How To Make Kolache Bharit || कोळाचं भरीत || मसाला खिचडी || Baingan Bharata || Masala Khichadi ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • How To Make Kolache Bharit || कोळाचं भरीत || मसाला खिचडी || Baingan Bharata || Masala Khichadi ||
    कोळाचे भरीत साहित्य :
    १ मोठं भरताचं वांगं
    दिड वाटी नारळाचं दूध
    २ मोठे चमचे चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे )
    ३ मोठे चमचे गूळ (आवडीप्रमाणे )
    १ छोटी हिरवी मिरची
    मीठ चवीनुसार
    भरीत फोडणीसाठी :
    २ चमचे साजूक तूप
    १ मोठा चमचा जिरं
    १ चमचा लाल तिखट
    १ छोटा चमचा हिंग
    मसाला खिचडी साहित्य :
    १ वाटी तांदूळ
    अर्धी वाटी पिवळी मूग डाळ
    पाव वाटी सालासह मुगाची डाळ
    ४ वाट्या गरम पाणी
    १ चमचा साखर किंवा गूळ
    २ छोटे चमचे तेल
    १ चमचा मोहरी
    १ चमचा हिंग
    १ चमचा हळद
    १ चमचा तिखट
    २ चमचे खिचडी मसाला
    मीठ चवीनुसार
    मसाला खिचडी साठी मसाला साहित्य :
    ४ चमचे जीरे
    १ चमचा धने
    ३ तुकडे दालचिनी
    ४ ते ५ काळी मिरी
    २ वेलची
    १२ लवंग
    वांगी वापरून आपण अनेक पदार्थ बनवतो. भरलं वांगं, वांगी भात, वांग्याची भाजी, वांग्याचे काप, वांग्याचं भरीत असे अनेक पदार्थ वांग्यापासून बनतात.
    वांग्याचा वापर करून आज आपण भरीत बनवणार आहोत. पण हे भरीत आपण नारळाचं दूध आणि वांगं यांचा वापर करून बनवणार आहोत. या भरीताला कोकणात कोळाचं भरीत म्हणतात. अतिशय साधा, सोपा, सहज होणारा पण चवीला मस्त असणारा हा पदार्थ.
    कोळाचं भरीत हे डाळ तांदळाच्या खिचडी बरोबर खातात. डाळ तांदूळ खिचडी मसाला वापरून कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    कोळाचं भरीत हा कोकणी पदार्थ आता खूप कमी ठिकाणी केला जातो. कारण आजच्या पिढीला हा पदार्थ माहित नाही. कोळाचं भरीत हा पदार्थ आज माझी ८६ वर्षांची आई करून दाखवणार आहे.
    तर चिंच कोळाचे वांग्याचे भरीत आणि डाळ तांदूळ वापरून मसाला खिचडी कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    For eggplant bharta :
    1 large eggplant
    1 and half cup coconut milk
    2 tbsp tamarind pulp (to taste)
    3 tbsp jaggery (to taste)
    1 small green chilli
    Salt to taste
    For tempering :
    2 tbsp pure ghee
    1 tablespoon cumin seeds
    1 tablespoon red chili powder
    1 teaspoon asafoetida
    Masala Khichdi Ingredients :
    1 cup rice
    1/2 cup yellow moong dal
    1/4 cup moong dal with skin
    4 cups hot water
    1 teaspoon sugar or jaggery
    2 teaspoons oil
    1 tablespoon mustard
    1 tablespoon asafoetida
    1 tablespoon turmeric
    1 tablespoon chili powder
    2 tbsp Khichdi Masala
    Salt to taste
    We make many dishes using eggplant. Food items that can be made from eggplant are eggplant rice, eggplant vegetable, eggplant slices, eggplant filling. Today we are going to make a bharta using eggplant. But we are going to make this bharta using coconut milk and eggplant. This bharta is called Kolacha bharit in Konkan. This is a very simple, easy, and delicious food item. This eggplant recipe is eaten with rice. You can also see how to make dal rice using khichdi masala in this video
    This Konkani dish with egglplant is now rarely made because today's generation does not know this substance. Today, my 86-year-old mother is going to show us this dish
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    #vaishalideshpande #कोळाचंभरीत #आईच्याहातचं #वांग्याचंभरीत #कोकणीपदार्थ
    #bhajirecipe #marathirecipe
    Topics Covered :
    वांग्याचं भरीत
    वांग्याचे भरीत
    वांग्याचे भरित
    वांग्याचे भरीत रेसिपी
    वांग्याचे भरीत रेसिपी मराठी
    वांग्याचं भरीत कसं बनवायचं
    बैंगन भरता
    चिंच कोळाचे वांग्याचे भरीत
    चिंच गुळातील वांग्याचे भरीत
    कोकणी पदार्थ
    पारंपरिक पदार्थ
    आईच्या हातचं
    कोळाचे भरीत
    मसाला खिचडी
    vangi bharit
    kolache bharit
    forgotten recipe
    kokani recipe
    marathi padartha
    masala Khichadi

