परप्रांतीय लुटतायत कोकणातील जंगले?| दुर्मिळ भेरले माडाची तस्करी|Save Forests Save Konkan
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #भेरलो_माड
सिंधुदुर्गात भेरली माडचे अस्तित्व धोक्यात...
भेरले माडचे वैशिष्ट्य असे की, त्याच्या खोडावर पिकलेल्या फळांचे घोस आसतात व त्यामध्ये हजारोंच्या संख्येने फळे असतात.
मालवण (सिंधुदुर्ग) : भेरली माड अर्थात सुरमाडाच्या पानांची बेसुमार कत्तल होत असल्याने या वृक्षाचे सिंधुदुर्गात अस्तित्व धोक्यात आले आहे. सुशोभिकरणासाठी या वृक्षाची कोवळी पाने तोडली जात आहेत. या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. धामापूर तलावाच्या सर्वेक्षण करणाऱ्या अभ्यास गटातील तज्ञ व्यक्ती व स्थानिक लोकांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आले की, काही परराज्यातील लोक हे भेरली माडाची कोवळी पाने बेकायदेशीर तोडून त्याचा राजरोसपणे व्यापार करताहेत.स्थानिकांनी या भेरले माडाच्या पानांचे भारे वनखात्याच्या अधिकाऱ्यांस बोलावून त्याच्या निदर्शनास आणून दिले.
कोवळ्या पानांचीच तोड बेसूमारपणे व्यापारी तत्वावर राजरोसपणे होत राहिल्यास या वृक्षाच्या वाढीवर परीणाम होऊन तो फुला-फळांनी बहरणार नाही व पर्यायाने या वृक्षाच्या अस्तित्वात धोका पोहोचेल अशी स्थिती पूर्ण सिंधुदुर्गात आहे. निसर्गाच्या संपन्नतेला ओरबाडून होत असलेला व्यापार हा पर्यावरणास व पर्यायाने मानवी जीवनास घातक असल्याचे मत अभ्यासगटातील तज्ञांनी मांडले आहे.चुनखडजन्य खडकाळ जंगल भागात साधारणपणे 300 ते 1500 मीटर उंचीच्या वनक्षेत्रात भेरली माड हा वृक्ष आढळतो. हे वृक्ष पाम प्रकारातील असून त्याला इंग्रजीत फिशटेल पाम किंवा ज्यागरी पाम असे संबोधले जाते. हा सदाहरित वृक्ष प्रणालीत असून साधरणतः 20 मीटर उंच वाढतो.
सुरमाड, भेरली माड, बिरलो माड या नावाने परिचित वृक्षाला संस्कृतमध्ये श्रीताल असे संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव कॅरिओटा उरेन्स लीन असे असून हा आरकेसी या कुळातील असून समुद्रिय पट्टा ते सह्याद्रीची डोगररांग व पठारावर सर्वसाधारणपाने आढळून येतो. याचे खोड सरळ असून खोडावरील पानांची रचना अतिशय सुबक आणि वक्राकार पध्दतीची असते. पानांची लांबी साधारणतः 6 मीटर असते. या वृक्षाची लागवड उद्यानामध्ये केलीच जाते. त्याचबरोबर या वृक्षाच्या पुष्प संभाराच्या देठातून येणारा चीक साखर व मद्यार्क निर्मिती करिता वापर केला जातो. फुलांच्या रसापासून गूळ बनवला जातो. हॉर्नबील(धनेश), एशियन पाम सिव्हेट(कांड्याचोर) या सारख्या पशू-पक्षांचे याची पिकलेली फळे हे आवडते खाद्य आहे.
याच्या बियाच्या पिठापासून बनविलेली लापशी ग्यास्ट्रिक अल्सर, अर्धशिशी, सापाचे विष उतरविण्यासाठी आणि संधीवताने येणारी सूज कमी करण्यासाठी वापर केला जातो. याच्या मुळाचा वापर दात व हिरड्यांच्या आजारामध्ये केला जातो. याची साल व बिया मूळव्याधीमध्ये वापरली जाते. याच्या फुलांच्या कळ्या केसांच्या वाढीमध्ये उपयुक्त आहेत. या व्यतिरिक्त याच्या पानांच्या देठा पासून मिळवलेल्या तंतूंतून दोरखंड तयार केले जातात. त्याचबरोबर पानांपासून झाडू, बास्केट बनविल्या जातात. खोडाच्या बाहेरील भागाचा वापर पारंपरिक बांधकामक्षेत्रात देखील केला जात असल्याबाबतची माहिती लोक सांगतात.
प्राणी व पक्षांचे खाद्य संपुष्टातः
या पाम प्रकारातील वृक्षाच्या पिकलेल्या फळांवर कित्येक प्राणी व पक्षी आपली उपजिविका करतात. वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्यामध्ये या वृक्षाचे महत्वपूर्ण योगदान असल्यामुळे हे वृक्ष वाडी वस्तीवर, घरांशेजारी आढळून येतात. इतके महत्त्व असताना देखील गेल्या कित्येक वर्षांपासून परप्रांतीय लोक या भागातील राखीव संरक्षित जंगलांमधून व खाजगी जंगलांमधून या वृक्षांच्या कमी उंचीच्या कोवळ्या वृक्षाची पाने बेसुमार पद्धत्तीने तोड करत आहेत. हजारो पाने एकत्र भाऱ्यामध्ये बांधून खाजगी बसने वाहतूक करून मुंबई सारख्या शहरांमध्ये पुष्पगुच्छ व समारंभात सुशोभीकरणाकरिता पाठवतात.
