परप्रांतियांना जमिनी न विकण्याचा ठराव घेणारा गाव|Save Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 446

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 3 года назад +42

    मी कोकणातला नाही पण आपण घेतलेला निर्णय नक्कीच कोकणासाठी चांगला आहे प्रत्येक कोकणवासियांनी हा निर्णयांमध्ये सामील होऊन कोकणाला मुंबईसारख्या होण्यापासून वाचू शकता हे आपल्या कोकणवासीयांच्या हातात आहे स्वर्ग आहे कोकण तो स्वर्गच राहू द्या

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 3 года назад +102

    खूप छान. तांबुळी या गावाचा आदर्श ईतर गावानीही घेउन असे ठराव मंजूर करावेत व आपले कोकण वाचवावे. प्रसाद तुझ्या कार्यास सलाम.

    • @kiransamant
      @kiransamant 3 года назад +3

      खूप छान प्रतिक्रिया.
      फक्त एक छोटीशी सुधारणा. देसाई सरांनी म्हटलय की त्यांच्या गावाचं नाव तांबुळी आहे. (तांबुलचा आपभ्रंश)

    • @sujatawadekar4643
      @sujatawadekar4643 3 года назад +1

      @@kiransamant धन्यवाद

    • @kiransamant
      @kiransamant 3 года назад +1

      @@sujatawadekar4643 🙏

    • @MrDilipGawas
      @MrDilipGawas 3 года назад +1

      चांगला निर्णय आहे. गावा गावा मध्ये ही जन जागृती होयला पाहिजे

    • @maheshnaringnekar5553
      @maheshnaringnekar5553 3 года назад +1

      Good work

  • @rsp151
    @rsp151 3 года назад +62

    सर्व गावांनी ह्या गावाचा आदर्श घ्यायला पाहिजे....🙏🙏🙏👍👍👍

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 3 года назад +3

    महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने असा ठराव केलाच पाहिजे........नाहीतर काही दिवसांनी अमराठी सरपंच असतील......मराठी माणूस त्यांचा गुलाम होईल.......

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +1

    सरपंच देसाई जी
    यांचा आदर्श इतर सर्व कोकणवासीयांनी घ्यायला
    हवा.
    प्रसाद नेहमी प्रमाणे हाही विडीओ
    छान होता.
    खुप खुप.....
    !! धन्यवाद !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @chavan123bipin
    @chavan123bipin 3 года назад +29

    तांबुळी गावाला आणि प्रसाद यांना तुमच्या कोकण पहा, आनंद लुटा आणि आनंद लुटता लुटता आपली कोकणी संस्कृती जपा, वाढवा या संकल्पनेला आणि संदेशाला त्रिवार सलाम. तुमचं कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जाओ, बहरत जाओ हीच निसर्गा चरणी प्रार्थना.

  • @HJ96k
    @HJ96k 3 года назад +64

    लई भारी... आता खरंच गरज आहे याची ... कोकणातील प्रत्येक गावाने हे कराव. मुंबई , पुणे, नाशिक संपवलं आहे, कोकण वाचवा🙏🙏..एकदा बाहेरचे आले की स्थानिकावर अन्याय होतो आणि पुढे त्यांची आरेरावी सुरू होते.
    सतर्क रहा..🙏🙏save kokan n Maharashtra as well..

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 3 года назад +1

      एकदम बरोबर.

    • @manolichari5736
      @manolichari5736 3 года назад +1

      अगदी खरं आहे.

    • @HJ96k
      @HJ96k 3 года назад

      @@manolichari5736 👍

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 года назад +3

      पुणे काही संपले नाहि,अजूनही मराठी लोकांची चालते. पुण्यात येऊन बघा.मुळशी पॅटर्न वर नका जाऊ....

    • @HJ96k
      @HJ96k 3 года назад +2

      @@nknnnn4977 बरोबर आहे भावा.. मी सुध्दा पुण्याचाच आहे. आधीच आणि आताचं पुणे यात खूप फरक आहे. मुंबई मध्ये सुद्धा आपलंच चालायचं आणि काहीं प्रमाणात चालत , पण पूर्वी सारखी आहे का परीस्थिती तिथे.? I am sure not.
      बाकी तुझ्या मताशी सहमत आहे.

  • @devendradalvi6970
    @devendradalvi6970 3 года назад +1

    खुपच छान पुर्ण कोकणात हा उपक्रम यशस्वी झाला तर आपल्या लोकांचं भलं होईल

  • @madhurdukhande4863
    @madhurdukhande4863 3 года назад +1

    ता़ंबोळी गावचे अभिनंदन. सर्व गावांनी हा आदर्श ठेवला पाहिजे व आपल्या जमिनी विकू नये तरच आपला कोकण वाचेल.

  • @swaranileshgaonkar5297
    @swaranileshgaonkar5297 3 года назад +14

    भावा तुझा आवाज इतका मंत्रमुग्ध करणारा आहे की थेट काळजाला भिडतो. फार आवडेल आज ना उद्या तुमच्या सोबत या कार्यात मदत करायला. लाख लाख शुभेच्छा तुमच्या कार्याला

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 3 года назад +61

    खुप छान....
    खुप शुभेच्छा
    देव बरे करो 👍

    • @rakeshtambe3809
      @rakeshtambe3809 3 года назад +5

      Dada tumhi ani prasad jya prakare mehnat ghet aahet ki pratyek konkani tarunane swatch gavi rahuun vegvegle udyog karava ani konkancha vikas karav yaa sathi tumha doghana salaam

    • @Samir_Sawant_Dodamarg
      @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +1