Комментарии • 362

  • @priyag1869
    @priyag1869 3 года назад +6

    काय भन्नाट रेसीपी आहे. फारच छान दाखविले. अगदी खावेत वाटले. तुमच्या आईपण इतक्या छान आहेत . त्यांना एकदम अगदी भेटावंस वाटल. बरे झालं मला तुमचा चॅनेल मिळाला व भावला

  • @vidyadhupkar8393
    @vidyadhupkar8393 3 года назад +15

    कोळाचे भरीत, खिचडी आणि ती सुद्धा आईच्या हातची म्हणजे मेजवानीच
    असे साधे पारंपरिक व म्हणूनच पौष्टिक पदार्थ आपण दाखवता ते खूपच आवडतात

  • @manikbidwe2961
    @manikbidwe2961 3 года назад +7

    ह्या वयात उत्साहाने करतात आमचे भाग्य त्यांच्या पाककृती बघायला मिळतात नक्कीच करुन बघणार 🙏🏻🙏🏻👍🏻😋

  • @jyotipathak9994
    @jyotipathak9994 Год назад

    छान पद्तीने प्रात्यक्षिक दाखवताना अनमोल टिप सांगितल्या.खिचडिचा मसाला लय भारी.नवोढा देखिल विडिओपाहून कोळाचे भरीत करु शकेल.धन्यवाद .

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 3 года назад +5

    भरीत व खिचडी एकदम मस्तच वाटली.करून बघायला पाहिजे..

  • @bhaktikpandit
    @bhaktikpandit 3 года назад +9

    खिचडीचा मसाला अख्या युट्युब वर शोधूनसुद्धा सापडत नव्हता. तो तुम्ही दाखवलात, तोही अगदी पारंपारीक पद्धतीने. खूप छान, खूप खूप धन्यवाद.

  • @sunandakulkarni7273
    @sunandakulkarni7273 3 месяца назад

    Mast combination!! Khichdi, n bharit!! 👌👌

  • @shivpriyakitchen6262
    @shivpriyakitchen6262 3 года назад +3

    आपल्या खाद्द्य संस्कृतिचा आरोग्य पुर्णवारसा (थोडासा विस्मृतीत जायला लागला होता) तुमच्या मुळे व आई मुळे परत योग्य प्रमाणा सकट दाखवले आहे.खाद्य वैभव अनुभवायला मिळते आहे.तुमचे व आईचे खुप आभार व शुभेच्छा

  • @neelampawar2788
    @neelampawar2788 Год назад

    तुमची आई खूपच अमेझिंग आहे त्यांच्या रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटते आणि खावेसे वाटते खुपच छान अगदी वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज आहेत मी तुमच्या सगळ्या रेसिपी डाउनलोड करते आणि एका डायरीमध्ये मी सगळ्या रेसिपी लिहून काढत आहे थँक यु सो मच

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 3 года назад

    खूपच सुंदर 👌👌आनंदी खूपच सुंदर रितीने सांगितली. करताना बघूनच तोंडाला पाणी सुटते. वैशाली ताई, तुमचे सर्वच दाखविलेले पदार्थ अप्रतिम. तुम्ही सुध्दा खूपच प्रेमाने पदार्थ सांगता. खूपच मस्तच 🙏🙏

  • @janhavikulkarni5099
    @janhavikulkarni5099 3 года назад +1

    खुप सुंदर

  • @nilimanavale7919
    @nilimanavale7919 3 года назад

    Mast chan vagache barit mastch

  • @amarendramulye
    @amarendramulye 3 года назад

    कोळाचं भरीत आणि खिचडी खूपच tempting झालंय. तुमच्या आई खूपच सुंदर प्रकारे पद्धत सांगतात.

