कोकणातील अपरिचित ऐतिहासिक गड आणि गडावरील रहस्यमय गुहा । एक रहस्यमय गाव "चाफेड"। जंगल सफर । Adventure

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • अपरिचित ऐतिहासिक गड आणि गडाच्या प्रवेशद्वारा कडे असलेली एक रहस्यमय गुहा । एक रहस्यमय गाव "चाफेड" । जंगल सफर
    देवगड तालुक्यातील चाफेड हे निसर्गरम्य गाव नदीकाठी वसले आहे. नदीच्या पलीकडे कणकवली तालुका सुरू होतो. अशा या गावात पूर्वेकडील भागात समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० फूट उंच असा डोंगर आहे. या डोंगराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. ‘दुर्गाचा डोंगर’ असे पूर्वीपासून म्हणतात.
    गडाचा परिसर सुमारे २० एकराचा असल्यामुळे तसेच मोठमोठी झाडीझुडपे, वेली वाढल्यामुळे चालताना अडथळा निर्माण होत होता. सर्वप्रथम नजरेस पडली ती घोडे पाणी प्यायची ती जागा. तिला पाग असे म्हणतात. सुमारे पाच फूट खोली असलेली गोल छोटी जणू विहीरच भासत होती. या विहिरीला बांधकामामध्ये चुना वापरलेलाही दिसून येतो. त्यानंतर गडाच्या मधोमध पूर्वेकडे बुरुजाचे ढासळलेले बांधकाम दिसते. गडाची तटबंदीही ढासळलेली आहे. गडाच्या मधोमध एक मोठा चौथरा आहे. या चौथ-याला राजवाडा असे म्हणतात. पूर्वी इथे राजवाडा होता असे म्हटले जाते. या चौथ-याच्या बांधकामाचे दगड कोरीव असून तीन पाय-या आहेत. यानंतर दोन मोठे हौद दृष्टीस पडतात. या दोन्ही हौदांची लांबीरुंदी, खोली ४० फूट आहे. चौरस-चौरस अशा या दोन्ही हौदात खूप झाडी वाढलेली आहे.
    या गडाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असून प्रवेशद्वार जांभ्या दगडात नक्षीकाम केलेले असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेक-यांना बसण्यासाठीची जागा आहे. बाजूलाच भलेमोठे भुयार आहे. याबाबत माजी सरपंच आकाश राणे यांनी माहिती दिली की, हा संपूर्ण गड पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षित असला तरी या गडाचे माहात्म्य मोठे आहे. या गडाच्या (डोंगराच्या) आत काय काय लपलेले आहे याचे संशोधन होणे गरजेचे आहे. या भुयाराच्या आत ५०० माणसे बसतील एवढी जागा असून आत चोरवाटाही असू शकतात.
    पूर्वी इथे लपण्याचे ठिकाण किंवा गुप्तचर्चा करण्याचे ठिकाण असावे. त्यामुळे संशोधन आणि उत्खनन झाल्यास ऐतिहासिक दस्तऐवज किंवा इतर काही मौल्यवान वस्तू नक्कीच सापडतील, असे सांगितले. याच गडावरून उत्तरेला कोळोशीचे ऐतिहासिक निशाण टेंब तर दक्षिणेला साळशीचा सदानंद गड पाहाता येतो.
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs

Комментарии • 146