गावगाड्यातली माणसं|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • संपत दवाखान्यात ऍडमिट आहे ..ऑपरेशन साठी कसे उभे राहतील पैसे? बघा आजच्या भागात..!
    #koripati

Комментарии • 977

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Год назад +229

    भाग आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका..!

    • @sonamsatarkar999
      @sonamsatarkar999 Год назад +2

      नक्कीच

    • @nikhilsawant954
      @nikhilsawant954 Год назад +17

      खूप झाले कवी पण बापावर कुणी कविता लिहिली नाही ....
      बाप म्हणजे काय हे आज वर कुणी दाखवलच नाही....
      नसतील केल्या त्याने सहन प्रसूतीच्या कळा, पण जन्म होई पर्यन्त बाळा तुझा तो दवाखान्यातून मारत होता फेऱ्या....
      जगाने पाहिली आईची माया....पण ज्याने झिजवली काया....तो बाप कोणी दाखवलाच नाही ....
      आईने दूध पाजून केले मोठे तुला.... पण बाळा तळ हाताची चाळण करून भाकर तुला दिली...तो बाप तुला दिसलाच नाही ....
      स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... पण बापाविना पोर हे पोर नसत ते पोरक असत हे कुनी सांगितलच नाही ....
      वेदनेत तुला "आई ग" अशी कळ तुला आली असेल पण संकटात "बाप रे" असे शब्द कोणी सांगितलेच नाही....
      बाप हा बाप असतो जो आजवर तुम्हा आम्हाला कधी कळलाच नाही....
      ...................... निखिल सावंत

    • @sunilpatilvlogs9280
      @sunilpatilvlogs9280 Год назад +2

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯❤️

    • @sonamsatarkar999
      @sonamsatarkar999 Год назад +3

      खरंय बाप काय असतो हे फक्त त्यांनाच कळतं ज्यांना कधी बापाचं प्रेम मिळालं नाही. त्याचा सहवास मिळाला नाही. आज प्रत्येक आनंदाच्या वेळी बापाची आठवण येते खरी पण देवाघरी गेलेले माणूस परत येतं नाही. लहानपणी बापाचं छत्र हरवत ते बालपण एक शापच असतं हे अनुभवलंय मी. मग तडजोड हेच जीवन उरत. म्हणून आई बाप आहेत तोपरेंत जपा त्यांना. गेल्यावर रडून काहीच उपयोग नसतो.आजही इतरांचे बाप बघितले कि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. म्हणून हा भाग माझ्या हृदयात भावला आज 😥😥

    • @sagarghuge6654
      @sagarghuge6654 Год назад +2

      आजचा भाग खुप छान आहे

  • @nehachirecipeaniblog1991
    @nehachirecipeaniblog1991 Год назад +7

    खरच नितीन सर बाप म्हणजे काय आहे हे दाखवून दिल बाप नसल्यावर काय होत हे समजत मला पण 😔😔😔😔👌👌👌👌

  • @rohitpatil7331
    @rohitpatil7331 Год назад +8

    काय वाट्याला नाही आलं तरी चालेल. पण ज्यांनी श्वास दिला त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहायच...खूपच छान

  • @Advait_creation2022
    @Advait_creation2022 Год назад +6

    वाव...खूप छान ...ज्याला बाप कळला त्याला पांडुरंग भेटला...बाप कसाही असूद्या बाप बाप असतो ...त्याची जागा कधीच आणि कुणीच घेऊ शकत नाही❤️❤️..अगदी वर्तमान कालीन जीवन तुम्ही डोळ्यासमोर आणलत...मनापासून आभार टीम कोरी पाटी प्रोडक्शन... आभाळाएवढे उंच उंच भरारी घेऊ तुम्ही ...

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 Год назад +8

    काय उपयोग त्या शिक्षणाचा ज्यात माणसाला माणूस कसं व्हायचं हेच शिकवलं जात नाही......
    अप्रतिम 👌👌👌

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 Год назад +5

    या भागासाठी खरच शब्दच सुचत नाहियेत.....
    अप्रतिम भाग... 👌👌

  • @ghanshyamkajarekar3990
    @ghanshyamkajarekar3990 Год назад +6

    बापरे केवढा हा जिवंतपणा भूमिकेत. एकदम वास्तव घडतेय असच. छान मांडता तुम्ही... सर्व पात्रांच्या भूमिका खूप छान आहेत

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 Год назад +33

    पोराला दोन बुका कमी शिकवं , पण बाप काय असतो ते शिकवं..... अप्रतिम...... काळजाला भिडनारी कथा.....