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 2 года назад

    सुंदर खिचडी छान झाली आहे

  • @archanakulkarni9853
    @archanakulkarni9853 Год назад

    Aajji kittii goad aahet...hya vayat pan kiti utsahane sawaympak karat aahet ...hats off ....Dev tyana asach nirogi thevo😊🙏

  • @pankajamoghe1440
    @pankajamoghe1440 3 года назад +1

    रेसिपी शिकविण्याची आईंची पध्दत.. आवाजातली आत्मविश्वासपूर्ण जरब... ह्यावरून त्यांचे स्वयंपाकात असलेले अनुभवसिद्ध नैपुण्य आणि वर्चस्व चांगलेच जाणवते आणि भावते... खूपच छान...🙏🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      होय. माझी आई आजही एकटी कुणाचीही मदत न घेता संपूर्ण स्वयंपाक करू शकते.

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 3 года назад

    Ek no

  • @sangitagurav2211
    @sangitagurav2211 2 года назад

    अफलातून....हा शब्द खरा ठरला 👍👌👌
    भरीत, खिचडी...आजचा मेनू ..खमंग...अप्रतिम 👍
    नेवैद्य दाखवून फोटो ही काढला...👍
    आजी खूप खूप थँक्स...🤝🙏😘💐💐

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. आईला सांगते तुमची कमेंट.

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 3 года назад +1

    वेगळ्या पद्धतीचं भरीत👌

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 года назад +8

    पारंपारिक पद्धतीने तुम्ही दाखवताय ते मला खूप आवडले.

  • @jankimishal6752
    @jankimishal6752 3 года назад +1

    खूप छान .मी नक्की करून बघेन खिचडी .👍मसाले भात रेसिपी असेल आई च्या हातची तरी नक्की दाखवा .अनुभवी माणसाच्या कमेंट सह रेसिपी खूप छान असतात आणि त्याला खूप छान चव ही असते.🙏thanks aaila Ani tumhala pan

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 3 года назад +3

    व्वा ! झक्कास बेत आहे , आईंची कमाल , त्यांचा ऊत्साह बघून बरं वाटलं , त्यांना नमस्कार आणि धन्यवाद

  • @madhukarkhanis5478
    @madhukarkhanis5478 3 года назад +1

    Khupach sunder sadarikaran.Bharit ani khichdi Ter ekdam bhannat

  • @veenagadekar9982
    @veenagadekar9982 2 года назад

    Khupach Chan 👌👌👌

  • @ashwiniwagh7455
    @ashwiniwagh7455 7 месяцев назад

    खूप आवडली 😋

  • @kirtimulye974
    @kirtimulye974 2 года назад

    अरे हे भरीत नवीन आहे मला , काय मस्त बेत केला आहे.
    काकुंना बघून फार आंनद होतो मला, माझ्या आजे सासू बाई आठवतात , नव्वदीत पण त्या अशाच स्वयंपाकघरात उत्साहाने उभ्या राहत असे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद कीर्ती ताई
      खरोखर तुमच्या आजे सासूबाई ग्रेट. कारण ९० व्या वर्षी इतकं फिट राहणं नक्कीच खूप मोठी गोष्ट होती.

  • @sulekhachewle625
    @sulekhachewle625 2 года назад

    वैशाली तुझा आवाज सुंदर व स्पष्ट आहे. रेसिपी पण खूब सहज जमतील असे शिखवते. 👌👍

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 3 года назад

    Kiti chaan

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 3 года назад

    Kup chan aaji 🙏

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 3 года назад +1

    अप्रतिम... याला उपमा नही.👌👌👌😊👍

  • @leenatachobe8105
    @leenatachobe8105 3 года назад

    माझी आई असेच भरीत करायची त्याची आठवण झाली.व ती त्या बरोबर तांदळापासून बनवलेली साल पापडी
    उकळतं पाणी घालून निथळत ठेवायची व त्या ओल्या पापड्या बाऊल मध्ये घेऊन त्यावर कोळाचे भरीत घालून खायला द्यायची ....अप्रतिम लागतं...माझी फेवरेट dish

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      मस्त. मी पण आता खाऊन बघेन. प्रत्येक आईकडे एकच पदार्थ किती विविध प्रकारे करण्याची कला असते.

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 3 года назад

    मी तुमचे चॅनेल नेहमी पाहते. कोळाचे भरीत नक्की करून बघेन. खूपच छान

  • @malini7639
    @malini7639 3 года назад

    खुप च छान असे वाटते जेवणाला लगेच बसावे

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 3 года назад

    Tumhi Aai Kadun Shiklat, Waa Great Simplicity & Testy Sudha.

