मराठीमध्ये अशा विषयांवरती युट्युब वरती व्हिडिओ येणं हे जागृतीकडे नेणारं एक मोठ्ठं पाऊल आहे. इंटरव्यू घेणारा युवा मुलगा सुद्धा माणुसकीची जाणीव ठेवून प्रश्न विचारताना दिसतो याचंही फार कौतुक वाटतं. खूप सेन्सिटिव्ह विषय निवडून सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावासा वाटतो कारण यामध्ये साधेपणा आहे, ही लोकं सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत ही जाणीव करून देणारा आहे. यांचे प्रश्न सुद्धा मार्मिक आहेत. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही प्रत्येकाच्या विचारांना स्वातंत्र्य यायला बराच काळ केला पण आता प्रत्येकजण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगळेपणा बद्दल कोणतीही अपराधी भावना न ठेवता धाडसाने बोलत आहे, आपलं रास्त मत मांडत आहे, यालाच चुकीच्या समजुती कडून आधुनिकतेकडे जाणारे नवीन विचार म्हणता येईल.
@@priteshpg4302 what's the difference between professional and non professional. Je asaych te sarkhach aahe. Changl rahile shikle tr professional n sadhe rahile tr non professional. He ani te sarkhech ahet original ani duplicate as kahich nhi
@@trupti5298 तसं नाही बोलत हे मी देवाने त्यांना पण काही गुण दिले आहेत ... आणि ते त्याप्रमाणे वागतात पण , पण असे खूप किरकोळ किन्नर समाज आहे हा अजून पण शिक्षणाकडे वळला नाही , जशी त्यांची शिकवण आहे त्याचप्रमाणे ते वागतात , सगळ्याच किन्नर समाज हा सुशिक्षित झाला तर सर्व लोक त्यांना आपलं समजतील. 😊
भावा आतापर्यंत चा इतिहासातील youtube वरचा सर्वात भारी व्हिडिओ.... ज्यांचा आवाज दाबला जातो किंवा समाज ज्यांला कमी लेखतो असा व्हिडिओ करून तू समजा प्रबोधन केलंय hats off brother
पहिले मराठी किडा चॅनलचे खूप आभार की त्यांनी खूपच छान विषयाला हात घातला खूपच कौतुकास्पद !समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा विषय! खरचं पृथ्वीवर जन्मण्याऱ्या प्रत्येकालाच त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असते.आपण देवाच्या प्रत्येक जीवाला समान न्याय व सन्मान दिला पाहिजे.🙏
मी प्रा.बनसोडे सुवर्णा महादेव बारामती मी गेल्या वर्षी सुनीता गायकवाड या काटेवाडी येथील (तृतीय पंथी ) त्यांना मी NSS Camp मध्ये बोलावून साडी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला पण विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत यांचे मला आजही दुःख वाटते मी त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टिने पहते माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना आहे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद,धन्यवाद
आपला खूप खूप आभारी आहे यांच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल. खरच समाज यांच्याकडे खूप हिन भावनेने बघतो. आपन जसे सामान्य मनुष्य आहोत तसे हे देखील आहेत.यांना देखील त्याच सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या भारतातील सामान्य नागरिकांना भेटतात. यांना ही सामान्य वागणूक दिली पाहिजे कारण ते आपल्या सारखेच सामान्य आहेत . शिक्षण, आरोग्य, सुखसुविधा, समानता, बंधुता हे यांचे हक्क आहेत. यांचे विचार ऐकून खूप काही शिकायला मिळालं.उत्तम भाषाशैली, ज्ञानभंडार, शब्दकोश भंडारा अति उत्तम. 🙏🏻👏🙌
किती साधी आणि सरळ मागणी आहे की, आम्हाला cup उचलायला,as a वेटर म्हणून job द्या आमच्यात तो जॉब करू शकतात...👌👌 खरंच खूप छान वाक्य आहे. सर्वांची इच्छा असतेच की स्वतःच्या कमाईवर गुजारा करणे ह्यांची पण इच्छा असणार आहे की, मग त्यांना अश्या संधी एवढी वर्षे का दिली नाही समाजाने...आता सर्व काही बदल होत आहे पण हा बदल खूप संथ पणे आहे... आपण स्वतःपासून हा बदल करूया आणि मुळात भेदभाव करणं सोडू या...हा व्हिडिओ खूप छान केला. ह्यातून बऱ्याचश्या गोष्टी समजल्या🙏☺️
खरोखर अतिशय मार्मिक व ज्ञानवर्धक असा हा आपला व्हिडिओ असून प्रत्येकाने पहावा यापेक्षा तो ऐकावा असा आहे हृदयाला स्पर्श करणारे शब्द ऐकण्यात आले यांची ज्ञानाची तिजोरी किती गच्च भरलेली आहे हे या मुलाखतीमधून समजले आतापर्यंत कुठेही व कधीही वाचण्यात व ऐकण्यात न आलेला शब्दांचा भांडार म्हणजे मी साबण नाही लोकांनी पुण्य मिळावे म्हणून बाहेर बसवलेले भिकारी व भिक्षुक त्याचप्रमाणे समाजाने आम्हाला राहण्यास जागा दिले नाही तर पुरण्यासाठी देखील जागा देतीलच याची शाश्वती नाही म्हणून आमची प्रेत यात्रा ही पहाटेच्या समय ला निघते हेदेखील कारण आजच कळले याबद्दल लिहावे तितके शब्द अपुरेच आहे आणि खरे जीवन काय असते हे अनुभव घेऊन निर्माण झालेलाज्ञानाचा खजिना आज पाहण्यास मिळाला खूप खूप धन्यवाद असे चर्चा संवाद स्थानिक पातळीवर ती घेण्यात यावे
Khupach chan pan sarv जनतेने त्यांना accept केलेलाच आहे पण काय या काही लोक आपलाच फायदा होण्यासाठी कोणाचं ही हित न होण्यासाठी त्यांना पुढे येऊ देत नाही.
