म्हातारपणी आजारी पडल्यावर कोण करणार... मुले जवळ नसतात... परदेशी जातात...परत येत नाहीत..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • म्हातारपण आल्यावर, at old age, happy and healthy life at home, dr anagha kulkarni
    #म्हातारपणआल्यावर
    #atoldage
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Комментарии • 245

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 8 месяцев назад +8

    जोडीदार असे पर्यंत ठीक आहे. दोघे असताना सगळ सुचत आणि पर्याय पण सुचतात. पण दोघांपैकी एक जातो तेव्हा काय करायच. ते पण साठीत. पैसा असतो पण एकटरहाण्याचं धैर्य नसतं अचानक शॉक लागतो. आजर पण असेल तरी मनाची पूर्व तयारी करू शकतो पण जेव्हा अचानक सगळ होत तेव्हा काय? पैसा असला तरी सोबत हवी ना? ऑपरेशन असलं तर कोणी तरी बरोबर हव ना? आजू बाजूचे जोडून ठेवलेले उपयोगी पडतात नाही असं नाही. आम्हांला आजपर्यँत चांगलेच शेजारी भेटले. आपल्या स्वभावावर अवलंबून असत सगळ. पण नेहमीच असं होईल असं नाही कोणाच आयुष्य किती असेल कोणी सांगू शकत नाही एखादी व्यक्ती खूप वयस्क असेल कि ती स्वतःला सावरू शकत नाही. तिच्या कडे पैसा भरपूर आहे पण जोडीदार नसेल अशा वेळी काय?पैश्याच्या बाबतीत कोणावर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा. जे एकटे पडलेत त्यानाच हे पटेल स्वतः त्याच्यातून गेल्याशिवाय हे इमॅजिन करू शकत नाही कोणीच.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 4 месяца назад +7

    म्हणुन पालकांनी हीं जास्त मुलांना बाबू, बाबू न करता स्वतःची life enjoy करावी नाही तर करण्यात सर्व वेळ जातो मग स्वतःसाठी वेळ उरत नाही.....

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Год назад +19

    शक्यतो कुणावर अवलंबून राहू नका हा विचार खुप छान गरज पडल्यास आजूबाजूच्या ज्येष्ठांनी शक्य तेवढी एकमेकांना मदत करावी

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Год назад +14

    आम्ही कधीच अशा अपेक्षा केले नाही पण सुना चांगल्या नाही बाहेरच्या खयाली पुलवाचे जास्त वेड असते नादत नाही त्या नवऱ्याचे नाही काय करत तर त्या सासू सासऱ्याचे काय करणार मित्र मैत्रिणी व सूनाना त्याचे आई वडिल पाहिजे असतात त्यांचे करायला आवडते सासूसासरे नको संपत्ती हक्क अधिकार पाहिजे असतो मँडम एकदम बरोबर बोलत आहात एकदम शंभर टक्के खरे आहे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Год назад

      Agadi barobbar ase barecha thikani asate sagalikade nahi

    • @anjalishukla2463
      @anjalishukla2463 6 месяцев назад +1

      अगदी बरोबर आहे तुमच

    • @rajnidhore2623
      @rajnidhore2623 5 месяцев назад

      मला खुप आवडले तुमचे विचार पण दोघांपैकी एक जण गलेल असेल तर काय करायच

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 Год назад +25

    या सगळ्या समस्यातुन काहीतरी सुवर्ण मध्य काढता आला पाहिजे...आणि आई वडीलांनी मनाची तयारी करावी..आणि आजारपणात काय होईल याचा विचार करण्यापेक्षा सर्व परमेश्वर वर सोडुन द्यावे भविष्यात जे होईल ते होईल..फार विचार करुच नये...कधीतरी भिती आणि काळजी वाटते

    • @amrutaathawale9419
      @amrutaathawale9419 11 месяцев назад +1

      Very good.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 месяца назад

      हो देवा वर श्रध्दा असली,प्रेम असले म्हणजेच भक्ती असेल तर देव कोणाच्या ना कोणाच्या रुपात येवून मदत करतोच.

    • @varshasidhwa4166
      @varshasidhwa4166 2 месяца назад

      Chhan vichar tumhi kasle dr. Ahat?