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 3 года назад

    Faracha apratim zala bet.mi nakki karnar.Aaicha hatachi sar kashalacha nahi.ashya videochi khup garaj aahe navin pidhya prenadayak number one video Abhar aani aaina dandvat🙏

  • @vinayphadnis5588
    @vinayphadnis5588 3 года назад

    वा...

  • @sheetalgupte3967
    @sheetalgupte3967 3 года назад +1

    आई मस्त. खिचडी कोळ एकदम सुंदर .

  • @mollycarlo3398
    @mollycarlo3398 2 года назад

    Mast khichdi

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 3 года назад

    Yach combination madhye south la aarisi upama ani kolache bharit ya combination ne banvtat mast

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      अरे व्वा !

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 года назад

      @@VaishaliDeshpande arisi upama bhannat lagato ... halka ahar ... mire naral .thodi tur dal .tup ani chincheche bharait ..south la sakhar ghalat nahit ... mi apla marathi bana n sodta thodi godachi chav dete ...

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 года назад

      He he mi tula same comment don vela keli .mhanaje 2 vela tuza vdo pan pahila na? It proves you must try ... ek series kar parprantiy delicacy

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 года назад

    खुप छान वांगयाचे भरीत, व मुगडाळ खिचडी मी सर्व पदार्थ पाहते व करुन पाहते .खूप छान आजी धन्यवाद

  • @shubhangisarvankar4537
    @shubhangisarvankar4537 3 года назад

    आईचे पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ खुपच छान आहेत. आई तुम्हाला हे सर्व करताना पाहून मला माझ्या आईची आठवण झाली.

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 3 года назад +1

    माय लेकी लै भारी.👌👌सुरेख रेसिपी.

  • @vidyatendulkar6033
    @vidyatendulkar6033 3 года назад

    अतिशय सात्विक बेत..आईँ ना खूप खूप धन्यवाद 🙏

  • @jassipal3433
    @jassipal3433 Год назад

    Excellent khichdi thanks

  • @aparnakale6992
    @aparnakale6992 3 года назад

    Mala majhya aai chi khoop khoop aathwan aali... tumache sagalech videos atishay sunder asatat.... thank you for helping restoration of our traditional cooking culture 🙏

  • @medhavirkar3965
    @medhavirkar3965 3 года назад +1

    Superb... Sarva aya zindabad.
    Only they know how to preserve our precious traditional recipes!
    Thank you

  • @anitagupte3947
    @anitagupte3947 3 года назад

    तिर्थरूप आजींना,
    माझा मनापासून नमस्कार 🙏,
    खूपच छान रेसिपी तुम्ही दाखवल्यात.अश्या साध्या सोप्या रेसिपीज बघायला आवडतील.वैशाली ताई तुमच्या आवाजात खूपच गोडवा आहे. 👌👌
    खिचडीचा मसाला अप्रतिम. 👌

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आपण असे वेगळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करूयात.

  • @ushachavan3980
    @ushachavan3980 3 года назад

    तुमच्या आईंना पाहिलं आणि आईची खूप आठवण आली . खूप छान रेसिपी सांगितली

  • @archanaparve1119
    @archanaparve1119 2 года назад +1

    Superb
    Ase paramparik padarth japoon theva aani aamhala tyacha labh dya
    Bhajanichi chakali recipe upload kara

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अर्चना ताई,
      माझी आई, सासूबाई यांच्या सोबत आपण चकली भाजणी ते चकली असे व्हिडिओज अपलोड केले आहेत. दिवाळी फराळ या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओज आहेत.

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 3 года назад

    वाह, किती मस्त भरीत व खिचडी

  • @poonamnaik6128
    @poonamnaik6128 3 года назад

    Aai khup chaan aahe, cute aahe 🥰

  • @chaitanyadeshpande9363
    @chaitanyadeshpande9363 3 года назад +1

    Amazing vlog & receipes, Feeling very great to learn this authentic receipes from Grandmother. GREAT

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 3 года назад

    Massst....Mi karnar he ata

  • @pritisahu2734
    @pritisahu2734 3 года назад

    Thank u auntiji aj ek naya bharata sikhne mila

  • @atharvadambelkar1267
    @atharvadambelkar1267 3 года назад

    विहिण बाईंची भरीत खिचडी ची रेशीपी खुप छान.

  • @vaishalipawar5988
    @vaishalipawar5988 3 года назад

    किती छान दाखवलं आईने तुमच्या खूप गोड आहेत👌👌😊👌

  • @Skyguru009
    @Skyguru009 3 года назад

    Khu chhan mast gavran jevan aavadle.