  • @anilmohite96
    @anilmohite96 Год назад +5

    अप्रतिम सादरीकरण. आज घरोघरी हिच अवस्था आहे.पण अमोल ची व्यकतीरेखा साकारणारी मुल आहेत म्हणून कुठतरी बाप आई बाप जिवंत आहेत.

  • @PravinrajJadhav
    @PravinrajJadhav Год назад +2

    #अप्रतिम
    शहरातील खरी वास्तविकता आहे ही
    मुली थोड फार कमवायला लागल्या की फक्त त्यांचा विचार करतात मग त्याला कुणाची च गरज नसते असे त्या समजतात
    पण त्या असा विचार करत नाहीत आई बाप त्यांना पण आहेत आणि दिवस सगळ्यांवर येतात
    Hats off All KoriPati Team

  • @Prathmesh5717
    @Prathmesh5717 Год назад +3

    लई मालिका हसावायला लावत असतील पण जगणं काय आहे हे दाखवणार खऱ्या खुऱ्या मालिकेचं माहेरघर आहे कोरी पाटी सलाम तुमच्या कल्पनेला आणि देव तुम्हाला अजून कल्पनाशक्ती देवो गावकडच खर खुर चित्र रेखाटयला

  • @amolbhagwat8982
    @amolbhagwat8982 Год назад +4

    खुप मनाला भावला हा भाग....
    खरच आताची सत्य परिस्थिती तुम्ही कलाकारांनी मांडली आहे..

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb Год назад +3

    काय कमेंट टाकू खरोखर शब्द अपुरे पडतात अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि मनापून धन्यवाद देतो. भाग असाच पुढे दाखवा हि विनंती.

  • @vishalkamble6573
    @vishalkamble6573 Год назад +5

    डोळ्यातून पाणी आलं शब्दच नाहीत बोलायला १ नंबर नितीन सर ❤

  • @sagardevkar7584
    @sagardevkar7584 Год назад +3

    डोळ्यात पाणी आणलं राव...विदारक सत्य आहे हे...अप्रतिम कल्पना आणि लेखणी...गरज आहे फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची

  • @kishornalawade8972
    @kishornalawade8972 Год назад +5

    डोळ्यात पाणी आलं सर.....अप्रतिम भाग होता

  • @ravishete1784
    @ravishete1784 Год назад +8

    खरंच खूप भारी भाग जमणारच माणसा असावं तर अशी कुणाकुणाला भाग आवडला त्यांनी लाईक करा जलावड नात्यांना कमेंट करा

  • @rahulnikam9881
    @rahulnikam9881 Год назад +6

    पवार सर एक नंबर एपिसोड बघितल्यावर डोळ्यातुन पाणी आले राव किती हि काय झालं शेवटी बाप तो बापच

  • @sudeshgurav8701
    @sudeshgurav8701 Год назад +21

    शेतकरी मुलगा आपल्या आई बापाला कधी वाऱ्यावर सोडत नाही....हे सत्य आहे

  • @koynaputra
    @koynaputra Год назад +3

    आजही घरा घरात भाऊबंदकी मध्ये सगळीकडेच प्रॉपर्टी साठी वादी वाद चालू आहेत, या एपिसोड मधून जळजळीत वास्तव डोळे ओले करणारे मांडले आहे नितीन सर आणि कोरी पाटी या साठी हक्काचा सलाम...❤️

  • @anilbhosale4160
    @anilbhosale4160 Год назад +10

    पुरुष कमवाय लागला की सगळ्यात आधी आपल्या बायकोच्या गरजा पूर्ण करायच्या ठरवतो...आणि बाय कमवाय लागली की सगळ्यात आधी तीला नवऱ्याची गरजच नाय हेच कसं ठरवते ......
    अप्रतिम.....

