सुबक आणि नाजूक अशा २१ कळ्यांचे उकडीचे मोदक शिका | Ukadiche modak | Leena's sugrankatta
HTML-код
- Опубликовано: 29 ноя 2024
- #उकडीचेमोदक #मोदक #नेवैद्य #२१कळ्यांचेमोदक #पक्वान्न #गोडपदार्थ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी #निहारमोदक
उकडीचे मोदक
खोवलेला ताजा नारळ ५०० ग्रॅम
गूळ ३५० ग्रॅम
साजूक तूप १ चमचा
वेलची पूड १ चमचा
इंद्रायणी तांदळाचे पीठ ३५० ग्रॅम
(किंवा तांदळाचे पीठ २ मोठ्या वाट्या भरून)
पाणी - जेवढे तांदळाचे पीठ असेल तेवढेच पाणी घ्या.
मीठ चवीपुरते
तेल १ चमचा
सारण:
पातेल्यात १ चमचा साजूक तूप घालून त्यात बारीक चिरलेला गूळ घालून गॅस वर वितळवून घ्यावा. त्यात खोवलेला ताजा नारळ घालून नीट मिक्स करून घ्यावा. सारणाला आधी चिकटपणा येईल व नंतर ते थोडे कोरडे होईल. तसे झाल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालावी.
उकड:
जेवढे तांदळाचे पीठ घ्याल, तेवढेच मोजून पाणी घ्यावे.
गॅस वर पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ व १ चमचा तेल (तुम्ही तूप किंवा लोणी पण घालू शकता.) घालून उकळी येऊ द्यावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. नंतर दोन मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून उकड तयार करावी.
त्यानंतर उकड एका ताटात काढून गरम असतानाच पाण्याचा हात लावत एकदम मऊसूत मळून घ्यावी. शेवटी तेलाचा हात लावून मळावी.
पारी:
मळून झालेल्या उकडीचे लिंबाएवढे एकसारखे गोळे करून घ्यावेत. मग एक गोळा करून त्याची पातळ पारी करावी. पारी करताना तेलाचा व पिठाचा हात लावून पारी करावी. पारीच्या वाटीत पिठाच्या गोळ्या एवढेच सारण भरून एकालगत एक कळ्या पाडून, वाटीचे तोंड मिटून मोदक तयार करावेत.
मोदक:
मोदक पात्रात पाणी घालून उकळून घ्यावे. तयार केलेले मोदक मोदकपात्रात १० मिनिटे वाफवून घ्यावेत. नंतर मोदक थोडे गार झाल्यावर बाहेर काढावेत.
आपले सुरेख असे उकडीचे मोदक तयार आहेत. साजूक तुपाबरोबर खाण्यास द्यावेत.
सुरेख कळीदार मोदकांसाठी व तयार दिवाळीच्या सर्व फराळासाठी नूतन ताईंना संपर्क करा.
सौ. नूतन चंद्रशेखर वैद्य
'निहार मोदक व मंगल आहार'
मु. पो. गणेशनगर, जालगाव,
दापोली, महाराष्ट्र.
9673806671
9975455532
9158532220
9423831853
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
बघतच राहावे असे मोदक
छान छान छान
आई शप्पथ इतके सुरेख,, नक्षीदार मोदक वाफाळलेले पाहताना जे सुख मिळालं ना ते नाही सांगू शकत अतिशय नाजूक आणि स्वादिष्ट वाह खूप छान वाटलं पाहून... खरच नूतन ताई चे आभार आणि तुमचेही❤❤❤🙏🙏🙏
नूतनताई लिनाताई खूपच छान व सुंदर उकडीच्या मोदकाची रेसीपी दाखवलीत.दोघींचे अभिनंदन वधन्यवाद.
अतिशय सुंदर मोदक .गणपती बाप्पा ची कृपा आहे ताई वर.
Khupach sundar👌👌👌👍 Thanks to you both 🙏
Khup chan
खूप सुंदर आणि सुबक मोदक आहेत👌🏻👌🏻
खरोखर हाताचं कौशल्य आहे।अप्रतीम
खूप छान , दोन सुगरणी एकत्र पाहिल्या, साध्या सरळ गोड स्वभावाच्या दोघींना लाख लाख धन्यवाद आणि शुशभेच्छा
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे
Great 👌👌🙏
👌👌❤
खरच मोदक करताना पाहणे नयनसुख आहे.नुतन ताईंना सलाम.