मानलं भावा तुला...हे सहज पणे करायला आणि समाज व्यवस्थेच्या विरोधात ठाम पणे वागायला खरंच वाघाचं काळीज लागतं... तू गोड पणे सामाजिक लाजिरवण्या नजरेला एक चापट मरलीये आणि ती कदाचित चांगली लागलीये....माझा आणि माझ्या कुटुंबाकडून नेहमीच ह्यांचा आदर होतो....बाकी तुला खुप खूप शुभेच्छा✔️🚩💪
खूप आहेत परंतु कोणी या विषयावर चर्चा करत नाही आणि त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न ही करत नाही तुझ्या या इंटरव्ह्यू ल सलाम आहे. तुझ्या मुळे लाखो लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन नकीच बदलेल आणि ह्या साठी धन्यवाद भावा. Hands off to you man 👏🏻
भावा खरचं खुप ग्रेट काम केलंस, हे लोक समाजातील एक भाग आहेत आणि एक माणूस म्हणून या लोकांना पाहणं खुप महत्त्वाचे आहे.... समाजात एक प्रकारची सभ्य आणि सन्मान पुर्वक वागणूक मिळायला हवी, मी पुण्यात असतो, मला वेळ असेल तर मि आवर्जून चहा घेणार विचारतो आणी गप्पा मारतो
भावा तू हा विषय निवडला त्याबद्दल तुझे आभार।। त्यांना 1 platform हवा असतो to express themselves. त्यांची मने , मते न जाणुन घेण्या आधीच तिरस्कार करणं खुप सोपं होतं, येथून पुढे ते देव म्हणून नाही ,पण ज्या माणूस म्हणवण्याऱ्या हक्कांचे हकदार होते ते त्यांना सरकार आणि जनता कडून मिळणारच।।❤️❤️❤️
Nice interview.... हयाच्या मध्ये खूप टॅलेंट आहे.. तस पाहिलं तर विचार खूप चांगले आहेत... हक्काने नोकरी मागतायत म्हणजे काम करण्याची पण धमक आहे.. थोडया फार जणांच्या मुळे बदनाम आहेत...
खरा देव तुमच्यासारख्या माणसात आहे जे लोकांना लोकांशी कसं जगायचं कस सावरायचं ते सांगतात मराठी किडा नुसता मराठी किडा नाही तर लोकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतीलअसा एपिसोड खूप छान
Both White Saree Trans are legitimately showing how calm, composed and confident they are becoming day by day after getting small piece of education and acceptance. Hats off to you Marathi Kida to take down such a sensitive topic of social education in funny and at same time informative way.
The entire interview was literally an eye opener. As a society, it is very important for everyone to think about this. Thank you very much for making an informative video!
Disha and Shamibha यांची वैचारिक बैठक आनि अभ्यास जबरदस्त आहेत बर्याच ठिकाणी आपल्या हक्कांसाठी लढताना दिसतात.गुलाबराव पाटील यांना धारेवर धरल्याचे video viral झालाय. शुभेछा भावी आयुष्यासाठी सर्वांना.
किती सुंदर विचारांचे शिक्षण आहेत ह्यांचे, त्यांचं बोलणं दिसणं,👍जे नॉर्मल श्री पुरुष सुद्धा असे विचार मांडू शकणार नाहीत, आम्हाला विष्णुच मोहिनी रूप,शंकर भगवान ह्यांच अर्धनारी नटशॉर रूप पूज्यनिय आहेत, पण ह्यांचा आम्ही अनादर करतो, किती संकुचित मानसीकता, मराठी किडा ह्यांनी खुप सुंदर विषयावर माहीत दिली,खूप धन्यवाद ❤👌👌👍👍🌹🙏🙏
अभिनंदन आणि आभार बोलभिडू... अतिशय वेगळा आणि कुणीही स्पर्श न केलेला पवित्र विषय घेतलात, आधीच किन्नर परिवाराबाबत आदर होता तो आणखी दुणावला... "तुमच्या पापक्षालनासाठीचा साबण नाहीये" समजून घ्यावा असा कमी शब्दात खूप मोठा गर्भित अर्थ आहे... थँक्स बोलभिडू मुक्या विषयाला वाचा दिल्याबद्दल
या मुलाखतीला सलाम..त्यांच्या तक्रारी ऐकून खरच बरे वाटले. सरकारने त्यांना शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय उभारणीच्या संदर्भात सोय केली पाहिजे. सरकारने त्यांना अधिकार दिले तरच समाजात त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल.
किती स्पष्ट, वेवस्तीत, छान, बरोबर आणि शब्द शब्द कळेल व हकाच बोल्या सर्य ताई खरच त्यांना नाही आपल्याला आपले विचार आणि वेव्हार बदलावं लागणार त्यांचा पण या पृथ्वी वर समान हक्क आहे. पशु,पक्षी, जीव, जंतू मनुष्य, आणि या सर्व tai 🙏🥺😞 देवा ने आपल्यात फरक नाही केला आणि आपण ज्या पृथ्वी वर राहतो तिने nahi केला तर मंग आपण का करायच आपल्या काहीच हक्क नाही कोणाला पण जज करण्याचा respect all jendars 🙏🥺😞
आज तुमचा विषय व मुलाखत अभ्यासपूर्ण वाटली,..समाजातील गैरसमज दुर होतात,माणसातील माणुसपण जागं होतं,आपलेपणा वाढतो...शुभेच्छा तुम्हाला ...चांगले कार्य आहे करत रहा.,🙏
Great Job Marathi kida Appreciate for bringing such innovative content and most importantly choosing right candidates from the community for the interview 👍 The fact is ,Transgender Community is also accepting that things are changing in last 8-10 years . The subject is very vast and a lot can be written here . However we all as a community need to ensure to change our perspective and things will fall in place for sure . Let us pledge -diversity and inclusivity should not remain mere English dictionary words or just a compliance and feedback process and should become a natural culture of our society .
फारच छान विषय निवडला आहे.समाजामध्ये "यांच्या" बद्दल असलेले समज-गैरसमज निश्चितच दुर होण्यास मदत होईल.यांच्या भावना,अपेक्षा,शुल्लक मागण्यांबाबत समाजाने समजून घेऊन त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे मला वाटते.यांचे विचार ,यांचा अभ्यास ,यांचे राहणीमान फारच छान आहेत आणि हो प्रत्येक विषयाच्या व्हिडीओ मध्ये निवडलेली लोकं ही सुध्दा चांगली आहेत.
Marathi kida hats off to you guys!❤️ Keep doing such interviews. transgenders also deserve respect, love just like we do. They are not different, they are similar just like us. People need to understand and respect them! More love and respect to them❤️
मित्रा खूप छान ब्लॉग झालाय हा व्हिडिओ जेव्हा केव्हा पाहतील तेव्हा तेव्हा प्रत्येकाला transgender community साठी काही तरी करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत राहील....
I liked the Transgender in White Saree because she is so damn confident and full of knowledge 😍😍😍😍 PS: Calling Transgender coz we use He and She for Man and Woman so why not to use Transgender with proud ❤️ I loved all of them😍😍😍 Marathi Kida awesome video 😍😍
भावा, खुप हिम्मत दाखवलीस हे सामाजिक सत्य बाहेर काढलंस, तृतीयपंथी लोकांची व्यथा प्रभावीपणे सर्वानी मांडली. आज गरज आहे त्यांना सन्मान देण्याची आणि नौकरीत किंवा व्यवसायात योग्य स्थान देण्याची.