  • @B.G.Bidwe.
    @B.G.Bidwe. Год назад +34

    आता पर्यंत चा सर्वात सुंदर डायलॉग आहे या मध्ये {*पुरूष कमवायला लागला की पाहिले बायको च्या गरजा पूर्ण करतो पण बायको कमवायला लागली तर तिला वाटत पुरुष्याची गरजच नाही*}👏👏👏

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 Год назад +3

    आजच्या शहरी सुशिक्षित पिढीसाठी अशी जोरदार चपराक लावलीच पाहिजे..
    धन्यवाद सर,
    ते काम तुम्ही करताय...

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 Год назад +5

    खरी गोष्ट आहे .
    आसच होतय पण आमचा शेति करणारा वाघ अशी कीतीपन संकट आली तरी ठाम आस्तुय आई-बापा समोर सर्व मतिमोल समजतो
    नितिन सर ❤❤❤😂😂😂 शेवट तर अप्रतिम

  • @vikasbatale1256
    @vikasbatale1256 Год назад +4

    काळजाला हात घातला ❤️❤️❤️ पोराला दोन बुक कमी शिकव पण बाप काय असतो ते शिकव अप्रतिम संवाद hatts of you 🙏🙏🙏

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 Год назад +3

    खूप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा
    🙏🙏🙏👌👍

  • @rushikeshyadav539
    @rushikeshyadav539 Год назад +3

    ज्याने श्वास दिला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहू.. काळजाला भिडणारा भाग...धन्यवाद नितीन सर

  • @04ajaynaik14
    @04ajaynaik14 Год назад +5

    *एक अप्रतिम विचार *
    जे वाट्याला येईल ते घेऊ आणि आबासोबत राहू ,
    काय नाय आल तरी चालेल पण ज्यांनी श्वास दिला त्याच्या शेवटच्या श्वासा परंत त्याच्या बरोबर राहू.

  • @tusharpatil853
    @tusharpatil853 Год назад +4

    काळजाला भिडणारा episod zalay dada..... खरंच तुम्हाला मानलं....लफडे , भानगडी दाखऊन पैसा कमवावा म्हणून एक ही एपिसोड नाही तुमचा ...नेहमी समाजाला काही तर विचार करायला लावणारी टीम आहे तुमची..... वास्तव काय असतं हे नेहमी तुम्ही दाखवता... सलाम टीम ला आणि नितीन पवार तुम्हाला...... एकदा भेटायची इच्छा आहे 👍

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 Год назад +10

    दोन पुस्तकं कमी शिकवली तरी चाललं पण "बाप" धडा शिकवला पाहीजे.. (खुपच छान ..धन्यवाद )

  • @naturelover2700
    @naturelover2700 Год назад +3

    खूप छान कथा मांडलीय राव डोळ्यातून पाणी आणलं राव तुम्ही 👌👌👌

  • @vikasjadhav3834
    @vikasjadhav3834 Год назад +2

    नितिन सर.. खूप छान विषय होता अगदी घराघरातल्या .. वय झालेला बाप कोणालाच नको वाटतो पण त्याची कमवलेली संपत्ती मात्र पायजे!.. मी या गोष्टी क्या जवळून गेलोय हो. सलाम तुमच्या कार्याला...

  • @santoshkamble9673
    @santoshkamble9673 Год назад +5

    खरच सर काळजाला भिडणारा एपिसोड आहे

  • @kbc9867
    @kbc9867 Год назад +3

    शब्द नाहीत ..हे तुमचं लिखाण जगातील वस्तवाल धरून आहे.. आई आणि वडील यांची आयुष्यातील जागा दुसर कुणी भरू शकणार नाही..

  • @dostti9159
    @dostti9159 Год назад +5

    खरी पारस्ती आहे आज काल आशाचं घडतंय. मनाला भिडणारा भाग आहे.

  • @satishnaik1142
    @satishnaik1142 Год назад +2

    नितीन सर... मोठ्या पडद्यावर या लवकर.. नागराज मंजुळे ला पण मागे टाकाल तुम्ही.. तुमच्या कलाकृतीला salute आहे.. असच मनोरंजन करत रहा.. God bless you..!!