Keeti sunder ❤
Khoop khoop chhaan
अप्रतीम... हा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद..कला आहे हातात तुमच्या..हे आमच्यासाठी helpful आहे...हे पाहताना नेत्रसुखद अनुभव..खुप वेळा पाहिला व्हिडिओ तरी मन भरत नाही ❤
खुप सुंदर बनविले आहे, छान
अप्रतिम, सुंदर,सुबक मोदक झालेआहेत.
अतिशय सुंदर झालेत मोदक
नूतन ताईंची कला बघून खरच चाट पडायला झाले. मोदक अप्रतिमच झालेत. लीना ताई तुम्हा दोघीं नाही खूप, खूप धन्यवाद
ताई सुंदर करतात .त्यांच्या कलेला प्रणाम.
Khup khup subak aani sunder 👍👍
खूपच सुंदर. एकदम अप्रतिम.
केवळ अप्रतिम कलाकुसर आणि दैवी देणगी आहे, नुतनताई खूप खूप कौतुक आहे तुमचं.. सुगरण तर तुम्ही आहातच,
सुग्रास पदार्थ सगळ्यांना खाऊ घाला... खूप धन्यवाद, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...
Khupach sunder layaway superb Modak bappa khush hot asel subah Modak baghun Nutan Tai hats off Ani ashya sunder receipysathi ty❤
Khupach chhan 🙏👏👌☝️👍modak surekh jhalet sopi padhdhat dakhavali mast ☝️
Atishay sundar modak❤❤
Nutan tie vaidya 👌👌🙏🙏 khup sundar. Dhanyawad.
खूपच सुंदर मोदक अप्रतिम शब्दच नाहीत
खूपच सुंदर अप्रतिम दाखवली आहे रेसिपी, आणि खरोखरंच कौशल्य पूर्ण कृति आहे. दोघींनाही मनापासून धन्यवाद 👌👌👌👌👌🌺🌺🙏🙏
अतिशय सुंदर झालेत मोदक ❤👌
Superb mouth watering madak banawta tumhi😋😋👌👌👌
Nutan Tai aapn khupch Sundar modak banvlet apratim
गणपती बाप्पा मोरया छान मोदक बनवला ताई🙏🌺
Nutan tai khup sundar dakhavle modak
nutan tai thanks tumhi khup chaan recepi dakhavli ❤
खुप खुप छान विडीयो होता सुरेख मोदक अप्रतिम मोदक ❤❤❤
Atishay sundar modak ganpatibappa ekdam khush
केवळ अवर्णनीय. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही पाककृती बघण्याचा योग आला. आपल्या दोघींचे आभार. नूतन ताईंच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
Thank you vahini tumchi recepi baghun me modak kele khup chan zale
😳😳😳😳,,Amezing waaaaoooo,,,,Speachless
खूपच सुंदर, गणपती बाप्पाचा छान आशिर्वाद पाठीशी राहो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना...😊👍👍👌👌❤❤
मोदक अप्रतिम खूपच सुंदर अभिनंदन
Khup chan modak banavale aahet 👍
Khupch chaan.. Recipe share kelya baddal dhanyvad
खूपच छान मोदक बनवलेत, दिसत तरी भारी आहेत खायला भेटले असते तर अहहआहाहाहा
Rutan taena 🙏🌹khupach chan modak
काय म्णायचंय तेंची मेहनत आणि साधे पण अप्रतिम ❤❤❤❤❤❤
खरचं baghyla ही छान वाटते,काय सुंदर ....
खूप सुंदर मोदक बनवले आहेत
खूप छान
दोघींना ही नमस्कार 🙏
अप्रतीम मोदक बनवलेत ताईनी
ताई तुमच्यावर गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होणार 🙏 अतिशय सुंदर मोदक तुम्ही बनवले आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
अप्रतिम.. तुमचा हात जगन्नाथ
खूपच छान उकडीचे मोदक दाखवले आहे कळ्या पण छान पाडलेत सुंदर अप्रतिम छान
धन्यवाद
नूतनताई दिवाळीचा सगळा फराळ, अळूवडी,फणसाचे सांजने खूप छान बनवते. ताईच्या हातची पुरणपोळी आणि मोदक याला जास्त मागणी असते.आमची ताई खरच सुगरण आहे, तिने जरी साधं जेवणं घाईत बनवले तरी त्याला छान चव असते, आणि विशेष म्हणजे ती पदार्थ बनवण्यासाठी जे साहित्य वापरते ते चांगल्या प्रतीचे असते, स्वच्छता टापटीप एकदम एक नंबर👌🏻👌🏻.