राजरोसपणे बेसुमार, कत्तल व वाहतूक चालू असतानाही आजपर्यंत वन खात्याने लक्ष दिलेले नाही. याबाबतची सविस्तर माहिती राज्य शासनाच्या वनविभागाचे प्रधान मुख्य सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली तरी सिंधुदुर्ग वनखात्याने याची दखल घेतली नाही. बांदयापासून ते सिंधुदुर्गच्या हद्दी पर्यंत मुंबई गोवा हायवेवर ठिक ठिकाणी या वनस्पतीचे भारे बांधून हे बाहेरील लोक गोव्यावरून येणाऱ्या खाजगी बसची वाट पाहताना निर्दशनास दिसून येतात. हे सर्व अनधिकृतपणे चालू असताना वनखात्याने याबाबत कारवाई केल्याचे अद्यापतरी निदर्शनास आलेले नाही.
काळसे परिसरात तोडीला मज्जावः
रायनो बीटल (गेंडा भूंगा) नावाचा भूंगा भेरली माडाची कोवळी पाने खाऊन आपली गुजराण करतो. याच भूंग्याचा नारळाच्या कोवळ्या पानावर मोठ्या प्रमाणावर प्रदुर्भाव दिसतो याचे महत्वाचे कारण म्हणजे भेरली माडाची कोवळी पाने मिळत नसल्यामुळे या भूंग्यानी नारळाकडे मोर्चा वळवला आहे. हे लक्षात आल्याने काळसे, पेंडूर व हूबळीचा माळ या परिसरातील ग्रामस्थांनी भेरली माडाची पाने काढणाऱ्या मजूरांना या भागात येण्यास मज्जाव केलाय.
असे होते पुनरूज्जीवनः
भेरले माडचे वैशिष्ट्य असे की, त्याच्या खोडावर पिकलेल्या फळांचे घोस आसतात व त्यामध्ये हजारोंच्या संख्येने फळे असतात. पिकून गळून पडलेली फळे या वृक्षाच्या बुंध्याखाली पडलेली असली तरी त्यामधून क्वचित प्रसंगी वृक्ष निर्मिती होते. पण या वृक्षाचा प्रसार प्राणी आणि पक्षी यांच्या मार्फत योग्य प्रकारे होतो. अशा पध्दतीने या वृक्षाचे निसर्गतः पुनरुज्जीवन होते.
(साभारः ई सकाळ वृत्तसेवा)
युपी च्या बिचाऱ्या लोकांना जंगलातून सुर माड तोडताना अडवले म्हणून वाईट वाटलेल्यांसाठी ....
परप्रांतीय असो की कोणी मराठी जो कोणी आमच्या अधिवासात येऊन झाडांना प्राण्यांना पक्ष्यांना त्रास देईल त्याला असेच हाकलून लावू... तुमचा व्यवसाय जर निसर्ग उध्वस्त करून उभा राहत असेल तर लक्ष्यात घ्या निसर्ग आमचे पोट भरतो...काही जणांना पुळका आलाय लोकांच्या गरिबीचा... परप्रांतीय हा एक शब्द पकडुन मराठी मराठी करणारे उभे राहिले अगदी नको त्या शब्दात कमेंट करू लागले पण स्वतः काय करतोय ह्याचाही विचार करा?? कितीजण आपापल्या गावात जुन्या जीवनशैली ला टिकवण्याचे काम करतायत?? कितीजण स्वतः निसर्ग पूरक जीवनशैली चा पुरस्कार करतात..फक्त शाब्दिक गप्पा मारायच्या...
होय मी परप्रांतीय पर्यटकांना पण फिरवतो कोकणात...म्हणून काय त्यांना झाडे विकतो काय? त्यांना कोकण किती समृद्ध आहे आणि का संर्वधित व्हायला हवे ही सुद्धा सांगतोच...ते आपले पहिले काम..
उद्या आपण पर राज्यात पैसे कमावयला गेलो तर काय काय तिकडे घाण करणार?? झाडे तोडणार?? धाक बसायला हवा की नको??
वाघाचा धाक असतो म्हणून जंगलात जाताना घाबरता ना?? जंगलागले वाघ कमी झाले तरी माणसे शिल्लक आहे..जी जंगल राखायला पुढे यायला हवी...स्थानिकांना दोष देणाऱ्यानी जरा स्वतःच्या घरात चार गोष्टी सांगाव्या...फेसबुक पेक्षा तिकडे बोलायची जास्त गरज आहे..