      Mast kam karto prasad dada

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Год назад +1

    नमस्कार माझ्या कोकणातील अपरिचित मित्रांनो हा प्रसाद किंवा त्याच्या सारखे अनेक निसर्गावर जिवतोडून प्रेम करणारे मोगली रणमाणसे सर्वांना मार्गदर्शन करत असतात आज मी ही कोकणातलाच पण दुर्देव आज मुंबईत स्थायिक आहे जोतो उठतो मुंबई किंवा पुणे नोकरीला बास पैसा कमवायला निघतो कितीसा पैसा लागतो आज मला पण कळलं नाही सकाळी उठायचं कामाला जायचं संध्याकाळी घरी यायचं हंथरुणात घुसायच हा शहरातला दिनक्रम शहरात काही कशाचा थांगपत्ता ही नाही फक्त झगमगाट बास पण खर जीवन आहे ते कोकणात आणि आपल्या गावात खास करून जीव लावणारी आपली माणसे आणि त्यांची नाती मी ही माझ्या गावी घरी येतो पण काय मोजक्या दिवसासाठी पण त्या दिवसात मुबंईपेक्षा दोन इंच का होईना पण आनंदाने छाती फुलते छान वाटते ना कसली अपेक्षा ना इच्छा ना इर्शा ऐकदम मस्त मित्रानो पण परत परतीचा प्रवासाला निघतो तेव्हा पाय निघत नसतात वाटते परत चाललो मी गुलामगिरीकडे म्हणून म्हणतो मित्रानो शहरात काही नाही
    आता हे कोकणात समुद्र किनारी बंगले घेणारे काय त्त्यांच्या कडे शहरात बंगले नाही आहेत.
    पण ती सुख शांती मन शांती नाही शहरात

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 года назад +4

    हे बोलण्याचे धाडस फक्त तूच करू शकतो ,प्रसाद..आपल्या जिल्ह्यात किंवा कोकणात असे बरेच Vlog करणारे आहेत ,पण ती तळमळ ,कळकळ कोणालाही नाही, कारण त्यांना Followers आणि Subscribers शी घेणे देणे आहे बाकी काही नाही..नाहीतर पैसे कशे भेटणार??
    मी याबबद्दल त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला पण काही ठोस उत्तर नाही...
    तुझ्यासारखे काम त्यांना जमणार नाही..जनजागृती नाही..
    आज मानलं तुला प्रसाद,खरी कोकणाबद्दल,कोकणी माणसाबद्दल आणि निसर्गाबद्दल जी काही ओढ आहे ,तिच्या जपणुकीसाठी ,जतन करण्यासाठी जी तुझी धडपड चालली आहे....Great Salute 👍👌💐💐💐

  • @kiransamant
    @kiransamant 3 года назад +23

    व्वाह प्रसाद..!
    छोटासाच व्हिडियो पण डोळे उघडणारा, अंजन घालणारा...
    सर्वच मुद्दे विचार करण्यासारखे पण तू मांडलेला एक विचार खरच अस्वस्थ करून गेला. आज जेंव्हा मी माझी जमीन एका परप्रांतियाला विकतो तेंव्हा माझ्या पुढच्या पिढीच्या 'मुखातला घास' काढून मी तो या अशा स्वार्थी माणसाच्या घशात घालत असतो ज्याला या मातीचं प्रेम नाही, जंगलाचं प्रेम नाही.
    परमेश्वराने इतक भरभरून ऐश्वर्य दिलं पण आम्हीच जर असा आतताई विचार आणि कृती केली तर आमच्यासाखे करंटे आम्हीच. पुलं च एक वाक्य आहे 'अंतू बर्वा' मध्ये. परमेश्वराने इकडे कल्पवृक्ष दिला पण यांची सलगी आतल्या खोबऱ्यापेक्षा बाहेरच्या करवंटीशीच अधिक. नशिबाने आलेली कठीण परिस्थिती समजू शकतो पण आपण स्वतःहूनच काही थोडक्या रकमेकरता ही परिस्थिती स्वतःवर ओढवून घ्यायची आणि पुढल्या पिढीवर मग तीच कठीण परिस्थिती लादायची!!!
    देसाई सरांचे बोलणे ऐकून तर अत्यंत आनंद झाला. देसाई सर आणि तांबुळी गावचे गावकरी यांच अगदी मनापासून अभिनंदन. यांचे हे विचार वणव्यासारखे सिंधुदुर्गातल्या सगळ्या गावात पसरायला हवेत. आणि ते पसरणारच. तुझं कौतुक मित्रा. आमच्याकडूनही हे व्हिडियोज सगळीकडे पसरवले जातीलच. इथे भेट देणाऱ्या माझ्या प्रत्येक कोकण प्रेमीला माझी हीच विनंती आहे की हा व्हिडियो जास्तीत जास्त स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवा. माझं कोकण होतं तसच राहायला हवं. नद्या, जंगलं, विविध प्राणी, पक्षी यांनी सदा बहरलेलं.. हिरवगार..
    आणि हो.. माझा मालवणी माणूसही तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण कोकणी संस्कृतीसकट टिकायला हवा आणि माझी मालवणी भाषाही तशीच कायम ऐकायला यायला हवी.🙏

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 3 года назад +18

    खुप छान लवकरच एक लाख लोक जोडले जातील चांगल्या कामाची चांगल्या विचाराची लोक दखल घेतात
    कोकणनी रानमाणूस
    प्रसाद

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад

      ruclips.net/channel/UCmsaxwPeCBrmtcrmmF7vuiQ
      ruclips.net/video/JA1w-lH7J0E/видео.html
      मराठी youtube channel आवडल तर नक्की subscribe करा..थोडी मदत मराठी माणसाला धन्यवाद 😊