खूप वाईट वाटतंय त्याच्यासाठी,पन आदर आहेच. खुप गमतीदार पणे interview घेतला.आणी त्यातून नवीन माहीती मिळाली. त्यांनी सुध्दा न रागवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली.👌👌👌👏👏👍👍👍
मराठी किडा... तू झालास येडा .... Weldone !!!! एका अर्धनारीनटेश्वराने आज पहिल्यांदा एपिसोड पूर्ण केला .... काही विभत्स नाही ... याचना दया नाही ... जे माझं आहे ते माझं म्हणन्यात कशाची भीती नाही ... The leads in the episodes were so straight that leaves straight people's a side ... Their point argument fights were so realistic that no one ever imagined ... I just wanna be present on that time or day when the Dr Ambedkar's equal opportunity, rights to be allowed to each section of the society.... तुला हे सुचलं म्हणुन तुझं अभिनंदन .... बाकी दुर्लक्षित राहिलेल्या अश्या अनेक व्यथा आणि त्यामागील कथा आहेत... ज्या तू भविष्यात गमती जमतीत बाहेर आणशील च
अगदी उत्तम व्हिडिओ सादरीकरण केलत ज्या समाजात आपण अर्ध ज्ञान घेऊन तृतीय पंथी लोकांविषयी गैर समज करून घेतो त्यांच्याविषयी अंधश्रद्धा ठेवतो पण या व्हिडिओ च्या माध्यमातून खरंच खूप गोष्टी पडद्याच्या समोर आल्यात... आज बरीचशी तृतीय लोकं समाजसेवेमध्ये दिसून येतात व त्याच्यासाशी समांनाने टाळ्या देखील वाजवल्या जातात.
खूप छान होता हा एपिसोड❤️🌸 त्यांना ही आपल्या सारखं मन आहे ,आपण त्यांना मदत करू शकत नसेल तर ,त्यांना त्रास होईल किमान अस तरी करू नका...आपल्या सारखा त्यांना ही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे ,हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे 🥺😊
🥺🥺🥺 Thanks brother. I am a church pastor. Feeling broken when I see very few of us reaching for their uplifting. Truly inspired to do something for them.
@@Aarav.patel000 my great grand father was a very rich man from Telangana those days south India. He got peace going to church. He had money but no peace. Family stood against but he left Family not Christ. My experience is very big. I was ready to commit suicide but Jesus spoke to me and gave me a life hope. Inspite of so many ups and downs God blessed me and today what I am is all because of Jesus.
@@dhirajkumarjames3074 Nice to see that you are happy! I wish you would have read Shrimad Bhagwat Geeta at that time. I am not forcing you to read, it's just a suggestion! Have a gread day!❤️
आणखी त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटत होतं... त्यांचं ज्ञान, समाजाबद्दलची जाणीव, जगाबद्दलच निरीक्षण आणि समान सन्मानाची अपेक्षा या सर्व गोष्टी यांत दिसून आल्या.. व्हिडिओचा शेवट छान केला...👌👌👌 त्यांच्या सन्मानासाठी टाळ्या माझ्याकडून आणि माणुसकीकडून....👏👏👏
खूप छान विषय निवडलं आहे दादा समाजात ह्यांना देखील तेवढच स्थान मिळालं पाहिजे जेवढं आपल्याला आहे ... त्यांच्या सुद्धा भावना समजून घेतल्या पाहिजेत 👍🙏 आणि त्यांना तृतीयपंथी ठरवणार आपण कोणीच नाही आहोत...🙏🙏👍 आणि ती अधिकार कोणालाच नाही आहे 🙏👍
भाऊ, लपून राहिलेला, ज्या विषयाबद्दल बोलण्यास लोक अजून सुद्धा टाळाटाळच करतात असा ज्वलंत विषय आहे... समाजाचा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला फार गंभीर विषय.. फार सुंदर पद्धतीने हाताळला
सर्व प्रथम तुझे खूप खूप धन्यवाद मित्रा की तू LGBTQ समाजाशी बोललास त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा समजल्या. आपण एक समाज म्हणून खूप मागे आहोत हे कळलं. ते पण एक मनुष्य आहेत आणि त्यांना पण सामान्य माणसाप्रमाने जगण्याचा अधिकार आहे. LGBTQ समाजातील काही प्रवृत्ती मुळे सर्वांचे नाव खराब झालं पण एक गोष्ट अशी आहे की आपण एक माणूस म्हणून त्यांना कधी समाजात स्थान दिल नाही की त्यांना कधी काही सिद्ध करायची संधी दिली नाही. ना समाजाने आणि ना सरकार ने....हेच सर्वात मोठं दुर्दैव
दादा...मस्त यार...!!!खूप छान विषय होता नक्कीच सरकार पुढे या समाजापुढे या लोकांबद्दल आदर पूर्वक भावना आल्या पाहिजेत.....शेवटी जे वाक्य होत टाळी बद्दल च ...खूप च छान बोलल्या त्या❤️👍
I loved the interview, being from the LGBTQIA+ community myself we face a lot of judgments and discrimination. However, I appreciate the fact that you guys tried to make this interview funny and light hearted for any common person of any age group can understand this video content and can get education of something new ( for themselves). Though it's a tough life for everyone but living a tran's life is the most difficult and hence we all should respect them even more. Lot's of love🏳🌈
मी अनेकदा निरीक्षण केलंय, (personally) हे लोकं सामान्य माणसापेक्षा जास्त हुशार आणि सुंदर असतात.....! लोकांनी थोडे विचार बदलले आणि सरकारने थोड लक्ष दिलं तर मोठं मोठ्या पदांवर हे नक्कीच दिसतील .
खुप चांगली माहिती दिली. मूळात त्यांना देखील माणूस म्हणून स्वीकारायला हवे. त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे समाजाने. सुरक्षित वातावरणात राहून दुसऱ्याला नावं ठेवणे, दोष दाखवणे फारच सोपे असते. आपल्यासाठी त्यांच्यावर चर्चा हा टाईमपास, शिळोप्याच्या गप्पा असतील कदाचित पण प्रत्यक्षात फार वेगळे आहे.जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे... ❤❤
They way they speak, the way they present themselves with their knowledge and facts, hats off to them, hidden gems of our society. They also must be respected, treated and looked upon like everyone else not because it's their fundamental right but because they are humans. Thank You Marathi Kida team, eye opening video it is
दिशा दीदी चे विचार खरोखर खूप चांगले आहे,त्या स्वतः खूप उत्कृष्ट वक्ता व लेखक आहे.यूट्यूब ला मी त्यांचे व्हिडिओ कायम पाहत असतो. सफेद साडी व मोगऱ्याचा गजरा घातलेल्या दिशा दीदी आहे.