कोकणी माणसे पैश्याने गरीब आहेत पण आनंदी आणि समाधानी आहेत ह्याचे कारण इथला निसर्ग....ज्या निसर्गाला मी देव मानतो माझ्या कोकणातल्या जंगलात आणि देवराई मध्ये स्थान असलेल्या सुर माड सारख्या झाडाला ओर बाडले जात असेल तर तळ पायाची आग मस्तकात जाणारच ना..माझ्या भावना खूप वेगळ्या आहेत ह्याबद्दल मी खूप भावूक आहे...माझ्या घरातल्यांशी मी झाड तोडण्यावरून भांडतो...झाडाला मीठी मारून उभा राहतो...माझ्या आजूबाजूला कटर चालू असेल तर तिथे जावून हाकलून लावतो..समजावून सांगणे हा प्रकार मलाही जमतो पण झाडांच्या बाबतीत मी खूप sensitive आहे... परप्रांतीय अन्य ठिकाणी पण आहेत..बिचारे कुठेतरी काम करतात कष्टाचे आणि जगतात रस्त्यात राहतात..त्यांची दया येते मला सुद्धा...त्यांची चूक काही नाही...पण जेव्हा जंगलात दिसतील ना...हेच करणार.. मी निसर्गाला देव मानतो लक्ष्यात घ्या तुमच्या देवाला तुमच्या श्रद्धेला कोणी ठेच पोहोचवली तर काय करणार तुम्ही???...मी माणूस आहे त्या आधी एक प्राणी आहे...आमच्या अधिवासात याल तर याद राखा..
अगदी बरोबर आहे भावा, १००% सहमत.
तुझे काम वाईट नाही रे भावा. तुझी पद्धत चुकीची होती. कदाचित तू रागाच्या भारत बोलला पण .. मला असा वाटतंय की तुझा हेतू इथे पब्लिसिटी घेणे असा आहे नाहीतर तू subject लिहिलंय सरसकट यूपी बिहारी .. आणि तिथे व्हिडिओ मधे तू पाहिले उर्मट दादागिरी दाखुन स्वतःच बोलतोय की या गरीब कामगाराची चूक नाही. याचा अर्थ असा की फुकटच्या पब्लिसिटी साठी तू व्हिडिओ छा शीर्षक एकदम हटके ठेवलास. असोत तुझा वयक्तिक विषय . पण comment करणे हा माझा वयक्तिक विषय. तुझे व्हिडिओ मी यासाठीच बघतो कारण तुझी पर्यावरणपूरक content.
पण जर तुला फुकटची पब्लिसिटी करून subscriber घ्याचेत तर खुशाल कर ..
मी अजून काही विषय सुचवतो तुला ..नुसताच लोकांना शिव्या घालून सुध्धा famous होतो माणूस . बेस्ट ऑफ लक.
👍
Ekdam barober👌
Bhava Barbour aahe Police complete kara lavkar
@@RajkumarYadav-he7hz राजकुमार यादव - सगळ्यात पहिले तू "यादव " युपी बिहारी आहेस म्हणून तुझ्या नाकाला "या मिरच्या झोंबल्या" राणमाणूस ने जे केलंय ते योग्यच केलंय तुझ्यासारखे फुटकळ लोक त्याला पब्लिसीटी स्टंटच बोलणार कारण ही गोष्ट महाराष्ट्रात-कोकणात घडली आहे, त्यामुळे तुला त्याची गंभीरता समजणार नाही कारण तुला इथल्या वनसंपदेशी घेणंदेणं नाही कारण ती तुझी प्रादेशिक अस्मिता नाही, हेच युपी बिहारमधे घडलं असतं तर तुझ्याही बुडाखाली आग लागली असती ,
मी विदर्भात राहतो पण निसर्गाच्या सरक्षण पाहुन करणारे लोक
पाहिल्यावर चांगलं वाटलं
काेकण साठीची तुझी तळमळ मनाला भिडते भाऊ.
garibala ordun tyacha channel mota karrnyacha technique 😄😄
👌👌👌👌👌
@@Dipeshvlogs exactly tya malkala phone lavun tya var chadayla hava hota na
@@Dipeshvlogs at least he is doing something
Bhau tuzya kamala salam
मी एक नाशिककर आहे दादा. अस्सल शेतकरी .मला कोकण इतके आवडते ना कि हॉलिडे एन्जॉय करायला फॅमिली बरोबर कोकणातच येतो .किती सुंदर समुद्र किनारे आहे . नारळ पोपळीची बागा खूप खूप मन प्रसन्न होऊन जाते आपलें कोकण सांभाळून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे..नाही तर ही परप्रांतीय लुटून खातील.. खूप छान काम करतोयस दादा तु
नेमकं कुठे कोकणात येता आपण? कर्जत पासून कोकणच आहे.
एकदम दबंग व्हीडिओ!मानलं. 👌
कोकणी रानमाणूस तुमची निसर्गाबद्दलची ओढ आणि निसर्गाबद्दलच ज्ञान खूप छान आहे 🙏🙏🙏
आपन खुप तळमळीने आणि मनापासून,खूप छान काम करता. नमस्कार.
तुला त्या झाडा बद्दल असलेली माहिती ही छान होती. तूझ्या सारख्या पर्यावरण प्रेमीची महाराष्ट्राला खूप गरज आहे. या लोकांना आपणच वेळीच आद्दल घडविली पाहिजे. धन्यवाद🙏
निसर्ग राहीला पाहीजे खुप छान मित्रा
यात परकीय लोकांचा काहीही दोष नाही,कारण आपलेच लोक स्वार्थी,मतलबी आहेत.
आपली पण आहेत सोबत परप्रांतीय ही तितकेच नालायक आहेत .