  • @queenroopali
    @queenroopali 9 месяцев назад +5

    मला हे पटत नाही... म्हातारपणी मुलांची गरज भासते..... मुलांनी काही करायला नको असेल तर मग लग्न आणि संसार कशाला पाहिजे

  • @anuambardekar5864
    @anuambardekar5864 Год назад +10

    अनघाताई आजचा व्हिडिओ आवडला व खूप काही शिकवून गेला .मनापासून धन्यवाद‌

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 Год назад +11

    दोघातील एकटा राहिल्यावर अधिक विचार करण्याची गोष्ट आहे.प्रत्येकाला एवढे मनोधैर्य असणे व आजारपणाचा प्रश्न..हाही एक विचार भेडसावतो.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад +3

    आपला देश इतका सुंदर आहे की तुम्ही नियमित देवापाशी एकच प्रारथना करा कि नीरव्यंग ठेव
    देवप्रारथना हा आपला संस्कार
    हे शक्य करण्यासाठी आहार व्यायाम निर्मोहीपणा हे पक्के ठेवसायचे हे झाले स्वानुशासन । खरंच जर एकटे राहावे लागले तर या 2 गोष्टीची तयारी असली की अत्यल्प तयारीने " चला नर्मदा परिक्रमा करू " सर्व सुंदर होतेच
    शेवटी मृत्यू -- हे विसर्जन आहे । आपला मृत्यूनंतर देहाचे काय व कोण करेल याचा विचार कशाला ? विचित्र वाटेल पण हे मस्त आहे । पडल्या जागी झोप लागते तर जे आश्रमात जेवायला मिळते ते पचते ही ।विश्वास ठेवा आपण कोणाचे वाईट करू नये बस

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Год назад +4

    मुले म्हणजे म्हातारपणीची काठी हे मनात ठेवुन मुलांना जन्माला घालत असाल तर तुमच्या सारखे स्वार्थी दूसरे कुणी नाही.

  • @swapnapote5309
    @swapnapote5309 Год назад +6

    खूपच छान
    माझ्या विचारांनशी खूपच मिळते,जुळते
    ही reality आहे
    परमेश्वरा कडे हेच मागणे आहे
    ,"इतकी शक्ति हमे दे ना दाता
    ,मन का विश्वास कमजोर हो ना

  • @surekhasonwane5490
    @surekhasonwane5490 Год назад +12

    अगदी बरोबर विचार आहे आजच्या काळात असच रहायला हवं,,

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 7 месяцев назад +4

    आमच्या बाजूच्या बिल्डिंग मधे एक आजी आहेत आता त्या नव्व द वर्षाच्या आहेत. त्यचे दोन्ही मुलं सुना क्वाली नितच रहातात त्या एकट्या रहातातमधे त्यांचा पाय फॅक्चर झाला होता चालता येत नव्हतं वर्षभर जागेवर होत्या. सुना असूनही त्या मुलांकडेगेल्या नाहीत. सकाळी एक मुलगा जेवण घेऊन जायचा. रात्री मोठा मुलगा झोपायला जायचा. दोन्ही मुलं नास्ता जेवण पुरवायचे. त्या स्वतःच्या घरात राहिल्या. मुलांकडे गेल्या नाहीत आतात्या चालतात फिरतात अजुनही व्यवस्थित आहेत. पण जर म्हणाल्या असत्या
    मुलांना नको कळवूया तर चाललं असत का? कोणी केल असत सगळ.? तीन महिने त्या जागेवर होत्या. सगळ करावं लागत होत. अशा वेळी एकच उपाय सगळल्याना लागू पडत नाही सगळ्या बाजूनी विचार केला तर हे सगळ्यांना लागू पडत नाही कुठलाही प्रसंग येत नाही आणि आला तरी जोडी दार असतो त्यांना हे कळणार नाही. स्वतः त्यातून जातो त्यालाच कळत.

  • @kishorwarekar5869
    @kishorwarekar5869 Год назад +7

    हा व्हिडिओ बघून फार भावना विवश झालो त्या दोघांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल

    • @vaishalibhagwat4898
      @vaishalibhagwat4898 Год назад +2

      खर आहे पण hach aajar ८०/८५ varshi zala tar kasa karaych teva tevdhihi takad nasel kadachit वृद्धाश्रमत pan khup paise Mojave lagtat

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Год назад +1

      Tai he bolayla sopp pn pachvayla farach kathin. 😔

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 4 месяца назад +1

    ताई खुप सवेंदनशील विषय हाताळत आहात...
    काही जण उचभ्रू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि पत्नी चे पण अचानक जाणे असून सुद्धा पुणे सारखे ठिकाणी एकटे राहणं आलं आहे....
    खुप वाईट वाटतं या गोष्टी ऐकून.
    पालक रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवतात शिकवतात पण पुढे त्यांच्या वाट्याला असं एकाकी जगणं पाहून वाईट वाटतं....