Very heavy topic handled so well.. these people definitely desrve all respect , our socity really need to be more sensible. Their view of life is,so wide... Thanks a lot team Marathi Kida 🙏🙏
मराठीमध्ये अशा विषयांवरती युट्युब वरती व्हिडिओ येणं हे जागृतीकडे नेणारं एक मोठ्ठं पाऊल आहे. इंटरव्यू घेणारा युवा मुलगा सुद्धा माणुसकीची जाणीव ठेवून प्रश्न विचारताना दिसतो याचंही फार कौतुक वाटतं. खूप सेन्सिटिव्ह विषय निवडून सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावासा वाटतो कारण यामध्ये साधेपणा आहे, ही लोकं सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत ही जाणीव करून देणारा आहे. यांचे प्रश्न सुद्धा मार्मिक आहेत. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही प्रत्येकाच्या विचारांना स्वातंत्र्य यायला बराच काळ केला पण आता प्रत्येकजण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगळेपणा बद्दल कोणतीही अपराधी भावना न ठेवता धाडसाने बोलत आहे, आपलं रास्त मत मांडत आहे, यालाच चुकीच्या समजुती कडून आधुनिकतेकडे जाणारे नवीन विचार म्हणता येईल.
Wow! नॉर्मल लोकांपेक्षा किती mature आणि समजुदर लोक आहे हे.... respect 🫡
Yesss
They are normal either.. Just a gender is different..
Mature आणी समजुतदार लाेकांना कमजाेर समजलं जातं
Exactly..!
शेवटची ओळ मनाला चटका लावून गेली. `ही टाळी नाही, ह्या टाळीची वाट पाहतेय". खूप सुंदर प्रयत्न..
भाऊ काय तू विषय निवडलास...एकदम दील छू गया..!!!❤
वाटले नाही होते कधी मराठी किडा वर असा पण विषय बघायला मिळेल आम्हाला.
Great Job.👏👏👏
या interview मुळे किन्नर समाजासाठी माझ्या मनात खरोखर एक आदर निर्माण झालाय ❤️
Nkki ❤
Same
हे प्रोफेशनल किन्नर आहेत ...
आणि जे टोल नाक्यावर , रेल्वेवर , पब्लिक ठिकाणी दिसतात ते ओरिजनल आहेत आणि त्यांचा कल्चर 😐
@@priteshpg4302 what's the difference between professional and non professional. Je asaych te sarkhach aahe. Changl rahile shikle tr professional n sadhe rahile tr non professional. He ani te sarkhech ahet original ani duplicate as kahich nhi
@@trupti5298 तसं नाही बोलत हे मी देवाने त्यांना पण काही गुण दिले आहेत ... आणि ते त्याप्रमाणे वागतात पण , पण असे खूप किरकोळ किन्नर समाज आहे हा अजून पण शिक्षणाकडे वळला नाही , जशी त्यांची शिकवण आहे त्याचप्रमाणे ते वागतात , सगळ्याच किन्नर समाज हा सुशिक्षित झाला तर सर्व लोक त्यांना आपलं समजतील. 😊
आपल्या पेक्षा कितीतरी जास्त ज्ञानी आहेत. सलाम यांना 🙏🏻🙏🏻
भावा आतापर्यंत चा इतिहासातील youtube वरचा सर्वात भारी व्हिडिओ....
ज्यांचा आवाज दाबला जातो किंवा समाज ज्यांला कमी लेखतो असा व्हिडिओ करून तू समजा प्रबोधन केलंय hats off brother
पहिले मराठी किडा चॅनलचे खूप आभार की त्यांनी खूपच छान विषयाला हात घातला खूपच कौतुकास्पद !समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा विषय! खरचं पृथ्वीवर जन्मण्याऱ्या प्रत्येकालाच त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असते.आपण देवाच्या प्रत्येक जीवाला समान न्याय व सन्मान दिला पाहिजे.🙏
Very good मराठीकिडा 🐞🪲
मी प्रा.बनसोडे सुवर्णा महादेव बारामती
मी गेल्या वर्षी सुनीता गायकवाड या काटेवाडी येथील (तृतीय पंथी ) त्यांना मी NSS Camp मध्ये बोलावून साडी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
पण विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत
यांचे मला आजही दुःख वाटते
मी त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टिने पहते
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना आहे
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद,धन्यवाद
😢
This type of interview will change the society perspective 👍🏻
Right😊
Absolutely right ...
Well said Ritesh
@@samuraidreams1880 👍🏻
Yes...💯
ह्या मुलाखतीमुळे माझी ह्या समाजाच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला 🙏🏻
आपला खूप खूप आभारी आहे यांच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल. खरच समाज यांच्याकडे खूप हिन भावनेने बघतो. आपन जसे सामान्य मनुष्य आहोत तसे हे देखील आहेत.यांना देखील त्याच सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या भारतातील सामान्य नागरिकांना भेटतात. यांना ही सामान्य वागणूक दिली पाहिजे कारण ते आपल्या सारखेच सामान्य आहेत .
शिक्षण, आरोग्य, सुखसुविधा, समानता, बंधुता हे यांचे हक्क आहेत.
यांचे विचार ऐकून खूप काही शिकायला मिळालं.उत्तम भाषाशैली, ज्ञानभंडार, शब्दकोश भंडारा अति उत्तम. 🙏🏻👏🙌
जशी दृष्टी , तशी सृष्टी ...
जगू द्या आणि जगून घ्या..
कोणी कसे का असेना, आयुष्य हे सुंदर आहे मज्जाच मज्जा ❤️
मराठी किड्याचे खूप आभार.... समाजाने नाकारलेल्या अशा प्रकारच्या समुदायाची मुलाखत घेऊन त्यांच्या वेदना समाजासमोर आणल्या...
त्यांच्यासाठी खरच ऐक टाळी ती पण अशी वाजवायला आवडेल.👏👏
खुप छान समजवले चारी पाची देवदासींनी व त्यांच्या जवळ बरच ज्ञान भंडार आहे हे जाणवलं.
🎉🎉🎉🎉🎉
किती साधी आणि सरळ मागणी आहे की, आम्हाला cup उचलायला,as a वेटर म्हणून job द्या आमच्यात तो जॉब करू शकतात...👌👌 खरंच खूप छान वाक्य आहे. सर्वांची इच्छा असतेच की स्वतःच्या कमाईवर गुजारा करणे ह्यांची पण इच्छा असणार आहे की, मग त्यांना अश्या संधी एवढी वर्षे का दिली नाही समाजाने...आता सर्व काही बदल होत आहे पण हा बदल खूप संथ पणे आहे... आपण स्वतःपासून हा बदल करूया आणि मुळात भेदभाव करणं सोडू या...हा व्हिडिओ खूप छान केला. ह्यातून बऱ्याचश्या गोष्टी समजल्या🙏☺️
अगदी खरं आहे आपलं
याला म्हणतात समाजाची कानउघाडणी...