Barobar
Tumhi aplya madhech bhandan kara aani gilu de tyana maharashtra jashi mumbai tyani gilali
@@blackblack1553 होना, त्यांच्या घामाने गटारे ओसंडून वाहतात।
तो कमी पैशात काम करून देता हा ना तुका काय करुचा असा असं बोलून दाखवनारे आपलीच माणसं असत
प्रसाद खुप सुंदर काम
परप्रांतीय नावाच्या कचऱ्याला महाराष्ट्रा बाहेर फेकून देणे खूप गरजेचे आहे.
पण त्याच बरोबर आपला मराठी माणूस ही तेवढाच जबाबदार आहे.
आपलं वैभव नष्ट होण्याआधी हे सर्व थांबलं पाहिजे.
कोकणी रान माणूस more power to u भावा 👍
प्रसाद तू खरंच चांगलें काम करतोयस.
सुंदर प्रसाद....♥️ त्या भय्याना फटकवायला हवं होतंस..
Khup chan vedio....tumchyasarkhya jagruk lokanmule ya gosti kaltat. Parprantiyana shakya tewadhe adwalech pahije..ani tyahipeksha aplya lokanche prabodhan havech...asech vedio banwa..shubhechyaa..
निसर्गाच्या सरक्षण पाहुन करणारे लोक
पाहिल्यावर चांगलं वाटलं
एकदम बरोबर, जंगलाचे संवर्धन व्हायला पाहीजे
चांगलं केलं भावा तू 👍👍 आणि तुझ्या डोळ्यात, बोलण्यात आणि वागण्यात मला एक कळवळा दिसला आपल्या मातीचा जो प्रत्येक मराठी माणसा मध्ये आला पाहिजे 🙏 आभारी आहे भावा तुझा
प्रसाद, तुम्हाला आणि तुमच्या टीमला सलाम. .. चांगली गोष्ट ... देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो ..🙏
Khup chchan kam kartay. Changli mahiti ahe tumhala. 👌🏻👍🏻
खूप छान माहिती दिलीस झाडा बद्दल जंगला बद्दल! मी नुकताच गावाला जाऊन आलोय वेंगुर्ले भोगवे सुनामी आयलंड अश्या बर्याच ठिकाणी फिरलो,एक गोष्ट दिसून आली आणि बघून वाईट वाटलं,समुद्र किनाऱ्यांवर प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा खूप वाढत चालला आहे , वेळीच जर ह्या गोष्टींना थांबवायला प्रयत्न केला नाही तर, कोकणचा गोवा व्हायला वेळ लागणार नाही, मला वाटतं की तू जनजागृती साठी लोकांच्या नजरेत ही गोष्ट तुझ्या व्हिडिओ मार्फत आणून दिले पाहिजेस , 🙏 मला वाटतं त्या मार्फत लोकान पर्यंत आपला मेसेज नक्कीच पोहोचेल
Khupach chhan video, tuzya videos madhun khup mahiti milate Dhanywad! Aani aapsamadhye bhandu naka hya video madhun je changal aahe te ghya👃💐👃
भावा तुला मानाचा नमस्कार,
तु कोकणचा रानमाणुस ,हि तुझी ओळख तु दाखविलीस.
पण तुझं हे काम पाहून,आज मनातुन हे शब्द निघाले.
कि, तु खरा कोकणचा शिलेदार आहेस म्हणुन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
शाब्बास, प्रसाद! असेच कोकणातल्या प्रत्येकाने असे केले तरच स्थानिक निसर्ग व जीवन समृद्ध होईल!
भावा खुप चांगलं काम केलंस.. कोकणी माणसाला हे कधी कळणार काय माहीत..? एव्हढं सगळं होत असताना सुद्धा मराठी माणसाला मुख्यत्वे करून कोकणी माणसाला स्वतःच्या नैसर्गिक वैभवाची काहीच किंमत उरलेली नाहीये हे दिसून येते.. आपल्या स्वर्गापेक्षा सुंदर जमिनी आज परप्रांतीय घेतायत अर्थात त्यांना विकल्या जातायत.. काही वर्षांनी चित्र उलट दिसेल यात शंका नाही कारण हेच परप्रांतीय आपल्या जागा घेऊन हेच वन्य जीवन अनुभवायला मोठे रिसॉर्ट, फार्म हाऊस बांधतील आणि त्यात कोकणी माणूस त्याचे पैसे देऊन निर्लज्जपणे राहायला आणि अनुभवायला जाईल..
तू करत असलेला प्रयत्न १००० % खरा आहे.. आज तुझ्यामुळे कोकणची साधीभोळी माणसं नक्की काहीतरी बोध घेतील.. आणि आपलं नैसर्गिक वन्यसौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतील हीच अपेक्षा..
सलाम तुझ्या कार्याला 👍👍👍👍
खरोखर सुंदर व्हिडिओ बनवला आहे बघुया आता तरी आपल्या कोकणवासीयांना काहीतरी समजेल 👍🙏🙏
निसर्ग संवधनासाठी आणि कोकण वाचवण्यासाठी तुझी तळमळ पाहून अभिमान वाटतो प्रसाद.
ह्यावर सर्व स्थानिक लोकांनी मिळून आवाज उठवायला हवा.
Chan kam karat ahe tumhi nisarg mitra
फार महत्वाचा व्हिडिओ प्रसाद.