  • @userww--aa
    @userww--aa Год назад +5

    मॅडम, तुम्ही सांगितलेली गोष्ट खूप प्रेरणादायी आहे, पण जोडीदार नसेल तर माणसानी काय करावे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. आपल्या देशात वृद्ध व्यक्तींचा प्रश्न फार जटील आहे. त्यावर सोपे उत्तर नही. परमेश्वराच्या मनात असेल तसं होणार.

  • @chhayachaudhari8242
    @chhayachaudhari8242 10 месяцев назад +1

    मॅडम,तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते .खूप खूप छान असतात , असं वाटतंय की, हे सगळं आपल्याच आयुष्यातील प्रसंग आहेत ,दररोजचे विषयही वेगळे आणि सध्याच्या चालू स्थितीवर असतात ,खूप खूप मस्त .👍🙏🙏🙏

  • @manishabhave2900
    @manishabhave2900 Год назад +4

    ताई आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहे त्यातले प्रत्येक वाक्य अगदी खर आहे त्या दादा सारखेच विचार असायला हवे पण अस इतकं स्पष्ट सागणे सर्वानाच नाही ना जमत बर असो 🙏🙏खूप सुंदर धन्यवाद 🙏

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 9 месяцев назад +2

    खूप प्रॅक्टिकल आणि आताच्या काळाला अनुसरून विचार आहेत. पण मला असं वाटते की, मुलांनी आपली सेवा करण्याची तयारी दर्शवली तर आपण ती नाकारू नये. ते मायेने जे आणि जसे करतील, ते गोड मानून घ्यावे. पण मुलांना नाही जमले तर त्यांच्यावर नाराज राहू नये. ते स्वीकारून स्वतः खंबीरपणे उभे राहावे.
    त्यातही आपली खरी जबाबदारी ही आपल्या मुलगा आणि मुलगी यांची आहे. सून आणि जावयाची नाही, याचे भान ठेवावे. सून जावई आपल्यासाठी जे काही करतात, ते खरं तर बोनस आहे. कारण तशा अर्थी आपण त्यांच्यासाठी काहीही केलेले नसते, जेवढे पोटच्या मुलांसाठी केलेले असते.
    याच मुद्द्यावर आधारित मी ' वेगळं व्हायचंय मला ' ही एक गोष्ट लिहिली होती. जी सोशल मीडियावर सगळ्यांना खूप आवडली, पटली.

  • @ashatarlekar3395
    @ashatarlekar3395 Год назад +12

    शेवटी प्रत्येकाचा नशिबाचा भाग आपण चांगले कर्म करत रहाणे

  • @milansave6274
    @milansave6274 11 месяцев назад +4

    दोघे असल्यास सर्व सहज होते पण मुलगा सून आहेत पण सर्पकातच नाहीत तर अशा एकट्या स्त्रि ने आजपण कसे निभावे?

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 Месяц назад

    उत्तम विडिओ, अत्यंत व्यावहारिक विचार, विशेष म्हणजे स्वतः च्या मुलांच्या विचारसरणीचा योग्य निष्कर्ष.कौतुकास्पद आणि अनुकरणीय.
    येणारा काळ असाच असणार,मुलगा/मुलगी स्वयंपूर्ण झाल्यावर एका वयानंतर होणारे आजार बरे होणार नसेल/सुधारणा होणार नसेल तर भरमसाठ पैसा खर्च करून अधु/परावलंबी जीवन जगणवण ही शिक्षा ठरते, इच्छा मरण पर्याय तीव्रतेने स्विकारावी मानसिकता होते.कोणतेही मोठं ऑपरेशन पेलण्याची क्षमता नसते , वेदना/दु:ख शक्य असेल तर कमी व्हाव्या.अशा वेळी मृत्यू हीच सुटका ठरते, सामोरं जावं, टाळणं अशक्य