  • @umeshchalke9341
    @umeshchalke9341 3 года назад +1

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने असा निर्णय घ्यायला पाहिजे. खूप छ्यान

  • @priyeshbhoir1455
    @priyeshbhoir1455 3 года назад +59

    खर तर की तिथल्या लोकांनी जागा विकुच नका कळकळीची विनंती 🙏 भविष्यात त्याचा खूप फायदा होईल

    • @mangeshshinde9472
      @mangeshshinde9472 3 года назад

      He ch lokana kalena Pune Mumbai ter up Bihar zalay

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 года назад +13

    खरंच रान माणुस या यूट्यूब चैनल ला नमस्कार कोकण वाचला तर आपल्या आपला निसर्ग वाचेल आपल्या कोकणातली संस्कृती वाचेल आपलीच काही लोक परप्रांतीयांना जमिनी विकतात पण आतापर्यंत एवढे यूट्यूब चैनल आहेत कोकणातली त्यांनी कोणीही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता पण रान माणूस खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती देता या चॅनल ला माझा नमस्कार

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 3 года назад +20

    खरोखरच परप्रांतीय लोकांना अटकाव करायला हवा...

  • @mangeshshinde9472
    @mangeshshinde9472 3 года назад +2

    Khup Chan vichar ahe ani nirnay sudha

  • @anilshinde3898
    @anilshinde3898 3 года назад +2

    प्रसाद दादा, खुप खुप छान माहिती आपण देत आहात. आपणांस खुप खुप शुभेच्छा

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 года назад +3

    प्रसाद सरपंच काकाना आणि तुला खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा. ते ह्या साठी खुप मोठा तरुण वर्ग आज कोकणात आकर्षीत होत्वाहेत. त्याच कारण तुमच्या सारख्या तरुण मार्गदर्शक कोकणात आहेत. उत्तम कार्य तुमच्या हातून घडत राहो ही श्री सदगुरु चरणी निवेदन....

  • @rahulsidam6688
    @rahulsidam6688 3 года назад +1

    Bolnyatla sadhepana ani matishi, nisargashi aslela bandh paryawarn rakshnasatichi kalwal.... Sglch khup chhan....

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या काकांला आणि तुला मनापासून सलाम कारण कोकण देव भूमीसाठी तुम्ही कोटिमोलाच काम करत आहे. मित्रा कोकणातल्या सर्व यु ट्यूबर वाल्यानी आणि इतर मित्रांनी हा व्हिडिओ बघून त्यांच्याच गावातल्या सरपंच आणि गावातल्या गावकर ( वाडी प्रमुखांला ) दाखवला पाहिजे. मित्रा तुझा व्हिडिओ कोकणातील जास्तीत जास्त यु ट्यूबवाले बघतात आणि कोकणातल्या लोकांनी आपल्या स्वतःच्याच जमिनी विकू नये ह्या संदेशाच जास्तीत जास्त पालन केले पाहिजे. तरच कोकणातल्या जास्तीत जास्त लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि मित्रा हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल.

  • @aartisalvi1194
    @aartisalvi1194 3 года назад +2

    Koknat pratek gavala ase sarpanch milale pahije. Koop chan gav ahe ❤❤

  • @yogeshkamble4481
    @yogeshkamble4481 3 года назад +5

    खुपच छान जी परीस्थिती आज मुंबईची झाली आहे ती परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतर भागांची होउ नये अस वाटत असेल तर असे निर्णय घेणे फार गरजेचे आहे

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 3 года назад +4

    तांबुळी गावाचे सरपंच देसाई सरांनी खूप छान विचार मांडलेत,अगदी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे.असे निर्णय कोकणातल्या प्रत्येक गावात होणे खूप गरजेचे आहे.तांबुळी गाव एक उत्तम आदर्श आहे इतर गावांसाठी...."कोकण स्वर्ग आहे". निसर्गाने नटलेल्या,निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे या सारखे सुख अजून कश्यात असूच शकत नाही....

  • @anilgholap1318
    @anilgholap1318 3 года назад +9

    🌴श्री देसाई- सरपंच- तांबूळी आपले अभिनंदन! 🍁आपल्या गावाने अतिशय योग्य असा ठराव संमत केला.☘यातूनच आपले गांव, आपले कोकण याविषयीची आत्मियता दिसून आली.प्रत्यक्ष कृतीच महत्त्वाची.🌿🌹🙏🙏🌹🌿अनिल घोलप. 🌿🐬

