Kamalgad Fort Trek : Best trek around Wai | वाई | सह्याद्री | महाबळेश्वर | Dhom Dam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 фев 2024
  • #Kamalgad #trekking #sahyadri #tourism #maharashtra
    सह्याद्रीमध्ये भटकायला सुरुवात करुन आता जवळपास एक तप उलटला. वयाच्या विशीतून आता तिशी उलटली तर अजूनही कोणत्याही नव्या ट्रेकला जायचा म्हटलं तरी कंटाळा येत नाही.
    रविवार असला तरी भल्या पहाटे मोठ्या उत्साहाने आवरुन घराच्या बाहेर पडतो आणि काही तास या सह्याद्रीच्या जंगलात दऱ्या खोऱ्यात फिरुन आलं की एक नवं बळ मिळतं रोजच्या आयुष्याशी दोन हात करायला...
    अशाच एका पावसाळी रविवारी केलेल्या एका भन्नाट ट्रेकची गोष्ट
    ---------------------------
    कमळगड...
    सह्याद्रीच्या आडदांड रांगेत गडकिल्यांच्या रुपाने जवळपास साडेतीनशे गडकोट मोठ्या दिमाखाने उभे आहेत.
    या गडकोटांमधलं छोटसं पण देखणं असं पाषाणशिल्प म्हणजे कमळगड...
    महाबळेश्वराच्या आजूबाजूला जे पहारेकरी उभे आहेत त्यातला एक शिलेदार म्हणजे कमळगड
    अल्याड रायरेश्वर पल्याड महाबळेश्वर मध्ये उभा कमळगड अशी या गडाची रचना....
    धोम धरणाच्या पाण्यापाशी उभं राहिलं की समोर दिसतो कमळगड
    वाईवरुन निघालो धोम मागे टाकले आता रस्ता छोटा आणि जंगल दाट होत चालले होते.
    वाटेत एक मामा भेटले त्यांना रस्ता विचारला
    मामांनी सांगितलेल्या रस्तावर आम्ही आमची वाटचाल सुरु ठेवली.
    दहा वर्षापुर्वी या गडावर मी येऊन गेलो होतो पण तेव्हाचे मातीचे रस्ते कोरेकरकरीत झाले होते.
    धोम डॅमला चिटकून रस्ता पुढे सरकत जातो आणि सह्याद्रीचे वेगळंच रुप आपल्यासमोर उभं राहतं.
    हाच रस्ता आपल्याला नेतो आगोशी गावात आणि इथूनच सुरु होतो कमळगडचा थरारक ट्रेक
    कमळगडाचा पहिला टप्पा पार करुन गेलात की तुम्ही पोचता एका कातळभिंतीपाशी... इथेच सुरु होतो तो कमळगडाच्या चढाईचा थरार.... बारा ते पंधरा फूटांची ही कातळभिंत कोणत्याही मदतीशिवाय चढून जाणे हा थरारक अनुभव
    दगडाच्या खोबणीत पाय खोचायचे आणि शरीर पायावर जोर देत वर उचलायचे हे सोपं काम नाही
    त्यात एका बाजूला पावसाने निसरडा झालेला गुळगुळीत
    अकोशी गावातून निघाल्यापासून सह्याद्रीच्या माथ्यावर पोचयाला आम्हाला तब्बल दोन तास लागले होते. त्यात मधला जीवघेणा कातळटप्पा...
    या चढाईमुळे आमच्यातल्या काही सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खुपच बोलकी आणि मजेशीर होती...
    कातळटप्पा चढून गेलात की सह्याद्रीच्या माथ्यावर तुम्ही पोचता.
    या माथ्यावर आहे सह्याद्रीत दुर्मीळ होत चाललेल्या सदाहरित जंगलाचा पट्टा....
    या सदाहरित जंगलात चालत जाणे म्हणजे अक्षरश; अँमेझ़ॉनच्या जंगलाचा फील येतो.
    कमळगडावर ऐतिहासिक अवशेष आजमितीला फारसे उरले नसले तरी हे जंगल हेच इथले खरे वैभव....
    या जंगलाच्या मधोमध वसला आहे एक धनगरवाडा....येथेच नांदवणे वरुन येणारा रस्ता मिळतो.
    या धनगर वाड्यातले धनगर नुसती हाक टाकली तरी मदतीसाठी तत्पर असतात.
    धनगरवाड्यापासून अजून निबड जंगलातून रस्ता वर जातो आणि एका पडझड झालेल्या दरवाज्यातून आपण अलगद कमळगडाच्या माथ्यावर पोचतो.
    कमळगडावर पोचलो तेव्हा स्वागताला उभा होता तो भन्नाट बोचरा वारा आणि धुक्याची चादर...
    खोटं वाटेल पण माथ्यावर उभं राहता येत नव्हतं इतक्या जोरात वारा होता
    या कमळगडाच्या माथ्यावर गडाचे असे काहीही अवशेष उरलेले नाहीत.
    गडाच्या दक्षिण दिशेला कातळाची नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे.
    या भिंतीवर बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. दक्षिणेकडे एका टोकाला एका वाडाचा चौथरा केवळ शिल्लक आहे.
    कमळगडाच्या नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे.
    पण याशिवाय याच माथ्यावर आहे एक अद्भूत असा चमत्कार...
    कमळगडाच्या माथ्यावर जमिनित हे भुयार गेलं आहे. या भुयाराला जवळपास ६० ते ७० पायऱ्या आहे. जमिनित ७० ८० फूट खोल गेलेलं हे भुयार म्हणजे एक विहीर आहे.
    ही विहीर गेरुची विहीर आहे. या विहीरत उतरत गेलं की अंगाला लाल रंग लागत जातो आणि तळाशी आहे थंडगार पाणी.... काहीशे वर्षापुर्वी ही विहीर का खणली असेल कशी खणली असेल ही विचार करत तुम्ही ही विहीर उतरता.
    कमळगडावरची विहीर बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाट आता पायाखालची असल्यामुळे झरझर उतरलो आणि गावात पोचलो.
    परतीच्य वाटही तितकीच मोहक होती. धोम काठचा डोंगर हिरवा शेला पांघरुन बसले होते.
    मनात रेंगाळणारा तो धिप्पाड कमळगड आणि त्यासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण घेऊन आम्ही पुण्यात पोचलो ते नव्या ट्रेकसाठी
    तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स कळवण्याचा अजिबात कंटाळा करु नका. आणि आमचा हरिफी हे युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

