कमळगड-घनदाट जंगलातील पाषाण पुष्प । Kamalgad trek | Jungle Trek | कावेची विहीर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #kamalgad #jungle #jungletrekking #jungletrek #fort #kamalgadtrek #chatrapati #maharashtratourism #fortsofmaharashtra #forest #forts #denseforest #shivajimaharaj #forest #kamalgadtrek
    कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर डोंगररांगातील एक किल्ला आहे.
    नाव - कमळगड
    उंची - ४२०० फूट
    प्रकार - गिरीदुर्ग
    ठिकाण - वाई, महाराष्ट्र
    जवळचे गाव - नांदगणे,वाई,महाबळेश्वर
    डोंगररांग - महाबळेश्वर
    महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते
    छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन् किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात
    धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.
    गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -
    दोन तासांच्या जंगलातील भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहचता येते. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदऱ्यांचा सुंदर मुलूख दृष्टिपथात येतो. अन्य किल्ल्यावर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत.
    गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० - ५५ खोलखोल पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.
    गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.
    माहिती संदर्भ -
    विकिपिडिया
    Music Credits -
    Music: Mumbai
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....

Комментарии • 16