  • @shakuntalabhane8987
    @shakuntalabhane8987 4 месяца назад +1

    अगदी बरोबर विचार आहे, ही वस्तूस्तिथी आहे 👍

  • @Nody-um1ix
    @Nody-um1ix 9 месяцев назад

    खूप छान व्हीडीओ . मी तर म्हातारपणी प्रेमाचं कुणी पाहीजे म्हणून मुलगी दतक घ्या म्हणत मिस्टरांच्या मागे लागलेली होती एक महिण्यापासून . तुमचा व्हीडीओ बघून म्हातारपण किती सोपी गोष्ट आहे हे ध्यानात आलं . थँक्यू मैडम

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 Год назад

    अनघा ताई
    आपण जो व्हिडिओ बनवलाय तो फारच सुंदर आहे,सध्या मी व माझी बायको आम्ही दोघेच राहतो,मला एक मुलगी आहे ती व तिचा नवरा आणि मूल अमेरिकेत राहतात,सध्या वयोमानानुसार तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत,मला एक अटेक येऊन गेला आहे व मी माझ्या मिसेस पेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे,आपण सांगितलेले अनुभव हे प्रत्यक्षात माझ्यावर येऊन गेलेत व संपलेले नाही तरीही आम्ही दोघांनी आयुष्य पूर्ण करायचं स्वप्न.ठेवले आहे, व परमेश्वर. सुद्धा मदत करीत आहे.

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 Год назад +7

    काही सुना नातवडं सांभाळून सुध्दा सासू सांभाळत नाहीत माझ्या समोर घडलले आहे मतलबी असतात.

    • @sulabhashelar5017
      @sulabhashelar5017 Год назад

      तुमचे विचार पटले.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Год назад

      Aapale nashib dussre kay? Baherche deshat mulanchi/mulinchi pore bale samalayala jamale tar ja te aapale oldage baganar mag aammi aatta gelecha pahije asa vichar karu naka

    • @jonitalobo4352
      @jonitalobo4352 Год назад

      पहिले मुलांना मोठ करा नंतर नातवंडे का तर मातारपणी बगाव म्हणून हे ठीक आहे मूलानचा काही च करतवय नाही का या पेक्षा मुल नसलेले लोक सुकी

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 7 месяцев назад +1

    तुमचे व्हिडीओ कौटुंबिक वातावरणाला घातक आहे

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 Год назад +3

    खरच छान व्हिडिओ आहे..आणि खरी परिस्थिती असते. वाटते भीक नको. ...👍

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +4

    तुमच्या मैत्रिणी ne खूप छान pratical निर्णय घेतला

  • @nehanaik9090
    @nehanaik9090 Месяц назад

    Madam khup chhan vichar dile . Thank you

  • @ujwalavagdargi1149
    @ujwalavagdargi1149 6 дней назад

    Correct madam tumhi agdi Barobar boltay. Mulanchi asech kurburu asate

  • @sangeetakochale8659
    @sangeetakochale8659 Месяц назад +1

    खुप छान विडीओ असतात

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 5 месяцев назад

    खुप छान व्हिडिओ एक चांगला आणि नवीन मार्ग दाखवला आहे त्या दादा आणि वहिंनीनी मनापासुन धन्यवाद

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 месяцев назад +1

    खुप चांगला अन व्यवहारी बोलण...छानच

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 Год назад +1

    खूप छान उपयुक्त माहिती हे थोड कठीण आहे पण बरोबर आहे
    आम्ही पण आता 60 ल आलो आहोत.

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Год назад +4

    त्या चांगल्या झाल्या ही देवाची कृपा

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 Год назад +2

    माझी पण चार महिन्या पुर्वी अशीच तब्येत खराब झाली होती माझ्या मिस्टर नी महिनाभर सगळ केलं पण मुलाला नाही बोलवलं तु नंतर ये कारण घरात गर्दी होते मी एक महिन्यांनी थोड काम करायला लागले कोणालही त्रास दिला नाही असच करावं नाही का तुमचा व्हिडिओ मला खुप आवडला म्हणून मी माझा अनुभव सांगितला

  • @kavitaromeo6362
    @kavitaromeo6362 Год назад +4

    Very True, today's generation doesn't have any patience to take care of their parents

  • @aashapatil749
    @aashapatil749 7 месяцев назад +1

    खूप च चांगले विचार आहे आम्ही पण विचार करू शेवटी नवरा बायको च एक मेळावा कामाला येतात धन्यवाद

  • @snehalimaye3952
    @snehalimaye3952 Год назад +2

    मॅडम दोघांपैकी एक जण मागे राहिला असेल..तर त्या वेळी तो आजारी पडला आणि नाही केलं त्याच तर अशा वेळी कुणाकडून अपेक्षा करायची....