Комментарии • 19

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 5 месяцев назад +1

    मस्त.

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 5 месяцев назад +1

    खुप छान आहे कमळगड..

  • @user-pw6vb2yi5f
    @user-pw6vb2yi5f 5 месяцев назад +1

    मावळे.अभिनंदन 👍 👍

  • @pratikdeshpande2760
    @pratikdeshpande2760 5 месяцев назад +1

    Superb

  • @Pri_yan_ka_j
    @Pri_yan_ka_j 5 месяцев назад +1

    Nice vlog👌🏻

  • @nileshgulajkar1253
    @nileshgulajkar1253 5 месяцев назад

    खूप छान

  • @pradipdhakane9833
    @pradipdhakane9833 5 месяцев назад

    मस्तच......👌👌

  • @shubhad3773
    @shubhad3773 4 месяца назад

    मस्त 👌👍

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 5 месяцев назад +1

    माथ्यावरचा view मस्त 👍🏻👍🏻👌🏻

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      धन्यवाद चैतन्य....चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करा

  • @manjirikarambelkar6572
    @manjirikarambelkar6572 5 месяцев назад +1

    अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      धन्यवाद !!!! चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करा

  • @user-jc7up8dv8p
    @user-jc7up8dv8p 5 месяцев назад

    खुप सुंदर
    तूझ्या या चॅनलला शुभेच्छा

  • @chinmaypandit6308
    @chinmaypandit6308 5 месяцев назад +1

    Superb content Rohit❤

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      Thanks Chinmay

  • @atuljoshi6938
    @atuljoshi6938 5 месяцев назад

    जबरदस्त रोहित राव रायगड ट्रेक करा खूप छान आहे.

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      रायगडला नेहमीच जाणं होतं यावेळेस ब्लॉग करायला जाऊ.

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      आमचं चॅनेल नक्की सबस्काईब करा

  • @user-if8nv9rk4v
    @user-if8nv9rk4v 5 месяцев назад

    मस्त 👌