तुझ्या कार्यास शतदा नमस्कार....🙏
खरोखर अतिशय मार्मिक व ज्ञानवर्धक असा हा आपला व्हिडिओ असून प्रत्येकाने पहावा यापेक्षा तो ऐकावा असा आहे हृदयाला स्पर्श करणारे शब्द ऐकण्यात आले यांची ज्ञानाची तिजोरी किती गच्च भरलेली आहे हे या मुलाखतीमधून समजले आतापर्यंत कुठेही व कधीही वाचण्यात व ऐकण्यात न आलेला शब्दांचा भांडार म्हणजे मी साबण नाही लोकांनी पुण्य मिळावे म्हणून बाहेर बसवलेले भिकारी व भिक्षुक त्याचप्रमाणे समाजाने आम्हाला राहण्यास जागा दिले नाही तर पुरण्यासाठी देखील जागा देतीलच याची शाश्वती नाही म्हणून आमची प्रेत यात्रा ही पहाटेच्या समय ला निघते हेदेखील कारण आजच कळले याबद्दल लिहावे तितके शब्द अपुरेच आहे आणि खरे जीवन काय असते हे अनुभव घेऊन निर्माण झालेलाज्ञानाचा खजिना आज पाहण्यास मिळाला खूप खूप धन्यवाद असे चर्चा संवाद स्थानिक पातळीवर ती घेण्यात यावे
ज्या व्यवस्थेत जगायला जागा न्हवती त्या व्यवस्थेत मारायला आणि पूरायला पण जागा देत न्हवते.. 🥺hart touching 💔
माणसातील माणूसपण जागं करणारं विधान.ऐकल्यावर डोळे भरून आले.😔
Yes very heart touching
हे आयकुन आंनगावर काटा आला😔
Khupach chan pan sarv जनतेने त्यांना accept केलेलाच आहे पण काय या काही लोक आपलाच फायदा होण्यासाठी कोणाचं ही हित न होण्यासाठी त्यांना पुढे येऊ देत नाही.
खरंच
When she said " governer la paise dein tr aplya deshach brr hoin , GDP vadhen" Appreciate 🇮🇳💯❤️
She is very good writer n poet....disha Pinki sheikh
I appreciate for their quality of education towards country and most is thinking .
Te khup inteligent aahe pan lokha veda asta tayna pan lay bekar vicharne bhaghtath
#supporttranswomen
LGBTQIA+
Best informative video
मानलं भावा तुला...हे सहज पणे करायला आणि समाज व्यवस्थेच्या विरोधात ठाम पणे वागायला खरंच वाघाचं काळीज लागतं... तू गोड पणे सामाजिक लाजिरवण्या नजरेला एक चापट मरलीये आणि ती कदाचित चांगली लागलीये....माझा आणि माझ्या कुटुंबाकडून नेहमीच ह्यांचा आदर होतो....बाकी तुला खुप खूप शुभेच्छा✔️🚩💪
मानलं भावा....की तु यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या कारण ते पण मानवी जीवनच आहे
"ज्या व्यवस्थेत जगायला जागा नव्हती, तिथं मरायला तरी जागा कुठून मिळेल..." निशब्द..😶🔥🔥
😢😢😢😢.
😢😢
खरंच...
खरंच
खूप आहेत परंतु कोणी या विषयावर चर्चा करत नाही आणि त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न ही करत नाही तुझ्या या इंटरव्ह्यू ल सलाम आहे. तुझ्या मुळे लाखो लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन नकीच बदलेल आणि ह्या साठी धन्यवाद भावा. Hands off to you man 👏🏻
या episode मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून खात्री पटली की महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे... 👍🏻
Right
kahi lokanna UP chi sanskruti anaychiye Maharashtraat !
Maharastra vaicharik drushtya khup pudhe aahe up Bihar peksha
आजपर्यंतचा सर्वात अप्रतिम मुलाखत भाऊ कोटी कोटी शुभेच्छा..! मराठी किडा असेच नवनवीन विषय समोर आणत जावा
भावा खरचं खुप ग्रेट काम केलंस, हे लोक समाजातील एक भाग आहेत आणि एक माणूस म्हणून या लोकांना पाहणं खुप महत्त्वाचे आहे.... समाजात एक प्रकारची सभ्य आणि सन्मान पुर्वक वागणूक मिळायला हवी, मी पुण्यात असतो, मला वेळ असेल तर मि आवर्जून चहा घेणार विचारतो आणी गप्पा मारतो
हि मुलाखत घेऊन खुप मोठ काम केलं भावा त्यांच जिवन, भावना, व्यथा आणि त्यांच्या रास्त मागण्या तू सर्वां समोर मांडल्या. ग्रेट 💐💐💐
भावा तू हा विषय निवडला त्याबद्दल तुझे आभार।। त्यांना 1 platform हवा असतो to express themselves. त्यांची मने , मते न जाणुन घेण्या आधीच तिरस्कार करणं खुप सोपं होतं, येथून पुढे ते देव म्हणून नाही ,पण ज्या माणूस म्हणवण्याऱ्या हक्कांचे हकदार होते ते त्यांना सरकार आणि जनता कडून मिळणारच।।❤️❤️❤️
पुरुषापेक्षा कितीतरी ज्ञानी आहेत... खूप आदर युक्त लोक
भाई आता पर्यंत चे तुझे सगळे ब्लॉग एका बाजूला अणि हा एका बाजूला 👍👍
👍
Right 👍
Correct
💯🤞🏻
💯🤞🏻
तृतीय पंथीयांची दुसरी बाजू फार जोरदार पद्धतीने मांडलीस.
कधीच विचार केला नव्हता, असा मुद्दा व वास्तव आपन आमच्या समोर आणले.
खुपच छान भाऊ….👌🏻
Nice interview....
हयाच्या मध्ये खूप टॅलेंट आहे.. तस पाहिलं तर विचार खूप चांगले आहेत... हक्काने नोकरी मागतायत म्हणजे काम करण्याची पण धमक आहे.. थोडया फार जणांच्या मुळे बदनाम आहेत...
