटिंग केलं आणि आम्हाला दाखवलं खूप आनंद झाला भारी आहे घर त्यांच आम्ही वेळात वेळ काढून तुमचे सगळे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतो आणि ते टीव्हीवर बघतो म्हणजे टीव्ही स्मार्ट असल्यामुळे बघू शकतो

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 Год назад +2

    Old is gold baghun khup khup anand zala....

  • @paragamberkar3213
    @paragamberkar3213 Год назад +2

    खुप खुप सुंदर घर . मित्रा हे सर्व बघुन या घराला भेट द्यावी असे वाटते. या घराबद्दल आणि या माणसांबददल काय बोलाव , माझ्या कडे शब्दच नाहीत रे मित्रा. खुप सुंदर.

  • @sagarvichare1234
    @sagarvichare1234 Год назад +1

    खुप खुप छान वाटल बापट सरांच घर पाहून आणि खरच खुप सुंदर घर आहेत 👌👌👌👌 मला ही खुप वाटत कोकणात राहायला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 Год назад +1

    स्वच्छ... स्वच्छ आणि खूपच स्वच्छ.....
    निर्मळ सुंदर घर ❤️❤️❤️❤️

  • @shreyapatwardhan8938
    @shreyapatwardhan8938 Год назад +33

    So proud that this is our house… yes Kakani khup maintain thewlay ghar…

    • @Vivek-ef7fd
      @Vivek-ef7fd Год назад +4

      This house can be used good for tourism, courtyard house,... very rare to see such houses in such good condition, ..let city people experience this life style....

    • @sunilasathe4717
      @sunilasathe4717 Год назад

      गाव कोणतं आहे?

    • @AS-dx7qk
      @AS-dx7qk Год назад

      ​@@Vivek-ef7fdo mkp uml

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Год назад

    खरंच खूप छान घर आहे अशा जून्या पद्धतीचे बांधकाम किती छान आहे अगदीं डोळ्यांचे पारणे फिटले धन्यवाद.

  • @arushghadi701
    @arushghadi701 Год назад +2

    खूपच छान मस्त वाटल

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 месяца назад

    कमाल घर आहे!! बापट काका काकूंनी अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवले आहे. Dream house!! देवडी ऐकली होती... पाहिली पहिल्यांदाच. त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा असंच ठेवलं पाहिजे.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад

    बापट गुरुजी तुम्हाला नमस्कार , अप्रतिम घर, आणि स्वप्नातील घर पाहून थक्क व्हायला होतं.निटनेटके स्वच्छपणा पाहुन आनंद झाला.

  • @sukhadavadhavkar1143
    @sukhadavadhavkar1143 Год назад

    घर बघून खूपच छान वाटलं आता अशी जुनी घर बघायला मिळत नाही. खुप छान घर ठेवलंय सरांनी. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ushasadare6270
    @ushasadare6270 Год назад

    खूप खूप सुंदर घर,किती सुंदर ठेवलंय,बघायला मिळाले ते सुध्दा भाग्य च बघायला मिळत नाही या गोष्टी आता,बापट सर आणि त्यांच्या पत्नी यांनी घर छानच ठेवलंय,अन आनंदाने दाखवलं धन्यवाद

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Год назад

    खूप सुंदर,छान शूटिंग केली.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Год назад

    बापट गुरूजी , अप्रतिम वास्तु....तुम्ही देखील ते अतिशय छान जपलं आहे. वाह....वाह.....!!..

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 Год назад

    खूपच सुंदर ,खूप समाधान झाले हे सर्व बघून, फारच छान.

  • @manojkhawale4945
    @manojkhawale4945 Год назад

    खरच मन भरून आले..🙏👍