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 года назад +3

    सरपंच साहेब तुमच्या SAVE KOKAN या कार्याबद्दल धन्यवाद आणि प्रसाद भाऊ तुमच्या SAVE KOKAN या कार्याबद्दल धन्यवाद. हे तुमचं कार्य पूर्ण कोकण भागामद्ये समजावून सांगा. तसं आपले कोकण महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा खरोखरच समृद्ध आहे. काजू/आंबा/नारळी/पोफळी बाग अशी इतर उत्पन्न देणारी साधने आहेत. पण आमच्या बहुतेक लोकांना म्हणजे नवीन पिढीतल्या मुलांना शेतीची आवड नाही . त्याने कॉलेज्यामद्ये पाऊल टाकलं कि तो शेतामद्ये काम करायला कंटाळतो. आणि मग तो मुबईला किंवा पुण्याला कामासाठी येतो झाडू मारायची सुद्धा कामे करतो. ज्याची गावी जमीन जागा नाही त्याचा नाविलाज असतो आणि त्याबरोबर गावच्या मुली फक्त दहावी बारावी झाल्या कि त्यांच्या आई वडीलांना वाटते माझ्या मुलीने कॉलेज केलं ती शेतात काम नाही करणार. मग ते लोक मुंबईला कामाला असणारा मुलगा बघतात आणि मग लग्न करून देतात . आणि नवऱ्याच्या तुटपुंजा पगारात घर नाही चाललं कि गुजराती आणि मद्रासी लोकांकडे भांडी घासायला जातात. पण काही असो कोरोनाने मात्र अश्या लोकांची चरबी जिरवून टाकली आता लोकांना गाव चांगला वाटू लागला. आता कोकणात वस्तुस्थिती अशी आहे कि जमीन विकली आणि जिथे बंगले बांधले तिथे जमीन मालकीण घर कामाला जाते . कोकणातली ७०% नवीन पिढी आळशी झाली . तांबोळी गावाचा आदर्श ईतर गावानीही घेउन असे ठराव मंजूर करून आपला गाव आणि आपले कोकण वाचवले पाहिजे. सरपंच साहेब तुमच्या SAVE KOKAN या कार्याबद्दल धन्यवाद आणि प्रसाद भाऊ तुमच्या SAVE KOKAN या कार्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏👍👍👍

  • @radhikawadekar485
    @radhikawadekar485 3 года назад +1

    खुप चांगला निर्णय. कोकणातल्या मूळमालकांनी आपल्या जमिनी बिलकुल विकू नयेत. कोणी कितीही मूल्य दिले तरीही हा कोकणातला अमूल्य ठेवा गमवू नये.

  • @bhushanparab8700
    @bhushanparab8700 3 года назад +5

    आमच्या गावाने आज हा ठराव केला याचा खूप अभिमान आहे आणि तांबुली माझ गाव आहे याचा मला खूप अभिमान आहे.
    आजूबाजूने सर्व जमिनी केरळी लोकांनी विकत घेतल्यात पण आमच्या tambuli ने एक इंच ही जमीन दिली नाही.
    अभिलाष काका खूप चांगले काम करत आहात

  • @siddheshsurve2333
    @siddheshsurve2333 3 года назад +18

    कोकणातील सर्व गावांनी हा आदर्श घेतला तर आपल्या स्वर्गीय कोकणाच सौंदर्य तर वाचेलच पण इथले रोजगार आणि मुख्यतः जे उद्योग उपरे आता हडपत आहेत ते आपल्याच लोकांच्या हातात राहतील.

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 года назад +2

    खरच आहे परप्रांतीय यांना जमिन विकू नका थोडी कमी किंमतीत तरी आपल्या माणसाला द्या बघा कस निसर्ग खुलुन जाईल🙏🏻👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +3

    हे काका शुद्ध मालवणी भाषेत बोलत आहेत हे खुप आवडलं मला.
    अभिनंदन त्यांचे
    💐💐💐💐💐💐
    जमिनी विकु नका आमच्या सारखे तरुण पुन्हा गावाकडे वळण्याच्या तयारीत आहेत .
    फक्त भांडवल आणि मार्गदर्शन तसेच हिंमत या गोष्टींचा अडथळा आहे, पण लवकरच यावर मात होईल.

  • @RaneSachin
    @RaneSachin 3 года назад +1

    खूप महत्वाची जनजागृती.

  • @swapnilg006
    @swapnilg006 3 года назад +1

    आपल्या जमिनी परप्रांतियांना विकणाऱ्या आपल्या कोकणातल्या माणसांसाठी हा एक उत्तम आदर्श आहे. आपल्या जमिनी परप्रांतियांना विकून आपण आपल्या पुढच्या पिढीच भविष्य विकत आहोत हे जेवढे लवकर लोकांना समजेल तेव्हा खर्या अर्थाने कोकण वाचेल.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 3 года назад +1

    Changali mahiti dili tyabaddal dhanyavad

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 года назад +26

    प्रसाद दादा 100k लवकरच
    अभिनंदन🎉🎊💐

  • @wondertechnology3567
    @wondertechnology3567 3 года назад +13

    प्रसाद आणि त्याची टीम यांना हार्दिक अभिनंदन तुम्ही सर्वांनी जेवढे कष्ट घेतलेत कोकण वाचवा या मोहिमेची सुरुवात केली या सर्व कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

  • @romapoojari8766
    @romapoojari8766 3 года назад +2

    Khup chaan aapli marathi sanskritiappan japli pahje.

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 3 года назад +2

    प्रसाद अभिनंदन तुझे १ लाख सब्स्क्रायबर झाल्याबद्दल.

  • @sahilkorgaonkar7322
    @sahilkorgaonkar7322 2 года назад +1

    आज मुंबई ची परिस्थिती झालीय तशी कोकणाची होऊ देऊ नका सगळे एकत्र येऊन आपलं कोकण आम्ही वाचवू शकतो .दादा तू अतिशय सुंदर काम करतोस 👍👍👍👍

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 3 года назад +1

    तांबोळी गावकर्‍यांचे खूपच आदर्श विचार आहेत, पण प्रत्येकाच्या मनात आपली आर्थिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे. व गावकर्‍यांनी, नेत्यांनी आर्थिक दृष्टया नैसर्गिक, जैविक संपत्ति वाचायला हवीच म्हणुन सहकारी तत्त्वावर गावकर्‍यांनी शेती, झाडांची लागवड करावी. त्यामुळे कमी खर्चात आर्थिक सबळता आणता येईल.

  • @vaibhavsawant3740
    @vaibhavsawant3740 3 года назад +1

    खूप छान उपक्रम
    धन्यवाद प्रसाद भाऊ

  • @bhalchandrapatankar9347
    @bhalchandrapatankar9347 3 года назад +6

    प्रसाद तुझ्या कामाला सलाम.
    असाच ठराव इतर गावांनीही करावा.