अगदी काही वर्षांपुर्वी नको वाटनारा विषय , दुर्लक्षीत समजल्या जाणार्या व्यक्तींकडुन मनमोकळेपनाने ऐकायला मिळाला. खुप छान
खरा देव तुमच्यासारख्या माणसात आहे जे लोकांना लोकांशी कसं जगायचं कस सावरायचं ते सांगतात मराठी किडा
नुसता मराठी किडा नाही तर लोकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतीलअसा एपिसोड खूप छान
अप्रतिम comment👌
यांच्या वक्तृत्व कौशल्याला सलाम🙏 अनेक पदव्या घेऊन पण normal माणूस छान बोलू शकत नाही👍Hats off👍
आपल्यापेक्षाही विचारांन छान असणारी माणसे, खूप नॉलेज आहे त्यांच्याकडे, हे तुमच्या मुलाखतीमुळे सर्वांना समजले धन्यवाद भाऊ🙏🙏
Both White Saree Trans are legitimately showing how calm, composed and confident they are becoming day by day after getting small piece of education and acceptance. Hats off to you Marathi Kida to take down such a sensitive topic of social education in funny and at same time informative way.
Good bro . Awesome work
कधी वाटलं नव्हतं मला एवढं knowledge असेल म्हणून यांच्याकडे
खूप meaning full शब्द रचना आहे
एक शब्द एका लाखा सारखा
खूप भारी वाटलं
The entire interview was literally an eye opener. As a society, it is very important for everyone to think about this. Thank you very much for making an informative video!
Hi Ninal tu ha channel pan follow kartes ka good .
@@vishaljadhavvj12 Yes! I also follow this channel. It has many things from entertainment to enlightenment.
Disha and Shamibha यांची वैचारिक बैठक आनि अभ्यास जबरदस्त आहेत बर्याच ठिकाणी आपल्या हक्कांसाठी लढताना दिसतात.गुलाबराव पाटील यांना धारेवर धरल्याचे video viral झालाय. शुभेछा भावी आयुष्यासाठी सर्वांना.
किती सुंदर विचारांचे शिक्षण आहेत ह्यांचे, त्यांचं बोलणं दिसणं,👍जे नॉर्मल श्री पुरुष सुद्धा असे विचार मांडू शकणार नाहीत,
आम्हाला विष्णुच मोहिनी रूप,शंकर भगवान ह्यांच अर्धनारी नटशॉर रूप पूज्यनिय आहेत, पण ह्यांचा आम्ही अनादर करतो, किती संकुचित मानसीकता, मराठी किडा ह्यांनी खुप सुंदर विषयावर माहीत दिली,खूप धन्यवाद ❤👌👌👍👍🌹🙏🙏
तुमच्या बद्दल खूप आदर आहे, देवाने तुम्हला सर्व सुखे द्यावी ही प्रार्थना💐
अतीशय योग्य विषय निवडला, यासाठी तु नक्कीच अभिनंदनास पात्र आहेस. 🤞🤞
अभिनंदन आणि आभार बोलभिडू... अतिशय वेगळा आणि कुणीही स्पर्श न केलेला पवित्र विषय घेतलात, आधीच किन्नर परिवाराबाबत आदर होता तो आणखी दुणावला... "तुमच्या पापक्षालनासाठीचा साबण नाहीये" समजून घ्यावा असा कमी शब्दात खूप मोठा गर्भित अर्थ आहे... थँक्स बोलभिडू मुक्या विषयाला वाचा दिल्याबद्दल
Hat's of you marathi kida 🙏khup chan vishy nivdla ahe
Respect ❤️kharach mansikta badlyala hawi.....Karan sarv manav ahot....sarv hakka milayla hawe.....
भाऊ तुझा हा व्हिडिओ बघनाऱ्या प्रत्येक व्यक्तीच हृदय परिवर्तन झालं असेल, आणि त्यांच्या मनात तृतीयपंथी बद्दल आदर भाव निर्माण झाला असेल.
Very nice समाजाने यांना स्वीकारलं पाहिजे❤❤❤
पूर्ण टीम चे अभिनंदन💐
असे विषय निवडायला जिगर पायजे💪🏽
आणि यशस्वी करण्यासाठी तुमच्या सारखी टीम🙌
या मुलाखतीला सलाम..त्यांच्या तक्रारी ऐकून खरच बरे वाटले. सरकारने त्यांना शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय उभारणीच्या संदर्भात सोय केली पाहिजे. सरकारने त्यांना अधिकार दिले तरच समाजात त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल.
किती स्पष्ट, वेवस्तीत, छान, बरोबर आणि शब्द शब्द कळेल व हकाच बोल्या सर्य ताई खरच त्यांना नाही आपल्याला आपले विचार आणि वेव्हार बदलावं लागणार त्यांचा पण या पृथ्वी वर समान हक्क आहे. पशु,पक्षी, जीव, जंतू मनुष्य, आणि या सर्व tai 🙏🥺😞 देवा ने आपल्यात फरक नाही केला आणि आपण ज्या पृथ्वी वर राहतो तिने nahi केला तर मंग आपण का करायच आपल्या काहीच हक्क नाही कोणाला पण जज करण्याचा respect all jendars 🙏🥺😞
आज तुमचा विषय व मुलाखत अभ्यासपूर्ण वाटली,..समाजातील गैरसमज दुर होतात,माणसातील माणुसपण जागं होतं,आपलेपणा वाढतो...शुभेच्छा तुम्हाला ...चांगले कार्य आहे करत रहा.,🙏
Interview देणाऱ्याच्या, घेणारच्या आणि बघानारच्या seriousness ला एका
वेगळ्या level ला नेणारा interview...... 🫡🫡🫡🤍🤍🚼
Great Job Marathi kida Appreciate for bringing such innovative content and most importantly choosing right candidates from the community for the interview 👍
The fact is ,Transgender Community is also accepting that things are changing in last 8-10 years .
The subject is very vast and a lot can be written here .
However we all as a community need to ensure to change our perspective and things will fall in place for sure .
Let us pledge -diversity and inclusivity should not remain mere English dictionary words or just a compliance and feedback process and should become a natural culture of our society .
भावा 100 तोंफेची सलामी तुला❗️ विचार करण्यास भाग पाडलास किन्नर बद्दल खरंच असा विडिओ तुझ्या चॅनल वर येईल अशी कधी अपेक्षा पण नाही केली धन्यवाद भावा 👌👌
"ज्या वेवस्थत जगायला जागा नाही त्या जगात मारायला पण जागा नाही "काय बात हैं 👍very well educated community.
अति उक्रुष्ट.यांचा आदर करायलाच पाहिजे.किति हुशार आणि समाधानी जीवन जगतात फार सोशिक आहेत हे लोक.
फारच छान विषय निवडला आहे.समाजामध्ये "यांच्या" बद्दल असलेले समज-गैरसमज निश्चितच दुर होण्यास मदत होईल.यांच्या भावना,अपेक्षा,शुल्लक मागण्यांबाबत समाजाने समजून घेऊन त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे मला वाटते.यांचे विचार ,यांचा अभ्यास ,यांचे राहणीमान फारच छान आहेत आणि हो प्रत्येक विषयाच्या व्हिडीओ मध्ये निवडलेली लोकं ही सुध्दा चांगली आहेत.