जंगलाची हानी करणाऱ्यांना रोखणे आवश्यक आहे.
परकीय लोकांना दोष देण्यात काय अर्थ नाही.आपण मराठी माणसच जबाबदार आहोत. तूझी तळमळ बघून तूझ्या कार्याला सलाम.
योग्य संयमी भूमिका घेतली तुम्ही 👌🙏
Khup chan Bhau kadak Aabhyas
आपण इतके तरी नक्कीच करू शकतो, असे व्हिडिओ जास्तीत लोकपर्यंत शेअर करून आपलाही खारीचा वाटा उचलायला हवा.
तुमच्या कार्याला सलाम.
Dada very good 🌍🌏save earth
आपल्या जागा जमीनी विकु नका . सगळ्यांनी एकत्र येऊन शेती करा. कोकण वाचवा महाराष्ट्र वाचवा.
अगदी बरोबर बोललास भाऊ सगळे एकत्र आली पाहिजेत पण आपलीच भावकी खेकड्याचे काम करते... हे ही तेवढच कटू सत्य आहे भावा...
हे असले लोक संपूर्ण कोकण मधून हाकलून दिले पाहिजे.
आता कोकण,मुंबई विकली.
Nice video bhau.🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹
छान मित्रा एकदम बरोबर केलस तू खरा कोकणी आहेस तू.खरा मराठी आहेस तू
खूपच छान माहिती
तुझ्या तळमळीला सलाम भावा ... पण ते काका तुका मागसून गाळी घालतले. 'मी सांगलय तोडूक आणि हो कोन हुशारे करता' म्हणू. तरी पण या व्हिडिओतून थोडीफार जरी जागृती झाली तरी पुरेशी आहे.
आपली लोक आपल्याच लोकांना लांब ठेवतात आणि परप्रांतीय लोकांना जवळ करतात
कोकणातली घरं, जमिनी,शेतीभाती विकत घेतायत परप्रांतीय लोकं, तिथलेच लोक विकतायत सगळं....शहरातली लोक तिथे हॉलिडे होम्स बनवतायत,जमीन शहरातल्यापेक्षा स्वस्त म्हणून ....हे सगळं खूप त्रासदायक आहे....कोकण कोकण राहू दे देवा महाराजा .....😢😢
आता कोकण मुंबई विकली.
कस आहे ताई पैसा हा महत्त्वाचा आहे. सगळ्यांना सगळ समजत आहे.. पण पैशाचं सोंग घेता येत नाही.कोकण वाचला पाहिजे हे सगळेच बोलतात प्रयत्न पण करतात.. पण सर्वात शेवटी पैसा
एक नंबर कोकणी रान माणूस....खूप छान काम👍
1 number kaam kelas bhava 🙏
Ashya prakare saglyani kela tar tyanchi himmat honar nahi tya kakala up la patva
Kup bhari
This video should b viral every where n d people in konkan should be alert what is happening .
खुप चांगलं केलं....तुमच्यासारख्या जागरूक लोकांची संख्या वाढली पाहिजे
छान . असा जागरूक पणा प्रत्येक कोकणी माणसामधे हवा.
कोंकणी माणसाने आत्ताच जागावे नाहीतर परिस्थिती मुंबई सारखी होवाची
It has already become in some places
Agdi barobar. Mumabai madhe tar kabja kela ahe pan kokanat yeu deu naka🙏🙏
अगदी बरोबर ...
60% कोकण विकला गेला आहे याचे परिणाम 4 वर्षांनी दिसणार
Mumbai pn konkantach yet.
Khup changla kaam keles bhava.. 🙏🙏...
'भैय्या हातपाय पसरी' असं नाटक होतं मच्छिंद्र कांबळी यांचं..!
राज ठाकरेंनी अनेक वर्ष कितीही ओरडून सांगितलं तरी आपल्याला अजून या मुद्द्याचं महत्व कळलेलं नाही..
दुर्दैव हेच की या परप्रांतीय लोकांना आपलेच काही लोकं मदत करत असतात.
हे एक्सपोज केल्याबद्दल तुझे आभार 🙏🏻👍🏼
संतोष धुरी हे नाव फेसबुक वर सर्च करा मग समजेल कोण आहेत ते😂
Khupach chaan
आपलीच मराठी माणसे जवाबदार आहेत हया लोकांना कोकणात आणतात. लोकल माणसे कोनी विचार करत नाही.
What do u mean by your people ...... ur people means Marathi manus... and he brings other people from outside places because ur local Marathi manus doesn’t do any work.... sabke sab kaam chor hote hain..... I work in Konkan in land development and real estate..... and most of the hard labour works are done by people of other sir states especially UP and Bihar and just because of these labourers the economy of Maharashtra work.... I have local Marathi contractors in Konkan and when I had asked them why u call people from other states and not give work to local people ..... than they only told that Marathi manus kaam chor hote hain and they don’t want to do hard work and want money without doing any work...... I myself given a work of just putting water in to my lawn for 30-50 mins everyday to a local young guy whose house is just next to my land and for this I pay him 10000/- per month and he doesn’t do this job also and when I asked him that u cannot work for half an hour also..... he told my sorry I cannot work any more .... so her mother told that I will put water daily to ur farm ... so she’s doing now...... and the same Marathi people from local says me that u please bring a family from outside who can take care of ur farm because our people will not work..... and many more things are there to say but I cannot because we all are one..... jai hind.... jai Maharashtra
परप्रांतीय हटवा , महाराष्ट्र वाचवा🚩
Dada 1no kam kel......
