सुरंगी ची सुगंधी गोष्ट| Forest of Fragrance

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #सुरंगी #Surangi
    कोकणातील मार्च महिन्यातील सकाळ म्हणजे सुरंगीच्या सुगंधाने दरवळलेला आसमंत. सुरंगीची फुले खुपच आकर्षक व सुगंधी असतात. या फुलांचा गजरा स्त्रीयांना खुपच आवडतो. सकाळी लवकर उठून सुरंगीच्या न उमललेल्या कळ्या काढायच्या, त्यांचा देठ नखाने तोडायचा व बाहेरच्या दोन संदलांना उलट पिळटायचे. यालाच "कळ्या #पटकाळणे" असे म्हणतात. नंतर पटकाळलेल्या कळ्यांचे संदल दोर्‍यात ओवून गजरा करायचा. बाजारात सुरंगीचे #वळेसार (गजरा) चांगल्या किंमतीने विकले जातात. सुरंगीच्या सुकवलेल्या कळ्या आणि फुलांना अत्तर उद्योगात खुप मागणी असते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. सुरंगीचे लाकुड खुप टणक व टिकावू असल्याने फर्निचर साठी वापरले जाते.
    सुरंगी हे तळकोकणात आढळणारे सदाहरीत, मध्यम आकाराचे झाड आहे. झाडाला जखम झाल्यावर खोडातून पिवळसर डिंक येतो. याची पाने लांबट, रबरी असतात. मार्च-एप्रिल दरम्यान याला फुले येतात. सुरंगीची फुले फुलोर्‍यात न येता, जुन्या फांद्यांवरच येतात. फुलांना चार पांढर्‍या पाकळ्या, दोन संदल, खुप पुंकेसर व लांब देठ असतो. याची नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. मालवणीत नर झाडाला #सुरंगी व मादी झाडाला #बुरंगा म्हणतात. दोन्ही झाडे दिसायला सारखीच असतात. यांत फरक असा की, नर फुलांमध्ये फक्त पुंकेसर असतात. पुंकेसर पिवळ्या रंगाचे व सुगंधी असतात. तर मादी फुलांच्या मध्यभागी फुलदाणीच्या आकाराचा, लाल रंगाचा एकच स्रीकेसर व त्याभोगती पुंकेसर असतात. गजरा व अत्तरासाठी फक्त नर फुलांचाच वापर केला जातो. नर फुलांपासून फळ तयार होत नाही. तर मादी फुलांपासून अंडाकृती, दगडी फळ तयार होते.
    सुरंगीचे शास्त्रीय नाव "मॅमीया सुरीगा" (Mammea suriga) असे आहे. मॅमेय (Mammey) या वेस्ट इंडीज स्थानिक नावावरून Mammea व सुरीगे (Surige) या कन्नड नावावरुन Suriga या शब्दांची उत्पत्ती झाली. सुरंगीचा समावेश 'कॅलोफायलॅसी' (उंडी कुळ) मध्ये होतो. पुर्वी उंडी कुळ हे 'क्लुसियासी' (कोकम कुळ) मध्येच समाविष्ट होते.
    सुरंगी (Mammea suriga) व उंडी/उंडग (Calophyllum inophyllum) या दोन्ही झाडांमध्ये खुप साम्यता दिसुन येते. उंडीची फुले सुरंगीच्या मादी फुलांसारखीच दिसतात. यात फरक म्हणजे उंडीची फुले ही पॅनिकल फुलोर्‍यात असतात, तर सुरंगीची फुले फांद्यांवरच लांब देठाने जोडलेली असतात. उंडीची फळे ही गोलाकार तर सुरंगीची फळे अंडाकृती असतात.
    नितीन कवठणकर NK
    Mammea suriga
    Calophyllaceae (Calophyllum Family)
    www.facebook.c...
    @KhalachiwadiPalVengurla
    #Mammea #Calophyllaceae

Комментарии • 624