Marathi kida hats off to you guys!❤️ Keep doing such interviews.
transgenders also deserve respect, love just like we do. They are not different, they are similar just like us. People need to understand and respect them! More love and respect to them❤️
Kharach khup bhari hoto bhau awareness khup garjechi aahe ya samjaat
खरोखरच यांची माणुसकीच्या नात्याने माणुस म्हणुन दखल घेतली च पाहिजे
आयुष्यात काहीतरी या समाजासाठी नक्कीच करेन..... ईश्वराने निर्माण केलेल्या या निर्मितीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाच गेला पाहिजे
मित्रा खूप छान ब्लॉग झालाय हा व्हिडिओ जेव्हा केव्हा पाहतील तेव्हा तेव्हा प्रत्येकाला transgender community साठी काही तरी करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत राहील....
I liked the Transgender in White Saree because she is so damn confident and full of knowledge 😍😍😍😍
PS: Calling Transgender coz we use He and She for Man and Woman so why not to use Transgender with proud ❤️
I loved all of them😍😍😍
Marathi Kida awesome video 😍😍
Disha pinky Shaikh her name
Am also to coment on same ..onnthat whits saares
Yes also I like
निवडणूकीच बिगूल
ruclips.net/video/5KYF3_5UkP4/видео.html
@@akshaydodake3932 शमिभा नाव आहे त्यांचं
भावा, खुप हिम्मत दाखवलीस हे सामाजिक सत्य बाहेर काढलंस, तृतीयपंथी लोकांची व्यथा प्रभावीपणे सर्वानी मांडली. आज गरज आहे त्यांना सन्मान देण्याची आणि नौकरीत किंवा व्यवसायात योग्य स्थान देण्याची.
खूप वाईट वाटतंय त्याच्यासाठी,पन आदर आहेच. खुप गमतीदार पणे interview घेतला.आणी त्यातून नवीन माहीती मिळाली. त्यांनी सुध्दा न रागवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली.👌👌👌👏👏👍👍👍
मराठी किडा... तू झालास येडा .... Weldone !!!!
एका अर्धनारीनटेश्वराने आज पहिल्यांदा एपिसोड पूर्ण केला ....
काही विभत्स नाही ... याचना दया नाही ... जे माझं आहे ते माझं म्हणन्यात कशाची भीती नाही ...
The leads in the episodes were so straight that leaves straight people's a side ... Their point argument fights were so realistic that no one ever imagined ...
I just wanna be present on that time or day when the Dr Ambedkar's equal opportunity, rights to be allowed to each section of the society....
तुला हे सुचलं म्हणुन तुझं अभिनंदन .... बाकी दुर्लक्षित राहिलेल्या अश्या अनेक व्यथा आणि त्यामागील कथा आहेत... ज्या तू भविष्यात गमती जमतीत बाहेर आणशील च
भावा आज पर्यंत च्या 1 नंबर अशा या मुलाखती तू आज घेतल्या आणि त्यांच्याबद्दल तू समाजात एक जागरूकता आणू पाहत आहेस खूप छान....👌👍
समाज्याच्या एका भागाला नक्कीच न्याय मिळेल फक्त गरज आहे स्वतःचा दृष्टीकोन बदलण्याची 🙏🏻
खूप चांगल्या विषया मध्ये हात घातला आहे, समाजाचा ह्याचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ह्यांना हि सुख-सुविधा मिळतील. 👍🏻
अगदी उत्तम व्हिडिओ सादरीकरण केलत ज्या समाजात आपण अर्ध ज्ञान घेऊन तृतीय पंथी लोकांविषयी गैर समज करून घेतो त्यांच्याविषयी अंधश्रद्धा ठेवतो पण या व्हिडिओ च्या माध्यमातून खरंच खूप गोष्टी पडद्याच्या समोर आल्यात... आज बरीचशी तृतीय लोकं समाजसेवेमध्ये दिसून येतात व त्याच्यासाशी समांनाने टाळ्या देखील वाजवल्या जातात.
खूप छान होता हा एपिसोड❤️🌸 त्यांना ही आपल्या सारखं मन आहे ,आपण त्यांना मदत करू शकत नसेल तर ,त्यांना त्रास होईल किमान अस तरी करू नका...आपल्या सारखा त्यांना ही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे ,हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे 🥺😊
👌👌👌
Exllent 🙏
Yes
Kharay
Right
🥺🥺🥺
Thanks brother.
I am a church pastor. Feeling broken when I see very few of us reaching for their uplifting. Truly inspired to do something for them.
@Dhiraj Kumar James
Why did you convert to Christianity ?? Could you elaborate??
@@Aarav.patel000 my great grand father was a very rich man from Telangana those days south India. He got peace going to church. He had money but no peace. Family stood against but he left Family not Christ.
My experience is very big. I was ready to commit suicide but Jesus spoke to me and gave me a life hope. Inspite of so many ups and downs God blessed me and today what I am is all because of Jesus.
@@dhirajkumarjames3074 Nice to see that you are happy! I wish you would have read Shrimad Bhagwat Geeta at that time. I am not forcing you to read, it's just a suggestion!
Have a gread day!❤️
@@Aarav.patel000 I love all religion. I will definitely pray for you all brother. God bless 🙌 you
आणखी त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटत होतं...
त्यांचं ज्ञान, समाजाबद्दलची जाणीव, जगाबद्दलच निरीक्षण आणि समान सन्मानाची अपेक्षा या सर्व गोष्टी यांत दिसून आल्या..
व्हिडिओचा शेवट छान केला...👌👌👌
त्यांच्या सन्मानासाठी टाळ्या माझ्याकडून आणि माणुसकीकडून....👏👏👏
एवढं knowledge, हे आम्हा mpsc करणाऱ्या पोरांना पण लाजवेल, hats off 👌🙏
खूप छान विषय निवडलं आहे दादा
समाजात ह्यांना देखील तेवढच स्थान मिळालं पाहिजे जेवढं आपल्याला आहे ...
त्यांच्या सुद्धा भावना समजून घेतल्या पाहिजेत 👍🙏
आणि त्यांना तृतीयपंथी ठरवणार आपण कोणीच नाही आहोत...🙏🙏👍 आणि ती अधिकार कोणालाच नाही आहे 🙏👍
भाऊ, लपून राहिलेला, ज्या विषयाबद्दल बोलण्यास लोक अजून सुद्धा टाळाटाळच करतात असा ज्वलंत विषय आहे... समाजाचा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला फार गंभीर विषय.. फार सुंदर पद्धतीने हाताळला
That last line about clap 👏 is Everything.