  • @ghugareuday5289
    @ghugareuday5289 3 года назад +2

    प्रसाद दादा तुझे हे कार्य अप्रतिम आहे.
    महाराष्ट्राचे नंदन वन जर जपायचे असेल तर तिथल्या स्थानिक लोकांचा यात महत्वाचा वाटा आहे.

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 3 года назад +6

    हा विषय सध्या निकरावर आला आहे . गावोगावी होतोय ठराव व्हावेच . पण बिरबलाची गोष्ट आहे त्याप्रमाणे , घोडा का अडला , भाकरी का करपली सर्वांचे उत्तर एकच , न फिरवल्याने .तसे महाराष्ट्राच्या अनेक समस्यांच्या मुळाशी आपला स्वभाषेच्या आग्रहाचा अनुत्साह किंवा उदासीनता आहे. महाराष्ट्रात कुठेही कामचलाऊ हिंदी येणाऱ्याला भाषेचा , परकेपणाचा धाक वाटतच नाही .त्यात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा गैरसमज बोकाळला आहे .म्हणजे हिंदी बरोबरच सर्व प्रांतांच्या भाषा राष्ट्रभाषाच , राजभाषा आहेत हे आपणास ठाऊक नाही . त्यामुळे हिंदी अस्खलित बोलता न येणं हा जणू काही दखल पात्र गुन्हाच आपल्या हातून होतोय असे बऱ्याच मराठी माणसांना वाटते . तेव्हा ओल्या गावी , शहरात जो कोणी परप्रांतीय बोलू लागेल त्याला मराठी येत नसल्यास हिंदीत बोलू द्या पण आपले संभाषण मराठीत होऊ द्या . संपर्क आणि व्यावहारिक गरज त्याला जास्तच आहे . असे दवैभाषिक संभाषण सर्वत्र अंगवळणी पडले पाहिजे .दुसरी महत्वाची सूचना .परप्रांतीय गावात किंवा आपल्या जागेत व्यवसाय करू पाहत असेल तर भले भाडे कमी घ्या पण त्याला पार्टनरशिप करायची अट घाला , जेणेकरून व्यवसायात आपला अलगद शिरकाव होईल .

  • @sampadasinkar8993
    @sampadasinkar8993 3 года назад +2

    खूप छान न्रिर्णय या गावाने घेतलाय..
    असाच निर्णय सर्व गावाने घेतला पाहिजे

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 3 года назад +4

    अगदी बरोबर निर्णय घेतला आहे.... अभिनंदन.....!!

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 года назад +6

    Though money is important but natural resources are priceless. Thank you Prasad dada. Pls. Keep it up. God bless you.

  • @vaibhavaiwale0034
    @vaibhavaiwale0034 3 года назад +1

    प्रसाद दादा तू खूप छान माहिती देतोय सगळ्यांना 😍❤️❤️आणि आपल्या जमिनी विकू नका कोकण हा 1 न-विसरणार भाग आहे त्याला आपण असच जपून ठेवल पाहिजे.थोड्या श्या पैशासाठी जमिनी विकू नका हे लोक आपल्या जमिनी घेऊन आपल्यावरच राज्य करतायत आहे आता कुठे कुठे चालू अशी परिस्थिती म्हणून जमिनी विकू नका 🙏🤗❤️❤️ # Save Kokan Save water❤️❤️

  • @shubhamsurve3296
    @shubhamsurve3296 3 года назад +2

    १ लाखाचा टप्पा पार.. अभिनंदन भावा.. 👏💥

  • @kerkarkiran
    @kerkarkiran 3 года назад +3

    तांबोळी गावाचा आदर्श कोकणातील इतर गावांनी सुद्धा घ्यायला हवा. आणि अशी एक चळवळ कोकणातील तरुणांनी हातात घ्यायला हवी. प्रसाद तुझ्या कार्याला सलाम! छान काम करत आहे.

  • @poojachandan3284
    @poojachandan3284 3 года назад +6

    🙏🙏🙏🙏 khup chan... decision....🙏🙏🙏 Sarv koknant kay sampurn MH suru kara....baherchi...kharab lok MH kharab karat...udharan..sadhya chi corona chi paristiti.... Maharshtra la badanam karat ahe...good example..🙏🙏🙏

  • @siddheshtopare1859
    @siddheshtopare1859 3 года назад +3

    कोकणातील प्रत्येक गावाने तांबूळी गावाचा आदर्श घेऊन आपल्या जमिनी कोकणाबाहेरील व्यक्तींना विकू नये आपले कोकण आपणच राखायला पाहिजे

  • @trusting9834
    @trusting9834 3 года назад +2

    खरच दादा तुझे हे काम चालू केलाय त्याला खरच सलाम हळू हळू सगळेच तुझ्याशी जॉईन होतील आणि एक चळवळ सुरू होईल आणि सगळे बदलतील 🙏

  • @Girishwagh44
    @Girishwagh44 3 года назад +12

    खूप छान विषय मंडतोस तू, सर्व कोकणवासीयांना ते आता कळायला हवं, एकदा कणकवली, कुडाळ तसेच इतर शहरांत असलेल्या मारवाडी लोकांचा साखळी वर सुद्धा एक व्हिडीओ बनव.