स्थानिक लोकांनी पण कोकण वाचवण्यासाठी हातभार लावला पाहिजे प्रसाद सारखा कोकणी रानमाणुस तर आहेच पण त्याच्या सोबत कोकणी रानमाणसे तयार होयाला पाहिजे कोकणाचे रक्षण करण्यासाठी
Nice job
Dada khup bhari kaam kartoy 👌👌👌👌👌👌🙏🙏
भावा तुला सलाम माझा, खूप उत्कृषटरित्या काम करतोय माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे
Ek number bhau jai maharashtra
प्रसाददादा... खूप पोटतिडकीने तुम्ही हा विषय मांडला आहात... नक्कीच त्याबाबतीत जागरूकता होईल.
खुप छान दादा तुम्हाला सलाम👍👍👍👍
माझ्या मनात हे बरेच दिवस झाले हेसवपहा निसर्गाचा रास रोखला पाहिजे
खूप सुंदर काम केल मित्रा 👍
खरतर स्थानिक लोकांनी स्वतःची जबाबदारी समजली पाहिजे.
खूप सुंदर काम केलंस दादा तू आशा लोकांन मुळे आता निसर्ग धोक्यात आहे,, माझे हरित क्रांती चे स्वप्न आहे पण अशा लोकांना जेव्हा पाहतो डोक्यात जातात,, आज निसर्ग ला सगळ्यात ज्यास्त धोका हा मनुष्य काडून आहे आणि हि खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे
हेंच्या मालकांका आधी वठणीवर आणून व्हया, एकदम बरोबर केलंस.
👌
Great effort Bhai.
Pls save forest pls save nature
good job 👍
भावा मी तूझ्या मदतीला नक्की येईन 🙏
ह्या परप्रांतीय याना मुंबईत ढील दिली म्हणुन ही लोक डोक्यावर बसली परतुं ह्याना कोकणात थारा देऊ नका। नाहीतर मुंबई हातची गोल्यातच जमा आहे म्हणुन सर्वाना विनंती आहे की स्वर्गासारखो आपलो कोकण हातचो गेलो नाय पाहीजे
Itar parprantiyala kokanat yeun devu naka yachi jabbdari apli ahhe,nahi tar yachi Mumbai banyala val lagnar nahi.
Swasth aani jast kaam karayala loka pahije, mhanun para prantiya lokancha vaapar karavaa lagto.
Pratek thikani mazdoor nahi milat, aani Bharatat konahi - kutehi kaam karoo shaktaat.
@@parulthakur8572 असं म्हणून चालणार नाही. देश सगळ्यांचा आहे. काही स्वार्थी लोकांसाठी कष्टाळू लोकांना दोष देऊ नका!
आज त्या माणसाला परत पाठवलं तो कदाचित आज उपाशी झोपेल पण उद्या कामधंदा शोधेलंच. तो कामं करण्यासाठीच स्वतःचं घरदार सोडून आलाय. यू पी वाले लोकं खूप गरिबीतून येतात पण खूप कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. हा माझा अनुभव आहे. केवळ परिस्थिती वाईट!
@@anjalishejwalkar3400 भाऊ आम्ही पर प्रांतीय लोकांच्या विरुध्द नाहीत पण हे पर प्रांतीय लोक खासकरून उत्तर भारतीय लोक मुंबई मध्ये किती अरे रावी आहे यालोकांची मुंबई आम्हालाच बोलतात हिंदी मे बात करो यांनी मुंबई मध्ये येऊन मराठी शिकली आणि बोलली पाहिजे तर उलटा मराठी लोकांनाच दादा गिरी करतात अज कोकणा मध्ये हे पर प्रांतीय लोक कमी आहेत म्हणून तुम्हाला चांगले वाटतात जरा त्यांची मुंबई सारखी कोकणा मध्ये लोकसंख्या वाड होऊ दे मग माहिती पडेल हे लोक काय आहेत ते मुंबई सारखी कोकणाची अवस्ता नाही वायला पाहिजे तर पर प्रांतीय विरहित कोकणाचा विकास व्हायला पाहिजे नाहीतर सृष्टी सौंदर्याने नटलेला कोकण तुमचा भांडी घासा आमची असे भविष्यात वायला नको
@@prabhakarnaik2457
माझी पण फॅमिली यूपी मधून 1980 वर्षी येऊन स्थाईक झाली. पण दादागिरी किती सहन करावी लागते तुझ्या सारख्या brainwashed लोकांची हे मला express करता येणार नाही एवढ्याश्या comment मधे.
तुला उत्तर म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये labourer UP Bihar मधुन आज येतोय कारण तेथील आर्थिक परिसथितीमुळे . जर उद्या तिथे काही वर्षात परिस्थिती सुधारली तर कोणी नाही येणार तुझ्या शिव्या खायला.
ज्या माणसाला चोरी गुन्हेगारी करायची असते त्याला मुंबईत यायची गरज नसते. यूपी बिहार मधे चांगले पूरक वातावरण आहे हे कोणाला सांगायची गरज नाही.