Hat's off to Marathi kida
सर्व प्रथम तुझे खूप खूप धन्यवाद मित्रा की तू LGBTQ समाजाशी बोललास त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा समजल्या. आपण एक समाज म्हणून खूप मागे आहोत हे कळलं. ते पण एक मनुष्य आहेत आणि त्यांना पण सामान्य माणसाप्रमाने जगण्याचा अधिकार आहे. LGBTQ समाजातील काही प्रवृत्ती मुळे सर्वांचे नाव खराब झालं पण एक गोष्ट अशी आहे की आपण एक माणूस म्हणून त्यांना कधी समाजात स्थान दिल नाही की त्यांना कधी काही सिद्ध करायची संधी दिली नाही. ना समाजाने आणि ना सरकार ने....हेच सर्वात मोठं दुर्दैव
भाऊ आपण आपल्या चॅनेल च्या माध्यमातून या लोकांच्या समस्या व त्यांची करी परिस्थिती लोकांप्रयन्त पोहचवली व लोकांची मानसिकता बदला पाहिजे सर्वात मोठी गोष्ट
बौद्धिक क्षमता काय असते हे यांच्याकडे बघून लक्षात आले
Nice work
दादा...मस्त यार...!!!खूप छान विषय होता नक्कीच सरकार पुढे या समाजापुढे या लोकांबद्दल आदर पूर्वक भावना आल्या पाहिजेत.....शेवटी जे वाक्य होत टाळी बद्दल च ...खूप च छान बोलल्या त्या❤️👍
दिशा पिंकी शेख आणि शमिभा या दोघींनी प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट रित्या मांडली खुप खुप प्रेम 💖💖
I loved the interview, being from the LGBTQIA+ community myself we face a lot of judgments and discrimination. However, I appreciate the fact that you guys tried to make this interview funny and light hearted for any common person of any age group can understand this video content and can get education of something new ( for themselves). Though it's a tough life for everyone but living a tran's life is the most difficult and hence we all should respect them even more. Lot's of love🏳🌈
Hiiii
Hiii
@@tejaskhopade337 bol
@@apekshit2612 number
@@tejaskhopade337 tu khutla aahes ky krtos
किती पद्धतशीर भाषा बोलून राहिले सगळेच किती छान प्रकारे समजाऊन सांगत आहे खरंच खूप चांगल मन आहेत तुमचं नेहमी सुखी रहा आणि लव्ह you😊🤗
Sexuality & gender यातला दोघा ही खरंच खुप महत्वाची बाब आहे......... धन्यवाद या व्हिडिओ साठी, समाजजागृती आहे आवश्यक आहे असे व्हिडिओसाठी👍👍👍
मी अनेकदा निरीक्षण केलंय, (personally)
हे लोकं सामान्य माणसापेक्षा जास्त हुशार आणि सुंदर असतात.....!
लोकांनी थोडे विचार बदलले आणि सरकारने थोड लक्ष दिलं तर मोठं मोठ्या पदांवर हे नक्कीच दिसतील .
खुप चांगली माहिती दिली. मूळात त्यांना देखील माणूस म्हणून स्वीकारायला हवे. त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे समाजाने. सुरक्षित वातावरणात राहून दुसऱ्याला नावं ठेवणे, दोष दाखवणे फारच सोपे असते. आपल्यासाठी त्यांच्यावर चर्चा हा टाईमपास, शिळोप्याच्या गप्पा असतील कदाचित पण प्रत्यक्षात फार वेगळे आहे.जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...
❤❤
Wowww ! How educated they are..!
Proud & respect
Lots of love ❤️😍✌️
They way they speak, the way they present themselves with their knowledge and facts, hats off to them, hidden gems of our society.
They also must be respected, treated and looked upon like everyone else not because it's their fundamental right but because they are humans. Thank You Marathi Kida team, eye opening video it is
दिशा दीदी चे विचार खरोखर खूप चांगले आहे,त्या स्वतः खूप उत्कृष्ट वक्ता व लेखक आहे.यूट्यूब ला मी त्यांचे व्हिडिओ कायम पाहत असतो. सफेद साडी व मोगऱ्याचा गजरा घातलेल्या दिशा दीदी आहे.
दादा एक व्हिडिओ वृद्धाश्रमात जाऊन पन बनव ना, वृद्धाश्रमात राहणार्या चे पन भावना जगा समोर आण, त्यांना कसे वाटते ते....
Agdi Barobar 👏👏👍
Ahe ki asa video
हे ऐकून खूप भावुक झालो यार. आमच्या ही गावात आहे. आणि भाग्य की ती माला भाऊ म्हणते.
तुमच्या या मुलाखतीमुळे खूप माहिती मिळते. समाजव्यवस्था समजते.
कड़क भाऊ .... मानल तुला🔥❤️
कोनीतरी केली हिंमत याना विषय माडायची संधी देवुन...!!!🙏🏻🙏🏻
ज्याचं जळत त्यालाच कळत ... त्यामुळे अशा लोकांसोबत माणुसकीने राहा 🙏🏻
त्या पांढऱ्या साडीवाल्या वंचित बहुजन आघाडीच्या खूप मोठ्या कार्यकर्ते आहेत आणि खूप हुशार सुद्धा आहेत..
15:54 👈 ह्या ना??
दिशा पिंकी शेख नाव आहे ना त्यांचं?
खरच किती knowledgeble आहे यार हे लोक ❤️
अगदी वेगळा ...अत्यंत महत्वाचा....आणि अत्यंत हुशार व्यक्तींसोबत केलेला हा भाग....नितांत सुंदर आहे...
"मी साबण नाही..." 👌👌
I like subget
माझ्या मनात लहानपणापासूनच अशा लोकांचा आदर आहे आणि तो यापुढेही राहील 🙏🙏
1 no bhava. 1 no video.
Also salute to LGBTQ community 🙏🙏
I support everybody Tritiyapanthi but not LGBTQ in modern Europes theory . My friend is my friend don't be like I hate kindly 🙏🏼
@@V.M.B.P this is your mentality every ones mentality is different
I am so glad that society is changing now. People have started accepting and recognising the community.
Hope for more improvement.
खूप च सुंदर वीडियो, मुलखत् घेतेलल्या सर्व जनि प्रगलभ आणि सर्व गोस्टि चि उत्तम जान असलेल्या वटल्या,
आता यांच्या बद्दल च समाज मन पण बदलत आहे,
जेवढा विडिओ पाहून आदर वाटला तेवढच कॉमेंट्स वाचून ही 🙏🏼🤘🏻 मराठी किडा चे धन्यवाद👏🏼
Very heavy topic handled so well.. these people definitely desrve all respect , our socity really need to be more sensible. Their view of life is,so wide...
Thanks a lot team Marathi Kida 🙏🙏
Thanks