  • @oldies0609
    @oldies0609 Год назад +1

    🙏🏻आपण सांगत आहात ते तंतोतंत खर आहे.आम्ही ह्या गोष्ठीचा अनुभव घेतला आहे घेत आहोत आणि आम्ही दोघे आहे त्या परस्थितित सुखी आहोत.

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 9 месяцев назад

    आगदी बरोबर आहे छान मार्गदर्शन केला मँडम धन्यवाद❤

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 8 месяцев назад

    आपला जोडीदार असे पर्यंत सगळ सहज सुलभ. स्वतः त्यातून गेल्या शिवाय तो अनुभव येत नाही काही जणी नवरा असताना सुद्धा त्याच्या कडे जास्त लक्ष देत नाही त एकट्या एकट्या फिरून येतात नवऱ्याला घरी एकट्याला ठेऊन मैत्रिणी बरोबर दौ ऱ्या वरजातात त्यांलवकर सावरून डिशिजन घेऊ shktatt

  • @littlechampSwayam
    @littlechampSwayam Год назад +5

    मग जर एखद्याला जोडीदार नसेल तर अशा वेळी काय करायच ही बाजु तुम्ही सांगितली नाही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 9 месяцев назад +3

    सरळ साधे आयुष आत्ता हद्दपार झाले आहे, जास्त विचार करू नये येणार्‍या परिस्थिती la सामोरे जाण्याची तयारी ठेवावे मरणाला आणि आजारी पणाला घाबरून जगू नये

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 9 месяцев назад

    अगदी बरोबर आहे खुप छान मार्गदर्शन । मीळाळे

  • @madhavidanke4669
    @madhavidanke4669 5 месяцев назад

    खूप छान पद्धतीने सांगितले आहे 👍🏻

  • @seemakalle433
    @seemakalle433 Год назад +2

    Super....vichar share kelat thank u so...much.he zale doghehi ekamekana sath deu shakatat pan ekata or ekatich aseltar kay karayche? Hahi seriously vichar vichar ahe.tyavishayavar sanga.pls.

  • @VaishaliShinde-zi4dh
    @VaishaliShinde-zi4dh 9 месяцев назад +1

    Hope, सर्वच नवरे एवढे खंबीर असतील, पैश्याने आणि तब्बेतीने . पण खरच खूप कौतुक वाटलं तीच्या नवऱ्याच.. पैसा तब्बेट सगळ असूनही, सेवा करायची भावना पाहिजे

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 4 месяца назад +1

    नमस्कार ताई, आजारी ताईला असा नवरा मिळाले. तिच फार मोठ भाग्य.

  • @purushottampimple1239
    @purushottampimple1239 5 месяцев назад

    ❤❤😊छान अनुभव दिले आहे धन्यवाद ताई❤❤

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 Год назад +4

    Madam,jodi dar nasel tar matra problem ahe. Tya veli kay karayache ya var apan bolave

  • @handelata
    @handelata Месяц назад

    Very very nice!
    Very good thoughts

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Год назад +2

    बरोबर आहे त्यांचा विचार

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 Год назад

    Wah! Kiti Chan vichar ahe. Asa samjudar vichar asel tar Mhatarpan jad watanar ahi. Thank you so much. Pharach ahan.

  • @akshatatakkar9505
    @akshatatakkar9505 10 месяцев назад

    कित्ती छान!!अगदी असेच माझ्या आईचेही विचार आहेत...

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 9 месяцев назад

    VAAA.MAST ahe vidio..khupach chan vatle baghun..vichar chan ahe..keep it up..

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 10 месяцев назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन मॅडम..👌👍🙏

  • @rebeccaharding3320
    @rebeccaharding3320 Месяц назад

    Madam खुपच छान video .

  • @pushpalalitabagde3296
    @pushpalalitabagde3296 4 месяца назад +1

    व्हिडिओ एकदम चांगला आहे 17:09

  • @shrutikasathawane1769
    @shrutikasathawane1769 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @pp-pc6yk
    @pp-pc6yk Год назад +3

    Very good message

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 9 месяцев назад

    अनघा ताई विचार खूपच सुंदर आहेत

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 Год назад +4

    Great 👌 hat's off to them

  • @shreyasshri2308
    @shreyasshri2308 Год назад +5

    प्रेम म्हणून कांहीं असते की नाही?