    • @santoshmayekar2457
      @santoshmayekar2457 3 года назад +3

      Barobar bolalaa bhava

    • @SonaliSatishTalekar
      @SonaliSatishTalekar 3 года назад +2

      मारवाडी संख्या खूपच वाढली आहे

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 года назад +2

      marwadi rajsthani dukandar tyanchya dukanat mal viktat to pn manufacturing krnarya
      compnya bhutek gujrat rajsthan kdchyach astat.
      vikt aslela mal hi ethe tyar
      honara hi lok vikt nahit.
      he aapn lxat ghyayla hv.
      he maharastrat mothe hotat
      nav kmavtat pn gun ganar
      rajsthan,gujratchech.

  • @9090Account
    @9090Account 3 года назад +1

    उत्कृष्ट. ही प्रथा गोव्यातील बर्‍याच खेड्यांमध्ये आहे. आनंदी आम्ही देखील त्याचे अनुसरण करीत आहोत

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 3 года назад +5

    हा व्हीडिओ पाहिला आणि असं वाटलं की माझ्या मनातल्या विचारांनाच तांबुळीच्या सरपंचाकडून आणि रानमाणूसकडून दुजोरा मिळाला. तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि धन्यवाद. कोकण रेल्वे सुरू झाल्या वेळेपासून मी कोकण रेल्वेने वरचेवर प्रवास करते. अचानक ठरल्याने बऱ्याचदा महिलांच्या अनारक्षित डब्यातून प्रवास करतांना कानावर पडलं की सहप्रवासी केरळींना जमीन विकायला निघाले आहेत. तेव्हा मी त्यांचं मतपरिवर्तन करायचा प्रयत्न केला. माझा फोन नं. दिला आणि सांगितलं की मी शेतीसंबंधी बरेच डिप्लोमा घेतले आहेत. तर तुम्हाला काहीही मदत हवी असेल तर मला फोन करा. मला काहीही मोबदला नको. पण कोणीही रिस्पाॅन्स दिला नाही. तसेच मी ज्या कोकणी गृप्समध्ये होते तेथेही लिहिलं की ज्यांना यासंबंधी आपल्या गावात जनजागृती करायची असेल त्यांनी मला बोलवावं. मी स्वखर्चाने येईन. पण तिथेही रिस्पाॅन्स मिळाला नाही. मी स्वतः मात्र कोकणातल्या परप्रांतियांच्या दुकानातून एकही वस्तू विकत घेत नाही. चार पैसे जास्त पडले तरी माझ्या कोकणी बांधवांकडूनच घेते.

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 3 года назад

      मी सुध्दा माझी कोकण मधील जमीन विकली नाही आणि आता पुणे मधील जॉब सोडून कोकण मध्ये राहायला आलो आहे.

    • @ranjananarvekar2062
      @ranjananarvekar2062 3 года назад

      @@sachinlanjekarkokanyoutube647 खूप छान निर्णय घेतला आहे तुम्ही. अभिनंदन. आता आपण कोकणप्रेमींनी जमिनी विकण्यापासून कोकणी लोकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करायला हवी.

  • @pankajsawant1209
    @pankajsawant1209 3 года назад +9

    खरं तर तुमच्या जमिनी कोणालाच विकू नका, ना परप्रांतीयांना ना बाकी मराठी माणसाला, या जमिनीची खरी काळजी आणि सेवा तर तिथले मूळ स्थानिक लोकच,चांगल्या पद्धतीने करतील.

    • @kiransamant
      @kiransamant 3 года назад +2

      अगदी खरं.

  • @VishwajitAbhyankar
    @VishwajitAbhyankar 3 года назад +2

    खूप चांगला काम केलास. खरोच आदर्श घेऊचो लागतलो. आपल्याकडची सगळी झाडं तोडून टाकल्यानी. वाट लावल्यानी आमच्या कोंकण ची. कोणाक उभ्याच करायचा नाय. झाडा आसत तरच कोंकण आसा.

  • @sharadpawar7426
    @sharadpawar7426 3 года назад +1

    खूप छान निर्णय घेतला

  • @vijaymadvi3020
    @vijaymadvi3020 3 года назад +3

    कोकणातल्या सर्व गावांनी असाच ठराव केला पाहिजे।।।तर परप्रांतीयांपासून कोकण वाचेल।।।।

  • @gajananparkar2925
    @gajananparkar2925 3 года назад +1

    Abhinandan tumche,kripaya brokers na thara deu naka

  • @sameerjedhe5476
    @sameerjedhe5476 3 года назад +1

    असे सुशिसिक्षित सरपंच सर्व गावांना लाभो.तसेच भवकितले वाद संपुदे दादा तुम्हाला शुभेच्या.

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +3

    Taambuli गावचा आदर्श प्रत्येक गावाने घेतला पाहिजे .
    प्रसाद भावा तुझ्या या कार्याला माझा सलाम .असेच कार्य तुझ्या हातून यापुढेही घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना . लवकरच 100K होतील. Advance मध्ये अभिनंदन

  • @kalpanapawar9194
    @kalpanapawar9194 3 года назад +1

    खूपच छान निर्णय. सगळ्या कोकणी माणसांनी त्यांचे अनुकरण करावे

  • @sunilraj8474
    @sunilraj8474 3 года назад +3

    खूप चागला निर्णय,कोकण वाचवा आणि तुझ्या कार्यास सलाम.

  • @nandasawant9685
    @nandasawant9685 3 года назад +5

    तांबोळी गावाचे अभिनंदन. आमच्या सहकार्य अपेक्षा ठेवू शकता.