Khupach apratim modak zalet sangnyachi padhathikhup chhan
खूप छान मोदक केले धन्यवाद तुम्ही आपल्या च्या लेणवर रेसीपी दाखवली खूप छान 😅😅❤🎉
Hoy apratim astat modak kaku n kadache , me suddha khalle ahet, ani baghitale hi ahet banvatana👍👌
खरोखर बोटात जादू आहे आणि विजेची चपळाई त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम, तुम्हा दोघींना 🙏
खरच सराव कौशल्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे बाप्पा चा आशिर्वाद आहेच पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
अप्रतिम झालेत मोदक.❤👌🏻👌🏻👌🏻💐
अप्रतिम ❤❤मस्त मस्त
नुतन ताई काय तो वेग खूप खूप छान मोदक केले .
वाह मस्त god bless you हातात जादू आहे ताई छान.
नूतन ताईंचे हात जादुगारासारखे आहेत, खूप छान टिप्ससहित व्हिडीओ पाहायला मिळाला त्याबद्दल आभारी आहे 🙏🏻👍🏻
Saran dakhwayla phije hot
Purn methad mahatwach
T
खूप छान बारकव्यांसहित शिकविलात.
खुपच सुंदर आणि सुबक.
Aprtim. khup. sundar 🎉
सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏🙏😍 खूपच छान 👆
खूप छान उकडीच्या मोदकाची रेसीपी दाखवली नुतनताई खुप धन्यवाद
Khup shan ,sundar👌👌
Modak’s were superb but I loved the small girl behind!
खूपच सुंदर.
किती सुंदर मोदक छान छान
Waa खूपच सुरेख दाखवल्या बद्दलढण्यवड
Dhanyawad Leena Tai 🎉
Khup chaan....mast mahiti dilit.....Pithampur aivaji panyane pari keli ter.
खूपच सुंदर मोदक केले आहे.
सुंदर नाजूक साजूक मोदक अप्रतिम एक नंबर
मस्त विडिओ लीना ताई big like tai😊😊😊
Khar che khup chan aamhi 21 jali ke bar vate salam tya tai na👌🙏
Khupch chaan zalet ❤
Ganpati Bappa Morya Khupch Sundar 👌👌👍👍
नुतन ताई लिना ताई खुप छान एकविस कळ्यांचे मोदक शिकवले आम्हाला धन्यवाद
अप्रतिम. खरोखरच नयनसुख
Khup Sundar modak banawile aahet Nutantaine
Apratim khupch chan modak
🙏🙏 बाप्पाची कृपा आहे ताई ,🎉🎉☕☕👍👍👍 काय बोलावे ,फक्त आपल्याकडून ते आदराने शिकावे.धन्यवाद
Khup khup sundar,nayan sukh aamhi hi aaplya mule aananda ghetla
ताई मोदक खुपच सुंदर बनवून दाखविले तुमचे आभार 🙏👌🌹❤
नुतन ताई अतिशय सुरेख ,सुबक मोदक.तुमच्या मोदकांचा भरपूर प्रसार होऊ दे.❤
Khupach chan apratim modak. Thanks
रेखीव, सुबक, रुचकर मोदक आहेत हे
नुतनताईंनी केलेले
इथे आम्हाला बघायला मिळाले
तुमच्या मुळे
दोन्ही सुगरणींवर अन्नपूर्णा अशीच
प्रसन्न राहो 🙏🏻🙏🏻
।छान मेद क ्आहे
Like केलं हो😊😊
Speach less...hattsoff ❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 simple and sweet Nutan Tai
खूप सुंदर माहिती देण्यात आली ❤दोन्ही भगिनींना🙏
खुप सुंदर धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup chan modak zaly nutan and Leena
फारच सुंदर दोघींना धन्यवाद
अप्रतिम सुरेख 👌👌
सुंदर मोदक दाखविल्या बद्दल धन्यवाद 19:35 दोघींचे ही अभिनंदन
खूप सुंदर झाले आहेत मोदक
खूपच छान जादू 👌🏻👌🏻👌🏻
Waaa kiti surekh video baghun khup chan vatle ..thanks Leena mam n modak khup chan banawle Kali padne itkyat barkaine sahaj jamne shakya nahi