  • @sandhyatak1885
    @sandhyatak1885 Год назад

    खूप छान माहिती दिली आम्हाला मार्ग दाखवला 👏

  • @yogitakulkarni8048
    @yogitakulkarni8048 Год назад +2

    Patla tumcha bolna... Tya dada ni yogya ch nirnay ghetla🎉

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 Год назад +1

    Khup chhan sangitlat angha tai malahi te patle

  • @user-ot6dv3jb9i
    @user-ot6dv3jb9i Год назад +2

    विचार चांगला आहे. पण मला असा वाटत की तरुण पिढी ला सगळा blame दिला आहे. सगळ्या मदतीची अपेक्षा सुने कडून करून मुलाला जबाबदारी मधून मुक्त करणे चुकीचा आहे. आजकाल च्या काळा मध्ये मुली/सुना सगळ्या जॉब करतात. मुलाच्या एवढ्याच जबाबदारी ची काम त्या बाहेर करतात. तरी पण घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी तिची एकटीची आहे ही mindset चुकीची आहे. मुलीला/सुनेला ऑफिस, मुलं, आई बाबा, सासू सासरे सगळी जबाबदारी देऊन खूप ओवेरलोड करतात. मुलीच्या आणि सुनेच्या करियर ला तेवढाच महत्वा सासू देत नाहीत. तीला एवढंच हवं असतं की तिला घरामध्ये सारखा judge न करता जसा मुलाला सपोर्ट मिळतो तसा तिला मिळवा. Every women tries her best to do everything. Support everyone who is dependent on her. हे एवढा तर सुनेनी केलाच पाहिजे ही गृहीत न धरता तिला जितका शक्य आहे तेव्हडा करू दे. थोडा मुलगा करेल. थोडा मुलगी करेल, थोडा जावई करेल. सगळ्या मध्ये जबाबदारी वाटून दिली की एका माणसावर सगळं लोड येत नाही. हे घरामध्ये पॉजिटिव वातावरण असेल तर सून का नाही सासू सासऱ्यांचा करणार.

    • @asmitakulkarni3734
      @asmitakulkarni3734 Год назад

      Pan मुलगी आई वडिलांचे करताना हा विचार करत नाहीत

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Год назад +6

    पण बायकोचे करताना त्या गृहस्थाना सुद्धा काही झाले तर. सगळे काही सुदृढ नसतात.

  • @milansave6274
    @milansave6274 11 месяцев назад +2

    मॅडम,तुम्हीं सांगता ते पटले पण जर एकटीच स्त्री राहत असेल तर आजारपणात ती कसे निभावून नेईल?

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Год назад

    खूप छान विचार 👌 🙏 धन्यवाद काकू

  • @geetarane1532
    @geetarane1532 8 месяцев назад

    Khup chaan guidance and information

  • @vinitaathakye1939
    @vinitaathakye1939 Год назад

    Khup chaan anubhav sangital ata mazhi mahtarpanachi bhiti geli

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 9 месяцев назад

    खुप अगदी खरेच सांगितले आहे

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 9 месяцев назад

    खूप खूप खूप धन्यवाद .