  • @myoutube7882
    @myoutube7882 Год назад +3

    नितिन पवार, नितिन बनसोडे, नितिन वाडीवाले
    शब्द नाहीत सर तीन नितिन ने सद्याच्या घडत्या विषयाला जिवंत रूप दिले शब्दात आभार मानता येत नाही माझ्याकडून या एपिसोड ला 100 तोफेची सलामी

  • @dnyaneshwarghote5559
    @dnyaneshwarghote5559 Год назад +4

    एका एका शब्दाचा सखोल अर्थ निघतो खरच खूप काही शिकायला मिळत धन्यवाद सर🙏

  • @Shru_______7
    @Shru_______7 4 месяца назад +5

    दवाखान्याच्या प्रसंगात सगळ्या नातेवाईकांचे खरे रूप दिसुन येते 💯🙏🏻

  • @krushnawayase3744
    @krushnawayase3744 Год назад +2

    काय नाही मिळालं तरी चालेल पण ज्याने श्वास दिला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहु.... अप्रतिम सलाम नितिन पवार सर आणि कोरी पाटी टीम💐💐💐💐

  • @amarjadhav8892
    @amarjadhav8892 Год назад +4

    परिस्थिती कशी जरी आसली तरी मगे कधीच हटू नये जे होईल ते नंतर बघता येईल पन गेलेला माणूस परत येत नसतो पैसे आणि संपत्ती कमवता येती या गोष्टी खूप छान पद्धतीने मांडणी केली खूप छान

  • @rahuljadhav934
    @rahuljadhav934 Год назад +2

    नितीन सर मानावे तेवढे आभार तुमचे कमी..... हा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आल...

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श Год назад +3

    एक नंबर क़ाय विषय घेताय तुम्ही डायरेक्ट काळजात हात घालताय प्रत्येक घरातील विषय आणि त्याला साथ सुंदर अभिनयाची
    खुप अभिनंदन

  • @sunilkharat8015
    @sunilkharat8015 Год назад +2

    सर खुप भारी खरच बाप या देवा चे उपकार कोणीच नाही फेडू शकत 🙌🙌🙌

  • @sachinbhoye8965
    @sachinbhoye8965 Год назад +5

    तुमच्या वेब सीरिज काळजाला भिडणाऱ्या असतात राव । खूप अप्रतिम ❤

  • @sagarshelake7330
    @sagarshelake7330 Год назад +2

    शब्दच नाहीत माझ्याकडे आपल्या बद्दल बोलायला खरंच आजचा भाग बघताना डोळ्यातून पाणी कधी आल हे पण नाही समजलं सगळ्या कलाकारांचं अगदी मनापासून अभिनंदन

  • @sachinmore514
    @sachinmore514 Год назад +4

    खरोखरच शिक्षणाच्या पुस्तकामधे मणुसकिचा धडाच नाहि.

  • @akashbarvekar5694
    @akashbarvekar5694 Год назад +2

    खरंच राव डोळ्यात पाणीच आणलं... अप्रतिम भाग. बापू आले बर वाटलं

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 Год назад +3

    डोळ्यात पाणी आणणारा असा हा भाग. जीवनाचं सुख - दुःख कशात आहे, आपलेपणा आणी जिव्हाळा याचं जिवंत उदाहरण आणी जास्त शिक्षणाचा माज प्रकट झाला...
    प्रत्येक आई - वडील आपल्या लेकरांसाठी आयुष्य झीजवत असतो ' निदान त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात तरी त्यांना मायेने हाक मारा, विचारपूस करा, सांभाळा... 🙏🏼🙏🏼

  • @govinddudhate825
    @govinddudhate825 Год назад +4

    नितीन सर सलाम तुमाला
    तुमी खुप भारी आहे यार हिरा आहे तुमी
    लय लय लईच भारी ❤

  • @dhirijdanawale8056
    @dhirijdanawale8056 Год назад +4

    अप्रतिम सुंदर आहे आजचा भाग खरच वास्तव आहे

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Год назад +4

    म्हणतात ना पैसा असून पण वाईट ,नसून पण वाईट..त्याहून अशा बायका तर लय वाईट..स्त्री स्वांतंत्र झाली पण...अती शानी पण झाली..अशा वेळेला प्रत्येक घरात असा एक तरी अमोल हवाच....मस्त कथा सर शिकण्या सारखी...👌👏🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Год назад +3