मुंबई मधे आणि जर labour up Bihar madhun नाही आला ना तर मग काय बांगलादेश, पाकिस्तान नेपाळ आणि आफ्रिका मधून बोलवणार काय?
जसे Gulf countries madhe बोलावतात.
थोडा research करा आणि सगळे मराठी आणि अन्य उद्योजक यूपी बिहारी लोकांनाच कामावर का कष्टाच्या कामासाठी ठेवतात त्याची कारणे त्यांनाच विचारा. आपलाच आसा जगाच्या पाठीवर देश आहे जिथे कष्टकर्यालाच कमी पैसा आणि नीच वागणूक दिली जाते .. म्हणूनच देश गरीब चा गरीब आहे. पैशाने आणि संस्काराने सुध्धा.
देशाची मेट्रो cities जर सगळ्या जाती पंथ धर्म प्रांत रेस कलर nationality च्या लोकांच्या सोबत जस्टिस करून प्रगती करू शकत नसतील तर मला वाटतं . काहीतरी मुळातच प्रॉब्लेम आहे . आपण कधी competition देणार Dubai ,New York , San Francisco, Shanghai, London ....
असेच जर चालू राहिले तर फक्त अधोगतीच होऊ शकते. जसा १९७१ मधे पाकिस्तानचा बांगलादेश झाला तसाच होईल आपलाही भारताचा काश्मीर , तामिळनाडू पंजाब ...मग बसू आपण डोके आपटत. आपण तेच करतोय तसेच वागतोय जसे आपल्या देशाच्या शत्रूंना हवय.🙏
Best kokani RUclipsr
Nature awareness spread karto hi saglyat mothi goshta aahe
Hats off to You
अनेक विषय तळमळीने लोकांपर्यंत पोचवतो
मित्रा एक नंबर काम करतो आहेस हे काम कोकणातल्या लोकांला आणि नेत्यांला सुद्धा जमत नाही ते तू करतो आहे माझ्या मते कोकणच नेतृत्व तू खूप छान करूशकतो आणि ह्या कोकण देव भूमीला वाचवूशकतोस आणि ह्या साठी कोकणातल्या सर्व आणि मुंबईला असलेल्या कोकणी तरुणांनी पुढाकार घ्यावा कारण खरंच कोकणात खूप मोठ्या प्रमाणात भैये , नेपाळी, गुजराती वाढत चालले आहेत आणि ते कायमचे कोकणात स्थायिक होत आहे आणि ह्याला जबाबदार कोकणातील तरुण मुलं आणि लोक आहेत आणि मित्रा हा व्हिडिओ कोकणातल्या सर्व तरुण मुलांपासून ते लोकांपर्यंत पोहचला पाहिजे मित्रा सलाम तुझ्या कामाला
Good job prasad.pls.keep.sharing
Mast mitra samjvinyachi reet khoop changli
Ek no
खुप संताप येतोय हे सर्व पाहून....आपल्याच माणसांना किंमत नाही आहे तर् यां परप्रान्तीयांना काय दोष देणार.... संबंधित माणसावर त्वरित कारवाई झाली पाहिजे...
Very well expressed 🙌🏻
वने व वन्य जीव रक्षणार्थ आपणा सर्वांचे अभिनंदन....
स्वतःच पोट भरण्यासाठी निसर्गाची वाट लावत चाललेत, आणि यासाठी स्थानिकच जबाबदार आहेत. कोंकण वाचवण्यासाठी कठोर कायदे आताच करायला पाहिजे नाहीतरी भविष्यात निसर्ग ही संकल्पनाच संपून जाईल....
✅
जर शेतकरी जमीन महसुल भरत असेल तर खाजगी जमिनीतील प्रत्येक झाडाची मालकी त्या शेतकऱ्याची आहे.
खूप गंभीर बाब आहे!
भावा बेडला माडाची पाने नाही तर गावठी आंब्याच्या झाडांची पाने देखिल ओरबाडून मुंबई सारख्या मोठ्या शहरात नेली जातायत .
अरे बाप रे
मुंबईकरांनी हे सर्व कुठे वाघाची कातडी घे,मांडूळ घे ,,खवले मांजर तस्करी करणे व वनस्पती ओरबडून ने या करीता प्रत्येक गावात युथफोर्स निर्माण करा
१no. Bhawa barobar आपली लोकच ह्याला कारणीभूत आहेत
👏👏 प्रसाद..." कोकणाची मुंबई" होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे 👍👍
मस्त भावा धन्य आहेस तू,खूप खूप आभार तुझे
Thanks for taking care of konkan and environmental issues. Hope many people see this and realize the damage being done and help preserve nature.
