संगीतकार श्रीधर फडके यांचा नवीन अल्बम 'तोच मी' याची ओळख करून देत आहेत मधुरा गोखले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 14

  • @AmitChakradeo
    @AmitChakradeo 11 месяцев назад +1

    वा! दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्हा संगीतरसिकांना ही अप्रतिम भेट दिली आहे श्रीधरजी आणि मोहनजी यांनी! अतिशय सुंदर जमली आहेत सगळीच गाणी. सुंदर शब्द आणि त्याला खूपच समर्पक अश्या संगीताची आणि गायनाची साथ यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या आटविलेल्या दुधासारखा हा दुग्ध शर्करा योगच जुळून आलेला आहे!
    5:42 तोच मी - सुरेश भट आणि मंदार चोळकर यांची ही कविता - कुठे सुरेशजी थांबतात आणि कुठे मंदारजी सुरू होतात हे अजिबात कळत नाही. अतिशय हळूवार अशी ही चाल श्रीधरजींनी खूपच सुंदरपणे गायली आहे. यातील तोSSच या एका शब्दामध्ये स्वरांचा जो प्रवास घडवला आहे तो खुपच छान आहे!
    15:47 दिवसा ढवळ्या - ग.दि. मा. आणि शांताबाई शेळके यांचे हे गीत बैलगाडीच्या ठेक्यावरून आपल्याला गावाकडे घेऊन जाते. मधुरा दातार यांनी हे गाणं खूपच छान ठसक्यात गायले आहे - आशा भोसलेंची आठवण नक्कीच येते, पण त्यांनी हे आव्हान छान पेलले आहे.
    19:18 रमेना गमेना - का कुणास ठाऊक, पण प्रवीण सवण्यांचे हे गाणं आशाताईंच्या घनराणी या गाण्याची आठवण करून देते. आर्या आंबेकरने हे गाणे खूपच छान गायले आहे.
    26:05 दारी टक टक - लावणीचा गोडवा शरयू दाते यांनी खुपच छान पोचवला आहे.
    31:59 - षड्ज ज्याच्या कंठातुन - खूप सुंदर ताना आणि अप्रतिम गायलं आहे शिल्पा पुणतांबेकर आणि श्रुती विश्वकर्मा यांनी!
    37:48 दिडदा दिडदिडदा - मजेदार शब्द आणि सतारींच्या सुंदर सुरावटी.

  • @sanjaypoman2769
    @sanjaypoman2769 Год назад

    Shidharji Dhanyawad !!

  • @ratnasathe18
    @ratnasathe18 Год назад

    आमचे भाग्य आम्ही बाबूजींची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो
    आणि आता तुमची पण गाणी ऐकत आहोत

  • @shailukul7485
    @shailukul7485 Год назад

    खूपच मस्त अप्रतिम सौ शैलजा कुलकर्णी

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Год назад

    खूप सुंदर ❤ प्रतिक्षा ❤❤❤

  • @SurekhaPande-m6p
    @SurekhaPande-m6p Год назад

    स्वरवेल हा अल्बम अपलोड करावा कृपया

  • @ravindradeshpande1462
    @ravindradeshpande1462 Год назад +4

    विभावरी आपटे जोशी यांना एखादे गाणे द्यायला पाहिजे होत अस मला वाटत.

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 Год назад +2

      नक्कीच १००%सहमत. खुप गोड आवाजाची गुणी गायीका आहे विभावरी आपटे.

  • @amitavartak1553
    @amitavartak1553 Год назад

    Looking forward to it

  • @amitavartak1553
    @amitavartak1553 Год назад

    Toch me...aprateem chaan ani preyasi cha varnan kiti premani kelay ani cherry on the cake mhanje tumcha avaaj....Bhatti ekdamach jamlye

  • @sheelab1009
    @sheelab1009 Год назад

    श्रीधर phadkeni बाबूजींची कसर भरून काढली आणि त्यांचा वारसा उत्तम चालवत आहेत. पण वाईट ईतके वाटते ki te फारच नम्र आहेत. ह्या जगात हे चालत नाही

  • @dsumitji
    @dsumitji Год назад

    खूपच सुंदर❤
    आतुरता ' तोच मी ' ची

  • @milindjoshi3600
    @milindjoshi3600 Год назад

    सगळीच गाणी सुंदर! पण त्यातही दिडदा सर्वात जास्त जमलंय असं वाटलं.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 Год назад

    दिडदा,दिडदा बाबुजींच्या "तुझे गीत,गाण्यासाठी सुर लावू दे मधे आलाय.झरयातुनी दिडदा दिडदा वाजते सतारी.