    अतिशय सुंदर चित्रिकरण केले आहे.जणु काही प्रसंग आपल्या समोर घडतो असे वाटते. आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @shriswami-tk4vd
    @shriswami-tk4vd Год назад +2

    सर हा भाग बघुण माझ्या डोळ्यात पाणी आले . तुम्ही खरंच सत्य गोष्टी मांडता. 👌👌

  • @sonamsatarkar999
    @sonamsatarkar999 Год назад +6

    निशब्द असा एपिसोड. काळीज चिरून टाकणारे. 100 तोफांची सलामी sir या एपिसोड साठी 🙏

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 Год назад +2

    नितीन सर जी काळजाला भिडणारी कथा सादर केली....
    खुप खुप शुभेच्छा...congratulations

  • @3SPCREATION
    @3SPCREATION Год назад +4

    ऐक नंबर भाग असतात मी कायम बघतो खुप भारी वाटते . डोळ्यात अश्रू उभे राहतात

  • @kiransalunkhe81
    @kiransalunkhe81 Год назад +2

    खरंच खूप छान अप्रतिम
    आणि खरंच शिक्षणाच्या माणुसकीचा धडा हा पाहिजेच

  • @ganeshawale88
    @ganeshawale88 7 месяцев назад +5

    मन हेलावून टाकणारा प्रसंग उभा केलात...

  • @sajeedshaikh105
    @sajeedshaikh105 Год назад +2

    कोरी पाटी चा आज पर्यंत चा सगळ्यात खतरनाक भाग....अंगावर काटे येत होते भाग बगताना...मी पण माज्या बाबा ना लै प्रेम करतोय.....मी लै प्रयत्न करून त्यांना कोरोना मधून वाचवून आणलंय.... आणि आता आम्ही सुखात आहे....मी शेवट पर्यंत माज्या बाबा सोबत राहणार

  • @krushna12768
    @krushna12768 Год назад +5

    नितीन सर आजचा भाग खूप छान आहे . मुल वाईट निघाली कि बापाची अवस्था काय होते ते दाखवल , परंतु बाप वाईट असतो तेव्हा मुलांची अवस्था काय होते हे सुद्धा महत्वाचे आहे. जे आम्ही भोगतो आहे . प्रत्येक नाण्याला 2 बाजु असतातच . 🙏🙏

    • @vishnudhobale3710
      @vishnudhobale3710 Год назад

      सत्य मांडले समोर अनकी काय अपेक्षा करायची सरांकडून खूपच छान

    • @krushna12768
      @krushna12768 Год назад

      दोन्ही सत्य खरी आहेत दादा 🙏

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 Год назад +2

    नितीन सर डोळ्यातुन पाणी आले राव बाप्पा मुळे जगणे कळते राव खरच सर मनापासून धन्यवाद,,

  • @shamdukare8966
    @shamdukare8966 Год назад +3

    सर एपिसोड खूपच भन्नाट झालाय ❤️❤️ हृदयस्पर्शी 😍❤️ अजूनही डोळ्यात पाणी आहे ❤️😍 हे खूप काही शिकवून जाते❤️❤️🌼

  • @omkarpandhrblae2510
    @omkarpandhrblae2510 Год назад +2

    मनाला चटका लावणारा भाग होता.... लय भारी वाटलं.....🙏🙏 सलाम आहे तुम्हाला सर 🙏🙏✨

  • @Ganesh_official77
    @Ganesh_official77 Год назад +4

    शब्द नाही बोलायला,अप्रतिम भाग,खरोखर खूप रडलो आज

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 Год назад +2

    कमीत कमी ही सीरिअल पाहून तरी काही जणांना आपला बाप आठवला खूप छान नितीन सर आणी टीम (बापू)

  • @vijaysalunkhe3146
    @vijaysalunkhe3146 Год назад +3

    अप्रतिम दादा, सुरेख विषय निवडलात....सत्य मांडलात , हृदयस्पर्शी एपिसोड

  • @sandeepkavar9156
    @sandeepkavar9156 Год назад +2

    येणाऱ्या भावी पिढीसाठी डोळ्यात अंजन घालणारा भाग. अप्रतिम . 👌

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Год назад +5

    भाग खूप छान असतात पण टाइमिंग थोडं फार जास्त तीस ते पस्तीस मिनिटात केलं तर भारी वाटेल तुमचे भाग मध्ये चालू परिस्थिती वर आहेत लेखक व दिग्दर्शक यांचे खरंच मनापासून आभार

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 Год назад +1

    कमेंट करायला शब्द सुचत नाही इतका हा भाग हृदय स्पर्षी होता धन्यवाद नितीन सर आजच्या पिढीला हे समजणे फार महत्वाचे आहे!