Dada khup chaan kaarya kartay tumhi 👍🏻👍🏻
खुपच छान काम करतो आहेस भावा 👌👌🙌
Prasad khup chan kaam
फार चांगले काम करत आहेस मित्रा. पण सगळ्या नागरिकांनी दक्ष राहून निसर्ग वाचवला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच मित्रा तुझी निसर्गाबद्दल ची तळमळ पाहून आणि कोकणा बद्दलची आपुलकी पाहून हेवा वाटतो..🙏
खरय्ं भाऊ आपल्या महाराष्ट्रातील वनसंपत्ती जपायला हवी
Kya bat hai bhai mala khup avdli hi video bhava love you ❤️
परप्रांतियांना कामाला ठेवल्यावर हे असेच होणार
Khup chan kam kelas bhava
EXCELLENT PRASAD.YOU CAUGHT HIM IN TIME AND SAVED HIM DESTROYING FURTHER.HOPE YOU WILL BE ABLE TO CATCH HOLD OF LOCALS AND WARN THEM.👍
खुप छान प्रसाद
एकदम बरोबर 🙌 तु मस्त काम करतोयस. मी मुंबईत राहत असलो तरी मी कशा प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो कृपया सांगा. मला खूप आवडेल.
प्रसाद दादा अगदी बरोबर हा आवाज सगळ्या कोकणवासीयांनी उठवायला पाहिजे
मित्रहो कोकण चा निसर्ग आणि निसर्ग जीवनशैली जगणारी रान माणसे जे स्वर्गीय जीवन जगतात तेच आजपर्यंत बऱ्याच व्हिडिओज मधून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला..पण कधी कधी लोक निसर्गाला ओरबडण्याची टोकाची सीमा गाठतात तेव्हा बघवत नाही..राहवत नाही आणि मग अश्याही घटना पोट तिडकिने तुमच्यासमोर मांडतो..हा व्हिडिओ त्यापैकीच एक आहे...युपी बिहारी किंवा परप्रांतियांना टार्गेट करणे हा ह्या व्हिडिओ चा उद्देश नसून निसर्ग वाचवण्यासाठी स्थानिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देणे हा प्रामाणिक उद्देश आहे...केवळ मराठी मराठी करून प्रश्न सुटत नसतात...शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र निर्माण केला त्यातील नैसर्गिक संपन्नता अबाधित ठेवण्यासाठी...समुद्रा पासून सह्याद्री पर्यंत जैव विविधतेचे माहेरघर असलेले कोकण जपणे हाच महाराजांना अपेक्षित असलेला शाश्वत महाराष्ट्र आहे.....परप्रांतीय हा शब्द आपल्या सर्वांसाठी आहे जे निसर्गातल्या ओरबडलेल्या संसाधनावर ऐशरामी जीवन जगतात आणि फक्त शाब्दिक विरोध करतात....खरेतर निसर्ग वाचवायचा असेल तर आपल्याला आतापासून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल..विचार करा🙏
Kahra bolat Dada tumhi...amhi tumchya sobat ahot...ya Nisarga sobat ahot...asech kama karat raha Ani kahi madat lagli tar nakki haak mara amhi yeu🙏❤️✨💯
डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलेली दुर्मिळ भेरले माडाबद्दलची महत्वपूर्ण माहिती वाचली. याचे तितकेच महत्व तिथल्या स्थानिकांना समजायला हवे. तरच तुमच्या सारखे तेही असे झाडे किंवा त्याची पाने तोडायला येणाऱ्याना विरोध करतील. तसेच इथे असेही जाणवत आहे कि ज्यांना या झाडाचे महत्व माहित आहे ती लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन स्वतः च्या स्वार्थासाठी याचा वापर करत आहेत व वनअधिकारीहि काही कारवाई करत नाही. आशा करते या vlog मुळे तुझी निसर्गाबद्दलची तळमळ त्यांच्यापर्यंत पोहचेल.पण जे काही करशील ते सांभाळून तुझ्याबद्दल आदर आहे तितकीच काळजीही वाटते. 👍
Mr Konkani Ranmanus..... please delete or edit the content of this video where you had used filthy unacceptable language against one community..... or be ready to face legal consequences....shame on u
@@guptapramod3090 He has not talked abt any community particularly or blaming them uselessly...he is taking abt the unwanted things that are happening in the jungles of Konkan...and he is absolutely right...his main aim is of saving the nature...so watch that video properly and get the things properly pls🙏🙏
Prasad Dada always with u...keep going ahead 🙏❤️✨💯
Great job bhau . Devak kalji
पण ज्यांनी त्यांना पाठवलंय
त्याला पकडून जाब विचरायला हवा
एकदम बरोबर.
Kahi pan changla kela ki tumha lokanna kahi tari sheput suchtach
Je changla hotay tyacha kautuk sodun shillak chya goshti aathavtil aata je changla hotay tyacha pn kautuk kara jara jyanni tyana pathavlay tyancha pn baghta yeil aadhi ya kamacha kautuk kara..
Ani lokanna akkal dilyapekaha tumhi pn jara ashe kama kara...
Barobr aahe tyach ky chukla.
Evda rag yetoy tr tu tyala thev changlya kamala
जमीन कोणाची आहे खाजगी की सरकारी?
@@roshanbrahman7688 khajgi jameen aahe aani ha ugach tyala oradto tya garibala. Me pn kokanatch rahato tepn he goshta ghadli tyach talukyat aani he bhedle mad aami pn kadto karan yacha kahihi upyog hot nahi
शहरी लोकांना शिक्षणाची खरी गरज आहे
Aआपण सर्व लोकांनी प्रसाद सारख्या लोकांना मदत करून त्यांच्या पाठी ठाम राहिले पाहिजे , नुसत हे करा ते करा अस करा सांगून उंटावरून शेळ्या हाकू नये