  • @shobhapawar4222
    @shobhapawar4222 Год назад

    Realy khoop chan ani perfect ahe👌👌

  • @AparnaKulkarni-og6gq
    @AparnaKulkarni-og6gq Год назад

    ताई तुमचे विचार मला खूप आवडतात

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 5 месяцев назад +1

    खर तर ताई माझं मत असं आहे की आपण तरूणपणीच काटकसर करून चार पैसे मागे टाकून बचत केली पाहीजे. आणि जर वाजवी पेक्षा जास्त खर्च होणार असेल तर सरकारी दवाखाने नाहीतर एनजीओ इतर संस्था ज्या काही मोठ्या आजारांवर मदत करतात त्यांना मदत मागितली पाहीजे. कारण खर सांगू का हल्ली पैशाची मदत कुणालाही जमत नाही. आणि कोणी जवळच्या माणसांनी जरी केली तरी ते आयुष्यभर उपकार कींवा ऋण रहातात.
    आणि मग त्या ओझ्याखाली माणूस दबून तर जातोच. पण ज्यांनी मदत केली आहे ती व्यक्ती समोर आली तरी ते फार अवघडल्यासारखे होते.
    त्यामुळे वेळीच चार पैसे मागे टाकलेले बरे. जवळच्या माणसांची मदत म्हणजे थोडीफार डोकेदुखीच होऊन बसते. कारण ती आपणही विसरू शकत नाही आणि ते ही विसरू शकत नाहीत.
    हल्ली कोणी इतका उदार नातेवाईक भेटणे कठीण की जो नेकी कर और कुँवे में डाल समजणारा. जो आर्थिक मदत करतो त्याच्या मनात हे असतेच असते की आम्ही मदत केली म्हणून आज हे जगत आहेत.
    हे कटू सत्य आहे.

  • @mandasupare6461
    @mandasupare6461 9 месяцев назад

    Khup sunder thinks ahe madam

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 11 месяцев назад

    Tai, khup chhan video, khupch aavdala..

  • @smitatoraskar2699
    @smitatoraskar2699 9 месяцев назад +1

    मला वाटते हे काही होत असते ते मागच्या जलमीचे भोग असते सर्व सुख नशिबाने भोगायचे असतात तुम्हाला धन्यवाद 🙏

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 Год назад +5

    मुले व मुली यांच्याशी अटॅचमेंट असते. त्यामुळे ते जावळ असले तरी धीर येतो.

    • @MariyamGs
      @MariyamGs Год назад

      Nice motivation.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Год назад +3

      आपले अटॅचमेंट असते मुलां बरोबर, पण त्यांची पण तेवढेच असायला पाहिजे ना! आणि मुलाची असली तरी सुनेची असेलच असं पण नाही ना.आणि सुनेची इच्छा नसेल तर मुलगा एकटा काहीच करू शकत नाही !हे आत्ताच मॅडम मी सांगितलं ना

  • @bhagyashrideshpande1572
    @bhagyashrideshpande1572 Месяц назад

    कुणालाच मुलांवर अवलंबून राहायला आवडत नाही.पण जोडीदार गेल्यावर आणि पैश्याचे पाठबळ ही नसल्यावर नैलाजच होतो की हो.अशावेळेस त्या म्हाताऱ्या माणसांना काय करावे?

  • @awantiphaltankar4370
    @awantiphaltankar4370 День назад

    Mam udya mulawar he vel aali tar aai vadil yenaar nahi ka mulakade

  • @vaishaligawai556
    @vaishaligawai556 Год назад +2

    Madam , ha advise phakt tyach lokansathi ahe , jyanchya javal paisa ahe ,kiva tyana pention vagere chalu ahe. Jyanchya kade hya kahich babi nastil tar tyana tar mulanvar depend rahave lagel n.
    Ani brechda asehi disun ale ki apla jodidar ch aplyapasun vela rahto . Bhava bahinichech aikto. Teva ektya stri ne kase jagayche. Tila tar mule ani sune chyach bharavshyavar rahave lagel ki nahi . Pls. Madam hyavar video banva

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 Год назад

    Khoop chaan mahiti ahe.
    Iekte rahachi savay kerala havi..

  • @user-hd4ij6wc6h
    @user-hd4ij6wc6h 2 месяца назад

    जेव्हा दोघे असतात व दुसरी व्यक्ती खंबीर असते तेव्हा ठीक आहे पण एकच व्यक्ती उरली व आजारी पडली तर काय करायचे

  • @pallavil6189
    @pallavil6189 Год назад +2

    बरोबर boltay ,if kids consider upkar then no need to come, perfect thoughts of husband

  • @meghanasawant8440
    @meghanasawant8440 Год назад +2

    Madam video baghun mala pudhchy fucharchi kalji mitali karana amhi doghach ahot mule nahit ajun amhi yung ahot pun mala perna milali ha video baghun Thynku madam

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Год назад +1

    खरच खूप चांगला विचार मांडला,प्रत्येक म्हंताऱ्या जोडप्याने खंबीरपणे राहिले पाहिजे, तूम्ही शेअर केलेत,त्या बद्दल धन्यवाद

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 5 месяцев назад

    Khupach chhan vichar ahet

  • @harshalavaidya7931
    @harshalavaidya7931 Год назад +3

    प्रत्येक नवरा बायकोची सेवा करतोच असं नाही आणि आपण सुरुवातीला बोललात कि सासु सासरे आमची मुलं सांभाळायला आले नाहीत मग सुन नोकरीवर असेल तर किती फजिती होते हे मला चांगले अनुभव आले मग म्हातारपणी त्याच कसं करण्याची इच्छा होईल ते
    ती वेळ आठवते

    • @neelesh8158
      @neelesh8158 Год назад

      ही पण परिस्तिथी काही ठिकाणी आहे, आमच्या मातोश्री त्यात तून वाचली कारण आजाराच निदान लवकर झाल 3-4 opinions घेतले गेले आणि जोडीदाराने त्या वेळी साथ दिली नाही..