  • @chetankirdat9358
    @chetankirdat9358 Год назад +5

    खूप छान नितीन सर.. आज माझ्या वयाच्या 33 वर्षी झाली.. मला बापच नाही.. ना कोणी भाव ना कोणी बहीण.. तरी पण देवाण मला.. इतकं पोरक केलय ना.. काय सांगू.. तुम्हाला.. अजून 2/3 दिवस बगणार.. नाहीतर... 😭😭

  • @irihute3131
    @irihute3131 Год назад +2

    धन्यवाद नितिन सर खरच गावाकडची सर या जगात कुट सुधा नाय बगा म्हनून‌ मला ग्रामिन भाग लय आवडतो या भागा बद्दल शब्द नाहीत

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 Год назад +3

    हे आजकाल भयान वास्तव समोर आणले यातून एका जरी पोराने बोध घेतला तर तुमची मेहनत कामयाब झालीच खूप छान एपिसोड एकदम झक्कास कधीच रडत नाही मी पण केव्हा डोळ्यात पाणि आल कळलच नाही

  • @umeshmali5476
    @umeshmali5476 Год назад +2

    वाईट आहे पण अगदी सत्य परिस्थिती आहे ही सध्याची, आजुबाजूला हेच बघायला लागतय. त्यातून पण काही चांगली मानसं आहेत समजात पण बोटावर मोजण्या इतपत. खुप छान एपिसोड होता👌👌🙏

  • @chhayanetak8886
    @chhayanetak8886 Год назад +3

    खुप छान भाग आहे , खरंच जन्मदात्या ला‌ कधीच विसरू नये आपल्या इच्छा आकांक्षा गरजा बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या पुर्ण गरजा भागविण्यासाठी आयुष्य भर कष्ट करतो तो बाप असतो ,🙏🙏🙏👍👍

  • @bhimrajgaikwad4661
    @bhimrajgaikwad4661 Год назад +2

    बाप या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे
    आणि ते तुम्हीं प्रकारे मांडले 👍👍 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashokjopale6711
    @ashokjopale6711 Год назад +6

    पुरूष कमवायला लागला की सगळ्यांत आधी आपल्या बायकोच्या गरजा पूर्ण करण्याच ठरवतो
    आणि
    बाई कमवायला लागली की सगळ्यात आधी तिला पुरुषाची गरजच नाही अस समजायला लागते
    सर्वात बेस्ट scene आणि डायलाँग या एपिसोड मधला

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 Год назад +2

    अप्रतिम लाजवाब स्टोरी आहे. जाम भारी. आपले व संपूर्ण टीमचे मनापासून आभार.

  • @nutanyadav6984
    @nutanyadav6984 Год назад +3

    वेळ आल्यावर च आपली माणसं कळतात.. heart touching episode

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Год назад +2

    नितीन भाऊ मन जिंकले तुम्ही कुपचं सुंदर अभिनय होता सर्वांचा एक लाईक सर्वांसाठी 👍👍🌹🌹🌹👌🙏🙏🙏

  • @Krushna_ghule_77
    @Krushna_ghule_77 Год назад +3

    यांच्या सारखे माणसं असल्यावर आपलं भारत कीती सुद्रन😍

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 Год назад +2

    हा भाग बघून सर्व नाती डोळ्यासमोरून गेली ..खरच डोळयात पाणी आले..

  • @suhaspatil4802
    @suhaspatil4802 Год назад +8

    संपूर्ण भाग संपेपर्यंत डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. कारण मीसुद्धा माझ्या वडिलांच्या वेळी हे सर्व अनुभवले आहे. मला भाऊ नाही खर हिमालयासारखी बहीण पाठीशी आहे आहे. फक्त नाना सारखी माणसे सांभाळून ठेवा अशा वेळेला पैसा आणि माणुसकीचा आधार महत्त्वाचा आहे.