  • @shivanikulkarni4850
    @shivanikulkarni4850 3 года назад

    फारच सुंदर रेसिपी 👌👌

  • @suchitrakrishnakumar4048
    @suchitrakrishnakumar4048 3 года назад

    अप्रतिम बैंगन भरता आणि खिचडी .

  • @rohinijoshi8974
    @rohinijoshi8974 3 года назад

    Masala khichdi cha vdo mi pahilyandach baghitla. Kolache bharit ha vismrutit gelela padarth kalala. Aaini khup changlya padhatine padarth karun dakhavle. Majhi aai pan 85 varshanchi aahe. Tumchya aaila baghitlyavar mala majhya aaichi khup aathvan yete. Tichi swayampakachi padhat pan tumchya aai sarkhich aahe. Tyamule barechse padarth karnyachi padhat aapli eksarkhich aahe. Tumhala matrudinachya shubhecha

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा. आईला नमस्कार.

  • @pradnyavaidya103
    @pradnyavaidya103 3 года назад

    आजी ग्रेट

  • @suhaschincholkar9025
    @suhaschincholkar9025 3 года назад +1

    तुमच्या दोन्ही आई (आया) खूप गोड आहेत.रेसिपीज ची कृती तुम्ही त्यांच्याकडून खूप हळूवार गोड गोड बोलून सांगता .ऐकतच रहावं असं वाटत .

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 3 года назад

    chanach zale aasel

  • @neetajadhav757
    @neetajadhav757 3 года назад

    खुप छान खिचडी चा वेगळा प्रकार 🙏

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 3 года назад

    छानच झाले आहे कोळाचे भरीत व खिचडी. खिचडीचा मसाला अप्रतिम. या मसाल्याचे कारवारी पद्धतीशी साम्य आहे.आईंना जपा. माझी आईदेखील अशीच आहे कोकणातील. धन्यवाद.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      तुमची आई पण कोकणातील आहे हे वाचून छान वाटलं. आजींना नमस्कार.

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi1457 3 года назад

    खूपच छान. गावी असताना खाल्लं होत कोळाच भरीत पण मला करता येत नव्हतं तुम्ही सांगितलंत खूप छान झालं. आईला माझा नमस्कार. मीही कोकणातली आहे. आणि आपले कोकणातले पदार्थ खूपच छान आहेत. मी हि आता कोलाच भरीत करून बघते.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      खूप छान वाटलं वाचून की तुम्ही पण कोकणातील आहात.

    • @vishakhajoshi1457
      @vishakhajoshi1457 3 года назад

      हो रत्नागिरी ची आहे मी

  • @shirishmodak8815
    @shirishmodak8815 3 года назад

    फार छान रेसिपी . प्रमाण आमच्या सारखाच आहे .

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад

    सुंदर बेत 😋👌👍
    आजींनी दिलेल्या tips माझी आजी नेहमी द्यायची खरंच त्या काळातील प्रत्येक गृहिणी पदार्थांचा पुरेपुर वापर करायच्या कोणतीही गोष्ट पदार्थ वाया जाऊदेत नसंत 😊👍👍👍👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      खरंय. त्या सगळ्यांकडून खूप शिकण्या सारखं आहे.

    • @ShilpaPatil460
      @ShilpaPatil460 3 года назад

      @@VaishaliDeshpande मोठ्या परिवारात राहिलेल्या वावरलेल्या आपल्या आजी पणजी त्यामुळे त्यांची सर्व कामं चोख 😊👍

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 3 года назад

    खरच आमचं भाग्य आहे आम्हाला एवढ्या सुंदर रेसिपी आजींच्या हातच्या पहायला मिळतात 😍 dislike करणार्यांची कीव येते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      तुम्हाला सर्वांना आईचे व्हिडिओज आवडत आहेत. तुम्ही त्याबद्दल प्रेमानी लिहीत आहात. धन्यवाद.

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 3 года назад

    भोगीसाठी ही विशेष मेजवानी,मस्तच

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 3 года назад

    आईच्या हातची खिचडी पापड पाहून मला माझ्या आईची आठवण झाली.आणि त्यांचा उत्साह पाहून खुश राहाण्यास प्रेरणा मिळाली.

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 3 года назад

    किती छान वाटले खिचडीची पद्धत अगदी माझ्या आईची माझी आईसुद्धा ८१ ची आहे आणि अशीच उत्साही खरच दीर्घ काळ आईची माया तिच्या हातचे छान छान पदार्थ खायला भाग्य लागत आणि आई आहे तोवर आपलं बालपण संपत नाही

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आईंना नमस्कार.