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 года назад +4

    मित्रा प्रसाद, अपेक्षेप्रमाणे तू आपल्या सर्वाच्या कोकणवासीयांच्या मनातील एक विचार मांडला आहेस हॅट्स ऑफ! आपल्या जमिनी विकून जमिनीत आपण मालकांचे ऐवजी नोकर म्हणून काम करणार हे १००% देसाई सरपंचांचे म्हणणे खरे आहे.तू बसला आहेस ते मागचे लोकेशन छानच आहे.एक विचारप्रधान व्हिडिओ... एका वास्तववादी विषय उत्तम मांडल्याबद्दल!.👌👌👍❤️

  • @sheetalrane3459
    @sheetalrane3459 3 года назад +3

    "कोकण वाचवा" मोहीम ही गरज आहे आताची. कृपया ही मोहीम कोकणातील इतर गावानं मध्ये पण सुरू केली पाहिजे अन तुमच्या मार्फत ती सर्वां पर्यंत पोचू दे 👍

  • @pravindalvi9099
    @pravindalvi9099 3 года назад +7

    भावा आपल्या कोकणाबदल असलेलं खूप मोठं मार्गदर्शन तुझ्याकडून आम्हा सर्वांना मिळतोय. हे तुझं कार्य असंच अविरत चालू ठेव. यासाठी मी चंडिकाआई आणि सद्गुरू अनिरुध्द बापू जवळ प्रार्थना करत आहे. अंबज्ञ..... नाथसंविध

  • @narayanchavan3731
    @narayanchavan3731 3 года назад +1

    तुमचा कोकणासाठीचा प्रयत्न, तळमळ खूप कौतुकास्पद आहे. God bless you.....

  • @AashishAdhav
    @AashishAdhav 3 года назад +5

    Great leader Sarpanch Saheb...ashe leaders pahijet aplyala...Thanks alot Prasad Dada yevdi mahatva purna mahiti share kartay tya badal...asech kaam karat raha amhi sadev tumcha sobat aasay...🙏❤️✨💯

  • @3333umesh
    @3333umesh 3 года назад +3

    बरेच वर्षांपासून जाणकार ही कोकलून सांगतात... की कोकणातील जमिनी विकू नका म्हणून... तरीही लोकांची दूरदृष्टी कमी होत चालल्यामुळे ...कोकणातील लोक ही चूक करत आहेत....धन्यवाद हा विषय तू मांडलास म्हणून...

  • @mahendrakap1706
    @mahendrakap1706 3 года назад +4

    सर्व प्रथम कोकणी रानमाणूस या चॅनल चे खूप खूप आभार आणि शुभेच्छा 💐💐💐💐
    तांबुली गावचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
    खूप छान वाटलं.

  • @nileshpaldhe2955
    @nileshpaldhe2955 3 года назад +1

    चांगला निर्णय आहे त्याची अंमलबजावणी खूप कडक पद्धतीने झाली पाहिजे.

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 3 года назад +3

    दादा, तुझे मी सर्व video पाहिलेत आणि काही पहायचेत , खूप बरं वाटत, प्रत्येक video पाहताना आणि असं वाटतं की आपले विचार , इच्छा कोणीतरी मांडतय, आपण लवकरच ह्या प्रयत्नांना अजून मोठ्या पातळीवर नेऊ. अजून एक गोष्ट आपण करू शकतो की प्लास्टिकच्या पिशव्या किंवा अन्य प्लास्टिक वेष्टन यांना या जलस्रोत आणि येथील निसर्गातून हद्दपार केलं पाहिजे. जे पण बाहेरून येणारे अथवा स्थानिक लोक आहेत त्यांनी जंगलात या प्लास्टिक असणाऱ्या वस्तुंना मज्जाव केला पाहिजे. स्थानिक कामगारांनी, पर्यटकांना मातीचे , नारळाचे, पळसाच्या व सागाच्या पानांचे , केळीचे वेष्टन अथवा अन्य नैसर्गिक साधन पुरवून तेच वापर करण्याची अट घातली पाहिजे, तसेच विशिष्ट संवेदनशील हद्दीपुढे वाहन चालवता येणार नाही, स्थानिक लोकांना रोजगार म्हणून इ- रिक्षा, सायकल अथवा प्रदूषण न करणाऱ्या वाहन पुरवून पर्यटकांना ती वापरण्यास सुविधा उपलब्ध करून देणे.
    जवळच्या बांधकाम व्यासायिकांना पर्यावरणपूरक बांधकाम करण्यास प्रोत्साहन देणे, काचेच्या खिडक्यांऐवजी आतून जाळ्या असणाऱ्या जुन्या लाकडी खिडक्या बनवण्यास प्रोत्साहन देणे, पत्र्यांचा वापर टाळणे, अशा बऱ्याच गोष्टींनी tourist होम सज्ज करण्यास प्रोत्साहन देणे.

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva4321 3 года назад +4

    खरं आहे भावा आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर जमिनी राखायलाच हव्या.नाहीतर आपल्याच देशातुन आपल्याला परागंदा होव्याची वेळ येईल.
    नाही आता प्रांतवाद होनारच.

  • @nitin73876
    @nitin73876 3 года назад +1

    सर्वांनी ह्या गावाचा आदर्श घेतला पाहिजे हे बरोबर आहे पण त्याची सुरवात स्वतः पासून केली पाहिजे , आपण सगळ्यांनी आपल्या स्वतः च्या गावाच्या सभेत हा प्रस्ताव मांडला पाहिजे आणि आपल्या गाववाल्यांना समजून सांगितलं पाहिजे

  • @rakeshpatil7474
    @rakeshpatil7474 3 года назад

    महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी असा निर्णय घेतला पाहिजे. गर्व आहे ह्या गावाचा

  • @amirvineet
    @amirvineet 3 года назад +4

    तू ज्या आत्मीयतेने बोलतोस टितक्याच मनापासून इथल्या दमदार तरुणांनी तुला साथ द्यायला हवी आपली जमीन आपली आई !!! तिच्यावर कुणाची नजर पडू देऊ नका मित्रांनो !!! फार छान वीडियो !!! जरूर बघा ! शेयर करा धन्यवाद !!