    • @seemapatil6294
      @seemapatil6294 Год назад

      mastch, asech saglyani vichar karayla hava

    • @maheshwarikulkarni8569
      @maheshwarikulkarni8569 Год назад +1

      हे दोघे असतानाचे ठिक आहे, एकटे असताना कस करावे ते सांगायला हवे

    • @archanagangwe4996
      @archanagangwe4996 Год назад +1

      नोकरी जमते नसेल तर घर काम करा

  • @ramchandradesai2145
    @ramchandradesai2145 5 месяцев назад +1

    याला जबाबदार काही आईवडील ही असु शकतात, जे स्वतः च्या महत्वकांक्षेपोटी मुलांना त्यांची जबाबदारी देतच नाहीत,

  • @seemakulthe9943
    @seemakulthe9943 Год назад +3

    मला तुमचे सगळे विचार पटले आहे पण ते दोघेहोते पण दोघांपैकी एकच जण कहककसए करा तरआणि असेल तर

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Год назад +1

      Hoy ho mala pan asecha vatate kadhi kadhi😕

  • @rajanikakade6704
    @rajanikakade6704 Год назад

    Amhi aasch vichar kela ahe madam .

  • @veenasapkal594
    @veenasapkal594 Год назад

    Kup chan old age cha bau n karata strong kas rahaych he samjale thank you andha madam

  • @latagawade2375
    @latagawade2375 Год назад

    खूप सुंदर विषय 👌👌

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 9 месяцев назад +1

    Mala वाटते he उगाच swatantrateche धडे चुकीचे आहे, maze आईवडील दोघे hi मोठ्या आजारांनी ग्रासलेले आहेत़, वडिलांचे आठवड्यातून दोनदा dialysis असते aani आईला liver cirrhosis, hernia,thyroid vagaire aajar aahet, तरीही ti त्यांच्या sobat jate dialysis साठी. आमच्याकडे 6 महीने राहून गेले pan त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणीच राहावेसे वाटते. एवढ्या वर्षांची ऋणानुबंध माणसांशी aani वस्तूशी hi. शिवाय mala स्वतः la hi वाटते ki te मोठ्या shaharat राहतात, tya comparison madhe amhi tase छोट्या शहरात राहतो tar medical facility तितकी चांगली aani विश्वासपात्र नाहिये ईथे. Maza भाऊ परदेशी असतो,त्याचे लग्न ही zale नाहिये, te hi हाच विचार करतात त्याच्या प्रगती madhe आमची adachan नको. कधी kadhi खूप rag येतो aani tras pan hoto ह्यात माझ्या आईची जास्त फरफट होते. 😢
    Tya ulat आमच्या सासुबाई, nehmi म्हणतात काहीही झाले tari mi kahi मुलांना सोडून रहाणार नाही. खरच kiti hakkane बोलतात aani असाच asale पाहिजे.
    Jo पर्यंत जमतय to पर्यंत he स्वातंत्र्याचे धडे गिरवता येतात, shevti कितीही पैसा असला तरी velela manase लागतातच. Aani आपल्या मुलांना सुनेलाही ह्याची जाणीव karun दिलीच पाहिजे.उगाच amhi bai आमचे पाहू तुम्ही tumche bagha एवढ्या udar matamulech विभक्त कुटुंब paddhat जन्माला aali आहे. सर्वांना स्वातंत्र्य पाहिजे कुणालाही जबाबदारी nako agdi sasu sasaryanna सुद्धा.
    आणि javai आणि मुलगी नेहमी परकेच असतात. Atleast जबाबदारी टाकायच्या बाबतीत सुद्धा.

  • @latanawale9906
    @latanawale9906 6 месяцев назад

    बरोबर सांगताय मॅडम