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 3 года назад

    मी आताच करून बघते काकून सारखी खिचडी 👌👌👌👍🙏🙏

  • @prajaktashirsekar6699
    @prajaktashirsekar6699 2 года назад

    👌👌😋😋

  • @drvarsha100
    @drvarsha100 3 года назад

    आईंना नमस्कार 🙏
    खूप च छान रेसिपी...

  • @vedavatiatre1462
    @vedavatiatre1462 3 года назад

    किती छान,दोघीही 👌💐मस्तच..😊

  • @riyazmullani4785
    @riyazmullani4785 3 года назад +1

    Tai tumhi ajjinchya sagalya recipes dakhava. Mla avadel. Khup chhan mast. 1no best

  • @meeramestry2093
    @meeramestry2093 Год назад

    Good

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 3 года назад

    Watering my mouth... Aaji God bless her...

  • @anaghapawar7896
    @anaghapawar7896 3 года назад

    Farach chavisht n Aaichya hatachi n premachi chav tar asnarach .Apratim 👍👌

  • @sanjyotpawagi1225
    @sanjyotpawagi1225 3 года назад

    वा आजी या वयात सुद्धा स्वयंपाक करतायत खुप छान भरीत आमच्याकडे सुद्धा हे कोळाचे भरीत करतो शुभेच्छा

  • @anitashetty5391
    @anitashetty5391 3 года назад

    Very healthy tasty receipe by ajji thankyou 🙏

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 года назад

    दोन्हि पारंपारी पाककृती खूपच छान. कोळाच भरीत मी पहिल्यांदाच पाहिलं, नक्की करून पाहिलं. 😋😋👍 खिचडीच्या मसाल्यासाठी मावशीला धन्यवाद🙏 असेच विस्मरणात गेलेले पारंपारीक पदार्थ मावशी आम्हाला पहायला आवडतील. पदार्थ पाहिला कि आठवतं 😇अरे हो आजी बनवायची. पण मावशीमुळे पाककृती माहिती झाल्या. खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏😊

  • @truptikhot6321
    @truptikhot6321 3 года назад

    Khup chan tasty bharit ani khichdi delicious recipe ajji khup chan samjavtat ajun recipes pahayala awdel ajjinchya hatchya
    Thank you❤ ajji ani kaku

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आईच्या हातचे अजून पदार्थ नक्की पाहूया.

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 года назад

    खुपच भारी आणि पौष्टिक.

  • @rekhapawar4
    @rekhapawar4 3 года назад

    Khup chan receipe aahe....

  • @dipalijadhav2860
    @dipalijadhav2860 3 года назад

    Khup Chan recipe 👌👌👌

  • @rajashreedeodhar4295
    @rajashreedeodhar4295 2 года назад

    Tai, Thank you so much! Tumachya aai ani Suman aaji doghi na pan khup dhanyavad !

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 3 года назад

    Pandhrya shubhra vangyache pan atishay chan bharit hote

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 3 года назад

    Khup sundr recipe 🙏🙏🙏

  • @sakshirane6958
    @sakshirane6958 3 года назад

    I m very happy by seeing this paramparik receipe. U make my day

  • @priyaborkar8599
    @priyaborkar8599 3 года назад

    no words for this recipe. just superb 👏👏👏👏

  • @amitjadhav8009
    @amitjadhav8009 3 года назад

    Wow yr mom is to good she is a very good cook also

  • @annanavagire9270
    @annanavagire9270 3 года назад

    खूपच छान मस्त 🙏🙏

  • @Gauri33
    @Gauri33 3 года назад

    अत्यंत चविष्ट 👌👌👌

  • @varshamilind4713
    @varshamilind4713 3 года назад

    Me too love this channel... Madam tumcha bolna khupach chan asta..hi recipe pan khup chan aahe...
    I have recently started watching this channel...but seriously I love all ur topics❤️❤️

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 3 года назад

    Tumchi pan chhan resepe mast.

  • @labhsweetscorner6854
    @labhsweetscorner6854 3 года назад

    ताई बनवून बघितले,आणि अप्रतिम चव

  • @sunitabhalerao4
    @sunitabhalerao4 3 года назад

    Wow that's awesome 👍👍👍👍👌 👌

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 3 года назад

    I love to listen to ur sweet way of explaining...