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Год назад +2

    पवार सर आज चा भाग फार सुंदर वाटला .सर्वांची कामे फार सुंदर साकारली छान छान

  • @sandipg1731
    @sandipg1731 Год назад +4

    खरंच खूप छान आहे एपिसोड
    शब्द नाहीत उरले बोलायला

  • @harishkarande7284
    @harishkarande7284 Год назад +2

    अप्रतिम कलाकारी डोळ्यात पाणी आलं राव.

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 Год назад +3

    Amol dada great aha tu motha bhau mhnun ani dada tuzi bayko pan ..mothi asun ek shabd nahi kadhla nahi ...hich sanskruti gavakadchi disun ali ......khup chan hota hai bhag

  • @sudhakarkoke7146
    @sudhakarkoke7146 Год назад +2

    नितीन सर खरच तुम्हाला सलाम आहे. तुम्ही गावाकडील खरी परिस्थिती मांडतात प्रत्येक वेळेला 🙏👌

  • @pratikghadge9328
    @pratikghadge9328 8 месяцев назад +7

    टाईमपास आणि सातारची आठवण म्हणून ह्या वेब सिरीज पाहायला सुरुवात केली होती पण इथून जगण्याचे आणि वागण्याचे कित्येक धडे मिळून गेले

  • @ramdasjagadale2466
    @ramdasjagadale2466 Год назад +2

    अप्रितम ,शब्दात तूमंचे अभिनंदन करणं कमी आहे ,खूप मस्त ,जीवनात काय सत्य चालू आहे ते दाखवलं ,सलाम टिम कोरी पाटि

  • @harshavardhanatkar1700
    @harshavardhanatkar1700 Год назад +4

    खूप छान एक्टिंग करता सर्व कलाकार अमोल दादा आणि त्याच्या पत्नी चे पात्र करणाऱ्या ताई ची खूप निरागस ऐक्टिंग आहे

  • @mich_amar
    @mich_amar Год назад +1

    अप्रतिम सर्वश्रेष्ठ जबरदस्त...सगळ्या व्याख्या फिक्या या भागा पुढे....एकदम भारी मांडणी...

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +8

    काही नोकरदार मुलींना घमंडीपणा लय असतो. अमोल आणि त्यांची पत्नी यांच्या चेहरा सांगून जातो घरातल्या प्रमुख माणसाची काळजी.

  • @myoutube7882
    @myoutube7882 Год назад +2

    नितिन बनसोडे सर तुमचा अभिनय खुप नैसर्गिक आहे तुमचा एपिसोड मला खुप आवडतो खुप नम्रता आहे तुमचा अंगी तुमच्या सारखे कलाकारांना कोरी पाटी पेक्षा मोठा मोठा प्लॅटफॉर्म मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    कोरी पाटी पण खुप मोठी आहे

  • @sandeepyadav-vz2qd
    @sandeepyadav-vz2qd Год назад +11

    एक स्त्री कारणीभूत असते घर तोडायला ...पण पुरष्यानी आपली अक्कल गहाण ठेवायची नसते ...

  • @yogie5055
    @yogie5055 Год назад +2

    डोळ्यातून पाणी आणले राव तुम्ही👌

  • @sagarchormale1909
    @sagarchormale1909 Год назад +4

    मला आवडलेला सगळ्यात भारी एपिसोड

  • @machindranarhe387
    @machindranarhe387 Год назад +2

    काळजाला भिडणारा भाग 👍अप्रतिम

  • @rajugamare1375
    @rajugamare1375 9 месяцев назад +5

    दादा तुम्ही तुमच्या वडिलांसाठी धावपळ केलात तेच पण माझ्या वडिलांसाठी धावपळ केली दादा मी तुमची मालिका बघत होतो तर माझ्या वडिलांची मला आठवण आली मी मालिका बघता बघता मी खूप रडलो दादा तुम्ही मालिका काढली खूप छान खूप सुंदर दादा 🌹🌹🌹🌹💙👌👍👍🙏🏻
    ....... धन्यवाद ... 🙏🏻
    🌹🌹🌹

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 Год назад +2

    खूप छान अगदी मनाला हेलून टाकणारा
    आजचा भाग होता
    १. ..८. भाग अगदी मनाला लागणारे आहेत खूप छान
    All the best team