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 года назад +1

    खुप छान निर्णय घेण्यात आला गावात 👍🙏 खुप सुंदर व्हिडिओ आसा.

  • @satishkshirsagar4614
    @satishkshirsagar4614 2 года назад

    एकदम झकास प्रसाद दादा

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 3 года назад +2

    इथे कॉमेंट करणारे 90,% लोकं स्वतः गावाला कधी शेतात जात नसतील,जमिनी राखण्यासाठी त्या कसाव्या पण लागतात नुसत्या ठेऊन चालत नाही.
    उशीरा सुचले पण चांगला निर्णय.असाही 70% कोकण च्या जमिनी आधीच विकल्या गेल्या आहेत.

  • @खादाडखाव
    @खादाडखाव 3 года назад +1

    Bhava atishay sunder bolalas pahile vakya

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 3 года назад +1

    हो हे खरं आहे, आपली जमीन आणि आपणच तिथे नोकर
    हे मी पहात आहे, जगत आहे, तळोजा midc नवी मुंबई येथील संपूर्ण कंपन्यांमध्ये बाहेरील लोक,कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ज्याची जमीन आहे तो तिथे गार्ड च काम करत आहे

  • @yashchavan9242
    @yashchavan9242 3 года назад +7

    अख्ख्या कोकणाने ह्या गावाचा आदर्श घ्यावा ही नम्र विनंती, नका विकू जमिनी परप्रांतीय लोकांना, नका लाचार होउ पैशा समोर, विकलात तर कोकणातल्याच लोकांना विका नाहीतर मुंबई व्हायला वेळलागणार नाही........

  • @dhanshreesawant9246
    @dhanshreesawant9246 3 года назад +1

    Prasad bhau, Sarpanch Desai yanche Sundar vichar. Punha Navin vishay aapan gheun aalat sundar subjective video👌👌❤❤

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 3 года назад +3

    Very very good saglyani asach vichar karava

  • @ajitrasale2031
    @ajitrasale2031 3 года назад +1

    खूप चांगला निर्णय तुमचे गावाने घेतला. याचे अनुकरण कोकणात या इतर गाव वाड्या यांनी करावे या साठी तुमचे ग्राम पंचायतीने घेतलेला निर्णय कोकणातील प्रत्येक गावा मध्ये पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा.

  • @vishwasmore5518
    @vishwasmore5518 3 года назад +4

    या अतिशय चांगल्या ठरावाबद्दल मनापासून धन्यवाद .

  • @somanathhule4976
    @somanathhule4976 3 года назад +1

    सरपंच देसाई साहेब खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे तुम्ही, अजून एक तुमचे बंधू हेमंत देसाई आमच्याबरोबर पुणे चाकण मध्ये आम्ही एकाच कंपनीत काम करतो.

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 года назад +1

    Kup sunder prasad tuze vichar ani srapnchache vichar chan ahet 🙏👌

  • @prakashpawar2380
    @prakashpawar2380 3 года назад +4

    खरंच मित्रा, तुझे विचार मला खूप आवडतात. तू जे सांगतोस ते फक्त कोकणालाच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू पडतंय. पैसा महत्वाचा आहेच, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने निसर्ग महत्वाचा आहे.

    • @sampathirave9697
      @sampathirave9697 3 года назад

      प्रसाद तू रानमाणुस च्या माढ़्य मातून महान कार्य करित आहेस तुझ्या कार्याला माझा मनापासून पाठिंबा आहे. तांबोळी गाव चा निर्णय खुप चांगला निर्णय घेतला आहे.कोकणा बाबत मला इतके आकर्षण आहे कि मी कोकणातच जन्म घ्यायला हवा होता मी दर वर्षी कोकणात येत असतो.कोकणातील निसर्ग संपदा टिकणे खुप गरजेचे आहे. तुझ्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा!!!👌👌👍👍

  • @neelimakharat9256
    @neelimakharat9256 2 года назад +1

    असा प्रयत्न प्रत्येक गावच्या सरपंचांनी केला पाहिजे तर कोकणातल्या जमिनी वाजतील

  • @Bhavesh_Gudekar
    @Bhavesh_Gudekar 3 года назад +2

    मुंबई ते गोवा हाइवे लगतच्या गावांनी,आणि सर्व गावांनी हा निर्णय घेतला पाहिजे...

  • @pravinbhonde5068
    @pravinbhonde5068 3 года назад +2

    मस्त निर्णय ,गावकर्या चे अभिनंदन

  • @manojgawadevlogs7213
    @manojgawadevlogs7213 3 года назад +3

    100k subscribers zale badal abhinandan🎉

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale 3 года назад +27

    कोकणातल्या youtube वरच्या engineer ना पण सांगा...बोलवून बोलवून विकत आहेत कोकणातल्या जागा

    • @mushtaqkarol7758
      @mushtaqkarol7758 3 года назад +1

      Ur right. Some sort of filtration is required alongwith conscious awake

    • @ganeshtalavanekar8798
      @ganeshtalavanekar8798 3 года назад +1

      Right

    • @sumofoodtravel8184
      @sumofoodtravel8184 3 года назад +1

      एकदम बरोबर बोललास मित्रा.

    • @kiransamant
      @kiransamant 3 года назад +1

      अगदी खरय. मुर्खासारखे प्रोजेक्ट्स बनवत चालले आहेत कुठेही. कोकणातली वैशिष्ट्य हरवत चालली आहेत यांच्यामुळे.